'कलयुग' शाम बेनेगलांचा होता. त्यात कार्पोरेट सेक्टर मधील कौटुम्बिक वादावर महाभारताचे प्रोजेक्शन केले होते. चांगला होता. त्यात रेखाचा एक हॉट बेड सीन होता . तो पाहिल्यावर हल्लीची पोरे फिदी फिदी हसतील. पिक्चरची हाताळणी मात्र मॅच्युअर होती....
प्रकाश झा चा रामगोपाल वर्मा झाला आहे का
Submitted by अजय अभय अहमदनगरकर on 6 June, 2010 - 21:58
मी कलयुगची सिडी विकत घेतली, पण त्यात चित्रपट इतका कापलाय की काहीच संगती लागत नाही. याआधी तो दुरदर्शनवरच पाहिलेला, त्यामुळे वर वर्णन केलेले सिन्स पाहणे अशक्यच होते
राजनिती पाहिला , ठिकच आहे. काही काही प्रसंगात मजा येते. एका प्रसंगात मनोज वाजपेयी भाषण करताना 'करारा जवाब देंगे' असे म्हणतो त्यावेळीचा त्याचा आवाज अंगावर काटा आणतो. बाकी त्या गोर्या पोरीला हकनाक मारले
हो ना रंगासेठ, महाभारतात सुभद्रा कुठे मरते ? अभिमन्यू मरतो !!!
कतरीना, ज्यावेळी प्रचाराला बाहेर पडते त्यावेळी पहिल्या शॉटमधे गळ्यात काही नाही, मग लगेच सोन्याची साखळी आहे. जादू !!!!
पण या लोकांची घरे मात्र मस्त दाखवली आहेत. जनतेचा पैसा !!
दोन्ही वेळचा एअरपोर्ट कुठला ते कळले का ?
इंदोर, भोपाळ, पाटणा असेल तर ठिक आहे. नाहीतर मल्ल्यासाहेबांचे विमान, अमेरिकेला जाते, हे माहित नव्हते मला. जाते का ?
राजनीती उर्फ महाभारत पाहिला, एवढ्या उथळ सिनेमाची अपेक्षा झा कडुन नव्हती.अनेक प्रसंग अतिशय सपक आणि हास्यास्पद्च वाटतात.
'राजनीती' म्हणजे कुटिल नीती, कारस्थान याला भरपुर वाव असताना खुपच ढोबळ प्रसंग टाकले.
'गॉडफादर 'हुन उचलेला आणि उत्तम जमलेला प्रयोग म्हणजे 'सरकार'.
राजनीती एकदा पहायला आवडला पण शेवटचा फिल्मी टच खटकला:).
रणबीर-नाना नी चांगलं काम केलय.
रणबीर हँडसम दिसतो आणि कॅरॅक्टर च्या डिमांड प्रमाणे खास खान्दानी देखणा :).
अर्जुन रामपाल पण सही दिसलाय , अॅक्टिंग बद्दल काही बोलण्यात अर्थ नाही
अजय देवगण मला आजिबात आवडत नाही पण बरं काम केलय.
नासिरुद्दीन शाह ला पाहुणा कलाकारा ऐवजी नानाचा रोल द्यायला हवा होता :).
कत्रिनाच्या अॅक्टिंग(!) चं लोकांनी कौतुक केलय पण मला तर ती नेहेमी प्रमाणेच ठोकळी नं १ , शोभेची बाहुली वाटली !
तिचा रोल पण सोनिया गांधी सारखा नसताना उगीच च सदोष हिंदी बोलणारी बाई कशाला घेतली ??
सुश्मिता सेन चांगली वाटली असती त्या रोल मधे.
स्पॉयलरः
कर्णाच्या रथाचं चाक अडकतं आणि कृष्ण त्या वेळी त्याला मारायला सांगतो या प्रसंगाशी जबरदस्तीनी सिमिलॅरीटी दाखवण्या साठी स्वतः नाना-रणबीर गोळीबारासाठी येतात हे मात्र अगदीच अ आणि आ.
