चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतक्या नितांत सुंदर चित्रपटावर उतारा म्हणून एक नितांत वाईट चित्रपट पाहिलाच पाहिजे नाही का? त्यामुळेच मी पिकनिक नावाचा मराठी चित्रपट पाहिला. सई ताम्हणकरच्या दिव्य मराठीचे कोणी फॅन असतील तर त्यांनी जरुर पहावा. मध्येच हिंदी गाणी पण आहेत.

पिकनिक मधली गाणी कोणी लिहिलीत माहीत आहे का? आदित्य ठाकरे.
मराठीच चित्रपटात सगळीच गाणी हिंदीच असलीच पाहिजेतच.

तद्दन फालतु पिक्चर आहे>>> विनाकारण वेळ वाया गेला.... पण ती हिरॉइन आपल्या हिंदी हिरॉइन पेक्षा चांगलं काम करतेय असं वाटल.... कमीत कमी "ओव्हर अ‍ॅक्टीग" तर नाहीय...

साऊंड ऑफ म्यूझिक ला ४० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, त्याची डिजीटली रीमास्टर्ड सिडी उपलब्ध आहे.
पूर्वी बघितला होता त्यावेळी संगीताने गारुड केले होते. आता तो किती नेत्रसुखदही होता ते जाणवते.
डो रे मी, कॉन्फीड्न्स, फेव्हरिट थिंग्ज, लोनली गोटहेड, कश्याचीच जादू कमी झालेली नाही. कॅप्टन ज्यावेळी मुलांच्या सूरात सूर मिसळतो, त्यावेळी आजही आतमधे कालवाकालव होते.
अरे पण काय लिहिलेत मी हे, साऊंड ऑफ म्यूझिक ४० वर्षाचा कसा होईल ? आपण झालोत, तो तर अजूनही तसाच चिरतरुण आहे, राहणारही आहे, कायमच...

सीडी नक्की घेणार. ते गारूड कायम आहे. पहिले पाहिला तेव्हा ते एड्ल वाइज गाणे व त्याचा संबंध समजला नव्हता पण त्याचा त्यांच्या राष्ट्रीय अस्मितेशी संदर्भ आहे ते कळले व ते अधिक गोड वाटले. आय लविट्लविट्लविट्लविटलविट.

here are a few of my favourite things...
i am sixteen going on seveteen...

गोड चित्रपट गोड गाणी..
परिचयची तुलना करायची का?नको राहू दे.गुलजारना वारा घालायचाय.

आत्ताच रॉग टर्न भाग २ पाहिला. भाग १ पेक्षा हा इतका बिभत्स आहे की कथा पटकथा लिहीणारा प्रोड्युसर, डायरेक्टर माणस असावीत की हैवान अशी शंका यावी.

नितिन, भूताचे फोटो काढणार्‍याला पण अशी शंका का यावी बरे ?
आता खरेच रे, जास्तीत जास्त बीभत्स कसे करता येईल, याची स्पर्धा आहे.

आज परत साऊंड ऑफ म्यूझिक बघितला, त्यातले प्रपोज करण्याचा प्रसंग. एंजेजमेंट तोडण्याचा प्रसंग, कसे अभिजात आहेत. इतकेच नव्हे तर राज्यक्रांतीचा प्रसंग पण किती सुंदररित्या सादर झालाय.
इतक्या वर्षानी पण त्यातला ताजेपणा कमी झालेला नाही.
हे बीबत्स सिनेमे परत बघावेसे वाटत नाहीत, आणि बघितलेच तर नजर आणि मन दोन्ही मरुन गेलेले असते.

अरेरे, इथल्या लोकांना काईट्स आवडला नाही वाटते!

