बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरुणची कविता वाचायची आज अखेर वेळ आली..
नको नको म्हणताना आज अखेर वेळ आली
वेळ आली होती पण काळ आला नव्हता..
अरुणला दोनपेक्षा जास्त कविता पाडायला वेळ नव्हता
वेळ आली होती पण काळ आला नव्हता..
जुमेच्या प्रलोभनांना अरुण बळी पडला नव्हता..
अरुणची कविता वाचायची आज अखेर वेळ आली..
नको नको म्हणताना आज अखेर वेळ आलीच
कुणाच्या अंगावर रोमांच.. कविता वाचून
कुणाच्या अंगावर शहारा ,
अरुणचा वाचणार्‍याच्या हृदयावर दरारा...
कुणी म्हणेल बाडगांवकर
पण मला आठवले थारप..
बघता बघता मला दरदरुन घाम फुटला
कागदही व्याकूळ टर्टरा फाटला..
त्याला त्याच्या कवितेला हा सलाम वाटला
अरुणची कविता वाचायची आज अखेर वेळ आली..
नको नको म्हणताना आज अखेर वेळ आली

(मिटलेले डोळे उघडून,)
सुमनलता,
छान लिहीलंत तुम्ही. पण काही काही जागांना शब्द कमी पडले. तुमचा हात थोडासा कापतोय का? म्हणजे' दरदरुन घाम फुटला' लिहीताना तुमच्या कपाळावर घर्मबिंदू साठलेले स्पष्ट दिसत होते. आज बर्‍याच दिवसांनी काव्यसुमने लिहीलीत म्हणून झालं असेल. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. संतश्रेष्ठ अमुकदेवांनी याच अर्थाचा एक अभंग लिहीला होता.
गुलमोहराच्या दारी उभा क्षणभरी
तेणे मरणे सारी पाहियेला..
तर या अभंगाला मी चाल लावत होतो. तेव्हा यातला 'पाहियेला' हा शब्द मला तितकासा योग्य नाही वाटला. म्हणून मी तत्कालीन संदर्भग्रंथ चाळले. तर त्यात 'कवितार्थनकोना' या खंडात मला असे कळाले की या अभंगात मूळ शब्द 'पाहियेला' नसून 'साहियेला' आहे. म्हणजे, गुलमोहराच्या दारात उभे राहून जितक्या काही (च्या काही) कविता दिसतात त्या पाहून बिचार्‍या वाचकाला साक्षात मृत्यूच्या दारात उभे असल्याचा भास होतो. त्याच्या अंगाला दरदरुन घाम फुटतो , अंगाचे पाणी पाणी होते. या अभंगाचा अर्थ मला इतका आवडला की मी त्याच अर्थाच्या अजून दोन कविता केल्या. त्या दीदी कडून गाऊनही घेतल्या. त्याचेही फार रंजक किस्से आहेत. ते सांगेनच पुढल्या खेपेला. शेवटी उच्च अभिरुची ही कोणत्याही काळाची गरज आहे. तुमचीही कविता त्यातलीच आहे. तुम्ही 'बहिरी ससाणा' किंवा 'धूमकेतू' आहात. म्हणजे रोज कविता टाकणार्‍या कवी म्हणजे चिमणी कावळ्याप्रमाणे नसून कधीतरीच उगवणार्‍या, पण आपल्या धडाकेबाज आगमनानेच सर्वांचे लक्ष वेधून घेणार्‍या 'बहिरी ससाणा' किंवा 'धूमकेतू' प्रमाणे तुम्ही आहात. तुमचे अभिनंदन.
(माईक ठेवून डोळे मिटले.)
निद्रयनाथ चंगेशकर.

(सदर लिखाण हे फक्त मनोरंजना साठी लिहीलेले असून त्यात कुणाची खिल्ली उडवून कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. )

मधुकर यांनी विदर्भच्या फलकावर ताडोबा अभयारण्याबद्दल विचारले असता हे लिहिले आणि मला त्यांचा हा अनुभव वेगळा वाटला म्हणून मी इथे त्यांचे ते पोष्ट डकवत आहे:

ताडोबाला कधी गेला अहात का>> १०-१२ वर्षा आधी गेलो होत. पण आमच्या आल्लापल्ली-भामरागड-कुडकेल्लीच्या तुलनेत ताडोबाचं रान म्हणजे आम्हाला शहरच वाटतलं होतं. ताडोबातले प्राणि ब-यापैकी माणसाळलेले आहेत, खरा रानटी वाघ बघायचे असल्यास बिनागूंडा-कुव्वाकोडीला जावे. आमच्या कुडकेल्लीत पण वाघं (अनेकवचन) असायचे पण आता संख्या कमी झाली. कांदोळिच्या पेंदयात ( Forest plantation ) आजही सगळे प्राणि दिसतात. अस्वल मात्र बांडिया नदीत हमखास दिसते. कारेमपल्लीला कियेर नाल्यात वाघ नेहमी पाणि पिण्यासाठी येतो, एकदा आम्ही वेटांग ( माकडाची शिकार ) करायला गेलो होतो व वाघाशी गाठ पडली. अस्सल रानात वाढलेले व माणसाशी फारशी गाठ न पडलेले प्राणि बघण्याची मजा औरच असते, पण हमला होण्याची शक्यताही तेवढीच जास्त. चंद्रपुरला शिकताना बरेच वेळा रात्री ९ नंतर गावाला जाण्याची वेळ आली, तेंव्हा वाघ व अस्वल आमच्या गाडी समोर आलेल्या ब-याच आठवणी आहेत, नंतर नंतर रात्री गावाला जाणे टाळु लागलो. तडस तर आमच्या घरात ( शेळ्यांसाठी घराला लागुनच बांधलेलं स्पेशल घर ) शिरुन शेळ्या पळवुन न्यायचा, नंतर आम्ही मशाल पेटवुन तडसाचा पिच्छा करायचो, फार दुरवर ओढुन नेणे न जमल्यामुळे जवळच कुठेतर त्या तडसला गाठुन मेलेली शेळी सोडवुन आणायचो व दुस-या दिवशी गावात मटन बनवुन स्वतात विकायचो. आमच्या शेतात ( गावातिल सगळ्यांच्याच) तर वाघा पासुन ते वानरा पर्यंत सगळ्याच प्राण्याचा संचार असायचा. रान डुक्कर व अस्वल हे दोन प्राणी मात्र धसका ध्यावा एवढे भयानक, रान डुक्कर जिवे मारतो तर अस्वल नाक, कान, डोळे व गुप्तांग खाऊन जीवंत सोडून देते, फार वाईट प्रकार असतो हा.

झक्कींनी सॉलीड सिक्सर हाणलाय हुडाच्या बर्‍यापैकी बॉल वर! (पायरेटेड सिनेमा या धाग्यावरुन)

रॉबीनहूड | 30 December, 2009 - 03:15
झक्कीबोवाजी , हा घ्या नेहलेपे देहला.. !!

साहेबः- हे काय कुठे चकाट्या पिटायला गेला होतात?
कारकूनः- साहेब केस कापायला सलूनम्ध्ये गेलो होतो.
साहेबः- खुशाल ऑफिसच्या वेळात केस कापायला जाता? लाज नाही वाटत?
कारकूनः- पण साहेब, ते केस ऑफिसच्या वेळेतच वाढलेले होते ना?

म्या हानलाय सिक्सर

झक्की | 30 December, 2009 - 10:23
रॉबिनहूड, जरा जपून. उद्या मुलगा आजारी आहे, किंवा शाळेत नाटकात काम करतो आहे, म्हणून सुट्टी मागितलीत तर साहेब विचारेल, म्हणजे मुलगा पण ऑफिसमधेच...?

देवा | 13 January, 2010 - 11:57
सुबुधवार लोकहो
खास बुधवारनिमित्त धुंद रविच्या एक चांगल्या ललित चे विडंबन
====

आज ती घेणार नसते.

आज ती घेणार नसते
पण न घेताही ती प्रत्येक ग्लास उचलत असते कारण तिच्या कंपनीशिवाय मी एक ग्लासही घेत नाही

आधीच मी अस्वस्थ असतो आणि नेमकं तेंव्हाच
ती अगदी नेहमी घेते त्याच ब्रँडची अॅड रेडिओवर लागते
मी जरा जास्तच अस्वस्थ होतो

हे असं झालं की माझे पाय माझ्याही नकळत आम्ही नेहमी जिथं बसतो त्या बारकडे वळतात
पण आम्ही नेहमी ज्या जागी बसतो त्या जागेवर आज दुसरंच जोडपं बसलेलं असतं
मी गोठलेल्या बर्फासारखा कोपर्यात जाऊन बसतो
मगतिची जास्तच गरज भासायला लागते
................................. नेहमीपेक्षा जास्त
पण आज ती घेणार नसते

मग कोणीही रिचवत नसलं तरी मला एकट्याला चकण्याचे वास येऊ लागतात
तलफ जास्त असेल तर बिअरचेसुद्धा येतात
बहुतेक मी बेवडा झालोय असं मला वाटायला लागतं आणि मी खुप बेचैन होतो

माझ्या नजरेसमोरून बिअरचे कॅन मिरवत एक तरूण जातो
खरं तर इतर वेळेला मला त्याचं अस्तित्वही जाणवत नाही, माझ्यासाठी बिअरवाला, वाईनवाला आणि व्होडकावाला सारखेच दिसतात
पण आज तो बिअरवाला टाईट होऊन पडेपर्यंत मी त्याच्याकडे पहात राहतो
तो शुद्ध हरपतो तरीही कॅनमध्ये बिअर उरलेलीच असते

मी उठतो आणि बारमधून बाहेर जायला निघतो, दरवाज्यापर्यंत येतो आणि डोकं खुप जड होतं
मी मागे वळून पहातो आता आमच्या जागेवर कुणीच बसलेलं नसतं
मी धावत पळत त्या जागेवर येतो, बसतो आणि बेवड्यासारखा उचकी देखील देतो
आजुबाजूच्या परिस्थितीची जाणीव झाली की ओशाळतो
मग तिथं बसवत नाही... मग उठतो. पण निघवत नाही...मग पुन्हा बसतो.
असं ब-याचदा झाल्यावर मला काय होतय हे मलच कळत नाही.
खुप प्रयत्न करुन मी स्वत:ला समजावतो आणि पायात जीव गोळा करुन जायला निघतो...
कारण माहित असतं.. आज ती घेणार नाहिये

पण
पण ती प्यायलेली असते.. खरंच प्यायलेली असते
चेहर्यावरचा आनंद आणि वेदना लपवत धावत मी तिच्या जवळ जातो
तिच्या डोळ्यात तर तेवढिही शुद्ध नसते

आम्ही आमच्या जागेवर येतो
इतक्या वेळात ती काहीच बरळलेली नसते
माझ्या ग्लासवर ग्लास आपटत ती इतकच म्हणते
...................' अजून एक पतियाळा आण ना'

आणेन.. मी पतियाळा आणेनही
पण मी बेवडा नाही
कारण बिअरचा वास मला एकट्यालाच येत नाही
त्याची नशा तिच्याही आयुष्यात आहे

माजी आवडती मालिका (टीवीवरची) - या विशयावरचा रमणीचा निबंद.