थंड डोक्यानी काम करणारा बुध्दीमान रणाबीर भाडोत्री गुंड वापरायचे सोडून स्वतः कशाला उतरेल मैदानात
महाभारता मधला हा सीन, कर्ण कुन्ती भेटीचे सीन इतके सुरेख रंगवलेत त्यापुढे राजनीतीचा फिल्मी टच नाही जमला !
असो, महाभारत च मुळात इतकं महान आणि सॉलिड spicy आहे कि त्या वरून घेतलेली कुठलीही कथा अॅक्चुअल महाभारता पुढे मिळमिळीत च वाटणार :).
>>>कत्रिनाच्या अॅक्टिंग(!) चं लोकांनी कौतुक केलय पण मला तर ती नेहेमी प्रमाणेच ठोकळी नं १ , शोभेची बाहुली वाटली !
तिचा रोल पण सोनिया गांधी सारखा नसताना उगीच च सदोष हिंदी बोलणारी बाई कशाला घेतली ??>>><<<
अनुमोदन. ती सुरूवातीच्या काही प्रसंगात विसंगत अशा काळ्या टिकल्या लावून का फिरत होती ते कळले नाही. अर्जुन रामपाल हा सच्चा आहे, असे नाना, रणबीर आणि कत्रिना एक दोन वेळा बोलतात... पण तो सच्चा का आहे हे मात्र कुठेच कळत नाही. सच्चेपणा दिसावा असे तो राजकीय जीवनात काहीच करत नाही. तोही मनोज वाजपेयी इतकाच प्रवाहपतित वाटतो.
मनोज वाजपेयी, अजय देवगण आणि अर्जुन रामपाल यांचा खून होतो ... तेही निवडणूकीच्या वेळी, त्याची चौकशी वगैरे होत नाही का? अजूनही आपल्या देशात लोकशाही टिकून आहे. अशा घटना घडल्यास निवडणूक आयोग ती निवडणूक प्रक्रिया रद्द करेल.
क्ष्णभर विश्रांती नावाचा मराठी चित्रपट पाहिला. चित्रपटाला विशेष कथा नाही. जनरल टंगळ मंगळच चालू होती. शेवट अत्यंत प्रेडिक्टेबल.
सगळ्यात ग्रेट म्हण्जे ३ उच्चभ्रू मुलींना आवडलेली मुलं पहा---
डॉक्टर मुलगी --- फार्मसी ड्रॉप आउट मुलगा
शिकत असलेली मुलगी---- अंडा भुर्जीची गाडी असणारा मुलगा
fashion designer मुलगी ----- पडेल नट
बरं ही मुलं चांगली handsome आहेत म्हणून आवडली म्हणावं तर तसंही काही दिसलं नाही. इतकी मोठी लोकसंख्या असणार्या महाराष्ट्रात दिग्दर्शकाला ३ सुस्वरुप तरुण मिळू नयेत ?
कालच "अतिथी तुम कब जाओगे" हा सिनेमा बघण्याचा प्रयत्न केला. मला नाही आवडला. पहिल्या २० मिनिटांनंतर बंद केला मी. अजय देवगण मुळीच आवडला नाही. तसा तो मला बरेचदा आवडत नाही. एकदम खप्पड चेहरा करून घेतला आहे. कोंकणा सेन दिसते चांगली पण सिनेमा पुर्ण न पहिल्यामुळे काम कसं आहे हे कळलं नाही. बघवलंच नाही. परेश रावल ने काम चांगलं केलं आहे पण अतिरेक झाला आहे असं वाटलं. एकुणात नाही आवडला सिनेमा.
त्यानंतर मात्र एक चांगला ईंग्रजी सिनेमा पाहिला. Judgement at Nuremberg. दुसर्या जागतिक महायुध्दानंतर जर्मनी मध्ये झालेल्या अनेक उच्चाधिकार्यांवर झालेल्या खटल्यांवर आधारित एक अतिशय सुंदर चित्रपट.
