चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल ब्लाइंड साईड पाहिला. थिएटरमधे जाउन पहायचा राहिलेला होता म्हणुन आठवणीने घरी आणून पाहिला. सँड्रा बुलॉकचे आणि त्या मुलाचे काम अप्रतीम झालेय. काही वेळेला 'Too good to be true' वाटते पण सत्यकथा आहे त्यामुळे सत्य घटना असतीलच. त्या मुलाचे कामही अप्रतीम झालेय.

साजिरा | 18 June, 2010 - 11:38
तुम्ही कधी सारसबाग पाहिली आहे का? आणि तुळशीबाग? दगडूशेठ गणपती पाहिला आहे काय? आणि तळ्यातला गणपती? सिंहगड? पुण्यातले सीसीडीज्? सिटीप्राईड? पुणेस्टेशन? नसेल पाहिले, तर 'मुंबई-पुणे-मुंबई' पाहा. Proud
बरं विनोद ठेवा बाजूला. ती मुंबईकर आणि तो पुणेकर- दोघे अनुक्रमे थोडे आणि किंचित डोक्यात जातात, हे जर सोडले, तर बाकी बरा आहे. कथा म्हणून बघायला जाल, तर भयंकर प्रेडिक्टेबल असल्याचा शिक्का माराल. मुंबईकर आणि पुणेकरांचे पुलंच्या आणि त्याच्याही आधीच्या काळापासून फेमस झालेले संवाद थोडी मजा आणतात. पण तेवढेच. इतरत्र काही ठिकाणी खालील छापाचे संवाद आहेत.
'तुला एक सांगू?'
'काय? तु छान हसतेस, हे?'
'नाही, तू हसताना छान दिसतेच, हे!'
Proud

मंजूडी | 18 June, 2010 - 11:40
सतिश राजवाडे जाम अपेक्षाभंग करायला लागलाय आजकाल..

अँकी नं.१ | 18 June, 2010 - 11:43
मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी म्हणजे ओव्हरअ‍ॅक्टिंग चा महापूर असेल ना...???

साजिरा | 18 June, 2010 - 11:46
ओव्हरअ‍ॅक्टिंग चा महापूर >> राईट. पण स्वप्निल पुण्याचा दाखवल्यानेने ते ओरिजिनल कॅरेक्टर वाटू शकते. Proud मुक्ता मात्र जास्तच बोअर करते.
पण राजनीतीसारखे सिनेमे बघण्यापेक्षा हे कितीतरी पटीने छान. हलकेफुलके.

tonaga | 18 June, 2010 - 12:05
हम्म्म.. मी मराठी चित्रपट (पाहण्यातून) कधीच निवृत्ती घेतली आहे. साजिर्‍या , राजनीतीची आणि मराठी चित्रपटांची तुलना करू नकोस. राजनीती थोडा फसला असेल पण 'मरा हाथी सवा लाखका' या न्यायाने कुठल्याही मराठी चित्रपटापेक्षा तो कधीही चांगलाच आहे. सिंहासन हा एकमेव चित्रपट अजूनही मला 'नो नॉन सेन्स' चित्रपट वाटतो. बाकी काय. कशाची कॉलर मापात तर बाह्या लाम्ब. बाह्या मापात तर छातील घट्ट. कुठे वरचे बटण खाली तर खालचे वर. कुठे कॉलरच भलत्या रंगाची लावलेली. छे छे , लाज आणतात अगदी. १० चित्रपट निर्माण होतात त्यातील ९ ला कसले ना कसले पुरस्कार. 'बेस्ट डोअर कीपर' चा पुरस्कार निघालाय की नाही अजून?

मी आज रावण नावाचा एक अक्षरश: थर्ड्क्लास सिनेमा पाहून आलो. मणिरत्नम् डायरेक्टर आहे हे पाहून अगदी अपेक्षेने बघायलो गेलो आम्ही, आणि पस्तावलो. ते वर कोणीतरी म्हटले आहे तसे शोरूम आणि गोडाऊन सारखे झाले.