माजी आवडती मालिका, टीवीवरची

माज्या टीवीवर बर्याच गोश्टी आहेत, माजा नवरा त्याला पसारा असे म्हनतो. त्या गोश्टींपैकी एक आहे माजी मोत्यांची माळ. ह्याला मोउक्तीक मालिका असेपन म्हण्तात. मला ही मालिका आवडते.
मुघलेआजम पिकचरमधेपण मधुबालाला मोउक्तिक मालिका दिली होती दिलिपकुमारने. ती नाच करायची. मी नाच करत नाही. माजी मालिका मी स्वतःच घेतली आहे.
माजी मैतरीण म्हणाली हे मोती कलचर्ड आहेत म्हणुन ही मालिका सुन्दर नाही. (ति जळकीच आहे भवानी अस काहीजणी तिच्यबद्दल म्हणतात.) तिच्याकडे नेपाळी मोउक्तिक मालिका आहे. नेपाळ एक छोटा देश आहे. मी नेपाळला गेले नाही. तिकडे खुप थंडी असते. तिकडे पशुपतीनाथ मंदीर आहे. पशुपतीनाथ म्हणजे शंकर. शंकर मोउक्तिक मालिका वापरत नाही. तो रुदराक्ष माळा घालतो अस सगळे म्हणतात. मी त्याला पाहिले नाही.
मी टीवीपण पहात नाही. पण त्यावरची मोउक्तिक मालिका पहाते आणि कधी कधी घालते. ति नेहमी टीवीवरच असते असा तिचा टीवीशी संबंद आहे. काही लोक याला बादरायण संबंद म्हणतात. पण बादरायण्चा संबंद बदरीनाथशी आहे, तिथे शंकर नाही, तो नेपाळला आहे. तिकडे मोती मिळतात. अशी माझी मोउक्तीक मालिका आवडती आहे.

मीनू | 22 January, 2010 - 10:15
विशेष काव्यवर्गः १
शिक्षीका: मीन्वाज्जी
धडा पैला: वृत्तकाव्य उगम, विकास आणि वाद.
मुलांनो, सध्या एक नविनच प्रकारचा काव्यप्रकार निर्माण झाला आहे आणि आज मी तुम्हाला त्याची ओळख करुन देणार आहे. तर या काव्य प्रकाराचे नाव आहे 'वृत्तकाव्य' हे काव्य दु:खवृत्तात असते आणि बहुतांश वेळा मुक्त छंदात लिहीले जाते. या काव्य प्रकारातली काव्य करण्यासाठी तुम्हाला समाजाभिमुख असावे लागते. समाजाच्या दु:खाची जाण असावी लागते. तसेच रोजच्या रोज वृत्तपत्र वाचावे लागते.

'वृत्तकवी' हे अत्यंत सन्माननीय असतात. त्यांनी आपल्या काव्यप्रतिभेचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी प्रबोधनासाठी करायचे व्रत घेतलेले असते. आम्हाला अशा कविंबद्दल अत्यंत आदर आहे.

आता हेच पहा एक उदाहरणः इसवी सन १९०९ मध्ये वृत्तपत्रात एक बातमी: अल्पवयीन मोलकरणीस छळले.. अशी होती. ही बातमी वाचताच प्रसिद्ध दिवंगत वृत्तकवी स. स. हळवे यांच्या ओठातून चिरंतन काव्य स्फुरले. तुम्हा सर्वांना माहीत असलेली ती सुप्रसिद्ध कविता म्हणजे "छळू नका त्या बाळा.. त्या फुलासवे सांभाळा..त्या छळणार्‍यांना जाळा.." लहान बाळासाठी अतिशय हळवा होणारा कवी त्यांचा छळ करणार्‍यांना जाळा म्हणण्याइतका कठोर होतो. हीच कवीची कवितेची ताकद.

वृत्तकाव्य करणार्‍यांवर टीकाही काही कमी झालेली नाहीये. एका अशाच टवाळखोर आज्जींनी वृत्तकवींवर टीका करताना एक लावणी लिहीली आहे. त्यातील काही भाग खाली उद्धृत करीत आहे. वृत्तकवींना त्रास देणार्‍या या आज्जींचा मी त्रिवार निषेध करते.

लावणी : ना ना तुम्ही पेपर वाचू नका
वृत्त: दु:ख
छंद: मुक्त

काका तुम्ही पेपर वाचू नका
ओ ना ना तुम्ही पेपर वाचू नका
दा दा तुम्ही पेपर वाचू नका

सकाळी उठून तुम्ही घेता हातामधी पेपर
घरोघरी मायबोलीकर कापती थरथर
कापती थरथरऽऽऽऽ

ओ काका तुम्ही पेपर वाचू नका हो.

उघडता पेपर तुम्ही पाहता पान ते तिसरे हो तिसरे
वाचताच दु:ख तुम्हास स्फुरती मिसरे..
पाहता पाहता कविता की हो स्फुरे
हो जी जी जी ऽऽऽऽऽ
दिसताच मशीन 'ती' कविता छापू नका

ओ ना ना तुम्ही पेपर वाचू नका
दा दा तुम्ही पेपर वाचू नका

पण या असल्या टिकांनी वृत्तकवी डगमगणारे नाहीयेत आणि त्यांनी नुकतीच 'काव्यबातमी' हे काव्यमय वृत्तपत्र सुरू केले आहे. उदाहरणादाखल यातील एक बातमी पहा. गद्य वृत्तपत्रात आलेली "चितळेंनी दुधाचे भाव वाढवले" ही बातमी काव्यबातमीच्या ३७ तारखेच्या अंकात खालीलप्रमाणे छापली होती.

कळविण्यास होतो खेद अत्यंत
परी सांगावे लागेल
उद्यापासूनी दुध लिटरमागे रुपयाने वाढेल
आता मोजा रुपये तीस, एक लिटर दुधास
सांगूनी गेले चितळे, आमच्या संपादकांस.

असो तर मुलांनो या काव्यप्रकाराची तुम्हाला ओळख करुन देताना मला अत्यंत आनंद झाला. तुम्हीही "वृत्तकवीं"चा योग्य तो 'सन्मान' कराल याची मला खात्रीच आहे. 'वृत्तकाव्य आनंदी बातम्यांवर कसे लिहाल?' यावर सध्या संशोधन सुरू आहेच.

(तळटीप: वरील लेखन जमल्यास हलकेच घ्यावे तसे जमत नसल्यास जडच घ्यावे लागेल.
धोक्याची सूचना: खट्याळ आज्जींच्या काव्यावर प्रतिक्रीया (चांगली अथवा वाईट) दिल्यास त्या नविन काव्य करतात. त्यामुळे आज्जींपासून सावध.)

देवा | 22 January, 2010 - 10:34
हर्डिकर बाई.. एक शंका.. सध्या अजून काही कविप्रकार आमच्या कानी येत आहेत. उदा. वृत्तांत कवि, आवृत्त कवि, अनावृत्त कवि.. हि सगळे वृत्त कविंचेच प्रकार का?

मीनू | 22 January, 2010 - 10:53
देवा, बाळा तू सांगितलेल्या कविप्रकारांपैकी वृत्तांतकवी हे वृत्तकवींचेच भाऊबंद असून ते कुठल्याही प्रकाराचा वृत्तांत काव्यातून सांगू शकतात. या काव्यप्रकाराला 'वृत्तांतकाव्य' असे वेगळे नाव न देता ते वृत्तकाव्याचा एक प्रकार म्हणून धरले जाते. प्रसिद्ध दिवंगत वृत्तकवी स. स. हळवे यांच्या अंत्ययात्रेचा वृत्तांत (दु:खाष्टक) १९२७ सालच्या "काव्यबातमीपत्रात" पहील्याच पानावर लिहीला होता. उदाहरणादाखल दोन ओळी देते.

"आज सकाळी हळवे झाले परलोकवासी
जमले सारे देण्या निरोप वैकुंठासी"

आवृत्तकवी आणि अनावृत्तकवी हे प्रकार मात्र थोडे वादातीत आहेत. काही खट्याळ लोक अनावृत्तकवी हा अश्लिल काव्यप्रकार आहे असा खोटा प्रचार करतानाही दिसून येतात. परंतू हे कवींचे प्रकार आहेत आणि काव्यप्रकार नाहीत.

नंद्या | 22 January, 2010 - 11:37
मीनू आज्जी, वृत्तकाव्य हे मुक्तछंदातच लिवले जाते काय ?

मीनू | 22 January, 2010 - 11:44
वृत्तकाव्य हे मुक्तछंदातच लिवले जाते काय >>> नंदू बाळा, तसं काही नाहीये. वेगळ्या वेगळ्या छंदात लिहीलेली वृत्तकाव्य उपलब्ध आहेत (च्या मारी मला येत नाय राव छंदबद्ध लिहीता. हे विध्यार्थी पन कदी मदी अस्ले नको ते प्रस्ण इचारुन घोटाळा करतात. ) त्यावर मी सविस्तर भाष्य विशेष काव्यवर्गः १० मधे करणार आहे. तोवर तुमचा हा प्रश्न तुम्ही बाजूला लावून ठेवा.

आजचा पाठ:
चला बरं तुम्हाला हा काव्य प्रकार कळला आहे का हे समजून घेऊ. आजच्या गद्य वृत्तपत्रातील एकेक बातमी घ्या आणि त्यावर किमान चार ओळींचे काव्य लिहा. मी येतेच थोड्या वेळात तपासायला.

