बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्हीमध्ये उपजत आवडीपेक्षा ठोकून-ठाकून केलेले संस्कार अधिक दिसतात. <
एक्झक्टली,नविन पिढीला तो विनोद कितपत समजेल याबद्दल मला जाम शंका आहे,
केवळ विनोदी लेखक म्हणून त्यांचे मूल्यमापन करणे हा त्यांच्यावर अन्याय ठरेल असे मला वाटते,त्यांची रविंद्रनाथांवरची भाषणे,वंगचित्रे सारखी प्रवासवर्णने किंवा 'एक शून्य मी' सारखी ऑफबीट पुस्तके यातून दिसणारे पुलं जास्त प्रभावी आहेत.त्यांचा 'परफॉर्मर'चा मुखवटा नसलेले लिखाण एका वेगळ्या दर्जाचे आहे आणी त्याचे स्वतंत्र समिक्षण गरजेचे आहे.

.

अगदी अगदी असामी. सकाळी हे लिहून पोस्ट न करता जागा चुकते आहे असं वाटून गप्प बसलो होतो मी. Happy

हे म्हणजे . नव्हे. Happy

ही पुपुवरची २६-२७ तारखेची चर्चा. वाहून जाउ नये म्हणुन इथे .
--------------------------------------------------------
प्रतिसाद raina | 27 October, 2009 - 03:48
फ- खूप खूप धन्यवाद. मी अजून ती पूर्ण रचना वाचूनच शॉकमध्ये आहे. ऐकताना नुसता चंद्रकांत काळ्यांचा आवाज आणि मोडकांची चालच डोक्यात होती, त्यामुळे एवढी हबकले नव्हते.
आणि शब्दार्थ माहितच नव्हता, नुसताच भावार्थावरून अंदाज बांधला होता.

तुला खरंच अजून सांगता आलं तर सांग.

प्रतिसाद needhapa | 27 October, 2009 - 03:58
रैने,
तू जनाबाईंचा 'विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या' ऐकलंयस/ वाचलंयस का?
त्यामधे 'विठ्या तुझी रांड झाली' असाही उल्लेख आहे.
हे अश्या प्रकारचे उल्लेख संतसाहीत्यात नवीन नाहीत. त्यातलं सबटेक्स्ट समजावण्यासारखा अभ्यास माझा नाही. तुला रस असेल तर मी काळेकाकांना पुढच्या पुणे भेटीत विचारीन तपशीलात. किंवा 'फ' अजून सांगेलच.

भेटूयात. परवा संध्याकाळी चालेल. आज आणि उद्या महत्वाच्या मिटींग्ज आहेत त्यामुळे पार्ल्यातून हलता यायचं नाही.

प्रतिसाद raina | 27 October, 2009 - 04:19
धन्यवाद नीरजा. विचारून सांगशील का त्यांना प्लीज. कमाल आहे खरंच.

प्रतिसाद pha | 27 October, 2009 - 04:50
अश्विनी, रैना : या भारुडात मुमुक्षू शिष्याला प्रथम भोळ्या असणार्‍या, पण पुढे व्यभिचारिणी बनलेल्या बाईची, मोक्षमार्गाची वाट दाखवणार्‍या गुरूला कुंटिणीची व परतत्त्वाला (= सत्) परपुरुषाची उपमा योजली आहे.
एकनाथांच्या निवेदनाचा भावार्थ असा : सद्गुरूरूपी कुंटिणीने मला अद्वैताचा शेला पांघरवला (= मी आणि सर्व चराचर सृष्टी यांच्यात अभेद असल्याचे बिंबवून माझ्या मनाला आश्वस्त केले). मला कळू न देता परपुरुषाकडे मला नेण्याच्या हेतूने मला एकांतात घेऊन गेली ( = मला एकांतात, निर्जनात रमण्यास शिकवले). पदररूपी भौतिकाच्या भ्रम फेडला. (पुढे सद्गुरूरूपी कुंटिणीच्या मदतीने त्या परतत्त्वरूपी पुरुषाने) माझी वासनारूपी चोळी सोडवली व मायारूपी कुच कुस्करले (=> हा क्रमही महत्त्वाचा वाटतो - सगे-सोयरे, आप-पर इत्यादी भौतिकाचा भ्रम पहिल्यांदा फेडला, म्हणजे पदर फेडला. या भ्रमाचं मूळ असणारी वासना म्हणजे पदराखालील चोळी. पण वासना मनातला भावनिक आविष्कार झाला. त्याखाली दडलेली माया, ज्यांना एकनाथ स्तनांची उपमा देतात, हे या सर्वांचे कारण. परत्त्वरूपी पुरुषाने अंग कुस्करले, म्हणजे ती माया मर्दली.). पुढे जिवाशिवाचे तादात्म्य झाले, परतत्त्वरूपी पुरुषाने मला देहातीत भोग, अर्थात आत्मबोधाचा साक्षात्कार, दिला.

(टीप : हा भावार्थ किंवा हे भारूड आंबटशौक मनी धरून वाचल्यास, एखाद्याला हे भारूड व वरील निवेदनाची भाषा आक्षेपार्ह वाटू शकेल. पण धुवट संकेत क्षणभर बाजूला ठेवून उपमान-उपमेयांची योजना व त्यामागील भावार्थ सांगायचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.)

प्रतिसाद SAJIRA | 27 October, 2009 - 04:52
सही, फ. धन्यवाद रे..!
(रैनेने त्या श्लील-अश्लील बीबीवर पण हा प्रश्न टाकला आहे, तिथंही हे उत्तर लिहिलंस तर छान. )

प्रतिसाद raina | 27 October, 2009 - 04:52
फ- तुला खरोखर अनंत कोटी धन्यवाद. आभारी आहे.
तुझी हरकत नसल्यास मी सेव करुन ठेवते आहे. विचार करायला हवा.
या भाषेत सांगायच कारण काय असु शकेल, समाजप्रबोधन अजून वेगळ्या उपमांनी होऊ शकले नसते का ? पण एकनाथांची काहीतरी भुमिका असली पाहिजे. शिवाय त्याकाळचे श्लील-अश्लीलतेचे संकेत वेगळे होते का ?

तू खरं म्हणजे लेख लिहू शकतोस.

प्रतिसाद robeenhood | 27 October, 2009 - 04:53
रच्याकने, शंका राहू नये, म्हणून शब्दार्थ नोंदवतो : कुंटीण = कुंटणखान्याची प्रमुख बाई)

>>
तालुक्याच्या एका गावी आमच्या साहेबाचे नाव होते कुंटे. त्यांच्या बायकोला कॉलनीतल्या बायका बिनदिक्कतपणे कुंटीणबाई, कुंटीण काकू म्हणत. अज्ञानात आनंद दुसरे काय?

प्रतिसाद ashwini_k | 27 October, 2009 - 05:06
फ, धन्यवाद रे ! कुणीतरी त्याने दिलेलं विश्लेषण माझ्या विपुत टाकून ठेवा प्लिज.

