" भंकस सिनेमा "

Submitted by रुपाली अलबुर on 9 July, 2010 - 07:37

"आय हेट लव्ह स्टोरी " सिनेमा पाहताना मला सहज सुचले कि असे किती तरी " भंकस " वाटणारे सिनेमे आपण पाहतो आणि कुठून बुद्धी झाली आणि हा सिनेमा पहिला असे वाटते . असे सिनेमे थेटरात जाऊन पाहण्याची दुर्बुद्धी प्रत्येकाला एकदा तरी झाली असेलच . तुम्हाला असे होते का ?? कोणी कोणी भंकस सिनेमे चक्क थेटरात जाऊनपाहिलेत ??

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिल बोले हडिप्पा - एकदम सिली मूव्ही! (शूटींग चालू असताना कुणालाच कशी कल्पना आली नाही की आपला सिनेमा भंकस असणार, पडणार म्हणून ... Sad )

ता रा रम पम - नेहमीप्रमाणे यशराज फिल्म्सची उच्च निर्मितीमूल्यं वगैरे! ती काय चाटायचीयेत?? Lol

शूटींग चालू असताना कुणालाच कशी कल्पना आली नाही की आपला सिनेमा भंकस असणार, पडणार म्हणून ...
>>
याच्या मेकिंग मधे रानी मुखर्जी चा इंटर्व्ह्यू दाखवला होता...
ती म्हणे हा डायरेक्टर कित्त्त्त्ती क्यूट आहे... याच्या फाईल मधे पहिल्या पानावर साईबाबा आणि मातारानी चे फोटो असायचे... जर एखादा सीन चांगला जमला तर तो म्हणायचा 'माता की कृपा से' आणि एखादा सीन जर नीट नाही झाला तर म्हणायचा 'अगले टेक मे बाबा देख लेंगे'...

जर हा असा डायरेक्शन करणार असेल तर सिनेमाचं कंदाळ नाही होणार तर काय होणार...

रुपाली,
मी तर गेल्या ३ वर्षात (लग्न झाल्यानंतर) एकच सिनेमा पाहिलाय..तो म्हणजे "विवाह" !
खुपच आवडला ! गाणे तर खासच !
Happy

थेटरात जाउन माझे पैसे वाया गेलेले सिनेमे
१. गायब (रागोव+तुक+अंमा)
२. जीना सिर्फ मेरे लिये (तुक+कक)
३. वादा (अमिशा +अर्जुन+ संजय खान सुपुत्र-नाव आठवत नाहि)
४.हाउस्फुल (अक्शय+रीतेश्+अर्जुन्+कमी कपड्यातल्या नट्या)

मला सांगायची अतिशय लाज वाटते आहे, असा भिकार सिनेमा थेटरमधे पाहिला होता मी.

मेरा पती सिर्फ मेरा है Blush अत्यंत भयंकर अत्याचार होता तो. मी इतकी वर्ष झाली तरी त्याचे आघात विसरु शकले नाहीए. Wink मिथुन आणि कोण ती पाकिस्तानी जाड आवाजाची गायिका-कम- अभिनेत्री. अगदी उग्र दिसायची ती.

मनिमाऊ, 'मेरा पती सिर्फ मेरा है' हा सिनेमा जीतेंद्राचा आहे. मिथुन सलमा आगाचे 'कसम पैदा करनेवाले की' वगैरे नावांचे महान सिनेमे होते.

नाही नाही, नाव चुकत असेल मग. त्यात मिथुन आणि सलमा आगा होते. फरहा त्याची बायको आणि सलमा आगा त्याचं प्रेम, असा त्रिकोण होता.

फुंक २

कोणे एके काळी एक शिणुमा आला होता........शक्यता आहे कोणाला तो माहित नसेल्....पिक्चरचं नाव होतं "पेन्टर बाबू"......असेल हिम्मत तर सान्गा .......मी तो शिणुमामा पाहुन अजून जीवन्त आहे म्हणजे खरंच माझा मला अभिमान वाटतो......का लाज वाटली पाहिजे माहित नाही.....!! Sad

