वेनस्डे..
खूप सुंदर पिक्चर...
खुप दिवसानी एखाद्या संवादाला सीनला जोरात टाळ्य्मा माराव्याशा वाटल्या. जबरदस्त.
अनुपम आणि नसीरूद्दिन या दोन गुणी अभिनेत्याचा अभिनयासाठी पहावा!!!
'ए वेनस्डे' या चित्रपटाच्या चर्चा व प्रतिक्रियांसाठी नुकताच नवीन धागा सुरू केला आहे.. http://www.maayboli.com/node/3521
या चित्रपटावरील वरच्या काही प्रतिक्रिया नवी धाग्यावर हलवाव्यात ही विनंती.
पूर्ण थिएटरमधे मी आणि अजून बारा लोकानी बसून "रूबरू" पाहिला. माझ्या बंगाली रूममेटने त्यातली हीरॉईन बंगालि असल्यामुळे "खूप चांगला" पिक्चर आहे असं सांगितलं.
खूप चांगला पिक्चर आहे!!!!
इंटर्व्हल्च्या आधी पिच्खरमधे काहीच होत नाही. इंटरव्हलच्या नंतर जे आधी झालय तेच परत होत राहतं.
सुरुवातीला एक गाणं चालू असतं. नंतर हिरो आणि हीरॉइन भेटतात. मग दोन वर्षानी हिरॉइन जॉगिंग करून घरी येते. मग ती हीरोला उठवते. मग तो दाढी करतो. ती पियानोवर गाणं वाजवते. मग ते कॉफी पितात. मग हिरॉइनचा हात भाजतो. मग ते थोडा वाद घालतात. मग हीरॉइन होरोच्या अंगावर ज्युस सांडते. मग त्याल हवे ते कफलिंक्स मिळत नाहीत. त्याचं "इंपोर्टंट प्रेझेंटेशन" असतं. तो क्लायनंट मिळाल्यावर मग ते दोघं लग्न करणार असतात!!!!
मग दोघं अजून थोडा वाद घालतात. मग ते दोघं ऑफिसला निघतात. मग ते कारमधे वाद घालतात (नक्की कशासाठी हे समजलं नाही म्हणुन लिहिलेलं नाही)
मग हिरॉइन फुलं विकत घेते. मग तो त्याची ऍनिव्हर्सरी विसरलेला असतो(लग्न नाही ना झालं. *&^%$#)
मग ते परत वाद घालतात! मग हिरॉइइनचा त्या दिवशी रोमिओ जयुलिएटचा शो असतो. ते पण हिरो विसरतो. मग ते परत वाद घालतात (कॉपी पेस्ट चालू)
मग तो ऑफिसमधे जातो बहुतेक तो जाहिराती मधे असावा कारण पीच वगैरे शब्द तो बोलतो. मग तो प्रेझेटेशन चालू करतो. मग हिऱोइन मीटिंङ रूममधे येते. तिला वाटतं तो महत्वाचे पेपर विसरलाय. प्रत्यक्षात ते पेपर महत्वाचे नसतात. मग ती नको तितकं बडबडते. क्लायंट नाखुश होतो. (गोरे लोक, मॅनर्स वगैरेला नको तितकं महत्व!! भावना महत्वाच्या असतात् हे लक्षात घेतच नाहीत)
मग ते दोघं फोनवर वाद घालतात. मग तो तिचा शो बघायला जातो. तिथे त्याला एक टॅक्सी ड्रायव्हर भेटतो. तो पंजाबी ऍक्सेंटमधे हिरोला बरंच काही समजावतो. प्रेम कुटुंब यावर एक लेक्चर देतो. मग तो टॅक्सी थांबवतो आणि हिरोला फूल घ्याय्ला सांगतो.
मग तो नाटकाला जातो. मग ती तिचे चांगली ऍक्टिंग करते (आयला!!!!)
मग तो तिला घेऊन डिनरला जातो. मग ते तिथं परत वाद घालतात. मग त्याचा क्लायंट तिथे येतात. मग ती चिडून निघते. तो मघाचा टॅक्सीवाला परत येतो (माझी बंगाली रूममेट जोरत अबे यार फिरसे नही" असं ओरडली. )
मग ती टॅक्सीत बसून जाते. आपघात होतो. आणि हिरॉइइन मरते.
दुसर्या दिवशी सकाळी हिरो उठतो.. आणि हिऱोइन त्याच्या बाजूला असते.
इंटरव्हल!!!!!!
आणि मग आपल्याला समजतं की या आधी जे काई झालं ते हिरोच्या स्वप्नात होत होतं. !!!!!!! परत तो दिवस सुरु होतो!!! नही SSSSSSSSSSSSSS
यातला एक एक सीन अचाट वाल्याना आमंत्रण आहे. फुकटात टीव्हीवर बघायला मिळाला तर बघा!!!
नंदिनी,सही लिहिलंस्.एका दमात वाचलं तुझं पोस्ट.
मग आपल्याला समजतं की या आधी जे काई झालं ते हिरोच्या स्वप्नात होत होतं.>> हे वाचुन तर मी 'आ' वासला.कठीण आहे.
