Submitted by के अंजली on 3 June, 2010 - 04:54
लहानपणी आम्ही नातवंडे जमलो की आजीच्या पोतडीतून एकएक किस्से, गंमतीजमती गाणी आणि छान छान कोडी निघत असत.आजी गेली अन ते सार संपलं,
आज काही काहीच त्यातली कोडी मला आठवताहेत. तुम्हालाही काही माहिती असतील तर मला लिहाल?
एक दोन त्यातली आठवताहेत ती इथे लिहीतेय, उत्तरे सोपी आहेत,पहा!
१. कुट कुट काडी पोटात नाडी
राम जन्मला हात जोडी कृष्ण जन्मला हात जोडी
२. एवढस कार्टं घर कसं राखतं
३. पांढरं पातेल पिवळा भात
न ओळखेल त्याच्या कमरेत लाथ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे पण कोकणातून आलंय का?
हे पण कोकणातून आलंय का?
अगदी बरोबर... दोन बैल, नांगर
अगदी बरोबर...
दोन बैल, नांगर आणि एक माणूस (शेत नांगरणारा).. म्हणून तीन डोकी आणि दहा पाय...
जोत (असा मालवणी शब्द आहे.. मराठीत काय म्हणतात?
LOL मी त चेष्टेनं म्हटलं.
LOL मी त चेष्टेनं म्हटलं. गजाननने सगळं कोकणातूनच आणलंय.
कोकणातनं आली नार तिचा पदर
कोकणातनं आली नार
तिचा पदर हिरवागार
तिच्या काखेला प्वार>>
काजू (फळासकट)
गजानन, मस्त आहेत हुमण ६ चे
गजानन, मस्त आहेत हुमण
६ चे उत्तर, मोट किंवा पखाल का ?
अरे हे अत्ताच वाचले. हे अजुन
अरे हे अत्ताच वाचले. हे अजुन एक कोडे तसे सोपे आहे -
घम घम घमाटा
विषाचा काटा
सोन्याच्या देवळात
रुप्याच्या घंटा
काळ्या रानात हत्ती मेला
काळ्या रानात हत्ती मेला त्याचा प्रुष्टभाग ऊपसून नेला...
भारी धागा आहे अजुन एक,
भारी धागा आहे
अजुन एक, एवढासा उंदीर तेलात पोहतो...
उत्तर :- करंजी
अजुन , दोन भाऊ शेजारी पण भेट
अजुन ,
दोन भाऊ शेजारी पण भेट नाही संसारी ???
काळ्या रानात हत्ती मेला
काळ्या रानात हत्ती मेला त्याचा प्रुष्टभाग ऊपसून नेला... - कापुस
दोन भाऊ शेजारी पण भेट नाही
दोन भाऊ शेजारी पण भेट नाही संसारी ??? - डोळे
घम घम घमाटा विषाचा
घम घम घमाटा
विषाचा काटा
सोन्याच्या देवळात
रुप्याच्या घंटा
केवडा का?
साता समुद्रापार रामाने लावली
साता समुद्रापार रामाने लावली केळी
हलतात पण उपटत नाहीत
साता समुद्रापार राजाने लावला
साता समुद्रापार राजाने लावला भात
एक एक शीत नऊ नऊ हात
दिनेश, मोट बरोबर. सगळी
दिनेश, मोट बरोबर.
सगळी उत्तरं अशी आहेत -
१. लसूण
२. नारळ
३. गायीच्या गळ्यातली घंटा
४. फणस
५. ज्वारीचे कणीस
६. मोट
७. केरसुणी
८. वांगे (झाडाला असलेले)
९. मका
१०. तोंड (दात आणि जीभ)
११. कागद
१२. गाजर
१३. वहाण
गजा भारी कोडी होती. मला
गजा भारी कोडी होती.

मला आजीने घातलेलं एकच हुमाण आठवतेय. बरीच इसरलो !
" एवढी एवढी पेटी चुन्नुकसया आत उघडुन बघता अगं बया"
बरोबर गुब्बी
बरोबर गुब्बी
साता समुद्रापार राजाने लावला
साता समुद्रापार राजाने लावला भात
एक एक शीत नऊ नऊ हात.
येतय का उत्तर ?
साता समुद्रापार राजाने लावली
साता समुद्रापार राजाने लावली केळी
हालतात पण उपटत नाहीत
माझी आजी हा एक घोर हुमण
माझी आजी हा एक घोर हुमण सांगायची
आकाशातून पडली घार
तिला मारून केलं ठार
रक्त प्यायलं घटाघटा
मांस खाल्लं मटामटा (किंवा चटाचटा)!
उत्तर आहे : नारळ!
एवढीशी बीबी कोपर्यात उभी!
(उत्तर : केरसुणी)
एवढंस्सं कार्टं घर कसं राखतं?!
(उत्तर-कुलूप)
अत्तर अत्तर झाड त्याचे कत्तर कत्तर पान
हिंदू मुस्सलमान त्यांची पगडी दाणादाण!
(उत्तर - गुलाबाचे फूल व त्याचे पान, दुसरी ओळ केवळ यमक जुळवायला!)
सूपभर लाह्या, लाह्यांमध्ये एक रुपया
(आकाशातील चांदणे व पौर्णिमेचा चंद्र)
तिपेरी कांडं, माथा मुंडं
हे बघ, ते बघ
(तर्जनी)
घम घम घमाटा विषाचा
घम घम घमाटा
विषाचा काटा
सोन्याच्या देवळात
रुप्याच्या घंटा
केवडा का?
--- चुक गुब्बी
उत्तर : फणस
उडत पाखरू बुडत जाय, सोळा
उडत पाखरू बुडत जाय, सोळा शिंगे बत्तीस पाय... ???
कोलंबी? झिंगा? प्राँस?
कोलंबी? झिंगा? प्राँस? श्रिंप्स (shrimps)?
बरोब्बर.. तुम्हाला १००
बरोब्बर.. तुम्हाला १००
काळ्या रानात गाढव मेले चार
काळ्या रानात गाढव मेले
चार जनांनी उचलुन नेले
काळ्या रानात गाढव मेले चार
काळ्या रानात गाढव मेले
चार जनांनी उचलुन नेले >> कापूस
२. कुलुप बाकी माहीत नाही.
२. कुलुप बाकी माहीत नाही.
ग्रेट !!! सगळीच कोडी खुप छान
ग्रेट !!! सगळीच कोडी खुप छान आहेत !!! अभिनन्दन
लख लख लखित लाकडाच्या कुपीत
लख लख लखित लाकडाच्या कुपीत काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात.
अजुन एक कोड... आधी असते
अजुन एक कोड...
आधी असते साधीभोळी
मग नेसते साडीचोळी
मग येते र.ंगाला
हात लावू देत नाही अ.ंगाला
ओळखा कोण?
Pages