चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात चेहरा अगदी टिपिकल सुंदर च्या व्याख्येत बसणारा नव्हता म्हणून संध्या बद्दल इतकं काही वाईट बोललं गेलं पण तिचे कष्ट, नाचातली/ अभिनयातली पॅशन नी कमिटमेंट याला तोड नाही. ती प्रेक्षकांना दाखवण्यासाठी कधी नाचली नाही. ती तो तो क्षण खरा करण्यासाठी नाचली असंच वाटतं तिचं नृत्य बघताना.
the word थयथयाट is completely uncalled for!
असो!
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

हाय अज्जुका , खूप दिवसांनी !
****************************
Minds are like Parachutes, they only function when open

हो रे. शूट चालू होतं ना त्यामुळे मायबोली नाक्यावर चक्कर मारायला वेळच होत नव्हता.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

ए कोणत्या चित्रपटाचं शूट सुरू होतं?

होय होय.. संध्या ची नृत्ये मलाही आवडतात. पिंजरा तर मला खूप आवडता आहे, सर्वगुणसंपन्न सिनेमा..
कदाचीत वेगळेपणामुळे असेल, मला ती दिसायला पण आवडायची. माझ्या आईने तिला तरूणपणी पाहिली होती.. खूप सुंदर होती म्हणे आणि प्रचंड गूलाबी गोरी (गोरेपण हा सौंदर्याचा निकष नाही मानला तरी Happy ).. एका आसनावर बसली होती म्हणे आणि अक्षरशः एखाद्या महाराणी सारखी तेजस्वी सारखी दिसत होती. असो..

आणि "पंख होते तो उड आती रे" ? हे माझे सगळ्यात आवडते गाणे आहे संध्या वर चित्रित झालेले.

सहारा नाव होते या सिनेमाच सिंड्रेला? अगदी लहान असतांना बघीतलेत हे सिनेमा नवरंग, सहारा. मला आवडते ते गाणं पंख होते तो उड आती रे.

ते नाव 'सेहरा' आहे.cbdg

हो सेहराच. काही गाण्यांचे (तकदीर का फसाना...) चित्रीकरण वाळवंटात होत असल्याने रूनी ला सहारा वाटले असेल Happy

सेहरा बरोबर. त्यात जा जा जा रे तुझे हम जान गये आणि तुम तो प्यार हो ही गाणी पण मस्त आहेत.

सेहरा.. सन्गीत रामलाल..

सेहरा, नवरंग आणि झनक झनक पायल बाजे... अतिशय सुंदर गाणी आहेत ह्यात. हे तीनही चित्रपट मला आवडतात. जा रे हट नटखट हे गाण तर अजुनही पहायला मज्जा येते.
पण संध्याचा नाच न आवडलेले चित्रपट म्हणजे जल बिन मछली नृत्य बिन बिजली आणि चंदनाची चोळी अंग अंग जाळी. Happy
हो पाहिलेत मी हे चित्रपट Wink

नवरंग मधली सारखी चीड्चीड करणारी बायको मस्त सकारलेली तिने.

ए अमृता,

पण ती जरा जास्तीच तोडून वागते त्याच्याशी. खरंतर त्याला त्याच्या सर्व रचना तिला स्वप्नात पाहूनच सुचत असतात, पण तो त्या स्वप्नातल्या 'तिला' वेगवेगळ्या नावानी हाका मारत असतो, त्यामूळे तिला वाटते की ह्याच्या आयूष्यात दुसरीच कोणी आहे, त्यामूळे ति जास्ती फटकून वागत असते. पण शेवटी 'तू छुपी है कहाँ, या गाण्यात, जमूना तू ही है तू ही मेरी सोहीनी.... म्हटल्यावर तिला कळते. Happy
अशाच एका दृष्यात ती रागावून डोक्यावरून पदर घेऊन रागारागात त्याच्या आईजवळ जाऊन झोपते. त्या प्रसंगाची मला मजा वाटली होती.

'आ दिल से दिल...' गाणं कोणावर चित्रित केलं आहे? ती अभिनेत्री कोण आहे, सांगू शकेल का? तिचं कामही मला खूप आवडलं. विशेष करून तिचं महीपालच्या कलेवरंच अपार प्रेम आणि कमिटमेंट. ठाकूरच्या वाढदिवशी त्याने खास गाणं रचावं पण त्याअगोदर, त्याची स्फुर्ती असणार्‍या त्याच्या बायकोला त्याच्या आयुष्यात परत आणावं यासाठी तिने घेतलेलं इनिशिएटिव्ह... केवळ अप्रतिम!

रजिस्टर मध्ये 'एंट्री' केल्यागत (तोंड लपवून) इथे नमूद करतो-
बापरे बाप ('डोक्याला ताप' असंही आहे ना पुढे?)- बघितला.
भिक्कार. भीषण. महाभयंकर. हॉरिबल.

आता पाहीलायंस तर हरकत नाही. अ.आ. मध्ये लिहून टाक आणि इतरांचे पैसे वाचव. Happy

दक्षिणा " जमुना तू ही है, तू ही मेरी मोहीनी" अशी ओळ आहे ती.
आ दिलसे दिल मिलाले, हे गाणे आशानेच जरा वेगळ्या आवाजात गायलेय. अभिनेत्री कोण ते आता आठवत नाही. याच सिनेमात मुमताज, जयश्री गडकर या सहनर्तिका म्हणून नाचल्या होत्या. जितेंद्रही होता.
सेहराला पंडित रामलालचे संगीत होते. अर्थात हे सर्व सिनेमा माझ्या आवडीचे. सेहरामधेच एक भला मोठा झोपाळा डोक्यावर घेऊन संध्या वावरलीय. तो झोपाळा खरोखरच जड होता.

