मराठी लोकांचे हिंदी....

Submitted by दक्षिणा on 20 November, 2009 - 03:06

जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.

सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......

घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......

सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...

घरमालक : पोळा???

सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?

घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..

सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.

घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रॉबिनहूड,
पुर्ण गाणं मिळालं तर टाका ना.
असंच एक गाणं म्हण्जे 'ऐसा खतमें लिखो'. इथे सगळ्यांना माहित असेलच.

आमच्या ऑफिस मधल्या टीमचा नेहेमीचा डायलॉग - 'डिफेक्ट दूसरे टीम पे सरका दिया' (आमच्या टीम वर आलेला डिफेक्ट दुसर्या टीम ला असाईन केला)
---------------------------------
माझ्या काकांचा फेवरेट - तक्के मे अल्ला डाल के लाओ (ताकात आले टाकून आण).

तक्के मे अल्ला डाल के लाओ
Rofl
>>>>>>>

माझे काका दुसर्‍या दिवशी सर्वाना दहाव्याला नदिवर जायचे असल्यामुळे मळ्यातील घराला राखणासाठी आदल्या दिवशी गुराख्याला सांगत होते.
"उद्या सुब्बु इधर आने का, भलाक्या''
"हम सबजणे नद्दिपे जायेंगे, तो इधर कुणीतरी मंगता है ना राखण के वास्ते."
"सुब्बु जल्दी आनेका भलाक्या, नहितो फिरते बैठेंगा इधर तिधर." Lol

आमचे एक क्लायंट आहेत. हिंदीतील सर्वाधिक खपाच्या दैनिक जागरणचे मालक. त्यांच्याबरोबर एकदा मिटिंग होती. माझ बंबय्या हिंदी ऐकून थोड्यावेळाने त्यांच्या माणसाने मला हळूच कानात सांगितल. आमच्या साहेबा बरोबर कृपया हिंदीत बोलू नका. Sad

आज शॉपींग करताना , एक गोरी कन्या भस्सदिशी एका आयल मधुन बाहेर आली त्यामुळे मी एकदम दचकुन थांबलो. पण मला तशाही परिस्थितीत "मराठी लोकांचे हिंदी... बी बी " वरचं वाक्य आठवलं .
" आज़ा मेरे आन्ग पे, ले ले मेरा जीव" . एकटाच कितीतरी वेळं हसतं होतो . मी का हसतोय हे तिला न कळल्यामुळं ती बिचारी अजुनचं गोंधळली Lol

आमच्या साहेबा बरोबर कृपया हिंदीत बोलू नका.
>>
खरे तर मराठीत सहजी नम्रपणे बोलण्याची प्रथा नाही. त्यातल्या त्यात एका विशिष्ट शहरातली भाषा तर तुच्छतापूर्वक उल्लेख करण्याबाबत प्रसिद्धच आहे. (कोकणीत तर काका मामाला एकेरीतच बोलतात. अधिकार्‍याना कोकणी लोक रे सायबा., आणि नन्दुरबारमधले आदिवासी तर चका 'अरे साहेबड्या' असे म्हनतात (स्वानुभव))त्यामुळे मराठीत कृपया वगैरे शब्द कृत्रिम वाटतात. प्लीज जेव्ढ्या सहजतेने येतो तेवढा कृपया नाहीच येत्.पुस्तकीही वाटतो.उर्दूमध्ये स्वतःला 'नाचीज' म्हणवण्याची आणि समोरच्याला 'आदब' देण्याची नैसर्गिक पद्धत आहे. ती खटकतही नाही् हिन्दीत ओ देताना 'जी' अगदी सहज येतो.तो मराठीत कनिष्ठ वर्गात येतो. बाकीच्यानी कुर्‍यात अथवा तोर्‍यातच बोलायचे.
हिन्दी बोलताना मराठी माणसाचा खरा घोळ होतो तो 'तू' , तुम, आप हे शब्द वापरताना. मराठी माणसे नकळत 'तुम्ही' शब्दाशी साधर्म्य असल्याने 'तुम' शब्द 'तुम्ही' अशा अर्थाने आदरार्थी वापरतो 'आप' च्या ऐवजी आणि सगळा घोळ होतो. तुमचा अर्थ 'तू' होतो हे सरळ आहे. त्यामुळे समोरच्या माणसाला 'तू' असे एकेरी सम्बोधल्यासारखे वाटते. व अपमानास्पद वाटते. काही लोक साहेबालाही 'तुम कब आये' 'तुम ऐसा करो' असे बिन दिक्कत हाणत असतात्.आणि साहेब मनात दात ओठ खात असतात.
एकदा इन्दूर पुणे बसने प्रवास करीत असताना कन्डक्टर एम पी चा होता. धुळे येथे गाडी असताना महाराष्ट्र्इयन पॅसेन्जरचा अन त्याचा थोडा खटका उडाला. पॅसेन्जर त्याला म्हनत होतो मैने तुमको इतना पैसा दिया. तुमने वापस नही दिया. वगैरे. कन्डक्टर उखडला .'बदतमीज आदमी , लगातार तुम तुम बोले जा रहा है. बात करनेकी तमीज भी नही वगैरे.'

