काल काईटस पाहिला. फक्त ह्रथिक आणि बार्बरासाठी पाहायचा असेल तर जरूर पहा अर्थात कमीत कमी पैसे खर्चून! पण ह्रथिकला मोठ्या पडद्यावर बघण्याचा जो 'निव्वळ' आनंद मिळतो त्यासाठी त्याचा प्रत्येक सिनेमा थिएटरमध्येच पाहायचा विडा उचलेले (माझ्यासारखे) चाहते कदाचित आणखी एकदा पाहू शकतात. कथा, सहकलाकार,दिग्दर्शक्,संगीत इ कसही असो, कुणीही असो ह्रथिक त्याचे पूर्ण १००% प्रयत्न (efforts) देतो हे पुन्हा एकवार सिध्द झालंय. कंगना राणावतही आश्चर्यकारक सुंदर दिसते. ती 'फॅशन' नंतर थोडी जाड झाली आहे वाटते पंण अशीही छानच दिसतेय. बाकी पूनमने वर लिहीलेलं आहेच पण आणखी एक मुद्दा म्हणजे अप्रतिम लोकेशन्स! सबंध पिक्चर मध्ये या प्रेमी जोडप्याला एकमेकांची भाषा नीटशी कळत नसते, पण शब्दातीत प्रेम नुसतं डोळ्यातून आणि चेहर्यावरच्या झरझर बदलणार्या हावभावांमधून या दोघांनीही व्यक्त केलंय त्यासाठी एजोटाझापा!
काल नेहरु सायन्स सेंटर ला 'एवरेस्ट' ही फिल्म पाहिली.. शब्दच नाहीत वर्णन करायला इतकी अप्रतिम आहे. आयमॅक्स कॅमे-याने घेतलेले शॉट्स काय असतात हे पाहायचे असेल तर ही फिल्म बघाच बघा.. रॉक क्लायबींग करताना खाली घसरतानाचे दृष्य, उटाहमध्ये डोंगराच्या कडेने अतिशय वेगात सायकल चालवत वॉर्मप करणार जोडपे, बर्फाच्या खोल घळीवरुन अॅलुनिमियम शीडीच्या साहाय्याने कसलाही आधार न घेता फक्त पोटाला सपोर्ट बांधुन जाणारी स्पनिश बाई इ. इ. दृष्ये पाहताना काळजाचे ठोके चुकले माझे. सायकल्सकट मीच खाली पडतेय असे वाटतेय तोच सायकल वळली.. हेलीकॉप्टरने बर्फाच्या वॅलीवरुन जाताना मी स्वतः त्यात बसलेय आणि खालच्या अफाट बर्फाकडे वाकुन पाहतेय असा भास होत होता.... मुंबईच्या गर्मीत ही फिल्म पाहणे म्हणजे एक अतिशय सुखद अन थंडगार करणारा अनुभव आहे. बच्चेमंडळी असतील तर त्यांना न्या, नसतील तर आपणच बच्चे व्हा आणि जा.
अतिशय जड असे ते स्पेशल कॅमेरे एवरेस्टवर वाहुन नेणा-या शेर्पांची खरेच कमाल आहे....
प्रिन्स ऑफ पर्शिया पाहिला.. छान आहे... हिंदी चित्रपट इंग्लिश चित्रपटावरुन चोरतात असे म्हणणार्यांची बोलती बंद करणारा चित्रपट आहे.. हा चित्रपट म्हणजे चक्क राजकुमार आणि कोहिनूरचा एकत्रित रिमेक आहे..
Submitted by जागोमोहनप्यारे on 31 May, 2010 - 08:29
एव्हरेस्ट सारखे चित्रपट, डोम थिएटर मधे बघणे म्हणजे एक अनुभव असतो. वडाळ्याच्या आयमॅक्स मधे तर भिती वाटली तर डोळे बंद करा, असे सांगतात, एवढा जिवंत अनुभव येतो.
पण हेच चित्रपट सीडीवर बघताना, तसा अनुभव देत नाहीत !!
कुठला जास्ती वाईट याचा निर्णय अजून होत नाहिये...>>>
वेलकम बॅक अँकी!
वाईटपणाची तुमची टेस्ट काय आहे त्यावरुन ते ठरेल. दोन्ही सिनेमात काही साम्यस्थळे आहेत उदा. स्क्रीप्ट्चा अभाव, अचाट आणि आचरट, संवाद आणि अभिनय, सुपरस्टारला घेतलं तर लोक काय वाट्टेल ते खपवतील हा अॅरोगन्स इ.इ.
बोथ आर बॅड इन देअर युनिक वे!
काल MERANTAU नावाचा इंडोनेशियन सिनेमा बघितला. थाई चित्रपटाप्रमाणेच त्यांच्या एका सिलात, नावाच्या मार्शल आर्ट चा सिनेमा.
जबरद्स्त अॅक्शन. मला जॅकी चॅन चे चित्रपट पण खुप आवडतात. पण त्याच्या सिनेमात कायम विनोदाची डूब असते, रक्तपात फारसा नसतो (आणि शेवटच्या दृष्यांमधे, ते चित्रीत करताना काय गमतीजमती झाल्या ते दाखवल्याने, आणखीनच मजा येते )
पण या चित्रपटात मात्र, अॅक्शन आहे ती जबरद्स्तच आहे, अक्षरश: डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच काहितरी घडत असते. हिरो, त्या सिलात मधे प्रवीण आहे, ते न सांगताच कळते.
