पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद रमा.
पण मला याची पण भीती वाटत आहे. ते चीजचा असा वास येतो ना. मला अस काहीतरी हवय की ज्याच्यात हे चीज घातलय ते समजणार पण नाही. मिसळुन जाईल पदार्थात.

<<आधी बाहेर कुठे खाल्ल असेल तरच घरी प्रयोग करा अशक्य वास येतो>>

हो ना. मी ते तब्येतीला चांगले. चिज खावे तर गोट चिज असे ऐकुन आणले. आता काय करु समजत नाही. Sad

'माझ्या कडे भरपूर अक्खी तूरडाळ आहे. सुकलेली, साला सकट. '
दंडगेल या गुजराथी पदार्थात ही वापरता येईल.

'मी गोट चिज आणले आहे. पण त्याच्या वासामुळे मला ते नुसते सँडविच बरोबर खावेसे वाटत नाहीए. त्याचे काय करता येईल?'

त्याच्या जोडीला तितलेच उग्र वासाचे काहितरी वापरून काट्याने काटा काढावा.
मेथी, चीझ आणि उकडलेला बटाटा यांचे चीझ बॉल्स करता येतील. अर्थात ते तळावे लागतील.

बटाट्याचे वेफर्स व किस कसा करावा ?

वाळवण व साठवण भाग पाहिला. त्यात नाही.

खर तर त्यात कुर्डया, पापड्या, पापड लोणची असे पदार्थ असतिल असे वाटले. ते पदार्थ आणखी कुठे तर नाहीत ? Sad

बारिकशी चूक झालीय, अख्खे ते तूर (किंवा तूरीचे दाणे, बाजारात तूरी अन भट भटणीला मारी, मधले )
तूरडाळ नव्हे. कडबोळ्यासाठी ती वापरतात. पिवळ्या (वा पांढर्‍या ) तूरीला तशी भिजवूनही चव लागत नाही, उसळीला ओले तूरीचे दाणेच चांगले. त्यामूळे इतर भाज्यात वापरंणे योग्य.

सिंडरेला, तूरडाळीला पण मोड येतात का? मला वाटले अख्ख्या कडधान्यालाच मोड येतात. डाळ करताना त्यावर काही प्रक्रिया झालेली असते ना!

स्विझ चिझच काय कराव लोकांनो?? चव आवडत नाहिये. लवकर सांगा नाहितर त्याला बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. Proud

तुरीच्या डाळीला नाही मोड येत. नमुसीकडे आख्खे तूर आहेत. उसळीला तुरीचे कोवळे दाणे असतील तर अर्थातच जास्त चांगले लागतात. पण दाणे भिजवुन केलेली उसळ पण काही वाईट लागत नाही. मी लसूण-खोबर्‍याचे वाटण लावून करते.

अमृता, स्लाइस आहेत का ? सँडविच कर.

कुणाला उपासा च्या बिस्किटाची पाककृती माहिती आहे का ?
पुण्याला बहुतेक सर्व बेकरी मध्ये मिळतात.

मला १८ माणसांसाठी छोले भटुरे करायचे आहेत विकांताला... पाकृ शोधली पण नाही सापडली. लिंक माहित असेल तर द्या Happy

शिल्पा, पानाच्या सर्वात खाली मायबोली सर्च ऑप्शन आहे. तिथे नुसतं 'खजूर' लिहिलंस तरी बर्‍याच पाककृती सापडतील.
मी तसं करून बघितलं. मला अनेक मिळाल्या Happy आता कोणी विचारेल की मग सल्ले देण्यापेक्षा पदार्थांच्या कृती दे, तर मुद्दामच नाही देत आहे त्या लिंक्स. हा सर्च ऑप्शन अत्यंत उपयुक्त आहे, किमान पाककृतींसाठी तरी नक्कीच. पण त्याचा जास्त वापर केला जात नाही, म्हणून असे मुद्दाम लिहिले. नथिंग पर्सनल.

सर्वांना आवाहन आहे की सर्च ऑप्शनचा वापर करा. जुन्या माबोतल्या लिंक्सही येतात.

खजूर म्हण्जे प्युअर शुगर. वजन कमी करायचे असेल तर खजूर खाऊ नये. त्यात बर्फी म्हण्जे तूप,वर साखर आलेच.

पुनम अग मी इथे लिहीण्याआधीच सर्च करुन पाहीले मला खजुराची चटणी नाही मिळाली, म्हणुन मग इथे विचारले. कोणास माहीती असल्यास कृपया सांगावे.

खजुर, खजूर ह्या दोन्ही नावांनी सर्च करून पहा. शिवाय खजुराच्या चटणीतील इतर घटक पदार्थ माहीत असतीलच ना.. त्या नावांनी सर्च करून पहा.

.

कुणाला eggless brownie चि पाककृती माहिती आहे का ?

माझ्याकडे चुकुन खारवलेले पिस्ते आणले गेले आहेत. खुपच जास्त आहेत तर मी त्याचे काय करु कोणी मला सान्गाल का?

खारवलेल्या पिस्त्याचा खारटपणा तसा जाणार नाही. थोडे पिस्ते भिजत घालून, अनेकवेळा धुवून बघता येतील. खारटपणा गेला, तर बर्फी, आईसक्रीम मधे वापरता येतील. नाहीतर तसेच खाऊन संपवावे लागतील.
खारवेलेले पिस्ते, साध्या पिस्त्यांपेक्षा थोडे जास्त टिकतात, तरीपण फ्रिजमधे ठेवले तर चांगले.

चिवड्यात शेंगदाण्याऐवजी पिस्ते वापरा. मीठ कमी घाला. छान लागतात.
भिजवुन ओल्या चटणीत घालता येतील.
दाण्यासारखी पिस्ता चटणी करता येईल.

मला खजुर लोफ पाहिजे होता, मी खजुर्/खजूर म्हणुन सर्च केले. बरेच खजुर सापडले (:) ) पण खजुर लोफ असे पाकृच्या शीर्षकात लिहिलेली पाकृ मात्र सापडली नाही. असे का?

पूनम, प्लिज चेक कर गं...

खजुर लोफ इकडे आहे http://www.maayboli.com/node/9150

त्याचं नाव खजुर लोफ - अंड्यशिवाय असे असल्यामुळे मिळाले नसेल कदाचित. पण मी बेकरी पदार्थात शोधले तेव्हा लगेच मिळाले. आपले सर्च पॅरॅमीटर्सचं कॉम्बिनेशन बदलून बघायचं अशा वेळी.

पाहिलं साधना, नुसता लोफ आणि खजुर लोफ दिन्ही दिलं- लाजोने ४१व्या पानावर लिंक दिलीये, ती आली Happy संपूर्ण लिंक आली नाही तरी आपण दिलेले शब्द येतात, त्यावरून अंदाज करायचा. ९९% सापडतेच.

कधी करत्येस मग? उद्या? Happy

अगं मंजु आणि पूनम, मी मग बेकरी पदार्थात जाऊन शोधला, मिळाला आणि परवा करुन खाल्लादेखिल....

मलादेखिल लाजोने दिलेली लिंक सापडलेली. पण मग जर लिंक सापडते तर मग पाकृही का नाही दिसत?? तसे खजुर लाडू दिसतात, date walnut cake दिसतो मग खजुर लोफ चे दोन पदार्थ का नाही दिसत?

Pages