Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला चार/तीन बर्नर असलेली गॅस
मला चार/तीन बर्नर असलेली गॅस शेगडी घ्यायची आहे. कोणता ब्रॅण्ड चांगला आहे? कोणतं मॉडेल?
मध्यंतरी एकदोन शेगड्या बघितल्या पण त्यात बर्नर्स मध्ये अंतर कमी वाटले. मोठ्ठे भांडे ठेवले तर एक बर्नर ओव्हरलॅप होत होता. शिवाय सफाई करताना जरा त्रास पडेल असे वाटले. प्रत्यक्ष वापर केल्याखेरीज काही पॉइंट्स लक्षात येत नाहीत.
चार/तीन बर्नर असलेल्या गॅस शेगडीचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत हे सांगू शकेल का कोणी?
नवरा हे जर स्वयंपाकघरातलं
नवरा हे जर स्वयंपाकघरातलं सर्वात उपयोगी उपकरण झालं तर काय मस्त होईल... <<< रजनीगंधा, मला वाटते असे प्रत्येक स्त्रीला वाटत असेल
नवरा हे जर स्वयंपाकघरातलं
नवरा हे जर स्वयंपाकघरातलं सर्वात उपयोगी उपकरण झालं तर काय मस्त होईल.<<<<< खरच
ग्याती (तुमचे नाव कसे
ग्याती (तुमचे नाव कसे लिहावे?), उत्तराबद्दल, लिन्कबद्दल धन्यवाद. माहिती (रीव्यूज वगैरे) चाळून बघते.
अमी
>>वरती जो स्टँड मिक्सर दिलाय
>>वरती जो स्टँड मिक्सर दिलाय (जो मला घ्यायचा आहे:) ) तो आपली चपातीची कणीक मळण्यासाठी योग्य >>नाही. याला कारण म्हणजे त्यात कणीक थोडी पातळ मळली जाते. ब्रेड किंवा पिझ्झा बेस बनवायला तो मिक्सर >>योग्य आहे.
हे अजिबात बरोबर नाही. सीमा, कणीक पातळ, घट्ट होणे हे घातलेल्या पाण्यावर अवलंबून आहे ना? उपकरणावर कसे? हे कधीही होऊ शकते. हाताने मळताना असे होण्याची शक्यता कमी कारण आपल्या हाताला अंदाज येत जातो आणि त्याप्रमाणे आपण पाणी घालत जातो. स्टँड मिक्सर नसताना मी फूड प्रोसेसरमध्ये कणीक मळली तेव्हा सुरुवातीला सैल झाली कारण पाण्याचा अंदाज नव्हता, आणि पाणी कमी पडेल की फिरत नाही. पण नंतर जमले. फूड प्रोसेसर मध्ये कणीक मळता येते, पण नंतर तो साफ करणे कटकटीचे आहे. स्टँड मिक्सर साफ करायला सोपा आहे. आणि चालू असताना ओपनच असतो तेव्हा वरुन पाणी, अजून पीठ घालून अॅडजस्ट करायला सोपे. तो आणल्यापासून मी एकदाही हाताने कणीक मळलेली नाही.
असेल ग लालु तु म्हणतेस तस.
असेल ग लालु तु म्हणतेस तस. पाण्याचा अंदाज चुकला असेल माझा
माझ्याकडे चपातिचा तवा(व्हाइट)
माझ्याकडे चपातिचा तवा(व्हाइट) आहे. त्यात भाकरि केल्याने तो काळा झाला आहे.
स्वच्छ कसा करावा ? क्रुपया उपाय सुचवा.
( टाइप करताना अनुस्वार कसा द्यायचा ?)
अनुस्वारासाठी (कॅपीट्ल) M
अनुस्वारासाठी (कॅपीट्ल) M वापरा.
तवा गरम असतानाच त्यावर चिंच
तवा गरम असतानाच त्यावर चिंच आणि पाणी घालून ठेवा. ताक घातलं तरी चालेल. नंतर घासा. तवा स्वच्छ निघेल.
माहितीबद्दल धन्यवाद प्राची.
माहितीबद्दल धन्यवाद प्राची.
माझ्याकडे आप्पेपात्र नाही.
माझ्याकडे आप्पेपात्र नाही. मफिन करण्याच्या साच्यात केले तर चालतील का? म्हणजे कुणी असा प्रयोग केला आहे का?
वत्सला, आप्पेपात्र हे कास्ट
वत्सला, आप्पेपात्र हे कास्ट आर्यनचं असतं त्यामुळे ते गॅसवर ठेवता येतं. मफिन ट्रे तुला अवनमध्ये ठेवावा लागेल नी तसे खुसखुशीत व्हायचे नाहीत. हवं असल्यास लहान प्रमाणावर प्रयोग करुन पहा.