कथानकात, भारतीय चित्रपटांना शोभेल असा मेलोड्रामा आहे. चित्रीकरणाचा दर्जाही उत्तम आहे.
पण बघायचा तर त्यातल्या अॅक्शन्दृष्यांच्या कोरिओग्राफी साठी !!
काल राजनीती पाहिला.
चित्रपटातील जमेची बाजु म्हणजे कॅट्रीना आणि रणबीर ह्यांचा चांगला अभिनय. कॅट्रीनाने खरच छ्हन काम केले आहे.
रणबीरने पण चांगले काम केले आहे.
पण हा चित्रपट म्हणजे गॉड फादर आणि महाभारत ह्यांचे एकत्रिक मिश्रण करुन भारतातील राजकारणाला फासले आहे. असे का करावेसे वाटले ते कळत नाही.
आता राजनीती म्हंतल्यावर, प्रोमोज बघितल्यावर वाटले कि थोडाफार तरी सध्याच्या राजकारणातील पात्रांवर असेल. पण तसे काहीच नाही आहे.
बहुधा चित्रपट वादाच्या भोवर्यात सापडु नये किंवा खरी पात्र सिनेमात दाखवु शकत नाहीत असे वाटल्याने म्हणा, त्यांच्या चित्रपटातील सर्वच पात्रे एकदम काल्पनिक आहेत आणि ती धड ना पौराणिक धड ना वास्तविक धड ना काहीच असे असल्याने मला तरी चित्रपटाशी conect नाही झाले.
गॉड फादर मधुन inspire होउन अजुन किती दिवस चित्रपट येणार आहेत कोण जाणे.
पण गॉड फादर मधिल पात्रे atleast तेव्हाच्या माफिया जगतातील पात्रांचे प्रतिनिधित्व करतात, पण राजनीती मधिल हि पात्रे बिहार मधिल राजकारणारणातील माणसांचे प्रातिनीधित्व करत नाहीत.
they dont look real.
पण पुन्हा एकदा कॅट्रीनाचे काम आश्चर्यकारक चांगले आहे आणि रणबीरचे सुद्धा.
बाकी नाना पाटेकर आणि मनोज बाजपई तर कसलेले कलाकारच आहेत त्यांच्या अभिनयाविषयी वेगळे काय बोलणार?
अरुन रामपाल आणि रणबीर कपूरच्या आईचे काम अगदी म्हणजे अगदीच भयंकर आहे.
राजनीती
पहिला हाफ अतिशय चांगला. नंतरचा हाफ अतिशय रद्दी. खास करुन शेवटचे ३५-४० मिनिटं. महाभारत पण लोकांना निट दाखवता येत नाही. राजनीती नावाला तो बिलकुल जागत नाही. वजिर, सरकारनामा किंवा सिहांसन सारखा असेल अशी अपेक्षा घेउन गेलो होतो पण अपेक्षाभंग.
राजनीती नावापेक्षा "आज का महाभारत किंवा किसी गड का महाभारत" असं नाव नक्कीच शोभल असतं.
प्रोमोज मध्ये भलतचं दाखवलं त्यावरुन चांगला असेल असे वाटले होते, पण ...हिंदी पिक्चर !! उतारा म्हणून दुपारी सरकारनामा पाहावा लागेल.
स्पॉयलर ......
रणबीर ने बरेचदा अभिषेक स्टाईल मारली आहे असे वाटते. अभिषेकला अमेरिका टू सरकार हा प्रवास निट दाखवता आला, पण रणबीर ठिक ठाक वाटतो, इंटेस वाटत नाही. शेवटचे गोळी मारण्याचे सिन तर कहर आहेत. अभिषेक फक्त कॉलरला हात लावून त्या व्हिलनला पाण्यात सोडतो, तसे काही तरी घ्यायचे निदान, पण वो बात जमी नही. तिथे मला तो केविलवाना (जरा हार्श होतयं का? ) दिसला. शकुनी + कृष्ण मध्ये नाना फार भाव खात नाही. कोणीही ही भुमीका करु शकलं असतं, नाना नाना वाटत नाही, तिथे स्कोप द्यायला हवा होता.
कॅटरिना पिक्चर मध्ये दिसते मस्त. कधीकधी कर्कश्श आवाजात ओरडायचे आहे, ते मात्र तिला जमले नाही, पण ओव्हरऑल आवडली.
राजनीती पाहिला.. मला आवडला.. काही काही गोष्टी अनरिआलिस्टीक आहेत पण चालायचच.