मला सहसा ऑस्कर मिळालेले चित्रपट कळत नाहीत. पण हा कळला. पल्लेदार वाक्य असलेले संवाद कुठेही डोक्यावरून जात नाहीत. थोडक्यात कहाणी अशी. नॅशनल सोशलिस्ट पार्टीचं राज्य असताना ज्या न्यायाधीशांनी कुठलाही विरोध न करता हिटलर ने दिलेल्या हुकुमाप्रमाणे अनेक मानवताविरोधी निर्णय दिलेत त्यातल्या चार प्रमुख लोकांवर खटला भरला जातो. कायदा व न्याय मंत्री, आणि ३ न्यायधीश. मंत्री हा जागतिक किर्तीचा कायदेतज्ञ असतो. इतर ३ न्यायधीश सुध्दा अतिशय प्रसिध्द असतात. ३ अमेरिकन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर त्याची सुनावणी होते. खंडपीठाचा प्रमुख न्यायाधीश अतिशय परखड मत ठेवणारी व्यक्ती ज्यांना व्यवहार कळत नाही अशी. कायदा हा सगळ्या गोष्टिंच्या वर आहे असं मानणारी. दोन्ही बाजूच्या वकिलांचे दृष्टीकोन, त्यांचे युक्तीवाद सगळंच उत्तम. हा सत्यकथेवर आधारित आहे. नावं बदललेली आहेत पण संदर्भ नाहीत.
त्यातलंच एक वाक्यं म्हणजे, "something that is logical, need not be always correct". फार आवडलं मला ते.
थोडक्यात ज्यांना कोर्टरूम ड्रामा बघायला आवडतो त्यांनी जरूर बघावा असा एक चित्रपट. थोडा मोठा आहे पण कुठेही खूप वेळ झाला संपतच नाही असं होत नाही. ह्या चित्रपट अमेरिकन फिल्म इन्स्टीटुटच्या १० बेस्ट कोर्टरूम ड्रामाज च्या लिस्ट मध्ये १० वा आहे.
मला असा एखादा हिंदी सिनेमा बघायला नक्की आवडेल. आपल्याकडे इतके चांगले अभिनेते आहेत. चांगले दिग्दर्शक आहेत. पैसा लावणारे निर्मातेही आहेत पण मग अश्या कल्पनांवर सिनेमे का नाही निघत. नाच गाणे ह्यांच्याशिवाय सुध्दा सिनेमा चांगला बनू शकतो.
दिनेशदा, मला वाटतं सत्यघटना कुठेही घडलेली असू शकते. त्या सिनेमाचा विषय हा वैश्विक होता. कायदा आणि न्यायव्यवस्था ही व्यक्ती आणि समाजाचं रक्षण करण्यासाठी असते. त्याला हवा तसा वळवून आपल्या फायद्यासाठी त्याचा बळी देणं हे किती समाजविघातक असतं याची अनेक जिवंत उदाहरणं आपण जगभर बघतो. भारतातही अशी उदाहरणं दुर्मीळ मुळीच नाहीत. आपल्याकडेही न्यायालयांचे अनेक वादग्रस्त निर्णय आहेत ज्यानी सामान्य जनाना दिलासा मिळाला आहे. पण मला फक्त ह्याच विषयावर चांगले सिनेमे बनत नाही असं मुळीच म्हणायचं नाही. बरेच विषय आहेत जे कधीच चर्चीले जात नाहीत. आणि जेव्हा ते पडद्यावर येतात तेव्हा त्यांना फारच वेगळं स्वरूप आलेलं असतं. कधीकधी तर निव्वळ नफा वाढवण्यासाठी काहीही मसाला दाखवतात.