मीनू | 22 January, 2010 - 11:51
गेल्या वाटतं बाई पाठ देऊन. मी टवाळ आज्जी, तुम्हाला काव्य लिहायला सोप्पं जावं म्हणून कृती देत आहे.
१. आजचा पेपर उघडा.
२. अत्यंत दु:खद आणि महीला वर्गाला हळवी करणारी बातमी शोधा
३. या बातमीशी संबंधित लेख, स्फुट, कविता, बातम्या सर्व वृत्तपत्रातून शोधून शोधून वाचा. हे करताना चंगल्या, काव्यमय, जड ओळींखाली पेनाने रेघा ओढा अथवा दुसरीकडे ती वाक्ये लिहून घ्या.
४. आता या विषयावर दोन चार हळव्या लोकांशी सखोल चर्चा करा. पुन्हा जड, चांगली, काव्यमय वाक्ये लिहून घ्यायला विसरू नका
५. इतके झाल्यावर आपल्याकडे या कवितेसाठी लागणारी सामुग्री तयार आहे.
६. वरील सर्व ओळी एकाखाली एक लिहा, यमक जुळवता आल्यास उत्तम.
७. वरती मायना लिहा, उदा, बाळा, ताई, प्रिये.. जो योग्य असेल त्यानुसार लिहावा. मायना हळवा भावनांना आव्हान देणारा असावा.
८. सर्वात उत्कृष्ट ओळ शेवटी लिहायला विसरु नका हं!

तर लागा कामाला..
तुमचीच
टवाळ आज्जी.

नंद्या | 22 January, 2010 - 12:30
परवाच गमनागमन्निरोधकत्रिबल्बधारीवीजसंचालक-रहित रस्त्यावरून चारचाकीचारदारेयुक्त चक्रचलितवाहन गतीमध्ये हाकताना, एक चिमणी येऊन धडकली, वाहनांस. त्यावर सुचलेली चार वाक्ये, मी समर्पित करतो.
यावरून माझे आकलनानाकलन कसे आहे त्यावर भाष्य करावे आणि मज गुणक्रमांकही द्यावे.

नकोस चिमणे ऊर भरू गं
नकोस चिमणे धडक देऊ
श्रीरामाचे नाम गात या
वाहनांना पार करू

किंवा

मै तो गाडी चला रहा था
सिटी बजा रहा था
गाडीसे जा रहा था, सिटी बजा रहा था
तूने धडक दे दी तो मै क्या करूं
तेरी नानी मरी तो मै क्या करूं

आणि हे एक वरिजनल [वरचे सगळे रिजनल होते]

केस उडवत, डोळ्यातून ड्रग ओकत
५० यार्डावरून धडधडत येणार्‍या
रावळपिंडी एक्स्प्रेसच्या हातातून
सुटलेला १५०मैलाचा बाउंसर....................
सचिनने अप्परकट केलाय
रवि शास्त्री घसा फाडून
आनंदाने ओरडत असताना
तो बॉल स्टँडमधल्या ज्या
वाकलेल्या प्रेक्षकाच्या
मागच्या खुर्चीवर
सुसाटलेल्या क्षेपणास्त्रासारखा घुसला
तशी आपटलीस तू,
माझ्या गाडीच्या तावदानावर
किती वाईट झाले ..... ...

साजिरा | 22 January, 2010 - 13:29
स्वाध्याय सोडवायला उशिर झाल्याबद्दल क्षमस्व करा बाई आमाला. दुसरं म्हणजे, नंद्यासारख्या हळव्या कविता जमल्याच नाहीत. मला तर नंद्या नक्की (त्या कवितांचा) पिता आहे का, त्याबद्दलच शंका आहे.

बाई, बाई; काल रात्री पिता पिता मी पण एका कवितेचा पिता झालो. पिता पिता आडवे होत असतानाच पिता झाल्यावर राहतात तसे काही प्रश्न उभे झाले. तर आधी कविता मग प्रश्न.

जेजूरीच्या गाढवबाजारात झाली एक कोटीची आवक,
सोनगीरच्या बाजारातून सोळाशे बोकडांची जावक!
धुळ्याच्या म्हैसबाजारातल्या सातशे म्हशी भाकड..
स्वारगेट चौकातल्या गर्दीची जात- नक्की माणूस की माकड?

१) तुम्ही महिला वर्गाला हळवे करण्याची अट काढणार का प्लीज? कारण म्हशींशी संबंध असला तरी महिलांचा गाढवे आणि बोकडांशी कसा जोडावा? किंवा असा संबंध जोडण्यासाठी काही क्ल्यु मिळेल काय?

२) आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रदेशांतल्या तीन-चार गावांची नावे आली आहेत. इतर गावांतले लोक या कवितेवर 'रीजनल' म्हणून शिक्का मारणार नाहीत ना? (पिता पिता पिता झाल्यामुळे ती किती 'वरिजिनल' आहे, ते तुम्ही जाणताच.)

३) यमके ही सगळ्याच ओळींची जुळली पायजेत, किमान पहिल्या-तिसर्‍या आणि दुसर्‍या-चवथ्या ओळींची जुळली पायजेत- असे एका नवकवीवर्यमित्रांनी (नवकवी नाही, तर आमचे नवीनच मित्र झालेत विपू-विपू खेळताना) आमाला सांगितले. पण मला तसे जमलेच नाही. पहिल्या-दुसर्‍या आणि तिसर्‍या-चौथ्या ओळींत यमके जुळली तर चालत नाही काय?

४) हळव्याची अट पायजेच का? कारण स्वारगेट हाच विषय फक्त आमाला हळवा करतो. बाकी एक कोटी म्हणले, की आमी आक्रमक होतो. बोकड म्हणले की घाबरतो. म्हशी हा आमचा आनंददायक विषय. माकड आमचे रोजच होते, पण हळवे वगैरे नसते ते. (माकडाबद्दल नसेल सुचत तुमाला, तर असू देत. झक्कीहेडमास्तर किंवा हुडसुपरवायझराला इचारतो.)

५) बाळा, ताई, प्रिये इ. मायने माझ्या कवितेत कसे घुसवू? (प्राण्यांना या नावाने हाका मारता येत नाहीत ना. )

कृपया मारकं द्या. (कवितेत प्राणी असल्यामुळे आणि मारकी (म्हैस), (मलई) मारके असे शब्द वापरायची सवै असल्यामुळे 'मारकं'. कृपया त्यावर फुली मारू नका.)

कविता वाचायला तुमाला प्रसन्न वाटावे म्हणून प्रत्येक ठिकाणी असे चित्र काढले आहे. समजून घ्यावे. व त्याप्रमाणे मारकं द्यावे.

कळावे, आपला विद्यार्थी.

मीनू | 22 January, 2010 - 13:32
वा! वा! नंद्या अतिशय उत्तम...
केस उडवत च्या आधी "बाळे" 'छकुले' 'मनुले' 'छोटुले' 'तान्हुले' यापैकी एक मायना घातलास तर स्त्रीहॄदयाला हात घालणारी कविता होईल. बाकी रिजनल बद्दल आपण बोलुयाच नको. श्री श्री गोविंदा यांच्या कवितेवर आधारीत दोन्ही रिजनल उत्तम आहेत. तुम्हाला माझ्यातर्फे "काव्यसुमन" (ही नवी मार्क देण्याची पदद्धत आहे. बरी कविता - काव्यपुष्प, मध्यम - काव्यसुमन, उत्तम - काव्यलता) असंच लिहीत रहा लवकरच तुम्ही काव्यलतेकडे पोहोचणार याबद्दल शंका नाही.

मीनू | 22 January, 2010 - 13:52
वा! वा! साजिरा सुंदर कविता. एकंदरीतच तळटीपा पाहता तुम्ही उत्तम वृत्तकवी होऊ शकता. जास्तीत जास्त माहीती लिहीण्याचा तुमचा खटाटोप वाखाणण्यासारखा आहे. अहो असं कसं? महीलांसाठीसुद्धा स्वारगेटची गर्दी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या गर्दीशी दोन हात करताना त्यांच्या हाताला लागतं आणि मग त्या हळव्या होतात. बाकी रिजनल आणि वरिजनल असे भेद कवितेत करु नका.. कविता असते फक्त कविता..
बाळा, ताई, प्रिये इ. मायने माझ्या कवितेत कसे घुसवू? >> मनेका गांधी समोर असं बोललात तर ती तुमचा निषेध करेल. अहो प्राणी झाले तरी ते कुणाची तरी बाळं, ताई, प्रिय असणार ना. मनेका गांधीला सगळेच प्राणी प्रिय आहेत.
तरी तुम्हाला या उत्तम प्रयत्नासाठी माझ्यातर्फे 'काव्यसुमन'

पूनम | 22 January, 2010 - 14:44
बाळेऽऽऽ (नियम आहे!)
पेस्टीत पेस्ट आलंलसणाची
सोबत कोथिंबीर-मिरची
सुटला घमघमाट
मन्जूनं केला जेवणाचा थाटमाट
जेवणानंतर दिली शशांकला पानसुपारी
प्रेमाची बै रंगतच न्यारी!
(ही खास बायकी कविता मीन्वाला समर्पित)

साजिरा | 22 January, 2010 - 14:51
मस्त पूनम.
फक्त हळवेपणाच्या अटीचं जरा बघणार का? (कोथिंबीरीचे भावाच्या बातमीचा उपयोग करून घेतला तर येईल बहूतेक हळवा रंग. बाकी त्या मंजूने जेवणानंतर दिलेल्या पानसुपारीला हळवा नसून वेगळाच रंग(त) चढल्याचे वाटते (आमाला).)

मंजूडी | 22 January, 2010 - 15:03
पण माझ्यावर केलेली कविता मीन्वाला का म्हणून समर्पित.. हा अन्याव आहे.
अश्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पूर्वजांनी काही उपाय सांगितलेत का ते बघून येते.

आशूडी | 22 January, 2010 - 15:09
मला पूनमची कविता न समजल्याने पुन्हा वाचावी लागली. यात मंजू आणि शशांक ही पात्रे आहेत ज्यांना फारसे महत्त्व नाही. आलं लसूण आणि कोथिंबीर मिरचीचा घम्घमाट कसा सुटतो? लसणाला एक विशिष्ट दर्प असतो. आम्ही आमच्या घराच्या मागे लावला आहे तो सेंटेड लसूण आहे. शिवाय मंजू ही सुगरण आहे , असे कवितेतून कळूनही त्याचा प्रत्यय अनुभवता येत नाही. विषयही नवा नाही. मला नाही आवडली ही कविता.मला पूनमचे बाकी लिखाण आवडते.. ललित, कथा वगैरे. कविता लिहीते आहेस म्हणून ऑल द बेस्ट!

मंजूडी | 22 January, 2010 - 15:18
पूनम ललित, कथा वगैरे घरून लिहीते आशू.. ही कविता ऑफिसातून पाडलीये.. लेखक तोच असला तरी लेखनस्थळाला काही महत्व आहे की नाही?

