" भंकस सिनेमा "

Submitted by रुपाली अलबुर on 9 July, 2010 - 07:37

"आय हेट लव्ह स्टोरी " सिनेमा पाहताना मला सहज सुचले कि असे किती तरी " भंकस " वाटणारे सिनेमे आपण पाहतो आणि कुठून बुद्धी झाली आणि हा सिनेमा पहिला असे वाटते . असे सिनेमे थेटरात जाऊन पाहण्याची दुर्बुद्धी प्रत्येकाला एकदा तरी झाली असेलच . तुम्हाला असे होते का ?? कोणी कोणी भंकस सिनेमे चक्क थेटरात जाऊनपाहिलेत ??

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२)प्रिन्स (विवेक ओबेरायचा लेटेस्ट. हा चित्रपट पाहून बाहेर आल्यावर स्वतःच्याच कोडगेपणाचे आश्चर्य वाटले.)

ज्ञानेश.. तुझे हे वाक्य वाचुन जबरी हसलो...:हहगलो:

आगावा मीही आधी स्टॅमीनेबाज होतो. पण टशन पासून खूप मोठ्ठा सदमा पोहोचलाय!

अर्बिट.. Biggrin

शुभंकरोती.. भंकस दॅन भंकसेस्ट Biggrin

मी अजूनही स्टॅमिना आणि जोश टिकवून आहे...

आज पर्यंत एकदाही सभात्याग केलेला नाही...
अँखियोंसे गोली मारे ला मात्र मी १५ मिनिट डुलकी मारली होती...
भर थेटरात धाराशायी होण्याचा हा एकमेव प्रसंग...

पण यानंतर जबरा मेहेनत घेऊन मी रगोव की आग, कर्झ्झ्झ, रेडियो, हां मैने भी प्यार किया है, टशन... इत्यादी बरेच शिणूमे गारद केले...

मी 'हम लल्लन बोल रहे है' देखील पाहिला आहे...

अँकी Rofl

माझी लिस्ट -

बिवी नं. १ (डिसगस्टींग)
ब्लू (मोअर डिसगस्टींग)
धूम-१, धूम-२ (पब्लिक को पागल समझते हैं क्या...)
किडनॅप (अस्लंच काहीतरी...)

सुदैवानं यातला एकही मी थ्येट्रात जाऊन पाहिलेला नाही.

अजून आठवलं की लिहीन.

सुदैवानं यातला एकही मी थ्येट्रात जाऊन पाहिलेला नाही>>
ललिताजी, फक्त थेट्रात जाउन पाहिलेला भंकस सिनेमा लिहायचाय इथे, तसे तर मग 'दुलहा मिलल दिलदार' पासून 'पोलर स्टॉर्म' पर्यंत शेकडो भंकस मी टिव्ही-लॅपटॉपवर पाहिलेत Proud

बिवी नं. १ (डिसगस्टींग)
>>>
मी तर बीवी नं.२ पण पाहिलाय... तो ही थेट्रात...

Rofl

अरेरे॓!!! काय लोक आहात तुम्ही???

इतक्या सुंदर सुंदर कलाकृतीना चक्क भंकस असे नाव देताय??? किती मेहनत केली होती त्या दिगदर्शकाने/निर्मात्याने आणि कलाकारानी असे मनोरंजक चित्रपट बनवताना याची तुम्हाला कल्पना आहे का?

असे चित्रपट पाहण्यासाठी एक वेगळी दृष्टी लागते. ती मायबोलीवर फारेंड, श्रद्धा, स्लार्टी आणि अंकूकडे आहे (इतरही बरेच आहेत, हे लोक जरा जास्तच!!)

. हे खालचे नमुने वाचा. आयुष्यात कधीच कुठल्याच सिनेमाला तुम्ही भंकस म्हणणार नाही.

जानी दुश्मन!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/138825.html?1211419972

खुशी.
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/135615.html?1197493261

धूम २
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/126050.html?1179926182

रागोव की आग.
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/131154.html?1188887125

द बर्निंग ट्रेन
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/135954.html?1199503254

वीराना
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/130718.html?1191878039

महाराजा
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/125942.html?1180561880

आपका सुरूर
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/129648.html?1204752824

कुछ कुछ होता है
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/135619.html?1197570425

बाकीच्या लिंक तुम्हीच शोधा. (आणि वाचा!!)

