स्त्रिया आणि खटकणार्‍या/ जाचक प्रथा

Submitted by डेलिया on 24 March, 2010 - 20:37

या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...

सौभाग्यचिन्हे या बीबी वरुन मला हा विषय सुचला. तो बीबी आता फक्त 'संयुक्ता' पुरता मर्यादित केलेला दिसतोय म्हणुन आणि या विषयाची व्याप्ती त्याच्या पेक्शा मोठी वाटत असल्याने नवीन बीबी उघडावा असे वाटले.

आपल्या समाजात बायकांच्या शारीरिक स्थिती वरुन ( उदा. - पाळी चालु असणे ) किंवा वैवाहिक स्थिती वरुन ( कु. , विवाहित , विधवा ई. ) अनेक प्रथा आहेत. यातल्या काही प्रथा तर स्त्रीसाठी अतिशय अपमानास्पद अशाही आहेत. असे असुनही त्यातल्या काही प्रथा आजही अनेक उच्चशिक्षित स्त्रियांकडुन देखिल पाळल्या जातात. काही स्त्रिया त्या प्रथा मनापासुन पाळतात तर काही जणी घरच्यांच्या / समाजाच्या दबावामुळे पाळतात.

इथे मला हे जाणुन घ्यायचेय की तुम्हाला अशा कोण्त्या प्रथा खटकतात? त्या नाहीशा करण्यासाठी तुमच्या परीने तुम्हि काय प्रयत्न करता ? तसेच तुमच्या पुढच्या पिढीवर या प्रथा लादल्या जाउ नयेत म्हणुन तुम्ही काय करता ? तसेच काही प्रथा खटकुन देखिल त्या तुम्हि पाळता का आणि कशामुळे ?

याचे उत्तर देउन माझ्यापासुनच मी सुरुवात करते.
१. पाळी ( menstrual periods ) सुरु असताना बाजुला बसणे ही जरी प्रथा अता बहुतेक सुशिक्षित घरातुन बंद झालेली असली तरी अजुनही पाळी सुरु असताना देवघरात जाणे , देवाची पुजा करणे ई. सारख्या गोष्टींना मनाई असते. पाळी चालु असणार्‍या स्त्री चा देवाला 'विटाळ' होतो असे म्हणले जाते. :
मला स्वताला या प्रथेत कोणतेही तथ्य वाट्त नाही. तसेच 'पाळी चालु असणार्‍या स्त्री चा विटाळ होतो' असे म्हणणे ही अतिशय अपमानास्पद वाटते. मी स्वता हे अजीबात पाळत नाही तसेच माझ्या मुलीला पण असे काहीही मी सांगणार नाही. ईतर कोणी तिला काही शिकवलेच तर ते का योग्य वाटत नाही हे तिला सांगेन.
२. सौभाग्यचिन्हे ( मंगळसुत्र ) ही बायकांची वैवाहिक स्थिती दर्शवितात. त्याच्या अनुषंगाने बायका - बायकात त्यांच्या वैवाहिक स्थिती वरुन भेद भाव केला जातो. : हा भेद भाव दुर व्हावा आणि सर्व बायकाना समाजात समान वागणुक मिळावी असे मला मनापासुन वाटते. रोजच्या आयुष्यात मंगळ्सुत्र वापरत नसले तरी लग्न , मुंजीसारख्या कार्यक्रमांना जाताना घालते. पटत नसले तरी नातेवाइकांच्या आणि घरातल्या मोठ्याच्या टीकेला सामोरे जावे लागु नये आणि उगीच वाद नकोत म्हणुन.

गुलमोहर: 

>>>>> जीव गेला तरी तुम्हाला जेवायला बोलावणार नाहीये.<<<<
कुणाचा जीव गेला तर? ओके ओके आल लक्षात! Proud कुणाचा जीव गेल्यावर तस बोलवता येतच नाही मुळी!
फक्त जीव गेल्यावर बाराव्व घातल की दोन भटजी बोलावतात, त्यात एक बोम्ब्या भटाला अन दुसर मला बोलाव! काय? Wink
(कुणाचा का जीव जाईना, बोम्ब्या भट अन मला काय त्याच? Happy )

एकूणच चर्चा जोरदार चालली आहे. सगळी नाही, पण बरीचशी वाचली मी.
आताच कैफी आजमी यांच्या कविता वाचत बसलो होतो. मूळ कविता बरीच प्रदीर्घ आहे (आणि उर्दू शब्द असल्याने समजायला जड आहे.)
पण त्यातला काही भाग एकंदर इथल्या चर्चेसाठी पोषक वाटला, त्यामुळे देतो आहे.