त्या राजनीतीमध्ये महाभारत आहे तर ह्या सिनेमात रामायण आहे. ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि एक कोणतातरी तमिळ कलाकार आहे. तिघेही ठोकळे आहेत खरंच. अडीच तासांचा चित्रपट आहे. सिनेमा सुरू झाल्यापासून सुमारे सव्वा दोन तास काहीही घडत नाही. शेवटच्या दहा मिनिटांमध्ये एक फडतूस ट्विस्ट आहे. मध्येच वाट्टेल तिथे गाणी घुसडली आहेत. पूर्ण सिनेमाभर निरर्थक काहीतरी दाखवत आहेत हे पाहून भयानक वैताग आला. नैराश्याने "उठा ले रे बाबा, उठा ले" असे विचार सिनेमाभर मनात येत होते. हिंदी चित्रपट पाहणे पूर्णपणे बंद करावे असे वाटू लागले आहे आता.

एकमेव चांगली गोष्ट सिनेमातली अशी आहे की काही काही ठिकाणची सिन-सिनरी छान आहे. भारतात ह्या सुंदर जागा आहेत हे पाहून अडीच तासांपैकी १० सेकंद बरे वाटले.

लोकहो, हा सिनेमा पाहून अजिबात पैसे घालवू नका. त्यापेक्षा घरी बसून वाल्मिकी रामायणाची पोथी वाचा. ह्या सिनेमाएवढं नक्कीच बोर होणार नाही आणि वर परत पुण्य लाभेल. Proud

रावण पाहिला.
पहिल्यान्दा सांगावे लागेल मी मणिरत्नम्चा फ्यान आहे.
चित्रपट दिग्दर्शन , फोटोग्रफी आणि अभिनय साईडला चांगला आहे. स्क्रीन प्ले ने वाट लावली आहे. राजनितीत जसा महाभारताचा तसा यात रामायणाचा बेस घेतला आहे.विथ सिनेमॅटिक लिबर्टी. राम आणि रावण या प्रवृत्तींचे एक वेगळेच इन्टरप्रिटेशन यात आहे पण ते स्पॉयलर मधे मोडत असल्याने इथे सांगण्यात पॉइन्ट नाही. वीरप्पन टाइपच्या एक ऱोबीनहूड (अरे राम पुन्हा आणि टोणगा -रॉबीनहूड आख्यान इथे चालू होणार) माणूस बीरा (धाकटे बच्चन) जंगलात त्याची वट बाळगून असतो. खरे तर तो पोलीसी अत्याचारामुळे पोलीसविरोधी झालेला असतो. इलाख्याच्या एस पीच्या बायकोला रागिणी (बच्चन घराण्याची बहू) तो पळवून नेतो व शराफतके साथ त्याच्या जंगली डोमेनम्ध्ये ठेवतो.(१४ दिवस). एस पी (चियान विक्रम ) त्याला जिन्दा या मुर्दा पकडण्यासाठी त्याच्या फौजेसह जंगलात येतो .त्याचा मदतनीस हनुमान सदृष्य गोविन्दा (हो तोच आहुजा.) जो लिटरली माकड उड्याच मारत असतो. प्रि -क्लायमॅक्सला
मारामार्‍या होऊन रागिणी बाइज्जत एसपीला मिळते. मग दुसरेच कथानक सुरू होते त्याला स्पॉयलर आहे.
फॅलश बॅकच्या सहाय्याने कथा उलगडत जाते.
कथा फारच कच्ची आहे. बीरा पोलीसविरोधी होण्याचे कारण म्हणजे बीराच्या मानलेल्या बहिणीच्या लग्नात सप्तपदी चालू असताना पोलीस घुसून गोंधळ घालतात . बीरावर गोळीबार करतात व लग्नच उधळते. नवरा मुलगा पळून जातो. पोलीस तिला कोठडी नेऊन सामूहिक बलात्कार करतात.(घाबरू नका हे सगळे संवादातून प्रभावीपणे येते.) ती नन्तर आत्महत्या करते. या लग्नात एस पी बीरावर गोळीबार करून त्याला जखमी करतो .ती जखम शेव्तपर्यन्त आहे. या बलात्काराचा सूड म्हणून बीरा एसपीच्या पत्नीला पळवून नेतो. पण मुळात पोलीस लग्नात कशासाठी का घुसलेले असतात ते नीट कळत नाही. कारण त्यापूर्वी बीराच्या नावावर पोलीस रेकॉर्ड नसते.
निरपराध लोकांवर केलेल्या अत्याचारांमुळे ते गुन्हेगारीकडे वळतात्.अशीही एक लाईन आहे.

