मराठीमधली कोडी

Submitted by के अंजली on 3 June, 2010 - 04:54

लहानपणी आम्ही नातवंडे जमलो की आजीच्या पोतडीतून एकएक किस्से, गंमतीजमती गाणी आणि छान छान कोडी निघत असत.आजी गेली अन ते सार संपलं,
आज काही काहीच त्यातली कोडी मला आठवताहेत. तुम्हालाही काही माहिती असतील तर मला लिहाल?
एक दोन त्यातली आठवताहेत ती इथे लिहीतेय, उत्तरे सोपी आहेत,पहा!
१. कुट कुट काडी पोटात नाडी
राम जन्मला हात जोडी कृष्ण जन्मला हात जोडी
२. एवढस कार्टं घर कसं राखतं
३. पांढरं पातेल पिवळा भात
न ओळखेल त्याच्या कमरेत लाथ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे हरले असं समजून मीच या कोड्याच उत्तर सांगते.
<साता समुद्रापार रामाने घातलं अळं
त्याला दोनच फळं!>
उत्तरः सुर्य आणी चंद्र. Happy

अश्विनी के>> चमकी जास्त बरोबर वाटतय मला तरी... तारेची चमकी.. चक चक चांदणी म्हणजे चमकीचा खडा... चांदणी बांगडीत बसत नाहिये

झाडावर काही पक्षी होते, एका फांदी वरील पक्षी दुसर्‍या फांदीवरील पक्षांना म्हणाले तुमच्यातला एक आमच्यात आला तर तुमची आणि आमची संख्या समान होऊ,..... तर दुसर्‍या फांदी वरील पक्षी म्हणाले तुमच्यातील एक जर आमच्यात आला तर आम्ही तुमच्या दुप्पट होऊ ... दोन्ही बाजुला किती किती पक्षी होते?

.

हो '१ रुपया हरवला' काहीस आठवत आहे.. पण पुर्ण नाही.. Sad
५० रु. असतात, आणि सगळा खर्च मोजला तरी बेरिज ४९ येते तेच ना..??

Pages