ठळक केलेल्या ओळींकडे विशेष लक्ष द्या. Happy
----------------------------------
ज़िन्दगी जहद में है सब्र के काबू में नहीं
नब्ज़-ए-हस्ती का लहू कांपते आँसू में नहीं
उड़ने खुलने में है नक़्हत ख़म-ए-गेसू में नहीं
ज़न्नत इक और है जो मर्द के पहलू में नहीं
उसकी आज़ाद रविश पर भी मचलना है तुझे
उठ मेरी जान! मेरे साथ ही चलना है तुझे

गोशे-गोशे में सुलगती है चिता तेरे लिये
फ़र्ज़ का भेस बदलती है क़ज़ा तेरे लिये
क़हर है तेरी हर इक नर्म अदा तेरे लिये
ज़हर ही ज़हर है दुनिया की हवा तेरे लिये
रुत बदल डाल अगर फूलना फलना है तुझे
उठ मेरी जान! मेरे साथ ही चलना है तुझे

क़द्र अब तक तिरी तारीख़ ने जानी ही नहीं
तुझ में शोले भी हैं बस अश्कफ़िशानी ही नहीं
तू हक़ीक़त भी है दिलचस्प कहानी ही नहीं
तेरी हस्ती भी है इक चीज़ जवानी ही नहीं

अपनी तारीख़ का उनवान बदलना है तुझे
उठ मेरी जान! मेरे साथ ही चलना है तुझे

तोड़ कर रस्म के बुत बन्द-ए-क़दामत से निकल
ज़ोफ़-ए-इशरत से निकल वहम-ए-नज़ाकत से निकल
नफ़स के खींचे हुये हल्क़ा-ए-अज़मत से निकल
क़ैद बन जाये मुहब्बत तो मुहब्बत से निकल
राह का ख़ार ही क्या गुल भी कुचलना है तुझे
उठ मेरी जान! मेरे साथ ही चलना है तुझे
------------------------------------

ते जनरलाइज्ड स्टेटमेन्ट आहे. स्वतःवर ओढवून घ्यायची काही आवश्यकता नाही.<<
मग माझ्याच वाक्यावर कशासाठी तो ताशेरा होता?
आणि मलाच काय कुठल्याच बाईला स्वैपाकात काय येतं, किती येतं याची उठाठेव टोणग्याने करू नये.
इथल्या कुणालाही तुम्हाला जेवायला बोलावण्यात इंटरेस्ट नाही.

>>लोक आपल्याकडे बघुनच कुजबुजतात अशी धारणा झालेल्या काही केसेस सायकॉलॉजीत असतात.<<
आणि आपलं बालपण कष्टाचं असं समजून बाकीच्यांचं आयुष्य सोप्पं आणि कर्तुत्व फालतू अशी धारणा झालेल्या केसेस पण रग्गड.

बाराव्याचं जेवण धोबीघाटावर घाला.. म्हणजे धोब्यालाही जेवण मिळेल.. Happy

________________________________________

(आमचेकडे सीतामैय्याच्या वल्कलांपासून खुशबूच्या रुमालापर्यंत सर्व काही धुवून मिळेल.. )

प्रोप्रा. धोधोमोहनप्यारे

दत्तक विधानासाठी १५ दिवस ते ४५ दिवस रजा मिळते. आणि स्त्री पुरुष दोघांनाही समान असते. दत्तक मुलाच्या वयावर ते अवलंबून असते>>> ह्म्म Happy जाईजुई, हे कायद्यात लिहिलेल आहे का? माहिती असल्यास द्यावी जाणकारांनी सांगाव.

पितृत्वासाठीच्या सुट्टीबाबतही सांगाव.

