काल रोड टू संगम, नावाचा हिंदी सिनेमा बघितला. इथे त्याचा उल्लेख झाल्याचे वाचले नव्हते. महात्मा गांधीजींचा अस्थिकलश, कटक च्या बँकेत तसाच राहिलेला, असतो आणि त्याचे अलाहाबादला विसर्जन करायचे ठरते. त्यासाठी त्यावेळी वापरलेला ट्रक परत वापरायचे ठरते, पण त्याचे इंजिन बिघडलेले असते. ते दुरुस्तीसाठी एका मिसलमान मिस्त्रीकडे येते. पण तेवढ्यात दंगल होऊन, सर्व मुसलमान दुकाने बंद करतात. त्याविरुद्ध जाऊन, तो मिस्त्री ते इंजिन दुरुस्त करतो. त्याचे हे चित्रण. दुरुस्त झाल्यावर ती यात्रा आपल्या मोहल्ल्यातून जावी आणि तिथल्या सर्व मुसलमानानी त्यात सामिल व्हावे यासाठी तो प्रयत्न करतो.
विषय वेगळा आहे. पण पटकथा बेतास बात आहे. कुराण पठणाचा, मिस्त्रीची पत्नी (स्वाती चिटणीस) सकाळी उठते व मिस्त्री गायब असतो, त्या प्रसंगाचे शॉट्स अप्रतिम आहेत. मिस्त्रीच्या भूमिकेत परेश रावल, आणि कमिटीच्या चेअरमनच्या भुमिकेत, ओम पुरी आहे. दोघांच्या भुमिका, त्यांच्या लैकिकाला साजेश्या. यातले सरप्राईज आहे, ते मैलवीच्या भुमिकेतला, पवन मल्होत्रा. हा गुणी कलाकार, बरेच दिवस कुठे दिसला नव्हता.
या सिनेमाचा, सगळ्यात महत्वाचा भाग, मलातरी, त्यातल्या संवादाचा वाटला. मुसलमानांच्या मानसिकतेबद्दल, त्यांच्या पाकिस्तानकडे असलेल्या ओढ्याबद्दल, बॅ जिनांबद्दल, जे संवाद आहेत, ते जळजळीत आहेत. त्या संवादाना कात्री लागलेली नाही हे विशेष.
सिनेमाचे नाव इंग्लीशमधे का असावे ? कटक हून अलाहाबादला जाताना, कावेरी लागते का ? असले प्रश्ण सोडले, तर सिनेमा एकदा अवश्य बघण्यासारखा आहे. (कलाकारात एकही मुसलमान कलाकार नाही !!! )
बीबीसी चा, Edge of Darkness नावाचा सिनेमा पण बघितला. मेल जिब्सन मुख्य भुमिकेत आहे. त्याची मुलगी, एका आण्विक अस्त्रे निर्माण करणार्या कंपनीत नोकरी करत असते. ती त्यातील षडयंत्राला बळी पडते. त्यामूळे पोलिस ऑफिसर असलेले तिचे वडील, त्याच्या छडा लावतात, हि कथा. प्रत्यक्ष त्या अस्त्रनिर्मितीपेक्षा त्यातील काळ्या बा़जूकडे जास्त लक्ष दिले आहे. हिंसाचार नेमका पण परिणामकारक आहे. मेल जिब्सन, आणि त्या मुलीच्या लहानपणीचे प्रसंग उत्तम वठलेत. दाढी करण्याचा प्रसंग तर उत्कृष्ट आहे. त्या मुलीची आई, फोटोतसुद्धा दिसत नाही. मेल जिब्सन, नेहमीप्रमानेच, उत्तम. नावात डार्कनेस असला, तरी सिनेमाचे चित्रण, पूर्ण प्रकाशात आहे.
Green Zone मात्र अजिबात आवडला नाही. सद्दाम हुसेनला, फाशी देऊनही त्याचे भूत अजून अमेरिकेच्या मानेवरुन उतरलेले दिसत नाही. सिनेमा बराचसा अंधारात आहे !!!
दिनेश धन्यवाद. रोड टू संगम बघण्यासारखा दिसतो म्हणजे. गेले काही दिवस आम्ही जेथून डीव्हीडी आणतो तेथे पाहात होतो पण नक्की माहीत नव्हते कसा आहे. आता पाहतो.
दिप्या लिहिल होती बहुद्धा आधी.
डीव्हिडी कशाला चॅनेल्सवर असतो आता.
चित्रपट एकदा बघण्यासारखा आहे.
पण मला तर त्यातली ऋषी कपुरचीच लव्ह स्टोरी लयी भारी वाटली.
अपार्टमेंट पाहिला... चांगली स्टोरीलाईन , पण नाटक असावे तसे इन्डोअर सीन्स जास्त भरुन कथा सगळी बाद केली आहे..
मुंबईचे काही आउट्डोअर सीन्स मात्र सुंदर आहेत... नवीन सेतुजवळचे लोकेशन मस्त आहे.. .. तिथे पैसा वसूल..
स्टोरी मात्र लई वंगाळ... १ चमचा 'गुप्त' + १/२ चमचा बायपोलर शिझोफ्रेनिआ डिसऑर्डर + बादलीभर पाणी....