मी पाहिलेला सगळ्यात भंकसातला भंकस सिनेमा म्हणजे मी नवर्‍याबरोबर गोव्याला तिथल्या थेटरात आवर्जून पाहायला गेले असलेला.........

राकेश रोशन चा "कोयला"......... बचाsssssssssव! पैसे, वेळ, मनःशांती सगळं वाया...

माधुरी साठी पहिला अर्धा तास सहन केला पण ती स्क्रीन वर दिसल्याक्षणी थेटरातून बाहेर पड्लो आम्ही Sad

दिलसे (सापेक्षता दिसते ती इथे ;))
तारारमपम (अती बळंच)
कुछ कुछ होता है! (संताप आणणारा अतीदिजगस्टींग सिनेमा आहे :राग:)
चुरा लिया है तुमने (हा सिनेमा कोणी पाहिलाय?????????? आम्ही पाहिला- फर्स्ट डे लास्ट शो- तेव्हा ताज्या ताज्या सिनेमाच्या नाईट शोला आम्ही धरून आठ जण होते हो!!!!!! :खोखो:)
मेरा नाम है अ‍ॅन्थनी!!!!! (अजून कोणी पाहिलाय हा थेटरात? हात वर करा, मिळून चुकचुकू :फिदी:)

नन्दू, मस्त लिंक्स, धन्स Happy

पूनम,

चुरा लिया है तुमने मधे संजय खानची पोरगी आणी हेमामालिनीचा पोरगा आहेत!!! मी तो पण थेटरात पाह्यलाय.

मेरा नाम है अँथनीला शाहरूख खानने इतकी प्रसिद्धी दिली होती की... बास. पिक्चर आपटलाच. (मी.तो.प.थे.पा.)

त्याशिवाय मी रूबरू (यामधे शायना गोस्वामी आणि रनबीर हूडा होते) थेटरात पाह्य्ला. भूतनाथ, आपका सुरूर, सावरिया (हा तर प्रीमीयरला पाह्यला), करीब, रागोव की आग(खरंतर सर्वच रागोव फॅक्टरीचे सिनेमे), अपरिचित, दशावतारम, मा तुझे सलाम, गझनी, दिल्लगी, काल, तीन पत्ती, सलामेश्क हे असे सर्व सिनेमे थेटरात पाहिलेले आहेत. अजून बरेच आहेत. हे फक्त आता लक्षात आले म्हणून!!!.

(प्लीज नोटः घरी टीव्ही/केबल/डीव्हीडीवर पाहिलेले चित्रपट यात धरलेले नाहीत)

मात्र, यापैकी कुठल्याही सिनेमाला मी भंकस अथवा फालतू म्हणत नाही, या सिनेमानी आनी त्याच्या आठवणीनी माझं भरपूर मनोरंजन केलय. आत्ता देखील हे सिनेमे आठवताना त्यापैकी कितीतरी आठवणी जागृत झाल्या.

उदा. दशावतारम्मधे कमल हासनचे "मानो तो भगवान" गाणं आणि त्यावर असिन थोट्ट्मकलचे धाय मोकलून रडणे Proud नंतरच्या जन्मात तिचे भगवानजी म्हणत म्हणत आचरटपणाचे नवनविन फंडे.

युट्युबवर बघितलेले भंकस सि. इथे लिहुन चालत नाहीत ना?
चालत असल्यास - > चोर मचाए शोर :अओ:, लव इन टोकियो (हा सीडी आणुन बघितलेला) Uhoh
काही वाट्टेल ते आहे यात...

पण मी वरच्यातले बहुतांश बघितलेले नाहीयेत.

आगावा, मी फकस्त जुनी मायबोली धुंडाळली. नविन मायबोलीवर पण धम्मालच चित्रपट आहेत. Happy

चिकवाचे अर्ध्याहून जास्त पोस्ट इथे लागू पडतील खरंतर!!