मला असे वाटते कि जेव्हा हा बीबी सुरु झाला तेव्हा विषय जरा वेगळे होते मला त्या बद्दल सगळ्यांना एक विचारावेसे वाटते -

जोडवी, मं.सु., कुंकु इ. न आवडणे, न घालणे ठिक आहे, ज्याचि त्यचि आवड पण जेव्हा हे विचार आपण ठळक पणे मांडतो तेव्हा कोणि असा पण विचार करते का कि - रोज नाहि पन सणासुदिला हि so called बंधने आपण झुगारुन देतो तेव्हा आपण कधी आपली संस्क्रुती टीकवण्यासाठि काय हात भार लावु पाहातो आहे. जि नविन पिढि आहे त्यांच्या समोर काय आद्र्यश ठेवतो आहे..जरा निट विचार केले तर असे जाणवते कि आपणच जर का हा विचार केला नाहि तर कोण करनार आणि एकिकडे आपण western culture आले आहे म्हणुन ओरडतो आणि एकिकडे आपण तेच का शिकवायचे. वर नमुद केलेल्या गोष्टि (जो,मं.सु., कुंकु इ.) हे फक्त त्याचा चेहरा आहे मला मान्य आहे या गोष्टिंनि तसा फरक किंवा संस्कार होत नाहित पण आज जे काही आपण आहोत त्यात ह्या गोष्टि पण आहेत ना....हळुहळु करत जर का सगळेच झुगारुन दिले तर मग भारतिय संस्क्रुती कुठे जाणार?
पण हे सगळे लिहितांना मला असे अजिबात म्हणायचे नाहि आहे कि तुम्हि काहि जाचक रुढि चालु ठेवा.. ज्या अति त्रासदायक आहेत त्या बंद व्हायलाच पाहिजेत्(हुन्डा, सति, बालविवाह इ.)
मी स्वत: इथे जोडवी, मं.सु., कुंकु इ. काहि घालत नाहि पण सहज विचार आला म्हणुन मांडला..असे वाटले कि इथेच याचि पण चच्र्या व्हावी...

वरिल सगळे विचार माझे आहेत्..आणि ते कोणि मनाला लावुन घेउ नये...पटले नाहि तर सोडुन द्या ..झाले... ( हो...इतके पोस्ट वाचल्यावर हे लिहिणे हवेच्...शेवटि मा.बो. वर पहिल्यांदिच पोस्ट लिहिते आहे हो...:) ....उगिच माझेच आता target नको ...)

>> हळुहळु करत जर का सगळेच झुगारुन दिले तर मग भारतिय संस्क्रुती कुठे जाणार? << दिखाऊ गोष्टींनी संस्कृतीरक्षण होते, हा समजच मूळात बदलायला हवा. आपण आपल्या संस्कृतीशी मनापासून किती प्रामाणिक आहोत ते तपासून पहायला हवे, एकदा त्याचे उत्तर मिळाले की जोडव्या, मंसू यांची गरज ही पडणार नाही.. अगदी नावापुरती सुद्धा...

>>>>> दिखाऊ गोष्टींनी संस्कृतीरक्षण होते, हा समजच मूळात बदलायला हवा.<<<<<

जे अस्त्/आहे ते केवळ "दिखाऊ" वा "सक्ती" म्हणूनच आहे, हा गैरसमज आधी बदलायला हवाय! Happy

माणसाने वस्त्रे (वा वल्कले) ल्यायला सुरुवात केल्यावर ती लज्जारक्षणाकरता वा नग्नता टाळण्यासाठी होती की थन्डीवार्‍यापासून सन्रक्षणाकरता होती की "व्यक्तिमत्व" (आयडेन्टीटी) प्रदर्शित करायला होती?
देहसन्रक्षण ते लज्जारक्षण ते व्यक्तिमत्वप्रदर्शित करणे हा प्रवास वेगवेगळा झाला की एकातुन दुसरा निर्माण झाला? अन हेच होत असताना, त्याचेबरोबरच अन्य "लक्षणे" व्यक्तिमत्वाचे निदर्शक म्हणून स्थानिक परिस्थिती/अक्कलेनुरुप घालण्याची प्रथा पडत गेली असेल तर त्यात गैर काय?

दिखाऊ (अन सक्तीचे म्हणून) बाकी सर्वच जाचक वाटत असेल, तर तसे तात्विकदृष्ट्या पहाता वस्त्रान्ची देखिल सक्तीच नाही का? मग वीतभर चिन्धोटी लावा वा हातभर कपडा गुन्डाळा, ती सक्तीच! अन ती सक्ति जर चालते असे गृहित धरले (का चालते असे विचारत नाही) तर अन्य "सक्त्या" का चालायला नकोत?

हिन्दुस्थानात हिन्दू महिलेने लग्न झाले याचे निदर्शक जोडवी/मन्गळसुत्र/कुन्कू न लावणे हे एका अर्थी, (ड्युप्लिकेत आयड्ञान्प्रमाणे) लग्न झाल्याची ओळख जाणून बुजुन झाकुन ठेवण्यासारखे नाही का? का झाकुन ठेवावेसे वाटते?

