होय.बेताबीच . मीही पाहिला होता हा चित्रपट....... कालिजात असताना.. आमची एक मैत्रीणही योगायोगाने याच पिक्चरला स्वतंत्रपणे आली होती.... तिला माझी शिनेमाची चॉइस कळली.. !! नंतर आमची मैत्री अगदी नॉमिनलच राहिली... अरेरेरे, करे कोई, भरे कोई.. !!! का हा पिक्चर काढला निर्मात्याने... !!!!!!
Submitted by जागोमोहनप्यारे on 16 April, 2010 - 02:44
काल मी, Me and Orson Welles, अश्या नावाचा सिनेमा बघितला. झॅक एफ्रॉन आहे त्यात, पण त्याचा रोल थोडा वेगळा आहे. नाटकाच्या क्षेत्रात उमेदवारी करणारा एक १८ वर्षाचा मुलगा, थिएटरच्या मॅनेजरच्या प्रेमात पडतो. त्या थिएटरमधे ब्रुटस ची भुमिका करणार्या नटाचे वर्चस्व असते. आणि तो त्या मॅनेजरला वापरुन घेत असतो. यावरुन छोटा रिचर्ड (झॅक) चिडतो. नाटकात काम करणार नाही असे सांगतो. पण तो ऑर्सोन, त्याची समजून घालतो. पहिला प्रयोग यशस्वी होतो. पण...
सिनेमाचे कथानक १९३७ मधले आहे. हॉलीवूड मधे बनलेली, पिरियड फिल्म बघताना, काळाचे किती व्यवस्थित भान ठेवलेले असते, याचे मला नेहमीच कौतूक वाटते. पडद्यावर दिसणारी प्रत्येक बारिकसारिक गोष्ट त्या काळातली आहे. इतकेच नव्हे तर मोठ्या वास्तू, जसे थिएटर, म्यूझियम, रस्ते देखील त्या काळातले. कलाकारांचे कपडे, मेकप देखील त्या काळातला. नाटकाच्या तालमीतल्या कुरबुरी, तिथल्या अंधश्रद्धा, सगळ्यांचे मस्त चित्रण. ऑर्सोन ची भुमिका केलेला कलाकार तर ग्रेट आहे, पण झॅक चा संयत अभिनय, सुंदर आहे. तो आहे म्हणून नाचगाणी आहेत असेही नाही. नाटकातली चार ओळींची कविता सोडली तर काहीच "गाणे" नाही. पण तरीहि बघण्यासारखा सिनेमा.
मी काल ट्रम्प कार्ड, नावाचा हिंदी सिनेमा पण बघितला. अॅक्शनसे भरपूर सस्पेन्स फिल्म, अशी जाहिरात. एकच कलाकार सोडला, तर एकही चेहरा माझ्या ओळखीचा नाही. पण यातले अभिनेते, अभिनेत्र्यांचा अभिनय बघितलात, तर हरमन बावेजाला अभिनयसम्राट म्हणाल. (आणि कतरीनाला सम्राज्ञी,) निदान दोघे दिसायला तरी देखणे आहेत.
बाकी या सिनेमात संवादापासून, ष्टोरी पर्यंत सगळाच आनंदीआनंद आहे. आजूबाजूला, फोडण्यासारखी, आदळण्याआपटण्यासारखी कुठली वस्तू नाही, याची खात्री करूनच हा सिनेमा बघा. (फक्त काहि किल्ले यात दिसले आहेत हे कौतूक. पण त्या किल्ल्यांवर हिरवीणीने जे केले आहे, त्यावरुन तिथल्या तिथे तिला हत्तीच्या पायी देऊन, सूळावर चढवून, मग तिचा कडेलोट करायची इच्छा होते.)
बकवास आहे... पहिल्या फुंकचा सिक्वल आहे... पण कथा पूर्ण झालेली नाही.... आता फुंक ३ येणार... बकवास फिल्मला तीन तीन तिकिटांचे पैसे वसूल करण्याची आयडिया छान आहे..
Submitted by जागोमोहनप्यारे on 19 April, 2010 - 07:38
काल मेरिल स्ट्रीप आणि अलेक बाल्डविन चा It's Complicated बघितला. छान आहे. मेरिल अजूनही गोड दिसते आणि सहजसुंदर अभिनय करते. अलेक, तरुणपणी पण जाडच होता, आता जास्तच सुटलाय. तरिपण छान अभिनय करतो. अगदी साध्या साध्या प्रसंगातून कथा फूलवलीय. शेवट मात्र भारतीय परंपरेला, अनुसरुन नाही. नायिका ठाम निर्णय घेते. माजी नवर्याच्या, मुलांच्या दबावाला बळी पडत नाही. हे विशेष आहे.