पाहिला हाफ छान पकड घेतो. सेकंड हाफ मधे काही ठिकाणी बळच ताणलय... बरीच पात्र एकदम रिलेट होतात. सुरुवातीला एस्टॅब्लीश व्हायला जरा वेळ लागतो फक्त. नाना पाटेकर रॉक्स !!! नेहमीची शैली सोडून एकदम वेगळ्या शैलीत वावरलाय आणि मामाचं काम सही वठवलय. रणबीर पण भाव खाऊन जातो. रणब्याचा पाठोपाठ तिसरा डिसेंट अभिनय. अजूर्न रामपालनी पण चांगलं काम केलय. अजय देवगणचं कॅरॅक्टर आणि काम दोन्ही मला आवडलं नाही विशेष. काही ठिकाणी उगीच बटबटीत वाटतं. कॅट, मनोज वाजपेयी, विनय आपटे ठिकठिक. विनय आपटेला अजून वापरता आलं असतं खरतर. बर्याच दिवसांनी तीन तास लांबीचा मुव्ही पाहिला.
साधना, मी पण पाहिला ग आज एव्हरेस्ट नेहरू सायन्स सेन्टरच्या डोममध्ये. मस्त म्हणजे एक्दम मस्त आहे. दिनेशदा, वडाळ्याच्या आयमॅक्समध्ये बहुधा हे चित्रपट आता दाखवत नाहीत. साईटवर मला काहीही माहिती मिळाली नाही. तिथे मी ४-५ असे पिक्चर्स पाहिले होते. मस्त अनुभव!
राजनीती पाहिला.. प्रोमोज पाहून झालेली अपेक्षा आणि पिक्चर यांचा ताळमेळ बसत नाही... मुख्यमंत्री व्हायच्या रेसमधली माणसं स्वतःच बंदूक घेऊन माणसे मारत फिरतात म्हणे! गरीब बिचार्या भाडोत्री गुंडांच्या पोटावर पायच की ... अजय देवगणचा कर्ण मात्र अगदीच हास्यास्पद वाटतो.. ३० वर्षापूर्वीची बाळाला लपेटलेली धुपटी जशीच्या तशी करकरीत.. अजुन एक हसू येणारा डायलॉग म्हणजे..
'उनकी तबियत बहुत गंभीर हो चुकी है.. डायस्टॉलिक बीपी १२० हो गया है.'
'तो क्या उनको लकवा मार जायेगा?'
'ये तो इ सी जी देखने के बाद पता चलेगा..'
इ सी जी बघून लकवा मारले की नाही हे समजते म्हणजे अजबच आहे...
Submitted by जागोमोहनप्यारे on 6 June, 2010 - 04:03
राजनीति लै म्हणजे लैच घटीया आहे.. गॉडफादर/महाभारत असली एक से एक तगडी व्यवधानं पेलताना प्रकाश झा ची पार हबेलहंडी उडली आहे.. त्यात काही काही अगदी नाट्यमय किंवा जिथे सिनेमा एकदम टेन्स आणि टॉट व्हायला हवा होता तिथल्या डायलॉगला तर आख्खं थेटर हसत होतं.. नाना/रणबिर सोडून बाकीच्यांची कामं फारच हास्यास्पद..
मला तर आता 'मै समय हूं' म्हणुन शेवट होतोय की काय असं वाटू लागलं होतं पिक्चर संपता संपता..
राजनीति लै म्हणजे लैच घटीया आहे अर्र.. मला बघायचा होता. प्रकाश झा माझा आवडता दिग्दर्शक.. मृत्युदंड वगैरे पिक्चर छान होते त्याचे. असं का होतय त्याचं हल्ली?
शटर आयलंड जबराट आहे! मला फारच आवडला.
कसिनो रोयाल टीव्ही वर बघितला. पिअर्स ब्रोसनान आणि डॅनिअल क्रेग यांच्यात शोरूम आणि गोडाऊन इतका फरक आहे (मावैम). डॅनिअल क्रेग रोज व्यायाम करणारा सुपारी किलर दिसतो फारतर. एकतर मला त्या जुगारातलं काही म्हणता काही कळलं नाही आणि बाँडचा सिनेमा इतका संथ?असोच.
>>पिअर्स ब्रोसनान आणि डॅनिअल क्रेग यांच्यात शोरूम आणि गोडाऊन इतका फरक आहे (मावैम).
अगदी अगदी. डॅनिअल क्रेग वयाच्या मानाने जास्त म्हातारा वाटतो. बॉन्डला रिटायरमेन्टमधून खेचून आणलंय की काय असं वाटतं त्याला पाहून. त्यापेक्षा क्लाईव्ह ओवेन बॉन्ड म्हणून मस्त दिसला असता. पण तो नको इतका सज्जन दिसतो बॉन्डच्या कारवर एक मस्त लेख मिंटमध्ये आला होता. James Bond’s Aston Martin up for sale
अरे मी पण बघितला राजनीती. थिएटरमधे केवळ ५ प्रेक्षक होते.
जामोप्या, नेमकी ३० वर्षांपूर्वीची ना रे दुपटी. नाना पाटेकर आणि अजय देवगणचे आईबाबा ३० च म्हणतात. पण कुंतीबाई, २७ म्हणतात. गणित कच्चे !!
मी भारताबाहेर बघितला, त्यामूळे सबटायट्ल्स सकट होता. त्यात आणखी मजा आहे. चार अक्षरी शब्द, सबटायटल्स मधे व्यवस्थित दिसतात, पण साऊंड ट्रॅकवर बीप होते.
