बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीप्या, दोन वेगवेगळ्या कवितांना दिलेला प्रतिसाद आहे तो ... Proud
रैना, तुला पण अ‍ॅक्सेस गावलेला दिसतोय Happy

आणि इथे मी महामहोपाध्याय परंपरा यशस्वीपणे आशुडी या विदुशीने पत्करलेली आहे त्याबद्दल ह्या इथे त्यांचे अभिनंदन करतो Proud

अरभाटा, सा.न.!!!!

अरभाट, आशू.. Lol महान!

मायबोलीवरचे विद्वान-विदुषी आणि विदुषक यांत काहीच फरक नाही, असे ते पल्याड बसलेले जख्खीबोवाजीयम्बीए म्हणतात, तर तेवढं जरा बघून घ्या त्यांच्याकडे. Proud

आशूडीचा पीएम्टी-प्रवास वृत्तांत (पुपुवर)
***
तर लोखो, सकाळच्या मंजूडीच्या विनंतीला मान देऊन सादर करत आहोत.. आजचा मनपा हिंजवडी १०० नंबरी बशीचा वृ..
वेळ सकाळी ९. ३५ ची. ऊन मी म्हणत होतं आणि मी पण मीच म्हणत होते. बसमध्ये चढले तेव्हा सर्व प्रवाशांनी समोर सिनेमा सुरु झाल्याच्या उत्सुकतेने बघायला सुरुवात केली. कं. च्या बसमध्येही याची सवयच असल्याने मी त्यांचा अनुल्लेख करुन जागा शोधू लागले. स्त्रियांसाठी राखीव जागा अर्थातच भरलेल्या होत्या. एक प्रचंड महिला एका सीटाचा पाऊण भाग व्यापून दशांगुळे वर उरलेली पाहिली आणि आता तिचे ते बल'दंड' पाहून 'सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है' एवढंच म्हणून पुढची ओळ मनात गायली. तिने खिडकीच्या आणि तिच्यामध्ये बफर म्हणून एक गुबगुबीत पिशवी ठेवली होती. मी येताच ती म्हणे, "तिथे पाणी सांडलंय, तुम्ही आत बसा" मग तिचा तो भेदक आवाज ऐकून मी ही खमकेपणाने "त्यापेक्षा मी तिथे बसते" म्हणून तिच्याच शेजारच्या एका सीटवर आसन ग्रहण केलं. तिच्या जागी मी असते तर 'मग मी काय करु' टाईप एक निरुत्तरीत प्रश्न केलाच असता. पण ती चांगली असावी.
तिकीट काढायला वाहक आला. मी स्टॉपचं नाव सांगताच "१६ का १८?" असं विचारलं. तेव्हा मला हाफ की फुल असं विचारतोय असाच भास झाला. मुलं वयात येताना वर एकेक अनुभव वाचून १६च्या मुलांनाही हाफमध्ये मोडण्याचा ठराव पास झाला की काय असं वाटत असतानाच पुढच्या एका मुलीने तोच स्टॉप सांगून १८ रु दिले आणि माझा डायलेमा सुटला! तरीही 'मला बसभाडे ठाऊक नाही' म्हणजे 'कहाँ कहाँ से चले आते है' टाईप तुक वाहकाने माझ्यावर टाकलाच.
मग एक मनोरंजक पथनाट्य सुरु झालं.. ती(च) बाई व तिच्या पुढचा बाबा (त्याचे डोळे इतके 'य' होते की त्याला समोरचे दिसतंय का नाही हेच कळत नव्हते..)
बाई: ओ काये???
बाबा: काय?
ई: खिडकीतून काय केलंत?
बा: तुमच्या अंगावर उडलं का?
ई: हवेनं येणार न्हाई का?
बा: हवा काय एवढी जोरात आहे का?
ई: इथे बसा आणि मी करते ते. मग कळेल हवेचा जोर.
बा: ओ, काय तमाशा लावलाय.. उडलं का सांगा..
ई: उडलं असतं तर रायला असता का तू??
कंडक्टरची पेन्शनीत निघालेल्या बापाप्रमाणे एंट्री. सध्या बहुतेक सौ.स चालू असावा. दोघांकडे बघून म्हणाला, "तुमचं बी र्हाेऊ द्या, अन तुमी बी शांत व्हा."
ड्रायव्हरच्या बाजूच्या एकुलत्या एका सीटावर एक 'गोपाळ' मुलगा बसला होता.त्यास याने उठवले व त्या गुटख्यामारुतीस मानाचा पहिला गणपती करुन बस खाटकाकडे निघालेल्या उत्साही कोकरांच्या कळपाला ऐटीत कोंबून बोंबलत निघाली....