हो तसाच. मला वाटते अलेक, स्टिफन आणि आणखी एक असे ३ भाऊ होते ते.
परवा, 5 minites of heaven असा बीबीसी ने निर्माण केलेला चित्रपट बघितला. १९७५ च्या सुमारास आयर्लंड मधे झालेल्या दंगलीवर तो आधारित होता. खरे तर दंगलीच्या परीणामांवर आधारीत होता. या दंगलीच्या दरम्यान एक कोवळा मुलगा, एका माणसाची हत्या करतो. ती हत्या त्या माणसाच्या लहान भावाच्या डोळ्यादेखतच होते. पुढे अनेक वर्षानी, एका टिव्ही कार्यक्रमात (वन ऑन वन) त्या दोघाना समोरासमोर आणायचे ठरते. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणावर हा सिनेमा बेतलेला आहे.
हा कार्यक्रम चित्रीत होऊ शकतो का ? ते दोघे भेटतात का ? हे या सिनेमात बघायला मिळते.
या घटनेचा त्या दोघांच्या आयूष्यावर खुप खोलवर परिणाम झालेला असतो. त्यामूळे या भेटित काय होणार, याची उत्सुकता चित्रपटभर राहते.
कलाकर फारसे नाववाले नाहीत, पण बीबीसी वर नेहमी दिसणारे आहेत. अभिनय म्हणाल, तर कलाकारांपैकी, कुणी अभिनय करतय असे वाटतच नाही, इतका उत्कृष्ठ आहे. मिळाला कुठे तर अवश्य बघा.
It's Complicated छान आहे. मी तर Nancy Meyers ची पंखी आहे. तिचे सगळे सिनेमे बघावेत. 'Holiday', 'The Parent Trap', 'Father of the Bride - 1 & 2' ह्याची तर पारायण करते.
फ़्रॉम पॅरिस विथ लव्ह, नावाचा नवा कोरा सिनेमा बघितला, आणि डोकेहिन सिनेमे
फ़क्त आपल्याकडेच बनतात, हा भ्रम दूर झाला.
अगदी अ.अ.ष्टोरी. खरे तर जॉन ट्रॅव्होल्टा होता, म्हणून मी बघितला. त्याने टक्कल
वगैरे करुन, नवा लूक घ्यायचा प्रयत्न केलाय. जोडिला जोनाथन मेयर्स, म्हणून कुणी
पोरगा आहे.
पॅरिस मधल्या रस्त्यांवरुन जोरदार पाठलाग सोडला तर सिनेमात बघण्यासारखे काहिच नाही.
जॉनने बरिच हाणामारी केलीय, पण त्याच्या जाडेपणामूळे तो अजिबात कन्व्हिसींग वाटत नाही.
ज्या रितीने ते एक फ़्लॉवरवास भरुन, मादक द्रव्य घेऊन रस्त्यावरुन फ़िरतात, ते अजिबात पटत
नाहीत. (दु:खात सुख एवढेच कि काहि पाकिस्तानी ड्रग डिलर्स दाखवलेत.) शिवाय, ड्रग माफ़ियांशी
लढणारेच, ज्या प्रमाणात ड्रग्ज घेतात, तेही पटत नाही.
ष्टोरीत एक बर्यापैकी ट्वीस्ट आहे, आणि सिनेमात सहसा, अशी व्यक्ती, तशी असत नाही.
पण ती व्यक्ती सुईसाइड बॉंम्बर असताना, एवढी कडक सुरक्षा पार करते, हे अशक्य आहे.
सिनेमा दिवसाउजेडी चित्रीत झालाय, हे एक वेगळेपण. (नेहमीसारखा निळाकाळा
नाही.)
'तेरे मेरे सपने' छान टाईमपास
'तेरे मेरे सपने' छान टाईमपास चित्रपट होता.
बेताबी च असणार तो बहुतेक.
बेताबी च असणार तो बहुतेक. तेरे मेरे सपने, ए बी सी एल चा पहिला सिनेमा होता ना ?
