बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संपादन प्रतिसाद पागल अनुकण | 2 November, 2010 - 10:51 नवीन
उद्योजकसंघातर्फे साजिर्‍याने मध्यंतरी रस्त्यावरून जाणार्‍या काही लोकांच्या मुलाखती घेतल्या :
साजिरा - नमस्कार. आपले नाव?
बाई (उसळून) - नीरजा.
साजिरा - आपण काय करता?
नीरजा (उसळून) - मी कॉस्च्युम डिझायनर आहे.
(रस्त्यावरून बाजूने जाणारा उसळून मध्येच भोचकतो - अहो, वेषभूषाकार म्हणा की! साजिरा त्या माणसाला 'थोडं थांबा, तुमचीही मुलाखत घेतो' असे सांगून शांत करतो.)
साजिरा - वावा! म्हणजे आता लॅक्मे फॅशन वीक झाला त्यात आपली डिझाइन्स......
नीरजा (उसळून उसळून) - ते वेगळे आम्ही वेगळे. आम्हाला पटकथा मिळते, मग आम्ही विचार करतो. त्यांची डिझाइन्स पटकथाकाराला मिळतात, मग तो विचार करतो.
साजिरा - ओके ओके. मराठी चित्रपट आजकाल जास्त चालतात कारण ते भारी असतात म्हणून नाही तर त्यांच्या जाहिराती भारी असतात म्हणून, असे एक मत आहे. आपले काय मत?
नीरजा (उसळून उसळून उसळून) - असल्या यडचाप मतांवर मी एक नि:श्वाससुद्धा टाकत नाही.
साजिरा - धन्यवाद. कृपया.

आता त्या बाजूला थांबलेल्या माणसाची पाळी. वरील बाईंची मुलाखत सुरू असताना हा सारखा साजिर्‍याला सूचना देत होता.
साजिरा - नमस्कार. आपले नाव?
माणूस - चि पहिला स्वल्पविराम न अर्धा स्वल्पविराम म पूर्ण स्वल्पविराम य पूर्ण पूर्णविराम दोनदा
(यातले साजिर्‍याला 'पूर्णविराम दोनदा' एवढेच कळते व बंगाली माणूस असावा असा तो अंदाज करतो.)
साजिरा - ओके आले लक्षात. आपण काय करता?
पूर्णविरामदोनदा - मी बरेच उद्योग करतो पूर्णविराम उदाहरणार्थ स्वल्पविराम शास्त्रीय संशोधन स्वल्पविराम मराठीवर आत्यंतिक प्रेम स्वल्पविराम प्रताधिकारावर जाज्वल्य निष्ठा स्वल्पविराम समाजसेवा इ पूर्णविराम इ पूर्णविराम आपण काय करता प्रश्नचिन्ह
साजिरा - माझे नाव साजिरा, प्रश्नचिन्ह माझ्या एका परिचिताचे नाव आहे. असो. मी उद्योजकसंघातर्फे या मुलाखती घेतोय. तसा मी अ‍ॅडव्हर्टायजिंगमध्ये आहे. आपण गझला खूप लिहिता का?
पूर्णविरामदोनदा - जाहिरातक्षेत्र पूर्णविराम मी गझला लिहितो असे का वाटले प्रश्नचिन्ह
साजिरा - आपण आपले नाव दर वाक्यात सांगत आहात म्हणून वाटले. आणि अहो, मी मुलाखत घेतोय, तर तुम्हीच मला प्रश्न काय विचारताय?
पूर्णविरामदोनदा - सवय आहे पूर्णविराम तसेच वरील वाक्यात आणिच्या आधी आपण पूर्णविराम टाकलाय तो चूक आहे पूर्णविराम तसेच आपली मुलाखत घेण्याची पद्धतही चूक आहे पूर्णविराम पिवळे हास्य
साजिरा - धन्यवा. कृपया.

आणखीही बर्‍याच मुलाखती आहेत. त्या नंतर बघू.