सेन्सॉरने विधवा चे बिटीया करायला लावले तरी, सबटायट्ल्स मधे विडो च आहे.
मनोज आणि अजय ला सिंगल ठेवले ते बरे झाले, नाहीतर आणखी दोन हिरवीणी लागल्या असत्या, आणि त्यांचे काय करायचे ते कळले नसते.
कतरीना चे काम बरे म्हणायचे, कारण यापूर्वी कधीच तिने चेहरा हलवला नव्हता.
नानाच्या गेटप मधे ३० वर्षात काहीच फरक पडला नाही !!
हल्ली एकतरी पात्र गे दाखवावे लागते असा नियम आलाय का ? (करण जोहरने करायला लावलाय का ? )
रणवीरला रोल झेपलेला नाही. तो कोल्ड ब्लडेड वाटतच नाही. डोळ्यात ते भाव त्याला आणता आलेले नाहीत.
आयटम साँगचा मोह टाळता आलेला नाही. सगळ्यात कहर म्हणजे, मल्हारातली एक चीज या उत्तान गाण्यासाठी वापरली आहे. मोरा पिया मोसे बोलत नाही, कुणी गायलय कुणास ठाऊक. ही खरे तर उस्ताद अमीर खाँ साहेबांची दरबारी कानडामधली चीज आहे. किनु बैरन काना भरे, मोरे पिया मोसे बोलत नाही, असे मूळ शब्द आहेत. पहिली ओळ इथे अर्थातच गैरलागू असल्याने, दुसरी ओळच आळवलीय आणि ती पण भयानक बिट्स वर !!
मॉब मात्र भरपूर जमवलाय, पण चित्रीकरण काही खास नाही. रंगपण तितकेसे उठावदार नाहीत. एवढे खुन / हत्या होतात. पण कुणाचीही चौकशी होत नाही. बलात्काराची होते, पण खूनाची नाही !!!
इथे स्थानिक रेडीओवर आधी उल्लेख नसे, पण रिलीज झाल्यावर मात्र महाभारतापासून प्रेरणा घेऊन, अशी जाहीरात केली जातेय.
महाभारतावर माझ्या आठवणीप्रमाणे दोन चित्रपट येऊन गेले. एकाचे नाव होते विजय. त्यात अनुपम खेर, हेमामालिनी, राजेश खन्ना, मौशुमी चटर्जी, राज बब्बर, अनिल कपूर, ऋषी कपूर, मिनाक्षी शेषाद्री, सोनम असे (एखादे नाव इकडे तिकडे झाले असेल ) तो पण यथातथाच होता.
त्यापेक्षा एक छान सिनेमा होता, कलयूग नावाचा, त्यात राज बब्बर, रेखा आणि शशी कपूर होते.
हो हो करण जोहरच !! सुधारतो आता !
खरे तर करण कपूर शशि कपूरचा देखणा मुलगा होता. बाँबे डाईंगचा मॉडेल होता तो. सल्तनत सारख्या एखाद दोन सिनेमातच होता बहुतेक तो.
काल काईटस पाहिला. फक्त ह्रथिक
काल काईटस पाहिला. फक्त ह्रथिक आणि बार्बरासाठी पाहायचा असेल तर जरूर पहा अर्थात कमीत कमी पैसे खर्चून!
पण ह्रथिकला मोठ्या पडद्यावर बघण्याचा जो 'निव्वळ' आनंद मिळतो त्यासाठी त्याचा प्रत्येक सिनेमा थिएटरमध्येच पाहायचा विडा उचलेले (माझ्यासारखे) चाहते कदाचित आणखी एकदा पाहू शकतात. कथा, सहकलाकार,दिग्दर्शक्,संगीत इ कसही असो, कुणीही असो ह्रथिक त्याचे पूर्ण १००% प्रयत्न (efforts) देतो हे पुन्हा एकवार सिध्द झालंय. कंगना राणावतही आश्चर्यकारक सुंदर दिसते. ती 'फॅशन' नंतर थोडी जाड झाली आहे वाटते पंण अशीही छानच दिसतेय. बाकी पूनमने वर लिहीलेलं आहेच पण आणखी एक मुद्दा म्हणजे अप्रतिम लोकेशन्स! सबंध पिक्चर मध्ये या प्रेमी जोडप्याला एकमेकांची भाषा नीटशी कळत नसते, पण शब्दातीत प्रेम नुसतं डोळ्यातून आणि चेहर्यावरच्या झरझर बदलणार्या हावभावांमधून या दोघांनीही व्यक्त केलंय त्यासाठी एजोटाझापा! 
काल नेहरु सायन्स सेंटर ला
काल नेहरु सायन्स सेंटर ला 'एवरेस्ट' ही फिल्म पाहिली.. शब्दच नाहीत वर्णन करायला इतकी अप्रतिम आहे. आयमॅक्स कॅमे-याने घेतलेले शॉट्स काय असतात हे पाहायचे असेल तर ही फिल्म बघाच बघा.. रॉक क्लायबींग करताना खाली घसरतानाचे दृष्य, उटाहमध्ये डोंगराच्या कडेने अतिशय वेगात सायकल चालवत वॉर्मप करणार जोडपे, बर्फाच्या खोल घळीवरुन अॅलुनिमियम शीडीच्या साहाय्याने कसलाही आधार न घेता फक्त पोटाला सपोर्ट बांधुन जाणारी स्पनिश बाई इ. इ. दृष्ये पाहताना काळजाचे ठोके चुकले माझे. सायकल्सकट मीच खाली पडतेय असे वाटतेय तोच सायकल वळली..
