पनीर माखनी

Submitted by सायो on 14 July, 2008 - 23:55
paneer makhani
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

जिरं १ टिस्पून, तमालपत्र १,२ , टोमॅटो प्युरे १ मध्यम कॅन, ८,१० काजू पाण्यात भिजवून मग पेस्ट करुन, लाल तिखट-चवीप्रमाणे, हळद १ टीस्पून, कसूरी मेथी १,२ टेबलस्पून, फ्रेश /हेवी क्रिम साधारण १ कप, पनीर साधारण पाव किलो किंवा १५,२० तुकडे ,(जशी ग्रेवी हवी असेल त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त करावं), मीठ चवीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

एका पातेलीत तेल गरम करुन त्यात जिरं ,तमालपत्र घालून फोडणी करावी. त्यावर टोमॅटो प्युरे घालून झाकण घालून थोडा वेळ उकळी काढावी. मग त्यात हळद, लाल तिखट घालून नीट मिक्स करुन काजू पेस्ट घालून पुन्हा उकळी काढावी. नंतर त्यावर कसूरी मेथी हाताने चुरुन आणि फ्रेश क्रिम घालून पुन्हा शिजू द्यावे. चवीप्रमाणे मीठ घालून सर्वात शेवटी पनीरचे तुकडे घालावेत व पुन्हा झाकण घालून शिजवावे.

वाढणी/प्रमाण: 
३,४ माणसांसाठी
अधिक टिपा: 

लागणारे जिन्नस हे अंदाजे आहेत. आपल्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करावं. तांच अमेरिकेत इंडियन ग्रोसरीमध्ये किंवा अमेरिकन ग्रोसरीमध्ये हेवी क्रीम मिळतं ते वापरावं.

माहितीचा स्रोत: 
मूळ रेसिपी संजीव कपूरची. त्यात काजू पेस्ट घालणं हे माझं version.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक एक डाऊट येताहेत.
१) पनीरच्या ऐवजी बटाटा चालेल का? घरात पनीरची भाजी आधी कधी केली नाहिये. घरातल्यांचा सपोर्ट कितपत मिळेल ही शंका आहे. :-|
२) हेवी क्रीम कुठे मिळतं? काय म्हणून मागायचं दुकानात? घरची घट्ट साय फेटून घेतली तर चालेल का?

लोको, मी आत्ताच बनवलीये पनीर मखनी सायो च्या या कृतीनुसार.
हा घ्या फोटो:

Paneer Makhani.JPG

खाऊन झाली की कशी लागली ते पण लिहेन Happy

माझ्या पद्धतीने केलीय ही भाजी. मी कसुरी मेथी वापरली नव्हती कधी, आता पुढच्या वेळी. ती टोमॅटो किसायची कल्पनाही मस्त!
हो बल्कमध्ये करायला झटपट आणि सोपी आहे.

मीरा, मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे कल्पना नाही पण तसं वाटत नाही. ज्यांना माहिती असेल त्यांनी प्लीज उत्तर द्या.

चिकन शिजवून घेतले तरी चालेल, पण चव थोडी वेगळी येईल. मी नेहमी चिकन चे छोटे लांबट तुकडे करते , त्याल मीठ, हळद आणि मीरेपूड लावते आणि नॉनस्टीक पॅन मध्ये अगदी थोड्या तेलावर भाजते, रंग बदलला ( अर्धवट शिजले) की करीत टाकते आणि पूर्ण शिजवते.
मूळ संजीव कपूर च्या रेसिपीत मध पण आहे. खुपच मस्त चव येत, मध घतल तर Happy

चिकनला थोडा तंदूरी मसाला लावून थोडावेळ मॅरीनेट करायचं. नंतर अवनमधे ग्रिल करून त्याचे तुकडे करून ग्रेव्हीत घालून एक उकळी आणायची. चिकन शक्यतो हाडांसकट घ्यावं म्हणजे ग्रिल करताना कोरडं होत नाही.
मधुरा म्हणते त्याप्रमाणे ग्रेव्हीत मध वापरलं तर छान चव येते.

आली का पनीर मखनी वर.... शोधुन दमले मी Happy
२/३ दा बनवली. झक्कास झाली. धन्यवाद सायो.
मी कांदा लसुण पण टाकला. काजु टाकले नाहीत . तरीही छान झाली.

कसूरी मेथी नव्हती पण ती टाकली की ह्या रेसीपीला हवे ते बरोब्बर फिनिश येणार. आता मेथी त्यासाठी घेऊन येऊन परत करणार. त्याबरोबर गरम गरम पुदिना पराठा पण मस्त लागेल.

कसूरी मेथीने एक वेगळीच चव येते त्यामुळे ती शक्यतो न घालता करु नये असं मला वाटतं. कुठल्याही टाईपचा पराठा चांगलाच लागेल ह्याबरोबर.

एकदम मस्त झाली आत्ताच केली होती. पण मलाही थोडी साखर टाकावी लागली गेव्ही थोडी आंबट लागत होती मी टोमॅटो पेस्टचा छोटा कॅन वापरला होता (पण सगळा नाही) त्यामुळे आंबटपणा आला असेल का?

पनीर माखनी करून पाहिली. यम्मी झाली होती. मी पण थोडी साखर घातली होती. एक उत्तर भारतीय मैत्रिनी ने विचारल की कसली इतकी छान चव आली आहे. उरलेली भाजी घेऊन् गेली घरी. Happy

सायो काल केलेली ही भाजी. मी प्युरे ऐवजी टॉमेटो पेस्ट वापरली. ती थोडी जास्त झाली असं वाटतं कारण किंचित आंबट चव आलेली की ती येते तशीच?

बाकी आवडली मला त्यामुळे परत करून बघणेत येईल नक्की.

आडो, आंबट चव येऊ नये म्हणून क्रिम जास्त किंवा टोमॅटो पेस्ट कमी करावी लागेल तसंच काजूची पेस्ट घातली होतीस का?

हो ग, काजूची पेस्ट घातली होतीच मी. पनीर माखनीची कन्सिस्टन्सी कशी असते? कितपत पातळ किंवा दाट?

दाट असते. काजू, पनीर आणि क्रीममुळे वर थोडा तुपकट तवंग यायला हवा. तरंच ती चवीला रीच होते.

सायो, मस्त रेसिपी. मी पण साधारण अशीच करते. खूपच डायेट करायचं मोटिमेशन असेल तर काजू थोडेच आणि जास्त तीळ घेवून त्याची पेस्ट करते. शिवाय थोडा कांदा पण घालते पण तो आधी पाण्यात उकळवते आणि मग काजू/तीळाबरोबर त्याची पण पेस्ट करते. ती एका पंजू मैत्रिणीची टिप होती.

Pages