Submitted by के अंजली on 3 June, 2010 - 04:54
लहानपणी आम्ही नातवंडे जमलो की आजीच्या पोतडीतून एकएक किस्से, गंमतीजमती गाणी आणि छान छान कोडी निघत असत.आजी गेली अन ते सार संपलं,
आज काही काहीच त्यातली कोडी मला आठवताहेत. तुम्हालाही काही माहिती असतील तर मला लिहाल?
एक दोन त्यातली आठवताहेत ती इथे लिहीतेय, उत्तरे सोपी आहेत,पहा!
१. कुट कुट काडी पोटात नाडी
राम जन्मला हात जोडी कृष्ण जन्मला हात जोडी
२. एवढस कार्टं घर कसं राखतं
३. पांढरं पातेल पिवळा भात
न ओळखेल त्याच्या कमरेत लाथ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इकडुन तिकडे आडवे जाय, तिन
इकडुन तिकडे आडवे जाय, तिन डोकी दहा पाय.
शेतकरी, नांगर आणि बैल ???
शेतकरी, नांगर आणि बैल ???
अशाला मशाला चार शिंगे कशाला?
अशाला मशाला चार शिंगे कशाला?
लवंग..?
लवंग..?
तीनजण वाढायला बाराजण
तीनजण वाढायला बाराजण जेवायला.
ओळखा पाहू?
तीनजण वाढायला बाराजण
तीनजण वाढायला बाराजण जेवायला
हे मात्र घड्याळ.
भरत परफेक्ट
भरत
परफेक्ट 
माझ्या आजोबानीं मला घातलेले
माझ्या आजोबानीं मला घातलेले कोडे.
एका दुकानदाराने १०० रु सुट्टे दिले. एकुन नोटा ५० होत्या. पण त्यामध्ये २रु एक पण नोट नव्हती. मग नोटा किती कितीच्या होत्या.
प्लीज उत्तर लवकर पोस्ट करा.
रु. २०/- x २ नोटा = ४०/-
रु. २०/- x २ नोटा = ४०/-
रु. ५/- x ३ नोटा= १५/-
रु. १/- x ४५ नोटा = ४५/-
एकूण ५० नोटा = रु. १००/-
रविंद्रदा अगदी बरोबर. धन्यवाद
रविंद्रदा अगदी बरोबर. धन्यवाद
हे मराठीतल नसुन इंग्लिशमधलं
हे मराठीतल नसुन इंग्लिशमधलं कोड आहे, पण बरोबर धागा सापडला नाही पोस्टायला.
which english word starts with 'q' but its 2nd alphabet is NOT 'u'?
e.g. queen, q is followed by u...
I need word in which q not followed by u.
qwerty एक पटकन आठवला.
qwerty एक पटकन आठवला. scrabble खेळताय का?
qwerty >> अर्थ काय हो याचा?
qwerty >> अर्थ काय हो याचा?
कि-बोर्ड का?
मला डिक्शनरी वर्ड हवा होता
scrabble खेळताय का? >> नाही, एक मिथुनपट पाहिला आणि जुने कोडे आठवले
लॉजिकली असा एकही डिक्शनरी
लॉजिकली असा एकही डिक्शनरी वर्ड नाही (निदान माझ्या माहितीत तरी) ज्यामध्ये q नंतर u येत नाही.
पण परवा मिथुनपटाचे नाव होते QAIDI भन्नाट स्पेलिंग केलेले.
qwerty >> अर्थ काय हो
qwerty >> अर्थ काय हो याचा?
ही अक्षरे इंग्रजी कीबोर्डवरची सुरुवातीची अक्षरे आहेत. चेंबर्स 21st Century Dictionary मध्ये हा शब्द आहे
आणि त्याचा अर्थ / खुलासा
qwerty or QWERTY /'kwM:tN/
adj said of an English-language typewriter, word processor or other keyboard: having the standard arrangement of keys, ie with the letters q w e r t y appearing in that order at the top left of the letters section.
असा दिलेला आहे.
खरंय, QWERTY की-बोर्डमुळे
खरंय, QWERTY की-बोर्डमुळे प्रचलित झालेला शब्द, नाहीतर आधी डिक्शनरीमधे नसावा बहुदा,
आण्खी काही 'q' but its 2nd alphabet is NOT 'u'...
http://en.wikipedia.org/wiki/List_of_English_words_containing_Q_not_foll...
qiviut –noun the soft,
qiviut
–noun
the soft, dense, light-brown woolly undercoat of the musk ox, used in making fabrics.
Origin:
1955–60; < Inuit
(साभारः विकी)
कोकणातनं आला रंग कोळी त्यानं
कोकणातनं आला रंग कोळी
त्यानं आणली भिंगु चोळी
शिंपिंण म्हणते शिवु कशी
परटिण म्हणते धुवू कशी
अन राणी म्हणते घालु कशी?
उत्तर सांगा ना....
मासे पकडायचे जाळे ..?
मासे पकडायचे जाळे ..?
अंकली, कागद. (उत्तर इथे दिले
अंकली, कागद.
(उत्तर इथे दिले होते. http://www.maayboli.com/node/16662?page=2#comment-731056)
अरे हो! खरंच की! पाहिलच नाही
अरे हो! खरंच की! पाहिलच नाही मी ते..
धन्यवाद गजानन
हे ओळखा तीन पायांची तिपाई,
हे ओळखा
तीन पायांची तिपाई, वर बसला शिपाई
माठ का रे?
माठ का रे?
नाही (पण असायला हरकत नाही )
नाही
(पण असायला हरकत नाही :फिदी:)
(No subject)
मला अपेक्षित उत्तर होत. चूल
मला अपेक्षित उत्तर होत.
चूल आणि तवा
अरे वा! माठ म्हटलं तर थंड
अरे वा! माठ म्हटलं तर थंड डोक्याचा आणि तवा गरम डोक्याचा ...
दोन्ही शिपाईच
छान
माठ म्हटलं तर थंड डोक्याचा
माठ म्हटलं तर थंड डोक्याचा आणि तवा गरम डोक्याचा ...
दोन्ही शिपाईच>>>>>
वरती क्यू वरुन चर्चा झालीय
वरती क्यू वरुन चर्चा झालीय त्यावरुन. अरेबिक लिपित, क चे दोन प्रकार आहेत. कोडाक मधले दोन्ही क एका प्रकारचे पण ते कातार मधल्या क पेक्षा वेगळे. असे वेगळे क रोमन लिपीत लिहिताना, के आणि क्यू वापरतात आणि अर्थातच तिथे क्यू नंतर यू ची गरज नसते. त्यानुसार कैदीचे स्पेलिंग बरोबर होते.
आई तरणी, मुले म्हातारी
आई तरणी, मुले म्हातारी ..
ओळखा पाहू
Pages