बघा बोवा, मला तरी विचार करता, वरील प्रश्न पडताहेत!
(वरील पोस्टद्वारे मी कुणालाच काही सल्ला/सुचना देऊ इच्छीत नाही तर केवळ माझ्यासमोरचे प्रश्न मान्डले आहेत, वैयक्तीक झोडपाझोडपी टाळून पूर्णतः बौधिक/तात्विक दृष्ट्या कुणाला भाष्य करायचे तर जरुर करा - तसेच "पुरुषान्ना" या सक्त्या अस्तात की नस्तात हा वाद आधी उकरु नका, पुरुषान्ना देखिल सक्त्या अस्तात, तुम्ही त्यान्ना त्या पाळणे भाग पाडू शकता, पण तुम्ही पण स्वैर् सक्ती न पाळता रहा, आम्हिही रहातो किन्वा तुम्ही पाळत नाही तर आम्ही का पाळू वगैरे बाबी खर पहाता तात्विकतेत बसत नाहीत, आतताईपणात नक्की बसतात, त्या टाळून निखळ चर्चा व्हावी अशी अपेक्षा! Proud )

>> हळुहळु करत जर का सगळेच झुगारुन दिले तर मग भारतिय संस्क्रुती कुठे जाणार? <<
मी मागे लिहिले होते तेच परत लिहिते. संस्कृती ही सतत बदलत आलीये , आणि हे बदल होत रहणारच.
हे अनिवार्य आहे. गेली ५००० वर्षे आपली भारतिय संस्कृती अनेक बदल पचवुन इथपर्यंत आली आहे.
नौवारी साडी, धोतर हे कालच्या महाराष्ट्रीयन संस्कृती चे प्रतिक होते ,पण आज ते नाही.
मंसु , कुन्कु आज आहे उद्या नसेल. इथेच झालेल्या चर्चेत निधप आणि अरुंधतीने पुरातन (मौर्यकालीन ई. ) संस्कृतीच्या वस्त्रांचे व आभुषणांची माहिती दिली होती. ती सुद्धा 'संस्कृती' होतीच ना. पण लयाला गेली.

परत हेच नमुद करावेसे वाटते की कालाप्रमाणे नियमात बदल होतात ,होणे अनिवार्य आहे. आणि एव्हढ्या छोट्या कारणांनी आपला धर्म आणि संस्कृती बुड्णार नाही.

<<जेव्हा हा बीबी सुरु झाला तेव्हा विषय जरा वेगळे होत<<>>
आणि एक स्पष्टीकरण : हा बीबी फक्त मंसु व कुन्कु या बाबींसाठी उघडला नव्हता. या बाबी फक्त माझ्या अनुभवातल्या असल्याने मांड्ल्या होत्या. याशिवाय ईतर अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यांच्यावर पण चर्चा व्हावी असाच उद्देश होता.

"हिन्दुस्थानात हिन्दू महिलेने लग्न झाले याचे निदर्शक जोडवी/मन्गळसुत्र/कुन्कू न लावणे हे एका अर्थी, (ड्युप्लिकेत आयड्ञान्प्रमाणे) लग्न झाल्याची ओळख जाणून बुजुन झाकुन ठेवण्यासारखे नाही का? का झाकुन ठेवावेसे वाटते? "
असे भारताला अट्टाहासाने हिंदुस्थान म्हणणारेच म्हणतील.
पुरुषांना लग्न झाल्याचे कोणते चिन्ह घालावे लागते?
स्त्री ही कुमारिका आहे, विवाहिता आहे की विधवा आहे, हे कळल्याने तुमच्या तिच्याबरोबरच्या व्यवहारात फरक पडतो का?(हो असेल तर बोलायलाच नको) अगदी व्यावसायिक, आर्थिक, सामजिक व्यवहारात? आणि पुरुष अविवाहित, विवाहित, विधुर आहे हे त्याला अनाउंस का करावे लागत नाही?