संकलन चांगले असूनही मध्ये तासभर चित्रपट खूपच रेंगाळतो ते सदोष पटकथेमुळे.चांगला बोअर होइल इतका संथ होतो.
अभिनयात अभिषेक बच्चन अगदी अभिनयसम्राट नसला तरी कन्विंसिंग वाटतो. थोडा 'सरकलेला' बीरा त्याने चांगला केलाय. सूनबाईंनी सुखद धक्का दिलाय.१४ जंगलात राहिल्याने तिला एक रस्टिक लूक दिलाय त्यामुळे ती प्लास्टिक वाटत नाही. एस पी विक्रम चियान विक्रमने अ‍ॅरोगन्ट एस पी चांगला केलाय. गम्मत म्हणजे तमीळ व्हर्शन 'रावणन' मध्ये विक्रमने 'बीरा' केलाय म्हनजे प्रचन्ड तुलनेला वाव. तमिळ रागिणी सूनबाइच आहेत.
या चित्रपटाचा सगल्यात स्ट्रॉन्ग पॉइन्ट म्हणजे सिनेमॅटोग्राफी. इट्स लाईक मणिरत्नम. अप्रतिम लोकेशन्स , छायाप्रकाशाचा अद्भुत खेळ म्हणजे मणिरत्नम. सतत चालू असलेला पाऊस , पाण्याचे तुषार , धबधबे, पाण्याचे स्फटिकासारखे थेम्ब , भिजलेला आसमन्त, दक्षिणेकडच्या डोळे फिरवणार्‍या धुकाळलेल्या दर्‍या. टाईट क्लोज अप्स. अगदी क्रिस्टल क्लिअर. एवढ्या एका गोष्टीसाठी तरी एकदा पाहिला पाहिजे.

दुसरे म्हनजे अप्रतिम संगीत. रहमानचे संगीत 'मुरावे ' लागते. पार्श्वसंगीत फारच सुरेख आहे. गीते गुलजार.

सांस्कृतिक दृष्ट्या हिन्दी चित्रपट उपरेच असतात. म्हणजे कोणत्या प्रदेशातली स्टोरी कळत नाही. तसे यात लग्न बिग्न कुठे तरे उत्तर भार्तातले असे वाटते. देवळे दक्षिणेतली असा गडबड गुन्डा आहे. मध्येच इला अरुण आणि रिचा शर्माचे 'रांझा राझा करके आपे रांझा होय' हे बुल्लेशाहचे गीत येते (अर्थात बॅक्ग्राउन्डला)ही गुलजारमियांची करामत.

'रावण्'च्या आवडण्यावर बराच वादविवाद होइल असे दिसते पण मला स्वतःला रावण आवडला. दोषांसकट.
(वैनींसाठी, यात पिस्तोलबाजी, खूनखराबा आहे . सरकारने केलेला)

रावण हा मी आजवर पाहिलेला जगात भंकस आणि भंपक शिणुमा आहे..