आशूडी | 22 January, 2010 - 15:22
लेखनस्थळाला काही महत्व वगैरे सर्व फॅन्सी गोष्टी आहेत. पूर्वजांचे उपाय अंगीकारले तर लेखनस्थळाचा व लेखनप्रतिभेचा शारीरीक स्पर्शापलीकडे काहीही सुतराम संबंध नाही हे दिसून येते. तुकाराम महाराज घरी ही अभंग लिहीत, दुकानात बसून लिहीत डोंगरावर जाऊनही लिहीत. कोणता अभंग कुठे बसून लिहीला आहे हे सांगता येते काय? तेव्हा हे सर्व चोचले आहेत.

पल्लवी | 22 January, 2010 - 16:03
माझी पण एक वृत्तकविता-कम-भारुड
बाई वाट कसली पाहता
पुण्यात येणारे 'मेट्रो' आता
महापौराचा व्हता लाल कंदिल
दादानं दाखविला हिरवा मंदिल
एका रात्रीत झाली 'सँक्शन'
बंगल्यावरती पार्टी रंगली 'जँक्शन' ।।१॥ हे हे हे जी जी जी रं

भन्नाट आहे! :D. आधी वरचा निबंद जबरी आणि काव्यक्लास तर धमाल. नंद्या - वरिजिनल कविता त्या अपरकट एवढीच महान. रा.ए. ला भेट म्हणून पाठव, आयपीएल मधून हाकलल्याबद्दल उत्तेजनार्थ बक्षिस.

मी मज हरवुन ह्या "भक्तीरसातील" गाण्याचे केदार ह्यांनी केलेले हे रसग्रहण:
केदार | 28 January, 2010 - 09:25
ऐकलं तरी मला भक्तीरस सापडत नाही. >> म्हणजे तुला हरिण दिसत नाही अशी गत. थोडे उलगडून सांगतो.

मी मज हरपुन बसले गं (आणखी दोनदा)
सखे मी मज हरपुन बसले गं
मी मज (आणखी दोनदा)

ह्या वाक्यात, एक बाई कुठला तरी एक्झिट चुकलेली आहे, ती फ्रिवे ने तिच्या उपनगरात असलेल्या कॄष्णमंदीरात सकाळचा नाश्ता करायला निघाली आहे. जिपीएस नसल्यामुळे तिला रस्ता सापडत नाही, त्यामुळे ती आल इज वेल च्या ऐवजी अनेकदा मी मज, मी मज असे म्हणते.

आज पहाटे श्रीरंगाने ...
साखरझोपी ...

ह्या कडव्यात ती बाई जिच्या नवर्‍याचे नाव श्रीरंग आहे, ह्याला दुषने देत आहे. त्याने ती साखरझोपीत असतानाच तिच्या गाडीतला जीपीएस लुटला हे तिला आत्ता कळाले, कारण त्याला मंदीरात न येता आईनष्टाइन ब्रदर्सचे बेगल्स खायचे होते व तिथे त्याला प्राजक्ता भेटणार होती.

त्या श्वासांनी ...
त्या स्पर्शाच्या ..
लाजत ..
ह्या कडव्यात मात्र तिला तिचा चोर नवर्‍याने, स्वतःची चोरी जसे पुरूष बायकोपासून लपवायसाठी काही करतात ते करावे म्हणून तिला नको तेवढं गोड बोलला, तिचे पाघंरुन काढले, (थरथरले) वर चहाही पाजवला, अन वाटी लावले.

शेवटचे कडवे मात्र भक्तीरसाचे आहे.

त्या नभश्यामल
दिसला मग तो देवकीनंदन ...
अन मी डोळे मी मिटले गं.

रस्ता सापडावा म्हणून ती देवाचा धावा करत होती. इतक्या वेळात कृष्णाला दोन नवस देखील बोलून झाले की बाबा आता तरी तो इंटरसेक्शन सापडू दे नाहीतर गरम गरम वडे अन इडल्या मिळणार नाहीत. अश्या मनस्थितीत गाडी फिरवत असताना तिला मंदीराचा कळस दिसला व तिने त्या दिशेने गाडी वळवली. (दिसला मग तो देवकीनंदन). त्या कळसाला नतमस्तक होण्यासाठी तिने डोळेही मिटवले. व कृष्णाने कश्या घोर संकटातून सोडवले ह्या बद्दल ती ह्या कडव्यात लिहीत /बोलत आहे.

आता मला सांग सिंडी .. .. भक्ती रस नाही का ह्यात?

हे सां प वै चं रसग्रहण : केदार कडून

नाही नाही सायो, मी रसग्रहण करणारा टिकाकार आहे. (स्वघोषीत) कवि कल्पनाशक्तीचे वारु चौफेर उधळून कविता करतो त्याला न्याय द्यायला नको का?

शोनू हे घे. तुला समपर्ण.

बेभान मुलींच्या हातून चांदीच्या परडीतील
फुले रस्ताभर व्हावीत तसा तू कळवळल्यागत
धारांना पिंजून काढतोस.
वैष्णवी दाराशी--
माझ्यासाठी तिने आणली आहेत रॉबिन्सन
जेफर्सची पत्रे. (अर्थांतरन्यासाच्या चिवट
भिंगातून मी पाहतो आहे एका कोवळ्या
जगाचे सर्वोत्तम विनाश...) छंदबिंदीचा
काळाशार मोर तिच्या मागे, खांद्यावर
बहिरी ससाण्याची मादी... एका हिंस्र सत्याच्या
पाठलागाने हा कवी हैराण दुखा:च्या
सावलीत येऊन उभा राहिला. इथेही त्याला
आकाश अपूर्ण, समुद्र नि:संग, निराश भासला.
मग तो शेकोटीच्या जवळ निजलेल्या आपल्या
मुलीच्या पाठीवर संपूर्ण रात्र हातांची
कमळे फुलवीत राहिला

- पाउसकाळातील पत्रे, सांध्यपर्वातील वैष्णवी. ग्रेस ..

काल रात्री वैष्णवीचे ( कळपातील नविन गाय) दुध काढताना तिच्या पाठीमागच्या डाव्या पायाने जोरात हाणल्यामुळे छातीत अजूनही ती कळ येत होती. गेले तीन-चार दिवस असेच चालू होते. कालचा दिवसही नुस्ता कन्हण्यात गेला. आजही तसेच होईलकी काय म्हणून तो बेभान होउन पटपट दुध काढणे ही प्रक्रिया संपवू पाहत होता. वैष्णवी कुणाला ऐकायची नाही. आजूबाजूला ती बेभाम गाय म्हणून प्रसिद्ध होती. अश्यातच तिच्या आवडत्या बैलाचे ओरडने ऐकू आले. (जेफरसन नाव होत त्याचे) आणि ती लाथा झाडु लागले. तिच्या प्रियकराला तिच्या पासून तोडन्यात गोविंदा गवळी सफल झाला, पण त्याला आता तिच्या बेफामपणाची भिती वाटू लागते. ही हिस्त्र गाय कधी परत एकदा लाथ मारेन व कधी तो कळवळेल ह्याचा काही नेम नव्हता. उकिडवे बसल्यामुळे त्याला लाथ येताना लवकर मागे फिरताही येत नव्हते, कसे पळावे हा विचार त्याला हैराण करत होता.
काही दिवसातच नविन इलेक्शन होते निदान काही दिवस तरी हात भट्टीची मिळेल व ह्या हिंस्त्र गायीमुळे होणार्‍या दुखा:पासून थोडी मुक्तता मिळेल ह्या विचाराने त्याने कमळ पार्टीला रोजची एक अशी हातभट्टी मागीतली व त्या दिलाश्यात तो भरभर दुध काढू लागला.

(प्राजक्तासम टिपले ही ओळ नाही का? टिपले म्हणजे पाहने असा अर्थही घेऊ शकतो. )

नंद्या | 16 February, 2010 - 13:44
डोकं बरोबर आणलं असता काय प्रमाद होतो त्याबद्दल विवेचन [चुणचुणीत मधला च] , मार्गदर्सन करा कोरडाई.
कधी काळी हेल्मेटला डोकं संबोधलं जायचं पुण्यात. ते हेल्मेट, हॅम्लेट आणि डोकं यांचा परस्परसंबंध [असलेला वा नसलेला] देखील सांगा. गरीबासाठी येवडं कराच. भारीव आटंल.

आशूडी | 16 February, 2010 - 14:16
भक्ताच्या आग्रहाखातर कोरडाईचे विवेचन :

ज्या क्षणी कोणत्याही हपिसात तुम्ही चिकटता त्या क्षणी समजावे की मानेच्या वर एका रिकाम्या घड्याचा भार जन्मापासून आपण बाळगत आलो त्या लोढण्याची गरज संपली. त्या मध्ये 'कांदे बटाटे' तरी असतात असा समज लहानपणापासून शिक्षक, शिक्षकेतर पालक व आजूबाजूचे कर्मचारी संघाने आपल्या मनावर बिंबवलेला आहे परंतु अजून जगात कुठेच इतकी अन्नान्न दशा न आल्याने , तो घडा फोडून कुणी ते खाल्ले आहेत असा पुरावा हाताशी नाही. तर,त्या 'चिकटण्याच्या' सुवर्णडिंकक्षणी दोन सत्य सिध्द होतात १. त्या साहेबाला डोके नाही , असते तर आपल्यासारख्या पात्राची 'पात्र' म्हणून निवड झाली नसती. २. आपल्याला डोके नसताना आपण मुलाखत पास होऊ शकतो मग ते आणखी चालवायची गरज नाही. कारण कोणत्याच ऑफिसात मुलाखतीच्या वेळी विचारल्या जाणार्‍या प्रश्नां एवढे / पेक्षा कठीण काम नसते. आपण बिनडोक आहोत हे सत्य आपण येनकेन प्रकारेण पावलोपावली सिध्द करत आलेलो असतानाही जर येथवर पोहोचू शकतो तर आपण काहीही करु शकतो. शिवाय, साहेब हा प्रत्येक बाबतीत आपला 'साहेब' च असणार आहे. हे सत्य स्वीकारा. त्यामुळे नाही तिथे अक्कल चालवून , तारे तोडण्यापेक्क्षा आणि मेंदूच्या शीरा एकमेकांवर गारगोटीसारख्या घासून त्यातून पडणार्‍या ठिणग्यातून आपल्या बुध्दीची चमक दाखवून इतरांना चकित करुन सोडण्याच्या व्यर्थ हट्टापायी आपल्या विचारशक्तीची वृथा झीज घडवून आणण्यात काहीच हशील नाही. जे ते काम दुसर्‍यावर कसे ढकलता येईल आणि अवघे नाही तर नाही , निदान स्वतःला तरी सुपंथ कसा धरता येईल असा संतविचार करणारे आपण नेमके साहेबासमोरच ही अक्कल का गहाण ठेवतो? त्याच्या निर्णयाला नुसते 'हो' म्हणण्याऐवजी फक्त मान डोलावली तरी त्याच्यापेक्षा 'वेगळा' विचार करत बसून, तो योग्य शब्दात त्याला पटवून द्यायची, गळी उतरवायची, परिणामांची फिकीर करुन जबाबदारी घ्यायची.. पुन्हा लोकांसमोर "बघा, मांजराच्या गळ्यात घंटा बांधली की नाही? " अशी फुशारकी मारुन स्वतःची जाहिरात करायची.. एवढी अनंत कामे परस्पर निपटली जातात, शिवाय काहीही न करता आपण साहेबाच्या 'खास' मर्जीतले म्हणून 'फायदे' मिळतात ते सुख वेगळेच.
तातपर्य : कर्मचार्‍यांनी आपले डोके स्वतःच्या जबाबदारीवर वापारावे. गहाळ झाल्यास वा इजा पोहोचल्यास प्रशासन जबाबदार नाही. Use of brains in the office is strictly prohibited.