Submitted by supriya19 on 16 September, 2008 - 11:13
सिंग इज किंग पाहिला. का????????? बरा आहे असे कोणेतरी सांगितले आणि देसीकडे बाकी नविन बघण्यासारखे काहीच नव्हते. अ आणि आ. ने ठासुन भरला आहे. ३-४ वेळा मी पहिल्या १५-२० मिनीटातच झोपलो. परवा शेवटी मनाची तयारी केली आणि पहिला एकदाचा.पैसे दिले होते ना!!! (पैसे देऊनही पुर्ण न पाहिलेले: सलामे ईश्क, होम डिलिव्हरी....)
त्याच रात्री AMC ह्या चॅनेलवर "Philadephia" होता. उतारा म्हणुन ३वा पर्यंत तो पाहिला आणि मग शांत झोपलो.
गेलेल्या वीकेन्ड ला 'नवरंग' आणि 'बाजार' असे अनुक्रमे शनीवार आणि रविवारी पाहीले. 'नवरंग' ची कथा खास नाही तरिही गाणी उच्च दर्जाची आहेत म्हणून मला खास उत्सुकता होती. नाहीतर संध्याचा थयथयाट कोण पाहील? 'शामल शामल बरन..' सारख्या कोमल गाण्यावर सुद्धा या बयेचा नाच. व्ही. शांताराम यांचे सिनेमे पाहीले की वाटतं की निव्वळ संध्याला तिच्या नाचाचे नैपुण्य(??) दाखवता यावं म्हणून की काय हे चित्रपट काढले आहेत. बाकी सिनेमा छान.
बाजार डिप्रेसिंग वाटला, स्मिता आणि नासिरूद्दीनचे काम उच्च. फारूख शेख आणि सुप्रिया पाठकने ही सुंदर काम केलेय.
Submitted by दक्षिणा on 17 September, 2008 - 00:45
द लास्ट लीअर... टिपिकल रितुपर्णो घोष. याचा क्लायमॅक्स मनमोहन देसाईची आठवण करून देतो.
१९२०.. हा बहुतेक हॉरर पिक्चर असावा.. फादर जेव्हा आरशामधे स्वतःला पहात होता तव्हा जराशी भिती वाटली. तेवढ्यात ती हीरॉइन घरभर बल्ले बल्ले केल्यासारखी धावत गेली. टाळ्या आणि शिट्या माझ्या तर्फे.
१९२० हॉरर सिनेमाच आहे. परवा सकाळला परिक्षण आलं होतं.
>>>
दक्षिणा माझं पोस्ट परत एकदा वाच. मी पिक्चर पाहून मग लिहिलय ते. परीक्षण वाचून नव्हे. तुला विनोदाचे वावडे वगैरे आहे का???
बाय द वे, फूंक आणि १९२० सारखे पिक्चर बघून घाबराणार्या लोकाची मला दया येते.
पुढील आठवड्यातला वेलकम टू सज्जनपूर मला बघायचा आहे. श्याम बेनेगल आणि आपला श्रेयस तळ्पदे आहे.
--------------
नंदिनी
--------------
नंदिनी (अभिनंदन) भन्नाट लिहीलय रूबरू बद्दल - नवीन बीबी का नाही उघडला, येथे उलटे जाऊन बघावे लागते. रूबरू च्या वर्णनाने पुलंच्या त्या एका "नाट्यानुभव" (तीन मिनीटांच्या नाटकाचा) ची आठवण झाली.
Submitted by फारएण्ड on 17 September, 2008 - 11:26
खरंतर "नवरंग" मधलं, किंवा शांतारामच्या बर्याचशा चित्रपटांमधलं संध्याचं नृत्य कोणत्या प्रकारात बसतं हे कळत नाही म्हणून बर्याच लोकांना वाटतं संध्याला नाचताच येत नाही.. पण लक्षात घ्या.. ही बाई गोपीकृष्णाकडे नृत्य शिकली आहे. तिचे भाव आणि ठेक्यावरील प्रभुत्व नि:संशय उत्तम आहे. तिच्या अंगी लवचिकता प्रचंड आहे. नृत्यदिग्दर्शक म्हणेल तशी अदाकारी ती पडद्यावर उतरवू शकते.
नवरंगमध्ये "तुम सैय्या गुलाबके फूल" मध्ये तिच्या चेहर्यावरचे भाव बघा.. आज नही माने तो मै जरा ना डरूंगी, जहर पिऊंगी घडी घडी ही मरूंगी म्हणतांनाचा लटका राग तिने माझ्यामते तरी उत्तम दाखवला आहे.
