चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेशम्-दोर - उतारा म्हणुन लव स्टोरी २०५० पहा..........दोन निगेटिव मिळुन एक पॉसिटिव्ह होते ना???

______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

मग छानसा रीव्हु लिही अ. आणी अ. मधे Happy

नही sssssssssss
भगवान के लिये मुझे छोड दो.......
मुझपे ये जुल्म मात करो
२०५० तक जीना चाहति हु
लव स्टोरि नही सह पाउंगी..........
Sad

The Dark Knight एकदम मस्त..
Heath Ledger अफलातून..
शेवट थोडा कंटाळवाणा झालाय, पण पैसा वसूल..

Hancock.. अजिबात नाही आवडला..मेजर अ. आणि अ.! श्र किंवा फारेंडला किमान १० पानं लिहीता येतील त्यावर! फ्लॉप सुपरहिरो.. कसली मस्त आयडीआ होती खरं, पण वाया घालवली! पुढे काहीच्या काही आहे,... मी कधी नव्हे ते मधे चक्क डुलकी काढली! Sad

"मनी है तो हनी है"
|
अचाट आणि अतर्क्य पणाचा कळस....
|
काय वाट्टेल ते....
|
मनी असेल तर हनी बरोबर जा (सिनेमावर पैसे घालवू नका....) असा इशारा दिला आहे....

'Mission Istanbul': खर तर ह्या चित्रपटाचा plot चांगला आहे पण typical हिंदी चित्रपट करुन त्याची वाट लावलेली आहे. थोडक्यात अजुन एक टुकार चित्रपट.....

बचना ए हसीनो रिलीज झालाय का?
झाला असल्यास आणि कुणी पाहिला असल्यास सांगा ना त्याबद्दल काही..
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
क्या मौसम आया है क्या मौसम आया है
गीत गाए नदीया बूँदो मे है सरगम..!!

आशू,
'बचना ऐ हसीनों' पंधरा ऑगस्टच्या शुभमुहुर्तावर होतोय रिलीज.
या आठवड्यात 'अग्ली और पगली' रिलीज झाला. कुणी बघितला का? Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'माता' रिटर्न्स.

त्या 'अग्ली और पगली' या नावाला घाबरूनच बरेच लोक तो पाहणार नाहीत असं वाटतं..!
***
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
सुंदर साजिरा, श्रावण आला..!

ट्रॉपीक थंडर बघीतला.
चांगला वाटला. मुख्य म्हणजे सिनेमात वापरलेली कल्पना छान आहे. एका दिग्दर्शकाला व्हिएतनाम युद्धावर सिनेमा काढायचा असतो. तो एकदम वास्तव व्हावा म्हणुन तो सगळ्या कलाकरांना खरच व्हिएतनामच्या जंगलात सोडुन देतो आणि सांगतो की तुम्ही दिलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे काम करत रहा आम्ही सिक्रेट कॅमेर्‍याने चित्रण करणार आहोत. त्यानंतर जे काही घडते ते सिनेमातच बघायला हवे. ज्यांना बेन स्टीलरची ऍक्शन कॉमेडी बघायला आवडते त्यांनी बघायला हरकत नाही.

Remember Neo from Matrix. his passport in the movie expired on 9-11-2001

http://img141.imageshack.us/my.php?image=12665matrix22jpgnl8.jpg

It's listed on the Matrix's Trivia page on IMDB:
http://www.imdb.com/title/tt0133093/trivia

"Some personal information can be seen on Thomas Anderson's "criminal record" that Agent Smith glances at when he interrogates Neo: The place of his birth is CAPITAL CITY USA, his date of birth is the 13th of September 1971, the passport was issued on the 12th of September 1991 and will expire on the 11th of September 2001."

Pretty freaky coincidence, seeing that the film was released in 1999.

अगलि और पगलि बघितला (अर्थात थेटरात नव्हे Wink ) जरा स्टोरि वेगळि आहे पण काहि खास नाहि. हिरोचे काम छान केले आहे. मल्लिका काहितरिच लाउड वाटते. एकंदरीत बघू नका.

ए 'फूंक' बघून इथे रिपोर्ट टाका ना लवकर

बचना ए हसीनो बद्दल काहीच मते दिसत नाहीत, पाहिला का कोणी?

ईथल्या फूंक आणि कॉन्ट्रॅक्ट च्या चर्चेचे नवीन धागे बनवले आहेत. त्या २ तसेच ईतर चित्रपटांची चर्चा तुम्हाला या ग्रुपच्या स्वगृहामध्ये वाचायला मिळतील. http://www.maayboli.com/node/2205

तसेच जर नवीन चित्रपटाबद्दल लिहिणार असाल तर नवीन लेखनाचा धागा चालू करावा.

ईथल्या फूंक आणि कॉन्ट्रॅक्ट च्या चर्चेचे नवीन धागे बनवले आहेत. त्या २ तसेच ईतर चित्रपटांची चर्चा तुम्हाला या ग्रुपच्या स्वगृहामध्ये वाचायला मिळतील. http://www.maayboli.com/node/2205

ह्या लिंकवर काहीच सापडत नाही Sad

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

टोणगा
त्यासाठी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये सामील व्हावं लागेल.

