चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वर दिलेल्या लिंन्कमधल्या होम सिनेमातले हे एक द्रुष्य. हा संपुर्ण सिनेमा अश्या अप्रतिम फ्रेम्स नी नटलेला आहे, आणि तरिही त्यातला संदेश महत्वाचा आहे.

home3.jpg

दिनेशदा, मी पाहिला "होम", तुम्ही दिलेल्या लिन्क वरून....
संपूर्ण एरियल शूट आहे. एकसे एक फ्रेम्स आहेत सगळे. संदेशही चांगला.

नितळ पाहिला.. आवडला...
सगळ्याचीच कामं चांगली झालीत.. नीना कुळ्कर्णीच काम आव्डलं.. स्पेशली ज्यी सीन मधे ती तिच्या लगनाच्या वेळची गोष्ट सांगते .

आभार नमुसी, सर्व तरुण आणि लहान मुलांनी बघण्यासारखा आहे तो चित्रपट.
***

Lond Weekend नावाचा ऑष्ट्रेलियन सिनेमा बघितला. कव्हरवरुन तरी तो हॉरर मूव्ही वाटत नव्हता
(आणि तो तसा नाहीही ) पण त्याला कुठल्या कॅटेगरीमधे टाकायचे ते कळत नाही.
हा खरे तर एका जून्या सिनेमाचा रिमेक आहे.
एक विसंवाद असलेले जोडपे, एका निर्जन किनार्‍यावर कॅंपिंग करायला जाते. आणि वाटेतच
त्याना विचित्र अनुभव यायला सुरवात होते. निसर्गाने जणू त्यांच्याविरुद्ध बंड पुकारले आहे, असे
वाटत राहते.
नेहमीच्या हॉरर सिनेमात असतात, तसले घटक इथे अगदीच मोजके आहेत, पण सुंदर निसर्गच
त्यांच्या विरोधात असल्यासारखा भासत राहतो. हे नेमके कसे साधले आहे, ते प्रत्यक्ष बघण्यासारखे
आहे. सिनेमाची म्हणून एक दृष्य़भाषा असते, तिचा इथे पूरेपूर वापर केलाय. आणि चित्रपटभर तो
ताण कायम राहिलाय. सगळीच दृष्य पुढे महत्वाची ठरतात असे नाही, पण आपल्याला बघताना
मात्र, काहीतरी जाणवत राहते. उदा, नायक जळती सिगरेट गाडीच्या बाहेर फ़ेकतो, तर तिथे छोटीशी
आग लागते. समुद्रातील बाटली बंदुकीने फ़ोडतो, तर तिचा एक टोकेरी तूकडा, समुद्राच्या तळाशी
जाउन बसतो.
बहुतेक सिनेमाभर दोघेच आहेत, (तरी एकही न्यूड सीन नाही.) शेवट काय आहे, किंवा घडणारे
कशामुळे घडते, हे ,लिहून उत्सुकता घालवत नाही.

नितळमध्ये सर्वांचीच कामे छान झाली आहेत. पण देविका दफ्तरदारचा अभिनय मला सर्वात आवडला.
इतक्या नितांत सुंदर चित्रपटावर उतारा म्हणून एक नितांत वाईट चित्रपट पाहिलाच पाहिजे नाही का? त्यामुळेच मी पिकनिक नावाचा मराठी चित्रपट पाहिला. सई ताम्हणकरच्या दिव्य मराठीचे कोणी फॅन असतील तर त्यांनी जरुर पहावा. मध्येच हिंदी गाणी पण आहेत.

हय्या हुप्पा बघितला आपली मराठीवर.... सगळा आकबंद....

काढणार्याला लो़कांना हे आवडंल असं तरी कस वाटल देव जाणे....

'शिक्षणाच्या आयचा घो' पाहिला. ठिक आहे. >>>
आक्रस्ताळेपणाचा अनुभव आहे हा चित्रपट.

