पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिनोती खूपच मस्त आयडिया आहे. पण मग ते दाण्यासारखे फोडणीत च टाकायचे का?

आणि अजुन काय करता येउ शकते?

निर्मयी, खारवलेल्या पिस्त्याचं डिप करायच...

पिस्ते शेल मधुन काढुन त्याची साल काढ. कोथिंबीर किंवा स्वीट बेसिल ची पानं + पिस्ते + ऑ ऑ आणि हवे असल्यास थोडी पापरीका/लाल मिरची चे तुकडे हे सगळे भरड वाटुन घे... हे डिप क्रॅकर्स वगैरे बरोबर, ब्रेड (बगेत) बरोबर मस्त लगत...

नॉनव्हेज खात असशिल तर पिस्त्याचा भरड चुरा करायचा आनि मॅरीनेट केलेले चिकन्/फिश चे थोडे मोठे तुकडे या चुर्‍यात घोळवायचे आणि शॅलो फ्राय/बेक्/बार्बेक्यु करायचे... मस्त क्रंची लागत...

मला केक वर आईसिंग / डेकोरेशन साठी जे क्रिम वापरतात..ते क्रिम घरि कसे बनवायचे..ते सांगाल क कुणी?

सुप्रिया,
मी माझ्या मैत्रीणीकडे अख्ख्या छोट्या कैर्‍यांचं 'गोवेकरी' लोणचं खाल्लयं फार पूर्वी. मैत्रिणीची गोव्याची मावशी म्हणे त्या कैर्‍यांना एकेक भोक पाडून हळद मीठ घालून मुरवतात आणि नंतर रितसर लोणचं घालतात. पण सविस्तर कृती माहीत नाही.

अख्ख्या कैर्‍या केवढ्या आकाराचे आहे त्यावर लोणच्याचा प्रकार ठर्तो. आन्ध्रा आणि कारवार दोन्हीकडे करतात हे. कोकणात, नुसत्या मिठाच्या पाण्यात बुदवून ठेवतात या कैर्‍या.
कारवारी लोणच्यात, तेल नसते. कैर्‍या बुडवून ठेवलेले मिठाचे पाणी, गरम करुन, थंड कर्य्न, त्यात लाल मिरच्या वाटतात. झणझणीत, पण मस्त लागते हे लोणचे. या कृति बहुतेक आहेत इथे.

सुजा, हे क्रिम करायचे दोनतीन प्रकार आहेत. शक्यतो आयसिंग शुगर वापरतात, कारण ती कोरडी असते. अगदी सोपा प्रकार म्हणजे, पांढर्‍या लोण्यात, पिठीसाखर मिसळून, हे करता येते. किंवा अंड्यातले फक्त पांढरे फेटून त्यात साखर मिसळून करता येते. दोन्ही प्रकार झटपट हाताळावे लागतात, कारण ते पटकन सुकतात.

ते अख्ख्या कैर्‍यांचं लोनच म्हनजे बाळ कैर्‍यांचं लोणच ना?
ते खुपच छान लागत. खुप खायचे लहानपणी.

लाल भोपळ्याची खीर करायला भोपळा साल काढून मावे किंवा कुकर ला शिजवून घ्यायचा.गर नीट मॅश करून घेऊन थोड्या तुपावर परतून घ्यायचा.एकीकडे दूध जरा आटवून घ्यायचे.गर मिसळून हव्या त्या कन्सिस्टन्सी चे झाले की आवडीप्रमाणे साखर, वेलची पूड, सुका मेवा वगैरे घालून गार करायची.दूध आटवायचे नसेल तर कण्डेन्स्ड मिल्क पण वापरू शकतेस.मग साखर घालायची गरज नाही.

व्हेज/नवरतन कुर्मा/मिक्स व्हेज ई. करताना त्यात फ्रेश क्रीम ऐवजी सोअर क्रीम वापरता येइल का? आणि जर फ्रेश क्रीम असेल तर ते हाफ न हाफ चे मिळत ते घालायच की हेवी व्हीपिन्ग क्रीम घालायच?

सोअर क्रिम चालेल अस मला पण बर्‍याच दिवसांपासुन वाटतय. पण अजुन ट्राय केलेलं नाहिये. मी हेवी क्रिमच वापरते.

रच्याकने, नवर्‍याने परवा इ. ग्रो. मधुन साबुदाणा पोहा आणलाय. त्याच काय करतात? मी भिजवुन पाहिल थोड तर चिकट लगदा झाला. तळाव काय?

पीटेड प्रुन्सचे काय करता येईल? असेच येता जाता खाणे चालु आहे पण बरेच आहेत..( काय विचार करुन एवढे आणले Sad )

अमृता, साबुदाण्याच्या पोह्यांचा मक्याच्या पोह्यांसारखा चिवडा करतात.

म्हणजे तळुनच घेउ ना ते पोहे?
सध्या भिजवलेल्या लगद्यात बटाटा, दाण्याच कुट घालुन थालिपिठ थापता येतय का पहाते.

अग तो नॉयलॉनचा साबुदाणा आहे बहुतेक मग. निवेदिता म्हणते तसा चिवडा होईल त्याचा. केला कि थोडा इकडे पण पाठव. Proud

तो साबुदाणा हलक्या आचेवर भाजून घे. फार जास्त आंच असेल तर लाह्या फुटायला लागतात बहुतेक. भाजल्यावर मग तळायचा. त्याचा चिवडा करायचा. त्यात बटाट्याचा कीस आणि दाणे. वा वा वा !!

सिंडे, नीट वाच. तिच्याकडे नायलॉन साबुदाण्याचे पोहे आहेत. साबुदाणा नाही. त्यामुळे लाह्या होणार नाहीत. Proud

मिनी म्हणतेय तो नायलॉन साबुदाणा आहे. त्यावर माझी पोस्ट आहे. आजी तुम्हीच आता परत वाचा बरं Proud

Pages