घोड्याबरोबर त्या काळात कुठल्या अभिनेत्रीने नृत्य केले असते? होळीच्या गाण्यात तिने पुरुष आणि स्त्री अशां दोन्ही भूमिकांमध्ये केलेलं नृत्य प्रसिद्धच आहे. तू छुपी है कहां मधला मेकअप पहिल्यांदा मलादेखील भयंकर वाटला होता.. पण जेव्हां दिग्दर्शकाच्या संकल्पनेचा विचार केला तेव्हा ती एक अनाकलनीय, अमूर्त अशी स्फूर्ति, उर्मी त्याला दाखवायची आहे आणि ती अशीच लोकांच्या सौंदर्याच्या व्याख्यांच्या पलिकडे असणारी हवी या भूमिकेतून तो आलेला आहे. (संध्याचा मेकअप नंतर तसाच राहीला ही गोष्ट अलहिदा)
तिचं नृत्यकौशल्य तिने झनक झनक सारख्या चित्रपटांमधून दाखवलंय.. पिंजरा मधली तिची नृत्य अतिशय सुरेख आहेत, एका गावातल्या लावणी नर्तिकेची जशी असायला हवीत तशी.. भडक संवाद, भडक अभिनय हा शांतारामच्या चित्रपटांत सर्वत्र आहेच. त्याचं दूषण संध्यालाच का?
माझ्या दृष्टीने तरी ती एक चांगली नर्तिका होती आणि त्याही पेक्षा ती तिच्या दिग्दर्शकाशी नेहमी प्रामाणिक राहणारी अभिनेत्री होती. आपले अभिनयगुण दाखवण्यापेक्षा दिग्दर्शक म्हणेल ती पूर्व दिशा मानून काम करणारी अभिनेत्री बहुतेक शांतारामला एकटयालाच मिळाली असावी. नाहीतर चित्रपटसृष्टीमध्ये "पिक्चर गेला चुलीत, माझे अवॉर्ड पक्के झाले पाहिजे" असा विचार करणार्यांची कमी नाही.. आणि मला वाटतं म्हणूनच त्याच्या प्रत्येक चित्रपटातली त्याची "muse" संध्याच राहिली..
संध्याची नृत्ये आणि त्यामागचा विचार समजावून घेण्यासाठी कृपया व्ही. शांताराम यांचे 'शांतारामा' हे आत्मचरित्र वाचा. शांताराम बापूंना फ्रेम रंगीबेरंगी करण्याचा सोस असेल, अनेक प्रतीकं ते वापरत असतील, पण हे सारं अस्थानी कधीच नव्हतं. त्यामागे त्यांचा निश्चित असा, त्यांना पटणारा विचार होता.
संध्याची नृत्येसुद्धा विशिष्ट हेतू मनात ठेवूनच चित्रित झाली होती. आणि या नृत्यांवर संध्याबाईंनी प्रचंड मेहनत घेतली होती.
त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झालेली असूनही अतिशय अवघड अशी नृत्ये त्यांनी केली आहेत.
Submitted by चिनूक्स on 17 September, 2008 - 22:47
संध्याच्या नृत्याला थयथयाट म्हणणे म्हणजे पहाणार्याचे डो़के अथवा डोळे त्यांच्या जागेवर नसण्याचे लक्षण आहे.
संध्याच्या नृत्यकौशल्याला वाव देण्यासाठी चित्रपट काढले गेले असतीलही पण त्यामुळे नृय्त्याची गुणवत्ता कमी कशी होते बुवा? हो, ही नृत्ये अस्थानी असू शकतील. स्टोरीशी असंबद्ध असू शकतील म्हणून तो थयथयाट कसा होतो? (संध्याबाईचं मान वेळावणं जरा अतिच असे ही बाब खरी.)त्यांचा अभिनयही कृत्रिम असे.
आता ' ही बया' हा उल्लेख अनुदार आणि अन्यायकारक नाही का? कुठल्या गाण्यावर नाचावे अगर नये हे स्वातंत्र्य नटीचे असते काय? पडद्यावर नट जे काही करतो त्याबाद्दल त्याला (सुमार अभिनय वगळता) दोषी धरणे म्हणजे चित्रपट पहाण्याची फारच बाळबोध अवस्था झाली.
'क्ष' यांच्या पोस्ट्सशी सहमत....
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
Submitted by अजय अभय अहमदनगरकर on 17 September, 2008 - 23:17
माझी रूममेट आणी मी माझे शेवटचे दिवस किती मजेत घालवता येतील ते बघतोय>>>>>>>>>>>
नीट बोल नन्दुभाय. अस चुकीच नको बोलु.
१९२०, रुबरू हे चित्रपट पाहण्याचं धैर्य तुझ्या अंगी बाणवण्यासाठी तू काय करतेस?>>>>>>
हाच प्रश्न मला पडला होता.
............................................................
Submitted by झकासराव on 18 September, 2008 - 00:24
पिंजरा च्या बाबतीत मी ही सहमत आहे. शिवाय नवरंग मध्ये शामल शामल .... या गाण्यावर नृत्य असेल अशी कल्पना आपण करू शकणार नाही तरिही ते नृत्य ही चांगले आहे. अर्थात त्यांच्या नाचाला थयथयाट म्हणले म्हणजे त्यांच्या बद्द्ल अनादर दाखवला नाहिए मी. माझं ही चुकलंच म्हणा, संध्याबद्दल मी फक्त जे आवडलं नाही तेच लिहीलं. त्यामूळे अशा प्रतिक्रिया साहजिक आहेत. आधा है चंद्रमा वर सात घागरी डोक्यावर घेऊन केलेले नृत्य माधुरी किंवा इतर उत्तम नृत्यांगना खचितच करू शकतील.