खून , सस्पेन्स असणार म्हणून गेलो, तर पहिला खून होतो, एका मांजराचा.. ! डायरेक्टरला माणसं परवडत नसावीत हे सिनेमा बघताना लक्षात येतेच. तीच तीच माणसे, तीच तीच लोकेशन्स... आणि सस्पेन्स तर अर्ध्या पिक्चरवरच संपतो.. पुढं फक्त नाईलाज म्हणून क्रियाकर्म उरकल्यागत सिनेमा बघत बसणे....
Submitted by जागोमोहनप्यारे on 26 April, 2010 - 11:32
P. S. I Love You पाहिला. cute आहे. जिरार्ड बटलर नेहमीप्रमाणे delicious दिसलाय. हिलरी स्वॉन्क चं कामही चांगलंय. the movie is very sad and very beautiful.
मी पण डेट नाईट बघितला. धमाल आहे नूसती. विनोदाचे प्रसंग, खुपच वेगळे आणि नवे आहेत.
इस्ताएल ची निर्मिति असलेला, लेबनॉन, हा सिनेमा पण बघितला. अनेक वर्षे सिव्हिल वॉर मधे होरपळलेला देश, म्हणजे लेबनॉन.
आपण भारतीय सुदैवी आहोत. आपल्याला लोकशाहीची सवय झालीय. लष्कर राज्य, सिव्हील वॉर याची प्रत्यक्ष झळ आपल्याला लागली नाही (पंजाब आणि काश्मिर मधल्या लोकांना हा अनुभव असेल) पण या सिनेमात जे पडद्यावर दिसते, त्याने प्रचंड विचलित व्हायला होते. शिंडलर्स लिस्ट नंतर असा सिनेमा बघितला नव्हता. किल बील मधला प्रचंड हिंसाचार बघताना, चक्क मजा वाटली होती, कारण तो खोटा आहे हे कळत होते, पण या सिनेमातला, हिंसाचार खोटा आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.
बहुतांशी सिनेमा, एका रणगाड्यात चित्रीत झालाय. रणगाड्याच्या आतमधे, त्यांची खायची प्यायची, झोपायची, इतर आन्हीके उरकायची काय व्यवस्था असते याची आपल्याला कल्पना नसते, ते सगळे यात बघायला मिळते. त्यातले विशीतले ऑपरेटर्स, त्यांची स्वप्ने हे पण सिनेमात येतात. पण ते केवळ संवादातून. त्याना दृष्यरुप दिलेले नाही. बहुतेक सिनेमा, त्यांच्या नजरेतून आपल्याला दिसतो.
भाषा अर्थातच हिब्रू आहे. सबटायटल्स वरुनच सिनेमातले संवाद कळतात. कलाकार सर्व त्या त्या भुमिकात चपखल. त्यातले अनेक जण कलाकार नसून, प्रत्यक्ष नागरीक आहेत, असेच वाटत राहते.
कुठेही मिळाला तर अवश्य बघा.
आजकाल रोज नवीन सिनेमा बघायला मिळत आहे. कॅश बघितला. मस्त आहे. स्मोकिंग न करणारे, रेड मीट न खाणारे, जोडपे बघून मजा वाटते. थ्रिलर पेक्षा हा सिनेमा मानसिकतेकडे जास्त लक्ष देतो.
बघताना मला सारखे वाटत होते, कि हा सिनेमा हिंदीत निघाला, तर सीन बीन च्या भारतीय अवताराला, शेवटी सज्जन दाखवण्याचा नक्की प्रयत्न होणार. शिवाय दोन चार गाण्यांच्या सिचुएशन पण दिसल्या. जसे नायिका, खलनायकाला सेड्यूस करायचा प्रयत्न करते तो. त्या दोघाना कॅश मिळते तेव्हा वगैरे.
Not Without my Daughter हा बराच जूना सिनेमा बघितला. याच नावाची कादंबरी आहे. ती मी वाचली होतीच. या कादंबरीचा मराठी अनुवाद पण उपलब्ध आहे.
एका अमेरिकन स्त्रीने का इराणी डॉक्टरशी लग्न केलेले असते. त्याना एक मुलगी पण असते.
बर्याच वर्षानी, तो तिला इराणला चलायचा आग्रह करतो. केवळ दोन आठवड्यासाठी जायचे
म्हणून ती तयार होते. पण तिथे गेल्यावर त्याचे इरादे वेगळे असल्याचे तिच्या लक्षात येते.
त्याचा परत जायचा विचार नसतो. आणि मग तिची सुटकेसाठी घडपड सुरु होते.
तिथल्या कायद्यानुसार तिला नवऱ्याच्या लिहित परवानगीशिवाय परत अमेरिकेला जाणे
शक्य नसते. तिच्या अमेरिकन नागरिकत्वाचा पण काही फ़ायदा होत नाही.
तिचावर अनेक बंधने येतात. घराबाहेर पडण्यावर, कुणाला फ़ोन करण्यावर बंदी येते.
मुलीला इस्लामिक शाळेत जाणे भाग पडते.