परत हेच नमुद करावेसे वाटते की कालाप्रमाणे नियमात बदल होतात ,होणे अनिवार्य आहे. आणि एव्हढ्या छोट्या कारणांनी आपला धर्म आणि संस्कृती बुड्णार नाही >>> जर का सण पाळणार नाहि, कुठल्याच गोष्टिं बद्दल चा विधिनिषेध झुगारुन देणार त्याला बंधन/जाच म्हणुन .... मग आपले असे अगदि भारतीय असे काय राहणार.... वरुन अजुन आपण च (म्हणजे मी पण आहे त्यात) नविन बीबी चालु करुन ओरडणार कि काय हे हल्लिच्या T.V मुळे मुलांवर काय काय परिणाम होता आहेत, कसे होणार? किंवा हल्लि मराठिपण लोपत जाते आहे.. या बीबी वर मंसु व कुन्कु नको, अजुन दुसर्या बीबी सा.बा आणि सा.बु नकोत अजुन वेगळ्या ठिकाणी वेगळे..थेंबे थेंबे तळे साचे हेच खरे...फक्त एव्हढ्या छोट्या कारणांनी आपला धर्म आणि संस्कृती बुड्णार नाही हे खरे पण हे सगळे साचत इथे काहि years मध्ये इंग्रज परत येणार हे नक्कि पण या वेळेला आपल्या रुपातच असतिल ते... काय?

काहि गोष्टी फक्त जाच जाच म्हणुन न करणे पटत नाहि... शेवटि उद्या कोणी परदेशी युवती थोडिच इथे भारतीय संस्कृती यावर भाष्य करणार आहे... आपण च पुढे नेणार ना?

म्हणुन तुम्हि २४ तास साडी नेसुन, नटुन थटुन, नथि आणि सगळे दागिने घालुन बसा किंवा ४ दिवस बाजुला बसा असे माझे म्हणणे नाहि आहे...पण जाच/बंधने म्हणुन त्याचा एवढा स्तोम माजवणे मला तरि उचित वाटत नाही....काहि गोष्टींची grace असते..कळत नकळत मुलांवर संस्कार होत असतात..

हिन्दुस्थानात हिन्दू महिलेने लग्न झाले याचे निदर्शक जोडवी/मन्गळसुत्र/कुन्कू न लावणे हे एका अर्थी, (ड्युप्लिकेत आयड्ञान्प्रमाणे) लग्न झाल्याची ओळख जाणून बुजुन झाकुन ठेवण्यासारखे नाही का? का झाकुन ठेवावेसे वाटते? <<
हे वाक्य स्वतःचं नाव आणि व्यवसाय प्रोफाइलमधे उघड करण्यासाठी नकार देत वितंडवाद घालणार्‍याने म्हणावं यात इतका मोठा विनोद आहे की बस्स..

बाकी संस्कृती किंवा भारतीय असणं किंवा मराठीपण = मंसू, कुंकू, सणवार, व्रतवैकल्ये, एक प्रकारची ग्रेस (म्हणजे काय कुणास ठाउक?) इत्यादी हा पण मोठा विनोद आहे.

मंसू न घालणे आणि कुंकू न लावणे याला विधिनिषेध झुगारणे म्हणणे आणि मंसू घालत नाही तर एकाच पुरूषाबरोबर लग्न का करता हे विचारणे यात फारसा फरक नाही दिसत मला.

बाकी पालथे घडे वाजतात मात्र उत्तम!

>>पटले तर घ्या माझी मते नाहितर दिवे घ्या....<<
ह्म्म्म म्हणजे नाही पटले तर तसं लिहू नका गप्प बसा....

हो...इतके पोस्ट वाचल्यावर हे लिहिणे हवेच्...शेवटि मा.बो. वर पहिल्यांदिच पोस्ट लिहिते आहे हो... ....उगिच माझेच आता target नको ...)>>> म्हणजे या आयडीने लिहिलेले हे पहिलेच पोस्ट आहे आणि टारगेट होणार याची पूर्ण कल्पना आहे तर!!!!! Proud

काहीतरी प्रचंड अशुद्ध लिहिल्याने आपण पहिल्यादा पोस्ट टाकतोय असा लोकाचा विश्वास होइल असं प्रत्येक नविन "डुआय" ला का वाटते कोणास ठाऊक???