या भाषेत सांगायच कारण काय असु शकेल, समाजप्रबोधन अजून वेगळ्या उपमांनी होऊ शकले नसते का ? पण एकनाथांची काहीतरी भुमिका असली पाहिजे. शिवाय त्याकाळचे श्लील-अश्लीलतेचे संकेत वेगळे होते का ?>>>>

रैना, अगं त्या काळी संतांनी अगदी तळागाळातील लोकांसाठी देखिल रचना केल्या आहेत. म्हणूनच संस्कृतातील अध्यात्मिक ग्रंथांबरोबरच सर्वसामान्य लोकांना कळतील असे गौळण, भारुड, अभंग इ. प्रकार प्रसवले गेले. सगळ्या अध्यात्मिक वाड्मयात irrespective of language शिकवण तीच होती.

सामान्य लोकांना जर गीता जशीच्या तशी सांगितली तर कळायला जड जाई. म्हणून एकनाथांनी जाणून बुजून संस्कृत बाजूला ठेवून या उपमा वापरल्या. याच गोष्टीवरुन त्यांचा मुलगा हरि पंडित त्यांना सोडून काशीला निघून गेला होता. त्याचे म्हणणे असे की त्याच्या वडिलांनी संस्कृत भाषेचा अपमान केला, अध्यात्माचा अपमान केला. कालांतराने हरि पंडिताचा भ्रम (अध्यात्म ही केवळ ब्राह्मण व संस्कृतातील ग्रंथांचा अभ्यास करणार्‍यांचीच संपत्ती आहे) दूर झाला व तोही वडिलांच्याच मार्गावर आला.

प्रतिसाद limbutimbu | 27 October, 2009 - 05:30
अरे अस्ल्या चर्चा वहात्या बीबीवर का करता रे? सेव्ह करा!
अश्विनी....
>>>> कालांतराने हरि पंडिताचा भ्रम (अध्यात्म ही केवळ ब्राह्मण व संस्कृतातील ग्रंथांचा अभ्यास करणार्‍यांचीच संपत्ती आहे) दूर झाला
पन्डीतास "हा असाच कन्सातला भ्रम" होता हे कशावरुन?
शन्का येण्याचे कारण् म्हणजे, नुकतेच कुठेतरी मी सुखकर्ता दुखहर्ता व तशा आरत्या गाणी चक्क पॉप/डिस्को टाईप आरडाओरडाकरीत गायलेल्या ऐकल्या! त्या पन्डीतासारखेच मला दु:ख झाले असावे! आरती म्हणायच्या सद्य पद्धतीपेक्षा "केवळ बहुसन्ख्यान्ना जे भावते" ते ते त्यात घुसवुन तशा चालीत म्हणण्याचे प्रयोजन कळले नाही, कळलेच नाही तर पटण्याचा सम्बन्धच नाही. या आरत्यामधेच कोब्रेतर लोक स्वतःच्या भरी घुसडून म्हणतात... पटत नाही!
पण उद्या काही शे वर्षान्नी, हीच गोष्ट, बघा लिम्ब्या देखिल कालान्तराने आरत्या त्या तशा धाबडधग्यात अन भर घातलेल्या स्वरुपात म्हणू लागला कारण त्याचा भ्रम ओसरला, अन तो भ्रम की जो..... ब्राह्मण अन्.......वगैरे वगैरे, असे म्हणले गेले तर चालेल काय?

नाथ काय की ज्ञानेश्वर की अजुन अनेक सन्तमहात्मे काय, त्यान्नी जनसामान्यान्ना समजेल अशा भाषेत रचना केल्या त्या या असल्या "विसा-एकविसाव्या शतकातील ब्राह्मणद्वेष्ट्या भाषेत वर्णन केलेल्या" भ्रमास तोडण्यास, हा नि:ष्कर्ष मला पटत नाही!
कन्सातील ते वाक्य मला त्याज्य/आक्षेपार्ह वाटले म्हणुन ही पोस्ट असे.

प्रतिसाद ashwini_k | 27 October, 2009 - 05:51
लिंबूभाऊ, हरि पंडिताने वडिलांपासून दूर जाण्याचे कारणच मुळी त्यांनी मराठी भाषेत व रोजच्या वापरातल्या वळणाने जातीपातीचा विचार न करता निरुपण करणे हे होते. त्यांना वडिलांचे हरिजनांच्या घरी जाणे जेवणे पसंत नव्हते. आपल्याच्याने हे संस्कृतचे भ्रष्ट होणे पहावणार नाही व त्याच बरोबर रोज वडिलांशी वाद होवू नयेत (वडिलांबद्दल आदर होता पण दोघांचे मार्ग व विचार वेगळे होते) म्हणून त्यांनी जिथे संस्कृतचे वैभव व मोठे पंडित व शिक्षित ब्राह्मण आहेत अशा काशीला जायचे ठरवले.

दोघांमधला मोठ्ठा वैचारिक फरक हा होता की हरि पंडिताला वाटे की संस्कृत ग्रंथ, पठण, चर्चा हीच भगवंताच्या जवळ नेते (ज्ञानाचा अहंकार). तर एकनाथांना वाटे की हृदयात भगवंताला वसवणे, त्याच्यावर प्रेम (भक्ती) करणे हेच भगवंताच्या जवळ असणे होय, तिथे जात पात, शिक्षित असणे नसणे गैरलागू होते (भक्तीतील समर्पणाची वृत्ती).

नुकतेच कुठेतरी मी सुखकर्ता दुखहर्ता व तशा आरत्या गाणी चक्क पॉप/डिस्को टाईप आरडाओरडाकरीत गायलेल्या ऐकल्या! त्या पन्डीतासारखेच मला दु:ख झाले असावे! >>>> तुम्हाला दु:ख झाले असावे कारण त्या आरत्यांमधे आर्तता राहिली नसून निव्वळ इतर गाण्यांसारखा पॉप्युलर ठेका ते लोक एन्जॉय करत असावेत.

फ ने म्हणूनच वर म्हटलेय की वर उल्लेखलेले भारुड व विवेचन हे आंबट अर्थाने घेतले तर मनामधे भक्तीभाव निर्माण होणारच नाहिये.

प्रतिसाद psg | 27 October, 2009 - 05:45
वाह फ! अनेकानेक धन्यवाद ह्या विवेचनाबद्दल!
अश्विनी, पटतंय- बोली(?) भाषेत सांगण्याचं कारण

प्रतिसाद Ashwinimami | 27 October, 2009 - 05:49
फकस्त ती लडकी 'लडकी' हवी 'सो कूल महिला' नको...>> माझा तसा काहि उद्देश नव्हता म्हणण्याचा. फिकर णॉट.