रावण्णा मध्ये ह्याचा काय संबंध नाही.. रावण्णात कशाचाच काय संबंध नाही.. त्यातली जंगलं वगैरे लॉर्ड ऑफ द रिंग्ज नाहीतर अवतार मधली वाटतात.. कुठल्याही काळाचा, समाजाचा, चळवळींचा संदर्भ नाही.. रुपक कथा/प्रतिकात्मक कथा/अमूर्त कथा म्हणावी तर कुठलेच पात्र नीट उभे राहात नाही, कुठलीही कृती आणि त्यामागची भावना/भुमिका ह्याचा अर्थाअर्थी संबंध नाही.. गोविंदा मर्कटलीला का करतो हे कळत नाही (म्हणजे केवळ तो हनुमानसदृश भुमिकेत आहे म्हणुन मर्कटलीला अ ओ, आता काय करायचं ).. बाकी सगळेच अगम्य..
निसर्गशोभा डोळ्याला थोडावेळ बरी वाटते. बरेचसे चित्रीकरण श्रीलंकेतले आहे (हे ऐकीव). चलतचित्रकार बहुतेक वर्मा कँपमध्ये ट्रेनिंग घेउन आलेला वाटला.. आडवे उभे लांब जवळ असे चित्रविचित्र अँगल लावून चित्रीकरण आहे (वर्मासारखे संपूर्ण चित्रपटभर नसले तरी बरेच आहे)..

नेत्रसुख आहे की नाही?
म्हणजे लॅण्डस्केपस इत्यादी मधे?
ते असेल तर जाईन बघायला बाहेर. शेवटी मणिरत्नमचा सिनेमा आहे. युवा आणि गुरू आवडले नव्हते म्हणून काय झालं.. Happy
तेही नसेल तर मग मरूदेत २ महिन्यात कुठल्यातरी च्यानेलवर येईलच.

तेही नसेल तर मग मरूदेत २ महिन्यात कुठल्यातरी च्यानेलवर येईलच.

हा विचार करुन मी गेले चार महिने एकही चित्रपट पाहिला नाही. इथले वाचुन हिंमतच होत नाही जायची Sad

२७ तारखेला 'Colour' चॅनेलवर काईट्स आहे. ज्यांनी कुणी बघितला नसेल त्यांनी बघायला हरकत नाही.

गुब्बी धन्स गं. किती वाजता आहे?
मला काईट्स पाहण्याची खुप इच्छा होती, पण आमच्याकडच्या थेटरातुन तो केव्हा गडपला कळलेच नाही..

तेही नसेल तर मग मरूदेत २ महिन्यात कुठल्यातरी च्यानेलवर येईलच.<<<<<<<दसर्‍याला दाखवतील 'रावण' Proud

इथले वाचून मी राजनीती स्किप करायच्या विचारात होतो. पण मित्राला कम्पनी म्हणून पाहिला. आवडला. मनात म्हटले आप्ल्या आय क्यूला ठीक आहे तो.

तेही नसेल तर मग मरूदेत २ महिन्यात कुठल्यातरी च्यानेलवर येईलच.<<<<<<<दसर्‍याला दाखवतील 'रावण' >>>>
आशुतोष. Happy

काय वाट्टेल ते झाले तरी रावण पाहू नका! चॅनलवरही!!
हा सिनेमा मणीरत्नमचाच आहे का अशी १००दा शंका येते. पात्रे,प्रसंग,संघर्ष सगळेच लूटुपूटीचे. एकतर सुष्ट-दुष्टाचा झगडा रंगण्यासाठी दोन्ही बाजू तितक्याच समर्थ असायला हव्यात, इथे ते विक्रमचे पात्र उभेच रहात नाही.
इंटर्वलच्या आधी 'कट गया बकरा' असे काय तरी गाणे लागते, ते प्रेक्षकांना उद्देशून आहे यात शंका नाही!

इंटर्वलच्या आधी 'कट गया बकरा' असे काय तरी गाणे लागते, ते प्रेक्षकांना उद्देशून आहे यात शंका नाही!

सहमत
सहमत
सहमत!!!

इंटर्वलच्या आधी 'कट गया बकरा' असे काय तरी गाणे लागते, ते प्रेक्षकांना उद्देशून आहे यात शंका नाही!>>>>> Lol
इथल्या पोस्टस वाचून मलाही पिक्चर बघायची हिंमतच होत नाही.
उशिरा का होईना, काल 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' पाहिला. साधासुधा, मस्त. आवडला.

