मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवर्‍याचे एक औषध बर्‍याच ठिकणी मिळाले नाही. मग एका दुकाणदाराला नाव आणि नंबर दिला. मिळाले तर मला फोन कर असे बजावले. दुसर्‍याच दिवशी त्याचा फोन , मिळाले औषध म्हणुन. मग गेले घ्यायला पण प्रिस्क्रीपशन नव्हते. तरी त्याने दिले.

पर्स मधे ठेवले आणि बील मागितले. बराच वेळ लावला बीलला. मधे मी एक्दा नाव नक्की करायला परत बाहेर काढले तर स्र्टीप फोल्ड झालेली Sad
मग हातातच ठेवली, उगी चुकीचे असेल तर परत नाही घेणार फोल्ड झालेली ( किती हुशार ना मी)

घरात गेल्यावर नवर्‍याने औषध मागितले. सगळी पर्स रिकामी केली पण गोळ्या काही मिळेनात. खाली गाडीत जाउन पाहिले. तरी नाही Sad

घरात आले फोन करायला घेतला तर एक मीस कॉल. दुकानदाराने सांगितले काउंटरवर विसरले होते Angry

नवीन लेखन वर क्लिक केलं तर सगळ्यात वर हे दिसलं ==>
मॉरीशस - डोळे झाकुन फोटो काढा.... नील वेद
तर "नील वेद" च्या ऐवजी मी "नील देह" असं वाचलं Rofl

मंडळी ,व्हॉल्वयुक्त भाताचा किस्सा विसरण्यासाठी त्यावर उतारा म्हणून नवरोबांचा किसा-
ऱोटरीच्या मीटिंसाठी आम्ही होस्ट होतो. फॉर अ चेंज स्नॅक्स घरून आणायचं ठरलं होतं. मी आप्पे चटणी आणि आंब्याचा केक असा असा बेत केला होता. केक ३/४ तरी लागणार होते. सगळं सामान व्यवस्थित गाडीपर्यंत नेता नेता जर गडबडच होत होती. सगळं नेलं. आता शेवटचा केक होतच आला होता. नवरोबांना म्हटलं, " मी गाडी काढते.(आमच्या घरातून गाडी काढणे हे एक दिव्य व वेळखाऊ काम आहे...पण तरी मला कुलपं वगैरे घालण्याचं बोरिंग काम आवडत नाही. ) तुम्ही फक्त ओव्हन बंद करून त्यातला केक घेऊन कुलपं, दिवे वगैरे नीट आवरून या." त्यांनी खूपच वेळ लावला...खाली आले हातात काळाकुट्ट केक.....म्हणाले , " मी ओव्हन बंद केला आणि सगळीकडचे दिवे पाहिले...सगळी दारं वगैरे पाहिली आणि केक बाहेर काढला तर हा असा....."
झा SSSSSSSSSलं! मी परत घरात गेले. अर्थातच कुलपं उघडून.....पाहिलं तर फ्रिजचं बटण ऑफ केलेलं.....ओव्हनचं चालूच! दोन्ही बटण जवळजवळ आहेत. नवरोबांनी फ्रिजचं बटण ऑफ केलं होतं!
याला म्हणतात काही सांगायला जावं तर टांगायला जातात!

वर्षे परत हेलपाटा घातलास ना >> नाही मी नाही घातला. दिरांनाच जास्त भावाचा पुळका, त्यांनी आणले जाउन Lol

मानुषी Wink

पण "सांगायला जावं तर टांगायला नेणे" या वाक्प्रचाराचा अर्थ वेगळा आहे ना. म्हणजे थोडंसं "ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो आपलंच खरं" या म्हणीच्या अर्थाची मिळता जुळता. थोडक्यात एखाद्याला चार भल्या गोष्टी सांगायला जावं तर त्याने आपल्या म्हणण्याचं असं काही पोस्ट मार्टेम करावं की परत त्याच्या वाटेला जाण्याचं आणि त्याला फुकटचा सल्ला देण्याचं आपन धाडसंच करू नये. बरोबरै का मी म्हणतेय ते. मला तरी असंच वाट्टंय. चुभूदेघे. Happy

हा माझ्या बाबांचा महान वेंधळेपणा.

खूपच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. तेव्हा दूधवाला पहाटे खूपच लवकर यायचा. पाच - साडेपाच वगैरे. दूधवाल्याने बेल वाजवली की बाबा उठायचे आणि आणि पूर्ण दरवाजा न उघडता सेफ्टी चेन असते ना त्यातून हात बाहेर काढायचे आणि दूधवाल्याकडून पिशवी घ्यायचे.