आशूडी | 16 February, 2010 - 14:53
माते, परस्पर संबंध लावायचा म्हणजे 'चालवा डोके' च्या वर्गात जाऊन बसावे लागेल. त्या'साठी'चे प्री रेक्विझिट लायसेन नाही सध्या जवळ (हपिसात असल्याने) . चिरीमिरी देऊन हेल्मेट शिवाय घुसता येते पण डोक्याशिवाय त्या हुशार लोकांच्यात बसणं म्हणजे स्वतःचा 'हॅम्लेट' करुन 'कोंबडी आधी का अंडं आधी?' अशा गहन प्रश्नांवर नुसत्या चर्चाच करत बसून त्या अंड्याचं ऑम्लेट झालेलं बघणं. त्यामुळे ते कीर्तन अखंड्टीपीपारायण सप्ताहात करायचे योजिले आहे.

श्रद्धा | 16 February, 2010 - 15:21
ज्युमा, तुमचा प्रत्तेक शब्द खरा आहे. पण आमचा आर्शीवाद असल्याने तुम्ही कुठल्याही लोकांच्यात बसू शकाल आणि छाप पाडू शकाल, हे लक्षात ठेवा. पाचशे शाहात्तर वर्षांपैकी दोनशे वीस वर्षांच्या तपस्येचे बळ मातेने (तुम्ही भारतातला आश्रम सांभाळत असल्याने) तुमच्यामागे उभे केले आहे.

'कोंबडी आधी का अंडं आधी?' अशा गहन प्रश्नांवर<<<<<<
हा खरा गहन वगैरे प्रश्न नाहीच्च आहे. लोक याचे सदासर्वकाळ उदाहरण देतात म्हणून स्पष्टीकरण देणे मातेचे कर्तव्य आहे.

ख्रिस्तोत्तर काळात अरबस्तानातील एका गृहिणीस तिचा नवरा रोजचे जेवण रांधायला पुरेल इतके सामान आणायपुरतेच पैसे देत असे. अर्थात सुपरमार्केटात उपलब्ध असणार्‍या गोष्टीही मर्यादित असल्याने तिला त्याचे एवढे काही वाटत नसे. एकदा सुपरमार्केटात ताजी अंडी आणि कोंबडी (तीपण ताजीच!) हे दोन्ही एकदम आल्याची बातमी फुटली. नवरा ती बातमी येण्याआधीच नेहमीइतकेच पैसे देऊन हपिसात गेला होता आणि प्रीपेड कार्डावर बॅलन्स कमी असल्याने त्यास फोन करणेही तिला दुरापास्त होते. (तेव्हा टेलिफोनाच्या तारांचा शोध लागलेला नसल्याने सर्वे लोक मोबाईलच वापरीत.) बिचारी गोंधळात पडली. घराच्या ओसरीवर बसून ती स्वतःशीच मोठ्याने बोलू लागली,
"कोंबडी आधी आणू की अंडे आधी आणू?"
दोन्हींपासून करायच्या पदार्थांच्या एकसे एक रेसिप्या तीस ठाऊक होत्या. त्यामुळे दुपार उलटून गेली तरी तिचा निर्णय होईना. आणि दुपारपर्यंत मोठ्याने वरील वाक्य बोलून बोलून तिचा घसा सुकला. आज दुपारी आपला डबा घरून का आला नाही ह्याचे आश्चर्य वाटलेला तिचा नवरा घरी आला असता,
"कोंबडी आधी की अंडे आधी?" असे वाक्य पुटपुटत बसलेली पत्नी त्यास दिसली. तिच्या त्या वाक्याचा अर्थ त्याने गावातील प्रत्येक विद्वानास विचारला असता कोणासही त्यामागील रहस्य उकलता आले नाही. त्यामुळे विश्वनिर्मिती झाल्यानंतरचा तो सगळ्यांत गहन प्रश्न आहे, असे सांगून सर्वांनी त्यास वाटेला लावले.
इतका गहन प्रश्न पडलेली आपली पत्नी निश्चितच कुणी सामान्य बाई नाही, हे जाणून त्याने स्वैंपाकाला व घरकामाला बाई ठेवली आणि पत्नीला चिंतनासाठी नवीन खोली बांधून दिली. तिथे ती रोज दुपारी बारा ते चार दार लावून त्याच एका प्रश्नावर चिंतन करीत असे.
मरण्यापूर्वी तिने एका भूर्जपत्रावर काहीतरी लिहून मुलांकडे सुपूर्द केले. त्यानंतरच्या कित्येक पिढ्यांमध्ये ते कुणासही वाचतादेखील आले नाही. तेच ते गहन प्रश्नाचे उत्तर असावे, पण आपली तेवढी लेव्हल नसल्याने ते आपल्याला कळत नसावे, असा समज करून घेऊन तिच्या वंशजांनी ते मखमली पेटीत ठेवले होते.
अखेर सीमातेला तो कागद मिळताच एका मिन्टातच रहस्य वर दिल्याप्रमाणे उलगडले! तिच्या वंशजांना ते का उलगडले नसावे पण?
(रहस्यभेद नंतर होईल.)

आशूडी | 16 February, 2010 - 15:31
माते, आज बारा वाजून गेले तरी तू चिंतनमग्न नाहीस?
अजाण भक्तांची उत्कंठा ताणू नकोस माते, नाहीतर अजून एका मांजराच्या पेकाटात लाथ बसून कोरडाई ला 'ते' व्रत पुन्हा आचरावे लागेल.(मातेचा) धावा!! रहस्यभेदाची त्वरा करा!!

श्रद्धा | 16 February, 2010 - 15:31
कारण... .कारण... कारण........
तिने ते देवनागरीत लिहिले होते.

आशूडी | 16 February, 2010 - 15:38
मातेचा महिमा अगाध आहे. त्या विदुषीच्या वंशजांना 'देवनागरी' मीडियम च्या शाळेत न घातल्याचे घनघोर घातक परिणाम आज 'कोंबडी आधी का अंडं आधी?' हे प्रश्नचिन्ह बनून अवघ्या विश्वाला व्यापून उरले आहेत. तरीही अजून देवनागरी ला योग्य ते स्थान नाही. या देवनागरी अ‍ॅटिट्यूडचं काय करावं? मीडियमची भेसळ थांबवा. शेवटी काय आहे खरा इतिहास?

आज वाड्यावर झालेले प्रवचन :

श्रद्धा | 25 February, 2010 - 06:40
नमस्कार वाडकरी. आज पुन्हा मातेच्या शुभहस्ते वाडा उघडला असून टीपीसाठी सर्वांना आमंत्रण आहे.
ज्युमांना वेळ असल्यास काही मौलिक, तात्त्विक आणि अर्थातच गहन चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आशूडी | 25 February, 2010 - 09:44
नमस्कार जनता! काल सचिन चे १९४ च्या पुढचे रन आणि तो विक्रम सेलिब्रेट करता यावा म्हणून नेहमीची बस चुकवली. फोन, नेट, जीटॉक, रेडिओ .. जिथून मिळेल तिथून अपडेट्स घेत होतो आणि २०० झाल्यावर सगळ्यांनी जो काय जल्लोष केला इथे क्युबिकल्स मधे ..काही विचारु नका.. नशीबाने एक मिल्की बार ची कॅडबरी होती पर्स मध्ये ती चिंगु चिंगु तुकडा १० जणात वाटून 'कुछ मीठा हो जाए' टाईप सेलिब्रेट केले. रोज घडणार्याग गोष्टी जाहिरातीत दाखवतातच.. काल पहिल्यांदाच जाहिरातीत दाखवलेले घडले.. मस्त मजा ! सचिन द ग्रेट!
जय मातादी! आजच्या चर्चेचा मसुदा सांगा.. खालीलपैकी शाईचा प्रकार बोला.. तत्काळ टीपी सुरु होईल.
पांशा (पांढरी शाई) /निशा (निळी शाई) / काशा (काळी शाई) / आशा (आचरट शाई)
आमचे येथे टीपी ची ऑर्डर स्वीकारली जाईल.
श्रद्धा | 25 February, 2010 - 09:49
पांशा, निशा इत्यादी शाईचे प्रकार आहेत का रंग? कृपया खुलासा करा.
आमचे येथे टीपी ची ऑर्डर स्वीकारली जाईल<<<<<
भक्तांना ऑर्डरी देणार्यास सर्वशक्तिशाली मातेच्या भूमिकेतून आपले 'ऑर्डर स्वीकारणार्याु' मानुषीत रुपांतर व्हावे ना? ज्युमा, ज्युमा... तपाचे सामर्थ्य वाढले पाहिजे हो...

आशूडी | 25 February, 2010 - 09:57 नवीन
सिमा! तुम्ही अव्यक्त तेही जाणता अशा समजात होते मी! ती पाटी आश्रमाबाहेर लावायची कित्येक दिवस मनात घोळत होते. तुमची परवानगी घ्यावी म्हणून वाट पाहत होते. अचानक तुम्ही प्रकट झालात आणि माझा आ. ग. मा. झाला! त्यामुळे "आमचे येथे टीपी ची ऑर्डर स्वीकारली जाईल" च्या पुढे 'अशी पाटीआश्रमाबाहेर लावायची कल्पना कशी आहे माते?' ही विचारणा मनातच राहिली. भक्तांसाठी मनकवडी असणारी आदरणीय सिमाता ज्युमातेची मनोवांछना ओळखू शकली नाही ही कवडीमोलाचे लांछन विचारणीय नक्कीच आहे.