इंटर्वलच्या आधी 'कट गया बकरा' असे काय तरी गाणे लागते, ते प्रेक्षकांना उद्देशून आहे यात शंका नाही!>>>>> Happy

प्रमोज पाहूनच वेडगळ आणि फसलेला सिनेमा वाट्टोय, राम गोपाल वर्माच्या जंगल सारखा आहे का ? Proud

मला पण तो ऐश्वर्याचा (काजळ ओघळलेला) फोटो बघून, वेडीबिडि आहे कि काय या सिनेमात, असे वाटून गेले.
आमचे पैसे वाचवल्याबद्दल, बलिदान केलेल्यांना एकेक चहा पाजायला हवा.
जंगल मधे निदान प्राणी तरी बघण्यासारखे होते !!!

चला! रावण लिस्ट मधुन कटाप.
टोणग्याच्या भरोश्यावर रहायला नको Proud

इंटर्वलच्या आधी 'कट गया बकरा' असे काय तरी गाणे लागते, ते प्रेक्षकांना उद्देशून आहे यात शंका नाही!
>> Lol अगदी खरं आहे..

इंटर्वलच्या आधी 'कट गया बकरा' असे काय तरी गाणे लागते, ते प्रेक्षकांना उद्देशून आहे यात शंका नाही!<<<
दसर्‍याला दाखवतील 'रावण'<<<
टोणग्याच्या भरोश्यावर रहायला नको<<<
Rofl

Rofl

Rofl

महाभारत पाहिले आहे.. आता रावण बघून पैसे बरबाद केल्याशिवाय पुण्य मिळणार नाही...

भागवत, नवनाथ कथासार , साईबाबा, याच्यावरही पुढचे पिक्चर येतील..

जामोप्या , कुठे गायब झाला होतात? मालदिवला.?

एक शंका: मालदिवला व्हिसा लागतो का?

कालच रावण पाहिला (का पाहिला?? Sad ) इथे सगळ्यांनी सावध केले होते पण तरी गेलो. चित्रपटाच्या १०व्या मिनिटापासूनच कंटाळा यायला सुरू झाला (पहिली १० मिनिटे आत येणारे क्राउड चांगले आहे असे आमचे नंतर मत झाले) असो वर टोणग्याने म्हटलय तसं चित्रिकरण छान वाटलं पण त्या नादात मूळ चित्रपटाकडे दुर्लक्ष झालयं. आत्ता एका प्रसंगात असं दाखवलय की या पोलीस हिरोला घनदाट जंगलात वर्तमानपत्र मिळत (ज्यात मिसेच चा फोटू असतो). मला अशी शंका आली की याला त्यादिवशीचा ताजा पेपर कुठून मिळाला Sad पण बीराच्या माणसांनी तो पेपर पोचवायची काळजी घेतली असावी असा अंदाज माझ्या शेजारी बसलेल्या रावणग्रस्ताने वर्तवला.

असो शेवटी सूनबाई 'बक बक बक' असे उद्गार काढतात त्यावेळी सार्‍या चित्रपटगृहात 'हे राम' चा जयघोष झाला. बच्चन ज्युनिअरने आत्ता मोठ्या भावाची अथवा हिरोचा मित्र अशी भूमिका करायल हरकत नाही.

इथली मतं वाचून मित्राला सांगितल की चित्रपटाची तिकीटे काढण्यापूर्वी हे कन्फर्म कर की फक्त आपणच नाही ना चित्रपट पाहायला, पण तिथल्या माणसाने किमान डोअर-कीपर तरी असेल म्हणून आम्हाला आश्वस्त केले.

मणिरत्नम साहेबांकडून ही अपेक्षा नव्हती. Sad

>>>इंटर्वलच्या आधी 'कट गया बकरा' असे काय तरी गाणे लागते, ते प्रेक्षकांना उद्देशून आहे यात शंका नाही!<<<
दसर्‍याला दाखवतील 'रावण'<<<
टोणग्याच्या भरोश्यावर रहायला नको<<< Lol

अपहरण झालेली व्यक्ती अपहरणकर्त्याकडे आकर्षीत होणे याला मानसशास्त्रात 'स्टॉकहोम सिंड्रोम' म्हणतात, 'रावण'पेक्षा हा मुद्दा रागोवच्या 'रोड'मधे कितीतरी जास्त प्रभावी पद्धतीने दाखवला होता. निदान तो सिनेमा किमान मनोरंजन करणारा तरी होता.

