चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवा लिंडसे लोहानचा लेबर पेन्स पाहिला...
टिपिकल हॉलिवुडी लाइट कॉमेडी...
टीपीसाठी ठीकठाक...

त्याशिवाय वीकांताला कसीनो रोयाल, क्वांटम ऑफ सोलेस आणि अशीही बनवाबनवी ची क्ष,य आणि ज्ञ वी पारायणं केली...

व्हर्टिकल लिमिट पाहिला. पाकिस्तानच्या आणि भारताच्या जवळ असणार्‍या के- २ शिखरावर आप्ल्या बहिणीसह अडकलेल्या २ जणांना वाचवायला ६ लोकांची टीम घेऊन भाऊ जातो. त्यापैकी त्याची बहिण, तो आणि एक अजून हिरोईन शेवटी वाचतात. म्हणजे ३ लोकांना वाचवण्यात शेवटी ६ जण मरतात Happy एवढं एक बाजूला ठेवलं तर एकदा पाह्ण्यासारखा आहे.

बॉलिवूड बघणे दिवसेंदिवस अशक्य होत चालले आहे.
तुपाची धार सोडलेले १००० मोदक चांदीचे ताट भरुन ...

काल हापुस बघितला. एकदा बघण्यासारखा नक्कीच आहे. कोकणात शुट करुनही कोकणदर्शन दाखवण्याचा मोह टाळलाय. विनोदी चित्रपटाला थोडी गंभीर फोडणी दिलीय. विनोदही सगळे प्रासंगिक आहेत, उगाच घुसडलेले नाहीत. सुबोध भावे, मधुरा वेलणकर आणि शिवाजी साटमचे काम चांगले झालेय. मकरंद अनासपुरे थोडासा बडबड्या भुमिकेत आहे तरी त्याला बराच ताब्यात ठेवलाय... Happy शेवट अर्थातच थोडा फिल्मी, पण त्याला पर्याय नाही... एकंदर एकदा पाहिल्यास पैसे फुकट जाणार नाहीत...

हापूस पाहिला. ट्रेलरमध्ये जे दाखवलय त्यावरून या चित्रपटात आंब्याच्या लागवडीपासून त्याच्या विक्रीपर्यंत कुठले प्रश्न येतात व त्यावर मात करून कथानायक यशस्वी कसा होतो हे चित्रपटात दाखवले असेल असा अंदाज होता. हा प्रवास दाखवलायच पण तो तोकडा वाटला (अथवा आम्ही जरा जास्तच अपेक्षा ठेवलेल्या होत्या) पूर्वार्धात सगळ्या पात्रांच्या ओळखीतच भरपूर वेळ घालवलाय व काही प्रसंग उगाचच घुसडलेत. काही काही प्रसंग पाहताना मूळ हापूस या विषयापासून चित्रपट भरकटलाय असं वाटलं.

बाकी प्रत्येक पात्राचे काम मस्त झालेय, विनोदी प्रसंग पण छान जमलेत. आंबा व्यापारी/दलालाची मुजोरीही जाणवून येते. चित्रपटात विशेष कंटाळा येत नाही. शेवटचे राहुल सक्सेनाने गायलेले गाणे आवडलं. साधना यांनी लिहिलय तसं कोकणात शुट करुनही कोकणदर्शन दाखवण्याचा मोह टाळलाय.

काही काही प्रसंग पाहताना मूळ हापूस या विषयापासून चित्रपट भरकटलाय असं वाटलं.

मुळ विषय हा मुख्य विषय म्हणुन येतच नाही पुढे. ट्रेलरमध्ये जे दाखवलेय ते तेवढेच आहे चित्रपटात. त्या विषयावर जास्त काही नाहीये.... हापुस आणि ज्योतिष्यावर अंधश्रद्धा हे दोन विषय आलटुन पालटून पुढे येत राहतात, त्यातही हापुसपेक्षा ज्योतिष जास्त वेळ घेते.

विनोदी म्हणुन पाहिल्यास भरपुर मनोरंजन.. मी तरी विनोदी म्हणुनच पाहिला आणि मस्त हसुन घेतले. विशेषतः एका सिनमध्ये जेव्हा अण्णा जेवण टाकुन जातात, त्यावर आई रागाने, 'आता झाले समाधान??' असे उद्गार काढते. ते ऐकुन जेवण्यात मग्न असलेला पुष्कर, तिच्याकडे बघुन 'नाही, अजुन थोडा भात द्या' असे म्हणतो, तेव्हा तर जाम हसले... Happy