काहिसा मी शिवाजीराजे भोसले बोलतोयच एक्स्टेंशन वाटतय.
पण तो बराच बरा जमला होता.

Out of the night that covers me,
Black as the pit from pole to pole,
I thank whatever gods may be
For my unconquerable soul.

In the fell clutch of circumstance
I have not winced nor cried aloud.
Under the bludgeonings of chance
My head is bloody, but unbowed.

Beyond this place of wrath and tears
Looms but the Horror of the shade,
And yet the menace of the years
Finds, and shall find, me unafraid.

It matters not how strait the gate,
How charged with punishments the scroll,
I am the master of my fate:
I am the captain of my soul.

विलियम हेन्ली ची Invictus कविता.
आणि या कवितेच्या नावाचाच, क्लिंट इस्टवूड ने दिग्दर्शित केलेला सिनेमा आताच बघितला. नेल्सन मांडेला
(हाच उच्चार बरोबर आहे, मँडेला नाही) ने सत्ता हाती आल्यावर, एका रग्बी मॅचचा, देशात मैत्रभाव निर्माण करण्यासाठी कसा उपयोग करुन घेतला, त्याची हि रोमांचक कथा.
आपण कुठेहि सिनेमा बघतोय असे वाटत नाही, इतके सगळे जमून आलेय. मॉर्गन फ्रीमॅन मांडेलाच्या भुमिकेत तर मॅट डेमॉन रग्बी टीमचा कॅप्टन. (दोघांचेही अकॅडमी अवार्ड साठी नामांकन झाले होते ) या दोघांच्या शिवाय, प्रत्येक छोट्या छोट्या भुमिकेतला कलाकार, मग तो मांडेलाची सेक्रेटरी असो कि बॉडीगार्ड, अगदी पर्फेक्ट आहे.
आपल्या देशात रोमांचक गोष्टी काय कमी घडतात, पण आपण ठराविक वळणाचेच (दळणाचेच म्हणू का ) सहन करतो ?

कोणी नुकताच प्रदर्शित झालेला "रानभूल" पाहिलाय का? पाहिला असल्यास कसा वाटला ते सांगाल का प्लीज?

त्या रानभूल चा फाँट कळालाच नाही :-(, मला पहिल्यांदा चित्रपटाचे नाव "अनमूल" आहे असे वाटले.

रानभूल शद्ब ऐकला की मला नेहमी 'तो एक राजपुत्र, मी एक रानफुल, हलकेच घालीन त्याला, मी रानभूल' हेच आठवते.. Happy

भरपुर मराठी चित्रपट प्रदर्शित होताहेत. फटाफट पहा आणि आम्हाला कळवा, म्हणजे आम्हीही पाहु...

अस्मानी, धन्यवाद ह्या लिंकबद्दल. पहिली काही वाक्यं वाचून मला असं वाटलं की अभिप्राय प्रतिकूल आहे. पण अनुकूल आहे तर. जमलं तर नक्की बघेन आणि लिहेन.

दिनेशदा Invictus पाहिला, मस्त आहे. मॉर्गन फ्रीमनने काम मस्त केलय. रग्बी मॅचेसचे चित्रिकरण पण चांगले झालेय. हा चित्रपट सुचवल्याबद्दल धन्यवाद. Happy

नितळ फार सून्दर सिनेमा आहे. त्यातल "पानी सा निर्मल हो मेरा मन" हे अनिल अवचत ह्यानी लिह्लेले गाने आहे.....देविका दफ्तर्दार चा अभिनय सुन्दर च.

मला त्यात तेन्डुलकर खुपच आवड्ले.

काईटस पाहिला कालच.

एक तद्दन फालतू सिनेमा... ना लेखकाला काय लिहायचंय ते कळलंय.. ना दिग्दर्शकाला काय आणि कसं दाखवायचं कळलंय... दोघेही एकदम कन्फ्युज्ड...!!!

