मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

दक्षिणा, याच पानावर (मदतपुस्तिका) वरच्या बाजूला ही सूची दिसते आहे बघ. Happy

धन्यवाद जीडी... Happy
सापडलं...

मला अन्न वै प्राणा चे भाग १ आणि २ दिसतात, पण तिसरा भाग दिसत नाही. पानावर जायची मुभा नाहिय, पण गृप कुठचा तेही कळत नाही. कृपया मदत करा

साधना

ashbaby,
तिसरा भाग लेखकाने अजुन प्रकाशीत केलेला नाही आहे.

मग त्याचे शीर्षक का दिसतेय?? तेही नको ना दिसायला....
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

ashbaby,
मी तो लेख अजून पूर्ण केलेला नाही. नवीन मायबोलीत कदाचित तो चुकून
दिसत असेल. येत्या आठवड्यात मी तो पूर्ण करतो. म्हणजे दुव्याचा प्रश्न येणार नाही. Happy
***
अजनबी सा, दोस्त सा, दुश्मन सा ये बहरूपिया
मेरे अंदर कोई बतलाए खुदा-रा कौन है?

मॉड्स, मी एक पूर्वी अपूर्ण असलेलं ललित पूर्ण केलंय (कोण होतास तू.. कोण होतीस तू ) पण ते नवीन लेखन मधे दिसत नाहीय.. ते तिथे हलवता येईल का प्लीज?

मुक्ताताई तुमचा इ मेल आयडीही द्या
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

मला माहिति हवे लहान मुलानच्या आहारा वर. माझि मुलगि ३ महिन्याचि आहे, तिचि आइ कामावर जाते.
doctor said not to give other than milk for 6 mths & no bottle feed use spoon instead of bottle. Can anybody help me on this?
निलेश म्ह्स्के

प्रशासक यांस - प्रकाशचित्र अपलोड कसे व कुठे करावे

मदत समिती, आपली विचारपूस एका झटक्यात "पुसायची" झाली तर काही करता येईल का? की एक चिमणी आली... सारखं एक एक डिलिटावं लागतं?

दाद, 'एक चिमणी आली...' सारखंच. Happy ठराविक दिवसांनी जुन्या विचारपुशी आपोआप डिलीट होतात. स्वतः करायचे असेल तर एक एक डिलीट करावी लागते.

देवाजिने करुना केलि हि कविता हवि आहे

मधुरा दी क्षित यांस - या कवितेची काही कडवी खाली दिली आहेत. आणखी असावीत परंतु
माहीत नाही. ही कडवी जयवंत दळवी यांच्या "सारे प्रवासी घडीचे" या पुस्तकात पान १९ वर आहेत
कवितेचे नांव - भाताचा हंगाम
देवाजीने करुणा केली |
भाते पिकुनी पिवळी झाली ||
देवाजीच्या नावा घेऊनी |
तयार व्हा रे करू कापणी ||
खसाखसा मग विळा चालवा |
चूड कापुनी घाला अडवा ||
कापा कापा झटुनी सारे |
कडपांचे मग बांधू भारे ||

मदत समिती, मायबोलीकरांची सुची फक्तं "मदत पुस्तिका" ह्याच पानावर दिस्तेय.... मला जरा 'ढुंढो ढुंढो रे साजना...' करीत इथे तिथे क्लिकक्लिकावं लागलं... सापडली म्हणा पण तिथे का असावी कुणास ठाऊक?
अजून कोणत्या पानांवर संयुक्तिक होईल?
'हितगुज' वर सुद्धा दिसली तर?

मला ईंग्रजी - मराठी डिक्शनरी हवी आहे ती कोठे मिळेल

माझी २२ मे २००६ रोजी "बकुळी" व ६जानेवारी २००९ रोजी " गंधित केवडा " असे दोन काव्य संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. हे काव्य संग्रह बळवंत पुस्तक भंडार, पोर्तुगिज र्चच च्या समोर्,जगन्नाथ शंकर सेठ मार्ग, गिरगाव मुंबई ४००००४ येथे उपलब्ध आहेत. कुणी रसिक घेण्यास उत्सुक असल्यास ९८६९२५८५८४ या भ्रमण दूरसंपर्कावर संपर्क साधावा ही विनंती. ही बातमी मला सर्व सभासदांना देता येईल कां? मला माझ्या ई-मेल वर कळ्ल्यास मी आपला खुप आभारी राहिन.

