मराठीमधली कोडी

Submitted by के अंजली on 3 June, 2010 - 04:54

लहानपणी आम्ही नातवंडे जमलो की आजीच्या पोतडीतून एकएक किस्से, गंमतीजमती गाणी आणि छान छान कोडी निघत असत.आजी गेली अन ते सार संपलं,
आज काही काहीच त्यातली कोडी मला आठवताहेत. तुम्हालाही काही माहिती असतील तर मला लिहाल?
एक दोन त्यातली आठवताहेत ती इथे लिहीतेय, उत्तरे सोपी आहेत,पहा!
१. कुट कुट काडी पोटात नाडी
राम जन्मला हात जोडी कृष्ण जन्मला हात जोडी
२. एवढस कार्टं घर कसं राखतं
३. पांढरं पातेल पिवळा भात
न ओळखेल त्याच्या कमरेत लाथ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काळी गाय काटे खाय,
पाणी बघुन उभी राय.<<<वहाण

सीतेने सारवलेली जमीन कधीच सुकत नाय. <<< जीभ
सीतेची गादी कधीच भिजत नाय. <<< अळूचे पान

अगदी बरोबर. धन्यवाद

लाल आहे पण रंग नाही, कृष्ण आहे पण देव नाही, आड आहे पण पाणी नाही, वाणी आहे पण दुकान नाही. ओळखा.

लाल आहे पण रंग नाही, कृष्ण आहे पण देव नाही, आड आहे पण पाणी नाही, वाणी आहे पण दुकान नाही. >>आयला ! मला वाटलं होत कि याच उत्तर कोणाला येणार नाही पण इथे सगळे हुशार लोक भरली आहेत.

"गजानन" तुम्हाला कठीण कोड्यांची उत्तर येतात,पण सोप्प्या कोड्यांची उत्तर येत नाहीत कमाल आहे.

गडगडतो पण गाडा नव्हे,
सरसरतो पण साप नव्हे,
नव्हे इंद्र, नव्हे चंद्र,नव्हे तळिचा मासा,
पृथ्वीला पडला फासा.

सोप्प आहे. ओळखा पाहू.

आज्जी वनात तीन भाकर्‍या घेवुन गेली दोन आज्जीने खाल्ल्या मग,एक कोणी खाल्ली.
अरे यार! सगळे गायब कुठे झाले. पटापट कोडी सोडवा ना!

Pages