मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

mala bhadrashrava raja,suratchandrika rani,shambalachi katha havi aahe

मला भद्रश्रव राजा ,सुलतचद्रिका रानी ,शामबालाची कथा हवी आहे. (गुरुवार्ची) लवकर

मयुरी६६८८,
इथे मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कश्या वापराव्यात यासंबंधीची माहिती याबद्दल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. इतर प्रकारचे प्रश्न आपण 'मदत हवी आहे' या धाग्यावर विचारु शकता. हा त्याचा दुवा http://www.maayboli.com/node/4458

i m searching margashish guruvar katha which is bhadrashrava raja ,sulatchandrika rani & shambala ...utu naye matu naye

मायबोलीवर सदस्य होण्यासाठी काय करावे लागेल

हेमंत पुराणिक,
तुम्ही स्वतः मायबोलीवर सदस्य म्हणुन नाव नोंदवलेले आहेच त्यामुळे तुम्हाला मायबोलीवर सदस्य म्हणुन लिहीण्यासाठी फक्त तुमच्या युजर नेमने लॉग इन करावे लागेल.
इतर नवीन कोणाला जर मायबोलीचे सदस्य व्हायचे असेल तर मायबोलीच्या मुख्य पानावर "नवीन सदस्य खाते उघडा" असा दुवा दिसेल (किंवा हा बघा http://www.maayboli.com/user/register) तिथे जावुन सदस्य नोंदणी करता येईल. नोंदणी करुन झाल्यावर तिथे नवीन सदस्याने दिलेल्या इ-मेल पत्त्यावर वर 'ऍक्टीवेशन की' पाठवली जाईल ती वापरुन मायबोलीवर त्या सदस्याला पहिला प्रवेश करता येईल. कधी कधी ऍक्टीवेशन की इ-मेल द्वारे मिळायला थोडा वेळ लागु शकतो. तसेच ती इ-मेल स्पॅम फोल्डर मध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

परवलीचा शब्द व वापरावयाचा शब्द एनटर केल्या नंतर " काहीतरी गडबड असल्याचे सांगितले जाते.अनेकदा प्रयत्न करुनही जमत नाही. तरी कृपया मार्गदर्शन व्हावे. त्यात ई-मेलच्या पत्त्याशी जुळणारा शब्द द्यावा असे सांगितले जाते. याचा अर्थ काय.

माझा मित्र आधीच आपणाकडे सभासद झाला असल्यास ते कसे बघावे. मित्राचा ई-मेल आय डी "एचपांडुरंगदिवेकर्@याहू.कोम" असा आहे. आपणा कडून मदतीची गरज आहे.

हेमंत पुराणिक,
बहुदा तुमचे मित्र प्रथम लॉग इन करतांना मायबोलीकडुन इ-मेल ने आलेली 'ऍक्टीवेशन की' जश्याच्या तशी न टाकता चुकीची टाकत असावेत. ते ती की बरोबर टाकत आहेत याची कृपया खात्री करुन घ्याल का?
तसेच इथे कोण सभासद आहे हे तुम्हीसुद्धा बघु शकता. ते बघण्यासाठी डावीकडे 'मायबोलीकरांची सूची' नावाचा दुवा आहे त्याचा वापर करुन तुम्ही एखाद्या सभासदाचे मायबोलीवरचे वापरायचे नाव (युजर नेम) शोधु शकता.
इथे फक्त hpandurang नावाचे सभासद सापडले, तुम्ही सांगीतलेल्या नावाने नाही, कदाचित तुमचे मित्र त्यांचे स्वतःचे लॉग इन नेम विसरले नाहीत याची पण खात्री करु शकाल का?

माझ्या मित्राच मायबोली वरच नांव एचपांडुरंग असेच आहे पण तो परवलीचा शब्द विसरला आहे. तो शब्द आता त्याला नव्याने टाकावयाचे आहे. तर तो कसा टाकावा.

नवीन परवलीचा शब्द मागवण्यासाठी
१. नेमस्तकांना इमेल लिहून पासवर्ड पुन्हा मागवा, खालील दुवा वापरुन इमेल लिहा. हा घ्या दुवा
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/board-profile.cgi?action=forgot
२. नवीन पासवर्ड भरा. (तोच पुन्हा दिला तरी चालेल)
३. इमेल मधे आलेली Activation Key लिहा.
४. मायबोलीवर लॉगीन करा.

मायबोलि च्या सर्व सभासदान्ना बोर्गाव च्या चिटनिसान्चा नमसकार...

मला Orange County ला येउन ४ आथवळे झालेत आणि ह्य वेबसाइट ला पाहुन खूबच आन्न्द झाला.

orange county मध्ये राहणारे मराथी माणुस मला नक्किच पत्र लिह्य.