मला तर वाटतं, भरत जाधव ला उगाचच डोक्यावर चढवून ठेवलंय.. असं काsssही विशेष करत नाही तो.. लक्ष्यानंतर आता कोण??? असं वाटत असतानाच त्याची मराठीत एंट्री झाली हे त्याचं सुदैव.. आणि आपलं.. !! प्रेक्षकांना जरा काही वेगळं आणि फालतू टाईमपास करणारं मिळालं की झाला लगेच उदो उदो सुरू. मग का नाही बरं श्वास मधल्या नलावडे, अश्विनला, किंवा डोंबिवली फास्ट वाल्या संदीप कुलकर्णीला अशी प्रसिध्दी मिळाली??? फालतू गोष्टी आयत्या मिळतात आणि गरजेच्या गोष्टी मिळवण्यासाठी घाम गाळावा लागतो तसंच आहे ना हे??
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नको दंड नको शिक्षा , शांत मंगलमय गणेशोत्सव हीच अपेक्षा!
Happy

ती केतकी थत्ते आहे होय??'
अँकी, ती महिला नाही, महामहिला दिसते. कळस माहितीये? तिची एंट्री म्हणजे- कॉलेजात मैदानावर शॉर्ट घालून कबड्डी खेळताना. आत्ता बोला. (आता यासाठी तरी सिनेमा बघणार की नाही?? :फिदी:)
झकासा, 'जत्रा' हा सिनेमा 'गलगले निघाले' पेक्षा दसपटीने बरा आहे..!!
आशू, भरत जाधव खरंच गुणी कलाकार आहे. पण मराठी कलाकारांच्या हातात 'आपण स्वतःला कोणाकडे सोपवायचं' हे नसतं हे दुर्दैव. शिवाय त्याचं ते सारखं 'दातांच्या शुभ्र कळ्या दाखवणं' अती झालंय.
तो केदार ही आत्ता पर्यंत चांगला होता. त्याला काय चावलं कुणास ठाऊक?

आईग, जत्रा गलगले पेक्षा बरा म्हणजे गलगले न बघणच शहाणपणाच ठरेल. Happy

सही रे सही मी पण पाहिलय आणि निदान त्या दिवशीच्या प्रयोगात भरत जाधव चा गलगले अप्रतीम होता.. खरे तर त्याचे पुर्ण कामच त्या प्रयोगाला इतके जमले की मी तरी त्याला साष्टांग नमस्कार (मनात) केला. तेव्हापासुन मला भरत जाधव बद्दल आदरच वाटतो.. (मी त्याचे जास्त सिनेमे,नाटके पाहीली नाहीयेत). अजून जास्त- त्या दिवशी सकाळी माझी वहिनी माझ्या ८ वर्षाच्या भाच्याला घेऊन एका दूकानात गेली जिथे भरत जाधव खरेदीला येणार होता असे कळले (भाच्याचा आवडता कलाकार आहे ना Happy ) आणि भरत जाधव त्या दोघांशी पण (कुठले कोण असे न समजता) खूप चांगले, नम्रपणे बोलला म्हणे. असो.

मला असे वाटते की भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे हे दोघे ही फालतु चित्रपटात (तेही भरमसाठ संख्येने) काम करून स्वत:ला कंटाळवाणे करून ठेवत आहेत. हिंदी मध्ये गोविंदाचे जसे झाले तसे या दोघांचे होइल असे वाटते. एके काळी चित्रपट चालतात म्हणून गोविंदाने एकामागून एक एकसाची चित्रपटात काम करायला सुरूवात केली. मला वाटते, आंखे हिट झाल्यानंतर.... काही वर्षात लोक त्याला कंटाळले.

भरत आणि मकरंद यांनी चित्रपट निवडतानी थोडे चूझी व्हावे, असे वाटते.

अमीशी एकदम सहमत.... मी तर आतापासुनच ते दोघे आणि सोबत सिद्धार्थ असला की टाळतेच...

गलगले पण पाहावासा वाटत नाही. 'पछाडलेला' पाहुन भरतकडुन खुप अपेक्षा वाटलेल्या, पण पुढे निराशा झाली. जत्रा, यांचा काही..., छे वाटच लागली सगळी. त्यातल्या त्यात 'माझा नवरा, तुझी बायको' बरा होता. भरतचं कामही खुप आवडलं त्यातलं. थोडं गंभीर वळणाचं होतं.

पण बाकी सगळा आनंदच आहे.. त्याने स्वतःच हे समजुन घ्यायला पाहिजे.

खरं तर भरतच्या सर्व सिनेमांपेक्षा 'सही रे सही' नाटक चांगलं आहे. मराठी कलाकारांना चॉईसला वाव नसतो तसा, पण भरत चॉईस करू शकतो. (कसाही का असेना, पण आघाडीच्या कलाकारांत असल्यामूळे). ते त्याने करायला हवं.
पण कर्तव्य म्हणून मी सगळे मराठी (भरतचेच असं नाही, तर सगळे. स्वामी माझे दैवत- वगैरे सोडून!) सिनेमे बघतोच. Sad

ही केतकी थत्ते कोण? कोणत्या सिरियल मध्ये होती का ती? नाव ऐकल्यासारखे वाटते आहे.

ही केतकी थत्ते कोण?>>>>>
वादळवाट मधली श्रावणी (पहिली)

केतकी सध्या 'मंथन' नावाच्या मालिकेत शुभांगी गोखले यांच्या मुलीचं काम करते..

Pages