मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

Admin/ मदत समिती,
ज्या ठिकाणी लेखनाचा धागा वापरला जातो तिथे नविन आलेले पोस्ट पहिले आणि जुने पोस्ट शेवटी असे करणे शक्य आहे का???
==================
सुसाट वारा वीज कडकडे पाऊस झाला सुरू
पाणीच पाणी रस्त्यावरती मुठीत गारा धरू

मी वर्ड मधे टाईप केलेलं लिखाण पोस्ट करतोय; पण देवनागरीमधे दिसत नाहीये. काय करू?

जाहिरात १/२ दिवसात प्रकाशित होते. आपण जिथे इतर जाहिराती पाहिल्यात तिथेच आपली जाहिरात प्रकाशित होईल.

माझ्या account मधून सदस्याची विचारपूस केलेले deleted messages मला परत कसे वाचायला मिळतील? मदत समिती मी हा प्रश्न तुम्हाला तिसर्यान्दा विचारत आहे ,मला उत्तर कधी देणार?

विचारपूस मधुन एकदा डीलीट केलेले मेसेज परत बघता येणार नाहीत.

नमस्कार. जुन्या हितगुजवरचा Looking for अथवा तत्सम बाफ इथे आहे का ? मला खाण्याच्या २ गोष्टी कुठे मिळतील अशी चौकशी करायची आहे, ती आता मी 'पाककृती हवी आहे' बाफवर केलीये. जर तिथे ते अयोग्य वाटत असेल तर कृपया योग्य ठिकाणी हलवाल का ? धन्यवाद.

    ***
    टिंग म्हणता येते खाली, टुंग म्हणता जाते वर

    गुलमोहर वर कव्यधारा विभागात बालकविता हा विभाग (लिंक) का दिसत नाही? क्रुपया दुरुस्ती कराल का?

    माझ्याशी संपर्क साधण्यासाठी दिलेला ईमेल ऍड्रेस मला बदलायचा आहे. कसा बदलायचा? Accounts Settings मध्ये जाऊन मी मला जो नविन पत्ता द्यायचाय तो दिला... पण खाली जो पासवर्ड विचारला जातोय तो कोणता लिहायचा? त्या नविन ईमेल पत्त्याचा? कि आपल्या रेग्युलर मायबोलीच्या लॉग इन चा? Uhoh
    मला काहीच कळत नाहीए... आणि काहीच होत नाहीए... Sad

    Accounts Settings मधे तुमचा इथला मायबोलीचा पासवर्ड लिहायचा. पण तुम्ही Accounts Settings मधे जाऊ शकत असाल तर तुमचे लॉगिन चालू आहे आणि परत पासवर्ड लिहायची गरज नाही. फक्त ईमेल बदलून सेव्ह करा.

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे आत्ताच करून पाहीलं पण, मला मेसेज येतोय की this email address is not valid. असं का होतंय? Uhoh

    जुन्या हितगुजवर जशा मुखपृष्ठावर मागील ३-२ किंवा १ दिवसात झालेले लिखाण बघण्यासाठी लिंक होत्या तसे नवीन हितगुजवर काय आहे? सध्या फक्त गुलमोहरवरचे आणि रंगीबेरंगीवरचे लिखाण तसे बघता येते. विषयानुसार झालेले लेखन बघण्यासाठी तशी सोय नाही. ती करता येईल का?

    नवीन लेखन पहाण्यासाठी वर जी निळी पट्टी आहे त्यावर "नवीन लेखन" अशी लिन्क आहे. त्यात नवीन लेखन आणि ज्या जिथे नवीन प्रतिसाद आला आहे तो बीबी असे वेळेप्रमाणे दिसेल.

    मला माझ्या लेखात एक image टाकायची आहे. ती मी upload केली. पण मला ती add करता येत नाही. असं का?

    इमेज अपलोड केल्यावर 'खाजगी जागा' मध्ये दिसते आहे का? तिथे असेल तर मजकुरात जिथे ती टाकायची आहे तिथे तो मजकूर 'संपादन' करताना कर्सर नेऊन 'मजकुरात इमेज किंवा लिन्क द्या' असं खाली दिसेल त्यातली इमेज ची लिन्क क्लिक करा. क्लिक केल्यावर खाजगी जागेत अपलोड केलेल्या इमेजेस दिसतील. त्यात लिस्ट मध्ये पुढे 'add' अशी लिन्क आहे ती क्लिक केल्यावर इमेज मजकुरात add होईल.

    <<इमेज अपलोड केल्यावर 'खाजगी जागा' मध्ये दिसते आहे का? तिथे असेल तर मजकुरात जिथे ती टाकायची आहे तिथे तो मजकूर 'संपादन' करताना कर्सर नेऊन 'मजकुरात इमेज किंवा लिन्क द्या' असं खाली दिसेल त्यातली इमेज ची लिन्क क्लिक करा. क्लिक केल्यावर खाजगी जागेत अपलोड केलेल्या इमेजेस दिसती<<>>

    हे सगळं होतंय. फक्त ती add ची लिंक सुरुवातीपासून दिसत नाही..delete मात्र व्यवस्थित दिसतं आहे.