हेलीकॉप्टरने बर्फाच्या वॅलीवरुन जाताना मी स्वतः त्यात बसलेय आणि खालच्या अफाट बर्फाकडे वाकुन पाहतेय असा भास होत होता.... मुंबईच्या गर्मीत ही फिल्म पाहणे म्हणजे एक अतिशय सुखद अन थंडगार करणारा अनुभव आहे. बच्चेमंडळी असतील तर त्यांना न्या, नसतील तर आपणच बच्चे व्हा आणि जा.
अतिशय जड असे ते स्पेशल कॅमेरे एवरेस्टवर वाहुन नेणा-या शेर्पांची खरेच कमाल आहे....
अधिक माहितीसाठी इथे जा - http://www.nehrusciencecentre.org/gen_info/ScOdyssey.htm
नंतर सायन्स सेंटरलाही भेट द्या. तिथे वेळ कसा जातो ते कळत नाही. शेवटी तर मी मुलीला ओढुन बाहेर काढले, मला दुसरीही कामे होती मुंबईला.
हाय लोक्स... बर्याच दिवसांनी
हाय लोक्स...
बर्याच दिवसांनी काल वोल्वोच्या कृपेनी २ सिनेमे पाहिले...
हाऊसफुल आणि वीर...
डोकं सुन्न झालंय...
कुठला जास्ती वाईट याचा निर्णय अजून होत नाहिये...
पण शब्दातीत प्रेम नुसतं
पण शब्दातीत प्रेम नुसतं डोळ्यातून आणि चेहर्यावरच्या झरझर बदलणार्या हावभावांमधून या दोघांनीही व्यक्त केलंय
कुठल्याशा चॅनलवर काईट्स चा review दाखवत होते तेव्हा तर असं सांगण्यात आलं की या सिनेमात प्रेम कुठेच नाही. नुसतीच lust आहे.
असो. मराठीत "टारगेट" असा एक नवा सिनेमा आलाय. कुणी पाहिलाय का?
प्रिन्स ऑफ पर्शिया पाहिला..
प्रिन्स ऑफ पर्शिया पाहिला.. छान आहे... हिंदी चित्रपट इंग्लिश चित्रपटावरुन चोरतात असे म्हणणार्यांची बोलती बंद करणारा चित्रपट आहे.. हा चित्रपट म्हणजे चक्क राजकुमार आणि कोहिनूरचा एकत्रित रिमेक आहे..
हि चुक मि पण केलि ! महा
हि चुक मि पण केलि !
महा भयन्कर चुक !
लोल
अवतार कोणि पहिला? नम्बर वन
अवतार कोणि पहिला?

नम्बर वन मुवि.
लाइक एक्दम पैसा वसुल!
एव्हरेस्ट सारखे चित्रपट, डोम
एव्हरेस्ट सारखे चित्रपट, डोम थिएटर मधे बघणे म्हणजे एक अनुभव असतो. वडाळ्याच्या आयमॅक्स मधे तर भिती वाटली तर डोळे बंद करा, असे सांगतात, एवढा जिवंत अनुभव येतो.
पण हेच चित्रपट सीडीवर बघताना, तसा अनुभव देत नाहीत !!
कुठला जास्ती वाईट याचा निर्णय
कुठला जास्ती वाईट याचा निर्णय अजून होत नाहिये...>>>
वेलकम बॅक अँकी!
वाईटपणाची तुमची टेस्ट काय आहे त्यावरुन ते ठरेल. दोन्ही सिनेमात काही साम्यस्थळे आहेत उदा. स्क्रीप्ट्चा अभाव, अचाट आणि आचरट, संवाद आणि अभिनय, सुपरस्टारला घेतलं तर लोक काय वाट्टेल ते खपवतील हा अॅरोगन्स इ.इ.
बोथ आर बॅड इन देअर युनिक वे!
काल MERANTAU नावाचा
काल MERANTAU नावाचा इंडोनेशियन सिनेमा बघितला. थाई चित्रपटाप्रमाणेच त्यांच्या एका सिलात, नावाच्या मार्शल आर्ट चा सिनेमा.
जबरद्स्त अॅक्शन. मला जॅकी चॅन चे चित्रपट पण खुप आवडतात. पण त्याच्या सिनेमात कायम विनोदाची डूब असते, रक्तपात फारसा नसतो (आणि शेवटच्या दृष्यांमधे, ते चित्रीत करताना काय गमतीजमती झाल्या ते दाखवल्याने, आणखीनच मजा येते )
पण या चित्रपटात मात्र, अॅक्शन आहे ती जबरद्स्तच आहे, अक्षरश: डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच काहितरी घडत असते. हिरो, त्या सिलात मधे प्रवीण आहे, ते न सांगताच कळते.