प्रतिसाद raina | 27 October, 2009 - 06:02
अश्विनी- धन्यवाद. छान माहिती. संदेशाबद्दल दुमत नाहीच. परंतू- तळागाळातील लोकांना कळण्यासाठी व्यवहार्य पातळीपर्यंतचे दाखले असूनही शारीरव्यवहाराच्या पातळीवरचे लिखाणच जरुरी का वाटले? की श्लीलतेचे संकेत वेगळे होते, की त्यापुढील काळातील इंग्रजी विक्टोरियन अंमल आल्यामुळे सो कॉल्ड श्लीलतेचे संकेत स्थापित झाले.?

प्रतिसाद SAJIRA | 27 October, 2009 - 06:06
समाजप्रबोधन ही फक्त संस्कृताचा अभ्यास करणार्‍या अन तीतच शिकविणार्‍या गाढ्या-व्यासंगी पंडितांचीच मक्तेदारी ही बोली भाषेत संतवाड्.मय ज्ञ्माला घालणार्‍या संतपुरुषांनी मोडीत काढली, यातच या बोलीभाषेतल्या साहित्याचे यश आहे. (असे मला वाटते.)

दिवसभर थकून भागून आलेल्या कष्टकरी बहुजन समाजाला समजेल अशा भाषेत, विनोदी, शृंगारिक अन रोजच्या जीवनातले दाखले देऊन केलेले समाजप्रबोधन प्रचंड मोलाचे आहे. यातल्या श्लील-अश्लीलतेबद्दल चर्चा झालीच, तर त्यापेक्षा ऐकणारा माणूस किमान त्याबद्दल विचार करतो आहे, हेच महत्वाचे नाही काय? यातूनच भारुडांसारख्या रचना झाल्या असाव्यात. फड, तमाशे, नौटंकी अशाच जन्मल्या असाव्यात. (मी माझ्यावरूनच विचार करतो आहे- दिवसभर काम केल्यावर-थकल्यावर; क्लिष्ट इंग्रजी किंवा संस्कृतात लिहिलेले तत्वज्ञान वाचण्यापेक्षा टीव्हीवरच्या गोविंदाच्या पिक्चरमधल्या पांचट विनोदांनी थोडे मनोरंजन झाले अन त्यातल्या किंचित-संदेशामुळे विचारमग्न झालो; तर मी यातल्या कशाला प्राधान्य देणार?)

प्रतिसाद SAJIRA | 27 October, 2009 - 06:12
फच्या उत्तराखालीच ही चर्चा 'त्या' बीबीवर सेव्ह केली आहे.

प्रतिसाद pha | 27 October, 2009 - 07:22
>>या भाषेत सांगायच कारण काय असु शकेल, समाजप्रबोधन अजून वेगळ्या उपमांनी होऊ शकले नसते का ? पण एकनाथांची काहीतरी भुमिका असली पाहिजे. शिवाय त्याकाळचे श्लील-अश्लीलतेचे संकेत वेगळे होते का ?<<

बहुधा असावेत. श्लील-अश्लीलतेचे संकेत आता आहेत, त्यापेक्षा काही पैलूंमध्ये आणि काही बाबींत वेगळे असावेत असे वाटते. संतसाहित्यात, किंबहुना पौराणिक साहित्यात आज आपण ज्या शब्दांना संकोचून, लाजत-बिचकत इंग्लिशीतले (पवित्र ) शब्द योजतो, असे शब्द वापरलेले आढळतात. त्यात महत्त्व शब्दांना नसून, त्यातून मांडलेल्या संकल्पनेला, गाभ्याला आहे.

बाकी, या भारूडातील संकल्पना अशीच मांडण्याबद्दल : कदाचित संभोग आणि आत्मबोधातील उत्कटतेच्या मानसिक पातळीवरील अंशतः समांतर प्रवासामुळे व सामान्यांना दैनंदिन व्यवहारातील व त्यातही शृंगारिक स्वरूपाचा दृष्टांत सांगण्यासाठी अशी योजना असावी. खेरीज, यात अंशतः समांतर असणार्‍या या दोन क्रियांमधील त्या विशिष्ट क्षणांमधलं साधर्म्य दिसत असलं, तरीही त्या दोहोंच्या उद्भवांमागील व हेतूंमधील कमालीचा विरोधाभास एकनाथांना व इतर संतांना वैशिष्ट्यपूर्ण वाटला असावा. अर्थात, ही सर्व माझी अटकळ आहे. जाणकार, अभ्यासू मंडळींची या संबंधातील समीक्षा बघायला हवी.

>>त्यांच्या बायकोला कॉलनीतल्या बायका बिनदिक्कतपणे कुंटीणबाई, कुंटीण काकू म्हणत. अज्ञानात आनंद दुसरे काय?<<
रॉबिनहूड : मराठीच्या प्रवृत्तीनुसार कुंटे-कुंटीण, पाटील-पाटलीण ही रूपे रूढ आणि योग्यच आहेत. वरकरणी गमतीचा भाग सोडला, तरी 'कुंटे' व 'कुंटण' वगैरे भिन्न शब्दांची मुळे/व्युत्पत्ती शोधायला हवी; तो रंजक विषय ठरू शकेल. आपट्यांच्या संस्कृत शब्दकोशामध्ये 'कुट्टारम्' म्हणजे झवणे/संभोग असा अर्थ नोंदवला आहे. त्यावरून कुट्ट=>कुंट असा उच्चारबदल घडत कुंटण हा शब्द आला असावा. अशीच उच्चारबदलाची प्रवृत्ती प्रकटली असेल, तर 'कुंटे' हा शब्द 'कुटीरम्' (= झोपडी) वगैरे किंवा 'कुट्टि' (= दलाल, मध्यस्थ) अशा शब्दांवरून आला असू शकतो. किंवा कदाचित अन्य उपखंडीय भाषांमधूनही तो उद्भवला असू शकतो.

रच्याकने, श्लील-अश्लीलतेबद्दल केवळ बोलीभाषांतील (मराठी वगैरेंमधील) साहित्यच धीट होते, असे नाही.. संस्कृत साहित्यातही (पंडित साहित्यिकांनी रचलेल्या साहित्यासकट) ही धिटाई अगोदर दाखवली होती.

प्रतिसाद ashwini_k | 27 October, 2009 - 06:18
रैना, शारिरव्यवहाराच्या पातळीवरचे लिखाण खूप नसावे. इतरही विषयांवर बेतलेली पण अध्यात्मिक संदेश देणारी भारुडं, अभंग आहेत, विंचू चावला.... आहे, ऊस डोंगापरी... आहे. बहुतेक सारे संत प्रपंच व परमार्थ समांतरपणे यशस्वी करणारे होते त्यामुळे जड जड भाषेचे बंधन असावे असे त्यांना वाटले नसावे.

आता वरच्या भारुडात एखाद्या पुर्णपणे अशिक्षित, कष्टकरी समुहाला फ ने सांगितलेले विश्लेषण डायरेक्ट सांगितले तर जबरदस्तीने तो डोक्यात घुसवून घेईलही कदाचित पण हृदयाला स्पर्श करायला वेळ लागेल. त्यापेक्षा वेश्येचा व्यवहार काय असू शकतो ही साधारण सर्वांना कल्पना असते त्यामुळे ते सोपे गेले असेल.

