मराठी लोकांचे हिंदी....

Submitted by दक्षिणा on 20 November, 2009 - 03:06

जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.

सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......

घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......

सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...

घरमालक : पोळा???

सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?

घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..

सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.

घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी शब्द वापरला तर चूक हे मला पटलं नाही >> अम्या मुद्दा तो नाहीच इथे...
मराठी शब्दांचे हिंदीत शब्दशः भाषांतर केल्याने झालेला घोळ , आणि होणार्‍या गमती, हा मुद्दा आहे..
जसे 'दुपारी दोन मिनिट पडतो', चे 'दोन मिनट गिरते है'.. असे रुपांतर.. त्यात इंग्लिश कुठे आले ?

आपल्याकडे हिंदी मधला 'लंबा' हा शब्द दोन्ही गोष्टीसाठि - अंतर आणि लांबि - वापरतात.
'बहोत लंबा जाना पडता है!', 'ईधर से बहुत लंबा है!', 'मेरा घर बहुत लंबा है!' इ...

आमच्या एका शिक्षकाच्या पत्नीने नागपुरात केलेला संवाद: -
'हम लंबा से आए है!'
'आपके गांव का नाम 'लंबा' है?'
'हां, हमारा गांव खुप लंबा है!'...

अमित...
दोन वेग्-वेगळ्या भाषांच्या सर-मिसळी मधुन होणारे गैरसमज आणि घडणार्‍या गमती-जमती हा मूळ उद्देश आहे. आपल्या भाषेची सर-मिसळ 'चूक' आणि परकी भाषेची सर्-मिसळ 'बरोबर' असं काही नाही.

'Please sit on leaves, I will grow..' हे 'क्रुपया पानांवर बसा, मी वाढते' या मराठी वाक्याच्या असल्या शब्द्शः भाषांतरा पेक्षा, दोन भाषांच्या सर-मिसळीचा आनंद आणि गंमत जास्त अनुभवता येतात...

आरती २१ यांनी पारितोषिक पटकावले आहे, तिला ५००० मोदक....
प्रश्न होता --- हती चिखलात लोळत होता याचे हिंदीत भाषांतर करा
अचूक उत्तर आरती २१ यांनी दिले. उत्तर आहे--- हाथी किचड मे लोटपोट हो रहा था

नागपुर ला उन्हाळ्यात जाउन आल्यावर तिथे पाहुन घरि पण (इन्दुरला)वाळ्याचे तट्टे लावले होते, महाराष्ट्रातुन आलेल्या मावशि ने त्या वर पाणि टाकले,जरा जोरात फेकल्यामुळे ते जवळुन जाणार्‍या बाजुच्या मुलावर थोडे उडाले, तो काहिहि न बोलता जात होता तरि पण मावशि बाहेर जावुन त्याला समजवित होति तो मराठित ठिक आहे ठिक आहे म्हणुन राहिलाय तरि पण मावशि त्याला हिंदीत सान्गत होति
"बेटा माफ करना मैने देखा नहि,लेकिन ये पानि गन्दा नहि है कपडे पर डाग नहि पडेगा क्योकि ये पानि गन्दा नहि है ये तो टट्टि का पानि है "

समिर>>>ये तो टट्टि का पानि है "<<< अशक्य Rofl
धन्यवाद वैभव ! माझा मुलगा मला चिडवत असतो, तुझं हिंदी म्हणजे भारी असतं म्हणून Happy

यावरून मी जुन्या मायबोलीवर लिहिलेला किस्सा आठवला.

नागपुरात उन्हाळ्यात वाळ्याच्या ताट्या लावतात. त्यावर पाणी टाकायला दोन तीन घरांना मिळून एकच नोकर असतो.
एकदा मैत्रिणीच्या सासूबाई जोरजोरात नोकराला रागावत होत्या,

'क्यु रे तू उनकी तट्टी पर पानी डालता है और मेरी तट्टी पर क्यु नही डालता? ऐसा नही चलेगा हा...' Happy

लोळणे याला रेंगना अशा शब्द आहे हिंदीत !
माझे नाहि रे हे ज्ञान. एका हिंदी भाषिक मित्राला विचारले.
त्याला विचारताना माझी तंतरली होती. अरे वो गधा नही क्या किचडने सोके, फिर पाँव उपर करके हवा मे सायकल चलाता है, वगैरे वगैरे !!!