श्रद्धा | 25 February, 2010 - 10:21
हां हां ज्युमां... तसलीं कांहीं पाटीं लावण्याचें मनांतहीं आणूं नकां. कांहीं झालें तरीं सर्वशक्तिशाली मातांनी ऑर्डरीं स्वीकारण्याचें काम करावें म्हणजें कहर... उलट
"येथे माता ऑर्डर देतात आणि कशात काही नस्तानाही टीपी होतो" अशीं जागेचां (पक्षी: आश्रम) आणि मातेचां महिमां वर्णणारी पाटीं लांवां.
बाकी अव्यक्त जाणण्याबद्दल: मध्ये मातेने अव्यक्त जाणून घेणे सुरू केले होते. मातेच्या विशिष्ट सिद्धीने मनातले अव्यक्त आवाजात रुपांतरित होऊन ऐकू येई. पण चार भक्त आले तरी कल्लोळ होऊन डोके दुखायला लागले. तस्मात ते बंद केले आहे. लोक अव्यक्त फारच साठवून ठेवतात मनात. अनावर झाले तर कविताही करतात. पण ते असो.
बाकीचे सदश्य का यीनात म्हणे अजून?
आशूडी | 25 February, 2010 - 10:33 नवीन
महिमां वर्णणारी पाटीं लांवां.>>
मातेची आदण्या शिरसावंड्य! तुझ्या अव्यक्तगेस समस्येवरुन फार फार वर्षांपूर्वी 'अगंबाई अरेच्चा' नावाचा एक दिव्यशक्तीमहिम्नस्तोत्रग्रंथ वाचनात आल्याचं स्मरतं.
बाकीचे सदश्य का यीनात म्हणे अजून?>>
सदश्य पुत्रपौत्रसंसारादिबॉसव्याधीसमस्तही दास्यात अडकलेले असतात.. पण आशरमाची ओढच त्यांना यातून काहे क्षण मुक्त करते. तेव्हा 'आएगा आनेवाला आएगा' या कालातीत संतवचनावर विश्वास ठेवून आपण निश्चिंत असावे.
श्रद्धा | 25 February, 2010 - 10:40
दिव्यशक्तीमहिम्नस्तोत्रग्रंथ, पुत्रपौत्रसंसारादिबॉसव्याधीसमस्तही >>>>
ज्युमा, तुम्ही संस्कृत शब्द लिहिताना संधी, समास जे काय असेल ते सोडवून लिहीत जा बरं.

नंद्या | 25 February, 2010 - 11:14
सिमा, ज्युमा
पाप हे एक कर्ज असते का? कुणी , कुणावर लादलेले? त्याचा व्याजदर काय असतो? ते का फेडावे लागते ?
पुण्य म्हणजे काय? पापाचे कर्ज फेडताना पुण्य भरावे लागते काय? [पापा म्हणजे वडील, किंवा गालावरोठ नव्हे]
अव्यक्त राहून, मिन्वाचे कुठले कर्ज तुम्हाला फेडावे लागणार आहे, याची चिंता मला लागली आहे.
म्या पामराच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची कृपा करावी. ह्या षष्ठप्रश्नांची कहाणी कित्त्योत्तरी सुफल संपूरण करावी.
[गुलजार उत्तरा मध्ये आले तरी चालेल ]
आशूडी | 25 February, 2010 - 11:45
गालावरोठ>> Lol
नंदूशेठ (चौकट राजा मधले नव्हे) तुम्ही रोज पहिल्या बेंचवर बसता त्यामुळे आश्रमाच्या अभ्यासक्रमातली तुमची प्रगती कौतुकास पात्र आहे. सिमाता तुमचे निरसन करण्यासाठी ध्यानमग्न आहेत. लवकरच तुम्हास उत्तरामृतांजनाचा लाभ घेता येईल तोवर अमृतांजन वापरण्यास हरकत नाही!

श्रद्धा | 25 February, 2010 - 12:09
गालावरोठ>>>
हा शब्द अजून एका लोकप्रिय (आयुर्वेदिक!) शब्दाशी भलतंच साधर्म्य दाखवणारा आहे. Proud
पाप हे एक कर्ज असते का? कुणी , कुणावर लादलेले? त्याचा व्याजदर काय असतो? ते का फेडावे लागते ?
पुण्य म्हणजे काय? पापाचे कर्ज फेडताना पुण्य भरावे लागते काय? [पापा म्हणजे वडील, किंवा गालावरोठ नव्हे]
>>>>>
अजाण बालका, असे कसे असेल? पाप म्हणजे 'जॉन अब्राहम' आणि कर्ज म्हणजे त्रेतायुगात ऋषी कपूर किंवा कलियुगात रेशमियाँ... (च्च.. च्च.. चुकून बॉलीवूड मोड ऑन झाला वाट्टं...)
हां तर, सत्ययुगाच्या शेवटच्या चार वर्षांमध्ये पाटलिपुत्र नगरीत ईश्वरचंद्र नावाचा राजा राज्य करत होता. राजा वागणुकीत ग्रे शेड असलेला होता. म्हणजे मध्येच तो सदाचारी असे, न्यायाने वागे आणि मध्येच त्याला वाईट वागण्याचा झटका येत असे. एकदा वाईट वागण्यात काळात द्विभार्याप्रतिबंधक कायदा मोडून त्याने पाच जास्तीची लग्ने केली आणि त्या बायकांना गोबीच्या वाळवंटातून अनवाणी चालवत आणले. तर एकदा सदाचारी वागत असताना त्याने मुंग्यांसाठी वारूळात एसी बसवून घेतले आणि मधमाशांना मध साठवून ठेवण्यासाठी ओक लाकडाचे बुधले आतली सहाशे वर्षे जुनी वाईन ओतून रिकामे करून दिले.
तर असा तो राजा होता. त्याची आठवी बायको चंद्रकलावती ही स्वरुपसुंदर आणि कमलाबाई ओगल्यांची शिष्या. तिने एकदा राजास पृच्छा केली,
"प्राणनाथ, आपण असे मधून मधून वाईट्ट वागता, यामुळे आपल्या डोक्यावर पापाचा डोंगर साठत आहे, याची आपणांस जाणीव आहे काय?"
हातातला खिरीचा बोल बाजूला ठेवून राजाने निरागस आवाजात विचारले,
"पाप... म्हंजे काय?"
हे ऐकताच चंद्रकलावतीचे अं:तकरण द्रवले. या भोळ्या जिवापर्यंत अजून पाप आणि पुण्य, नरक वगैरे कल्पना पोचल्याच नाहीत, हे जाणून तिने 'चंद्रकलावती' हा पापपुण्यमीमांसा करणारा, बेस्टसेलर ग्रंथ सिद्ध केला. (त्यावरून स्फूर्ती घेऊन आपल्या गणितावरच्या ग्रंथाला भास्कराचार्यांनी 'लीलावती' नाव दिले. तोही बेस्टसेलर झाला.)
त्या ग्रंथाचा आधार घेऊन प्रश्नांनी उत्तरे दिली आहेत.
१. पाप हे कर्जच असते.
२. अमुकतमुकाने पाप केल्याचे ज्याला पहिल्यांदा कळेल तो त्याच्यावर पापाचे कर्ज लादू शकतो. पण त्याच्याकडे भरपाई करता येत नाही. ती ऑथोराईज्ड हपिसांतच करावी लागते.
३. त्याचा व्याजदर बालकांस: १ टक्का, प्रौढांस: ७.५ टक्के, आणि ज्येष्ठ नागरिकांस: ४ टक्के आहे. स्त्रीपुरुषांस वेगळे दर नाहीत. (जसे मल्टिप्लेक्साची तिकिटे एकाच दराने मिळतात, तसेच! मल्टिप्लेक्साचा दृष्टांत समजला नाही तर राडांना विचारा.)
४. का फेडावे लागते म्हंजे काय? तुम्हाला नाही वाटले फेडावेसे तर नका फेडू. वसुलीला यमदूत येतील तेव्हा कळेल.
५. पापाच्या उलट केले की पुण्य.
६. ह्म्म्म.. तसेच काही नाही. काही लोक करूण भजने, देवस्तुती वगैरे स्वतःच्या आवाजात गाऊन गाऊन वसुली अधिकारी व वरिष्ठ हपिसरांना वात आणून कर्जमाफीही करून घेतात.
कळले ना वत्सा? अजून शंका असतील तर जरूर विचार.

अश्विनीमामी | 25 February, 2010 - 12:49
गालावरोठ >> लै भारी.
मातांनो मजसी तुमच्या कल्ट मध्ये सभासद करूण घ्या. चंद्रकलावती ग्रंथ मज वाचावयाचा आहे. कारण माझ्या वागणुकीतही ग्रे शेड्स आहेत. रेबॅन च्या.

नंद्या | 25 February, 2010 - 13:14
>>गालावरोठ
का हसताय ?
सिमा - आपल्या प्रवचनाने, मजप्रत असलेला अज्ञानाचा अंधार अधीकच अधोरेखीत झाला आहे. या अंधारात रेबॅन ग्रे-शेड्स लावूनदेखील पापाचा डोंगर ही कल्पना डोक्यात चमका मारतेय. यावर अथक [याचा कुठल्याही ठाकरेंशी संबंध नाही] चिंतन करणेंत येईल.

[उद्या येथे असलेल्या पापा जॉन पिझ्झावाल्याला देखील विचारतो, पापाचा डोंगर बनवणार का? ]

त्यातल्यात्यात आनंदाची गोष्ट कळली ती म्हणजे मी बालक आणि म्हणून १% व्याजदर.
ढींचाक ढीचांग !!

साजिरा | 25 February, 2010 - 13:15
आयला, काल तो सचिन बदाबदा नाचून गेला. आज या दोन माता. आमाला नाचायला काय, पण रांगायलाही जागा नाई आता. सिमा, मी पाप केल्याचे मला कधीच कळत नाही. त्यामुळे भरपाईचा प्रश्नच येत नाही. पण आता लक्शात आले, तर हे अ‍ॅरियर्स साचून साचून, सुविचार साचल्यामुळे त्या स्लार्ट्यामेल्याची हार्डिस्क क्र्याश झाली असेल, तसे आमचे भविष्य होणार नाही ना क्र्याश? शिवाय कुक्कूटिणींचे भक्षण, दारूपान इ. कर्मे पापांत मोडतात का? असेल तर ब्यालंशीट ताळ्यावर आणण्यासाठी दुसर्‍या बाजूला काय करयला हवे. शिवाय आतापर्यंत आम्हाला न कळलेल्या पापांना काय उ:शाप?

