चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अपहरण झालेली व्यक्ती अपहरणकर्त्याकडे आकर्षीत होणे याला मानसशास्त्रात 'स्टॉकहोम सिंड्रोम' म्हणतात, 'रावण'पेक्षा हा मुद्दा रागोवच्या 'रोड'मधे कितीतरी जास्त प्रभावी पद्धतीने दाखवला होता. निदान तो सिनेमा किमान मनोरंजन करणारा तरी होता.<< हाच मुद्दा होता ना सुभाष घइ च्या "हिरो" मध्ये?

अपहरण झालेली व्यक्ती अपहरणकर्त्याकडे आकर्षीत होणे याला मानसशास्त्रात 'स्टॉकहोम सिंड्रोम' म्हणतात, 'रावण'पेक्षा हा मुद्दा रागोवच्या 'रोड'मधे कितीतरी जास्त प्रभावी पद्धतीने दाखवला होता. निदान तो सिनेमा किमान मनोरंजन करणारा तरी होता.<< हाच मुद्दा होता ना सुभाष घइ च्या "हिरो" मध्ये?

इतके वाईट आहेत का राजनिती आणि रावणा? Sad
असे रिव्ह्युज वाचून एकही पिक्चर पाहिला नाहिये मागच्या ६ महिन्यात.. मी तर "गजिनी" नंतर धसकाच घेतलाय over-hyped पिक्चर्सचा Sad
बघावे तरी काय सध्या???

अपहरण झालेली व्यक्ती अपहरणकर्त्याकडे आकर्षीत होणे याला मानसशास्त्रात 'स्टॉकहोम सिंड्रोम' म्हणतात, 'रावण'पेक्षा हा मुद्दा रागोवच्या 'रोड'मधे कितीतरी जास्त प्रभावी पद्धतीने दाखवला होता. निदान तो सिनेमा किमान मनोरंजन करणारा तरी होता.<< हाच मुद्दा होता ना सुभाष घइ च्या "हिरो" मध्ये?

घईचा हिरो आणि खलनायक सुध्दा साधारण त्याच टाइप चा होता !
खलनायक मधेही जॅकीचं नाव 'राम' होतं का ??

म्हणजे रावण चित्रपटात, सीतामाई, रावणाच्या प्रेमात पडते कि काय ?
कलयूग, घोर कलयूग ...
रामायणाच्या एका व्हर्जनमधे तर ती त्याची (रावणाची ) मुलगीच असते !!!

खलनायक मधेही जॅकीचं नाव 'राम' होतं का ?? >>> हो.

Karate Kid बघितला .. अप्रतिम! Jaden Smith सहि आहे .. पण Persuit of Happyness मध्ये अगदी लहान दिसणारा Jaden चार वर्षांत खुप मोठ्ठा दिसायला लागलाय .. वेगळाच दिसतो ..

पण पिक्चर, सगळ्यांचे performances, चायना तल्या काही नयनरम्य ठिकाणी केललं शूटिग आणि पिक्चरच अप्रतिम आहे ..

कराटे किड(?) खरच सहि आहे.मास्टर स्मिथचा अप्रतिम अभिनय.एकदा बघावाच असा.

काल आलाप हा अमिताभ रेखा, असरानी, ओमप्रकाश यांचा जुना सिनेमा मॅक्सवर सकाळी पाहिला. खास जुन्या जमान्यातला पठडीतला सिनेमा होता. हा डब्यात गेला होता का? मी याच नाव सुध्दा नव्हत ऐकल. मला तरी छान वाटला. लोकांना त्या वेळेला का आवडला नाही माहित नाही. एकच कारण असाव. एक सुध्दा गाण लक्षात राहील नाही.

