पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईत अलिकडे खुप वेगवेगळ्या स्वादाचे खाकरे मिळतात. पावभाजी, पुदिना असे अनेक प्रकार असतात. ते मसाले वापरुन ती चव आणता येते. पण तयार खाकरे मलातरी फार तेलकट वाटतात. मंद आचेवर दाब देत भाजल्यास तेलाची गरज वाटणार नाही.
बाकि पिठ आपण चपातीला भिजवतो तसेच.
थाई पाककृति मी लिहिल्या होत्या.

गेल्या २-३ वेळा गव्हाची खीर नासली. मी देसी दुकानात लहान गुळाची ढेली मिळते, तो गुळ वापरते. माझी पध्दत अशी- तुटके गहु कूकरमधे शिजवुन घेते. थोडे केशर घालुन दुध उकळुन घेते. गरम असतानच त्यात हे गहु, थोडा-फार सुकामेवा (बेदाणे/बदाम/काजु) घालते. थोडावेळ शिजले की मग फ्रोझन नारळ १ मिन. मायक्रोव्हेव मधे गरम करुन घालते. ते थोडावेळ शिजले की मग गुळ. नारळ आणि गुळ घातल्यावर कधीतरी दुध फाटायला सुरुवात होते. आधी कधीच असे झाले नाही. कशाने होत असेल ?

मला असा अजुन अनुभव आला नाही....
मी तर दलिया, दुध, गुळ आणि थोडे पाणी घालुन कुकरमधे शिजवुन घेते, मग एका भांड्यात तुप गरम करुन त्यात हे शिजलेले मिश्रण, कोरडे बारीक खोबरे, खसखस, थोडे दुध घालुन उकळी आणते आणि शेवटी सुकामेवा आणि वेलदोडा पुड...३-४ दिवस फ्रिजमधे मस्त रहाते.

अगं बाई मला पण नव्हता आला कधी. गेल्या २-३ वेळाच असे झाले आहे Happy मला गव्हाच्या खीरीत सुके खोबरे आवडत नाही Sad पण गहु, गुळ एकत्र शिजवुन बघते.

सिंड्रेला, गुळ (थोड्या) पाण्यात भिजवुन ते पाणी गाळुन खिरीत वापरुन बघ. खीर नासणार नाही.
नारळाने फाटत नसावी असा माझा अंदाज आहे. नारळ आंबट लागतोय का ते पण बघ.

-प्रिन्सेस...

काल मी गुळपापडीचा भुगा केला..... काल पहिल्यांदाच वड्या बिघडल्या.... चवीला छान झाल्यात पण एकदम खुसखुशीत. आता या चुर्‍याचे काही करता येइल का? तसा नुसता खायला पण चांगला लागतोय पण लेकीला वाटीत दिला तर घरभर सांडुन ठेवेल.

लाजो, हा चुरा दुधात घाल, चवीला साखर घाल, मंद गॅसवर ठेवून सतत ढवळ आणि उकळवून दाटसर कर, खीर म्हणून लेकीला खायला दे....
नाहीतर थोडा डींक तळून चुरा कर, थोडी कणिक कोरडीच खमंग भाजून घे, मग डिंकाचा चुरा आणि ही भाजलेली कणिक त्या गूळपापडीच्या चुर्‍यात मिसळ, आणि वरून गूळाचा पाक करून घाल, मिश्रण गार झाल्यावर मग त्याचे लाडू वळ नाहीतर वड्या थाप.
ह्यातील जे तुला विनाखटपटीचे, सोपे वाटेल ते कर. Happy
.
सिंड्रेला, माझा पण असाच अनुभव... दूधात गूळ घालून उकळलं की दूध नासतं.. Sad

गूळात जी रसायने वापरतात त्याने खूपदा दूध फाटते. गूळाबरोबर सहसा नारळाचे दूध वापरावे. त्यापैकी पातळ दूध शिजवण्यासाठी वापरावे आणि घट्ट दूध अगदी शेवटी घालावे व न उकळता पदार्थ गरम करावा.

गूळात जी रसायने वापरतात त्याने खूपदा दूध फाटते. गूळाबरोबर सहसा नारळाचे दूध वापरावे. त्यापैकी पातळ दूध शिजवण्यासाठी वापरावे आणि घट्ट दूध अगदी शेवटी घालावे व न उकळता पदार्थ गरम करावा.