एकवेळ अशी येते, कि तिला एकटिला परत जायची परवानगी मिळते, पण मुलीला
तिथे सोडण्याची तिची तयारी नसते. कसेही करुन, मुलीसकट तिला अमेरिकेला
जायचे असते. तिला काहिजणांची मदत मिळते, मग छुप्या, खडतर मार्गाने, कधी
पायी तर कधी घोड्यावरुन असा प्रवास करत ती अंकारा (तूर्कस्तान) गाठते आणि
तिथून ती अमेरिकेला जाते.
मी ज्यावेळी हि कादंबरी वाचली होती, त्यावेळी, लेखिका बेटी महमूदी अज्ञातवासात
होती. आज इतक्या वर्षानीदेखील ती कादंबरी लक्षात आहे.
हा सिनेमा मात्र खरेच खूप छान आहे. कादंबरीवरुन सिनेमा काढताना, बरेचसे निसटते,
तसे इथेही झालेय. घरातील बायकांच्या अस्वच्छतेबद्दल, बाकिच्या बंधनाबद्दल जे उल्लेख
आहेत, ते सिनेमात नाहीत. पण तरिही मुख्य भाग, सर्व आला आहे.
इतकेच नव्हे तर जी घरे, दुकाने, रस्ते चित्रीकरणासाठी निवडले आहेत, तेही मूळ
कादंबरीतल्या वर्णनाप्रमाणेच आहेत. शेवटचा प्रवास आटोपशीर असला, तरी बराच
मूळ कादंबरीप्रमाणे आहे. याचे चित्रीकरण प्रत्यक्ष इराणमधे झाले आहे का, याची
कल्पना नाही. पण शंका येण्यास वाव नाही. (१५ वर्षांपूर्वी, फ़्रान्स आणि इराण
मधल्या फ़ूटबॉलच्या मॅचच्या वेळी, मुद्दाम हा सिनेमा, आफ़्रिकन नेटवर्क वर
दाखवला होता, आणि त्यावरुन बराच गदारोळ झाला होता. भारतात हा सिनेमा
प्रदर्शित झाला होता का, हे आठवत नाही. )
मुख्य भुमिकेत, सॅली फ़िल्ड आहे. तिचा अभिनय तर उत्तम आहेच, पण बाकिच्या
छोट्या छोट्या भुमिकेतील कलाकार पण, अगदी चपखल आहेत.
मी बघितलेल्या सिडीत, इराणी संवादांचे भाषांतर सबटायटल्सद्वारे केलेले नव्हते, पण
त्यामूळे ते संवाद जास्तच परिणामकारक झालेले आहेत. (नायिकेप्रमाणे आपण पंण
त्याबद्दल अंधारातच राहतो.)
आपल्याकडे करिष्मा कपूर चा एक सिनेमा, याच कथानकावर बेतल्याचे आठवतेय.
पण तो इतका परिणामकारक, झाला नसणार. (मी बघितला नव्हता.)
***
हाल बेरीचा The Rich Man's Wife नावाचा एक थ्रीलर पण बघितला. हाल बेरी
बॉंड बरोबर आली होती, त्यावेळी तिला तितकासा वाव मिळाला नव्हता, पण
हा सिनेमा पूर्ण तिचा आहे.
खरे तर यातले सर्व कथानक, फ़्लॅशबॅक मधे आहे. नायिकेला एका खूनावरून
अटक झालीय, आणि ती जबानी देतेय अशी सुरवात आहे. (या जबानीत
तिच्या अपरोक्ष घडलेल्या घटनाही येतात, हे जरा खटकते.) पण जे काही
घडते, ते सगळे क्रमानुसार सिनेमात येते त्यामूळे सस्पेन्स असा काहिच नाही.
पण शेवटच्या दोन मिनिटात, जी कलाटणी दिलीय ती लाजबाब आहे. या
शक्यतेचा आपण विचारच केलेला नसतो.
हाल बेरीचे, बोलके डोळे आणि चेहरा, यांचा मस्त वापर केलाय तिने.
***
कुणाच्या तरी आग्रहाला बळी पडून मी, हाऊसफ़ूल हा साजिद नडियादवालाचा
हिंदी सिनेमा बघितला.
अक्षय कुमार, रितेश देशमुख, अर्जून रामपाल, लारा दत्ता, दिपिका पदुकोण,
बोमन इराणी, चंकी पांडे, रणधीर कपूर, गझनी मधली दुसरी नटी (नाव
विसरलो ) झुबेदा मधली तिसरी नटी (परत नाव विसरलो) इतके सगळे
कलाकार असून, सिनेमाला काडीचा अर्थ नाही.
बरेचसे प्रसंग तर आयत्यावेळी लिहिल्यासारखे आहेत. बहुतेक सगळे
विनोद, केळ्याच्या सालीवरुन पाय घसरुन माणूस पडला, या दर्जाचे.
विनोदावरुन हसू येणार नाही याची बहुतेक दिग्दर्शकाला खात्री असावी, म्हणून
शेवटी बकिंगहॅम पॅलेसमधला लाफ़िंग गॅसचा प्रसंग आणलाय.
सिनेमात इंग्लंडची राणी चक्क, मला माहित नाय, असे मराठी बोलताना
दाखवलेय ( हसा रे !!) ती प्रत्यक्ष राणी आहे का लूक अलाईक आहे, याची
कल्पना नाही. पण तरिही तिथल्या अधिकार्याने, या प्रसंगाला परवानगी
कशी दिली, हे नवलच आहे.