एक उदाहरण देते (मला जमेल तसे) --

एक बी नुस्ती पाण्यात टाकून ठेवली व दुसरी किंचीतच ओलावा (टिपकागदाच्या सहाय्याने) ठेवली. २-३ दिवसांनी दिसेल की पाण्यातली बी सडून गेली व दुसरी बी तो किंचीतसा ओलावा मिळ्ण्यासाठी झगडून रुजू लागली, तिला मुळे फुटली.

संदेश ---- माणसाजवळ भरपूर साधने, सुविधा असतील पण तो निष्क्रीय असेल तर त्याच्यातल्या स्पार्कचा काहीही उपयोग न होता तो निरुपयोगी होईल. व एखाद्या माणसाजवळ जरी लिमिटेड किंवा अत्यल्प साधने, सुविधा असतील पण त्याच्याजवळ जिगर असेल तर तो कधी ना कधी स्वतःची प्रगती करेलच.

प्रतिसाद zakasrao | 27 October, 2009 - 06:23
फ भारीच रे.
तुझ्याही पोतडीत बरच काही आहे.
पण बहुद्धा वेळेअभावी तु तुझी रत्न बाहेर काढत नाहीस

प्रतिसाद psg | 27 October, 2009 - 06:40
सहज आठवलं- आनंद यादवांचं जे तुकारामांवरचं पुस्तक बॅन केलं गेलं, त्यातले काही परिच्छेद मटात छापून आले होते.. त्यात असं होतं की त्याकाळी (तुकाराम रहात होते तिथला) समाज इतका नीचांकी पातळीवर उतरला होता, की रोजचं पोटाचं काम करून झालं, की नाच-गाणे-वेश्या व्यवसाय हे अगदी सहज समजलं जायचं. कुटुंबाकडे, पक्षी- बायको-मुलं-आईवडील यांच्याकडे पुरुष लक्ष देत नसत.. यादवांच्या शब्दात 'सगळे वासनेत बरबटलेले कीडे' झाले होते. खुद्द तुकारामही यातून सुटले नव्हते. पण इतक्या खोल गर्तेतून ते केवळ (कोणीही गुरू नसताना) स्वतःच्या आत्मिक बळावर वर आले, नुस्तेच वर आले नाहीत, तर विठ्ठलाचा साक्षात्कार त्यांना झाला, त्यांनी स्वतःची उन्नती स्वतः करून घेतली आणि समाजाचीही केली- अश्या काळात जेव्हा वेशागमन सर्रास आणि समाजमान्य होतं- म्हणून त्यांची महती अजूनच पटते..

तुकाराम त्यातले होते- हे वारकरी सांप्रदयाला पचलं नाही, आणि त्यांचा क्षोभ उडाला. 'ते त्यातून वर आले' हे लिहिलेलं त्यांनी वाचलंच नाही बहुधा!

असो, तर ह्या पार्श्वभूमीवरही एकनाथांच्या रचनेचं कारण कळू शकेल, की शरीराचे चोचले कोणत्याही मार्गाने पुरवणं हे त्याकाळी बर्‍यापैकी रूढ होतं.. त्याच मार्गातून अध्यात्म शिकवणं हे म्हणजे फारच सही!

प्रतिसाद devdattag | 27 October, 2009 - 06:56
चांगली चर्चा चालू आहे..
रच्याकने.. वाल्मिकी रामायणातही सितेच्या सौंदर्याचा उल्लेख आजच्या तथाकथित सभ्य भाषेत शोभून दिसणारा नाही.

प्रतिसाद needhapa | 27 October, 2009 - 07:08
वा मस्त माहीती फ.
श्लील-अश्लिलतेच्या संकेतांबद्दल म्हणायचं झालं तर जुनं साहीत्य वाचलं तरी आपल्याला धक्के बसू शकतात. आणि आपलं साहीत्य त्यांनी वाचलं तर त्यांना..
कुणी चिपळूणकरांचं अरेबियन नाइटस वाचलंय का पूर्ण? ते लहान मुलांसाठी आहे यावरच माझा विश्वास बसला नाहीये अजून..

प्रतिसाद robeenhood | 27 October, 2009 - 07:40
भृशुंडी रामायण तर कहर आहे कहर...

शोनु, वेळेत चर्चा कॉपी करुन इथे आणल्याबद्दल धन्यवाद. आता पान बरेचसे वाहुन गेले आहे. चर्चा सुरु करणार्‍यास, फ आणि इतरांना पण धन्यवाद Happy

बाकी म्हैस, बिगरी ते मॅट्रिक, रावसाहेब (वा व्यक्ति आणि वल्ली मधली इतर पात्रे) ह्या कॅसेटी लावून हसणे आणि आइ-बापानी शिकवले म्हणुन आयुष्यभर देवाला नमस्कार करणे ह्यात मला फारसा फरक जाणवत नाही. >>> Lol

हे आजच, आताच वाचले, आणि ही पोस्ट लिहिण्यानंतर हसू यावे ही अपेक्षा असल्याने, टण्याचा (मायबोलीकर)मित्र म्हणून तेही कर्तव्य मी पार पाडले. Proud

पुलंनी भरपूर लेखन केले. अन त्यातले 'तुला' मिडीऑकर वाटेल असेच लिखाण 'सुप्रसिद्ध' झाले, त्याला तु किंवा पुलं किंवा इतर लोक काय करणार टण्या? उदाहरण देताना शेवटी तु 'व्यक्ती आणि वल्ली'चेच उदाहरण दिलेस ना?

विचार करा पण पोस्ट नका करू >>> म्हणजे ते बर्‍याच वेळा जे करतात त्याच्या बरोबर उलटे करायला सांगतो आहेस असामी तू Proud

hawa_hawai | 28 October, 2009 - 09:58 नवीन
नुकत्याच हाती आलेल्या बातमी नुसार डिसेंबर महिन्यातील सर्वोत्तम कवितेची तब्बल दोन महिने आधीच निवड करण्यात आली आहे. कधी दोन महिने उशीर तर कधी दोन महिने लवकर असे हे नविन फिट्टमफाट धोरण आहे. सर्वोत्तम म्हणून निवडली गेलेली कविता ही मेट्रन या कवयित्रीची असून
मूळ असामीज असलेल्या या कवितेचे हे मराठी मायबोलीतले भाषांतर आहे.
(सूचना :असामीज आहे म्हणजे असामी भाषेतली. असामीज शब्दावरून मेट्रन म्हणजे असामी किंवा आसामला गेलेली व्यक्ती असे कुठलेही बोट आम्हाला दाखवायचे नाही.)

मी तुम्हाला नक्कीच भेटेन!!

मी तुम्हाला (पुन्हा) नक्कीच भेटेन
कुठे? कशी?...... माहीत नाही?

