मराठी लोकांचे हिंदी....

Submitted by दक्षिणा on 20 November, 2009 - 03:06

जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.

सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......

घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......

सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...

घरमालक : पोळा???

सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?

घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..

सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.

घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तर ते विसरूच शकत नाही..'आजा मेरे आंग पे, ले ले मेरा जीव' नवीन गाडीवर लिहून घ्यावे असे वाटतेय Wink

मामी माझाही तुमच्यासारखाच एक किस्सा आहे...फक्त मी झोपेत नव्हते. माझ्या मैत्रिणीच्या आईशी बोलताना मी म्हटले,
" हा आन्टी और इस जमानेमे ये परवडताभी तो नही .." त्या माझ्याकडे प्रश्नार्थक चेह-याने बघतच राहिल्या..मग मला लक्षात आली माझी चूक पण काय करणार हिंदीत परवड्णेको क्या बोलते ये मालूमच नही अपनेको फिर कह दिया afford नही कर पाते ना.....

रच्याकने..जांभईला उबासी म्हणतात ना?

अपुन हिंदी बोलनेकाच कायकु. राज ठाकरे ने बोला है ना. उन्कु गरज रहेंगा तो वो लोग बोलेंगा ना अपुन के साथ मराटी मे क्या ?

दिल्लीला सासरी गेल्यावर मला सासुबाईंनी पहिल्यांदा (मुद्दाम) काय आणायला पाठवलं असेल तर, "खडीसाखर" आणी "आख्खे मुग"!
डोंबलं कुणाला माहीत होतं खडीसाखर ला "मिश्री" की काय म्हणतात ते! दुकानदाराला सगळ्या प्रकारे सांगुन झाले...वो बडी बडी शक्कर होती है ना...शक्कर के खडे!
'आख्ख्या मुग'ला तिथे "साबुत मुंग" म्हणतात..

माझी आजी तिच्या तुलु शेजारणीला - "वो अपने बेटे के बेटे को बेटा होता है ना तो हम लोगो में उस बच्चे पर सोने का फूल उधळते है| "

मी pregnant असताना एकदा माझी आई आणि मी local train ने प्रवास करत होतो. एक बाई २ seats च्या मध्ये असलेल्या जागेत माझ्या अगदी समोर उभी होती. आईने तिला आधीच नीट उभी राहण्याविषयी सांगितले होते जेणे करुन ती तोल जाऊन माझ्या अंगावर पडू नये म्हणून. पण थोड्या वेळाने ती उभ्या उभ्या पेंगू लागली आणि एकदा तर झोक जाऊन जवळपास माझ्या अंगावर झुकली. त्यावर माझी आई रागारागाने तिला म्हणाली "पेहले ही बोला था ना तुमको की नीट खडे रहो. मेरी बेटी के आंग पे मत पडो. अभी तुम इसके उपर पडती तो हमको कितने पे पडता???" ("आम्हांला केव्हढ्यात पडलं असतं?" चं असं शब्दशः केलेलं भाषांतर ऐकून मी गडबडा लोळण घ्यायची बाकी होते :-))

लहान असताना बिल्डिंग मधला एक मुलगा खेळताना एक मुलगी पळाली तेव्हा हिंदीत म्हणाला "अरे, वो पळी" Proud
आमच्या शेजारच्या काकू कुणाला तरी फोनवर हिंदीतून सांगत होत्या कसली तरी रेसिपी.... तेव्हा शेवटी त्या म्हणाल्या की," जब उपर बुडबुडे आना चालू हो जाए तो शेगडी बंद करो" Lol

मराठी मध्ये आपण डोक्यावरून आंघोळ करायची झाल्यास "नाहणे" असे म्हणतो. उदा. "मला उद्या नहायचं आहे". माझ्या एका हिंदी भाषिक मैत्रिणीला मी एकदा असं म्हणाले "मैं आज नहा के आयी हुं". तिने आश्चर्याने विचारले "मतलब तुम रोज नहाती नही हो क्या?" Happy

Happy आमची आजी एम पी त राहिलेली असली तरी तिला मराठी फोडणीशिवाय हिन्दी बोलायला जमत नसे.
आजी : ओ दुकानदार , ये बार बासमती मे कुछ बांस नहीं, ये क्वालिटी अच्छी नही'
दुकानदार एकदम कनफ्यूस्ड.. बांस नसलेला म्हणजे वाईट वास नसलेला तांदूळ वाईट कसा काय

वास = खुशबू
वाईट वास = बांस

माझा एक तमिळ मित्र एका मराठी घरी जेवायला गेला होता.
त्या काकुंना "खाओ, पेटभरके खाओ| बिल्कुल शर्माओ मत|" असं म्हणायचं होतं त्यांनी असं म्हटलं, "खाओ, तुम्हे कोई शरम नही है! "

मिनी, नशिब तो तमिळ होता, लखनवी असता तर न जेवता उठला असता Proud

आमच्या वसतीगृहात आमचा हैदराबादचा मित्र बाथरुमच्या बाहेरून आतल्या मुलाला विचारत होता "विजय, आप पानी नहा रहे हो क्या?" आतला उस्मानाबादचा मुलगाचा मुलगा ओरडला "अबे, पानी नही मै नहा रहा हूं"
हैदराबादचा हा मित्र स्नान करण्याला "पानी नहाना" म्हणायचा. Proud

माझ्या आजीने विचार्लेला प्रश्न :

"तुम ईस वडेको भोक कैसे पाडते हो " ??

एका कर्नाटकी (मेदु वडे विकणार्या ) मुलाला विचरला होता....
तो बेशूध च पदायचा बकी राहिला होता......

माझी आई एकदा रीक्षेवाल्याला म्हणाली होती भॅय्या थोडा धीरे चलाओ नाहीतर घर मे गणपती और मॅ आडवी..... (तेव्हा घरी गणपती बसले होते.)
माझ्या सासरचे लोक हिंदी भाषिक आहेत त्यांच्याशी बोलताना एकदा बाबा म्हणले "आप के यहा तो ठंड की लाट आयी होगी ना" Happy

Pages