क्ष, संध्याचा मेकप प्रत्येक गाण्यात थोडा भेसूर मला ही वाटलाच होता. पण ज्या काळात तो निघाला होता त्याकाळात मेकपचे ज्ञान बहुधा यथा तथा असावे (आजच्या काळातल्या मेकपशी तुलना करता) असे मला वाटते. कारण आजकाल कोणी शर्मिला टागोर सारखे आय लायनर लावत नसले तरी त्याकाळी ते सुंदर दिसायचे. आयशॅडो संपूर्ण म्हणजे पापणी पासून ते भुवई पर्यंत लावणे, डोक्यात विविध प्रकारची आभुषणे घालणे. (हे सगळं एकदम तुमची पोस्ट वाचल्यावर रिकॉल झालं) हे सगळं तेव्हा जास्ती होतं.
Submitted by दक्षिणा on 18 September, 2008 - 00:30
<<त्याकाळात मेकपचे ज्ञान बहुधा यथा तथा असावे (आजच्या काळातल्या मेकपशी तुलना करता) असे मला वाटते<<>>
दक्षिणा, असं अजिबात नव्हतं.. जुकरदादा किंवा अशोक पांगम यांच्याविषयी ऐकलं नाहीस का तू? ती त्या काळची फॅशन म्हणून हवं तर.. बदल होतच असतात, पण साधनं कमी असूनही तेव्हा अफाट कलाकृती निर्माण झाल्या.
आणि हे सर्वच बाबतीत खरं आहे. ध्वनिमुद्रणकार वामन भोसले यांच्यासारखा कलावंत अजूनही निर्माण झालेला नाही.
Submitted by चिनूक्स on 18 September, 2008 - 01:17
>>> ती त्या काळची फॅशन म्हणून हवं तर.. बदल होतच असतात, पण साधनं कमी असूनही तेव्हा अफाट कलाकृती निर्माण झाल्या.>>> एकदम मान्य. मलाही थोड्याफार फरकाने हेच म्हणायचं होतं. आणखी ५/१० वर्षांनी कदाचित ऐश्वर्या ने केलेला मेकप आपल्याला बाळबोध वाटेल. नाही का?
Submitted by दक्षिणा on 18 September, 2008 - 01:32
संध्याचे नृत्यकौशल्य वादातीत आहे. झनक झनक मध्ये ती दिसतेही सुंदर आणि नाचतेही सुंदर. झाडाखाली बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत दाखवतानाही तिने पायांच्या हालचाली सुंदर दाखवल्यात.
पण पिंजरा बाबत मात्र पुर्णपणे असहमत. त्या काळच्या इतर चित्रपटातील लावणीनृत्ये आणि पिंजरातील लावणीनृत्ये यात खुप फरक आहे. त्याकाळी असलेल्या काम करत असलेल्या उषा चव्हाण, लीला गांधी या मुळाच्या तमासगीर. त्यामुळे त्या चित्रपटात करत असलेली लावणीनृत्ये थोड्याफार फरकाने तमाशासारखीच असणार (किंवा असावीत. मी खरा तमाशा पाहिलेला नाही)
पण संध्याची पिंजरातील नृत्ये, वेशभुषा एकदमच वेगळी होती. नृत्ये म्हणुन चांगली होती (मेकप वगळता), पण लावणीनृत्ये वाटत नव्हती. तिच्याजागी जयश्री गडकर किंवा उषा चव्हाण असती तर ती गाणी अजुन सुंदर वाटली असती..
मेहनतीच्या बाबतीत मात्र तिला सलाम.. वाचलेय की झनकच्या वेळेस तिला कथक येत नव्हते. तिला सहा महिने गोपीकृष्णाने कथक शिकवले. त्या सहा महिन्यात तिने दिवसरात्र कथकचा ध्यास घेऊन पुर्ण पारंगत होऊन मगच चित्रिकरणाला सुरवात केली. नाचताना मणक्याला दुखापत झाली तरी तिने पाय मागे घेतला नाही.
त्याकाळच्या ब-याचशा गोष्टी आजही मला दिव्य वाटतात.. आणि जेव्हा त्याबद्दल वाचते तेव्हा कळते कळते, की साधनसामग्री किती तुटपुंजी होती ते.
तेव्हाची फोटोग्राफी, प्रसंगांचे/गाण्यांचे टेकींग वगैरे गोष्टी आजही लोकांना जमतील असे वाटत नाही.. आज काही वेगळे पाहिले की लगेच 'नक्किच कॉम्प्युटरवर केले असेल" असा विचार मनात येतो..
मनी... ती
मनी...
ती नव्हे ही.... ही आभाळमाया मधली अक्षता (दुसरी का.. तिसरी?)
भरत जाधव बाबतित बोलायचं तर...
भरत नी आयुष्यात 'सही रे सही' केलं....
भरत नी आयुष्यभर 'सही रे सही'च केलं....
_______
फिल्लमबाजाच्या मनात थिएटर
आणि
खवैय्याच्या मनात रेस्टॉरंट
"Wednesday" अ मस्ट
"Wednesday"
अ मस्ट वॉच मूव्ही!