धन्स मंजू, खीरीची आयडीया चांगली आहे. लेकीला खीर आवडते. तीला त्यातल्या त्यात जमलेले तुकडे देतेय सध्या खायला. मटामट खात्येय..

वीकांतला मृ सो पा आणि मनुस्विनीने सांगितल्या प्रमाणे मॅ पो केले होते. चव चांगली आली होती पण बटाटे एकसारखे मॅश झाले नाहीत. जास्त केले तर चिकट होतात म्हणुन तसेच राहु दिले. का असे ? मी लहान लाल बटाटे pressure cooker मधे उकडुन घेतले होते.

इकडे तुरीची डाळ सहज मिळत नाही. एकदा मिळाली म्हणुन एकदम चार किलो आणली. पण ती शिजतच नाही. सगळे उपाय करुन झाले. अशी पाकक्रुती सांगाल का ज्यात डाळ शिजवावी लागणार नाही? धन्यवाद.

कुकर लावायच्या आधी डाळ पाण्यात २/३ तास भिजवून पाहिलीस?
चिमुटभर सोडा शिजताना टाकू शकतेस..

जर हे लेह मधे असेल तर कदाचित हाय आल्टीट्यूड चा पण प्रॉब्लेम असेल डाळ शिजण्यात. इथे मिळणार्‍या केक मिक्स च्या पाकिटांवर व इतर रेडी टू कूक पाकिटांवर नेहेमी हाय आल्टीट्युड करता वेगळ्या सूचना असतात.
कदाचित पाणी अन शिजवण्याचा वेळ दोन्ही जास्त लागणार. आसपासच्या अनुभवी लोकांना विचारल्यास जास्त माहिती मिळेल.

प्राची, डाळ भिजवून वाटून दोसे करता येतील किंवा भिजवलेल्या डाळीचे वाटून वडे करता येतील. डाळ भरडून मग शिजते का बघ.

शेवयांच्या खिरीसाठी कोणी माप सांगेल का? (वाट्यांच्या प्रमाणात) किती शेवयांना किती दूध, साखर वगैरे ..
जुन्या हितगुजवर खीरीची रेसिपी आहे पण माप दिलेलं दिसलं नाही कुठे
लवकर सांगा प्लीज...

sayuri ....
२-३ जणांसाठी
शेवया २ वाट्या
साखर १ वाटी
पाणी १/२ वाटी
दुध १ वाटी
तुप १/४ वाटी

प्रथम शेवया तुपात खरपुस भाजुन घ्या.... सोनेरी झाल्यावर त्यात दुध , साखर आणी पाणी घाला...वरुन काजु , बदाम , जायफळ, वेलदोडा, पिस्ता २-३ चमचे तुपात भाजुन घाला[ पाहीजे आसेल तर्...काहीनां आवडत नाही]...१/२ तासात खीर तयार

Anameera, इथे शोनु म्हणतात त्याप्रमाणे high altitude problem येतो. त्यामुळे मी डाळ आदल्या रात्रीच भिजवते. नाहीतर गरम पाण्यात भिजवते. कधी सोडा घालुन पाहिले नाही. आता बघेन. आर्च, डोसे करते मी. आता वडे करुन बघेन. तुम्हां सगळ्यांचे आभार.

सोडा घातला तर डाळी मधले सगले सत्व निघुन जातिल. त्यापेक्षा कोमत पाण्यात डाळ भिजवुन बघ. आणी शिजताना १ चमचा खायचे तेल टाकुन बघ.

सायुरी,

खीर दाट किंवा घट्ट होणं हे शेवयांच्या प्रकारावर अवलंबून असतं. तुझ्याकडच्या शेवया कश्या/कुठल्या आहेत ते माहित नाही, पण मी पुढिलप्रमाणे खीर करते.

दूध : दोन वाट्या
पाणी : अर्धी वाटी
साखर : ५-६ चहाचे चमचे (गोडाचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे ठरवावे)
शेवया : हाताने चुरलेल्या ३ चहाचे चमचे
केशर : १-२ काड्या
वेलची पावडर : चिमूटभर
सुका मेवा : आवडीप्रमाणे सगळा मिळून फार तर १ चहाचा चमचा
तूप : पाव चहाचा चमचा

एका जाड बुडाच्या भांड्यात चुरलेल्या शेवया घेऊन त्यावर तूप घालून मंद गॅसवर शेवया चांगल्या तांबूस लालसर होईपर्यंत भाजायच्या. त्या चांगल्या भाजल्या गेल्यावर पाणी घालून एक उकळी येऊ द्यावी. शेवया जरा शिजल्या असे वाटल्यावर दूध घालून साखर घालावी. अधून मधून ढवळत रहावे. साखर विरघळ्यावर सुका मेवा, केशर, वेलची घालावे. आवश्यक तेवढी खीर घट्ट झाली गॅस बंद करावा. कुठलीही खीर गार झाली की आळते.