कांदापोहे | 2 November, 2010 - 11:06 नवीन

साजिरा - नमस्कार. आपले नाव? लक्षच गेल नाही माझे तुमच्याकडे. तो जीएस तुम्हाला कृष्णाजी म्हणत होता. तुम्ही नक्की कोण?
रा१ - अहो नावात काय आहे असे गांधीजी म्हणुन गेलेत. कृष्णाजी तर कृष्णाजी. तसाही वाल्याचा वाल्मी... माफ करा. रामाचा रावण झालाच की. उद्योजक बनायचे म्हणजे रामासारखे स्वच्छ राहुन चालतच नाही म्हणा.
साजिरा: तुम्ही उद्योजक आहात?
राम बदलुन : तुम्हाला काय वाटले? काहीही काम न करता आयटीत चिंकोके घेतो आम्ही? आम्ही पूरेपूर उद्योजक आहोत. तुम्ही आम्हाला उद्योजक गटात सामील केले नसले तरी.
साजिरा: काय उद्योग करता तुम्ही?
रा१ परत बदलुनः अनेक उद्योग करतो. काही लोक याला धंदे पण जोडतात पण मनोरे बांधतो आम्ही. स्वप्नांचे नाही. (स्वप्ना म्हणल्यावर तिथे अ.आ. व केप्या डोकावतात)
साजिरा: असो काय स्वप्न आहेत तुमची?
रामनराघवन बदलुन : येत्या बुधवारी 'कच्ची टाका' वर चर्चासत्र, वर्कशॉप व प्रत्यक्ष उपयोग आयोजीत केला आहे. अहो अहो चाचलात कुठे? अजुन अनेक उद्योगांविषयी सविस्तर चर्चा करायची आहे तुमच्याशी. आज मंगळवारच आहे. अहो थांबा..

हे टण्याचं भाष्य

दाणे म्हणजेच चकणा ना ? चकण्यावर दाणे म्हणजे कोथिंबिरीच्या वड्यांवर कोथिंबीर तसं झालं

>>>.

दाणे चखण्यात मोडतात पण चखणा म्हणजे दाणे नाही. तसं बघायला गेलं तर चखणा हे आपल्या संस्कृतीचे एक वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे. पण त्याचवेळी कामगार वर्ग केवळ खडेमीठ अथवा लोणचे चखण्यासाठी वापरताना बघितले की चखणा हे वर्गवादाचे प्रखर रुपक आहे असेदेखील आढळून येईल. वर्गवादाचा केवळ चखण्याशी संबंध नसून चखण्याबरोबर घेतल्या जाणार्‍या पेयाशी देखील आहे. गरीबांना निकृष्ट दर्जाची पण उत्तम चढणारी दारू पाजून सरकार त्यांना शरीर बिघडवून मनःशांती देते तर श्रीमंत न चढणारी महाग दारू पिउन मनःशांती घालवत पैसेही घालवतात. अश्या तर्‍हेने एकाचवेळी शोषितांना ग्लानीत ठेवत सरकार शोषण करणार्‍या साम्राज्यवादी घटकांनाही चुना लावते. चुन्याचे उत्पादन आणि वितरण हा तर एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होउ शकेल. आत्ता जरी त्यास बाजूला ठेवले तरी दारू उत्पादनात कुठे कुठे चुना लागतो हे बघणे ह्या निबंधाच्या अनुषंगाने योग्यच ठरेल असे म्हटले तरी हरकत नाही. धान्याचे समाजात वितरण न करता त्याचा दारू निर्मितीसाठी वापर करणे म्हणजे लोक भुकेले असता त्यांनी केक खावा असे फ्रान्सच्या राणीने म्हणण्यासारखेच आहे. शेंगदाणे हा चखण्याचा अविभाज्य अंग असताना दाणे भरडून, सडवून दारू निर्माण केली जाते पण दारू पिणार्‍याला चखणाच कमी पडू लागतो. म्हणजे एका हाताने दिले आणि दुसर्‍या हाताने काढून घेतले. खरे तर अश्या मनोविभ्रमी व्यामिश्र परस्परविरोधातूनच उपहासपूर्ण महान कलाकृती निर्माण होउ शकतात. जी.ए.कुलकर्णी सटायर अथवा उपहासगर्भ कलाकृतींना निकृष्ट समजतात. पण त्याचवेळी नेमाडे लघुकथांनाच मोडीत काढतात. मोडीचा धंदा लोखंड, वर्तमानपत्र व दारुच्या रिकाम्या बाटल्या ह्या तीन भक्कम पायांवर उभा आहे. एक पाय ओढा आणि संपूर्ण धंद्याची इमारत कोसळेल. त्यामुळे दारुचा खप हा लोखंड निर्मिती व वर्तमानपत्राचा खप वाढवण्यासाठी वाढवायला लागणार्‍या साक्षरतेइतकाच महत्वाचा आहे. आणि दारू अधिक खपण्यासाठी दाण्यांनी सजवलेला चखणाच उपयोगी ठरणार आहे, हे माझ्या बंधु-भगिनींनो तुम्ही ध्यानात ठेवा.