>>विनोदी म्हणुन पाहिल्यास भरपुर मनोरंजन.. मी तरी विनोदी म्हणुनच पाहिला आणि मस्त हसुन घेतले. विशेषतः एका सिनमध्ये जेव्हा अण्णा जेवण टाकुन जातात, त्यावर आई रागाने, 'आता झाले समाधान??' असे उद्गार काढते. ते ऐकुन जेवण्यात मग्न असलेला पुष्कर, तिच्याकडे बघुन 'नाही, अजुन थोडा भात द्या' असे म्हणतो, तेव्हा तर जाम हसले... << हे नक्की Happy याच प्रसंगात आजी गावाचे नाव सांगताना खाणा-खुणा करतात व प्रत्येकजण आपल्यापरीने ते गाव ओळखायचा प्रयत्न करतो तो प्रसंग पण मजा आणतो. तुम्ही वर लिहिलय तसं विनोदाची फोडणी मजा आणते.

काल 'लाइव्स ऑप्फ अदर्स' आणि 'पियानिस्ट' पाहिले. 'लाइव्स ऑप्फ अदर्स' मधील जर्मन अधिकार्‍याच्या भावना व कर्तव्य यांच्यातील ओढताण सही दाखवलय. या चित्रपटासाठी वेगळा धागाच आहे इथे.
'पियानिस्ट' मध्ये दुसर्‍या महायुध्दातील जर्मनांनी ज्यूंचा केलेला अमानुष छळ पुन्हा एकदा पाहायला मिळाला Sad

पियानिस्ट मीही पाहिलाय मागे एकदा.. केवळ चित्रपट म्हणुन असल्या चित्रपटांकडे पाहताच येत नाही..... दिवसभर तेच आठवत राहते आणि काहीतरी विचित्र अस्वस्थ वाटत राहते. भरीस भर म्हणुन त्यांचे जवळचे नातलग जगलेवाचले मागे उरले असतील तर त्यांनी बाकीचे आयुष्य कसे काढले असेल असे वाटत राहते... परत नको असले चित्रपट पाहणे..

अस्मानी, त्याच्या मस्कलां ( हैद्राबादेत असेच म्हणतात) ह्रितिक पेक्षा पण शोल्लीड आहेत. आम्ही तौलनिक अभ्यास करत होतो कारण साइड्ला काइट्स येत होता. ह्रितिक हा नुस्ताच हिंबो असून त्याला अ‍ॅक्टिन्ग येत नाही व ह्यु हा ट्रेन्ड थीएटर आर्टिस्ट आहे हा त्यातील मेन फरक आहे. आता आम्ही एक्स मेन फॅन झालो असून वूल्वराइनसारख्या टॅगच्या शोधात फिरत आहोत. शेवटाची मारामारी पण पैसा वसूल आहे. ( सीजी असली तरी) ह्यु च्या मैत्रीणीचे पात्र बार्बरा मोरी पेक्षा सुन्दर असून तिची लिस्टिप शेड फारच मस्त दिसते त्या मरण्याच्या सीन मध्ये. हात लावताच लोकांचे विचार बदलतात हे स्किल डेवलप करण्यास म्युटेशन ची काय हो गरज. असे आपले मजला वाट्ले.

मामी.....:हाहा:

मामी, ह्यू चा अजून एक सुंदर सिनेमा बघायचा असेल तर 'ऑस्ट्रेलिया' जरुर बघावा. मस्कलाच नव्हे तर बाकी कथानक, निसर्गचित्रण सारेच उत्कृष्ट.

हो हो जरूर. भाग्यश्री पण तो, पक्षी सिनेमा, खूप लांबडा आहे असे ऐकले आहे. लायब्ररीतून डीवीडी घेउन हपिसात बघते. स्क्रिप्ट चांगले आहे ऑस्ट्रेलियाचे. माझे म्युटेशन होउन मी आयर्स रॉक झाले तर मेट? Proud

btw, मामी हिंबो म्हणजे काय ?
hugh jackman उत्तम सिंगर आणि डान्सर सुद्धा आहे.
भाग्यश्री, ऑस्ट्रेलियाबद्दल मोदक !

एक्स मैन ओरिजीन्स चा पहिला भाग मुळ कथा सोडुन बाकी प्रत्येक बाबतीत मस्त आहे.
hugh jackman ने लोगन च्या भुमीकेला ह्याच नाही तर बाकीच्या तिन्हि भागात, विशेषतः तिसर्‍या भागात अगदी योग्य न्याय दिलेला आहे.
आणी हो दाढी शिवाय वुल्वरीन म्हणजे अदाकारी विना माधुरी...

त्या सिरिज चे बाकीचे सिनेमे पण आवर्जुन पाहण्या सारखे आहे.