या कलाकारांपैकी, कुणालाच कथा वा पटकथा बघायची गरज वाटली नाही का ?
कि निर्मात्याच्या पैश्याने, लंडनची सैर करायला मिळतेय तर का सोडा, असा
विचार केला ? ( अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज, नावाचा सिनेमात अमिताने,
आणि बारुद सिनेमात रिना रॉयने, अश्याच विचाराने भुमिका घेतल्या होत्या
आणि ते बिनदिक्कत कबूलही केले होते !! )
बघा, पैसे वाचवले ना मी तूमचे !
(काश, निर्मात्याचेही वाचवू शकलो असतो !!)
अरेरे.. साजिद खान परवा प्रेस कॉन्फरन्समधे हाऊसफुलबद्दल जे काही बोलला ते तुम्ही ऐकले नाही का दिनेशदा??
हा सिनेमा अक्षय कुमारच्या सर्व विनोदी चित्रपटापेक्षाही (यात हेराफेरी पण आला) महान आहे. हा दिपिका पदुकोणच्या आयुष्यातला सर्वात जास्त विनोदी चित्रपट आहे. रितेश देशमुखचं कॉमिक टायमिंग ही काय चीज आहे हे हा चित्रपट पाहून तुम्हाला कळेल. यानंतर अर्जुन रामपालला लोक एक "विनोदी अभिनेता" म्हणून ओळखतील. याचित्रपटामुळे जिया खानची (गझनीवाली) गर्ल नेक्स्ट डोअर अशी इमेज तयार होइल.
भारतातले सर्व रेकॉर्ड्स हा चित्रपट तोडेल. इत्यादि इत्यादि इत्यादि... हे ऐकल्यापासूनच "पाण जाये पर हाऊसफुल्ल न देखा जाये" असं मी ठरवलय.
हा सिनेमा अक्षय कुमारच्या सर्व विनोदी चित्रपटापेक्षाही (यात हेराफेरी पण आला) महान आहे. हा दिपिका पदुकोणच्या आयुष्यातला सर्वात जास्त विनोदी चित्रपट आहे. रितेश देशमुखचं कॉमिक टायमिंग ही काय चीज आहे हे हा चित्रपट पाहून तुम्हाला कळेल. यानंतर अर्जुन रामपालला लोक एक "विनोदी अभिनेता" म्हणून ओळखतील. याचित्रपटामुळे जिया खानची (गझनीवाली) गर्ल नेक्स्ट डोअर अशी इमेज तयार होइल. >>>> ओह... तर खरा विनोद तिथे आहे तर....
'नॉट विदाऊट माय डॉटर' ह्या पुस्तकाएवढा त्या वर बेतलेला पिक्चर मला अजिबात आवडला नाही. पुस्तकं किमान ४ वेळा वाचलंय, पण पिक्चर एकदाच कसाबसा पाहिला. एवढं पुस्तकं, त्यातले बारकावे २ तासाच्या पिक्चरमध्ये बसवणं काही सोप्पंही नाहीच म्हणा.
डेट नाईट मस्त आहे , कॅश पण
डेट नाईट मस्त आहे , कॅश पण सही आहे .
दीपु, बघ बिंदास.. मी पाहिलाय,
दीपु, बघ बिंदास.. मी पाहिलाय, मस्त आहे.. एकदा पाहण्यासाठी एकदम उत्तम.. इथे झालीय चर्चा. बहुतेक वेगळा धागा उघडलेला. वर गृप मध्ये चेक कर..
दीपुर्झा काही पाने मागे जा,
दीपुर्झा काही पाने मागे जा, किमान मी तरी लिहीले होते - काय लिहीले होते ते आठवत नाही
फारेंडा, वाचलं रे ५० व्या
फारेंडा, वाचलं रे ५० व्या पानावर आहे
दीपड्या,घेउन बघ की विकत !
दीपड्या,घेउन बघ की विकत ! ९०-१०० रु. गेले तर गेले

अरे Bounty Hunter कुणीच का
अरे Bounty Hunter कुणीच का बघत नाहिये ?
२००० सालचा, अमोल पालेकरांचा र
२००० सालचा, अमोल पालेकरांचा र धो कर्व्यांवरील ध्यासपर्व पहिला. सर्वांनी जरुर पहावा
http://broadband.bigflix.com/home/Movie/409/Dhyasparva
चांगलाय Bounty Hunter .
चांगलाय Bounty Hunter .
विहीर पाहिला. आवडला.
विहीर पाहिला. आवडला.
Definitely Maybe मस्त मुवी
Definitely Maybe मस्त मुवी आहे .
अपार्ट्मेम्ट कुणी पाहिला
अपार्ट्मेम्ट कुणी पाहिला कारे? अरे बरेच दिवसात सस्पेन्स, मर्डर स्टोरी नाही पाहिली... कुणी तरी रेव्ह्यु लिहा .. जीव तळमळतोय...