मुलींनो तुम्ही इलेक्ट्रीक
मुलींनो तुम्ही इलेक्ट्रीक कॉईल वर कसा स्वयपाक करता??? माझ्याकडे देशातल्यासारखा गॅस होता आणि इथे तसा कुठेच नाहीये. मला गॅसचा अंदाजच येत नाहिये, साधं दुध गरम करायला तास लागला, हाय वर ठेवावे तर जळण्याची भीती, जाम वैताग आलाय.
अनुभवी लोकांनी जरा मार्गदर्शन करा,
ज्ञाती, एकदा कॉईल तापली की
ज्ञाती, एकदा कॉईल तापली की फार वेळ गरम रहाते त्यामुळे बारीक करुनच तापवणे इष्ट. याचा अंदाज यायला वेळ लागतो.
दूध वगैरे मी तापवत नाही पण भाज्या वगैरे करताना गॅसपेक्षा वेळ लागते ते लक्षात ठेव.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे बटण बंद केल्यावर गॅस तापलेला असतो बराच वेळ त्यामुळे पदार्थ शिजला नसला तरच त्यावर ठेव पण पूर्ण शिजले असेल तर पातेले बाजुला काढून ठेव, मुख्यतः पालेभाज्या करताना. एका मैत्रीणीने मस्त खमंग केलेले तूप तसेच ठेवून पूर्ण जळालेले
चपात्या/भाकरी करुन झाल्यावर तवा बाजुला काढून ठेवायची सवय करावी लागेल नाहीतर रिकामा तवा तापत रहातो आणि मधोमध गोलसर (शॅलो कढईसारखा) होतो. तेल वगैरे तापवायला वेळ लागतो पण एकदा तापले की सणसणून तापते.
थोडक्यात काय, घर स्वतःचे असेल तर गॅस बसवून घेणे नाहीतर आहे त्यावर नेटाने करत रहाणे
इंडक्षन कुकिन्ग सिस्टिम मिळते
इंडक्षन कुकिन्ग सिस्टिम मिळते का तिथे त्याला वर ग्लास टॉप अस्तो. थोडे जास्त सेफ. बरोबर मॅन्युअल मिळते.
मामी तुम्ही घेतलंत का हो,
मामी तुम्ही घेतलंत का हो, इंडक्षन कुकिंग सिस्टीम?? मध्ये म्हणला होतात ना.. चांगलं असेल तर माझी आई इथे घेऊन येणारे.. रिव्ह्युज मिळाले तर बरं होईल..
ज्ञाती, मिनोतीने लिहीले आहेच.
माझ्या वहिनीने हा प्रकार करून तळहातावर मस्त नक्षी काढून घेतली होती..
अजुन एक म्हणजे (थोडं डम्ब आहे.. पण तरिही) कॉइल (अनलेस हाय वर ठेवली तर) तापलेली दिसत नाही. त्यावर चुकून हात ठेऊन तापली आहे का, हे पाहू नये!
आणि पोळ्या करताना जाळी ठेऊन भाज. त्याने पोळ्या मऊ होऊ शकतात. मला वात आणलेला कॉइलवर पोळ्या करणे प्रकरणाने..
कोनता coffee grinder चागाला
कोनता coffee grinder चागाला आहे माला मसाला तायार करन्या साथि हवा आहे.
माझ्याकडे हाआहे. लहानसा,
माझ्याकडे हाआहे. लहानसा, वजनाला हलका आहे. आतलं भांडं वेगळं काढून धुता येतं. आजकाल मी धण्याची पावडर ह्यातच ताजी करते. एकावेळी साधारण २-३ आठवडे पुरेल एवढी करते. इतका मस्त वास येतो ताज्या पावडरीचा.
इतका मस्त वास येतो ताज्या
इतका मस्त वास येतो ताज्या पावडरीचा.>> अनुमोदन. वादच नाही आमचा बालाजी मारवाडी विकतो सर्व पुडी पण काल मी नाक मुरडून आले. ताजी घरचीच पूड चांगली म्हणून.
बस्के नाही घेतली अजून इंड्क्शन सिस्टिम. सध्या फिजूल खर्ची बंद आहे ग. विशलिस्टीत आहे पण.
२५०० - ४००० परेन्त किंमती आहेत. कॉइल वापरताना त्याचे इन्सुलेशन परफेक्ट हवे कारण स्वैपाक घरात वायरीवर पाणी पडण्याची शक्यता जास्त. व शॉक बसण्याची.
सध्या होम शॉपिन्ग मध्ये हुसेन एक जाहिरात करतो. एक जर्मन टेक्नॉलोजी वाले भांडे आहे. त्याला कसलेतरी हाय फाय नॉन्स्टिक कोटिन्ग आहे व पॉवर कनेक्षन आहे. त्यात सर्व स्वयंपाक होतो. भाज्या आमलेटे वगैरे. बेअर कॉइल पेक्षा ते बरे. व एक राइस कुकर घ्यायचा.