या पार्ल्यातल्या मनोहर वरच्या पोष्टी

स्वाती :
मृण, बरोबर. ग्रेसांच्या सुप्रसिद्ध 'आई' कवितेत (ती गेली तेव्हा..) याच पाचोळ्याचा (त्यावेळी वारा सावध पाचोळा तुडवित होता) उल्लेख आहे. यावर निवडुंग सिनेमासाठी आपल्या अर्चना जोगळेकरचं नृत्यसुद्धा बसवलं होतं, ज्यात ती कथ्थकवर आधारित मनोहर विघटन करत असे. जागेअभावी ते चित्रपटात आलं नाही. ही गोष्ट मला अर्चनाच्या आईने (त्याच अर्चनाच्या शिक्षिका बरं) एकदा पुणे-मुंबई प्रवासात सांगितली होती. मी सरकून त्यांना तिसरी सीट दिली होती. आता तसे सौजन्य राहिले नाही, किंवा मी म्हातारी झाले आहे.

प्रतिसाद tonaga | 11 June, 2010 - 09:01
हात्तीच्या, त्या शिळ्या पोळ्याच्या फोडणीय चुर्‍याला मनोहर म्हणतात की काय?

प्रतिसाद सायो | 11 June, 2010 - 09:03
हात्तिच्या टोणगा, एवढं रामायण झालं तरी रामाची सीता कोण आहेच का?

प्रतिसाद पन्ना | 11 June, 2010 - 09:03
जबरी

प्रतिसाद tonaga | 11 June, 2010 - 09:04
सौजन्य आहे पूर्वीप्रमाणेच. ते पुढचं बघा काय ते तुम्हीच. आम्ही तर सौजन्यदान करण्याची संधी शोधतच असतो. फक्त ते दान सत्पात्री असावं अशी माफक अपेक्षा असते. अडचण सोसण्याच्या मोबदल्यात ,साली एवढी पण अपेक्षा ठेवू नये की काय ? आं?

प्रतिसाद tonaga | 11 June, 2010 - 09:06
आता ही पन्ना कशाला जबरी म्हटली ? मला तर ती माझ्याच पोस्टला म्हटल्यासारखे वाटले...

प्रतिसाद अमृता | 11 June, 2010 - 09:07
मनोहर वरुन सौजन्यावर पोचली गाडी

प्रतिसाद मेधा | 11 June, 2010 - 09:07
मोड आलेल्या म्यानेजमेन्टचे काय बनवता येईल? >> ओल्या फडक्यात गुंडाळून दमट अंधार्‍या जागी ठेवावे म्यॅनेजमेण्टला. मस्त मोड येतात :-फिदी:

संपादन प्रतिसाद स्वाती_आंबोळे | 11 June, 2010 - 09:08 नवीन
मेधा, बरोबर. उन्हात ठेवले तर मॅनेजमेंट अन्न तयार करायला लागते.

प्रतिसाद मृण्मयी | 11 June, 2010 - 09:08 नवीन
स्वादी, तुमची माहिती बघून मला नेहमीच थक्क व्हायला होते. अजून येऊ द्या ना. चित्रपटात आलं नसलं तरी त्याची यूट्यूब लिंक देऊ शकाल का?
-धन्यवाद!

प्रतिसाद केदार | 11 June, 2010 - 09:08 नवीन
मनोहरचे पोस्ट काही बाफवर.

राजकिय घडामोडी
तुम्हा सुखवस्तू लोकांना काय कळणार रोजच मनोहर खातात त्यांचे दु:ख तुम्ही बसा मनोहरावर चर्चा करत. :रागः

मनोहर हिंदू नाव आहे ना? मनोहराचा अर्थ इथे बघा -- विकीची लिंक तिथे तर कोणी काही तसे म्हणले नाही की मुस्लीमांनी खाऊ नये म्हणून.

गांधीने मनोहर खाल्ला होता काय?

हे ह्यांच नेहमीच. भगवि ब्रिगेड.

ओ ब्रिगेड कुणाला म्हणताय. जरा ताळतंत्र बाळगा. मनोहर मुस्लीम अन हिंदू दोघेही खातात. च्यायला आजकाल कश्यातही लोक मुस्लीम आणतात.

शब्दार्थ
मनोहर ह्या शब्दाची व्युत्पत्ती काय? (व्युत्पत्ती वापराला बघ मेधा, मला आधी उत्पत्तीच माहित होता).