रविवारी 'बमबम भोले' पाहिला. लेकीच्या हट्टाखातर म्हणून लावला आणि मग चॅनेल बदलावेसेच वाटले नाही. मस्त सिनेमा आहे. केवळ लहान मुलेच नाहीत तर मोठ्यांनीही बघण्यासारखा आहे. मुलांच्या विश्वातली सुखंदु:खं, त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यावरचे त्यांनी आपल्या बुद्धीनुसार काढलेले उपाय... मस्तच.. Happy
श्रीमंत-गरीब यांच्यातला भेद दाखवतानाही कुठेही अति केलेले नाही. बघून वाटतं, खरंच हे असंच तर घडत असतं आपल्या आजूबाजूला. एकेक प्रश्न जसे निर्माण होत जातात तसेच सुटतानाही दाखवले आहेत. पण काहीही स्क्रीप्टेड वाटत नाही. आपल्या आयुष्यातही एक प्रश्न सुटतो म्हणेपर्यंत दुसरा उभा राहतोच की. सिनेमा आहे म्हणून बघत अस्लो तरीही काही खोटं वाटत नाही, जे हल्ली बरेच सिनेमे बघताना जाणवत असतं. Happy

अपहरण झालेली व्यक्ती अपहरणकर्त्याकडे आकर्षीत होणे याला मानसशास्त्रात 'स्टॉकहोम सिंड्रोम' म्हणतात, <<
ह्या हे तर मराठीत पण झालंय की गंमत जंमत मधे.. :एक खवचट आणि तु. क. टाकणारी बाहुली:
Happy

नितिन, आलाप चालला नव्हता, कारण त्यावेळी बच्चन मारधाडीचे सिनेमे करत होता. पण त्यातली गाणी मात्र लोकप्रिय झाली होती.
काचे मनवा नाचे, बैरन बिजुरी, कोई गाता मै सो जाता, सगळीच छान होती.
माता सरस्वती, हे लताचे आणि मिनू पुरुषोत्तमचे गाणे संगीत सरिता मधे लागायचे.

कोई गाता मै सो जाता व माता सरस्वती ही दोन गाणी अतिशय सुंदर होती.. बच्चनच्या मारधाडइमेजमुळेच हा चित्रपट वाया गेला. कसा होता माहित नाही, कारण मी त्यावेळी मारधाडपटूची फॅन होते. असला गळ्यात शाल अडकवुन, किलोभर तेल ओतलेल्या चेह-यावर पडेल भाव घेऊन गंभीर स्वरात बोलणारा अमिताभ कोण बघेल???

असला गळ्यात शाल अडकवुन, किलोभर तेल ओतलेल्या चेह-यावर पडेल भाव घेऊन गंभीर स्वरात बोलणारा अमिताभ कोण बघेल???<<<<<<:हहगलो:
आलाप या चित्रपटाचं संगीत जयदेव नी दिलं होतं. ईतकी सुरेल गाणी देउनही पिक्चर डब्यात गेला हे संगीतकाराचं दुर्दैव Sad
याच जयदेव यांनी संगीत देऊन गाजलेले काही चित्रपट म्हणजे हम दोनो ( देवसाहेबांचा ),रेश्मा और शेरा, मुझे जीने दो, घरोंदा. लैला मजनू ( ॠषी कपूर्/रंजिता) ची गाणी मदनमोहनची होती पण मदनमोहन गेल्यानंतर पार्श्वसंगीताची जबाबदारी जयदेव नी घेतली.

'बमबम भोले' हा 'चिल्ड्रन ऑफ हेव्हन' ह्या माजिद माजिदीच्या इराणी सिनेमाची भ्रष्ट नक्कल आहे Sad मूळ चित्रपटाची सीन टू सीन कॉपी करताना त्यात उगाचच अतिरेकी, पोलिस वगैरे घुसडून त्या मुलाची धावपळ, एकाच बूटाची जोडी वापरताना झालेली त्रेधा, त्याने शर्यत जिंकण्यासाठी केलेला सराव वगैरे सगळ्यावरच अन्याय झालाय.. ती फाटकी शंभर रुपायांची नोट, शेवटी त्याच्या वडिलांना पोलिसांनीच मिळवून दिलेले काम वगैरे टिपिकल हिंदी सिनेमा सीन्स! Happy मूळ सिनेमा पाहिला असेल, तर हा त्यापुढे अगदीच फिका आहे. नुसता हा पाहिला असेल, तर आवडेल Happy
पण ह्यातली छोटी बहिण मात्र फारच गोड, मूळ सिनेमापेक्षाही Happy