आणी ह्यु चा "दी प्रेस्टीज" हा आणखी एक सुरेख सिनेमा आहे, सोबतीला वटवाघळ्या "Christian Bale" ने पण छान काम केले आहे

अस्मानी >> सुंदर पण मूर्ख बाई अस्ते तिला इंग्रजीत बिंबो म्हणतात ना. तसाच सुन्दर पण इडियट पुरुष हिंबो.
एक्स मेन चे तीन भाग आहेत का? मी एकच पाहिला तो ही अर्धवट. ह्यू चा ब्रॉडवे वर एक शो झाला होता त्यात त्याने गाणे न्रुत्य व अ‍ॅक्टिंग केले होते त्याचा प्रीरिलीज इंटरव्यु मी बघितला होता.

ह्यु आणि मेग रायनचा आएखी एक सुंदर चित्रपट म्हणजे... केट अँड लिओपोल्ड!!! ह्यु अप्रतिम छान दिसलाय लिओपोल्डच्या रोलमध्ये!!!! Happy

ह्यु आणि मेग रायनचा आएखी एक सुंदर चित्रपट म्हणजे... केट अँड लिओपोल्ड!!! ह्यु अप्रतिम छान दिसलाय लिओपोल्डच्या रोलमध्ये!!!! स्मित>>
व्हय तर स्वातीवैनी. म्हणून तर तो दाढीवाला काय तो वुल्वराइन पटेचना खूप वेळ. हाच का तो असे वाटत राहिले. स्कूप मध्ये पण आहे कि इंग्लिश लॉर्डचा बेटा म्हणून.

आणी ह्यु चा "दी प्रेस्टीज" हा आणखी एक सुरेख सिनेमा आहे, सोबतीला वटवाघळ्या "Christian Bale" ने पण छान काम केले आहे

>>> खूप छान आहे हा सिनेमा, मला फार आवडतो. Happy

मोठी सुट्टी सुरु झाली आहे त्यामुळे बॅकलॉग भरुन काढतो आहे. कार्तिक कॉलिंग कार्तिक पाह्यला. आपल्या पेशंटची जराही माहिती न काढता त्याची ट्रिटमेंट करणारी माठ सायकियाट्रिस्ट आणि महिना-महिना शोधायला न येणारे हिरोचे नातेवाईक हे दोन लूज एंड्स सोडले तर बर्‍यापैकी मनोरंजन होते. मी फरहान अख्तरचा पंखा आहे आणि दिपिकाबाईंनी चक्क बरे काम केले आहे.

कार्तिक अजून पहायचाय...

मेग रायन जोपर्यंत चालत नाही तोपर्यंत छान... चालायला लागली की मात्र कम्प्लीट बकवास..
आजीबात न शोभणारी मर्दानी चाल आहे...
ही एनवायपीडी मधे वगैरे कामाला होती की काय इतपथ शंकेला वाव देणारी...

मेग रायन जोपर्यंत चालत नाही तोपर्यंत छान... चालायला लागली की मात्र कम्प्लीट बकवास..आजीबात न शोभणारी मर्दानी चाल आहे...>>> अगदी अगदी! 'यू हॅव गॉट मेल' मधला शेवटचा प्रसंग पहा Happy :

अगदी अगदी! 'यू हॅव गॉट मेल' मधला शेवटचा प्रसंग पहा
>>
तेच रे तेच्च आलं डोळ्यपुढे...

मामी,, एक्स मैन मुळ कथेवर आता पर्यंत तीन सिनेमे आलेत, एक्स मैन -१, २ आणी ३. तिन्ही एका पेक्ष एक आहेत.

ह्याव्यतिरीक्त, कॉमिक्स कथेला बाजुला सारुन फक्त वुल्वरीन (मुळ नाव : लोगन, वयः सांगणे शक्य नाही, काही शतके आणी बहुदा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा वयस्क म्युटंट, शक्ति: जखमा ताबडतोब बर्‍या होणे, मेल्या नंतर सार काही विसरतो आणी पुन्हा जिंवत होतो, शिवाय अ‍ॅडामँटियम धातुची हाडे आणी नखे) ह्या पात्रा वर आलेला तुम्ही पाहिलेला सिनेमा म्हणजे एका नविन सिरिज चा पहिला भाग ... एक्स मैन ओरिजिन्स - वुल्वरीन.

ह्या कॉमिक्स मालिके वर आधारीत दोन कार्टुन सिरिज सुद्धा आल्या आहेत, पहिलीचे नाव एक्स मैन तर दुसरीचे एक्स मैन इवोल्युशन...

हुश्श

kate and leopold, मेग रायनची hair style सोडली तर मस्त आहे. स्वाती, hugh jackman बद्दल हवे तितके मोदक !