मन + ओव्हर अशी व्युत्पत्ती आहे, म्हणजे धोणीच्या काळात जेंव्हा त्याला दुसर्‍या टीमला जास्त रन द्यायचे तेंव्हा तो त्याच्या पिद्दूला ओव्हर द्यायचा. रवि शास्त्री व संजय मांजरेकर हे दोघे एकदा कॉमेंट्री देत होते व ते मराठी असल्याने त्यांनी मन + ओव्हर = मनोहर अशा शब्द काढला.

ते तसे नाही. मन + अव्हेर असा व्युत्पत्ती आहे. कुडचेडकरांनी ती निट मांडली आहे. ताज खायचा अव्हेर करुन, म्हणजे मन मारुन शिळंच परत खायचं त्याला मनोहर म्हणतात. पाहा www.bhalatechshabda.com

खाण्याचा बाफ
मनोहरात मराठवाडा पद्धतीने त्यात शेंगदाने टाकले तर त्याची चव बदलते. तिथे शेंगदाने खूप खातात. त्याने ऋदयरोग होऊ शकतो, पण चवही महत्वाचीच !

पण मी शेंगदाने न घालताच करते, त्याने आरोग्यवर्धक राहिल असे वाटते.

असचं काही नाही ! शेंगदान्यात अ जिवनसत्व असते, मी जेंव्हा बिर्याणी केली तेंव्हाही शेंगदाने टाकले.

न्युजर्सी
हा मनोहर कोण? त्याची काय गरज इथे? काहीही उथळ अन पांचट लिहायला हे काय विशिष्ट शहर आहे काय? मी भारतात असताना (म्हणजे तुम्ही जन्मलाही नव्हता तेंव्हाची गोष्ट) आमच्या नागपुरात मनोहर उपक्रम मात्र झाला होता. हा बाराबाफ आहे इथे मनोहराला आणू नका.
संत्य ब्रुयात प्रियं हे ठावूक आहे का?

गुंतवणूक.
केदार मनोहर कंपनी नविन आली आहे काय? तुला काय वाटतं त्याबद्दल. म्हणजे असे मनोहर लोकं विकत घेतील काय?

तो रेंजबाउंन्ड आहे. मी पोझिशन बदलतो.

वाड्यावर अरभाटाचे पोस्ट -

चिन्मय, तू पटकन 'रावण : एक बघणे' असा प्रवासवर्णनात्मक लेख पाड बरे. तू घरून एकटाच निघालास (केवढे ते अतुलनीय धैर्य!). डोळ्यांवर तुझा नेहमीचा ठरलेला चष्मा/गॉगल पाहिजेच. अकोल्यातील डुकरांना तोंड देत तू पुढील चौकात पोहोचलास. तिथे तुला जाणवले आणि आता तुला उन्हाचा त्रास होऊ लागला. काय ते विचित्र व भिकार हवामान! असे पुटपुटत तू त्याही पुढील चौकात पोहोचलास. तिथे तुला अकोल्यातील लोक धुळवड खेळताना दिसले. 'अकोल्यातील लोकांना घाणीत खेळायला आवडते' असा निष्कर्ष काढलास व डोळ्यांवरील अमूल्य चष्म्याला घाण, धूळ, रंग, पाणी इ. बाह्यप्रभावांपासून वाचवत त्याही पुढील चौकात पोहोचलास. तिथे तुला अकोल्यातील पारसीवंशीय स्त्रीया दिसल्या. त्यांची विशिष्ट पद्धतीने नेसलेली/नेसावी लागलेली साडी बघून तुला शेवटी एकदाचे जाणवले की अकोला किती मागासलेले आहे (फिदीफिदी) याच विचारात असताना तू त्याही पुढील चौकात पोहोचलास तर तुला कळले की अकोला संपले. भारत, अमेरिका असल्या देशांपेक्षा अकोला फारच छोटे आहे याचे ज्ञान तुला झाले. शेवटी तू रावण बघितला नाहीसच. म्हणजे ज्या उद्देशाने घराबाहेर पडलास तो बाजूला राहिला हे खरे, पण त्यामुळे प्रवासवर्णन झाले. प्रवास 'घडो' वा न घडो, प्रवासवर्णन लिहिता येते, तसे रावण न बघताही 'रावण : एक बघणे' लिहिता येते.
टण्या, चिन्मयच्या लेखात गाइडबुकांचे असंख्य संदर्भ असतील (नेहमीच असतात), त्यातील दोनचार पुस्तके एकदा खरीच वाचून बघितली पाहिजेत. ते तू कर आणि त्या लेखात मांडलेल्या मुद्द्यांचा सर्रिअ‍ॅलिस्टिक/पोस्टमॉडर्न समाचार घे. मी पिटात बसून बघेन (पण रावण्णा बघणार नाही).