मणीरत्नम् च्या सर्व फॅन्सची क्षमा मागुन परत एकदा सांगावेसे वाटते की तो एक ओव्हरेटेड दिग्दर्शक आहे. मला त्याचा युवा सोडुन एकही चित्रपट आवडला नव्हता. युवा जो विषय त्याने निवडला होता; त्याच्याशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहिला. फोटोग्राफीत अडकुन त्याची अ‍ॅडफिल्म केली नव्हती. मणिरत्नम् कौटुंबिक भाग नेहमीच छान हाताळतो; जसे रोजामध्ये त्यांचे लग्न होईपर्यंत तसा टाईम्पास होतो. Best Shot तो सिगारेट पटकन मधुच्या ओठाला लावतो. ड्रामा आला की तो साऊथी होतो. रोजात ती मधु highly security areaत घुसते काय... कर्नलही तिला अतिरेक्याच्या अड्ड्यावर धाड टाकायला घेऊन जातो.... अतिरेक्यांच्या त्या ठिकाणी ती "तू कहाँ, मैं यहाँ..." सारखी फिरते... तिच कथा बाँबेची (हिंदू-मुस्लीम दंगा, नेत्यांचा भंपकपणा वगैरेची क्लासिक कथा म्हनजे तमस). अगदी अंजली माझ्या एका मैत्रिणीने reccomend केला म्हणुन पाहिला. अंजली बाजुलाच राहिली, कॉलनीतील प्रेमप्रकरण, त्या मुलांची नाचगाणी... काही सिरीयसनेसच नव्हता. एका mentally challenged असलेल्या मुलामुळे कुटुंबावर होणारे परिणाम हा विषय हवेतच रहातो. (ह्याचे उत्तम सादरीकरण म्हणजे मराठी नाटकः नातीगोती>> दिलीप प्राभावळकर, स्वाती टिपणीस/ चिटणीस, अतुल परचुरे. नाटक अंगावर येत. थिएटरमधुन बाहेर पडताना सुन्न होते.) एखाद्या सर्वाथाने मोठ्या व्यक्तीची life storyसादर करताना, त्यापाठी किती अभ्यास आणि विचार लागतो हे पहायचे असेल तर The Aviator पहावा. कसा नसावा ह्यासठी गुरु. The Aviator मधील चौकशी आयोग आणि गुरुतील आयोगच्या सादरीकरणात केव्हढा फरक आहे.

तरीही गुरु पर्यंतचे सर्व चित्रपट पाहिले. कारण एकच आशावद की एव्हढा "मोठा" म्हणुन गौरवलेला दिग्दर्शक कधीतरी निहलानी किंवा बेनेगलांसारखा थिएटरमधुन बाहेर पडल्यावरही डोके सुन्न करुन विचार करायला लावणारा सिनेमा काढेल. मला तरी कधीच जाणवले नाही. कदहित मीच मठ्ठ असेन.

ता.क.: मित्राने एक महिना फ्री नेट्फ्लिक्सचे कुपन दिले. पहिलाच "The Song of Sparrows" हा माजिद माजिदीचा चित्रपट पाहिली. नेहमीप्रमाणेच अप्रतिम!!! गरीब कुटुंब, त्यांची धडपड, पैशाने सर्व विकत घेता येत नाही आणि मनाचा सच्चेपणा (Purity) हाच खरा... असा सहज दिलेला संदेश आणि हो, उत्तम फोटोग्राफी जी चित्रपटावर कुठेही कुरघोडी करत नाही. A must watch movie!!!

पूनमला अनुमोदन.
प्राची चिल्ड्रेन ऑफ हेवन नक्की बघ. युट्युबवर आहे. बमबम भोले आवडला असेल तर तो नक्कीच जास्त आवडेल.

राजनिती बघितला फक्त प्रकाश झा साठी .. कारण गंगाजल मला अत्यंत आवडतो. सगळ्या अपेक्षांवर पाणी फिरलेय राजनिती बघुन .. अतिषय रद्दड सिनेमा .. सुरवात चांगली केलीय .. नंतर त्याला बॉलीवुड मसालापट बनवुन टाकलेय .. निवडणुकीला उभे असणारे नेते एकमेकांच्या मागे बंदुका घेउन धावतात .. छ्या !! सगळे म्हणताय कैफ बद्दल चांगली अ‍ॅक्टिंग केलीय वगैरे .. पण मला तरी नेहमीसारखच प्लास्टीक वाटलं ..