एकदा काय झालं की अशीच बेल वाजली आणि बाबा जाम झोपेत होते. किलबिलत्या डोळ्यांनी त्यांनी दार अर्धवट उघडून साखळीतून हात बाहेर काढला तर हातावर जोरात कुणीतरी चापट मारलीन्. पाठोपाठ "अहो सकळकळे, अहो सकळकळे" अशा हाका ऐकू आल्या. मग बाबांची झोप पसार झाली आणि झालेल्या आवाजाने मी, आई, बहिण असे सर्व उठून बसलो. घड्याळात बघितले तर पहाटेचे २ वाजले होते. दरवाजा उघडला तर दारात माझा मामा कातावून उभा होता. त्याचा रात्री जवळच्या एरियातला गाण्यांचा कार्यक्र्म उशीरा संपल्याने आणि शेवटची ट्रेन हुकल्याने तो बिचारा आमच्या घरी असा आड वेळी आला होता. तर बाबांनी दरवाजा वगैरे न उघडता साखळीतून हात बाहेर काढून वगैरे त्याचे जंगी (?) स्वागत केल्याने असा काय उचकला होता की बास रे बास. अर्थात त्यालाही खरा किस्सा समजल्यावर तो पण आमच्या हसण्यात सामील झाला.
अजूनही आईच्या माहेरचे एकत्र जमले की आमच्यात हा प्रसंग आठवून खूप हशा उसळतो. Rofl

काल मी नवीन कंपनी मध्ये रुजू झालो. लंच हून परत येताना रिसेप्शनच्या डावीकडच्या हॉल मध्ये माझं डेस्क आहे त्याऐवजी मी उजवीकडच्या हॉल मध्ये शिरलो, आणि माझ्या डेस्कवर असलेली बॅग दिसली नाही म्हणून चिंतामग्न झालो. Biggrin

पण लवकरच सगळ्यांच्या 'कुण्या गावाच्चं आलं पाखरू' टाईप नजरा पाहून मला काय गोंधळ झाला ते समजलं आणि "कुणालातरी शोधत होतो" असा आव आणून परत फिरलो Wink Proud

नाय नाय, मी हातावर लिहून ठेवलंय, 'डावीकडे वर्कस्टेशन आहे'.

च्यामारी, डावीकडे म्हणजे जिन्याकडे पाठ करुन की रिसेप्शनकडे पाठ करुन? Uhoh

असो. जाताना बघून ठेवतो आणि 'डावीकडे वर्कस्टेशन आहे (_ _कुठे पाठ करून ते या कंसात_ _)' असं लिहून ठेवतो हातावर हाकानाका Proud

असो. जाताना बघून ठेवतो आणि 'डावीकडे वर्कस्टेशन आहे (_ _कुठे पाठ करून ते या कंसात_ _)' असं लिहून ठेवतो हातावर हाकानाका
पुढच्या कंसात पाठ कोणाची तेही लिहून ठेव, नाहीतर रिसेप्शनिस्ट च्या.......

निंबूडा, तुमच्या किश्श्यावरुन मला माझाच हा किस्सा आठवला. पार्ल्यात टाकला होता आधी.
मी मध्यंतरी इथे मायबोलीवरुनच "इन्स्पिरेशन" घेऊन हाफ मॅरॅथॉन मध्ये भाग घ्यायचा असं ठरवलं होतं. ज्या दिवशी ठरवलं त्याच्या दुसर्‍या दिवशी लवकर उठून पळायला जायचा पिलान होता. एक्साईटमेंट इतकी होती की गजर न वाजताच उठलो. मला तसा बर्‍यापैकी नंबरचा चष्मा आहे, बिन चष्म्याचे, डोळे बारीक करुन सुद्धा जास्तीत जास्त घड्याळाच्या काट्यांचा नुसता अंदाजच बांधता येइल येवढच मला दिसतं. त्यात पहाटे अंधारच होता.
उठलो, दात घासले, एकदम शुज घालून, आय पॉड कानाला लावून तयार झालो.सगळ्यात शेवटी चष्मा चढवला अन घड्याळाकडे पाहतो तर रात्रीचे २.३० वाजेले होते. Proud पार्ल्यात, केलेल्या वेंधळेपणाची साक्ष देत पोस्टं टाकली अन परत झोपायला गेलो.