कदाचित नविन आयडी घेऊन मायबोलीवर उतरेन
आणि कदाचित तुमच्या वॉर्डातील भांडणे बघून
एक आणखी राऊंड घेत वात्रटपणा करत राहेन
काय सांगू... कुठेही, कधीही
पण मी तुम्हाला नक्कीच भेटेन

नाहीतर,
बाष्कळ असे भराभरा लिहुन, कुणाला चिमटा काढेन
त्या चिमट्यानी कुणाचे सर्वांग थरथरवून टाकेन
आणि एक नकोशी शिरशिरी होऊन मायबोलीला कवटाळेन

मला बाकी काही माहित नाही
पण एव्हडं कळतय की
डॉक्टरांनी काहीही केले तरी
या जन्मी मी मायबोलीवरच असेन
हा आयडी नष्ट झाला
तरी सगळेच नष्ट होत नाही
लोकांच्या आठवणी विश्वात विरून जातात

मी नविन शब्द गोळा करेन
ते धाग्यात गुंफेन....

(आणि नविन आयडी घेऊन)
मी तुम्हाला नक्की, नक्कीच भेटेन

श्री. टण्या बेडेकर यांनी हे सदर सुरु केले ही चांगली गोष्ट केली. माझ्या मते इथे कुणालाहि (म्हणजे मला) लिहू देण्यापेक्षा, एक संपादक मंडळ करावे, ज्यांना साहित्यातले, कवितेतले, विनोदातले कळते. त्यांना इतरत्र काहि चांगले आढळले तर ते वाहून जाऊ नये यासाठी इथे आणून ठेवायची परवानगी असावी. तसेच जे बा. फ. वाहून जात नाहीत तेथील लिखाण तिथेच राहू द्यावे, व त्याचा फक्त संदर्भ इथे द्यावा. म्हणजे चांगले होईल असे मला वाटते. नाहीतर हा बा. फ. पण नुसताच गप्पांचा बा. फ. होईल.

नेमके काय म्हणजे, काय नेमके काय? इथे अनेक विषय आहेत. कुठल्या विषयाबद्दल नेमके काय असे विचारता आहात?
असो. मी आपले माझे म्हणणे पुनः लिहीतो.
१. एक संपादक मंडळ असावे. ज्यांना साहित्यातले, विनोदातले, कवितेतले काही कळते असे लोक यात असावेत.
२. इतरत्र वाहून जाणार्‍या ठिकाणी काही जपून ठेवण्यासाठी दिसले तर फक्त त्याच लोकांना ते इथे आणायची परवानगी असावी.
३. वाहून न जाणार्‍या ठिकाणी काही आढळल्यास, त्याचा फक्त संदर्भ इथे द्यावा.
४. त्यामुळे या बा. फ. वर फुकटच्या गप्पा होणार नाहीत.

आशूडी यांसी पुपुवरती आज स्फुरलेले काव्य.
स्लार्टीआजोबा, आता तरी परत याच!!

आशूडी | 18 November, 2009 - 06:57

स्लार्टी

मी ठोकतो नाव माझे स्लार्टीबार्टफास्ट
लोक म्हणे, ओळख देईना, थेरडा आहे भारी खाष्ट
बालकच अजूनी वय फक्त चौर्‍याण्ण्वाचे
ज्ञानासाठी लागते का वय विद्यार्थ्याचे? ||१||

बाफ असे माझा आवडता जरी पुपु
पोस्टी वाचून माझ्या, वाहून जाई रोज ही विपु
दरदिनी आसु लिहिणे असे आगळा छंद
या वयात येणार आता कसले आणिक गंध? ||२||

टक्कल पडते लोकांस खाजवून डोके
अजून शाबूत श्वेतकुंतल, म्हणून म्हणतो चालवा डोके
दाढीचेही केस ना अजून होती विरळे
प्रेमकविता नाही; पाडतो मी तिरळे ||३||

पेशवाई, पुणेरी मिसळ, रंपाचे अड्डे
तरीही का खुणावती सतत शेपूचे गड्डे?
व्यासंग कसचा; अटळ या मेंदूच्या खाजा
म्हणूनच म्हणे मी आहे सार्‍यांचा आजा! ||४||

शोधतो नवे किनारे काठी टेकीत
जनीच्या प्रेमाच्या बाता फेकीत
वाटेल तुम्हास पळाला हा जणू
महाराष्ट्रातून बिहारी..
कैसे उमजणे जगास आस माझी..
स्वामी हजार तटांचा जनीविना भिकारी! ||५||

स्वामी हजार तटांचा जनीविना भिकारी! >>> गेलेत !! बहुतेक जनीसोबत नविन किनारे शोधायला गेलेत (आणि मायबोलीचा रस्ता विसरलेत.)

आमची बी कवीता .

मी एक टिंब ती एक टिंब मधेच सुर्याचे प्रतीबिंब
माझ्या घरा जवळ आहे विजेचा खांब
तीच्या घरा जवळ आहे लिंब
माझ्या घरा पासुन तीच घर लय लांब ||

तीच झालय वो लग्न
ती गेली माझ्या पासुन लांब
ती गेली म्हनुन मी करतो हतभट्टी लावुन बोंबाब ||

एक दीवस तीच्या घरा समोरुन जातांना
तीचे मुल म्हनाली मला मामा जरा थांब
मंग मी गम ए जुदाई मुळे लावले हातभट्टी चे दोन तांब
म्हनुन म्हन्तो पोरांनो पोरी पासुन राहा जरा लांब ||

शेवटी मी एक .....................................

आणखी एक प्रयत्न .

कवि : एक शुन्य
प्रेक्षक : वा क्या बात .. एक शुन्य
कवि : एक शुन्य
प्रेक्षक : खरोखर काय कल्पाना शक्ती आहे एक शुन्य
कवि : एक शुन्य एक शुन्य
प्रेक्षक : एकदम स ही ही ही
कवि : एक शुन्य ,शुन्या वर आणखी एक मोठा शुन्य
प्रेक्षक : ग्रेट एक दम भारीच .. शुन्य
कवि : हा शुन्य , तो शुन्य , तीकडे शुन्य , ईकडे शुन्य , थीते शुन्य , इथे शुन्य
(माझ्या सारखा ) प्रेक्षक : गप्प बसा वो शुन्या च्या पलीकडे काही आहे की नाही ?
कवि Sad माझ्या कडे उंगली र्नीदेश करुन ) तो पाहा आणखी एक शुन्य .

अश्विनीमामांचे पोस्ट गडावरून हरवायच्या आत त्यांनी पार्ल्यात टाकलेले. तिथून हरवायच्या आत इथे

सिह्गड रोड वरील पोस्ट इथे टाकत आहे.
सिन्डी, सायो, शोनू - हैद्राबादी ड्वाय्लोक.