सर्वात म्हत्वाचे म्हणजे (आताच लक्षात आले की) या अनंत पापांमध्ये अनंत गालावरोठ पण आहेत. तर आता काय करावे? Proud

अश्विनीमामी | 25 February, 2010 - 13:18
माते मी डिटॉक्ष करून डोके रिकामे केले आहे व वयाचे सेटिन्ग १५ वर अड्कवले आहे. मला व्याजदरात सूट मिळेल काय? टाय पण चालेल. यमदूतांशी काही सेटिन्ग होणे शक्य आहे काय? अत्तर्बाट्ली वगैरे?

श्रद्धा | 25 February, 2010 - 13:28
शिवाय कुक्कूटिणींचे भक्षण, दारूपान इ. कर्मे पापांत मोडतात का? असेल तर ब्यालंशीट ताळ्यावर आणण्यासाठी दुसर्‍या बाजूला काय करयला हवे<<
कुक्कुटिणींना दाणे पुरवणे, दारुगाळपास मदत करणे, ओक लाकडाचे बुधले पुरवणे.... खेरीज मित्रमंडळींमध्ये दारूची जाहिरात करून दारुवाल्याचा धंदा वाढवणे, असले काय काय केले की आले ब्यालंशीट ताळ्यावर. हाय काय नाय काय?

या अंधारात रेबॅन ग्रे-शेड्स लावूनदेखील पापाचा डोंगर ही कल्पना डोक्यात चमका मारतेय. <<<<
त्या ग्रे-शेड्स मामींच्या असतील तर त्या परत कर. अंधारातदेखील दुसर्‍याच्या शेड्स लावणे म्हणजे पापाच्या डोंगरावर ज्वालामुखीचे तोंड...

डिटॉक्स, १५ वय आणि अत्तरबाटलीचे सेटिंग! मामी, तुम्ही एक नंबर क्लृप्तीबाज आहात त्यामुळे तुम्ही पापाच्या कर्जातून निसटणार यात शंका नाही. ते सेटिंग वगैरेचे जमले तर 'चंद्रकलावती'त तेवढी भर घाला. इतरांना फायदा होईल.
मीनू | 25 February, 2010 - 13:27
. ह्म्म्म.. तसेच काही नाही. काही लोक करूण भजने, देवस्तुती वगैरे स्वतःच्या आवाजात गाऊन गाऊन वसुली अधिकारी व वरिष्ठ हपिसरांना वात आणून कर्जमाफीही करून घेतात. >>> आत्ता कळ्ळं त्या घरासमोरच्या देवळात सकाळसंध्याकाळ या म्हातार्‍या बायका गाऊन गाऊन देवाला वात का आणताहेत ते.. करावीतच कशाला इतकी पापं मी म्हणते.. पापं हे करणार आणि भजनं आम्ही ऐकणार आता आम्हाला होणार्‍या त्रासामुळे पापात भर पडत असेल की देवाचं भजन म्हणलं म्हणून पाप कमी होत असेल.. मला तर वाटतं हे वारीसारखंच असेल दोन पावलं पुडं एक पाऊल मागे..

आशूडी | 25 February, 2010 - 13:29
साजिरेपंत , जसं नंदूशेठांनी आपला वयोगट प्रसिध्द करुन आपली कर्जमाफी माफक प्रमाणात का होईना करुन घेतली तीच सुविधा सुलभ पध्दतीने आपणही वापरु शकता. परंतू त्याचे खालील दूरगामी परिणाम लक्षात घ्या.
आपण आपला वयोगट बालवर्गात आहे असे जाहीर केल्यास,
१. तुमचा टीआरपी निर्देशांकाच्या कैक योजने खाली घसरण्याची शक्यता.
२. मुली, नवतरुणींचे तु.क. त्यामुळे पर्यायाने पुरुषमित्रांनी केलेला अनुल्लेख.
प्रौढ असल्यास
१. तुमच्या पापाचा घडा भरत आल्याची पदोपदी जाणीव. व त्या पश्चात्तापातून अधिक पापे (श्लेष!) होण्याची शक्यता.
२. मागचे (पाप) सावरु की पुढचे (पाप) आवरु अशी सतत द्विधा मनःस्थिती.
ज्येष्ठ असल्यास
वार्धक्य हे दुसर्‍यांदा मिळालेले बालपण या नात्याने बालवयोगटाचे परिणाम लागू मात्र पापांवर (गालवरोठ , दारुपान इ. इ.) वर मर्यादा.

गालावरोठ हे पाप / पुण्याच्या सीमारेषेवरील कृत्य आहे. त्याचा निर्णय गाल व ओठांच्या वयावर अवलंबून राहिल. निकालाचे अधिकार त्या त्या काळातील रिपोर्टींग मॅनेजरच्या (आई, मैत्रीण, बायको, लेक.. इ.इ. )स्वाधीन.

अश्विनीमामी | 25 February, 2010 - 13:32
पापाच्या डोंगरावर ज्वालामुखीचे तोंड...>> क्काय ज्वलंत उपमा आहे माताच असा उपमा करु जाणे प्रसादासाठी.
इतर्ठिकाणोठ हे पाप कीकॉय? मग कठीण आहे रेबॅनशेड परत करून थ्रीडीग्लासेस घ्यावेत व अवतारनश्ट करावा.

साजिरा | 25 February, 2010 - 13:40 नवीन
Lol वयोगटावर इतके अवलंबून असते म्हणायचे. दोन्ही योजनांत जाहीर केलेले फायदे घेण्यासाठी कुमारसे थोडा बडा, प्रौढसे थोडा कम असा वयोगट घोषित करून टाकू का? 'चंद्रकलावती' काय म्हणतो याबाबतीत?

मीनू | 6 April, 2010 - 15:46
काल प्रशासकांना नावं ठेवताना यांना महानगरपालिकेचा कारभार दिसत नव्हता का? >>> मला अगदी टिळकांची सरकारचे डोके ठीकाणावर आहे काय? अशी फोडलेली डरकाळीच आठवली चिनू..
चिनूकल्या ही माझी छोटुकली कविता कम लावणी कम वग तुझ्या चरणी अर्पण.

ऐका..टण टण टण...
शहरामंधी शहर एक नाव त्याचं अकोला.. (आर अंकोला न्हाय अकोला...अकोला)
सुंदरबाई खंडेलवाल टावर तिथं उंच आकाशी गेला ..... (सौजन्यः विकीपेडीआ)
(तर अशा अकोला शहरात .. बरं का अशा अकोला शहरात )
होती एक महानगरपालिकाऽऽऽऽआ आ आ...
(महानगरपालिकेला डासांचं नी डुकरांचं लय प्रेम बरं का )
दुष्ट इथले लोक त्येंना डुकरांचं सुख पाहवेना
वाईट वृत्ती त्येंची त्येंना डास चावलेला चालंना
(आता डासांनी आन डुकरांनी तरी कुठे जावं म्हाराजा... प्राणिमात्रांवर प्रेम करावं येवडं सादं कसं समजंना यास्नी????? पर म्हाराजा महानगरपालिकेतला सायेब लय मंजे लयच मायाळू, दयाळू, कृपाळू, कनवाळू, प्रेमाळू, कविताळू, भंजाळू..)
सायेब इथला हळवा भारी
स्त्रीयांचा कैवारीऽऽऽऽऽऽ
डासाडुकरांची त्येला अशी दया आली
दोनदा देऊन वेळ त्याने भेटायची टाळाटाळ केली..... जी जी रं जी जी ...बाबा चिनू तू रं .... बाबा बीरं तू रं....जी जी रं जी जी रं जी
(सध्या उपलब्ध माहीतीच्या आधारे इतकंच लिहीलेलं आहे. संध्याकाळी वेगवेगळ्या चॅनेलवर सर्फिंग करताना लेटेस्ट अपडेट आला की नविन कडवे घालण्यात येईल.)
(वरील पोस्टात मला डुकरं, डास अथवा कुठल्याही प्रशासकीय अधिकार्‍याचा अपमान करायचा नाही. )

आशूडी | 6 April, 2010 - 17:04
बरं, मीनू तुझा उपक्रम मी पुढे नेते..

नेहमीच साहेब तुमची घाई नका लावू रिक्षेत बसायला
येऊ कशी तशी मी भांडायला हो येऊ कशी तशी मी भांडायला...

आवडता अड्डा कवितांची गल्ली जीव ओवाळते एकेक वल्ली
ललित मी घेतलंय सांधायला हो येऊ कशी तशी मी भांडायला...

रिक्षा फिरते 'विचार' पुशीत वाहवा मिळता येते खुशीत
लागले तारे तोडायला हो येऊ कशी तशी मी भांडायला...

हुद्द्याचा मज भलताच गर्व नोकरच आहेत बाकीचे सर्व
नका लावू कामे करायला हो येऊ कशी तशी मी भांडायला...

डुक्करे गेली अकोल्याला निरोप त्यांचा घ्यायला हवा
डास येती अंगावर चावायला हो येऊ कशी तशी मी भांडायला...

आज वाड्यावर घडलेले महाभारत..

*********** ढ्यँट ड्यँ **************
श्रद्धा | 27 April, 2010 - 13:25

'आज यायला अंमळ उशीरच झाला' - कृष्ण.
'आसाच उशीर कराय लागलास तर घोडे हाकाया वसुदेवाला (प्लीज नोटः तुझा बा हा शब्द समरांगणात असांसदीय मानला गेला आहे) बशिवनार हैस का? युद्ध टाइमावर सुरु व्हायलाच होवं.' - द्रुपद.
'हे पहा, माझ्या मित्राला बोलायचं काम नाही. पहिले सासरे आहात म्हणून आजवर ऐकून घेतलं. माझा मित्र त्याच्या सवडीने येईल. पटत नसेल तर जा पांचालात परत. मला तुमची काय्येक गरज नाही, बाकी बरेच सासरे आहेत मला.' - अर्जुन.
'ह्या लेटकमरपेक्षा त्याची सेनाच का नाही घेतली? समोर पहा. सगळी यादवसेना सहाच्या ठोक्याला रेडी.' - विराट.
'यू डेअर इन्सल्टिंग माय डॅड, अर्जुन????? युद्धात तुला कुणी खलास केले नाही तर युद्धानंतर मीच ते काम करेन.' - पांचाली.
'दीदी, आय सपोर्ट यू.' - धृष्टद्युम्न.
'पांचाली, आधी वेणी घाल.' - युधिष्ठिर.
'कृष्ण उशिरा आला??? बिग डील! मीतर आत्ताच उठलोय. माझं सगळंच आवरून व्हायचंय अजून. - भीम.
'दादा, अजून वेळ लागणार असेल तर आम्ही चहा घेऊन येऊ?' - नकुल, सहदेव.
'महाराज, समोरून निरोप आलाय की काय ते युद्ध लौकर सुरु करा. पितामहांना रथात फारवेळ उभे राहणे सोसत नाही. व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आहे त्यांना.' - एक सैनिक.
'अरे उशीर का करतोस कृष्णा? किती मॅन अवर्स आणि पर्यायाने पैसा वाया जातो! गरीब आहे तुझी आत्या नि तिची मुलं.' - कुंती.
'अरे काय चाल्लंय? आवरा की पटापट. आम्ही सकाळपास्नं व्यूहरचना करून उभे आहोत.' - (समोरच्या बाजूकडून) 'द्रोण.