हो ना.... आधी तो स्टार मुव्हिजला सतत पडीक असायचा (तो म्हणजे kate and leopold पिक्चर, ह्यु नाही... Wink ) मग एकदा वैतागुन बघितला. त्यानन्तर एक पण चान्स सोडला नाहिये बघायचा!! नुसतं एकटक त्याला बघत बसते... Happy

आणी ह्यु चा "दी प्रेस्टीज" हा आणखी एक सुरेख सिनेमा आहे, सोबतीला वटवाघळ्या "Christian Bale" ने पण छान काम केले आहे>>> काय आठवण करुन दिलित.... वा!!!!!!!! Happy

हेथ लेजरचा "टेन थिंग्स आय हेट अबाउट यु" पाहिला... त्या मानसाला काय म्हणाव तेच कळत नाहीये..
एखादा अ‍ॅक्टर खरच केवढा वैविध्यपुर्ण असु शकतो हे त्याला बघुन जाववते... मला त्याच्या सगळ्याच भुमिका एकापेक्षा एक वाटतात ....

त्याचा जोकर म्हणजे मला खरतर जिवापेक्षा जास्त आवडतो..
that "joker" is more like a phenomenon for me

काल रात्री अचानक "वर्ल्ड मूव्ही" चॅनेलवर (ज्यावर जाहिरातींचा कमीतकमी धबधबा असतो) ज्युडी फॉस्टरचा "बेस्ट अ‍ॅक्ट्रेस ऑस्कर विनिंग" चित्रपट "दी अक्युज्ड" पाहायला मिळाला. जातिवंत अभिनय म्हणजे काय असते ते आमच्या बॉलिवूडच्या कचकड्याच्या बाहुल्यांनी या ज्युडीकडून शिकून घ्यावे. स्वच्छंदी जीवन जगण्याची हौस असलेल्या व त्यामुळेच मार्जियुनाच्या आहारी गेलेल्या खास अमेरिकन तरूणीची भूमिका ज्युडीने विलक्षण ताकदीने उभी केली आहे. हायवेवर असलेल्या एका व्हीडीओ गेम पार्लरमध्ये वेटर मैत्रीणीला भेटायला गेली असताना तिथल्या संगीताच्या तालावर बेभान नृत्य करत असताना तिच्या हावभावावरून ही एक "चालू" पोरगी आहे असे तेथील गेम्स खेळायला आलेल्या तरूणाच्या एका गटाचा "सोयीस्कर" समज होतो आणि तिच्यावर त्या अर्धवट बेशुध्द अवस्थेत अत्याचार होतो. तशा रक्ताळलेल्या अवस्थेत कशीबशी रस्त्यावर येऊन एका ट्रकवाल्याकडे लिफ्ट मागते, तो तिची तसली अवस्था पाहून तिला थेट दवाखान्यात दाखल करतो. बलात्काराची केस म्हणून पोलिस येतात आणि तिथून सुरू होते एक नाट्य.

डिस्ट्रिक्ट अ‍ॅटॉर्नी असते एक स्त्री आणि ती ही केस आपल्याकडे घेते व तिला आरोपीना पकडण्यापूर्वी ज्युडीची जी उच्छ्रंखल प्रतिमा सोसायटीत झालेली असते तिचा खूप त्रास होतो, इतका की ती पहिल्या पायरीवर आरोपी सापडूनदेखील त्याना किरकोळ ताकीद देण्याच्या शिक्षेपलिकडे काही जास्त देवू शकत नाही. मात्र पुढील काळात ज्युडी तिच्यावर "आतून पैसे खाल्लेस" असा आरोप करते व त्या नैराश्येपोटी स्वतःचा अपघात करुन घेते, त्यावेळेनंतर मात्र डीए मॅडम अगदी कंबर कसून तिला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात, तो कसा ते प्रत्य़क्षात पाहणे फार आवश्यक आहे.

पूर्ण चित्रपट तो हायवे वरील 'मिल" नावाचा बार, ज्युडीचे घर, डीएचे कार्यालय आणि कोर्ट रूम इथेच घडते आणि यातच नाट्य आहे. ज्युडी फॉस्टर हिला या चित्रपटापूर्वीदेखील "सायलेन्स ऑफ दि लॅम्ब" या चित्रपटातील भूमिकेबद्दल ऑस्कर मिळाले होते, आणि "अक्युज्ड" बद्दल दुसरे.

प्रतीक,
ज्युडी फोस्टर ही खरच एक कसलेली अभिनेत्री आहे. तिचा "पॅनिक रुम" सुद्धा आवर्जुन पहाण्यासारखा आहे.

आणी हो... वयाच्या तिसर्‍या वर्षापासुन अभिनय करत आहे ती.. तिचा अनुभव तिच्या प्रत्येक कलाक्रुतीतुन दिसुन येतो

Pages