एका सिंहस्थात साधुंच्या बरोबर दोनेक महिने सरकारी काम करण्याचा प्रसन्ग आला. उत्तर हिन्दुस्थानी साधून्ची शुद्ध तुपातली हिन्दी ऐकत रहावी असी. आमचे सुपरिटेन्डन्ट ऑफ पोलीस होते महाराष्ट्रीयन . स्टेट केडरमधून प्रमोट होऊन आय पी एस झालेले. पक्के महाराष्ट्रीयन . त्यांची हिन्दी तशीच. ते साधुना व त्यांच्या गुरुना (त्याना महामन्डलेश्वर म्हणतात) , महाराज तुम ऐसा करो , महाराज तुम वैसा करो. महाराज तुम इधर बैठो वगैरे आदरानेच म्हणायचे. साधूना ते खूप खटकायचे पण भिडेपोटी ते काही बोलायचे नाहीत.
एकदा प्रशासनाची व साधूची खूप विवाद झाले.अगदी सिंहस्थावर बहिष्कार टाकण्यापरय्न्त पाळी आली.
रागावलेल्या साधूंशी अधिकार्‍यांची चर्चा चालू असताना एक महाराज एक्दम उखडले "कहां वो एस पी.? बदतमीज कहीं का? किस गुफामे भजन कर रहा है? पूरे सिंहस्थ पर्वमे बडे बडे महात्माओको 'तुम ' शब्दका अशिष्ट प्रयोग करता रहा...." वगैरे.

तात्पर्य तुम शब्दाचा वापर जपून करा शक्यतो करूच नका.....

जुन्या 'माया' पिक्चरमधला (ऐ दिल कहाँ तेरी मंझिल हे गाण होत त्यात) एक सीन आठवला. हिंदीभाषिक देवानंद उतरल्या उतरल्या मुंबईतल्या टांगेवाल्यावर डाफरतो "ये क्या तुम तुम लगा रख्खा है ? आप नही बोल सकते." त्यावर त्याच उत्तर अगदी खास मुंबईकराचं होतं "तुमको अच्छा लगता है तो आप बोलूंगा |"

खूप पूर्वी पाहिल्याने तपशीलातल्या चूका पेटमे लेव |

मी कालंच माझ्या नॉन मराठी मैत्रिणीला माझ्या बिल्डींगित जेवायला यायचं आमंत्रण दिलं.
"तुम आज खाना खाने की लिये मेरी तरफ आव.
तु आज जेवायला माझ्याकडं ये चं सरळ सरळ भाषांतर...

परवा औरंगाबादहून येतांना आतेभावाने भाड्याने इंडीका बोलावली. नेहमीचा त्यांचा अब्दुल ड्रायवरला आतेभाउ म्हणतो कसा," अब्दुल मिंया, वाळुंज में थोडी देर गाडी रोको, 'सब्जीपाला लेने का हय!' ( भाजीपालाचं शुद्ध भाषांतर) Proud

तुम आज खाना खाने की लिये मेरी तरफ आव.>> सहेलीजान, आप आज दावत में नोश फर्माने हमारे गरीबखाने तशरीफ लाइयेगा. असे म्हणुन बघ. हैदराबादी तमीज और तहजीब का एक नमूना.

मामी,
तशरीफ वरन आठवल..माझ्या एका मैत्रिणीच्या आजीने तिच्या एका नबाब छाप हिंदी मित्राला हे उत्तर दिल होत. त्यांच कुटुंब खूप बस प्रवास करून ह्या मित्राच्या घरी गेले. संभाषणाचा सारांशः
मित्र: आईये आईये. तशरिफ रखिये!
आजी: काय ठेव म्हणतोय?
मैत्रिणः बस म्हणतोय...
आजी: मित्राला उद्देशून.. बादमे. बस मे बैठके तशरीफ को फोड आये है.

Rofl

हे दोन लेटेस्ट माझ्या भावाचे:
_माझ्या एका मित्राने भारतात न्यायला भयंकर महागड्या बॅग्स घेतल्या त्यावर- बाबा रे तुम्हारा तो भारतवासीयोंपे बहोत प्रेम उतु जा रहा है Uhoh
_this store is कैच्याकै expensive

माझा नवरा परवाच त्याच्या मित्राला म्हणाला...."पता नही क्या प्रॉब्लेम है इस घडी का...१ दिन हाथ मे नही पहनो तो पिछे पड जाती है"

मी ऐकलेलं , मुसलमानी हिंदी ,

भागते भागते गया
धापदिशी पड्या
सालना बी साठ्या
आन कोरड्यास बी सांड्या

आजचा ताजा किस्सा माझी मराठी मैत्रिण एका अमराठी मैत्रिणीला... बाबरी मशिद पाडली त्यावेळी उसळलेल्या दंगलीचे अनुभव सांगत होती. तीचं माहेर परळी वैजनाथ आहे. तर वृत्तांत असा.. " हमारा परली हैद्राबाद से जवळ है ना बहुत्..तो बाबरी मशिद गिराने की बातमी आई ओर ईतने दन्गे उसळे...सब मुस्लीम लोगोने हल्ला मचाया... इतना जालपोल हुआ के पुछो मत.. बहुत हिंदुके घर जाले. हम तो डरके मारे घर से बाहरही नही निकले.. जरा वातावरण निवळ गया तो थोडा हुश्श हुआ"

Pages