काल रोड टू संगम, नावाचा हिंदी
काल रोड टू संगम, नावाचा हिंदी सिनेमा बघितला. इथे त्याचा उल्लेख झाल्याचे वाचले नव्हते. महात्मा गांधीजींचा अस्थिकलश, कटक च्या बँकेत तसाच राहिलेला, असतो आणि त्याचे अलाहाबादला विसर्जन करायचे ठरते. त्यासाठी त्यावेळी वापरलेला ट्रक परत वापरायचे ठरते, पण त्याचे इंजिन बिघडलेले असते. ते दुरुस्तीसाठी एका मिसलमान मिस्त्रीकडे येते. पण तेवढ्यात दंगल होऊन, सर्व मुसलमान दुकाने बंद करतात. त्याविरुद्ध जाऊन, तो मिस्त्री ते इंजिन दुरुस्त करतो. त्याचे हे चित्रण. दुरुस्त झाल्यावर ती यात्रा आपल्या मोहल्ल्यातून जावी आणि तिथल्या सर्व मुसलमानानी त्यात सामिल व्हावे यासाठी तो प्रयत्न करतो.
विषय वेगळा आहे. पण पटकथा बेतास बात आहे. कुराण पठणाचा, मिस्त्रीची पत्नी (स्वाती चिटणीस) सकाळी उठते व मिस्त्री गायब असतो, त्या प्रसंगाचे शॉट्स अप्रतिम आहेत. मिस्त्रीच्या भूमिकेत परेश रावल, आणि कमिटीच्या चेअरमनच्या भुमिकेत, ओम पुरी आहे. दोघांच्या भुमिका, त्यांच्या लैकिकाला साजेश्या. यातले सरप्राईज आहे, ते मैलवीच्या भुमिकेतला, पवन मल्होत्रा. हा गुणी कलाकार, बरेच दिवस कुठे दिसला नव्हता.
या सिनेमाचा, सगळ्यात महत्वाचा भाग, मलातरी, त्यातल्या संवादाचा वाटला. मुसलमानांच्या मानसिकतेबद्दल, त्यांच्या पाकिस्तानकडे असलेल्या ओढ्याबद्दल, बॅ जिनांबद्दल, जे संवाद आहेत, ते जळजळीत आहेत. त्या संवादाना कात्री लागलेली नाही हे विशेष.
सिनेमाचे नाव इंग्लीशमधे का असावे ? कटक हून अलाहाबादला जाताना, कावेरी लागते का ? असले प्रश्ण सोडले, तर सिनेमा एकदा अवश्य बघण्यासारखा आहे. (कलाकारात एकही मुसलमान कलाकार नाही !!! )
बीबीसी चा, Edge of Darkness नावाचा सिनेमा पण बघितला. मेल जिब्सन मुख्य भुमिकेत आहे. त्याची मुलगी, एका आण्विक अस्त्रे निर्माण करणार्या कंपनीत नोकरी करत असते. ती त्यातील षडयंत्राला बळी पडते. त्यामूळे पोलिस ऑफिसर असलेले तिचे वडील, त्याच्या छडा लावतात, हि कथा. प्रत्यक्ष त्या अस्त्रनिर्मितीपेक्षा त्यातील काळ्या बा़जूकडे जास्त लक्ष दिले आहे. हिंसाचार नेमका पण परिणामकारक आहे. मेल जिब्सन, आणि त्या मुलीच्या लहानपणीचे प्रसंग उत्तम वठलेत. दाढी करण्याचा प्रसंग तर उत्कृष्ट आहे. त्या मुलीची आई, फोटोतसुद्धा दिसत नाही. मेल जिब्सन, नेहमीप्रमानेच, उत्तम. नावात डार्कनेस असला, तरी सिनेमाचे चित्रण, पूर्ण प्रकाशात आहे.
Green Zone मात्र अजिबात आवडला नाही. सद्दाम हुसेनला, फाशी देऊनही त्याचे भूत अजून अमेरिकेच्या मानेवरुन उतरलेले दिसत नाही. सिनेमा बराचसा अंधारात आहे !!!
दिनेश धन्यवाद. रोड टू संगम
दिनेश धन्यवाद. रोड टू संगम बघण्यासारखा दिसतो म्हणजे. गेले काही दिवस आम्ही जेथून डीव्हीडी आणतो तेथे पाहात होतो पण नक्की माहीत नव्हते कसा आहे. आता पाहतो.
दिप्या लिहिल होती बहुद्धा
दिप्या लिहिल होती बहुद्धा आधी.
डीव्हिडी कशाला चॅनेल्सवर असतो आता.
चित्रपट एकदा बघण्यासारखा आहे.
पण मला तर त्यातली ऋषी कपुरचीच लव्ह स्टोरी लयी भारी वाटली.
अपार्टमेंट पाहिला... चांगली
अपार्टमेंट पाहिला... चांगली स्टोरीलाईन , पण नाटक असावे तसे इन्डोअर सीन्स जास्त भरुन कथा सगळी बाद केली आहे..
मुंबईचे काही आउट्डोअर सीन्स मात्र सुंदर आहेत... नवीन सेतुजवळचे लोकेशन मस्त आहे..
.. तिथे पैसा वसूल..
स्टोरी मात्र लई वंगाळ... १ चमचा 'गुप्त' + १/२ चमचा बायपोलर शिझोफ्रेनिआ डिसऑर्डर + बादलीभर पाणी....