माझी मुलगी (वय वर्षे ५) तर खूपच गंमती करते. घरात मराठी-बाहेर हिंदी या तारेवरच्या कसरतीत ती बर्‍याचदा गोंधळ करते.
एकदा तिने एका साउथ इंडियन ऑफिसरला 'डोंगरपे बर्फ पडी है' असे सांगितले होते. तेव्हा त्याचा चेहरा बघण्यालायक होता.
तसेच, माझी आई बाथरुमबाहेर पाय घसरून पडली तेव्हा माझ्या एका मैत्रिणीला तिने 'नानी पाय घसरके गिर गयी' असे सांगितले.
जॉगिंग करणार्‍या जवानांना बघून "भय्या कसे भागताहेत बघ" असे म्हणाली.
शाळेची सुट्टी सुरु झाली तर म्हणाली," आता मला शाळेत जायला नाही पडणार्."('अब मुझे स्कूल जाना नही पडेगा' चे भाषांतर)
असे अनेक किस्से आहेत तिचे. आठवतील तसे एकेक लिहीन. Happy

प्राचीच्या मुलीच्या किश्श्यासारखाच किस्सा माझ्या दुसरीतल्या चिरंजीवाचा.
शाळेत मुले हिन्दीत बोलतात , त्यामुळे त्याचं मराठी हिंदी मिक्स.
मोठ्या मुलीच नाव सोना (नेत्रा), हा एकदा म्हणाला, " आज मी सोनाताईच्या कमर्यात सोनार आहे."

१) तुम्हारे पास आठानेका नाना है क्या? (तुझ्याकडे आठाण्याचं नाणं आहे का?)
२) हममें खना- नारलकी ओटी भरते है| (आमच्यात खणा - नारळानं ओटी भरतात.)

~साक्षी.

आयला दक्षे ...काय धम्माल बिबि!
एकटीच हसतेय नेटकॅफेमधे! Lol

आमच्या समोरच्या पवार काकू शेजारच्या मारवाडनीला सान्गत होत्या," हमारे मे जब नवरदेव पार पे आता है ना, तो करवल्या बी उसके साथ होती है, फिर मारुती का दर्शन लेने के बाद वो शेवया कलाकलाके खाता है! ( शेवया कालवुन कालवुन खातो अस म्हणायच होत त्याना) Proud

द़क्ष धम्माल सदर आहे ... मज्जाच मज्जा आली ..
मेरा तो हसुन हसुन पुरा वाट हो गया .. क्या सांगु इतनो दिनों के बाद ऐसा काहीतरी वाचने मिला है ..
बाबा रे ब्बाब्बा क्या क्या लिहलेला है .. गगन का भाव कांदे को भिड गया .. और Biggrin
पहिल्या इतना हसनेको आयेला है .. लिहायचा भरपुर है .. पर साला वेळ्च मिलता नै है ना ..

"हत्ती चिखलात लोळत होता">>>
हाथी किचडमे लिड रहा था|...

----------------------------------------------
लाडकी

साक्षी, आठानेका नाना..... डोळ्यात पाणी येईपर्यंत हसलो. आणि ते आ मेरे आन्ग पे ले ले मेरा जीव.....माय गॉड! अशक्य हसतो आहे!
असेच सुरतला कॉलनीतील फंक्शनवरून आल्यावर माझ्या वहिनीने मैत्रीणीला काय करतेस म्हणून फोन केल्यावर तिच्या मराठी मोलकरणीने दिलेले उत्तर" म्यॅडम साडी सोड रही है और मै भांडी घास रही हू!"

एक प्रचलित गाणं (कोकणी मुसलमान भाषेतील)
मुम्बै वालीच्या लागुन नादी
माझी उलथून टाकली शादी
काय सांगु मेरी बरबादी रे
सुन मेरी अमीना दीदी

महाराष्ट्र - मध्यप्रदेश सिमेवरचे रहीवासी, अशा प्रकारची मराठी-हिंदी 'मिश्र' भाषा वापरतात. विशेषतः 'गोंड' जमातीतिल लोक अशी धेड्-गुजरी भाषा वापरतात.

१९७०-७१ मधे माझे वडिल 'आमला एअर-फोर्स स्टेशन्'ला होते. तिथे रहाणार्‍या लोकांच्या घरी हे गोंड लोक 'साफ-सफाई' साठी यायचे. आमच्या शेजारीच माझ्या वडिलांचा पूण्याचा एक मित्र 'सह्-कुटुंब' रहायचा. मधे दोन्-चार दिवस नेहमी येणारा 'सफाई कामगार' आला नव्हता. म्हणून वडिलांच्या मित्राने, तो कामगार पुन्हा 'कामावर' आल्यावर चौकशी केली. कामगाराने दिलेले उत्तर ऐकुन तो मित्र अक्षरशः त्या कामगाराच्या अंगावर धावून गेला.

कामगाराचे उत्तर होते, 'साब, खरं बोलता, तुमच्या बाईला मी भुलुन गेलो...' (साहेब, खरं सांगतो, तुमच्या बायकोला मी विसरुन गेलो...)

एक काका सुताराला त्याच्या केलेल्या कामाबद्दल झापत होते. त्यात..
ये हमको ऐसा थातूर मातूर काम नही मंगता है....

एक मराठी ग्रुहस्त, हिंदी भाषीकाणे कामाचा सारखा ताकदा लावल्याने थोडे त्रसून असे म्हटले असल्याचे ऐकिवात आहे की...."हम तुम्हारा काम करेंगे तो करेंगे नाहीतो नही करेंगे. जाओ भागो अभी..."

Pages