एक दोन कार चेस आणि एकमेकांवर उलट्या पालट्या पडणार्या गाड्या..त्यालाही हॉलिवूडची सर नाहीच्. नुसतीच कॉपी करायचा प्रयत्न...

त्या बर्बारा मोरी नावाच्या फॉरेनर बाईला घेतलंय आणि तिच्या भोवती सिनेमा गुंफायचा प्रयत्न केलाय. कोणतंच पात्र पकड घेत नाही. अगदी ह्रुतिकचंही.

पिक्चर संपायला अर्धा तास बाकी असतानाच प्रेक्षक निघून जायला लागले होते. अडिच मिनीटांची स्टोरी अडिच तास ताणल्यावर असंच होणार म्हणा.

तीनशे रुपयांचं तिकीट काढुन प्रिव्हीव्ह शो पाहिल्याचा मोठ्ठा पश्चाताप झाला.

मी तर सरळ 'स्वरविभ्रम संगीत नाटक पाहिले... छान आहे.. पण एक्दोन गाणी वगळली तर इतर गाणी ही नाट्यगीते कमी आणि भावगीते जास्त वाटली... मग उतारा म्हणून दुसर्‍या दिवशी 'कट्यार... ' पाहिले.... आता उद्या/परवा 'तो मी नव्हेच' बघणार आहे... Happy

मी परवा no country for old man पाहिला...शेवट नाही कळला तसे तो चित्रपटभर वीलन खून का करत हिंडतो तेही नाही कळले एकूण काय चित्रपटच नाही कळला माझ्या बाल्बुद्धीला झेपेल असं कुणी समजावून सांगेल का की त्यात काय दाखवायचे होते त्या दिग्दर्शकाला?

काईट्स ची खरचं कटलेली पतंग ठरली , मध्यंतरापर्यंत एकदम बोर आहे , मध्यंतरानंतर थोडासा बरा वाटतो , एंड तर पार गंडलाय. विनाकारण स्पॅनीश डॉयलॉग्ज घातलेत असं वाट्तं , थोडक्यात मोरीचा म्हणावा तसा प्रभाव नाही, हृतिक रोशनही काही विशेष प्रभाव पाडु शकला नाही . हृतिक पैशांसाठी खोटी लग्न करुन मेक्सिकन मुली अमेरिकेत मायग्रेट करतो , एखादं लग्न ठीक आहे पण सारखं सारखं तेच करण्याइतके अमेरिकन इमिग्रेशन लॉज लवचिक आहेत का ?
थोड्क्यात पतंग उडण्याचे चान्सेस खुपच कमी आहेत.

मग हृतिक ला एवढी कथा का आवडली होती ? एकतर तो मोजकेच चित्रपट करतो, आता पुढचा येईपर्यंत आणखी सहा महिने वर्ष जाईल.

आत्ताच काईटस पाहुन आलो, तद्दन फालतु पिक्चर आहे Sad

>>>>ना लेखकाला काय लिहायचंय ते कळलंय.. ना दिग्दर्शकाला काय आणि कसं दाखवायचं कळलंय... दोघेही एकदम कन्फ्युज्ड...!!!<<<< अविकुमारला १०० मोदक.

>>>>काईट्स ची खरचं कटलेली पतंग ठरली , मध्यंतरापर्यंत एकदम बोर आहे , मध्यंतरानंतर थोडासा बरा वाटतो , एंड तर पार गंडलाय>>> अगदी अगदी.

मध्यंतरानंतर थोडासा तरी बघनेबल आहे पण एंड मात्र .......... (या चित्रपटाची "सुरुवात पहा आणि शेवट चुकवा" अशी जाहिरात केली पाहिजे Happy )

त्यातल्या त्यात हृतिक आणि कंगनाचा डान्स भन्नाट आहे आणि "जिंदगी दो पल कि....." गाणे छान आहे.

थोडक्यात काय २००-२५०रू. ची तिकिट काढुन बघण्यासारखा बिलकुल नाही.

Pages