पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षू मला उक्कडीची ही लिंक मिळाली माबो वर, त्यात ज्वारीचे पीठ आहे त्या ऐवजी फक्त तांदळाचे पीठ घालायचे!
Proud

मी दिलेल्या अर्धवट कृतीपेक्षा ही वेगळी कृती आहे, पण मस्त वाटते आहे!
लिंक आहे : http://www.maayboli.com/node/7632

अकु.. थँक्स गं.. नक्की करीन..
अमृता..मी ऑलरेडी इकडे शोधली होती रेसिपी..नव्हती कुठे Happy

मी एकदा टाकणार होते पण वाटल असली कुठे तर उगिच डबल होइल. Happy कधी कधी शोधुन पण शब्दखुणा नीट नसतील तर मिळत नाही रेसिपी... आपल्याला ही उक्कड म्हणूनच नाही मिळाली.

सिंडरेला, ज्वारीच्या उक्कडीची रेसिपी मिळाली आहे इथे, मग पुन्हा वेगळी तांदळाच्या पिठीची उकड रेसिपी पा.कृ.मध्ये टाकावी काय? दोन्ही उकडींची थोडी पध्दत वेगळी आहे, पण माझ्या मते चव एकाच प्रकारची लागेल...... फर्मास!!!! Proud

वर्षू मला उक्कडीची ही लिंक मिळाली माबो वर, त्यात ज्वारीचे पीठ आहे त्या ऐवजी फक्त तांदळाचे पीठ घालायचे!
मी दिलेल्या अर्धवट कृतीपेक्षा ही वेगळी कृती आहे, पण मस्त वाटते आहे!
लिंक आहे : http://www.maayboli.com/node/7632
मी लिन्क क्लिक केली पण...

हे पान पहायची परवानगी नाही.
तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. (हे जर ग्रूप मधले पान असेल तर ग्रूपचे सभासद होऊन पहा. पुष्कळदा काही पाने फक्त ग्रूपच्या सभासदांसाठीच मर्यादित असतात)

असे का येतेय?

चुचु, आहारशास्त्र व पाककृती ग्रुपची मेंबर हो, तुला ते पान दिसेल! Happy तिथेच कोठेतरी ''सदस्य व्हा'' असा पर्याय दिसेल बघ!

अकु, तसं असेल तर मूळ कृतीच्या खाली प्रतिसादांत आपण केलेला बदल सांगायचा. इथे कृती दिली तर ती पुन्हा शोधायला फार अवघड जाते.

माझ्याकडे मक्याचे आणि सोयाबिनचे पिठ आहे. त्याचे काय करता येईल ?

जागू मक्याच्या पिठाची थालीपीठे खूप मस्त होतात..तुझ्याकडे कुठलं मक्याचं पीठ आहे माहित नाही पण मी अमेरिकन ग्रोसरी मधून गोया ब्रांड च आणते मक्याचं पीठ..त्याची थालीपीठे मस्त होतात आणि भाकऱ्या पण..

पुण्यात कुठल्या बेकरी बिस्कीटे , नानकटाइ भाजुन मिळते? मी सिंहगड रोडला रहाते. जवळपासची बेकरी सांगा ना कुनाला माहित असेल तर Happy

सदाशिव पेठेत पेरुगेटपाशी, गीता धर्म मंडळ/ भवनसमोर मनोहर बेकरी आहे तिथे बिस्किटे, नानकटाई भाजून मिळते.

फर्ग्युसन कॉलेज रोडलाही एक बेकरी होती अशी, सध्या चालू आहे वा नाही माहित नाही.

मला कुणी गुलाबजाम मिल्क पावडर वापरून कसे करायचे सांगेल का.. अगदी ओम फास झाला परवा.. कोणी तरी सांगितला होता मिल्क पावडर आणि दुध थोडा एकत्र करून कोकर मध्ये वाफवून घेतला तर खावा तयार होतो .. झाला छान पण त्याचे गुलाबजाम नाही करता आले.. मिल्क बर्फी करून खाल्ली मग Sad

Pages