जोवर आपण चित्रपट हे फक्त आणि फक्त मनोरंजन करण्यासाठी असतात हि विचारसरणी बदलू शकत नाही तोवर असं बोलण्याला काहीही अर्थ नाही. ह्या माध्यमाचा उत्तम प्रकारे उपयोग होउ शकतो हे कित्येकदा आपल्याच इकडच्या दिग्दर्शकांनी सिध्द केलं आहे.
मल अतिथी आवडला. फक्त पवनदिवाने जोक्स जरा कमी पाहिजे होते..
बोक्या सातबंडे पाहिला मध्यंतरी.. खूप आवडला. सर्व लहान मुलांना दाखवण्यासारखा आहे. करमणूक तर होतेच पण थोडा उपदेशपर आहे. त्यामुळे कदाचित दुसर्यांदा पाहताना मोठ्यांना बोर होईल.. बोक्याचे काम मस्त आहे! (त्याचे निरागसपणे डायलॉग्स बोलणे फार मस्त.. ) आलोकचे काम मी प्रथम पाहिले. आवडले..
दिलीप प्रभावळकर बरोबर्च्या आजींचा आवाज मात्र अतीच कापरा आलाय..
नविना, आपल्याकडे डॉक्यूमेंटरी आणि चित्रपट वेगळेच मानले जातात. चित्रपटाकडे आपण मनोरंजन म्हणूनच बघतो, म्हणून असे चित्रपट निघत नसावेत. तसे आपल्याकडेही काही गौरवास्पद घटना घडल्याही आहेत, पण त्यावर चित्रपट निघणे, आणि निघालाच तर त्याला प्रेक्षक लाभणे कठीण आहे.
'कलयुग' शाम बेनेगलांचा होता.
'कलयुग' शाम बेनेगलांचा होता. त्यात कार्पोरेट सेक्टर मधील कौटुम्बिक वादावर महाभारताचे प्रोजेक्शन केले होते. चांगला होता. त्यात रेखाचा एक हॉट बेड सीन होता . तो पाहिल्यावर हल्लीची पोरे फिदी फिदी हसतील. पिक्चरची हाताळणी मात्र मॅच्युअर होती....
प्रकाश झा चा रामगोपाल वर्मा झाला आहे का
कलयुग मला आवड्लेला रे. शशीचा
कलयुग मला आवड्लेला रे. शशीचा फ्लॅट मस्त होता त्यात. रेखा जबरी. सुप्रीया पातक पिडते.
कलयुग खरंच मस्त होता. पुर्वी
कलयुग खरंच मस्त होता. पुर्वी टीव्हीवर सारखा लागायचा. बर्याच दिवसांत दाखवला नाही. तो चांचौटुचा सारखा दाखवण्यापेक्षा असले सिनेमे का दाखवत नाहीत?
पिअर्स ब्रोसनान आणि डॅनिअल
पिअर्स ब्रोसनान आणि डॅनिअल क्रेग यांच्यात शोरूम आणि गोडाऊन इतका फरक आहे >>> १००दा अनुमोदन!
मी कलयुगची सिडी विकत घेतली,
मी कलयुगची सिडी विकत घेतली, पण त्यात चित्रपट इतका कापलाय की काहीच संगती लागत नाही. याआधी तो दुरदर्शनवरच पाहिलेला, त्यामुळे वर वर्णन केलेले सिन्स पाहणे अशक्यच होते
राजनिती पाहिला , ठिकच आहे.
राजनिती पाहिला , ठिकच आहे. काही काही प्रसंगात मजा येते. एका प्रसंगात मनोज वाजपेयी भाषण करताना 'करारा जवाब देंगे' असे म्हणतो त्यावेळीचा त्याचा आवाज अंगावर काटा आणतो. बाकी त्या गोर्या पोरीला हकनाक मारले
हो ना रंगासेठ, महाभारतात
हो ना रंगासेठ, महाभारतात सुभद्रा कुठे मरते ? अभिमन्यू मरतो !!!