ऐ देखिये, कल नबाबसाब हमकु एक बाट्ल लाके दिये. शाम में बच्च्च्चे सो गये बाद पियेन्गे, बातां करेन्गे बोलके बोले. मै बच्च्च्चाओं को सुलाइ, मुर्गी बनाइ और इन्तेजार करते बैठी. जब हमारी नै नै शादी हुइ थी ना तब वो कब्बीकबी लाते थे ( शराब? तुमको क्या लगा! - चार आने के तीन? तौबा तौबा.) और पीके रात तमाम मस्ती करते थे. तबी तो बच्च्च्चे - जुम्मन , आयशा, फातमा और ह्सन.

मै बवरान में थी. अब चालीस के उप्पर पांच साल पडे मियांको. अब संभालना पड्ताना. ज्यादा मस्ती करेन्गे तो अल्ला को प्यारे हो जैन्गे ना. फिर मै किसके मू को देखना. उनके बालोंको मेहेन्दी मैच लगातीना. मेरेको मालुम, सारे बाल सफेद हो गये सो है. फिर भी दिखते मिया गुलफाम.

रात मे कब तो बी साहब आये. मै बाट्ल टेबिल पे रखी. गिलासां रखी. तो उन्हों म्रेरेपेइच उखड गये. बेगम
तुम्हारे इरादे कुच ठीक नै लगते. मै परेशान हो गै. ऐसा क्यु कह रे जानम? ( कहिं कोइ दूसरी बेगम तो नही करके आये ?)

मिया बोले, अगे, तु गिलासा बाजु रख. अब अपनी उमर नशा करने की नै. अब हम लोगां खयाल रखना पड्ता. मै मुन्नालाल दवासाज की दुकान से असली शहद लाया हु. एक एक चम्मच पीयेन्गे. हाय तौबा
ये मेरे शेर को क्या हो गया. कल बोलेगा बिर्यानी में गोश्त नही सब्जी डालो. फिर भी मिया का सुनना पड्ता ना. तो हम शहद पीये और सो गये. शब्बा खैर. दिलनवाज बेगम

मामींनी आज गडावर सक्काळी सक्काळी घोषित केलं, की त्या आज शन्वार असल्यामुळे अज्जिब्बात इनोद करणार नाहीत. मग मी म्हणालो- ठीके. इनोद नको. हायदराबादीत एक गोष्ट सांगा. तेव्हा मामींनी मेंदुमंथनातून खालील रत्न बाहेर काढलं.
---

अश्विनीमामी | 21 November, 2009 - 13:57

ऐ देखिये, कल नबाबसाब हमकु एक बाट्ल लाके दिये. शाम में बच्च्च्चे सो गये बाद पियेन्गे, बातां करेन्गे बोलके बोले. मै बच्च्च्चाओं को सुलाइ, मुर्गी बनाइ और इन्तेजार करते बैठी. जब हमारी नै नै शादी हुइ थी ना तब वो कब्बीकबी लाते थे ( शराब? तुमको क्या लगा! - चार आने के तीन? तौबा तौबा.) और पीके रात तमाम मस्ती करते थे. तबी तो बच्च्च्चे - जुम्मन , आयशा, फातमा और ह्सन.

मै बवरान में थी. अब चालीस के उप्पर पांच साल पडे मियांको. अब संभालना पड्ताना. ज्यादा मस्ती करेन्गे तो अल्ला को प्यारे हो जैन्गे ना. फिर मै किसके मू को देखना. उनके बालोंको मेहेन्दी मैच लगातीना. मेरेको मालुम, सारे बाल सफेद हो गये सो है. फिर भी दिखते मिया गुलफाम.

रात मे कब तो बी साहब आये. मै बाट्ल टेबिल पे रखी. गिलासां रखी. तो उन्हों म्रेरेपेइच उखड गये. बेगम तुम्हारे इरादे कुच ठीक नै लगते. मै परेशान हो गै. ऐसा क्यु कह रे जानम? ( कहिं कोइ दूसरी बेगम तो नही करके आये ?)

मिया बोले, अगे, तु गिलासा बाजु रख. अब अपनी उमर नशा करने की नै. अब हम लोगां खयाल रखना पड्ता. मै मुन्नालाल दवासाज की दुकान से असली शहद लाया हु. एक एक चम्मच पीयेन्गे. हाय तौबा ये मेरे शेर को क्या हो गया. कल बोलेगा बिर्यानी में गोश्त नही सब्जी डालो. फिर भी मिया का सुनना पड्ता ना. तो हम शहद पीये और सो गये. शब्बा खैर. दिलनवाज बेगम.

वाड्यावर ज्युनियर मातेने सिनियर मातेला केलेले रिपोर्टिंग.

श्रद्धा | 23 November, 2009 - 09:56
पुण्यातून मातेचा नमस्कार.
कस्काय ज्युमा? इथला आश्रम ठीक चालला आहे ना?