नैवेद्याच्या पानासाठी करायची असेल तरच मी खीर घट्ट करते नाहीतर साधारण बासुंदीपेक्षा थोडी कमी दाट करते म्हणजे चमच्याने व्यवस्थित खाता येते.

piapeti, मंजू
धन्यवाद ग!
माझ्याकडे जरा जाडसर अशा ब्राऊन रंगाच्या शेवया आहेत.
(मला वाटतं त्या मला कोणीतरी भेट दिल्या आहेत..) कसल्या असतात त्या? खीर चांगली होईल ना त्यांची
कारण आतापर्यंत आपल्या नेहेमीच्या पांढर्‍या शेवयांचीच खीर किंवा उपमा खाल्लाय मी

अग त्या गव्हाच्या भाजलेल्या शेवया असतील. पाकीस्तानी brandच्या अश्या शेवया मी (चूकून) उचलल्या एकदा indian grocery . तर त्या जाड होत्या. त्या ज्यास्त भाजायची गरज नाही. हलकेच तूप टाकून परतायचे नी गरम उकळते दूधात फुलवायच्या.

सुप्रभात sayuri
त्या शेवया फोडणी करुन केल्या तरी छान होतात [maggi noodles] सारख्या!!!!!!

मला पण वाटलं एकदा की कदाचित गव्हाच्या असतील पण म्हटलं काय माहित...
खीर चांगली झाली (होती) Happy
पियापेटी, एकदा करुन बघीन मॅगीटाइप... मॅगीपेक्षा पौष्टीक पण होईल नाही का..
आधी परतायच्या का? तू कसं करतेस?

सयुरि,

मॅगिपेक्षा पौष्टिक मात्र होणार नाहित कारण शेवया करताना गव्हातिल कोंडा पुर्णपणे काढुन टाकला असतो ना.

मॅगिपेक्षा पौष्टिक आणी चवदार होईल!!!!!!!!!

मी त्या शेवया पहीले भाजुन घेते..
मग साध्या फोडणीत म्हणजे तेलात हळद , हिंग , मोहरी, जीरे, कांदा, टोंमॉटो ,मीठ , मसाला घालुन ....
मग कांदा निट भाजल्यावर....पाणी घालुन उकळवावे..
पहील्या उकळीला शेवया टाकाव्यात...वरुन कोथींबीर..

मी कधी कधी वटाणे, गाजर, [any फळ भाज्या चालतील] घालते.....
खुपच पौष्टिक .....आणी भाज्या पण पोटात जातात [काहींच्या न आवडीच्या सुद्धा!!!]

mala ganpatisathi bina kanda-lasunichi bhaji suchva

manuruchi अशाप्रकारच्या भरपुर भाज्या आहेत.....

कांदा ,लसुन सोडुन फक्त.... टोमॉटो फोडणीत घातलेले सुद्धा खुप चवदार असते....

बाकी मसाला म्हणशील तर जास्त खोबरे आणी १/२ मिरची घालुन वाटण कर...
[खोबरे, मिरची,कोथींबीर, आले, मसाला वेलची असे simple वाटण.... acidity न होणार आहे!!!!!!!!]
भाज्या...
=भेंडी --टोमॉटो फोडणी घालुन
=गवार-- वाफवलेली
=फरसबी--टोमॉटो फोडणी आणी ओलं खोबर घालुन
=दोडका--टोमॉटो फोडणी घालुन
=पाती ची भाजी
=मेथी ,शेपु, पालक्,अळु,लाल माठ
=बटाटा भाजी
=मोड आलेले कडधान्ये

१)मला पालक आणि बटाटा अशी सुकी भाजी कशी करायची कोणी सान्गू शकेल का?
२)फरसबी ची ओले खोबरे न घालता भाजी कशी करायची ?
३)गाजराची भाजी करता येते का? मी नेहेमी कोशिम्बीरच करते.

piapeti, जरा विस्तॄत्पणे सांगाल का या भाज्या? चांगल्या वाटत आहेत.

Pages