काईट्स एक टिपिकल प्रेमकथा आहे. त्यातून काहीतरी ग्रेट हाती येईल अशी अपेक्षाच करणं चूक. एक तद्दन कमर्शियल सिनेमाकडून काय अपेक्षा करतो आपण? मनोरंजन, सौंदर्य- निसर्गाचं आणि मुख्य पात्रांचंही, थोडीफार कथा आणि तिची नेटकी मांडणी, चांगलं संगीत. हे सगळंच आहे काईट्समध्ये. 'पैसा की प्रेम' हा युगानुयुगांचा प्रश्न, ताकद प्रेमाला वाकवू शकत नाही हेच युगानुयुगांचं उत्तर.
बार्बरा मोरीला घेतलं म्हणून जरा जास्त उत्सुकता असेल. मस्त आहे ती. म्हणजे दिसायला तर 'सुंदर' अशी नाही, पण प्रचंड चार्मिंग आहे. टिपिकल अमेरिकन हसतात तसे सर्व दात दाखवून, दातात जीभ ठेवून हसते, तेव्हा she lights up the screen! फिगर वॉव आहेच. प्रेमकथा खूप गोड फुलवली आहे. संवाद अगदी थोडे आहेत, पण मस्त दिग्दर्शित केलेत.
ह्रिथिक! Blush त्याचा टॅन, त्याची पर्फेक्ट बॉडी, त्याचे रंग बदलणारे डोळे (घार्‍या लोकांच्या डोळ्यांमध्ये सर्व भावना कशा सही उठून दिसतात!), त्याचे फेशियल एक्स्प्रेशन्स- सगळंच वॉव.
दिग्दर्शन आवडलं. मधूनच फ्लॅशबॅक, मग त्याची वर्तमानाशी संगती, परत फ्लॅशबॅक, परत पुढे चालू- प्रभावी झालंय. सर्वात आवडलेलं- मारामारी चालू असताना मागे एकदा तर चक्क गाणंच आहे, आणि एकदा धोधो पावसाचा आवाज. त्यामुळे इम्पॅक्ट वाढलाच आहे. शेवटीही तसाच पार्श्वसंगीताचा वापर मस्त आहे.

शेवटचं जे काही लोकेशन आहे, ते मात्र breathless सुंदर आहे!! कुठे आहे ते? मेक्सिकोत? आपल्यापैकी कोणी प्रत्यक्ष गेलंय का तिथे?

शेवटी मरतात का हे दोघं? 'एक दूजे के लिए' स्टाइल? जर उत्तर हो असेल तर आता तिकडे पर्यटनासाठी भारतियांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे Wink

ते मेक्सिको नसून , न्यू मेक्सिको आहे असे त्याच्या मुलाखतीत वाचले होते.

काईट्स बघुन असं वाटलम उगाच शनिवार फुकट गेला Sad त्याऐवजी कॅमेरा घेऊन कुठे बाहेर गेलो असतो तर दिवस सार्थकी लागला असता Happy

काल व्हेन ईन रोम, नावाचा सिनेमा बघितला. सगळेच नवे चेहरे आहेत. पण मला मध्यवर्ती कल्पना आवडली. रोम मधे एक कारंजे आहे आणि तिथे नाणे टाकले कि म्हणे प्रेम सफल होते.
आपली नायिका कामात बुडून गेलेली. प्रेम वगैरे करायला वेळ नाही. बहिणीच्या लग्नासाठी म्हणून रोमला येते तर तिथे एकाच्या प्रेमात पडते. पण एका क्षणी विफल होते आणि दारू पित चक्क त्या कारंज्यात उतरते. तिथली चार पाच नाणी उचलते.
आता आणखी एका समजूतीनुसार, अशी नाणी उचलली, तर ज्याने नाणे टाकले होते ती व्यक्ती नाणे उचलणार्‍याच्या प्रेमात पडते. झाले, चार विचित्र वीर तिच्या मागे लागतात. शिवाय हिरो आहेच. तिची पळता भुई थोडी.
यावर उतारा म्हणजे ती नाणी परत कारंज्यात टाकायची किंवा ज्याची आहेत त्याला परत करायची. नायिका तसे करते, पण एक नाणे तिला परत करावेसे वाटत नाही. (कारण ती पण आता प्रेमात पडलेली असते ) लग्नापर्यंत प्रकरण जाते, पण अगदी ऐन मोक्याच्या क्षणी तिचे मन उचल खाते, तिला वाटते असे अखाद्या अमंलाखाली असलेले प्रेम काहि खरे नाही. ती नाणे परत करते.
पण शेवट इतका सहज नाही.
कथा वेगळी आहे. माफक विनोदी आहे. नायक नायिकेपेक्षा निदान सव्वा फुट उंच आहे. सहज बघायला मिळाला तर बघा.

'पल्प फिक्षण' (pulp fiction) पाहिला कालच, अजिबात झेपला नाही. Sad आत्ता विकीवर माहिती वाचून परत पाहावा लागेल.