बंगलोरमधे श्रीराम सेनेने पबमधे जाणार्‍या तरुणींना बदडले..दारू पिणे हे फक्त स्रियांसाठीच का वाईट. म्हणजे पुरुषांनी दुष्कृत्ये करावीत आणि स्त्रियांनी व्रतवैकल्ये करून ती पापे धुवावीत का?
केरळ मधल्या एका देवळात १५-४५ या वयातल्या स्त्रियांना (३६५ दिवस) मज्जाव असताना एक स्त्री गाभार्‍यापर्यंत पोचली होती तेव्हा इंग्रजी वृत्त वाहिन्यांवर बरेच मंथन झाले होते. एका तरुणाने (नाव आठवत नाही)त्यात परंपरावाद्यांची भूमिका मांडली होती. त्या देवाचेही ब्रम्हचर्य धोक्यात आले का स्त्रीमुळे. त्याने असेही म्हटले की सती फक्त स्त्रियानीच जावे असे नाही. पुरुष का नाही सती जात? की पहिल्या बायकोची चिता थंड होण्याआधी दुसर्‍या बायकोबरोबर अग्निभोवती फेरे घेतो?
ज्या ज्या गोष्टी स्त्रीला तू स्त्री आहेस, एक व्यक्ती नव्हे ही जाणीव करून देतात त्यांचा विचार व्हायला हवा.
कितीक घरात अजूनही वयाने लहान नणंदेला आदरार्थी हाक मारतात्...मुलांची आत्या म्हणून एके ठिकाणी वहिन्याही तिला आत्या म्हणतात. अविवाहित नणंदेचे आधुनिक पोशाख चालतात, वहिनीचे नाही. तरी महाराष्ट्रात बरीच बरी परिस्थिती आहे. उत्तर भारतात बघायला नको (म्हणजे हवे).मी इंदूरला ५ वर्षे होतो. तिथे पाहिले- डोईवर पदर्..इ.इ.

"हळुहळु करत जर का सगळेच झुगारुन दिले तर मग भारतिय संस्क्रुती कुठे जाणार?"" संस्कृती लोकांमुळे घडते..लोकांसाठी असते..लोक तिच्यासाठी नसतात. आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी त्यांना कायम तसेच ठेवायचे का?

>>पटले तर घ्या माझी मते नाहितर दिवे घ्या....<<
ह्म्म्म म्हणजे नाही पटले तर तसं लिहू नका गप्प बसा....

>>> मला माझी मतं लिहिण्याचे पुर्ण स्वातंत्र आहे...मला सगळे पटले आहे आणि म्हणुनच लिहिले आहे बर का नी ताई ...म्हणुन तुम्ही पटले तर घ्या माझी मते नाहितर दिवे घ्या(म्हणजेच उगिच काहितरी आपले पहिजेच म्हणुन लिहित न बसता लिहू नका गप्प बसा.......[काय हल्लि कळत पण नाहि..])

बाकी पालथे घडे वाजतात मात्र उत्तम! >>> तुम्हाला कोणि सांगितले की तुमचा घडा उपडा आहे म्हणुन्...का आपले आपणच ठरवले... (हे बाकि बरे.. स्वतः ठरवायचे... साक्षी लक्षात ठेव बर का...आपले आपण स्तुति करुन घायची आता...)

मला माझी मतं लिहिण्याचे पुर्ण स्वातंत्र आहे...मला सगळे पटले आहे आणि म्हणुनच लिहिले आहे <<
ओ बाई मला पण स्वातंत्र्य आहे. आणि मी पण पटले म्हणून लिहिले आहे. तुम्ही लिहीता ते पटले म्हणून आणि आम्ही विरोधात मत असेल तर उगाच काहीतरी का?

स्वतःच्या मूळ आयडीनी या मग बोलू तोवर अनुल्लेख तुमचा आता..

हो...इतके पोस्ट वाचल्यावर हे लिहिणे हवेच्...शेवटि मा.बो. वर पहिल्यांदिच पोस्ट लिहिते आहे हो... ....उगिच माझेच आता target नको ...)>>> म्हणजे या आयडीने लिहिलेले हे पहिलेच पोस्ट आहे आणि टारगेट होणार याची पूर्ण कल्पना आहे तर!!!!! >>>>
काय करणार fair चर्चा राहते बाजुला आणि जे वर झाले ते होते म्हणुन पोस्ट टाकत नव्हते पण...झालेच शेवटी... कधी कधी असे वाटते कि चर्चा म्हणजे भांडण नसते...तिथे जर का तुम्हाला समोरच्या मताला पण respect & value देणे जमले तर ती चर्चा नाहितर मग आपला आवाज वाढवुन बोलणार्यांचेच खरे होते असे नाही ... समोरचा शांत होतो पण त्याचा मुद्दा तर पुसल्या जात नाहि ना..

