Submitted by के अंजली on 3 June, 2010 - 04:54
लहानपणी आम्ही नातवंडे जमलो की आजीच्या पोतडीतून एकएक किस्से, गंमतीजमती गाणी आणि छान छान कोडी निघत असत.आजी गेली अन ते सार संपलं,
आज काही काहीच त्यातली कोडी मला आठवताहेत. तुम्हालाही काही माहिती असतील तर मला लिहाल?
एक दोन त्यातली आठवताहेत ती इथे लिहीतेय, उत्तरे सोपी आहेत,पहा!
१. कुट कुट काडी पोटात नाडी
राम जन्मला हात जोडी कृष्ण जन्मला हात जोडी
२. एवढस कार्टं घर कसं राखतं
३. पांढरं पातेल पिवळा भात
न ओळखेल त्याच्या कमरेत लाथ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मिरची का ग?
मिरची का ग?
नाही मिरची नाही... क्लू भाजी
नाही मिरची नाही...
क्लू भाजी आहे
काये उत्तर?
काये उत्तर?
करडई ची भाजी
करडई ची भाजी
सखुबाइ नेसुन बसली लुगड्यावर
सखुबाइ नेसुन बसली लुगड्यावर लुगड,
पदराचा पत्ता नाही डोकं सताड उघडं.
????
सखुबाइ नेसुन बसली लुगड्यावर
सखुबाइ नेसुन बसली लुगड्यावर लुगड,
पदराचा पत्ता नाही डोकं सताड उघडं.
<<< कांदा ?
करडई च्या भाजीचे कोडे तसे
करडई च्या भाजीचे कोडे तसे समजायला अवघड आहे. हि भाजी रोप असताना खुपच मऊशार आणि लुसलुशीत पानांची असते. मग तिला सुंदर फूले येतात आणि छान बोंडे पण येतात, (या बोंडात करडईच्या बिया असतात.) पण त्यावेळी पानाला, बोडाला इतके तीक्ष्ण काटे असतात, कि बोट जवळ जरी नेले तरी टोचतात.
सखुबाई म्हणजे मक्याचे कणीस का
सखुबाई म्हणजे मक्याचे कणीस का ?
उत्तर - नारळ
उत्तर - नारळ
दिनेशदा! विठाई डोकावतेय बरं
दिनेशदा! विठाई डोकावतेय बरं तुमची!
कोडं टाका ना इथे तुमचं!
बघुया आम्हांला येतयं का उत्तर!
हे आणी या आधीच हुमाण मला
हे आणी या आधीच हुमाण मला माझ्या आई ने घातल होत...
अ.ंधार्या खोलीत म्हातारी मेली
५ जण ल्याक असुन दोघानी नेली.
शेंबूड!
शेंबूड!
बरोबर माधव
बरोबर माधव
सखुबाई म्हणजे मक्याचे कणीस का
सखुबाई म्हणजे मक्याचे कणीस का ?
हो बरोबर!!!
(अस्सल ग्रामिण भाषेत कोडे वेगळे आहे... आपल्याला ज्ञात असेलच.)
भो भो करतो पण कुत्रा
भो भो करतो पण कुत्रा नाही
कुणाचेच नसते बरोबर काही???
नेते .....
नेते .....
नाही पल्लवी.
नाही पल्लवी.
घाटावरनं आल्या बाया त्यांच्या
घाटावरनं आल्या बाया
त्यांच्या सुरकुतल्या काया
१०० रु. चे सुटे हवे आहेत.
१०० रु. चे सुटे हवे आहेत. त्यात १० रु ची नोट नको , पण एकुण नोटा १० च असाव्यात.
१०० रु. चे सुटे हवे आहेत.
१०० रु. चे सुटे हवे आहेत. त्यात १० रु ची नोट नको , पण एकुण नोटा १० च असाव्यात>>>>>>

@विप्रा .. मोजून घे
मी नोटा व नाणे असे लिहायचे
मी नोटा व नाणे असे लिहायचे विसरलो , त्याचा फायदा घेतलास.
50 x 1
20 x 2
2 x 3
1 x 4.
किंवा
50 x 1
20 x 1
5 x 5
2 x 2
1 x 1.
(No subject)
कुलु मिरच्या का?
कुलु मिरच्या का?
मला एक असे नाव हवे आहे ज्याचा
मला एक असे नाव हवे आहे ज्याचा अर्थ सुन्दर व हेल्दी (स्वस्थ) असा होइल मला माझ्या मैत्रिनिच्या क्लिनिकसाथि नाव हवे आहे
आहे मला मुख परंतु खात
आहे मला मुख
परंतु खात नाही
दिसते मी झोपलेली
पण असते पळतही
माझ्या शिवाय तुमचे
जगणेच शक्य नाही
वहा तुम्ही माझी
थोडीशी कळजीही
मी कोण काढा शोधुन
नाहीतर बें म्हणा मागून
नदी
नदी
घाटावरनं आल्या बाया त्यांच्या
घाटावरनं आल्या बाया
त्यांच्या सुरकुतल्या काया >>>> खारीक का?
३११ अगदी बरोबर
३११ अगदी बरोबर
आमच्या वर्गात एक नवीन मुलगी
आमच्या वर्गात एक नवीन मुलगी आली. आम्ही विचारले, तुझे नाव काय?
ती म्हणाली ३-११ २११
सांगा बर तिच नाव काय?
घाटावरनं आल्या बाया त्यांच्या
घाटावरनं आल्या बाया
त्यांच्या सुरकुतल्या काया
मिरचीच ना?
Pages