ओ दाजी! माझे मित्र मैत्रिणी सगळे तिथेच आहेत आणि शिवाय मला तेव्हा ह्या बाफं बद्दल माहिती नव्हती. Happy

>>असो. जाताना बघून ठेवतो आणि 'डावीकडे वर्कस्टेशन आहे (_ _कुठे पाठ करून ते या कंसात_ _)' असं लिहून ठेवतो हातावर हाकानाका
>>पुढच्या कंसात पाठ कोणाची तेही लिहून ठेव, नाहीतर रिसेप्शनिस्ट च्या.......<<

रिसेप्शनिस्टच्या पाठीत मला इंटरेस्ट नाय, कारण तो बुवा आहे Wink Proud

हा माझ्या काका-आजोबांचा वेंधळेपणा--
कुणीतरी गावतल्या कार्यक्रमाची आणि जेवणाची पत्रिका घेऊन आले होते. "डॉक्टरसाहेब, तुम्ही नक्की जेवायला या, रविवारच आहे, दवाखाना बंदच असतो.." वगैरे म्हणत होता.. आणि आजोबा म्हणत होते "अहो नाही जमणार , माझा सोमवार आहे त्या दिवशी" !! Proud Lol
इकडे तो पुन्हा म्हणतो, "अहो रवीवार आहे" तर हे म्हणतात, "हो ठीक आहे, पण मला सोमवार आहे..त्यामुळे नाही जमणार".. तो भांबावून गेला आणि घरातले सगळे हसून हसून बेजार झाले..
त्याचे असे होते की त्या दिवशी कसलासा उपास होता, तर उपास म्हणायच्या ऐवजी आजोबा सोमवार म्हणत होते (कारण ते दर सोमवारचा उपास करतात) Lol

ताजा ताजा वेन्धळेपणा.........आजच नविन घरात शिफ्ट झालोय... ईस्टातुन वेस्टात........ मुव्हर्स पॅकर्स वाल्यानी सगळे व्यवस्थित शिफ्टिन्ग केले (फक्त एक छोटी काच फोडली, आणि ते इतके हळहळत होते कि शवटी आम्हालाच त्यान्ची समजुत घालावी लागली कि असु द्या बाबानो काम छान आणि पटकन झाले......) असो. तर आप्ले काम चोख बजावुन हे गडी निघाले......मला हॉलमधल्या सिटिवर बसायची कोण घाई झालेली............ वरती प्लाय लावलेला नाही हे न बघता सरळ बसलो....आणि क्षणार्धात मी अखाच्या अखा सिटित होतो.........खाली डोके वर पाय......... ! नशिबाने डोके नाही आपटले मागे.

लिहयची हाताला एवढी खाज सुटली होती की सगळ्या बॅगान्च्या गराड्यात बसुन, काम कर जरा अश्या "सौ"च्या शिव्या खात पोस्ट्तोय.........!

वर्षु,मंदार, तुम्ही भ्रमर आणि मंडळी ....ऐका हो ऐका !
गेल्या दिवाळीच्या वेळी मी आणि माझा एक मित्र त्याच्या गाडीवरुन टिळक रोडवर मिठाई घेण्यासाठी गेलो, दुकानासमोरच्या गाड्यांच्या रांगेत गाडी लावली, मिठाई घेतली, बाहेर पडलो आणि मित्राने गाडी घेतली,मी ही बसलो,चालु केली, २-३ किलोमीटर गेल्यानंतर आमच्या सभ्य मित्राच्या लक्षात आलं (आवाजावरुन) की आपल्या गाडीत आणि सदरच्या गाडीत फक्त नंबराचा फरक आहे !

(मी मित्राला त्यावेळी म्हणालो ही गाडी घेईन मी पुढे घरी जातो ,तु ऑटोनी जा आणि ये आपली गाडी घेऊन !!
Lol

'आवाजावरून ओळखली गाडी??? Lol Lol
आणी तू कशाला ती गाडी घेऊन पुढे जाणार होतास?? हे म्हणजे देवळाबाहेर काढून ठेवलेल्या चपलांसारखीच त्या गाडीची गत झाली Biggrin

भ्रमर Biggrin

वा दोन दिवसात इतकी प्रगती. माबोकर व्हायला वेंक्यू खूप लाग्तो हां.

वेंक्यू: वेंधळे पणाचा कोशंट. : )

अश्विनी - वेंक्यू .....हाहाहाहाहा....भारी कन्सेप्ट हां!

अश्विनी - वेंक्यू .....हाहाहाहाहा....भारी कन्सेप्ट हां!
Lol
लिहयची हाताला एवढी खाज सुटली होती की सगळ्या बॅगान्च्या गराड्यात बसुन, काम कर जरा अश्या "सौ"च्या शिव्या खात पोस्ट्तोय.........!
भ्रमर .. ऑल इज वेल !

Pages