ओ बाई मला पण स्वातंत्र्य आहे. >>> नी ताई चीडता का?(खरे बोलले कि माणसांना राग येतो हे बरोबर..) .... माझे नाव साक्षी आहे.. ते नाव घ्या ना छान आहे कि "ओ बाई" पेक्षा...

स्वतःच्या मूळ आयडीनी या मग बोलू तोवर अनुल्लेख तुमचा आता.. >>> हा काय प्रकार आहे? हाच माझा मूळ आयडी आहे... ?????

ए बास की आता.. आता बोर व्हायला लागलंय. (नवीन पोस्ट पाहून वाचायला यायचा मोह काही जात नाही! Angry )
बरं ज्यांची त्यांची मतं तीच राहतायत, मग एकमेकांना पटवायला कशाला जायचं?? ज्याची त्याचि मतं म्हणून सोडून देऊया! तसंही हे काही एका चर्चेनी बदलणारं मत नाहीये. पीढ्यानपीढ्या चालतंच आहे.. जाऊदे !

विचार परीवर्तन व्हावे आणि स्त्रीची भुमिका उघड करणारा पैलू जगाला दिसावा याचा हा खटाटोप होता, जग असच सम़जून चालतं की बाई करतेय म्हणजे ते तिला आवडतेय्..दुसरीही बाजु असु शकते.
जाच हा केवळ शारीरिक नव्हे..तो एखाद्या मनाजोगतं काम न करायला मिळल्याचा त्रागा हि असु शकतो.

सणासुदीला किंवा लग्नकार्यात मं.सु. घालावे एवढी जाण इथल्या बहुतेक स्त्रियांना आहेच. त्यांनाही उगाच साडि वगैरे पेहराव न करून स्वतःचे हसे करायला आवडणार नाहि. पण याचा अर्थ असा होतो का की लग्न ठरवतानाही मुलिने साडीच नेसलि तर ती कुलवंत असेल?

संस्कृती टिकवल्यानी टिकते.पुढ्च्या पिढिला आचरण शिकवले पाहिजे, संस्कृती आपोआप घडत जाते योग्य संस्कारातून.

साक्षी,
तुमच्या मताप्रमाणे भारतीय संस्क्रुती टिकव्ण्यासाठी तरी बायकांनी कुन्कु, मंगळसुत्र, जोडवी घालावीत.
मग आपल्या पुरातन संस्क्रुती प्रमाणे चातुर्वर्ण्य व्यवस्था, बायकांनी घराच्या दाराबाहेर पाऊल न टाकणे, परदेशी न जाणे, स्री-शिक्षण बंद करणे इ.इ. ही पट्ते का तुम्हाला? आणि जर हे पट्त नसतील, तर मग केवळ कुन्कू, मंसु इ. ने च भारतीय संस्क्रुती चे रक्षण होणार आहे का?

मी कुन्कू, मंसु कधी घालते, कधी नाही. जोडवी तर अजिबात नाही ( मला तरी पोशाखाप्रमाणे बदल कराय्ला आवड्ते.. ऑफिस ला फोर्मल्स, बाहेर casuals, सणासुदीला साडी/सल्वार आणि प्रत्येकावर अनुरुप accessories) !!
पण मी घरी येणार्या प्रत्येकाला चहा-पाणी विचारते, मोठ्यांना नमस्कार करते. अगदी कामवाल्या बाया, ड्रायवर, माळी इ. ना सुद्धा आदरानेच वागवते ( जसे वयाने मोठ्यांना एकेरी न संबोधणे, त्यांना मुद्दाम दुसर्या कपात चहा न देणे इ.). माझ्या घरी सगळे सण उत्साहात साजरे होतात, नवर्याचे तेलुगु, माझे मराठी (आणि इतरही जसे friendship day/valentine's day :)).. मग केवळ मी कुन्कू, मंसु जोडवी घालत नाही म्हणुन भारतीय संस्क्रुती टिकवत नाहीये, असं तर नाही ना? माझ्या सासरी (तेलुगु) लोकांकडे तर मंसु ची प्रथाच नाही, मग आंध्रा चे लोक काय लगेच western culture फॉलो करणारे झाले का?

मुल्य ही अबाधित असतात, त्याची प्रतिकं काळानुसार बदलतात आणि ती व्यक्ती-स्थळ्-काळ सापेक्ष असतात. तुम्ही प्रतिकांनाच मुल्य (principles) समजण्याची चुक करत आहात. तेव्हा एकदा पुनर्विचार करावा.