हो हो दिनेश, तायपिंग मिस्टेक झाली. थँक्स Happy

>>>याच सिनेमात मुमताज, जयश्री गडकर या सहनर्तिका म्हणून नाचल्या होत्या. जितेंद्रही होता>>>>> दिनेश... काय सांगताय काय?
तू छुपी है कहा मध्ये सरोज खान होती हे मला ऐकून माहीती होतं, मुमताज असणं ठिक पण जितेंद्र सुद्धा? मला तर कुठेठेच दिसले नाहीत. Uhoh

सेहरा ही मी खूप लहान असताना पाहीलाय, त्यातलं फक्त एक दृष्य आठवतंय... कुणितरी पदराने पिळून पाणी पाजतंय, कुणाला ते नाही आठवंत.

>>आ दिलसे दिल मिलाले, हे गाणे आशानेच जरा वेगळ्या आवाजात गायलेय. अभिनेत्री कोण ते आता आठवत नाही. याच सिनेमात मुमताज, जयश्री गडकर या सहनर्तिका म्हणून नाचल्या होत्या. जितेंद्रही होता.

दिनेश, सेहरा आणि नवरंग मध्ये घोळ घालताय. मुमताज, जितेंद्र वगैरे सेहरा मध्ये होते.

दक्षिणा, आ दिलसे दिल मिलाले "वंदना" नावाच्या अभिनेत्रीवर चित्रित झालंय.. तिचं खरं नाव आशा नाडकर्णी. छान अभिनय केलाय तिने.. फक्त आवाज जरा नाकात होता तिचा Happy

क्ष, थँक्स Happy तिचं बोलणं काय लाडीक? पण इरिटेट नाही होत ऐकून सहज वाटलं Happy

संध्याचे पिक्चर यावर स्पेशल बीबी उघडावा की काय??? आधी तिचा दिसण्यावरून, नाचण्यावरून हवे ते शब्द वापरायचे आणि मग पब्लिक ओरडलं की लगेच "मला पण हे आवडलं आणि ते आवडलं" करायचं.

चांगलं चालू आहे.. Happy Happy Happy MARCOM मधे नाव काढलं असतं अशा लोकानी..

परत एकदा विषयाकडे..
झोहान पाहिला.

एकदा पहाण्यालायक. Happy

ब्रेंडन फ्रेझरचा नवीन ३डी पिक्चर कुणी पाहिलाय का??? अंधेरीला जाऊन बघावा लागेल म्हणून जरा अळमटळम करतेय.

--------------
नंदिनी
--------------

पुण्यात ज्या चित्रपटाचा खेळ "प्रेक्षकांअभावी रद्द" करावा लागला , त्याच ब्रँडन प्रेझरच्या "जर्नी टू दी सेंटर ऑफ दी अर्थ" बद्दल बोलतेयस का? Happy
इथे पण थिएटरमध्ये चक्कर मारली तेव्हा एकही प्रेक्षक दिसला नाही.. त्यावरुन कल्पना येतेय ..

ओके क्ष...

समझ्या मेरेको. मेरा अ.न्धेरी ट्रीप कॆन्सल.

या आठवड्यात काही खास रीलीज नाहियेत. पुढच्या आठवड्यात द्रोण आहे (ते नाव द्रोणा अस. का लिहिलय कुणास ठाऊक??)

--------------
नंदिनी
--------------

ते आपल्याला शाळेत नाही का मराठीतील अकारान्त नावे इंग्रजीत आकारान्त असायची? तसेच काहीतरी केलेले दिसते.

मी चक्क लंडन च्या एका बस च्या मागे 'द्रोण' ची जाहिरात पाहिली...

धक्काच बसला....
_______
नमस्ते लंडन

३D मी पाह्यलाय. ९ जणांचा ग्रुप गेलो होतो आणि खरंच टिपी बघायचा होता म्हणून आयत्यावेळेला पृथ्वीहून पीव्हीआरला गेलो. स्पेशल प्लॅन करून बघण्यासारखा मुळीच नाही.
साधारण माठ चित्रपट आहे. एलियन्स आणि भविष्यातले प्राणी एवढेच यायचे राह्यले होते.
शेवटी हसून हसूनही कंटाळा आला.
एका ठिकाणी आमचा मित्र वैतागून ओरडला, " अरे ये तो सनी देओलसे कॉपी किया इसने!" आणि सगळं थिएटर हसून हसून मेलं.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

'वेलकम टू सज्जनपुर' पाहिला. पूनम ला मोदक्...मस्त आहे पिक्चर एकदम... सिंपल असल्याने छान टिपी होतो..
फक्त श्रेयस गावठी वगैरे दिसत नाही त्यात... त्याला अजून थोडा गावठी दाखवायला हवा होता..

त्याचा डोर, इक्बाल आणि हा तिनहि पिक्चर मस्त आहेत..

आणि काल मराठी चेकमेट पण पाहिला.. चांगला attempt आहे.. काही काही प्रसंगात एकदम ब्लफमास्टर किंवा चॉकोलेट ची छाप वाटते..

चेक मेट मलाही आवडला.... मर्फीज लॉ आधी माहीत नव्हता..

Pages