आशूडी | 23 November, 2009 - 10:27
माते, तुझ्या कृपेने आश्रम जोरात चालू आहे. यज्ञकुंड धगधगते ठेवण्याकरीता माझ्या मदतीला वैनी, आज्जी साजिरापंत शुध्द पांशात बुडवलेल्या काड्या आपलं समिधा टाकत असतात. हिम्या, मयुरेश, केपी, इ. खंडे आपलं, खंदे कार्यकर्ते पांशा व इतर साहित्याची सपोर्ट सिस्टीम समर्थपणे हाताळत आहेत. अँकी , शँकी ही जोडगोळी (नक्की २ वेगळे आहेत ना? ) पडेल ते काम करण्यास तत्पर असतात. त्याशिवाय (), अर्भाट यांसारखे परमभक्त आश्रमावर रोमातून हिंडून कुणा पापी राक्षसाची त्यावर नजर तर पडणार नाही ना यावर करडी नजर ठेवून असतात.
त्याशिवाय आश्रमात गुरुवर्य स्लार्टीमहारजांच्या अचानकअदृष्यगमन्योगाचे दुष्परिणाम सांप्रत काळात आश्रमाला फारच जाचक होत असल्याने ज्येष्ठ हास्यटरयोगीभगिनीमाता अश्विनीमामी व टीकाचिमटाबंड्खोरज्ञानी हूडेश्वरमहाराज यांच्या हाती काही काळ त्या विभागाची सूत्रे तात्पुरती सोपवण्यात आली आहेत. (थोडक्यात, ते प्रोबेशन वर असून त्यांना परमनंट करुन परमानंदाची अनुभूती भक्तास नित्य देण्याचा आश्रमश्रेष्ठींचा विचार आहे.)
दानवासुरांचे दूत मायावी शक्तीने डुआयडी बनून शिष्यांना छळण्यास अधूनमधून चाल करुन येतात पण शिष्य सामर्थ्य इतके प्रबळ झाले आहे की ते क्लृप्त्या करुन येनकेनप्रकारेण त्यांना "त्राही त्राही" करुन .. ला पाय लावून पळण्यास भाग पाडतात. त्यायोगे संपूर्ण आश्रमाला विनामूल्य मनोरंजनाचा आस्वाद घ्यावयास मिळतो हा आपलाअ फायदाच जणू.
चालू काळातील ठळक घडामोडी खालील प्रमाणे :
१. संतशिरोमणी केदारशास्त्री जोशी यांनी कैबर खिंडीतून मार्गक्रमणा करीत असता आश्रमस्थळी भेट देण्याचा मानस व्यक्त केला.
२. तत्क्षणी आपले तत्पर सचिव वाडेश्वर पेशवे यांनी तपशीला साठी खालील खलिता पाठवला.
>>
देशात २० ते २० ठीक आहे पण पुण्यात कोणत्या कालखंडात आपण वास्तव्यास असणार आहात केदारशास्त्री? तपशील कळविणे. त्याबरहुकूम आपला शामियाना उभारुन त्यात होणार्या मसलतीचे खलिते मातब्बर सरदारांस धाडण्यात येतील. शिवाय मसलतीचा मसुदाही थोडक्यात कळविणे. मुद्दे आधी माहित नसले की आमचे सरदार गुद्द्यांवर येतात. भोजनाचा तपशील आम्ही ठरवू. तो सांगण्याची गरज नाही मात्र पान चाटून पुसून लख्ख केल्याशिवाय पाटावरुन उठता येणार नाही याची खूणगाठ बांधूनच पुण्यनगरीच्या दिशेने कूच करावे.
लोभ आहेच. (तुम्हाला . आम्ही निर्मोही आहो.) तो आटोक्यात आणावा ही विनंती.
आपले हितचिंतक
वाडेश्वर पेशवे.
<<
त्यावर त्यांनी हसण्याव्यतिरिक्त उत्तर देणे 'गैर' मानले.
२. वाड्याचे हेरखाते "गैर" नावाचा माहितीपट शिष्यांना जगातल्या गैरप्रकारांची ओळख करुन देण्यासाठी योग्य आहे की नाही हे पाहण्यास गेले आणि येताना "झोप गेली तरी बेहत्तर पण वैर ७२" अशा घोषणा देत परतले. तपशील विचारु नका म्हणतात. आता तूच तो प्रकार पाहा आणि तुझ्या रसग्रहणाने आम्हाला पावन कर.
३. केदारशास्त्रींसाठी आयोजित करण्यात आलेल्या गटगयागासाठी साजिरापंत कार्यशिरोमणी म्हणून पुढे सरसावले आहेत. ज्येष्ठ कार्याध्यक्ष मयुरेश त्यांना मार्गदर्शन करीत आहेतच. पण अजून म्हणावे तितके यश नाही. पाहू.
असा एकंदरीत वाडाश्रम, पुणे येथील हालहवाल आहे. तिकडे सिंगणापुरी आश्रम काय म्हणतो? आपला भगवा झेंडा अटकेपार तिथवर फडकावून आपण व गुरुदादा फ यांनी जो पराक्रम केला आहे त्याचा आम्हास अभिमान आहे.
तरीही, आपल्या लेकरांवर मायेची पाखर करण्यास आपण उभयतांनी पुण्यनगरीत पदार्पण करुन सकलांस भेटून जावे , ही सदिच्छा!
आपली आज्ञाधारक,
ज्युनिअर माता.

श्रद्धा | 23 November, 2009 - 10:38
ज्युमे, आढावा मस्तच.
पण स्लार्टीमहाराजांचे पद दुसर्‍या कुणाला???????????? नाही नाही ज्युमा... असा अवतार एखादाच होतो. आपण ते तसेच रिक्त ठेवूया. न जाणो, केव्हा कधी कुठल्या किनारी महाराज पुनः प्रकट होतील. तेव्हा पदासाठी मारामार्‍या होऊ नयेत म्हणून पद रिक्त ठेवणे आवश्यक आहे.

आशूडी | 23 November, 2009 - 11:00
माते, मी ते पद कुणासच देऊ इच्छित नाही. तूर्तास आश्रमाचे कामकाज खोळंबू नये म्हणून इतर लोक त्या जमेल तशा जबाबदार्‍या पार पाडीत आहेत. पण झाले बहु, होतील बहु, परंतू या सम हा! या न्यायाने, महाराजांच्या आठवणीत आजवर कुणीही आसु लिहिण्यास धजले नाही. रादर, स्लार्टीमहाराजांचे पद आश्रमात अढळ आहे. सज्जनगडावर जसे समर्थांचे शेजघर जतन करण्यात आले आहे त्याच प्रमाणे आम्ही स्लार्टीमहाराजांची विपू झाडलोट करुन लेटेस्ट अपडेट देऊन लख्ख ठेवित असतो. मी त्यांच्या आळवणीसाठी एक आर्त आरतीही रचली होती जी बहर, त्यांची विपू अशा जागोजागी डकवण्यात आली आहे. जेणेकरुन कधीतरी ते ती वाचतील व भक्तांचा धावा ऐकून साक्षात प्रगटतील.
शिष्योत्तमा नंदिनी, तू का रागे भरत आहेस. माते, हीची प्रगती वाखाणण्याजोगी आहे. तिने तपःसाधनेने दिव्य शक्ती प्राप्त करुन मुंबईसारख्या शहरात घरात घरबसल्या आजूबाजूचा १००-२०० मैलांचा मुलुख न्याहाळण्याची दिव्यदृष्टी प्राप्त केली आहे. त्याने रोमातील शिष्यांना हातभारच लागेल, म्हणून तिचे कौतुक.
मंजुडी सध्या भलभलते प्रयोग करण्यात व्यग्र आहे. त्या प्रयोगात तिने स्वतःच्या कन्येला भरताचे वांगेच बनवून टाकले. ती मजा तू हस्तकलेत पाहाच. पण त्या वांग्यांची पुन्हा नीरजा बनवण्यात माझे किती तपोबल खर्ची पडले असेल याची मी तुला काय कल्पना देणार!
(मातेकडे वेळ कमी असल्याने प्रत्येकाचा डीटेल तपशील आत्ता देणे शक्य नाही . पण दर महिन्याला प्रत्येक आश्रमवासीयांचा मासिक अहवाल मातेला पोचतो हे भक्तांनी लक्षात ठेवावे. शिवाय माता सर्वज्ञानी आहेच! )

रिमोट कंट्रोलाची परंपरा जुनीच आहे हिम्या. महाराष्ट्रदेशी होती, आता भारतदेशी आहे. मायबोलीवर आता प्रतिमंत्रीमंडळ आले आहे. मग हेच का नको?

(अरे यावरून आठवले, काल 'मायबोली प्रतिमंडळा'ची बातमी होती बरं का सकाळला.)

आज गडावर अ.आं. नी त्यांची चाळीस पानी वही बर्‍याच दिवसांनी उघडली त्यातील ही दोन पुष्पे आणि त्यावरील कोरडाईचे भाष्य...

खास जुमा च्या आग्रहावरून ...........