तुम्ही प्रतिकांनाच मुल्य (principles) समजण्याची चुक करत आहात. तेव्हा एकदा पुनर्विचार करावा. >>>> टाळ्या! Happy

एक साधा व्यावहारिक विचार : आज स्त्री बाहेर नोकरी/व्यवसायानिमित्ताने किंवा अन्य कारणाने कामाला जाते. वाहतूक, वर्दळ, गर्दी, प्रदूषण, हातातली ओझी इत्यादी इत्यादी सांभाळत, त्यातून मार्ग काढत तिला तिची कामे लवकरात लवकर उरकायची असतात आणि कमीत कमी गैरसोय होईल अशा पध्दतीने सुरक्षितपणे आपल्या घरी पोचायचे असते. अशा वेळी ती कपाळाला टिकली आहे ना, हातात-कानात आहे ना पाहणार की धडेपणाने घरी पोहोचण्याला प्राधान्य देणार? त्या गोष्टी सांभाळायच्या, आणि तेही जर मनाविरुध्द, तर मग तिच्या ''स्ट्रेस लेव्हल'' मध्ये वाढ होणारच! हां, जर त्या स्त्रीला त्या गोष्टी आपल्या सौंदर्याचाच एक भाग वाटत असतील तर गोष्ट वेगळी!!

नोकरी/ व्यवसाय करणार्‍या स्त्रियांना तर ''युनिसेक्स'' वातावरणात आपली तडफ दाखवून द्यायची असते. जेवढे तुम्ही वेषभूषा इत्यादींमध्ये ''सॉफिस्टिकेटेड'' [ हलके-फुलके रंग, पाश्चात्य धाटणीचा पेहराव, मेक-अप, आभूषणे, केशरचना इ.इ.] राहता तेवढा तुमचा शहरी वातावरणात टीआरपी जास्त! बाह्य आवरणाला इथेही तेवढेच महत्त्व!;-) पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव होतच राहणार हे गृहीतक आहे. त्यातून जगली, वाचली, उरली तर ती आपली संस्कृती! ती जपायला खूप आटापिटा करावा लागत असेल, नगारे बडवावे लागत असतील तर त्यात काय अर्थ? वडीलधार्‍या लोकांना नमस्कार करावा, घरी आल्यावर हात-पाय धुवावेत, सायंकाळी देवापुढे दिवा लावावा, घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करावे इ.इ. गोष्टी जर मारून-मुटकून होणार असतील, मनाविरुध्द होत असतील तर त्यात काय अर्थ?

ज्या ज्या स्त्रिया आपल्या प्रथा परंपरा मानतात/पाळतात किंवा आवडीने अंगीकारतात त्यांना शहरी वातावरणात, गर्दीत, उकाड्यात, धावपळीतही आपल्या अस्सल भारतीय वेष-केशभूषेत व व्यवहारात [हस्तांदोलन न करता नमस्कार इ.] काही वावगे वाटत नाही. किंवा वावगे वाटले तरी त्या तो 'वेगळेपणा' आवडीने पत्करतात. मला ह्या बाबतीत गायिका उषा उत्थप व आशा भोसले ह्या गोघींचे अतिशय कौतुक वाटते. भारदस्त, बिनधास्त, प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि आपल्या भारतीय वेषभूषेतही काय तो नखरा, ऐट, बेमालूम सौंदर्य! [अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे! ;-)]

परंतु ज्यांना ही ''बंधने'' वाटतात, त्यांना साहजिकच त्यांचा त्रास होणार!!

आपल्याकडे किती स्त्रिया अशा आहेत ज्या अशा मनाविरुध्दच्या बंधनांनाही ''संस्कृती'' म्हणून जीवापाड जपत राहतात. तोंडे वाकडी करत खालमानेने, धुसफुसत, त्याचा राग-राग करत व तो राग अनाठायी इतर गोष्टींवर काढत राहतात!!!! त्यापेक्षा स्त्रियांनो, जशाही कशा वावराल, मनमोकळेपणाने, खुलेपणाने, दिलखुलासपणे वावरा व पुरुषांनो, त्यांना असे वावरता यावे ह्यासाठी जमली तर मदत करा, त्यांचे पाय संस्कृतीच्या नावाखाली खेचू नका ! शेवटी हा आता ज्याच्या त्याच्या मनाचा मामला आहे!! Happy

Pages