चांगले वेगवान कथानक, गोळीबंद संवाद आणि कमाल अभिनय!
नसिरुद्दिन शहाचा शेवटच्या काही प्रसंगातला अभिनय तर केवळ अप्रतिम....
तुमच्या आमच्या सारख्या "स्टुपिड कॉमन मॅन" वरचा नोन्-स्टुपिड अनकॉमन चित्रपट!
एकदा बघाच!
स्वरूप, रिव
स्वरूप,
रिव्ह्यू दिल्याबद्दल धन्यवाद. काल प्रथमच वेडनेसडेचा प्रोमो पाहीला आणि बरा वाटला, तुम्ही शिक्कामोर्तब केले.
वेनस्डे
वेनस्डे खूप छान मूवी आहे. नसरुद्दिन शाह आनि अनुपम ख्रेर एकदम बेस्ट. खुप छान अभिनय केला आहे दोघान्हि.
वेनस्डे.. ख
वेनस्डे..
खूप सुंदर पिक्चर...
खुप दिवसानी एखाद्या संवादाला सीनला जोरात टाळ्य्मा माराव्याशा वाटल्या. जबरदस्त.
अनुपम आणि नसीरूद्दिन या दोन गुणी अभिनेत्याचा अभिनयासाठी पहावा!!!
--------------
नंदिनी
--------------
'ए वेनस्डे'
'ए वेनस्डे' या चित्रपटाच्या चर्चा व प्रतिक्रियांसाठी नुकताच नवीन धागा सुरू केला आहे..
http://www.maayboli.com/node/3521
या चित्रपटावरील वरच्या काही प्रतिक्रिया नवी धाग्यावर हलवाव्यात ही विनंती.
कोणी
कोणी द्रोणा पाहीला का? इतकी advertisement आहे ना सारखी झी वर, कसा आहे हा मूवी? का डोके फोडायला लागेल?
आताच कळले मैत्रीणीकडून की द्रोण अजून आला नाही. तेव्हा वरचा प्लन बाद.
रॉक ऑन कसा आहे मग? आजचा शुक्रवार घालवायचा का हा विचार चालू आहे?
पूर्ण
पूर्ण थिएटरमधे मी आणि अजून बारा लोकानी बसून "रूबरू" पाहिला. माझ्या बंगाली रूममेटने त्यातली हीरॉईन बंगालि असल्यामुळे "खूप चांगला" पिक्चर आहे असं सांगितलं.
खूप चांगला पिक्चर आहे!!!!
इंटर्व्हल्च्या आधी पिच्खरमधे काहीच होत नाही. इंटरव्हलच्या नंतर जे आधी झालय तेच परत होत राहतं.
सुरुवातीला एक गाणं चालू असतं. नंतर हिरो आणि हीरॉइन भेटतात. मग दोन वर्षानी हिरॉइन जॉगिंग करून घरी येते. मग ती हीरोला उठवते. मग तो दाढी करतो. ती पियानोवर गाणं वाजवते. मग ते कॉफी पितात. मग हिरॉइनचा हात भाजतो. मग ते थोडा वाद घालतात. मग हीरॉइन होरोच्या अंगावर ज्युस सांडते. मग त्याल हवे ते कफलिंक्स मिळत नाहीत. त्याचं "इंपोर्टंट प्रेझेंटेशन" असतं. तो क्लायनंट मिळाल्यावर मग ते दोघं लग्न करणार असतात!!!!
मग दोघं अजून थोडा वाद घालतात. मग ते दोघं ऑफिसला निघतात. मग ते कारमधे वाद घालतात (नक्की कशासाठी हे समजलं नाही म्हणुन लिहिलेलं नाही)
मग हिरॉइन फुलं विकत घेते. मग तो त्याची ऍनिव्हर्सरी विसरलेला असतो(लग्न नाही ना झालं. *&^%$#)
मग ते परत वाद घालतात! मग हिरॉइइनचा त्या दिवशी रोमिओ जयुलिएटचा शो असतो. ते पण हिरो विसरतो. मग ते परत वाद घालतात (कॉपी पेस्ट चालू)
मग तो ऑफिसमधे जातो बहुतेक तो जाहिराती मधे असावा कारण पीच वगैरे शब्द तो बोलतो. मग तो प्रेझेटेशन चालू करतो. मग हिऱोइन मीटिंङ रूममधे येते. तिला वाटतं तो महत्वाचे पेपर विसरलाय. प्रत्यक्षात ते पेपर महत्वाचे नसतात. मग ती नको तितकं बडबडते. क्लायंट नाखुश होतो. (गोरे लोक, मॅनर्स वगैरेला नको तितकं महत्व!! भावना महत्वाच्या असतात् हे लक्षात घेतच नाहीत)
मग ते दोघं फोनवर वाद घालतात. मग तो तिचा शो बघायला जातो. तिथे त्याला एक टॅक्सी ड्रायव्हर भेटतो. तो पंजाबी ऍक्सेंटमधे हिरोला बरंच काही समजावतो. प्रेम कुटुंब यावर एक लेक्चर देतो. मग तो टॅक्सी थांबवतो आणि हिरोला फूल घ्याय्ला सांगतो.