सँटीनो,
मायबोलीवरच्या कुठल्याही सदस्याला (ऍडमिनना पण) वैयक्तिक निरोप पाठवण्यासाठी ज्या सदस्याला इ-मेल करायची आहे त्या सदस्याच्या प्रोफाईल मध्ये जावुन संपर्क या टॅब वर टीचकी मारा. तिथे लिहुन मग त्या सदस्याला मायबोलीवरुन वैयक्तिक इ-मेल पाठवता येते.
अमित,
मायबोलीवर आपले स्वागत आहे. आपल्याला सगळ्या गावांचे गप्पांचे पान हितगुज विभागात 'माझ्या गावात' या विभागात मिळतील.
हे बघा http://www.maayboli.com/hitguj/index.html

@palli
>काही मायबोलीकर प्रतिसादमध्ये स्फोटक आणि गलिच्छ मराठी वापरत आहेत.

कृपया कुठल्या पानावर आणि कोण वापरत आहेत ते सांगू शकाल का म्हणजे आम्हाला पाहता येईल.

http://www.maayboli.com/node/4689 वरती raw ची विधाने पहा.

अजुन कुठेतरी होते. पण बहुधा ऍडमिन ने आधीच काढलेले दिसतेय. त्यासाठी धन्यवाद.

मदत समिती..

मी प्रकाश चित्र विभागात 'कोकण- हिरव्यागार माडांपासून सोनेरी सूर्यास्तापर्यंत विविधरंगी प्रवास..' या शिर्षकाखाली काही फोटो upload केले आहेत. पण काही माबोकरांच्या मते ते दिसत नाहीयेत. काय करता येईल?

धन्यवाद..

किरु, मला एकच फोटो दिसत नाही. वरुन पाचवा, konkan.jpg. बाकीचे दिसत आहेत. ती इमेज तुमच्या खाजगी जागेत नक्की आहे का पहा.

लालू, मी तो फोटो पुन्हा नव्याने अपलोड केला आहे. आता दिसतोय का?

मला ग्रिटीग काड् हावि आहेत प्लिज मला मदत करा

माझं रंगीबेरंगी पान मला कसं सुरू करता येईल? त्याची कानोकानीमध्ये दखल घेतली जाईल असं कसं करता येईल?

काही क्लिष्ट मराठी शब्दांसाठी मला योग्य इंग्रजी पर्यायी शब्द हवे आहेत. Marathi into English Dictionary मध्ये सापडत नाहीत. कारण तत्त्व व परिणाम, यज्ञविद्या, ज्ञाता-ज्ञान-ज्ञेय, समाज शासन शास्त्र, याज्ञिक प्रात्यक्षिके वगैरे. या शब्दांमागे जो भारतीय संदर्भ आहे त्याचा विचार रूढ डिक्शनरींमध्ये घेतलेला दिसत नाही. शब्दश: भाषांतर नको आहे, संदर्भानुसार भावार्थ कुठे मिळेल?
मायबोलीवर नेमक्या कोणत्या विभागात सर्व मायबोलीकरांना मी हे विचारू शकते? कसं?

mala PERT / CPM - Critical Path Method ya vishayavar marathitune mahiti havi aahe , konala mahit aslyas dya pls.

मला मायबोलीचा पोष्टल पत्ता हवा आहे. मिळेल कां?

नूतन आणि मनुरुची, इथे डाव्या बाजूला किंवा वर निळ्या पट्टीवर 'हितगुज' लिन्क आहे ती क्लिक केल्यावर 'विषयानुसार हितगुज' टॅब दिसेल. त्यातून तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे त्यासाठी योग्य ग्रुप, लेखनाचा धागा निवडा. नूतन, शब्दार्थांबद्दलचे प्रश्न सध्या इथे विचारु शकता-
http://www.maayboli.com/node/2229

मला
क्शणो क्शणि पठे परि बळे उडे बापडि..
हि कविता हवी आहे कोठे उपलब्ध होईल
धन्यवाद
राजन

नवीन .. म्हणजे आजपासुन केलेला दृश्य बदल छान आहे.... पण माझ्या संगणकावर Win98 असल्याने असेल पण ईतर सभासदांच्या नावाच्या जागी फक्त चौकोन दिसत आहेत. याला काय उपाय?

मला माझं अकाऊंट डिलीट कारायचे आहे. काय करू?

Admin,
maayboli ughadataanaa malaa baryaach 'runtime' errors yetaahet. (javalpaas 10) Aani mi Marathitun type karu shakat naahiye. (CTRL +\ kaam karat naahiye). kasaa solve karataa yeil haa problem?

ऍडमिन,
मायबोलीचं नविन रुप आवडलं. Happy
पण मला मायबोलीकरांची सुची सापडत नाहीए.

Pages