हो, तो बेताबीच ! त्यात ते
हो, तो बेताबीच ! त्यात ते सुरेश वाडकरांच एक गाणं होतं ' तुम मेरे हो , बस मेरे ही मेरे हो'
आमचा एक मजनु मित्र सारखा आळवायचा हेच गाणं , म्हणून म्हाईत
तेरे मेरे सपने, ए बी सी एल चा
तेरे मेरे सपने, ए बी सी एल चा पहिला सिनेमा होता ना
हा अतिशय सुंदर चित्रपट... गाणी साधना सरगमने गायलेली, तिही अगदी श्रवणीय होती.
बेताबी.... याचे नावही ऐकले नाही.. पण त्यातले सुरेश वाडकरचे 'तुम मेरे हो, बस मेरेही मेरे हो..' हे गाणे मात्र एकदम झक्कास आहे.
दीपू, नेटवरुन डाऊनलोड करुन ऐक गाणे, एकदम मस्त आहे....
दिनेश :).... नशिब इतर तरी वाचले. उगाच कोणाच्या हाती सीडी लागती तर...
साधना, माहीती आहे ते गाणं.
साधना, माहीती आहे ते गाणं. तेरे मेरे सपने मधलं ही 'कुछ मेरे दिल ने कहा' मस्तय एकदम.
होय.बेताबीच . मीही पाहिला
होय.बेताबीच . मीही पाहिला होता हा चित्रपट....... कालिजात असताना.. आमची एक मैत्रीणही योगायोगाने याच पिक्चरला स्वतंत्रपणे आली होती.... तिला माझी शिनेमाची चॉइस कळली.. !!
नंतर आमची मैत्री अगदी नॉमिनलच राहिली... अरेरेरे, करे कोई, भरे कोई.. !!! का हा पिक्चर काढला निर्मात्याने... !!!!!!
अपरिचितुडु तेलुगुमध्ये पण खूप
अपरिचितुडु तेलुगुमध्ये पण खूप गाजला. विक्रमचे काम चांगले झालंयं. सदा पण चांगली दिसत्ये. 'कुमारी..' हे गाणं पण मजेदार.
आमची एक मैत्रीणही योगायोगाने
आमची एक मैत्रीणही योगायोगाने याच पिक्चरला स्वतंत्रपणे आली होती.... तिला माझी शिनेमाची चॉइस कळली.. !!
तीही आलेली ना तोच चित्रपट पाहायला???? मग तीचाही चॉइस भंगार.... तिला सांगायचे, तु जशी मोठी चुक केलीस तशीच मीही केली... झाली फिट्टंफाट....
फूंक २ पाहिला का? कसा आहे?
फूंक २ पाहिला का? कसा आहे?
कुणी पाठशाला पाहिला का?
कुणी पाठशाला पाहिला का?
>>फूंक २ अस्सं योग्य नाव
>>फूंक २
अस्सं योग्य नाव दिलंय ना हिंदीत !!
पाठशाला ठीक आहे , स्टोरी
पाठशाला ठीक आहे , स्टोरी चांगली होती पण म्हणावी तशी फुलवता आली नाही दिग्दर्शकाला , खुपच स्लो वाटतो.
आत्ताच वेक अप सिड पाहिला. बरा
आत्ताच वेक अप सिड पाहिला. बरा वाटला. करण जोहरला अजुन बराच स्कोप आहे मॅच्युअर्ड व्हायला.
फूंक २.............. मी आज
फूंक २.............. मी आज बघणार आहे.... (पहिला बघितला आहे...
)
पाठशाला पाहीला. ब क वा स
पाठशाला पाहीला. ब क वा स
काल मी, Me and Orson Welles,
काल मी, Me and Orson Welles, अश्या नावाचा सिनेमा बघितला. झॅक एफ्रॉन आहे त्यात, पण त्याचा रोल थोडा वेगळा आहे. नाटकाच्या क्षेत्रात उमेदवारी करणारा एक १८ वर्षाचा मुलगा, थिएटरच्या मॅनेजरच्या प्रेमात पडतो. त्या थिएटरमधे ब्रुटस ची भुमिका करणार्या नटाचे वर्चस्व असते. आणि तो त्या मॅनेजरला वापरुन घेत असतो. यावरुन छोटा रिचर्ड (झॅक) चिडतो. नाटकात काम करणार नाही असे सांगतो. पण तो ऑर्सोन, त्याची समजून घालतो. पहिला प्रयोग यशस्वी होतो. पण...