मग तो नाटकाला जातो. मग ती तिचे चांगली ऍक्टिंग करते (आयला!!!!)
मग तो तिला घेऊन डिनरला जातो. मग ते तिथं परत वाद घालतात. मग त्याचा क्लायंट तिथे येतात. मग ती चिडून निघते. तो मघाचा टॅक्सीवाला परत येतो (माझी बंगाली रूममेट जोरत अबे यार फिरसे नही" असं ओरडली. )
मग ती टॅक्सीत बसून जाते. आपघात होतो. आणि हिरॉइइन मरते.
दुसर्या दिवशी सकाळी हिरो उठतो.. आणि हिऱोइन त्याच्या बाजूला असते.
इंटरव्हल!!!!!!
आणि मग आपल्याला समजतं की या आधी जे काई झालं ते हिरोच्या स्वप्नात होत होतं. !!!!!!! परत तो दिवस सुरु होतो!!! नही SSSSSSSSSSSSSS
यातला एक एक सीन अचाट वाल्याना आमंत्रण आहे. फुकटात टीव्हीवर बघायला मिळाला तर बघा!!!
नाहीतर जाऊ दे...
--------------
नंदिनी
--------------
मी हा
मी हा चित्रपट पहाणार आहे..
नंदिनी,सही
नंदिनी,सही लिहिलंस्.एका दमात वाचलं तुझं पोस्ट.
मग आपल्याला समजतं की या आधी जे काई झालं ते हिरोच्या स्वप्नात होत होतं.>> हे वाचुन तर मी 'आ' वासला.कठीण आहे.
सिंग इज
सिंग इज किंग पाहिला. का????????? बरा आहे असे कोणेतरी सांगितले आणि देसीकडे बाकी नविन बघण्यासारखे काहीच नव्हते. अ आणि आ. ने ठासुन भरला आहे. ३-४ वेळा मी पहिल्या १५-२० मिनीटातच झोपलो. परवा शेवटी मनाची तयारी केली आणि पहिला एकदाचा.पैसे दिले होते ना!!! (पैसे देऊनही पुर्ण न पाहिलेले: सलामे ईश्क, होम डिलिव्हरी....)
त्याच रात्री AMC ह्या चॅनेलवर "Philadephia" होता. उतारा म्हणुन ३वा पर्यंत तो पाहिला आणि मग शांत झोपलो.
इंटर्व्हल
इंटर्व्हल्च्या आधी पिच्खरमधे काहीच होत नाही. इंटरव्हलच्या नंतर जे आधी झालय तेच परत होत राहतं >> नंदिनी जाम हसवतेस बॉ कधीकधी.
गेलेल्या
गेलेल्या वीकेन्ड ला 'नवरंग' आणि 'बाजार' असे अनुक्रमे शनीवार आणि रविवारी पाहीले. 'नवरंग' ची कथा खास नाही तरिही गाणी उच्च दर्जाची आहेत म्हणून मला खास उत्सुकता होती. नाहीतर संध्याचा थयथयाट कोण पाहील? 'शामल शामल बरन..' सारख्या कोमल गाण्यावर सुद्धा या बयेचा नाच. व्ही. शांताराम यांचे सिनेमे पाहीले की वाटतं की निव्वळ संध्याला तिच्या नाचाचे नैपुण्य(??) दाखवता यावं म्हणून की काय हे चित्रपट काढले आहेत. बाकी सिनेमा छान.
बाजार डिप्रेसिंग वाटला, स्मिता आणि नासिरूद्दीनचे काम उच्च. फारूख शेख आणि सुप्रिया पाठकने ही सुंदर काम केलेय.
द लास्ट
द लास्ट लीअर... टिपिकल रितुपर्णो घोष. याचा क्लायमॅक्स मनमोहन देसाईची आठवण करून देतो.
१९२०.. हा बहुतेक हॉरर पिक्चर असावा.. फादर जेव्हा आरशामधे स्वतःला पहात होता तव्हा जराशी भिती वाटली. तेवढ्यात ती हीरॉइन घरभर बल्ले बल्ले केल्यासारखी धावत गेली. टाळ्या आणि शिट्या माझ्या तर्फे.
--------------
नंदिनी
--------------
१९२० हॉरर
१९२० हॉरर सिनेमाच आहे. परवा सकाळला परिक्षण आलं होतं. फूंक पेक्षा चांगला आहे (चांगला म्हणजे घाबरायला होतं :फिदी:) म्हणे.
१९२० हॉरर
१९२० हॉरर सिनेमाच आहे. परवा सकाळला परिक्षण आलं होतं.
तुला विनोदाचे वावडे वगैरे आहे का???
>>>
दक्षिणा माझं पोस्ट परत एकदा वाच. मी पिक्चर पाहून मग लिहिलय ते. परीक्षण वाचून नव्हे.
बाय द वे, फूंक आणि १९२० सारखे पिक्चर बघून घाबराणार्या लोकाची मला दया येते.
पुढील आठवड्यातला वेलकम टू सज्जनपूर मला बघायचा आहे. श्याम बेनेगल आणि आपला श्रेयस तळ्पदे आहे.