मोडीचा धंदा लोखंड, वर्तमानपत्र व दारुच्या रिकाम्या बाटल्या ह्या तीन भक्कम पायांवर उभा आहे.>>>>> Lol

मोडीचा धंदा लोखंड, वर्तमानपत्र व दारुच्या रिकाम्या बाटल्या ह्या तीन भक्कम पायांवर उभा आहे. >>>>>>>>>:खोखो:

Rofl

आजचा पुपु.
वि.सू. गोटा नव्हे - उद्दीन = हा अर्भाटायडी आहे. गझल त्याच्या खालील ओळीपासून सुरु होते.

गोटा नव्हे - उद्दीन | 16 November, 2010 - 11:39
वावा! काय मिसरा आहे.

बोलण्याची का भ्रांत भ्रांत
आज सगळंच शांत शांत

खूप दिवसांनी आलो नेमके
आज सगळे निवांत वांत

जेवण गेले इतके आंत
तटतटून फुगली प्यांट प्यांट

वर्कलोडाचा नुसताच देखावा
लोडाला टेकूनच क्लांत क्लांत

रैना म्हणे, वाचा 'क्रिटिक ऑफ प्युअर रिझन'
आम्ही म्हणतो, कान्ट काण्ट

मामींना विचारले, अत्तर कुठले
म्हणे, "अमलपुरा आण्ट आण्ट"

श्रच्या कवितेची वाट बघता झाला उशीर
अजूनही कविता आली नाही, हा हन्त हन्त!

प्रतिसाद रैना | 16 November, 2010 - 11:44
सारखा (मेला) एकाच दिशेचा शोध
विषयांची आहे, भ्रांत भ्रांत

येऊन गेली वावटळ येथे
आता सगळे, शांत शांत

श्रद्धा | 16 November, 2010 - 12:52
गलीगली मे आजकाल हाच शोर आहे
आजचा अलिबाबा हा एक्केचाळिसावा चोर आहे
* 'अरेबियन नाईट्स' च्या रुपकातून सामाजिक परिस्थितीवर भाष्य

मालवून टाकलास दीप, हात हाती घ्यावया
आपल्यावर लक्ष ठेवून (इश्श्श!), आकाशी चंद्राची कोर आहे
* रोम्यांटिक

हंसाने ऑफर केले १००% प्युअर दूध,
गेस्ट म्हणून आलेला सरस्वतीचा मोर आहे
* नीरक्षीरविवेक, 'अतिथी देवो भव' आणि पुराणांतली माहिती

झुडपेबाबांचं नाव घ्यून पक्यादादाकडे लावला आकडा
समदा पैसा ग्येला, पक्या भXX XXXखोर आहे
* अंधश्रद्धा, सामाजिक समस्या आणि मनातल्या भावनांचे उत्स्फूर्त प्रकटीकरण

दोन सिन्म्यांनंतर रोहित शेट्टीस काय झाले?
अजिचबात पाहवेना, गोलमाल ३ बोर आहे
* जिव्हाळ्याचा विषय - बॉलीवूड, नवीन सिन्म्याचा रिव्ह्यू

तू लिहिलीस गझल, लिहीन कविता मी,
पुपुवरील काव्य सारेच थोर आहे.
* पुपुला एकतरी शेर अप्रण करणे आवश्यकच!

पहाट झाली, बैल घेऊन शेतात निघाला शेतकरी,
गावचा पैलवान शंभूदादा मारतो बैठका, जोर आहे
* ग्रामीण जीवनाचे रम्य चित्रण

पाऊस पडतो तसाच, परि तूस मिळावी कांदाभजी कोठूनी?
पुणे नव्हे हे 'श्रद्धा', हे तर सिंगापोर आहे.
* वस्तुस्थितीची दु:खद जाणीव व खिन्नपणा, खेरीज येथे शेवटच्या शेरात नाव गुंफण्याची प्रक्रिया केली आहे.

"माझ्या काव्याची शीतं... तुमच्या पतरावळीवर सांडतो, जेऊन घ्या.

"कवितेचं नाव आहे - 'अक्कल करीयेला जाते तेव्हा'

लग्नाची वरात
मुंडवळ्या हातात,
ती पायातल्या पायात हसली
का हसली? का हसली?
आमाला तर बाबा काईच कळत न्हाई
आमाला तर बाबा काईच कळत न्हाई.