सिनेमाचे कथानक १९३७ मधले आहे. हॉलीवूड मधे बनलेली, पिरियड फिल्म बघताना, काळाचे किती व्यवस्थित भान ठेवलेले असते, याचे मला नेहमीच कौतूक वाटते. पडद्यावर दिसणारी प्रत्येक बारिकसारिक गोष्ट त्या काळातली आहे. इतकेच नव्हे तर मोठ्या वास्तू, जसे थिएटर, म्यूझियम, रस्ते देखील त्या काळातले. कलाकारांचे कपडे, मेकप देखील त्या काळातला. नाटकाच्या तालमीतल्या कुरबुरी, तिथल्या अंधश्रद्धा, सगळ्यांचे मस्त चित्रण. ऑर्सोन ची भुमिका केलेला कलाकार तर ग्रेट आहे, पण झॅक चा संयत अभिनय, सुंदर आहे. तो आहे म्हणून नाचगाणी आहेत असेही नाही. नाटकातली चार ओळींची कविता सोडली तर काहीच "गाणे" नाही. पण तरीहि बघण्यासारखा सिनेमा.
मी काल ट्रम्प कार्ड, नावाचा
मी काल ट्रम्प कार्ड, नावाचा हिंदी सिनेमा पण बघितला. अॅक्शनसे भरपूर सस्पेन्स फिल्म, अशी जाहिरात. एकच कलाकार सोडला, तर एकही चेहरा माझ्या ओळखीचा नाही. पण यातले अभिनेते, अभिनेत्र्यांचा अभिनय बघितलात, तर हरमन बावेजाला अभिनयसम्राट म्हणाल. (आणि कतरीनाला सम्राज्ञी,) निदान दोघे दिसायला तरी देखणे आहेत.
बाकी या सिनेमात संवादापासून, ष्टोरी पर्यंत सगळाच आनंदीआनंद आहे. आजूबाजूला, फोडण्यासारखी, आदळण्याआपटण्यासारखी कुठली वस्तू नाही, याची खात्री करूनच हा सिनेमा बघा. (फक्त काहि किल्ले यात दिसले आहेत हे कौतूक. पण त्या किल्ल्यांवर हिरवीणीने जे केले आहे, त्यावरुन तिथल्या तिथे तिला हत्तीच्या पायी देऊन, सूळावर चढवून, मग तिचा कडेलोट करायची इच्छा होते.)
फुंक २
फुंक २ बघितला.....................
बकवास आहे... पहिल्या फुंकचा सिक्वल आहे... पण कथा पूर्ण झालेली नाही.... आता फुंक ३ येणार... बकवास फिल्मला तीन तीन तिकिटांचे पैसे वसूल करण्याची आयडिया छान आहे..
मी अग्यात पाहिला होता...
मी अग्यात पाहिला होता... तेव्हापासून रागोवचा कुठलाही चित्रपट न पाहण्याची मी प्रतिज्ञा केली आहे.
रागोव चे १०० अपराध कधी भरणार?
रागोव चे १०० अपराध कधी भरणार?
डेट नाइट. टीना फे आणि स्टीव्ह
डेट नाइट. टीना फे आणि स्टीव्ह करेल साठी एकदा बघावाच असा. धमाल सिनेमा.
काल मेरिल स्ट्रीप आणि अलेक
काल मेरिल स्ट्रीप आणि अलेक बाल्डविन चा It's Complicated बघितला. छान आहे. मेरिल अजूनही गोड दिसते आणि सहजसुंदर अभिनय करते. अलेक, तरुणपणी पण जाडच होता, आता जास्तच सुटलाय. तरिपण छान अभिनय करतो. अगदी साध्या साध्या प्रसंगातून कथा फूलवलीय. शेवट मात्र भारतीय परंपरेला, अनुसरुन नाही. नायिका ठाम निर्णय घेते. माजी नवर्याच्या, मुलांच्या दबावाला बळी पडत नाही. हे विशेष आहे.
अलेक, तरुणपणी पण जाडच होता,
अलेक, तरुणपणी पण जाडच होता, आता जास्तच सुटलाय. तरिपण छान अभिनय करतो.
संजीवकुमारसारखं का?
हो तसाच. मला वाटते अलेक,
हो तसाच. मला वाटते अलेक, स्टिफन आणि आणखी एक असे ३ भाऊ होते ते.