खून , सस्पेन्स असणार म्हणून गेलो, तर पहिला खून होतो, एका मांजराचा.. ! डायरेक्टरला माणसं परवडत नसावीत हे सिनेमा बघताना लक्षात येतेच. तीच तीच माणसे, तीच तीच लोकेशन्स... आणि सस्पेन्स तर अर्ध्या पिक्चरवरच संपतो.. पुढं फक्त नाईलाज म्हणून क्रियाकर्म उरकल्यागत सिनेमा बघत बसणे....
जामोप्या तुम्ही सभात्याग का
जामोप्या तुम्ही सभात्याग का नाही केलात?
P. S. I Love You पाहिला. cute
P. S. I Love You पाहिला. cute आहे. जिरार्ड बटलर नेहमीप्रमाणे delicious दिसलाय. हिलरी स्वॉन्क चं कामही चांगलंय. the movie is very sad and very beautiful.
मी पण डेट नाईट बघितला. धमाल
मी पण डेट नाईट बघितला. धमाल आहे नूसती. विनोदाचे प्रसंग, खुपच वेगळे आणि नवे आहेत.
इस्ताएल ची निर्मिति असलेला, लेबनॉन, हा सिनेमा पण बघितला. अनेक वर्षे सिव्हिल वॉर मधे होरपळलेला देश, म्हणजे लेबनॉन.
आपण भारतीय सुदैवी आहोत. आपल्याला लोकशाहीची सवय झालीय. लष्कर राज्य, सिव्हील वॉर याची प्रत्यक्ष झळ आपल्याला लागली नाही (पंजाब आणि काश्मिर मधल्या लोकांना हा अनुभव असेल) पण या सिनेमात जे पडद्यावर दिसते, त्याने प्रचंड विचलित व्हायला होते. शिंडलर्स लिस्ट नंतर असा सिनेमा बघितला नव्हता. किल बील मधला प्रचंड हिंसाचार बघताना, चक्क मजा वाटली होती, कारण तो खोटा आहे हे कळत होते, पण या सिनेमातला, हिंसाचार खोटा आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.
बहुतांशी सिनेमा, एका रणगाड्यात चित्रीत झालाय. रणगाड्याच्या आतमधे, त्यांची खायची प्यायची, झोपायची, इतर आन्हीके उरकायची काय व्यवस्था असते याची आपल्याला कल्पना नसते, ते सगळे यात बघायला मिळते. त्यातले विशीतले ऑपरेटर्स, त्यांची स्वप्ने हे पण सिनेमात येतात. पण ते केवळ संवादातून. त्याना दृष्यरुप दिलेले नाही. बहुतेक सिनेमा, त्यांच्या नजरेतून आपल्याला दिसतो.
भाषा अर्थातच हिब्रू आहे. सबटायटल्स वरुनच सिनेमातले संवाद कळतात. कलाकार सर्व त्या त्या भुमिकात चपखल. त्यातले अनेक जण कलाकार नसून, प्रत्यक्ष नागरीक आहेत, असेच वाटत राहते.
कुठेही मिळाला तर अवश्य बघा.
आजकाल रोज नवीन सिनेमा बघायला
आजकाल रोज नवीन सिनेमा बघायला मिळत आहे.
कॅश बघितला. मस्त आहे. स्मोकिंग न करणारे, रेड मीट न खाणारे, जोडपे बघून मजा वाटते. थ्रिलर पेक्षा हा सिनेमा मानसिकतेकडे जास्त लक्ष देतो.
बघताना मला सारखे वाटत होते, कि हा सिनेमा हिंदीत निघाला, तर सीन बीन च्या भारतीय अवताराला, शेवटी सज्जन दाखवण्याचा नक्की प्रयत्न होणार. शिवाय दोन चार गाण्यांच्या सिचुएशन पण दिसल्या. जसे नायिका, खलनायकाला सेड्यूस करायचा प्रयत्न करते तो. त्या दोघाना कॅश मिळते तेव्हा वगैरे.
Date night ठीके. Steve Martin
Date night ठीके. Steve Martin आणि Queen Latifa च्या चित्रपटाची आठवण येत राहते. नाव विसरले.
Not Without my Daughter हा
Not Without my Daughter हा बराच जूना सिनेमा बघितला. याच नावाची कादंबरी आहे. ती मी वाचली होतीच. या कादंबरीचा मराठी अनुवाद पण उपलब्ध आहे.
एका अमेरिकन स्त्रीने का इराणी डॉक्टरशी लग्न केलेले असते. त्याना एक मुलगी पण असते.
बर्याच वर्षानी, तो तिला इराणला चलायचा आग्रह करतो. केवळ दोन आठवड्यासाठी जायचे
म्हणून ती तयार होते. पण तिथे गेल्यावर त्याचे इरादे वेगळे असल्याचे तिच्या लक्षात येते.
त्याचा परत जायचा विचार नसतो. आणि मग तिची सुटकेसाठी घडपड सुरु होते.
तिथल्या कायद्यानुसार तिला नवऱ्याच्या लिहित परवानगीशिवाय परत अमेरिकेला जाणे
शक्य नसते. तिच्या अमेरिकन नागरिकत्वाचा पण काही फ़ायदा होत नाही.
तिचावर अनेक बंधने येतात. घराबाहेर पडण्यावर, कुणाला फ़ोन करण्यावर बंदी येते.