भरत... पिकनिक मी पण बघितला... सगळी गाणी पळवत पळवत... हा पिक्चर काढायची इच्छा निर्मात्याला का झाली असा प्रश्न पडला होता मला... अत्यंतिक लो बजेट पिक्चर वाटला... एकूण ५ पात्र. त्यातले एक पात्र फक्त ३ मिनिटांसाठी आणि बाकीचे चौघं पूर्ण चित्रपट भर... कॉलेज मध्ये शिकणारे चार मित्र, त्यातल्या एकाचे तिच्यावर खूप लहान असल्यापासून प्रेम पण तिचे लग्न दुसर्‍याच बरोबर., जो त्यांच्या ग्रुप मध्ये बर्‍यापैकी नंतर आलेला आहे.. मग मेन प्रेमीचे डोकं फिरणे आणि त्याने ह्या सगळ्यांना मारण्यचा प्लॅन करणे.. असला काहीतरी अतर्क्य प्लॉट आहे... कदाचित फारेंड किंवा श्रद्धा अ आणि अ चित्रपट म्हणून जास्त चांगली चिरफाड करू शकतील..

सकाळमधे आलेला काईट्स चा रिव्ह्यू चांगला आहे. >>> त्याच्या खालच्या प्रतिक्रिया वाचल्यात का ? रिव्ह्यु पैशे देऊन लिहु शकतो पण प्रतिक्रिया मात्र उत्स्फुर्त आहेत. Proud

जेनीफर अ‍ॅनीस्टन चा द ब्रेक अप आताच पाहिला (बा चंपका वाचतो आहेस ना ? ) साधी सरळ कथा. एका जोडप्याचे नाते, अगदी तुटायला आलेले. तूटतेच. काही क्षण असे येतात कि परत सगळे जूळेल असे वाटते, पण असा साधा सरळ शेवट सहसा इंग्रजी सिनेमात नसतो.
तिने आणि विन्स वॉगन ने सुंदर भुमिका केल्या आहेत. सर्वच प्रसंग सहज आहेत. आणि शेवट तर खासच आहे.

"ओव्हर अ‍ॅक्टीग" तर नाहीय.......>>>>>>

मला तरी बार्बराची ओव्हर अ‍ॅक्टीगच वाटली उलट. कित्ती प्लास्टीक हसण आणी ते पण सारख सारख!! प्रेमकथा फुलवल्यासारखी तर अज्जीबातच वाटली नाही.

काईट्स मधला हृतिक आणि कंगना चा नाच आत्ताच बघितला. छान नाचलाय तो. पण गाणे खूप फास्ट शूट झालेय, शिवाय त्याला प्रतिस्पर्धी बरेच आहेत.
अश्या प्रकारच्या नाचांचे, डान्स डान्स, डान्स विथ मी, असे बरेच चित्रपट बघितले आहेत. आणि या सगळ्या चित्रपटांचे अगदी चावट असे विडंबन, डान्स फ्लीक नावाने आले होते, तेही बघितले.

श्री, मी सकाळ मधे म्हणजे actual , hard copy सकाळमधे वाचला रिव्ह्यू. so couldn't read प्रतिक्रिया .

'ग्राउंडहॉग डे' हा चित्रपट पाहिला. अमेरिकेतील (का कॅनडातील ??) एका गावात हिवाळा संपून, उन्हाळा केव्हा सुरू होणार हे जाणून घेण्यासाठी एक खास सोहळा असतो. तिथे ग्राउंडहॉग (बीव्हर का??) हा प्राणी हवामान तज्ञ आहे असे मानून उन्हाळा केव्हा सुरू होईल याचा अंदाज घेतला जातो. अशा काहिशा वेगळ्या सोहळ्याचे चित्रिकरण करण्याचे काम पीटर ला देण्यात येते जो की स्वतः न्यूज चॅनेलवर हवामानाच्या बातम्या देत असतो, त्याला 'वेदरमॅन' अशीही पदवी लाभलेली असते.

त्याला व्यक्तिशः या सोह्ळ्याच्या चित्रिकरणाला टाळायचे असते पण त्याला जावे लागते. मग तो सोहळा अनुभवतो, चित्रिकरण (वार्तांकन) करतो व लगेच आपल्या सहकार्‍यांसह परत जायला निघतो पण खराब हवामानामुळे त्याला परत त्याच गावी यायला लागते.