कथानकात, भारतीय चित्रपटांना शोभेल असा मेलोड्रामा आहे. चित्रीकरणाचा दर्जाही उत्तम आहे.
पण बघायचा तर त्यातल्या अॅक्शन्दृष्यांच्या कोरिओग्राफी साठी !!
द प्रिन्सेस अँड द फ्रॉग
द प्रिन्सेस अँड द फ्रॉग पाहिला. चांगला आहे. कृष्णवर्णीय प्रिन्सेस छान आहे.
श्रेक फॉर एवर आफ्टर पाहिला.
श्रेक फॉर एवर आफ्टर पाहिला. श्रेक पार्ट ३ पेक्षा नक्कीच चांगला आहे.
क्लायमॅक्सला माती खाल्ली.
kites without tail and kites
kites without tail and kites without tale tend to drift away असे कुठेतरी वाचलेले नेटवर ते एकदम पटलं
अरेरे!
अरेरे!
काल राजनीती
काल राजनीती पाहिला.
चित्रपटातील जमेची बाजु म्हणजे कॅट्रीना आणि रणबीर ह्यांचा चांगला अभिनय. कॅट्रीनाने खरच छ्हन काम केले आहे.
रणबीरने पण चांगले काम केले आहे.
पण हा चित्रपट म्हणजे गॉड फादर आणि महाभारत ह्यांचे एकत्रिक मिश्रण करुन भारतातील राजकारणाला फासले आहे. असे का करावेसे वाटले ते कळत नाही.
आता राजनीती म्हंतल्यावर, प्रोमोज बघितल्यावर वाटले कि थोडाफार तरी सध्याच्या राजकारणातील पात्रांवर असेल. पण तसे काहीच नाही आहे.
बहुधा चित्रपट वादाच्या भोवर्यात सापडु नये किंवा खरी पात्र सिनेमात दाखवु शकत नाहीत असे वाटल्याने म्हणा, त्यांच्या चित्रपटातील सर्वच पात्रे एकदम काल्पनिक आहेत आणि ती धड ना पौराणिक धड ना वास्तविक धड ना काहीच असे असल्याने मला तरी चित्रपटाशी conect नाही झाले.
गॉड फादर मधुन inspire होउन अजुन किती दिवस चित्रपट येणार आहेत कोण जाणे.
पण गॉड फादर मधिल पात्रे atleast तेव्हाच्या माफिया जगतातील पात्रांचे प्रतिनिधित्व करतात, पण राजनीती मधिल हि पात्रे बिहार मधिल राजकारणारणातील माणसांचे प्रातिनीधित्व करत नाहीत.
they dont look real.
पण पुन्हा एकदा कॅट्रीनाचे काम आश्चर्यकारक चांगले आहे आणि रणबीरचे सुद्धा.
बाकी नाना पाटेकर आणि मनोज बाजपई तर कसलेले कलाकारच आहेत त्यांच्या अभिनयाविषयी वेगळे काय बोलणार?
अरुन रामपाल आणि रणबीर कपूरच्या आईचे काम अगदी म्हणजे अगदीच भयंकर आहे.
राजनीती पहिला हाफ अतिशय
राजनीती
पहिला हाफ अतिशय चांगला. नंतरचा हाफ अतिशय रद्दी. खास करुन शेवटचे ३५-४० मिनिटं. महाभारत पण लोकांना निट दाखवता येत नाही. राजनीती नावाला तो बिलकुल जागत नाही. वजिर, सरकारनामा किंवा सिहांसन सारखा असेल अशी अपेक्षा घेउन गेलो होतो पण अपेक्षाभंग.
राजनीती नावापेक्षा "आज का महाभारत किंवा किसी गड का महाभारत" असं नाव नक्कीच शोभल असतं.
प्रोमोज मध्ये भलतचं दाखवलं त्यावरुन चांगला असेल असे वाटले होते, पण ...हिंदी पिक्चर !! उतारा म्हणून दुपारी सरकारनामा पाहावा लागेल.
स्पॉयलर ......
रणबीर ने बरेचदा अभिषेक स्टाईल मारली आहे असे वाटते. अभिषेकला अमेरिका टू सरकार हा प्रवास निट दाखवता आला, पण रणबीर ठिक ठाक वाटतो, इंटेस वाटत नाही. शेवटचे गोळी मारण्याचे सिन तर कहर आहेत. अभिषेक फक्त कॉलरला हात लावून त्या व्हिलनला पाण्यात सोडतो, तसे काही तरी घ्यायचे निदान, पण वो बात जमी नही. तिथे मला तो केविलवाना (जरा हार्श होतयं का? ) दिसला. शकुनी + कृष्ण मध्ये नाना फार भाव खात नाही. कोणीही ही भुमीका करु शकलं असतं, नाना नाना वाटत नाही, तिथे स्कोप द्यायला हवा होता.
कॅटरिना पिक्चर मध्ये दिसते मस्त. कधीकधी कर्कश्श आवाजात ओरडायचे आहे, ते मात्र तिला जमले नाही, पण ओव्हरऑल आवडली.
एन्ड .......
राजनीती पाहिला.. मला आवडला..
