पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्या! क्रुती छान आहे, वेगळी लिंक उघडुन लिही म्हणजे नंतर पटकन सापडेल कुणालाही!..किंवा खांदेशी पाकक्रुती असा बाफ उघडुन सविस्तर माहिति लिहीली तर अजुनच चांगले.
(माझि क्रुती सुद्धा अस्थानी आहे, ती हलवते :डोमा:)
मिनोती! ही क्रुती सासुबाईंनी सांगितली होती असच माहिती म्हणुन, त्यामुळे डिटेल नाही माहिती. तु लिही ना तुझी क्रुती.

मंजूडी, तुम्ही मोड आलेल्या हिरव्या मुगाची चाट करू शकता. खूप उशीर झाला वाटत सांगायला.

वर खानदेशी कृतींबद्दल जी चर्चा झाली आहे, ती कृपया वेगळ्या धाग्यावर हलवली जाईल का? 'खानदेशी पदार्थ' असा एक वेगळा धागा होऊ शकेल का?

कृपया इथे भेट द्या. खान्देशी पाककृतींसाठी हा वेगळा धागा उघडलाय.
http://www.maayboli.com/node/14887

<<,बाजरिच्या पिठाचे खमन्ग पदार्थ करता येतिल का?
पाककृती हवी आहे.<<

आपण जशा कोथिंबिरीच्या वड्या करतो... म्हणजे वाफवुन तसेच आमच्याकडे मेथिचे 'शेंगोळे' म्हणुन प्रकार आहे.
पाला मेथी बारीक चिरुन त्यात मावेल तितके बाजरीचे पीठ टाकावे. आणि अगदी चमचाभर बेसन एकजीव होण्यासाठी घालावे. नंतर तिखट, मिठ, चमचाभर तेल, वाटल्यास लसुण ठेचुन घ्यावा व जरा घट्टसर मळुन पोळपाटवरच त्याच्या शेंगोळ्या (जाड शेवेसारख्या) वळाव्यात. शेंगोळ्या बोटाच्या जाडीएवढ्या असतात. नंतर तव्यावर थोड्याशा तेलात झाकण ठेउन वाफवाव्यात. पुन्हा एकदा आजुबाजुने थोडे तेल सोडुन, खरपुस (ब्राउनीश) झाल्यावर या स्टीक्स लोणचं किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाव्यात.

लाजो चांगलाच होतो तो, पण जरा कडवट लागतो, म्हणून त्यात दूधी अवश्य किसून घालावा. आणि थोडिशी साखर पण.

दिनेशदा, इथे दुधी नाही मिळत सहजासहजी... गाजर, वाटाणा, कॉर्न अस घालायचा विचार होता. चलेल का?

लाजो, गाजर (बारिक किसून ) किंवा कोबी बारिक चिरून वापरता येईल. काकडी पण किसून वापरता येईल. वाटाणा, कॉर्न त्याच्या जोडीने. असे काहि घातले नाही, तर हांडवो अगदी कोरडा कोरडा होतो. आणि त्याचा तोठरा बसतो.

<<<आर्या, कृपया तो धागा या ग्रूप्मध्ये सुरू करा<<<

तो धागा आता इकडे कसा टाकता येईल?? Uhoh

मला प्लिज कोणी भाजणीचे पीठ कसे तयार करायचे ते सांगाल का ?
म्हणजे योग्य प्रमाण वगेरे...

"भाजणीचे पिठ" असे लिहून सर्च केले पण नाहि मिळाल..

आर्या
खानदेश ग्रूपमधला धागा आहारशास्त्र मध्ये हलवण्यासाठी अ‍ॅडमिनना विनंती कर. तुला स्वतः ते करता येणार नाही.

मी गोट चिज आणले आहे. पण त्याच्या वासामुळे मला ते नुसते सँडविच बरोबर खावेसे वाटत नाहीए. त्याचे काय करता येईल?

माझ्या कडे भरपूर अक्खी तूरडाळ आहे. सुकलेली, साला सकट. त्याची आमटी काही केल्या चविष्ट होत नाही. काय करू त्याचं, कोणी सुचवू शकेल का?

तूरडाळ भिजवुन शक्य झाल्यास मोड आणून त्याची उसळ करावी. मोड लवकर येत नाहीत. रात्रभर झाकुन ठेवली तर थोडेसे कोंब फुटतात तेवढे पण पुरे.

धन्यवाद प्रिती, सिंडरेला.
डोसे करायचा प्रयत्न करीन. मोड आणून उसळही करून बघीन.
डायरेक्ट शिजवली की फार बेकार लागते, मसाले, कांदा घालूनही.

गोट चिज आणि ओल्या अंजिराचे तुकडे पिझ्झा बेस वर लावुन, वर थोडे मध शिंपडुन डेझर्ट पिझ्झा करता येइल.

गोट चीज , ...आधी बाहेर कुठे खाल्ल असेल तरच घरी प्रयोग करा अशक्य वास येतो .:अओ:

Pages