बुधवार आला बुधवार आला
कार्याध्यक्षांनी पुकारा केला
कामाच्या धबडग्यातला होता
तो एक किरण आशेचा ||१||

हापिसातून लवकर निघण्याचा
एक प्रामाणिक प्रयत्न होता
बॉस आणि क्लायंट यांचा
बेत हाणण्याचा संयुक्त प्रयत्न होता ||२||

या यशस्वी प्रयत्नाचा
माझा एक बळी होता
माझ्या पदरी चिडचिड देऊन
बुधवार माझा कोरडाच गेला ||३||

आशूडी | 10 December, 2009 - 14:47
अरुण! टू गूड!
मान गए, आपकी कवीकी नजर और कोरडे बुधवार का असर, दोनों को!
फक्त दुसर्‍या कडव्यात यमकासाठी दोनदा " प्रयत्न " हा एकच शब्द वापरला आहे. आपल्या र ला र ट ला ट च्या शेंडीबाजार घराण्याच्या शैलीमध्ये ते अडकल्यासारखं वाटतं. बाकी कविता उत्तम. एक्स्प्रेशन्स मध्ये तर तुमची तोड नाही. ती ????????? यातून तुमच्याइतक्या ताकदीने कुणी व्यक्त करुच शकत नाही. ठेवा ते वर. अडगळीत नाही हो. त्या शेवटच्या २ ओळी पुन्हा एकदा लिहून दाखवा..
माझ्या पदरी चिडचिड देऊन
बुधवार माझा कोरडाच गेला >> आहा हाह.. तुमचा दर्द असा काळजाला भिडला.. स्कूटर पल्टी चाकं टरार!! ( मामींची स्कूटर नाही. माझी.)
तुम्हाला वरचा ट!
सलधूत गुलकर्णी.
Light 1
Lol

अरुण | 10 December, 2009 - 14:56
धन्यवाद जुमा.

पण आमच्या शेंडीबाजार घराण्याच्या प्रथेप्रमाणे ही कविता लिहिली गेली असल्यामुळे र ला र (च) आणि ट ला ट (च) द्यावा लागतो. घराण्याच्या शैलीच्या बाहेर गेल्यास, पुढचे कितीतरी बुधवार कोरडे काढावे लागतील, याच भान आम्हाला आहे................

आमच्या कवितेतला दर्द तुम्हा पर्यंत पोचलाच कसा???????? शेंडीबाजार घराण्याच्या शैलीचा आमचा अभ्यास कमी झाला की काय ???????? आमचे प. पु. गुर्जी लिम्यादा यांना कळंल तर भलतीच आफत येईल आमच्यावर .................

अरुण | 10 December, 2009 - 15:15
आता या आमच्या शेंडीबाजार घराण्याच्या शैलीचा अजून एक नमुना

शेंडीबाजाराचे शेंडे आम्ही, आम्हा कुणाची ना भीती
काव्य, कविता चारोळी साठी, वही घेतली हाती ||१||

नोकरीच्या पहिल्या दिवशी, दिक्षा घेतली काव्याची
अर्थाविण कविता लिहाया, लेखणी सज्ज जाहली ||२||

काम असो वा नसो हाताशी, कल्पनेची उत्तुंग भरारी
चार ओळी खरडाया, कसली आलिये मगजमारी ||३||

बुधवाराचे आमंत्रण येता, कळी खुलते जराशी
काम संपवण्याच्या ऐवजी, स्वप्न घेतसे भरारी ||४||

स्वप्नातून होता जागे, सत्याची येते प्रचिती
काळ-काम-वेगाची, प्रमेये अवघडुनी जाती ||५||

अशा काव्यप्रतिभेला, कुणाची बरे दृष्ट लागावी
माझी ४० पानी वही, का अशी अपुर्ण राहावी ||६||

पूनम | 10 December, 2009 - 15:16
अरूण!! दारूण कविता रे! _/\_

ज्युमे! खरंतर त्याला चिथावणी दिल्याबद्दल तुझं ज्युमापद काढून घ्यायला हवं २ दिवस इतका गंभीर गुन्हा आहे हा!

अरुण | 10 December, 2009 - 15:18
दारूण कविता रे! >>>>>> दारुण कसली ??????? "दारु --- न" कविता आहे ती ............

हिम्सकूल | 10 December, 2009 - 15:25
वा वा.. अ.आ. एकदम मस्त कविता... पण जरा काही ठिकाणी ते यमक जुळत नाहीये.. आणि काही ठिकाणी मात्रापण कमी जास्त आहेत.. त्यामुळे जरा चाल बिघडती आहे.. आणि मूळ वृत्ताला पण जरा धक्का लागला आहे.. पुढच्या वेळेस ह्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास अजून चांगली होईल तुमची कविता....

आता रसग्रहण आयडी येऊन एक जोरदार समिक्षण टाकणार..

आशूडी | 10 December, 2009 - 15:33
क्या बात है! वाचकांना रडवायचा क्रूर रस ओतप्रोत भरलाय या कवितेत. तू ही थोडी बाडगावकरांच्या स्टाईलने लिहिलीस का? हम्म. कारण मला चोरगावकरांची अजून आठवते आहे डोळ्यांत रुंजी घालते .. तुझ्या आधीच्या परफॉर्मन्स पेक्षा आत्ता खूपच सुधारणा जाणवते आहे. पण...
अरुण , आपल्यामधल्या काव्य प्रतिभेचा असा 'दारु' नं पराभव होऊ देऊ नको. तुला रोज सकाळी रियाझाची गरज आहे असे जेव्हा तुझे खालच्या ओळीतले शब्द वाचले तेव्हा जाणवले. झोप , काम, चहा (प्लीज नोट अब्सेंस ऑफ \)अशी कारणं चालणार नाहीत. तुला माणिक वर्मा यांचा जगप्रसिध्द किस्सा माहित आहे ना? घरात पाहुणे आले तर त्या बाथरुम स्वच्छ करुन तेथे रियाझ करत. सावरकर , टिळक यांनी जेल मध्ये कोणत्याही लेखन साहित्याशिवाय लिहिलेले साहित्य आज शिलालेख समजले जाते. तेव्हा रियाझ हा हवाच. तू कुठेही लिही, डेस्क, क्यूबिकल्,बोर्ड, मीटींग रुम, गाडी, कुठेही कशानेही लिही. काव्य हे कोणत्याच साधनांवर अवलंबून नसतं. नुसती स्वप्न पाहू नको. अमलात आण. नाहीतर कालच्यासार्खे सगळॅ बुधवार कोर्रडे जायचे. जिद्द हवी मनात, आणि साधनाही. (कोणती ते तू ठरव.)
तू खूप वर जाशील या क्षेत्रात. शुध्दलेखनाकडे जरा लक्ष दे.अभिनंदन तुझं. हं?
तुला मी देते. च!! बस्स.
-
चेवकी थंडीत.
Light 1
Lol

Pages