कतरीना, ज्यावेळी प्रचाराला बाहेर पडते त्यावेळी पहिल्या शॉटमधे गळ्यात काही नाही, मग लगेच सोन्याची साखळी आहे. जादू !!!!
पण या लोकांची घरे मात्र मस्त दाखवली आहेत. जनतेचा पैसा !!
दोन्ही वेळचा एअरपोर्ट कुठला ते कळले का ?
इंदोर, भोपाळ, पाटणा असेल तर ठिक आहे. नाहीतर मल्ल्यासाहेबांचे विमान, अमेरिकेला जाते, हे माहित नव्हते मला. जाते का ?
राजनीती उर्फ महाभारत पाहिला,
राजनीती उर्फ महाभारत पाहिला, एवढ्या उथळ सिनेमाची अपेक्षा झा कडुन नव्हती.अनेक प्रसंग अतिशय सपक आणि हास्यास्पद्च वाटतात.
'राजनीती' म्हणजे कुटिल नीती, कारस्थान याला भरपुर वाव असताना खुपच ढोबळ प्रसंग टाकले.
'गॉडफादर 'हुन उचलेला आणि उत्तम जमलेला प्रयोग म्हणजे 'सरकार'.
अरे इथे सद्या कोणि येत नाहि
अरे इथे सद्या कोणि येत नाहि का
राजनीती एकदा पहायला आवडला पण
राजनीती एकदा पहायला आवडला पण शेवटचा फिल्मी टच खटकला:).
रणबीर-नाना नी चांगलं काम केलय.
रणबीर हँडसम दिसतो आणि कॅरॅक्टर च्या डिमांड प्रमाणे खास खान्दानी देखणा :).
अर्जुन रामपाल पण सही दिसलाय , अॅक्टिंग बद्दल काही बोलण्यात अर्थ नाही
अजय देवगण मला आजिबात आवडत नाही पण बरं काम केलय.
नासिरुद्दीन शाह ला पाहुणा कलाकारा ऐवजी नानाचा रोल द्यायला हवा होता :).
कत्रिनाच्या अॅक्टिंग(!) चं लोकांनी कौतुक केलय पण मला तर ती नेहेमी प्रमाणेच ठोकळी नं १ , शोभेची बाहुली वाटली !
तिचा रोल पण सोनिया गांधी सारखा नसताना उगीच च सदोष हिंदी बोलणारी बाई कशाला घेतली ??
सुश्मिता सेन चांगली वाटली असती त्या रोल मधे.
स्पॉयलरः
कर्णाच्या रथाचं चाक अडकतं आणि कृष्ण त्या वेळी त्याला मारायला सांगतो या प्रसंगाशी जबरदस्तीनी सिमिलॅरीटी दाखवण्या साठी स्वतः नाना-रणबीर गोळीबारासाठी येतात हे मात्र अगदीच अ आणि आ.
थंड डोक्यानी काम करणारा बुध्दीमान रणाबीर भाडोत्री गुंड वापरायचे सोडून स्वतः कशाला उतरेल मैदानात
महाभारता मधला हा सीन, कर्ण कुन्ती भेटीचे सीन इतके सुरेख रंगवलेत त्यापुढे राजनीतीचा फिल्मी टच नाही जमला !
असो, महाभारत च मुळात इतकं महान आणि सॉलिड spicy आहे कि त्या वरून घेतलेली कुठलीही कथा अॅक्चुअल महाभारता पुढे मिळमिळीत च वाटणार :).
कुणी मुक्ता बर्वे आणि
कुणी मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांचा मुंबई-पुणे-मुंबई पाहिल आहे का?
काल उलाढाल नावाचा मराठी
काल उलाढाल नावाचा मराठी चित्रपट पाहिला. 'मोरया-मोरया' हे गाणे सोडल्यास बाकी चित्रपट रद्दाड ह्या गटातच येतो.
>>>कत्रिनाच्या अॅक्टिंग(!)