हेमंत पुराणिक,
तुम्हाला मायबोलीवरच्या जाहीरात विभागात या काव्यसंग्रहांबद्दल लिहीता येईल म्हणजे सगळ्या मायबोलीकरांना ती जाहीरात वाचता येईल. मायबोलीच्या मुख्य पानावर हा विभाग तुम्हाला सापडेल.

मला सारेगामापा लिटिल चँप्सचा बीबी कुठे दिसतच नाही. गायबला की काय??
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

मदत समिती -
प्रकाशचित्र कसे व कोठे अपलोड करावे / खाजगी जागा येथे करून पाहिले परंतु अपलोड होत
नाहीं.

डी व्ही सामंत,
"माझे सदस्यत्व" या विभागांतर्गत असलेल्या "खाजगी जागा" या उपविभागात तुम्हाला प्रकाशचित्रांना साठवण्याची सोय आहे. लेखन करताना जिथे प्रकाशचित्र हवे असेल, तिथे मजकुराच्या खिडकीखाली "मजकुरात image किंवा link द्या" असा दुवा आहे त्यावर टिचकी मारा. उघडलेल्या नवीन खिडकीत वरील भागात तुम्ही साठवलेली सर्व प्रकाशचित्रे दिसतील. त्यातील हवे ते निवडून अगदी उजवीकडील Add दुवा वापरा.
स्वत:ची प्रकाशचित्रे टाकण्यासाठी गुलमोहोरवर प्रकाशचित्र विभाग आहे. त्या विभागात चित्र डकवण्यासाठी 'नवीन लेखन करा' हा दुवा वापरुन नंतर प्रकाशचित्र हा विभाग निवडावा.

मदत समिती - प्रकाशचित्र अपलोड करण्याविषयी - मूळ प्रकाशचित्र फार मोठे - १२२८ केबी - असल्याने
अपलोड होत नव्हते. आकार कमी केल्यानंतर होत आहे. मदतीबद्दल धन्यवाद

नवीन मायबोलीतले सगळे ग्रुप्स कुठे बघायला मिळतिल ? मी काही ग्रुप्सची सभासद आहे पण स्वगृह वर सुद्धा त्याची यादी दिसत नाही.. आधी गृप्स अशी लिंक असायची कुठेतरी, आता अनेक दिवसांनी आले आहे पण आता सगळंच आणखी नवीन नवीन वाटायला लागलं आहे. Sad काय करू ?

सोनचाफा,
वर हितगुज असे लिहीलय तिथे टीचकी मारल्यावर तुम्हाला हितगुज-विषयवार असा दुवा दिसेल, त्या टॅबवर टीचकी मारुन तुम्हाला मायबोलीवर असलेले सगळे गृप दिसतील.

>>मी काही ग्रुप्सची सभासद आहे पण स्वगृह वर सुद्धा त्याची यादी दिसत नाही..
सोनचाफा, ती यादी 'माझे सदस्यत्व' लिन्क वर 'माझे हितगुज' विभागात दिसते.

नमस्कार.
मला गेल्या काही दिवसांपासून मायबोली होमपेज वरची आणि इतरही काही चित्रं दिसत नाही आहेत. त्याऐवजी तिथे लाल फुली येते.

उदा.
होमपेजवरची ही लिंक पहा - http://www.maayboli.com/files/imagecache/thumbnail//files/u11571/jerbera...

या लिंकमधून जर मी www काढून फक्त http://maayboli.com एवढंच ठेवलं तर मला ते चित्र दिसतं.
http://maayboli.com/files/imagecache/thumbnail//files/u11571/jerbera.jpg

ह्यात दोष माझ्या ब्राउजर चा आहे की कसला आहे? कारण माझ्या घरी ही सगळी चित्र व्यवस्थित दिसतात. ऑफिसमधे ही साइट ब्लॉक नाहीये मग काही चित्र दिसतात आणि काही दिसत नाहीत हे कशामुळे होत असेल?

मला एक कविता हवि आहे.........सर आला धाउनि काल , विव्हलला श्रावन बाल .....
हि एक फार जुनि आनि सुन्दर कविता आहे...

लालु आणि मदत समिती धन्यवाद ! दोन्ही गोष्टी जमल्या.. Happy

Pages