Submitted by के अंजली on 3 June, 2010 - 04:54
लहानपणी आम्ही नातवंडे जमलो की आजीच्या पोतडीतून एकएक किस्से, गंमतीजमती गाणी आणि छान छान कोडी निघत असत.आजी गेली अन ते सार संपलं,
आज काही काहीच त्यातली कोडी मला आठवताहेत. तुम्हालाही काही माहिती असतील तर मला लिहाल?
एक दोन त्यातली आठवताहेत ती इथे लिहीतेय, उत्तरे सोपी आहेत,पहा!
१. कुट कुट काडी पोटात नाडी
राम जन्मला हात जोडी कृष्ण जन्मला हात जोडी
२. एवढस कार्टं घर कसं राखतं
३. पांढरं पातेल पिवळा भात
न ओळखेल त्याच्या कमरेत लाथ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बत्तीस चिर्यांमधे नागिण
बत्तीस चिर्यांमधे नागिण फिरे....
लाल पालखी हिरवा दांडा.. आत बसल्या बोडक्या रांडा...
(आजीच्या काळात Political Correctness नव्हता...)
थई थकड धा.. तीन डोकी पाय धा.....
लाल पालखी हिरवा दांडा.. आत
लाल पालखी हिरवा दांडा.. आत बसल्या बोडक्या रांडा...
हिरवी मिरची
लाल मिरची..
लाल मिरची..
छान आहे हा बीबी.
छान आहे हा बीबी.
बत्तीस चिर्यांमधे नागिण
बत्तीस चिर्यांमधे नागिण फिरे....
..दात आणि जीभ..:)
बत्तीस चिर्यांमधे नागिण
बत्तीस चिर्यांमधे नागिण फिरे.... > जीभ
एवढासा गडु, त्याला पाहुन रडु
एवढासा गडु, त्याला पाहुन रडु
हे लय सोप्पं, आणि तोंडी
हे लय सोप्पं, आणि तोंडी घालायचं कोडं आहे, पण आता काय.. लेखी...
रामाच्या दु,
कानात ऊ.
तमचिव,
डामिळ,
तो. म्हंजे काय..
रामाच्या दुकानात उत्तम चिवडा
रामाच्या दुकानात उत्तम चिवडा मिळतो.
दुकानात डोकं म्हणजे काय?
दुकानात डोकं म्हणजे काय?
एवढासा गडु, त्याला पाहुन रडु
एवढासा गडु, त्याला पाहुन रडु - कांदा का?
ह्यो धागा लय भारी अंजली.
ह्यो धागा लय भारी अंजली.
आमच्याकडे याला हुमाण म्हणतात. आता ही ओळखा बरं..
१. कोकणातनं आली सखी
तिच्या मानंवर दिली बुक्की
तिच्या घरभर लेकी
२. कोकणातनं आला भट
धर की आपट
३. एवढीशी नन्नुबाय
सार्या वाटनं गीत गाय
४. काट्याकुट्यांचा बांधला भारा
कुठं जातोस ढबुण्या पोरा
५. कांड्यावर कांडी सात कांडी
वर समुद्राची अंडी
६. खाली जाती पोटुशी होती
वर येऊन बाळंत होती
७. सगळे गेले रानात
अन् झिपरी पोरगी घरात
८. काळ्या कोटाचा
हिरव्या टोपीचा
वाकून बघतो कोण *तडीचा
९. कोकणातनं आली नार
तिचा पदर हिरवागार
तिच्या काखेला प्वार
१०. आटंगण पटंगण लाल लाल रान
अन् बत्तीस पिंपळांना एकच पान
११. कोकणातनं आला रंगूकोळी
त्यानं आणली भिंगू चोळी
शिंपीण म्हणते शिवू कशी
परटीण म्हणते धुवू कशी
अन् राणी म्हणते घालू कशी
१२. सोन्याची सुरी भुईत पुरी
वर पटकार गमजा करी
१३, काळी कपिला गाय
पाणी बघून उभी र्हाय
२. कोकणातनं आला भट धर की
२. कोकणातनं आला भट
धर की आपट>
नारळ
१०. आटंगण पटंगण लाल लाल रान
नि बत्तीस पिंपळांना एकच पान>
तोंड - ३२ दात आणि जीभ
आर्च, दोन्ही बरोबर.
आर्च, दोन्ही बरोबर.
गजानन, मस्त आहेत कोडी. पहिलं
गजानन, मस्त आहेत कोडी. पहिलं भाताचं कणीस का?
खुप धन्यवाद लोक्स! गजानन
खुप धन्यवाद लोक्स!
गजानन तुमची हुमाण पन लय भारी
१३ च उत्तर: वहाण
हिरवी पेटी काट्यात पडली
उघडून पाहिली तर मोत्याने भरली
ओळखा!
झेलम तुमच्या कोड्याचे उत्तर
झेलम तुमच्या कोड्याचे उत्तर काय?
हिरवी पेटी काट्यात पडली उघडून
हिरवी पेटी काट्यात पडली
उघडून पाहिली तर मोत्याने भरली >> डाळींबं/सिताफळ?
भेंडी!!
भेंडी!!
लालू, पहिल्या हुमणाचं उत्तर -
लालू, पहिल्या हुमणाचं उत्तर - लसणीचा कांदा.
अंजली, वहाण बरोबर.
३. रेडीओ/शिट्टी? ४. फणस??
३. रेडीओ/शिट्टी?
४. फणस??
नुस्ते अंदाज बांधतेय!
खाली जाती पोटुशी होती
वर येऊन बाळंत होती >>
फणस बरोबर.
फणस बरोबर.
दुकानात डोकं म्हणजे 'दु'
दुकानात डोकं म्हणजे 'दु' कानात (दोन कानांमध्ये) डोकं!
७. सगळे गेले रानात अन् झिपरी
७. सगळे गेले रानात
अन् झिपरी पोरगी घरात>
केरसुणी
सोन्याची सुरी भुईत पुरी
वर पटकार गमजा करी>
केवडा?
हा धागा "चालवा डोकं" या
हा धागा "चालवा डोकं" या ग्रूपमध्ये हलवला आहे.
आर्च, केरसुणी बरोबर!
आर्च, केरसुणी बरोबर!
माझं एक कोडं राहीलं... पण जरा
माझं एक कोडं राहीलं... पण जरा कठिण आहे..
कोणतं?
कोणतं?
थई थकड धा.. तीन डोकी पाय
थई थकड धा.. तीन डोकी पाय धा.....
नाही येतेय, सांगा उत्तर?
नाही येतेय, सांगा उत्तर?
Pages