राजनीती पाहिला.. मला आवडला.. काही काही गोष्टी अनरिआलिस्टीक आहेत पण चालायचच.
पाहिला हाफ छान पकड घेतो. सेकंड हाफ मधे काही ठिकाणी बळच ताणलय... बरीच पात्र एकदम रिलेट होतात. सुरुवातीला एस्टॅब्लीश व्हायला जरा वेळ लागतो फक्त. नाना पाटेकर रॉक्स !!! नेहमीची शैली सोडून एकदम वेगळ्या शैलीत वावरलाय आणि मामाचं काम सही वठवलय. रणबीर पण भाव खाऊन जातो. रणब्याचा पाठोपाठ तिसरा डिसेंट अभिनय. अजूर्न रामपालनी पण चांगलं काम केलय. अजय देवगणचं कॅरॅक्टर आणि काम दोन्ही मला आवडलं नाही विशेष. काही ठिकाणी उगीच बटबटीत वाटतं. कॅट, मनोज वाजपेयी, विनय आपटे ठिकठिक. विनय आपटेला अजून वापरता आलं असतं खरतर. बर्याच दिवसांनी तीन तास लांबीचा मुव्ही पाहिला.
साधना, मी पण पाहिला ग आज
साधना, मी पण पाहिला ग आज एव्हरेस्ट नेहरू सायन्स सेन्टरच्या डोममध्ये. मस्त म्हणजे एक्दम मस्त आहे. दिनेशदा, वडाळ्याच्या आयमॅक्समध्ये बहुधा हे चित्रपट आता दाखवत नाहीत. साईटवर मला काहीही माहिती मिळाली नाही.
तिथे मी ४-५ असे पिक्चर्स पाहिले होते. मस्त अनुभव!
राजनीती पाहिला.. प्रोमोज
राजनीती पाहिला.. प्रोमोज पाहून झालेली अपेक्षा आणि पिक्चर यांचा ताळमेळ बसत नाही... मुख्यमंत्री व्हायच्या रेसमधली माणसं स्वतःच बंदूक घेऊन माणसे मारत फिरतात म्हणे! गरीब बिचार्या भाडोत्री गुंडांच्या पोटावर पायच की
... अजय देवगणचा कर्ण मात्र अगदीच हास्यास्पद वाटतो.. ३० वर्षापूर्वीची बाळाला लपेटलेली धुपटी जशीच्या तशी करकरीत.. अजुन एक हसू येणारा डायलॉग म्हणजे..
'उनकी तबियत बहुत गंभीर हो चुकी है.. डायस्टॉलिक बीपी १२० हो गया है.'
'तो क्या उनको लकवा मार जायेगा?'
'ये तो इ सी जी देखने के बाद पता चलेगा..'
इ सी जी बघून लकवा मारले की नाही हे समजते म्हणजे अजबच आहे...
राजनीति लै म्हणजे लैच घटीया
राजनीति लै म्हणजे लैच घटीया आहे.. गॉडफादर/महाभारत असली एक से एक तगडी व्यवधानं पेलताना प्रकाश झा ची पार हबेलहंडी उडली आहे.. त्यात काही काही अगदी नाट्यमय किंवा जिथे सिनेमा एकदम टेन्स आणि टॉट व्हायला हवा होता तिथल्या डायलॉगला तर आख्खं थेटर हसत होतं.. नाना/रणबिर सोडून बाकीच्यांची कामं फारच हास्यास्पद..
मला तर आता 'मै समय हूं' म्हणुन शेवट होतोय की काय असं वाटू लागलं होतं पिक्चर संपता संपता..
राजनीति लै म्हणजे लैच घटीया
राजनीति लै म्हणजे लैच घटीया आहे
अर्र.. मला बघायचा होता. प्रकाश झा माझा आवडता दिग्दर्शक.. मृत्युदंड वगैरे पिक्चर छान होते त्याचे. असं का होतय त्याचं हल्ली?
वाईट म्हणजे मी शटर आयलंड
वाईट म्हणजे मी शटर आयलंड सोडून राजनीति बघायला गेलो.. कुफेपा..
शटर आयलंड जबराट आहे! मला फारच
शटर आयलंड जबराट आहे! मला फारच आवडला.
कसिनो रोयाल टीव्ही वर बघितला. पिअर्स ब्रोसनान आणि डॅनिअल क्रेग यांच्यात शोरूम आणि गोडाऊन इतका फरक आहे (मावैम). डॅनिअल क्रेग रोज व्यायाम करणारा सुपारी किलर दिसतो फारतर. एकतर मला त्या जुगारातलं काही म्हणता काही कळलं नाही आणि बाँडचा सिनेमा इतका संथ?असोच.
शोरूम आणि गोडाऊन >>>
शोरूम आणि गोडाऊन >>>
>>पिअर्स ब्रोसनान आणि डॅनिअल
>>पिअर्स ब्रोसनान आणि डॅनिअल क्रेग यांच्यात शोरूम आणि गोडाऊन इतका फरक आहे (मावैम).