--------------
नंदिनी
--------------
नंदिनी, १९२
नंदिनी,
१९२०, रुबरू हे चित्रपट पाहण्याचं धैर्य तुझ्या अंगी बाणवण्यासाठी तू काय करतेस?
चिनूक्स,
चिनूक्स, माझी रूममेट आणी मी माझे शेवटचे दिवस किती मजेत घालवता येतील ते बघतोय.
१० नोव्हेंबरपर्यंत ५० पिक्चर, १० डिस्क, १५ पब आणि जमतील तितकी रेस्टॉरंट्स असे टारगेट आहे.
--------------
नंदिनी
--------------
'शेवटचे
'शेवटचे दिवस' म्हणजे नोव्हेंबरपूर्वीचे 'शेवटचे दिवस' असं म्हण... अभिनंदन.
१०
१० नोव्हेंबरपर्यंत ५० पिक्चर, १० डिस्क, १५ पब आणि जमतील तितकी रेस्टॉरंट्स असे टारगेट आहे.
नंदीनी...
नंदीनी... अरेच्चा! नाही गं विनोदाचं वावडं वगैरे काही नाही...
नंदिनी
नंदिनी (अभिनंदन) भन्नाट लिहीलय रूबरू बद्दल
- नवीन बीबी का नाही उघडला, येथे उलटे जाऊन बघावे लागते. रूबरू च्या वर्णनाने पुलंच्या त्या एका "नाट्यानुभव" (तीन मिनीटांच्या नाटकाचा) ची आठवण झाली.
खरंतर
खरंतर "नवरंग" मधलं, किंवा शांतारामच्या बर्याचशा चित्रपटांमधलं संध्याचं नृत्य कोणत्या प्रकारात बसतं हे कळत नाही म्हणून बर्याच लोकांना वाटतं संध्याला नाचताच येत नाही.. पण लक्षात घ्या.. ही बाई गोपीकृष्णाकडे नृत्य शिकली आहे. तिचे भाव आणि ठेक्यावरील प्रभुत्व नि:संशय उत्तम आहे. तिच्या अंगी लवचिकता प्रचंड आहे. नृत्यदिग्दर्शक म्हणेल तशी अदाकारी ती पडद्यावर उतरवू शकते.
नवरंगमध्ये "तुम सैय्या गुलाबके फूल" मध्ये तिच्या चेहर्यावरचे भाव बघा.. आज नही माने तो मै जरा ना डरूंगी, जहर पिऊंगी घडी घडी ही मरूंगी म्हणतांनाचा लटका राग तिने माझ्यामते तरी उत्तम दाखवला आहे.
घोड्याबरोबर त्या काळात कुठल्या अभिनेत्रीने नृत्य केले असते? होळीच्या गाण्यात तिने पुरुष आणि स्त्री अशां दोन्ही भूमिकांमध्ये केलेलं नृत्य प्रसिद्धच आहे. तू छुपी है कहां मधला मेकअप पहिल्यांदा मलादेखील भयंकर वाटला होता.. पण जेव्हां दिग्दर्शकाच्या संकल्पनेचा विचार केला तेव्हा ती एक अनाकलनीय, अमूर्त अशी स्फूर्ति, उर्मी त्याला दाखवायची आहे आणि ती अशीच लोकांच्या सौंदर्याच्या व्याख्यांच्या पलिकडे असणारी हवी या भूमिकेतून तो आलेला आहे. (संध्याचा मेकअप नंतर तसाच राहीला ही गोष्ट अलहिदा)
तिचं नृत्यकौशल्य तिने झनक झनक सारख्या चित्रपटांमधून दाखवलंय.. पिंजरा मधली तिची नृत्य अतिशय सुरेख आहेत, एका गावातल्या लावणी नर्तिकेची जशी असायला हवीत तशी.. भडक संवाद, भडक अभिनय हा शांतारामच्या चित्रपटांत सर्वत्र आहेच. त्याचं दूषण संध्यालाच का?
माझ्या दृष्टीने तरी ती एक चांगली नर्तिका होती आणि त्याही पेक्षा ती तिच्या दिग्दर्शकाशी नेहमी प्रामाणिक राहणारी अभिनेत्री होती. आपले अभिनयगुण दाखवण्यापेक्षा दिग्दर्शक म्हणेल ती पूर्व दिशा मानून काम करणारी अभिनेत्री बहुतेक शांतारामला एकटयालाच मिळाली असावी. नाहीतर चित्रपटसृष्टीमध्ये "पिक्चर गेला चुलीत, माझे अवॉर्ड पक्के झाले पाहिजे" असा विचार करणार्यांची कमी नाही.. आणि मला वाटतं म्हणूनच त्याच्या प्रत्येक चित्रपटातली त्याची "muse" संध्याच राहिली..
संध्याची
संध्याची नृत्ये आणि त्यामागचा विचार समजावून घेण्यासाठी कृपया व्ही. शांताराम यांचे 'शांतारामा' हे आत्मचरित्र वाचा. शांताराम बापूंना फ्रेम रंगीबेरंगी करण्याचा सोस असेल, अनेक प्रतीकं ते वापरत असतील, पण हे सारं अस्थानी कधीच नव्हतं. त्यामागे त्यांचा निश्चित असा, त्यांना पटणारा विचार होता.