परवा, 5 minites of heaven असा बीबीसी ने निर्माण केलेला चित्रपट बघितला. १९७५ च्या सुमारास आयर्लंड मधे झालेल्या दंगलीवर तो आधारित होता. खरे तर दंगलीच्या परीणामांवर आधारीत होता. या दंगलीच्या दरम्यान एक कोवळा मुलगा, एका माणसाची हत्या करतो. ती हत्या त्या माणसाच्या लहान भावाच्या डोळ्यादेखतच होते. पुढे अनेक वर्षानी, एका टिव्ही कार्यक्रमात (वन ऑन वन) त्या दोघाना समोरासमोर आणायचे ठरते. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणावर हा सिनेमा बेतलेला आहे.
हा कार्यक्रम चित्रीत होऊ शकतो का ? ते दोघे भेटतात का ? हे या सिनेमात बघायला मिळते.
या घटनेचा त्या दोघांच्या आयूष्यावर खुप खोलवर परिणाम झालेला असतो. त्यामूळे या भेटित काय होणार, याची उत्सुकता चित्रपटभर राहते.
कलाकर फारसे नाववाले नाहीत, पण बीबीसी वर नेहमी दिसणारे आहेत. अभिनय म्हणाल, तर कलाकारांपैकी, कुणी अभिनय करतय असे वाटतच नाही, इतका उत्कृष्ठ आहे. मिळाला कुठे तर अवश्य बघा.
डेट नाइट छान आहे. कुणी "How
डेट नाइट छान आहे.
कुणी "How to train your Dragon" बघितला का ?
धमाल सिनेमा आहे.
कुणी "How to train your
कुणी "How to train your Dragon" बघितला का ? >> मी पाहिला पहिल्याच दिवशी. मस्त आहे.
It's Complicated छान आहे. मी
It's Complicated छान आहे. मी तर Nancy Meyers ची पंखी आहे. तिचे सगळे सिनेमे बघावेत. 'Holiday', 'The Parent Trap', 'Father of the Bride - 1 & 2' ह्याची तर पारायण करते.
फ़्रॉम पॅरिस विथ लव्ह, नावाचा
फ़्रॉम पॅरिस विथ लव्ह, नावाचा नवा कोरा सिनेमा बघितला, आणि डोकेहिन सिनेमे
फ़क्त आपल्याकडेच बनतात, हा भ्रम दूर झाला.
अगदी अ.अ.ष्टोरी. खरे तर जॉन ट्रॅव्होल्टा होता, म्हणून मी बघितला. त्याने टक्कल
वगैरे करुन, नवा लूक घ्यायचा प्रयत्न केलाय. जोडिला जोनाथन मेयर्स, म्हणून कुणी
पोरगा आहे.
पॅरिस मधल्या रस्त्यांवरुन जोरदार पाठलाग सोडला तर सिनेमात बघण्यासारखे काहिच नाही.
जॉनने बरिच हाणामारी केलीय, पण त्याच्या जाडेपणामूळे तो अजिबात कन्व्हिसींग वाटत नाही.
ज्या रितीने ते एक फ़्लॉवरवास भरुन, मादक द्रव्य घेऊन रस्त्यावरुन फ़िरतात, ते अजिबात पटत
नाहीत. (दु:खात सुख एवढेच कि काहि पाकिस्तानी ड्रग डिलर्स दाखवलेत.) शिवाय, ड्रग माफ़ियांशी
लढणारेच, ज्या प्रमाणात ड्रग्ज घेतात, तेही पटत नाही.
ष्टोरीत एक बर्यापैकी ट्वीस्ट आहे, आणि सिनेमात सहसा, अशी व्यक्ती, तशी असत नाही.
पण ती व्यक्ती सुईसाइड बॉंम्बर असताना, एवढी कडक सुरक्षा पार करते, हे अशक्य आहे.
सिनेमा दिवसाउजेडी चित्रीत झालाय, हे एक वेगळेपण. (नेहमीसारखा निळाकाळा
नाही.)
दु:खात सुख एवढेच कि काहि
दु:खात सुख एवढेच कि काहि पाकिस्तानी ड्रग डिलर्स दाखवलेत
काय हे?? love thy neighbours
लव आज कल बद्दल इथे कुणी काहीच
लव आज कल बद्दल इथे कुणी काहीच लिहिलं नाही. मी अजून नाही पाहीला सगळेच गाणे आवडले म्हणून डीवीडी आणून बघायच्या विचारात आहे.
Pages