    नविन मायबोलीवर मला जोर्जिया चा ग्रुप उघडायचा आहे. कसा उघडायचा. मला लिन्कच मिळत नाहीय.

    lovevin,
    तुम्हाला हा गृप म्हणायचय का? http://www.maayboli.com/node/2711
    हे नसेल तर हितगुज मध्ये 'अमेरीका : उर्वरीत' मध्ये तुम्ही नविन गप्पांच पान सुरु करु शकता.
    तुम्ही अमेरीकेतील जॉर्जिया राज्याबद्दल बोलत आहात असे समजुन हे उत्तर दिले आहे Happy

    मी थोड्या वेळापुर्वी चित्रकला सदरामधे अपलोड केलेल्या एका स्केचची पोस्ट गायब झाली आहे! Sad
    मला परत अपलोड करावे लागेल काय ?

    नव्या मायबोलीतः
    शब्द निरनिराळ्या रंगात कसे लिहायचे?
    अवग्रह (म्हणजे इंग्रजी एस हे अक्षर आलाप दाखवण्यासाठी वापरतात ते, जुन्या हितगूजमधील .a) , कसा लिहायचा?

    इमोटिकॉन्स कसे काढायचे?
    धन्यवाद. sorry, धन्स!

    pakashkalel,
    तुमचे चित्र दिसतय ना चित्रकला विभागात आणि त्याला प्रतिसाद पण आलेत म्हणजे इतरांना पण दिसत आहे.
    झक्की,
    नविन मायबोलीवर अजुन वेगवेगळ्या रंगात लिहायची सोय नाही.
    अवग्रह देण्यासाठी इंग्रजी s वापरता येईल. मराठीत लिहीत असतांना मध्ये इंग्रजी लिहीण्यासाठी ctrl +\ चा वापर करा.
    इमोटीकॉन्स साठी हे बघा.
    http://www.maayboli.com/node/1818

    मला nutrition ह्या विषयाची आवड आहे. त्या संबंधित एखादा bb सुरु कराल का? मला असणारे doubts विचारता येतील.

    मायबोलीवरचे लेख (प्रतिसादांसकट) प्रिंट करण्याची सोय आहे का? मला दिसली नाही कुठे...

    मला अजुन निट ओपरेट करता येत नाहि. Can anyone help me in this? Pls tell me how to operate this a/c like how we operate yahoo or gmail. PLS PLS ALSO TEL ME HOW & WHERE SHOULD I SEE RESPONSE TO MY QUERIES?

    PLS HELP ME

    निलेश म्ह्स्के

    nilesh.mhaske,
    तुम्ही लॉग इन केल्यावर तुम्हाला डाव्या बाजुला सर्व लिंक्स दिसतील. तेथे विचारपुस मध्ये तुम्हाला कोणी वैयक्तिक लिहीले असेल तर ते निरोप मिळतील. 'माझे सदस्यत्व' मध्ये जावुन स्वतःबद्दल माहिती बदलता/ लिहीता येईल.
    तसेच मदतपुस्तिकेत पण तुम्हाला बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.

    मदत समिती, मला माझा वैयक्तिक संपर्काचा ईमेल पत्ता बदलायचा होता, तुम्ही सांगितल्या प्रमाणे म्हणजे असा >>Accounts Settings मधे तुमचा इथला मायबोलीचा पासवर्ड लिहायचा. पण तुम्ही Accounts Settings मधे जाऊ शकत असाल तर तुमचे लॉगिन चालू आहे आणि परत पासवर्ड लिहायची गरज नाही. फक्त ईमेल बदलून सेव्ह करा.>>> प्रयत्न केला, पण मला मेसेज येतोय की this email address is not valid. असं का होतंय? Uhoh

    कॄपया सांगाल का? मी हा प्रश्नं दुसर्‍यांदा विचारतेय इथे. Sad

    मी पश्चीम किनार्‍यावर रहाते. पण कालपासून माझ्या मायबोलीवर पूर्व किनार्‍याची वेळ येत आहे. ती कशी बदलायची?

    मदत-समिता

    धन्यवाद

    निलेश म्ह्स्के

    अतिशय छान वेबसाईट आहे. आत्ता रात्रीचे १.०० वाजलेत तरी संगनकावरुन ऊठाव वाटत नाही.

    अतुल चव्हाणा, पुणे

    I have posted a picture for the Ganeshotsav photo contest. but i cannot see that entry when i am not logged in.
    But i can see all the other entries of the contest. What could be the problem?

    Pages