इंडक्शन हीटर मीच घेईन आता...
इंडक्शन हीटर मीच घेईन आता... रिव्हू लिहितो.. काही चांगले शिजवले तर खायला या...
मामी. कुणी घेतलय का ते किचन
मामी. कुणी घेतलय का ते किचन किंग??? घेतले असेल तर रीव्ह्यु विचारा.
मी मायक्रोवेव्ह घेतला आहे.
मी मायक्रोवेव्ह घेतला आहे. सॅमसंग चा. अजुन डेमो दाखवायला माणुस आला नाही. धिर नाही म्हणुन मी केक करायला घेतला आणि तो आतुन करपला. माबोवर मायक्रोवेव्हची माहीती आहे का कुठे ?
जागू, अगं मायक्रोवेव्हचा एक
जागू, अगं मायक्रोवेव्हचा एक बीबी आहे बघ. आहारशास्त्रामधेच.
बस्के,मी वापरते इंडक्शन
बस्के,मी वापरते इंडक्शन प्लेट.मस्त आहे एकदम.तीला टायमर असल्यामुळे खुप फायदा होतो,एकदा टायमर लावला की नंतर बघायला नको.
माझ्याकडे अंजलीचा फिल्टर आहे
माझ्याकडे अंजलीचा फिल्टर आहे आणि मला त्याच्या कॅण्डल्सच मिळत नाहीयेत बदलायला. दुकानात कॅण्डल्सची चौकशी केल्यावर दुकानदार १८५७च्या बंडातली वस्तु मागितल्यासारखे बघतात.
तेव्हा नवीन प्युरिफायर घ्यायचा विचार आहे. हल्ली बाजारात बरेच वॉटर प्युरिफायर उपलब्ध आहेत. त्याबद्दल काही माहिती कळू शकेल काय? म्हणजे कोणता चांगला आहे, त्याचे तोटे/फायदे काय आहेत, सर्व्हिसिंग बद्दल काही माहिती.
टाटा स्वच्छ.... चिनूक्सने
टाटा स्वच्छ.... चिनूक्सने डिजाईन केलेलं प्रॉडक्ट आहे ते. फायदे/तोटे व्यवस्थित सांगेल तो.
जे प्युरिफायर वीजेशिवाय
जे प्युरिफायर वीजेशिवाय चालणारे आहेत त्या सर्वांना कँडल्स लागतातच आणि त्या सहजपणे सर्व ठिकाणी मिळतात का ते बघायला हवे.
जे विजेवर चालणारे आहेत, त्यांनाही कँडल लागतेच, पण कंपनीच्या सर्व्हिस सेंटरचा माणूस घरी आणून बसवतो.
आम्ही बजाजचा आणि अॅक्वागार्डचा- विजेशिवायचा आणि अॅक्वागार्डचाच विजेवरचा असे वापरलेत. चांगले आहेत. आईकडे गोदरेजचा नवीन लाँच झालेला आहे, तोही चांगला आहे.
त्या सर्वांना कँडल्स लागतातच
त्या सर्वांना कँडल्स लागतातच आणि त्या सहजपणे सर्व ठिकाणी मिळतात का ते बघायला हवे.>>> हा मुद्दा महत्त्वाचा आहे ग. तरी अंदाजे किती दिवस्/महिने चालतात या कॅण्डल्स? विजेशिवाय चालणाराच घ्यायचा आहे.
आईकडे अॅक्वा शुअर आहे. तिच्या मते तो चांगला आहे. प्युअर इट्चा रिपोर्ट पण चांगला कळाला आहे.
एनीवे धन्स.
मंजू, बघते त्याबद्दल जरा गुगलून.
रायवलचा क्रोकपॉट घेतलाय -
रायवलचा क्रोकपॉट घेतलाय - त्यात करता येण्यासारख्या फक्त शाकाहारी रेसिपीज कुणी सांगू शकेल का? जुन्या मायबोलीवरचे पान चाळून झाले आहे. त्यावरच्या लिंक्स पण पाहिल्या आहेत. क्रोकपोट अडीच क्वार्ट साईजचे आहे.
अमी
प्राची, टाटा स्वच्छ विजेशिवाय
प्राची,
टाटा स्वच्छ विजेशिवाय चालतं. सध्या महाराष्ट्र, गुजरात, गोवा, बंगाल या राज्यांत बहुतेक सर्व गावांत या पुरिफायरचे बल्ब मिळतात. येत्या एक-दोन महिन्यांत भारतभरात बल्ब मिळतील. एक बल्ब साधारण तीन महिने चालतो (३००० लि). बल्बची किंमत रु. २९९ आहे. आणि उपकरणाची किंमत रु. ९९९.
अधिक माहिती - http://www.tataswach.com/
Pages