अगदी अगदी. डॅनिअल क्रेग वयाच्या मानाने जास्त म्हातारा वाटतो. बॉन्डला रिटायरमेन्टमधून खेचून आणलंय की काय असं वाटतं त्याला पाहून. त्यापेक्षा क्लाईव्ह ओवेन बॉन्ड म्हणून मस्त दिसला असता. पण तो नको इतका सज्जन दिसतो
बॉन्डच्या कारवर एक मस्त लेख मिंटमध्ये आला होता. James Bond’s Aston Martin up for sale
राजनिती मध्ये ती नवकुंती आली
राजनिती मध्ये ती नवकुंती आली की आमच्याकडे लोकांनी थेटरात टाळ्या वाजविल्या अन एकदम हास्यस्फोट झाला होता. तिथून एकदम नोझ डाईव्ह आहे तो पिक्चर.
अरे मी पण बघितला राजनीती.
अरे मी पण बघितला राजनीती. थिएटरमधे केवळ ५ प्रेक्षक होते.
जामोप्या, नेमकी ३० वर्षांपूर्वीची ना रे दुपटी. नाना पाटेकर आणि अजय देवगणचे आईबाबा ३० च म्हणतात. पण कुंतीबाई, २७ म्हणतात. गणित कच्चे !!
मी भारताबाहेर बघितला, त्यामूळे सबटायट्ल्स सकट होता. त्यात आणखी मजा आहे. चार अक्षरी शब्द, सबटायटल्स मधे व्यवस्थित दिसतात, पण साऊंड ट्रॅकवर बीप होते.
सेन्सॉरने विधवा चे बिटीया करायला लावले तरी, सबटायट्ल्स मधे विडो च आहे.
मनोज आणि अजय ला सिंगल ठेवले ते बरे झाले, नाहीतर आणखी दोन हिरवीणी लागल्या असत्या, आणि त्यांचे काय करायचे ते कळले नसते.
कतरीना चे काम बरे म्हणायचे, कारण यापूर्वी कधीच तिने चेहरा हलवला नव्हता.
नानाच्या गेटप मधे ३० वर्षात काहीच फरक पडला नाही !!
हल्ली एकतरी पात्र गे दाखवावे लागते असा नियम आलाय का ? (करण जोहरने करायला लावलाय का ? )
रणवीरला रोल झेपलेला नाही. तो कोल्ड ब्लडेड वाटतच नाही. डोळ्यात ते भाव त्याला आणता आलेले नाहीत.
आयटम साँगचा मोह टाळता आलेला नाही. सगळ्यात कहर म्हणजे, मल्हारातली एक चीज या उत्तान गाण्यासाठी वापरली आहे. मोरा पिया मोसे बोलत नाही, कुणी गायलय कुणास ठाऊक. ही खरे तर उस्ताद अमीर खाँ साहेबांची दरबारी कानडामधली चीज आहे. किनु बैरन काना भरे, मोरे पिया मोसे बोलत नाही, असे मूळ शब्द आहेत. पहिली ओळ इथे अर्थातच गैरलागू असल्याने, दुसरी ओळच आळवलीय आणि ती पण भयानक बिट्स वर !!
मॉब मात्र भरपूर जमवलाय, पण चित्रीकरण काही खास नाही. रंगपण तितकेसे उठावदार नाहीत. एवढे खुन / हत्या होतात. पण कुणाचीही चौकशी होत नाही. बलात्काराची होते, पण खूनाची नाही !!!
इथे स्थानिक रेडीओवर आधी उल्लेख नसे, पण रिलीज झाल्यावर मात्र महाभारतापासून प्रेरणा घेऊन, अशी जाहीरात केली जातेय.
महाभारतावर माझ्या आठवणीप्रमाणे दोन चित्रपट येऊन गेले. एकाचे नाव होते विजय. त्यात अनुपम खेर, हेमामालिनी, राजेश खन्ना, मौशुमी चटर्जी, राज बब्बर, अनिल कपूर, ऋषी कपूर, मिनाक्षी शेषाद्री, सोनम असे (एखादे नाव इकडे तिकडे झाले असेल ) तो पण यथातथाच होता.
त्यापेक्षा एक छान सिनेमा होता, कलयूग नावाचा, त्यात राज बब्बर, रेखा आणि शशी कपूर होते.
हल्ली एकतरी पात्र गे दाखवावे
हल्ली एकतरी पात्र गे दाखवावे लागते असा नियम आलाय का ? (करण कपूरने करायला लावलाय का ? )
-------
तुम्हाला करण जौहर म्हणायचंय का?
हो हो करण जोहरच !! सुधारतो
हो हो करण जोहरच !! सुधारतो आता !
खरे तर करण कपूर शशि कपूरचा देखणा मुलगा होता. बाँबे डाईंगचा मॉडेल होता तो. सल्तनत सारख्या एखाद दोन सिनेमातच होता बहुतेक तो.
हल्ली एकतरी पात्र गे दाखवावे
हल्ली एकतरी पात्र गे दाखवावे लागते असा नियम आलाय का ? (करण कपूरने करायला लावलाय का ? )
-------
तुम्हाला करण जौहर म्हणायचंय का? स्मित
<<< के जो च्या आधी ही ट्रेन्ड मधुर भांडारकरनी आणली !
पेज ३ , फॅशन मधून.
Pages