पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडे, मिनी
आज्जी म्हणत्ये ते बरोबर आहे. माझ्याकडे साबुदाण्याचे पोहे आहेत. काय करावे कळेना म्हणुन भिजवुन २ थालीपिठ थापलीयेत. पण ते मी साबुदाण्याच पण करु शकते. पोह्याचा काय उपयोग??

निवेदिता, थँक्स .. करुन पाहाते.

नाही फुलले ग. आणल्याआणल्या पहिल्यांदा तेच चेक केलं. त्यात फुलले नाहीत म्हणुन तळल्यावर तरी फुलतील का शंकाच आहे. पण ट्राय करुन पाहिन.

काहितरी आपलं उचलून आणायचं दुकानातुन. Proud

लाह्याच्या पीठाचे , दूध साखर घालून खाणे किंवा, ताकात कालवून फोड्णी देणे, ई. सोडून अजून काय काय करता येईल? खूपच जास्त शिल्लक आहे. मला खूप आवडतं पण. पण तेच तेच खाऊन कंटाळा आलाय.

मधुरा, लाह्यांच्या पीठाचे लाडू करता येतात. लाह्यांचे पीठ, पंढरपुरी डाळ्याचे पीठ (३:१ प्रमाण) कढईत तुपावर थोडे परतून, त्यात पीठीसाखर, वेलची पूड, हवे असल्यास ड्राय फ्रूटचे काप, खोबर्‍याचा कीस घालून खूप मळून घेणे व लाडू वळणे.

' फ्रुट क्रिम 'ला कोणती फळ लागतिल? व्हिपींग क्रिम म्हणजेच कुल व्हिप का?
रेसिपी सापडत असेल तर लिंक देता का प्लिज? इथे किंवा विपुत डकवली तरी चालेल.
२० मोठी माणस आणी १० मुलांनासाठी प्रमाण सांगा.(जोडिला अजुन एखादे डेझर्ट असेल बहुधा)

घरी बागेत छोटे लाल मुळे भरपूर आले आहेत. त्या लाल मुळ्याच्या पानांची भाजी कोणी करून पाहिली आहे का?
नेहेमीच्या पांढर्‍या मुळ्यांच्या पानांची पिठ पेरुन भाजी मस्त लागते, पण लाल मुळ्यांच्या पानांची भाजी कधी करुन पाहिली नाही. पण पानं भरपूर आहेत आणि ताजी आहेत त्यामुळे टाकून द्यायला नको वाटतयं.

सेट दोशाच्या कृतीत फक्त चटणीचे पदार्थ दिलेत. दोशासाठी चणाडाळ, पोहे आणि तांदुळ पिठ यांचे प्रमाण नाहीये Sad कोणी सांगेल काय??

दुस-या कृतीत दिलेत.. पण तिथे तांदुळ आहेत, पिठ वापरले नाहीये Happy

हॅलो.. प्लीज मला तांदूळाच्या पिठाची उकड कुणी सांगेल काय?? मी केलेली उकड (अक्षरशः) कावळा सुद्धा खात नाही Sad म्हणजे मलाच खायची आहे हं ,नाहीतर कुणीतरी प्रतिप्रश्न विचारेल लगेच्,'कावळ्यासाठी करायचीये का म्हणून' Biggrin

फक्त फुल फॅट मिल्क्व वापरून (कंडेन्सड मिल्क , क्रीम, अंडे न वापरता) आंब्याचे आइस्क्रीम करता येते का?

@ वर्षू : मी तांदळाच्या पिठीची उकड अशी करते :

तांदळाच्या पिठीच्या समप्रमाणात आंबट ताक तिच्यात मिसळून नीट एकजीव करायचे.

फोडणीत (तेल/तूप) जिरे, मोहरी, कढीपत्ता, भरपूर हिरव्या किंवा लाल सुक्या मिरच्या, हवे असल्यास लसणाच्या एक -दोन पाकळ्या घालणे. त्यावर पिठी व ताकाचे मिश्रण ओतणे. पीठ शिजल्यावर खदखदू लागेल. त्यात थोडे आमसूल (आवडत असल्यास), मीठ व हवी असल्यास चिमूटभर हळद घालून, आवडीप्रमाणे/ गरजेप्रमाणे सरसरीत करून एक दमदमीत वाफ आणणे. देताना शक्यतो गरमच देणे. वरून चमचाभर तूप घातल्यास अहाहा!!!! आणि ज्यांना आवडते त्यांनी वरून कोथिंबीरही पेरावी.

कर के देखना, और बताना! Happy

Pages