मुलीला इस्लामिक शाळेत जाणे भाग पडते.
एकवेळ अशी येते, कि तिला एकटिला परत जायची परवानगी मिळते, पण मुलीला
तिथे सोडण्याची तिची तयारी नसते. कसेही करुन, मुलीसकट तिला अमेरिकेला
जायचे असते. तिला काहिजणांची मदत मिळते, मग छुप्या, खडतर मार्गाने, कधी
पायी तर कधी घोड्यावरुन असा प्रवास करत ती अंकारा (तूर्कस्तान) गाठते आणि
तिथून ती अमेरिकेला जाते.
मी ज्यावेळी हि कादंबरी वाचली होती, त्यावेळी, लेखिका बेटी महमूदी अज्ञातवासात
होती. आज इतक्या वर्षानीदेखील ती कादंबरी लक्षात आहे.
हा सिनेमा मात्र खरेच खूप छान आहे. कादंबरीवरुन सिनेमा काढताना, बरेचसे निसटते,
तसे इथेही झालेय. घरातील बायकांच्या अस्वच्छतेबद्दल, बाकिच्या बंधनाबद्दल जे उल्लेख
आहेत, ते सिनेमात नाहीत. पण तरिही मुख्य भाग, सर्व आला आहे.
इतकेच नव्हे तर जी घरे, दुकाने, रस्ते चित्रीकरणासाठी निवडले आहेत, तेही मूळ
कादंबरीतल्या वर्णनाप्रमाणेच आहेत. शेवटचा प्रवास आटोपशीर असला, तरी बराच
मूळ कादंबरीप्रमाणे आहे. याचे चित्रीकरण प्रत्यक्ष इराणमधे झाले आहे का, याची
कल्पना नाही. पण शंका येण्यास वाव नाही. (१५ वर्षांपूर्वी, फ़्रान्स आणि इराण
मधल्या फ़ूटबॉलच्या मॅचच्या वेळी, मुद्दाम हा सिनेमा, आफ़्रिकन नेटवर्क वर
दाखवला होता, आणि त्यावरुन बराच गदारोळ झाला होता. भारतात हा सिनेमा
प्रदर्शित झाला होता का, हे आठवत नाही. )
मुख्य भुमिकेत, सॅली फ़िल्ड आहे. तिचा अभिनय तर उत्तम आहेच, पण बाकिच्या
छोट्या छोट्या भुमिकेतील कलाकार पण, अगदी चपखल आहेत.
मी बघितलेल्या सिडीत, इराणी संवादांचे भाषांतर सबटायटल्सद्वारे केलेले नव्हते, पण
त्यामूळे ते संवाद जास्तच परिणामकारक झालेले आहेत. (नायिकेप्रमाणे आपण पंण
त्याबद्दल अंधारातच राहतो.)
आपल्याकडे करिष्मा कपूर चा एक सिनेमा, याच कथानकावर बेतल्याचे आठवतेय.
पण तो इतका परिणामकारक, झाला नसणार. (मी बघितला नव्हता.)
***
हाल बेरीचा The Rich Man's Wife नावाचा एक थ्रीलर पण बघितला. हाल बेरी
बॉंड बरोबर आली होती, त्यावेळी तिला तितकासा वाव मिळाला नव्हता, पण
हा सिनेमा पूर्ण तिचा आहे.
खरे तर यातले सर्व कथानक, फ़्लॅशबॅक मधे आहे. नायिकेला एका खूनावरून
अटक झालीय, आणि ती जबानी देतेय अशी सुरवात आहे. (या जबानीत
तिच्या अपरोक्ष घडलेल्या घटनाही येतात, हे जरा खटकते.) पण जे काही
घडते, ते सगळे क्रमानुसार सिनेमात येते त्यामूळे सस्पेन्स असा काहिच नाही.
पण शेवटच्या दोन मिनिटात, जी कलाटणी दिलीय ती लाजबाब आहे. या
शक्यतेचा आपण विचारच केलेला नसतो.
हाल बेरीचे, बोलके डोळे आणि चेहरा, यांचा मस्त वापर केलाय तिने.
***
कुणाच्या तरी आग्रहाला बळी पडून मी, हाऊसफ़ूल हा साजिद नडियादवालाचा
हिंदी सिनेमा बघितला.
अक्षय कुमार, रितेश देशमुख, अर्जून रामपाल, लारा दत्ता, दिपिका पदुकोण,
बोमन इराणी, चंकी पांडे, रणधीर कपूर, गझनी मधली दुसरी नटी (नाव
विसरलो ) झुबेदा मधली तिसरी नटी (परत नाव विसरलो) इतके सगळे
कलाकार असून, सिनेमाला काडीचा अर्थ नाही.
बरेचसे प्रसंग तर आयत्यावेळी लिहिल्यासारखे आहेत. बहुतेक सगळे
विनोद, केळ्याच्या सालीवरुन पाय घसरुन माणूस पडला, या दर्जाचे.
विनोदावरुन हसू येणार नाही याची बहुतेक दिग्दर्शकाला खात्री असावी, म्हणून
शेवटी बकिंगहॅम पॅलेसमधला लाफ़िंग गॅसचा प्रसंग आणलाय.