चंद्राची कोर
नाचतो मोर,
जीवाला घोर
का रुसली? का रुसली?
आमाला तर बाबा काईच कळत न्हाई
आमाला तर बाबा काईच कळत न्हाई.

डोक्यात फूल मोगर्‍याचं
गळ्यात डोरलं दुसर्‍याचं,
कडंला लेकरु शेजार्‍याचं
का रडली? का रडली?
आमाला तर बाबा काईच कळत न्हाई
आमाला तर बाबा काईच कळत न्हाई."

टण्या, Lol >>>> म्हणजे एका हाताने दिले आणि दुसर्‍या हाताने काढून घेतले >>>> Lol
श्रद्धा, Rofl महान जमली आहे! वास्तव उसवून उसवून त्यातील प्रत्येक धागा तुम्ही कवितेत जैसा गुंफला आहे की....... अलिबाबा, इश्श्य, पक्या आणि शेवटचा जास्त आवडले Proud

बाळूची पोस्ट वाहून जाऊन तिला उगीच नको तितकी उच्च व्हॅल्यू प्राप्त होऊ नये म्हणून (आणि त्याच्या इच्छेखातरही) बहरात हलवतो. Proud

---

बाळू जोशी. | 27 November, 2010 - 01:39
मीही पूर्वी कामू, सार्त्र, थोरो, डोटोव्हस्की, प्लेटो, रसेल, बायरन ,शेली,वगैरे वाचत असे. नन्तर रस्कीन बॉन्ड, जेम्स बॉन्ड वाचू लागलो. तेमाझ्या रस्त्यावर एक रद्दी पुस्तकाचा एक पथारी वाला होता त्याच्याकडून घेऊन . माझ्या अभिरुचीच्या घडणीत त्याचा मोठा वाटा. तो मला प्ले बॉय, हसलर , वगैरे माशिके दाखवीत असे आणि म्हणे 'साहेब ही न्या .मजा येईल . टाइमपास हुइल. ' मी त्याच्याकडे तु. क. टाकून उपरोक्त ग्रंथसम्भार नेत असे. त्या पथारीवाल्याच्या साहित्यिक आणि रसास्वादाच्या पातळीबद्दल कींव आणि चिन्ता व्यक्त करीत. नन्तर ते लेखन माझी समज वाढल्याने पुच्याट वाटू लगले . मग मी नेमाडे, चित्रे, कोलटकर, पेठे, पेन्डसे (गुरुजी नव्हेत..),एलकुंचवार्,नगरकर, मनोहर, आदींची सकस पुस्तके त्या रद्दीतून नेत असे. तो शिंचा पथारी वाला आता मला पेन्टहाऊस , डेबोनेर वगैरे न्यायचा आग्रह करू लागला. 'लई हाय कलास आणि उच्च , अल्टिमेट, माल है सायेब...' मग मी अरुंधति रॉय, शोभा डे वाचू लागलो.
नन्तर मी अधिकच चिकित्सक, चोखंदळ झाल्याने मौज . म्याजेष्टीक, राजहंस वाचू लागलो..माझा पथारीवाला माझ्या कडे तु. क . टाकीत असे आणि मी त्याच्याकडे. नतर तो मला 'पिवळी' पुस्तके दाखवून त्याची तारीफ करू लागला आणि आग्रह करू लागला....
मी वैतागून त्याचे कडे जायचे बन्द केले.
आताशा वाचायला काही उरलेच नाही अशी नेपोलियनसारखी गत झाल्यावर सर्वोच्च अभिरुचीचे अनियतकालिक किंवा सर्वकालिक ' मायबोली' वाचू लागलो....

.
.
.
परवाच युरोपच्या टूरवरून आल्यावर आयुष्याला वैतागून पथारी वाल्याकडे गेलो आणि विचारले' अरे बाबा

ती पिवळी पुस्तके आहेत ना? दे बघू..'
त्यावर तो सव्वापंचविसावा गाढव खदखदा दात विचकीत म्हणतो कसा' सायेब आले का आता लैनीवर !पण माल सम्पला त्या कुटला र्‍हातोय इक्ता टैम? लै खप त्येला. चांगले चांगले जंटिलमन थोरो सार्त्र च्या पुस्ताकत लपवून न्हेत्यात. बरं गौरीदेशपंडेची लै रद्दी आलीया देऊ का किलू दोन किलू.......?"

Pages