प्रकाश काळेल | 27 April, 2010 - 13:43

हाहा

अस्ला रडीचा डाव खेळायचा असेल तर ..दुर्व्या, आमी जातो बाबा कवड्या खेळायला.-शकुनीमामा.

अरे क्काय चाल्लंय क्क्काय संजया....युध्द सुरु झालं का न्हाय अजुन...तुझा सिग्नल चेक कर बघु...च्यायला कवाच्या फालतू जाहीराती दाखवत आहेस ! -धुतराष्ट्र

मिल्या | 27 April, 2010 - 14:32

हाहा खो खो

अरे क्काय चाल्लंय क्क्काय संजया....युध्द सुरु झालं का न्हाय अजुन...तुझा सिग्नल चेक कर बघु...च्यायला कवाच्या फालतू जाहीराती दाखवत आहेस ! -धुतराष्ट्र >>> अहो म्हाराज धीर धरा... किस्ना गेला होता जाहिरातिंचे शूटींग करायला ... 'अमूल घी', सुदर्शन रेडिअल टायर्स झालेच तर मुंगुस बासरी... त्यामुळे त्याला उशिर झाला यायला - संजय

नंदिनी | 27 April, 2010 - 14:40

'अमूल घी', सुदर्शन रेडिअल टायर्स झालेच तर मुंगुस बासरी... >>> मंगूस नावाच्या महान, इनोसंट आणि सुंदर प्राण्याचा अपमान करून त्याच्या नावाने बासरीसारखे प्रोडक्ट विकणार्‍याचा त्रिवार निषेध.

स्वतःच्या नावाची किम्मत उतरली की हेलोक त्याच्या ब्रँडला प्राण्याची नावे देऊन ग्राहकाची दिशाभूल करू लागतात. आम्ही प्राण्याच्या नावाने चालणारा हा बाजार कदापि शक्य होउ देणार नाही. याविरूध येत्या चंद्रग्रहणाच्या दिवशी एक प्रचंड मोर्चा काढण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आणी तसेच, यासाठी एक भव्य रथयात्रा काढून अजनतेमधे या प्रश्नाची जागृती करण्याचा आमचा ठाम निश्चय आहे.

अरभाट | 27 April, 2010 - 15:00

श्र, प्र हाहा खल्लास!
'हे खरंय बरे का कृष्णा. पितामहांना व्हेरिकोज व्हेन्स आहेत, गुरूवर्यांना स्पॉण्डिलायटिस आहे. त्यामुळे त्यांना एकदम उभं किंवा झोपूनच रहावं लागतं. ('त्यावरून थेरडा म्हणतो कॉल मी बाबा. कुष्ठरोग म्हणता येत नाही अजून' - धृष्टद्युम्नाची द्रौपदीच्या कानात धुसफूस) त्यांना फार वेळ तिष्ठत ठेवणे योग्य नाही. तसं पाहिलं तर शकुनीमामासुद्धा लंगडे आहेत ('differently able' म्हणा असा अफगाणिस्तानातून पॉलिटिकली करेक्ट पुकारा होतो). कृपाजोबा कालच मदनभाऊंकडे गेले होते. (अनेकांच्या भुवया उंचावतात. 'ह्या वयात?'ची कुजबूज होते. त्या कुजबुजीकडे जळजळीत नजरेने पाहत) म्हणजे पुण्यातील प्रसिद्ध डायबेटीसतज्ञ मदन फडणिसांकडे गेले होते. कृपाजोबांना डायबेटिस डिटेक्ट झालाय. त्यामुळे त्यांचे जेवणखाण वेळच्या वेळी झालेच पाहिजे. ह्या सर्वांची काळजी आपण नाही घेतली तर कोणी घ्यायची? मला वाटतं आपण हा गेम थोडा पोस्टपोनच करूयात' - अर्जुन
(गेम आणि पोस्टपोन ऐकून संतापाने भीमाच्या तोंडाला आलेला फेस स्वतःच्या ड्रायव्हर नॅपकिनने पुसत) 'अरे बाबा वयं झाली की असच व्हायचं. तब्येती कमीजास्त होणारच. एवं सततयुक्ता ये म्हणजेच हे वय अश्या सततच्या दुखण्यांनी युक्त असणारच. तेव्हा लक्षात ठेव, भक्तास्त्वां पर्युपासते म्हणजेच अश्या सत्त्वपरीक्षेच्या वेळी जे माझे भक्त असतात त्यांनाच मी पास करतो. द्वारका आर्किओलॉजिकल म्युझिअमचे फुल्ल तिकीट काढून तू माझा रीतसर भक्त झाला आहेस. तू चिंता करू नकोस' - कृष्ण
'आणि पैश्यांचे काय रे #@#? पैसे कोण आणि कसे आणणार? तुझं काय जातं पोस्टपोन करू म्हणायला? या द्रौपदीकडे बघ.
द्रौपदी अजून केस मोकळे सोडून हिंडते आहे.
(पैश्यांचे काय? - द्रुपद)
पायी नायकी शूजच्या ऐवजी कोल्हापुरी वहाण आहे
(पैश्यांचे काय? - द्रुपद)
मुलांच्या करीरचे काय, मुले अजून लहान आहेत
(पैश्यांचे काय - द्रु)
आपल्याला सपोर्ट करणारे आपले नातेवाइक जास्त महान आहेत
(पैश्यांचे काय? - ||द्रु||)
मला दु:शासनाच्या रक्ताची तहान आहे
(पैश्यांचे काय? - ||ध्रु||) - भीम
'तुम्हाला लक्ष मोदक आर्यवीर. तुम्हीच खरे माझे पती. हे मी आधी बोलले नव्हते पण आता अर्जुनाने वेळ आणली आहे ,म्हणून जाहीरच सांगते. माझा सर्वात आवडता नवरा भीमच आहे.' - द्रौपदी
(या गॉसिपबॉम्बने रणांगणावर स्तब्धता. कर्णाचा मत्सर एका क्षणात ट्रान्स्फर होतो. भीमाला अचानक पित्ताचा त्रास होऊ लागतो. आडियन्समधून एक आवाज - आय न्यू इट! हाच जय नावाचा खरा इतिहास आहे.)

नंदिनी | 27 April, 2010 - 15:11 नवीन

रूक्मिणी मोड ऑनः
अहो, काय मेलं सारखं त्या आत्याच्या घरात जाऊन बसायचं ते?? तुम्हाला काय स्वतःचं घर बीर आहे की नाही.. सारखं मेलं बघावं तेव्हा याचं युद्ध लाव त्याचा तह कर. अशा लष्कराच्या भाकर्‍या भाजणं जरा कमी केलंत तर बायको पण काहीतरी करीअर करेल म्हटलं.. ती सत्यभामा बघा. नरकासूराला मारायच्या सुपार्‍या घ्यायला लागली. नाहीतर इथे आम्ही अजून तसेच. एक साधा मोर्चा काढायचा म्हटला तर तुमचा पाठिंबा नाही आम्हाला. सतराशे साठ बायका करून ठेवल्या.. एकाचं तरी नाव आठवतं का आयत्या वेळेला तुम्हाला?? सारखं आपलं अर्जुन आणि द्रौपदी आणि भीम करत फिरता ते?? शोभतं का आता हे सगळं तुम्हाला या वयात??

ऐकलं का मी काय म्हणतेय ते?? साखर संपलीये घरात.. ती आणून द्यायला पण तुम्हाला सवड नाही.. गेलात ते गेलात वर सर्व सेना घेऊन गेलात.. आता घरातली कामं करणार कोण?? या जाचक पद्धतीबद्दल बोलायला आता मी एक नवीन बीबी चालूच करते की नाही बघा.. तिथे येऊ नका कडमडत डुप्लिकेट आयडी घेऊन... समजलं ना????

त्या म्हातार्‍याना आणी त्याच्या नातवंडाना काय धन्य्ष्य बाण खेळायचय ते खेळू दे.. तुम्ही गुमान घरला परत या.. नाहीतर गाठ माझ्याशी आहे समजलं ना???

मीनू | 27 April, 2010 - 16:20

इतक्यात ललित मोदी कुरुक्षेत्रावर अवतरतात..
अरे! ए काय लावलंय पैसे पैसे.. पैसे कुठून आणायचे ते मी सांगतो. आपण एक महाभारत प्रिमिअर लीग लाँच करु यात.
महाभारत प्रिमिअर लीग ??????? - समस्त कौरव पांडव एकदमच ओरडतात..
च्च च्च तुम्हाला धनुष्यबाण खेळायचंय ना आणि त्यासाठी पैसे हवेत. पैशाची व्यवस्था मी करतो तसेच लाइव्ह प्रक्षेपणाचीही व्यवस्था करु. संजयाच्या अंतरचक्षूंना उगीच ताण नको पडायला.. सर्वात आधी कौरव आणि पांडवांचा लिलाव करायला हवा..
चला तर लिलावाला सुरुवात करु..
द्रौपदी तुलाही लिलावात सहभागी होता येईल. जे कुणी प्रत्यक्ष युद्धात उतरणार नाहीत ते सर्वजण बोली लावू शकतात.. चला तर मग

सुरुवात पांडवांच्या लिलावाने करु यात..

नंदिनी | 27 April, 2010 - 16:29

सुरूवात अर्थात छोट्या खेळाडूपासून

सहदेव पांडू हस्तिनापूरकर. राईट आर्म धनुष्यधारी. लेफ्ट हॅंड भालाफेक. स्पेशलायझेशन घोडे सांभाळणे.

कोण लावतय यासाठी बोली??

माल्ल्या एक..
अंबानी दोन.
शाहरूख तीन..
जुही चार.

(धृतराष्ट्र मधेच संजयला "मेलो, या काय चाल्लाव काय?? अंबानी आनि मल्ल्या करताव काय या कुरू क्षेत्रात???
संजय उवाच : तात, त्यानी टीम्स विकत घेतल्यात.. आता कौरव पांडव खेळणार ते या लोकासाठी)

बोली चालूच आहे. शेवटी नकुलला जिंकतात ते मल्ल्यासाहेब. त्याना घोडे धाववण्यचा बराच नाद आहे असे लोक म्हणतात.

Pages