सिनेमात इंग्लंडची राणी चक्क, मला माहित नाय, असे मराठी बोलताना
दाखवलेय ( हसा रे !!) ती प्रत्यक्ष राणी आहे का लूक अलाईक आहे, याची
कल्पना नाही. पण तरिही तिथल्या अधिकार्याने, या प्रसंगाला परवानगी
कशी दिली, हे नवलच आहे.
या कलाकारांपैकी, कुणालाच कथा वा पटकथा बघायची गरज वाटली नाही का ?
कि निर्मात्याच्या पैश्याने, लंडनची सैर करायला मिळतेय तर का सोडा, असा
विचार केला ? ( अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज, नावाचा सिनेमात अमिताने,
आणि बारुद सिनेमात रिना रॉयने, अश्याच विचाराने भुमिका घेतल्या होत्या
आणि ते बिनदिक्कत कबूलही केले होते !! )
बघा, पैसे वाचवले ना मी तूमचे !
(काश, निर्मात्याचेही वाचवू शकलो असतो !!)
Not Without my Daughter पुर्ण
Not Without my Daughter पुर्ण पाठ असलं तरी बघताना/वाचताना दरवेळेस शहारा येतो. 'इच्छा तेथे मार्ग' हे अगदी पटत.
अरेरे.. साजिद खान परवा प्रेस
अरेरे.. साजिद खान परवा प्रेस कॉन्फरन्समधे हाऊसफुलबद्दल जे काही बोलला ते तुम्ही ऐकले नाही का दिनेशदा??
हा सिनेमा अक्षय कुमारच्या सर्व विनोदी चित्रपटापेक्षाही (यात हेराफेरी पण आला) महान आहे. हा दिपिका पदुकोणच्या आयुष्यातला सर्वात जास्त विनोदी चित्रपट आहे. रितेश देशमुखचं कॉमिक टायमिंग ही काय चीज आहे हे हा चित्रपट पाहून तुम्हाला कळेल. यानंतर अर्जुन रामपालला लोक एक "विनोदी अभिनेता" म्हणून ओळखतील. याचित्रपटामुळे जिया खानची (गझनीवाली) गर्ल नेक्स्ट डोअर अशी इमेज तयार होइल.
भारतातले सर्व रेकॉर्ड्स हा चित्रपट तोडेल. इत्यादि इत्यादि इत्यादि...
हे ऐकल्यापासूनच "पाण जाये पर हाऊसफुल्ल न देखा जाये" असं मी ठरवलय.
हा सिनेमा अक्षय कुमारच्या
हा सिनेमा अक्षय कुमारच्या सर्व विनोदी चित्रपटापेक्षाही (यात हेराफेरी पण आला) महान आहे. हा दिपिका पदुकोणच्या आयुष्यातला सर्वात जास्त विनोदी चित्रपट आहे. रितेश देशमुखचं कॉमिक टायमिंग ही काय चीज आहे हे हा चित्रपट पाहून तुम्हाला कळेल. यानंतर अर्जुन रामपालला लोक एक "विनोदी अभिनेता" म्हणून ओळखतील. याचित्रपटामुळे जिया खानची (गझनीवाली) गर्ल नेक्स्ट डोअर अशी इमेज तयार होइल. >>>> ओह... तर खरा विनोद तिथे आहे तर....
LSD बघितला. आवडला. सही
LSD बघितला. आवडला. सही experiment केलाय. लोकसत्तेतला हा लेख पण वाचा.
गेल्या आठवड्यात Wild Things बघितला. बघुन रेस (हिंदी) पिक्चर आठवला
'नॉट विदाऊट माय डॉटर' ह्या
'नॉट विदाऊट माय डॉटर' ह्या पुस्तकाएवढा त्या वर बेतलेला पिक्चर मला अजिबात आवडला नाही. पुस्तकं किमान ४ वेळा वाचलंय, पण पिक्चर एकदाच कसाबसा पाहिला. एवढं पुस्तकं, त्यातले बारकावे २ तासाच्या पिक्चरमध्ये बसवणं काही सोप्पंही नाहीच म्हणा.
याचित्रपटामुळे जिया खानची
याचित्रपटामुळे जिया खानची (गझनीवाली) गर्ल नेक्स्ट डोअर अशी इमेज तयार होइल.
काय सांगताय.... कायम ड्रग्सच्या नशेत असल्यासारखे डोळे असलेली मुलगी गर्ल नेक्स्ट डोअर???????? मला नको असल्या बिल्डींगमध्ये घर.........
कुणीतरी हौशी (म्हणजे जिगरबाज)
कुणीतरी हौशी (म्हणजे जिगरबाज) माणसाने हा सिनेमा पहावा, आणि इथे अख्खी ष्टोरी लिहावी, अशी इच्छा आहे.
>>झुबेदा मधली तिसरी नटी (परत
>>झुबेदा मधली तिसरी नटी (परत नाव विसरल>><<
कोण आहे ही? झुबेदा मध्ये तर करिष्मा आणि रेखा आहेत.
कोण आहे ही? झुबेदा मध्ये तर
कोण आहे ही? झुबेदा मध्ये तर करिष्मा आणि रेखा आहेत.
>> ती बहूतेक लिलियत (?) दुबे असेल.
Pages