>>>कत्रिनाच्या अॅक्टिंग(!) चं लोकांनी कौतुक केलय पण मला तर ती नेहेमी प्रमाणेच ठोकळी नं १ , शोभेची बाहुली वाटली !
तिचा रोल पण सोनिया गांधी सारखा नसताना उगीच च सदोष हिंदी बोलणारी बाई कशाला घेतली ??>>><<<
अनुमोदन. ती सुरूवातीच्या काही प्रसंगात विसंगत अशा काळ्या टिकल्या लावून का फिरत होती ते कळले नाही. अर्जुन रामपाल हा सच्चा आहे, असे नाना, रणबीर आणि कत्रिना एक दोन वेळा बोलतात... पण तो सच्चा का आहे हे मात्र कुठेच कळत नाही. सच्चेपणा दिसावा असे तो राजकीय जीवनात काहीच करत नाही. तोही मनोज वाजपेयी इतकाच प्रवाहपतित वाटतो.
मनोज वाजपेयी, अजय देवगण आणि अर्जुन रामपाल यांचा खून होतो ... तेही निवडणूकीच्या वेळी, त्याची चौकशी वगैरे होत नाही का? अजूनही आपल्या देशात लोकशाही टिकून आहे. अशा घटना घडल्यास निवडणूक आयोग ती निवडणूक प्रक्रिया रद्द करेल.
क्ष्णभर विश्रांती नावाचा
क्ष्णभर विश्रांती नावाचा मराठी चित्रपट पाहिला. चित्रपटाला विशेष कथा नाही. जनरल टंगळ मंगळच चालू होती. शेवट अत्यंत प्रेडिक्टेबल.
सगळ्यात ग्रेट म्हण्जे ३ उच्चभ्रू मुलींना आवडलेली मुलं पहा---
डॉक्टर मुलगी --- फार्मसी ड्रॉप आउट मुलगा
शिकत असलेली मुलगी---- अंडा भुर्जीची गाडी असणारा मुलगा
fashion designer मुलगी ----- पडेल नट
बरं ही मुलं चांगली handsome आहेत म्हणून आवडली म्हणावं तर तसंही काही दिसलं नाही. इतकी मोठी लोकसंख्या असणार्या महाराष्ट्रात दिग्दर्शकाला ३ सुस्वरुप तरुण मिळू नयेत ?
नाहीतर मल्ल्यासाहेबांचे
नाहीतर मल्ल्यासाहेबांचे विमान, अमेरिकेला जाते, हे माहित नव्हते मला. जाते का ?>>
ति लंडनची असते ना?
कुणी मुक्ता बर्वे आणि
कुणी मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांचा मुंबई-पुणे-मुंबई पाहिल आहे का? >>>
मी पण हेच विचारायला आले इथे
माझ्या मित्राने पाह्यलाय आणि
माझ्या मित्राने पाह्यलाय आणि अजिबात पाहू नकोस असा सल्ला दिलाय. सध्यातरी तो मी मानायचं ठरवलंय.
माझा राजवाडेवरचा विश्वास
माझा राजवाडेवरचा विश्वास उडालाय आणि संपूर्ण दोन तास फक्त मुक्ता आणि स्वप्नील यांना रोमँटिक मूडमध्ये मी नाही पाहू शकणार.
डोंट वरी! राजवाडे आहे
डोंट वरी! राजवाडे आहे म्हटल्यावर,त्या दोन तासातला एक तरी पुनर्जन्म, चेटूक, टॅरो कार्ड यात घालवला असेलच
आशूडी सहमत आहे, राजवाडेने
आशूडी सहमत आहे,
राजवाडेने आम्हालाही असाच दगा दिलाय...
(आता त्या पडेल पिच्चंरच नावही आठवत नाहिये, जाने. रिलिज झाला होता)
पैसा आणि महत्वाचं म्हण्जे वेळेचा अपव्यय...
वरुन त्याचे प्रयोग आहेतच डोक्याची मंडई करायला.