संध्याची नृत्येसुद्धा विशिष्ट हेतू मनात ठेवूनच चित्रित झाली होती. आणि या नृत्यांवर संध्याबाईंनी प्रचंड मेहनत घेतली होती.
त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झालेली असूनही अतिशय अवघड अशी नृत्ये त्यांनी केली आहेत.
संध्याच्य
संध्याच्या नृत्याला थयथयाट म्हणणे म्हणजे पहाणार्याचे डो़के अथवा डोळे त्यांच्या जागेवर नसण्याचे लक्षण आहे.
संध्याच्या नृत्यकौशल्याला वाव देण्यासाठी चित्रपट काढले गेले असतीलही पण त्यामुळे नृय्त्याची गुणवत्ता कमी कशी होते बुवा? हो, ही नृत्ये अस्थानी असू शकतील. स्टोरीशी असंबद्ध असू शकतील म्हणून तो थयथयाट कसा होतो? (संध्याबाईचं मान वेळावणं जरा अतिच असे ही बाब खरी.)त्यांचा अभिनयही कृत्रिम असे.
आता ' ही बया' हा उल्लेख अनुदार आणि अन्यायकारक नाही का? कुठल्या गाण्यावर नाचावे अगर नये हे स्वातंत्र्य नटीचे असते काय? पडद्यावर नट जे काही करतो त्याबाद्दल त्याला (सुमार अभिनय वगळता) दोषी धरणे म्हणजे चित्रपट पहाण्याची फारच बाळबोध अवस्था झाली.
'क्ष' यांच्या पोस्ट्सशी सहमत....
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
माझी
माझी रूममेट आणी मी माझे शेवटचे दिवस किती मजेत घालवता येतील ते बघतोय>>>>>>>>>>>
नीट बोल नन्दुभाय. अस चुकीच नको बोलु.
१९२०, रुबरू हे चित्रपट पाहण्याचं धैर्य तुझ्या अंगी बाणवण्यासाठी तू काय करतेस?>>>>>>
हाच प्रश्न मला पडला होता.
............................................................
पिंजरा
पिंजरा च्या बाबतीत मी ही सहमत आहे. शिवाय नवरंग मध्ये शामल शामल .... या गाण्यावर नृत्य असेल अशी कल्पना आपण करू शकणार नाही तरिही ते नृत्य ही चांगले आहे. अर्थात त्यांच्या नाचाला थयथयाट म्हणले म्हणजे त्यांच्या बद्द्ल अनादर दाखवला नाहिए मी. माझं ही चुकलंच म्हणा, संध्याबद्दल मी फक्त जे आवडलं नाही तेच लिहीलं. त्यामूळे अशा प्रतिक्रिया साहजिक आहेत. आधा है चंद्रमा वर सात घागरी डोक्यावर घेऊन केलेले नृत्य माधुरी किंवा इतर उत्तम नृत्यांगना खचितच करू शकतील.
क्ष, संध्याचा मेकप प्रत्येक गाण्यात थोडा भेसूर मला ही वाटलाच होता. पण ज्या काळात तो निघाला होता त्याकाळात मेकपचे ज्ञान बहुधा यथा तथा असावे (आजच्या काळातल्या मेकपशी तुलना करता) असे मला वाटते. कारण आजकाल कोणी शर्मिला टागोर सारखे आय लायनर लावत नसले तरी त्याकाळी ते सुंदर दिसायचे. आयशॅडो संपूर्ण म्हणजे पापणी पासून ते भुवई पर्यंत लावणे, डोक्यात विविध प्रकारची आभुषणे घालणे. (हे सगळं एकदम तुमची पोस्ट वाचल्यावर रिकॉल झालं) हे सगळं तेव्हा जास्ती होतं.
<<त्याकाळात
<<त्याकाळात मेकपचे ज्ञान बहुधा यथा तथा असावे (आजच्या काळातल्या मेकपशी तुलना करता) असे मला वाटते<<>>
दक्षिणा, असं अजिबात नव्हतं.. जुकरदादा किंवा अशोक पांगम यांच्याविषयी ऐकलं नाहीस का तू? ती त्या काळची फॅशन म्हणून हवं तर.. बदल होतच असतात, पण साधनं कमी असूनही तेव्हा अफाट कलाकृती निर्माण झाल्या.
आणि हे सर्वच बाबतीत खरं आहे. ध्वनिमुद्रणकार वामन भोसले यांच्यासारखा कलावंत अजूनही निर्माण झालेला नाही.
>>> ती त्या
>>> ती त्या काळची फॅशन म्हणून हवं तर.. बदल होतच असतात, पण साधनं कमी असूनही तेव्हा अफाट कलाकृती निर्माण झाल्या.>>> एकदम मान्य. मलाही थोड्याफार फरकाने हेच म्हणायचं होतं. आणखी ५/१० वर्षांनी कदाचित ऐश्वर्या ने केलेला मेकप आपल्याला बाळबोध वाटेल. नाही का?
सहमतच... संध
सहमतच...

साधना
Pages