आम्ही टॉय स्टोरी ३ सोडुन मणी रत्नमचा म्हणुन रावण बघायला गेलो शुक्रवारी. हमारी मती मारी गयी थी Sad
अख्खा सिनेमाभर ऐश्वर्या आणि तिचा खरा नवरा उर्फ रावण उर्फ बीरा पावसात नाचत बसतात. मध्यंतरापूर्वी पर्यंत तर फक्त तिला किडनॅप करणं आणि भर पावसात इकडे तिकडे नाचत बसणं ह्या पलिकडे काही नाही. रामाचं उर्फ देवचं काम करणारा विक्रम तर अगदीच ठोकळा आहे. त्याची सो कॉल्ड सुंदर बायको किडनॅप होते पण ह्याच्या चेहर्‍यावर ना दु:खी भाव ना आनंदी भाव. अगदीच अ आणि अ आहे सिनेमा. निव्वळ वेळ आणि पैश्याच्या अपव्यय. वर फचिनने म्हटल्याप्रमाणे वाल्मिकींचं रामायण वाचलं तर मन:शांती आणि पूण्य दोन्ही मिळेल.

रावण :
ऐश्वर्याचा आवाज फारच इरिटेटींग वाटला. आणी अभिषेक यडपट वाटला. गोविंदा जेव्हा सुरवातिला उड्या मारताना दाखवला ते फारच फनी आणी पटण्याच्या पलिकडच होत.
त्या तेजस्विनी कोल्हापुरेला तर एक पण डायलॉग नव्हता.
आणि एक गोष्ट काहीकाही सिन मध्ये पाउअस पडताना दाखवलाय पण मागे चक्क उन आणी आकाश निळ. मला कळत नाही. कम्पलसरी येवढा पाउस दाखवण्याची काय गरज आहे?

या चित्रपटाचा सगल्यात स्ट्रॉन्ग पॉइन्ट म्हणजे सिनेमॅटोग्राफी. इट्स लाईक मणिरत्नम. अप्रतिम लोकेशन्स , छायाप्रकाशाचा अद्भुत खेळ म्हणजे मणिरत्नम. सतत चालू असलेला पाऊस , पाण्याचे तुषार , धबधबे, पाण्याचे स्फटिकासारखे थेम्ब , भिजलेला आसमन्त, दक्षिणेकडच्या डोळे फिरवणार्‍या धुकाळलेल्या दर्‍या. टाईट क्लोज अप्स. अगदी क्रिस्टल क्लिअर. एवढ्या एका गोष्टीसाठी तरी एकदा पाहिला पाहिजे.

दुसरे म्हनजे अप्रतिम संगीत. रहमानचे संगीत 'मुरावे ' लागते. पार्श्वसंगीत फारच सुरेख आहे. गीते गुलजार.

>>
टोणग्याला प्रचंड मोदक...
केवळ एवढ्यासाठी थेटरात पहा...
टीव्ही चॅनेलवर ती संतोष सिवनच्या कॅमेर्‍याची जादू कळाणारच नाही...

आणि बिनामेकपची ऐश्वर्या चक्क पहाणेबल वाटली...
आणि काही दृष्यांमधे तर सुंदरही (हे केवळ दिसण्याबाबत आहे... अभिनयाबाबत नाही...)

बाकी स्क्रीनप्ले आणि डायलॉग्स हे 'टशन' चा दिग्दर्शक असलेल्या विजय कृष्ण आचार्य चे आहेत.. याहून अधिक काही सांगत नाही...

ओव्हरॉल त्याच्या ऑडियो-व्हिजुअल ट्रीट मुळे मला आवडला...
याची एचडी प्रिंट आली नेट वर की डाऊनलोड करणारच...

Pages