लोकसंख्या असणार्या
लोकसंख्या असणार्या महाराष्ट्रात दिग्दर्शकाला ३ सुस्वरुप तरुण मिळू नयेत ?
>>
आता चणे फेकल्यावर माकडेच येणार ना?
कालच "अतिथी तुम कब जाओगे" हा
कालच "अतिथी तुम कब जाओगे" हा सिनेमा बघण्याचा प्रयत्न केला. मला नाही आवडला. पहिल्या २० मिनिटांनंतर बंद केला मी. अजय देवगण मुळीच आवडला नाही. तसा तो मला बरेचदा आवडत नाही. एकदम खप्पड चेहरा करून घेतला आहे. कोंकणा सेन दिसते चांगली पण सिनेमा पुर्ण न पहिल्यामुळे काम कसं आहे हे कळलं नाही. बघवलंच नाही. परेश रावल ने काम चांगलं केलं आहे पण अतिरेक झाला आहे असं वाटलं. एकुणात नाही आवडला सिनेमा.
त्यानंतर मात्र एक चांगला ईंग्रजी सिनेमा पाहिला. Judgement at Nuremberg. दुसर्या जागतिक महायुध्दानंतर जर्मनी मध्ये झालेल्या अनेक उच्चाधिकार्यांवर झालेल्या खटल्यांवर आधारित एक अतिशय सुंदर चित्रपट.
मला सहसा ऑस्कर मिळालेले चित्रपट कळत नाहीत. पण हा कळला. पल्लेदार वाक्य असलेले संवाद कुठेही डोक्यावरून जात नाहीत. थोडक्यात कहाणी अशी. नॅशनल सोशलिस्ट पार्टीचं राज्य असताना ज्या न्यायाधीशांनी कुठलाही विरोध न करता हिटलर ने दिलेल्या हुकुमाप्रमाणे अनेक मानवताविरोधी निर्णय दिलेत त्यातल्या चार प्रमुख लोकांवर खटला भरला जातो. कायदा व न्याय मंत्री, आणि ३ न्यायधीश. मंत्री हा जागतिक किर्तीचा कायदेतज्ञ असतो. इतर ३ न्यायधीश सुध्दा अतिशय प्रसिध्द असतात. ३ अमेरिकन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर त्याची सुनावणी होते. खंडपीठाचा प्रमुख न्यायाधीश अतिशय परखड मत ठेवणारी व्यक्ती ज्यांना व्यवहार कळत नाही अशी. कायदा हा सगळ्या गोष्टिंच्या वर आहे असं मानणारी. दोन्ही बाजूच्या वकिलांचे दृष्टीकोन, त्यांचे युक्तीवाद सगळंच उत्तम. हा सत्यकथेवर आधारित आहे. नावं बदललेली आहेत पण संदर्भ नाहीत.
त्यातलंच एक वाक्यं म्हणजे, "something that is logical, need not be always correct". फार आवडलं मला ते.
थोडक्यात ज्यांना कोर्टरूम ड्रामा बघायला आवडतो त्यांनी जरूर बघावा असा एक चित्रपट. थोडा मोठा आहे पण कुठेही खूप वेळ झाला संपतच नाही असं होत नाही. ह्या चित्रपट अमेरिकन फिल्म इन्स्टीटुटच्या १० बेस्ट कोर्टरूम ड्रामाज च्या लिस्ट मध्ये १० वा आहे.
मला असा एखादा हिंदी सिनेमा बघायला नक्की आवडेल. आपल्याकडे इतके चांगले अभिनेते आहेत. चांगले दिग्दर्शक आहेत. पैसा लावणारे निर्मातेही आहेत पण मग अश्या कल्पनांवर सिनेमे का नाही निघत. नाच गाणे ह्यांच्याशिवाय सुध्दा सिनेमा चांगला बनू शकतो.
नविना, आपल्याकडे अशी
नविना, आपल्याकडे अशी सत्यघटनाच होऊ शकत नाही, तर सिनेमा कुठून होणार ?