१. साडेसात फेरे
२. मनोरमा- सिक्स फीट अंडर..(की असंच काहीतरी)
३. अग्ली पगली (होपलेस, पांचटपणाची लिमिट, अर्धाच पाहिला)
४. मैने प्यार क्यु किया (हाय राम्..मैने ये पिच्चर क्यु देखा?) Angry
५. मेरे ब्रदर की दुल्हन (याविषयी चिकवा वर सविस्तर लिहिलेय)
६. जिंदा (यानंतर असं वाटतं की मी कशाला मरायला पाहिला हा पिच्चर!) Sad
७. स.खान अन करीना चा कुठलातरी..ज्यात कुणीतरी वेडा/डी असतं..भयंकर सिनेमा Angry
८. बॉडीगार्ड (अर्धाच झेलु शकले)
९. नो स्मोकिंग (हा पण अर्धाच झेलु शकले)
१०. मालामाल वीकली (यात हसायला कमी येतं, इरिटेट जास्त होतं).

हे सगळे तिकिटं विकत घेऊन झेललेले आहेत..मोस्ट्ली भैताड ग्रुपमुळे.. Wink Sad

अजून बरेच आहेत पण हे अगदी टॉप टेन वगैरे आहेत..

नताशा, यातील 'मालामाल वीकली' हा मी पहिल्यांदा पाहिला तेव्हा माझे असेच मत झाले होते. पण नंतर पुन्हा पाहिला आणि आवडला. ओम पुरी, परेश रावळ, अरबाज खान, असरानी, सुधा चंद्रन, राजपाल यादव ई.ची कामे मस्त झाली आहेत.

हो. बर्‍याच जणाना आवडतो तो. शिवाय वरच्या लिस्टमधल्या सल्लुपटांचेही फॅन आहेतच.
पण मला अनेकदा तर असं वाटतं की तिकीट काढून तर जाऊच दे पण हे चित्रपट बघण्याबद्द्ल बक्षीस म्हणून मलाच पैसे मिळावेत. फुकट दाखवले तरी नाही बघणार. पैसे मिळणार अस्तील तरी "विचार करीन." Happy

फार पूर्वी रामसेंचा एक 'टेलिफोन' नावाचा चित्रपट आला होता तो नीलायम थेटरला पाहिला व तरीही घरी सुखरूप पोचलो.

बाकी काही लिहीत नाही.

Rofl

मग तो 'पती, पत्नी और तवायफ'! (कसलं भीषण नाव आहे ना? ) >>> अगं मी तपासलं गुगलवर. हेच नाव आहे. नाव जेवढं भीषण, तेवढाच सिनेमा आणि ती सलामा बेगम तर त्याहुन भीषण दिसते.

मेरा पती सिर्फ मेरा है मधे राधिका नामक नटी होती. तिची भयानक हेअर-स्टाइल बघून मी चक्रावूनच गेलो होतो. तिच्या वेणीची टोके जमिनीला समांतर रहायची आणि स्प्रिंग सारखी वेणी हलायची. त्या आधी सन्यासी/फकीर वगैरे लोक आपल्या जटा वडाचा चीक लाऊन वळतात हे माहित होते पण हा मात्र त्याहून भयानक प्रकार होता. अशी हेअर-स्टाइल असल्यावर 'पती तेरा होना तो दूर की बात है, तेरेको पती मिलाहीच कैसे?" असाच प्रश्न पडायचा.

तिच्या वेणीची टोके जमिनीला समांतर रहायची आणि स्प्रिंग सारखी वेणी हलायची.>>> Lol

ही राधिका म्हणजे "मुखडा चाँद का टुकडा, मेरे नैन शराब के प्याले" वालीच ना? या गाण्यात तिच्या वेणीचे वर्णन असेल तर शोधायला पाहिजे Happy

माधव, राधिकेची भन्नाट हेअरस्टाईल असलेला सिनेमा म्हणजे 'मेरा पती..' नोहे, तो 'नसीब अपना अपना'... त्यात ऋषी कपूर आणि फरहा होते.

त्याच सिनेम्यातले हे महान गाणे. आपापल्या जबाबदारीवर पाहणे.

श्रध्दा असे आहे का? बरं!
पण मला आठवतय ते गाणे एकदम रडके होते. त्यात ती बाई साडीत वगैरे होती आणि वर ती फ्येमस वेणी.
हे गणे पण जबरी आहे. गायरोस्फीअर च्या जनाकाला त्याची कल्पना हे गाणे बघूनच सुचली असणार.

Pages