मात्र दुसर्‍या दिवशी सकाळी जाग आल्यानंतर त्याला जाणवते की दिवस बदलला नाही, आजपण 'ग्राउंडहॉग डे' आहे. आदल्या दिवशी घडलेल्या घटना पुन्हा घडायला लागतात जसे की हाउसकीपरने झोपेबद्दल विचारणे, जुना शाळेतला मित्र भेटणे , त्याला चुकवावे तर खड्यात पाय पडणे , तोच 'ग्राउंडहॉग डे' चा सेरेमनी परत होणे इ. असे दररोज सुरू होते. जणू काही हिरो साठी काळ पुढेच सरकत नाही, तो एकच दिवस परत परत अनुभवावा लागतो, पहिल्यांदा काही काळ तो मजा घेतो पण नंतर कंटाळून आत्महत्येचे दररोज एक प्रकार करून बघतो, विविध प्रकारे चोरी करून जेल मध्ये जातो पण रात्र झाली व सकाळी जागा झाल्यावर त्याच बेड मध्ये असतो व परत 'ग्राउंडहॉग डे' सुरू होतो.

मग तो हळूहळू त्याला आवडणार्‍या व नवीन अशा गोष्टी शिकायला , करायला लागतो. लोकांना मदत करणे, पियानो शिकणे, वैद्यकीय सल्ला पुरवणे इ. सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रेयसीला आवडणार्‍या गोष्टी माहिती करून घेणे व त्यानुसार स्वता:त बदल घडवणे.

जेव्हा सगळ्यात शेवटी जेव्हा प्रेयसीला प्रपोज केल्यानंतर दुसरा दिवस उजाडतो तेव्हा तो 'ग्राउंडहॉग डे' नसून त्यानंतरचा दिवस आहे व काळ पूर्ववत गतिमान झाला हे कळाल्यावर तो 'ग्राउंडहॉग डे' चे आभारच मानतो.

अवांतरः हा चित्रपट बराच आधी पाहिल्यामुळे जसे आठवलय तस लिहीलय, आणि जे काही लिहीलय (बोअर होणारे) त्यापेक्षा चित्रपट बराच चांगला आहे.

रंगासेठ, हि कल्पना एक दोन सिनेमामधे (अर्थातच इंग्रजी ) वापरलेली आहे. छान कल्पना आहे, प्रत्यक्षात तसे करता आले वा घडले तर !!!

मागच्या आठवड्यात "Identity" पाहिला. शेवटाचा अगदीच विचका होता, काही झेपलं नाही. ह्याच कथानकावर शिल्पा शेट्टी आणि केली दोरजी असलेला एक भयाण पिक्चर टिव्हीवर पाहिल्याचं स्मरतंय Sad

हो, बरोबर तोच. सुरुवात एकदम छान होती. पुढेही बराच इंटरेस्टींग वाटला. मग कायतरी multiple personality disorder चा घोळ घातलान त्यांनी. हिंदी भुलभुलैय्याची आठवण झाली. त्यात पण शेवट असाच अ़ळणी केला होता.

प्रिंस ऑफ पर्शिया: द सँड्स ऑफ टाईम

व्हिडीओ गेमवरुन प्रेरीत झालेला आणि मागचा अनुभव (टुंब रेडर) यथातथाच असल्याने, जास्त अपेक्षा न ठेवता हा सिनेमा पहायला गेलो; सुखद धक्का बसला. दोन तासाची निखळ करमणुक, सगळ्या कुटुंबाला आवडेल (पीजी१३) असा चित्रपट. अजिबात चुकवु नका.

ओके अरे पूर्ण सुट्टीत मुलांना काय दाखवावे असा प्रश्नच पडला होता. आज विचारते. टुंब रे. पण मला आवड्ला होता ( डॅ. क्रे. ) अंजु वहिनींनी नुसते विमानातील अनाउन्स्मेन्ट केली तरी मला आवड्ते ह्याह्याह्या.
Please check the worst chick flicks list on Time site at your leisure. its too funny. And sometimes it is more fun to watch the demaar movies than silly chick flicks. One doesn't want to be meaning full all the time. heheheehe

Pages