पण आता मिळवायलाच हवा हा सिनेमा.
बाकि अतिथी, २० मिनिटे सुद्धा सहन करणे कठीण आहे !!
दिनेशदा, मला वाटतं सत्यघटना
दिनेशदा, मला वाटतं सत्यघटना कुठेही घडलेली असू शकते. त्या सिनेमाचा विषय हा वैश्विक होता. कायदा आणि न्यायव्यवस्था ही व्यक्ती आणि समाजाचं रक्षण करण्यासाठी असते. त्याला हवा तसा वळवून आपल्या फायद्यासाठी त्याचा बळी देणं हे किती समाजविघातक असतं याची अनेक जिवंत उदाहरणं आपण जगभर बघतो. भारतातही अशी उदाहरणं दुर्मीळ मुळीच नाहीत. आपल्याकडेही न्यायालयांचे अनेक वादग्रस्त निर्णय आहेत ज्यानी सामान्य जनाना दिलासा मिळाला आहे. पण मला फक्त ह्याच विषयावर चांगले सिनेमे बनत नाही असं मुळीच म्हणायचं नाही. बरेच विषय आहेत जे कधीच चर्चीले जात नाहीत. आणि जेव्हा ते पडद्यावर येतात तेव्हा त्यांना फारच वेगळं स्वरूप आलेलं असतं. कधीकधी तर निव्वळ नफा वाढवण्यासाठी काहीही मसाला दाखवतात.
जोवर आपण चित्रपट हे फक्त आणि फक्त मनोरंजन करण्यासाठी असतात हि विचारसरणी बदलू शकत नाही तोवर असं बोलण्याला काहीही अर्थ नाही. ह्या माध्यमाचा उत्तम प्रकारे उपयोग होउ शकतो हे कित्येकदा आपल्याच इकडच्या दिग्दर्शकांनी सिध्द केलं आहे.
मल अतिथी आवडला. फक्त
मल अतिथी आवडला. फक्त पवनदिवाने जोक्स जरा कमी पाहिजे होते..
बोक्या सातबंडे पाहिला मध्यंतरी.. खूप आवडला. सर्व लहान मुलांना दाखवण्यासारखा आहे. करमणूक तर होतेच पण थोडा उपदेशपर आहे. त्यामुळे कदाचित दुसर्यांदा पाहताना मोठ्यांना बोर होईल.. बोक्याचे काम मस्त आहे! (त्याचे निरागसपणे डायलॉग्स बोलणे फार मस्त.. ) आलोकचे काम मी प्रथम पाहिले. आवडले..
दिलीप प्रभावळकर बरोबर्च्या आजींचा आवाज मात्र अतीच कापरा आलाय..
हो ग बस्के, बोक्या मलाही
हो ग बस्के, बोक्या मलाही आवडला. माझ्या लेकीला तर खूपच आवडला.
आलोक म्हणजे कोण ग? मोठा भाउ का बोक्याचा?
हो अमृता, बोक्याचा मोठा भाऊ.
हो अमृता, बोक्याचा मोठा भाऊ.
नविना, आपल्याकडे डॉक्यूमेंटरी
नविना, आपल्याकडे डॉक्यूमेंटरी आणि चित्रपट वेगळेच मानले जातात. चित्रपटाकडे आपण मनोरंजन म्हणूनच बघतो, म्हणून असे चित्रपट निघत नसावेत. तसे आपल्याकडेही काही गौरवास्पद घटना घडल्याही आहेत, पण त्यावर चित्रपट निघणे, आणि निघालाच तर त्याला प्रेक्षक लाभणे कठीण आहे.
ऐसा है क्या.. मला आवडला तो
ऐसा है क्या.. मला आवडला तो पण. मस्त काम केलय त्यानेही.
राजनिती पाहिला . सुपर डुपर
राजनिती पाहिला .
सुपर डुपर फसलाय . दिग्दर्शक, आणि चित्रपट दोन्हिही...
Pages