नविन माबोवरील धमाल
http://www.maayboli.com/node/2516 -ढाई अक्षर प्रेम के
http://www.maayboli.com/node/7826 -धरमवीर
http://www.maayboli.com/node/2255 -जूनुन
http://www.maayboli.com/node/3640- जन्नत
http://www.maayboli.com/node/6836 -शर्त द चॅलेंज
http://www.maayboli.com/node/3882 -किडनॅप
http://www.maayboli.com/node/11435 - कातिलोंके कातिल
http://www.maayboli.com/node/7678 - नजराना
http://www.maayboli.com/node/9767 -लक

माझे काही थेटरातले, घामाचे पैसे देऊन पाहिलेले फर्स्ट डे फर्स्ट/लास्ट शो-

अलबेला (गोंद्या चा)
सलाम ए ईष्क
ता रा रम पम
मंगल पांडे द रायझिंग
डुप्लिकेट
दिल मांगे मोअर
कुछ खट्टी कुछ मीठी
एक और एक ग्यारा
राजा भैय्या
कॅलकटा मेल
हे बेबी
कुछ ना कहो
ढोल
टशन
फूंक
जमीन, एक्सक्यूज मी (हे दोन्ही एकाच दिवशी, एकाच थेटरात १२ आणि ३ चा शो)
रन
शादी नं.१
किस्मत कनेक्शन
...

अजूनही असतील... सध्या एवढे आठवताहेत...

अरे कुणीतरी....बस इतना सा ख्वाब है बघा...बाहेर पाऊस सुरु होता म्हणुन थेटरात कसा वेळ काढला माझे मलाच माहीत

बागबान (फर्स्ट डे)
गरम मसाला
सावरीया
पार्टनर (सल्लू - गोंद्या)
खाकी
वजूद (माधूरी- नाना पाटेकर)
राजू चाचा

किडनॅप...... बेक्कार
माय नेम इज खान.... बकवास.
यापेक्षा जास्त फडतूस पिच्चर थेटरात पाहण्याइतकं कमनशिब अजून अनुभवलं नाही. टचवूड Happy

'मंगल पांडे' ह्या अत्याचाराला कशी विसरू शकेन मी?
सिनेमारूपी अत्याचार कमी होता म्हणून की काय थेटरात पहिल्या रांगेत बसून हा पिच्चर पाहिला होता..... पहिल्या दिवशीचा शो. Sad
पडद्यावर दोन पात्रांचा संवाद सुरू असताना आम्ही टेनिस मॅच पाहिल्यासारखे इथून तिथे मान वळवत होतो. मध्येच मला झोपही लागली होती

मेरी तरफसे कुछ और...

प्लॅटफॉर्म
जिगर
हमसे है मुकाबला
विरोधी (अरमान कोहलीचा)
संगीत (माधुरी दिक्षितचा)
वक्त हमारा है
प प प पीया... ज ज ज जीया गाण्याचा सचिनचा हिंदी चित्रपट (नाव आठवत नाही)
रंग
इज्जत (जॅकी श्रॉफ चा ... मैने साले पे रंग डाला.... या गाण्याचा चित्रपट)
लुटेरे
तहलका
दौलत की जंग

इत्यादी इत्यादी...

माझी यादी

ये सिलसिला हैं प्यार का (करिश्मा, चंद्रचूड)
आरजू (अक्षय, माधुरी आणिक कोण तरी.... सैफ??)

हे दोन्ही चित्रपट ओळीने पाहिल्यानंतर पुढे ३-४ महिने थेटरात जायची हिम्मत केली नव्हती Happy

जानम समझा करो (सलमान उर्मिला - कास्ट बघूनच यावर अजून काही न लिहिलेलेच बरे :))
हद कर दी आपने (गोंद्या आणि राणी)
चल मेरे भाई (सल्लू, संजू, करिस्मा)
अँथनी कौन हैं (संजू, अर्शद)
प्यारे मोहन
तहजीब (फर्स्ट डे लास्ट शो... आज एक तरी सिनेमा पहायचाच असे म्हणत सर पे कफन बांधून निघालेलो... येताना त्यातच गुंडाळून आणावे लागले नाही हेच नशीब Happy )
अलबेला (गोंद्या)
बूम (ह्याबद्दल काही न लिहिलेले बरे Happy काही काही सीन चांगले होते Happy )

जुन्यांमध्ये
जागिर (मिथुन्,धर्मेंद्र)
किमी काटकर, जितेंद्र चा एक (नाव आठवणे शक्य नाही :))
कसम पैदा करनेवाले की (डबल मिथुन)
आज के अंगारे (हा म्हणे लहान मुलांचा चित्रपट होता Happy )

त.टी : फारेंड आणि श्र ह्यांनी हे सर्व सिनेमे लवकरात लवकर पाहून त्यांचा लेखाजोखा पेश करावा...

........हुकुमावरूण

Pages