रावण तर प्रोमोस वरुनच समजला होता .. पाहण्याची चुक केली नाही Happy

बमबम भोले' हा 'चिल्ड्रन ऑफ हेव्हन' ह्या माजिद माजिदीच्या इराणी सिनेमाची भ्रष्ट नक्कल आहे >>>> या माहितीसाठी धन्स पूनम. कदाचित मूळ सिनेमा न बघितल्याने किंबहूना बबभो हा कुठल्या सिनेमाची नक्कल आहे हेच माहिती नसल्याने, तुलना न करता पाहिल्याने असेल, मला सिनेमा आवडला Happy

चिल्ड्रन ऑफ हेवन ची पारायणं झाल्यावर बबभो च्या वाट्याला जायची हिंमतच नव्हती झाली माझी.
असो.
एमभुरे,
मला त्याचा युवा अजिबात आवडला नव्हता. पण आधीचे बरेचसे आवडले होते.
आणि बेनेगलांनी गेल्या काही वर्षात बरेच वाईट सिनेमे दिलेतच की. झुबेदा आणि नेताजी उदाहरणार्थ.
निदान झुबेदा जरा तरी बरा पण नेताजी म्हणजे मोठा विनोदच होता की. बेनेगलांच्याकडून अपेक्षित नक्कीच नव्हता इतका वाईट.

( टोणगा.. मी मालदीव सोडले.. सध्या मुंबईतच आहे.. )

एक सेकंद कुणी पाहिला आहे का?

प्रविणपा, म्या पायला 'मायनॉरिटी रिपोर्ट' परत एकदा. यावेळी जास्त कळला आणी आवडला ही.
निदान झुबेदा जरा तरी बरा पण नेताजी म्हणजे मोठा विनोदच होता की. बेनेगलांच्याकडून अपेक्षित नक्कीच नव्हता इतका वाईट.>>>
अनुमोदन, पण त्यांनी सज्जनपूर मधे बरीच भरपाई केली.

सगळेजण वर्ल्ड कप बघताहेत.
मी काल बर्‍याच वर्षानी परत ब्यूटीफूल पीपल बघितला. आता काहि दृष्ये ग्राफिकली अ‍ॅड केली आहेत (उदा माकडाचा हात वारुळात अडकतो ते ) पण बाकि सगळा सिनेमा आजही तसाच हसवतो. मादक फळे खाल्यामूळे सगळेच प्राणी झिंगतात तो प्रसंग तर मस्तच जमलाय.

एक्स मेन वुल्वराइन आणि २०१२ पाहिले वीकांताला. दोन्ही आवड्ले. बॉलिवूड बघणे दिवसेंदिवस अशक्य होत चालले आहे. २०१२ मध्ये ग्राफिक्स मस्त. त्यात भारतीय शास्त्रज्ञ व त्याचे कुटुंब मरते त्यावेळीस खूप वाइट वाट्ते. त्यात पहिल्या शॉट मध्ये तो अमेरिकन शास्त्रज्ञ विजयवाडा ला जातो व तिथे सतनाम व हरनाम नावाच्या लोकांना भेट्तो हे गंमतीचे वाट्ले पण मुलगी म्हणे आपण नाहीका इथे राहात तसेच ते राहात असतील. त्यात जो अमेरिकन शेवटी चीफ होतो प्रेसिडेंट मेल्यावर तो नट. एक्सिक्युटिव डिसिजन नावाच्या देमार पटात एक इंजिनिएअर असतो. काड्या चावणारा तोच आहे. त्याला बघून गंमत वाट्ली.

वुल्वराइन पण मस्त आहे. जॅकमन ला नेहमी गुडीगुडी रोलस मध्ये बघितले आहे त्यामुळे इत्का हार्ड कोअर रोल तो करेल असे वाट्ले नव्हते. त्यात ती विचित्र दाढी!

Pages