हे पार्ल्यातील जेवणाच्या वेळचं संभाषण :
प्रतिसाद सिंडरेला | 21 June, 2010 - 11:45 नवीन
आज माझा जेवणाचा (मोठ्ठा) बेत आहे..
पारल्यात मेनु पोस्टणे हेच माझे व्रत आहे!

उकडला रटरट अंजिर आज ज्यांनी,
रंग बर्फीचा तयांच्या किरमीजी आहे!

मेनु मी माझे तुम्हाला काय वर्णावे?
सुगरणी फसव्या, चीड त्यांची येत आहे!

कोण खातो का कुणाच्या संगतीने?
डबा रोज माझा बरोबर नेत आहे!

बोलणे काढू नये दूसरे दूपारी,
'खात रहावे' हा इथे संकेत आहे!

सांग वाटे तुज 'खाण्याची' ही खंत कसली?
आकार गोलाकार हा तुज समवेत आहे!!

प्रतिसाद tonaga | 21 June, 2010 - 11:49 नवीन
बरी आहे. आणखी टोकदार हवी होती. रसाचा परिपोष व्युत्क्रमी क्रमाने झाला आहे. बांधणी अधिक रवाळ होणे आवश्यक होते.कोसलाच्या तुलनेत तर कोठेच नाही

प्रतिसाद केदार | 21 June, 2010 - 11:52 नवीन
बुवा, केदार, एकतर मेलचा मजकूर इथे लिहा नाहीतर मग त्याची चर्चाही इथे करू नका >>>

स्वाती बुवाने टकलू संस्था काढन्यासाठी लापि लावली आहे. आम्ही आर्य चाणक्य अशी टकलू संस्था पुनर्वजिवित करण्याचा प्रयत्न पण करणार आहोत. त्यासाठी कौटिल्यिय संहितेला मार्गदर्शक धरुन टकलूत्व हेच राष्ट्रीयत्व करण्याचे धोरण मी निर्माण करणार आहे. आणि दाढि वाढविन्याचा बुवाला अनुभव असल्यामुळे तो दाढी गटाचा कार्यवाह होईल. सरदाढीसंघटक ही पोस्ट अद्यापी ओपन असून ती कोणाला द्यावी ह्यावर विचार करत आहोत. त्यासंदर्भात कृती कर असे बुवा म्हणाले. पुढचे मेल आले की मग मी तुला हवे असतील तर डिटेल्स देईन. संदर्भासाठी योग्य ते बाफ स्वतः वाचावेत. नंबर देण्यात येणार नाहीत.

सांगोपांग चर्चेचे फलित काय? >> मी स्वप्नरंजन करतो.

मेधा हो. पण काय होतं की असा एखादा लेख लिहला की परत खाजवून खरुज निघते अन विषय भलतीकडे जातो, त्यामुळे भिती वाटते. ह्यावेळी विषय निघाला, नेमके प्रश्न विचारले गेले म्हणून आपसुक लिहले. मुद्दामहून लिहायचे म्हणले की माहिती देण्यापेक्षा भांडन निभावने हेच कार्य होऊन बसते. पण विचार करत आहे.

बांधणी अधिक रवाळ होणे आवश्यक होते >> टोणग्या कधी कधी फार मस्त ड्राईव्ह मारतो. एकदम सफाईने.

प्रतिसाद स्वाती_आंबोळे | 21 June, 2010 - 11:52 नवीन
केदार, वाचते आहे हळूहळू. खरंच तिथे सर्वांनी सांगितल्याप्रमाणे लेखमाला लिहीता आली तर बघ रे.

धर्मापासून देव ही संकल्पना निराळी काढता येऊ शकते का? आचारविचारांत? आपण हिंदू आहोत म्हणजे नक्की काय आहोत? मला तर 'माझे आईवडील हिंदू होते' यापलिकडे उत्तर सुचत नाही.

सद्ध्या 'गॉड डिल्यूजन' वाचत असल्यामुळे असेच प्रश्न डोक्यात आहेत.

प्रतिसाद रैना | 21 June, 2010 - 11:53 नवीन
टोणग्या- मी सकाळी तुम्हाला पुपुवर प्रश्न ठेवला होता त्याचे उत्तर द्या कृपया.
तुम्ही क्लोजेट 'कोसला" फॅन आहात का? नाही म्हणजे, असतात असे लोकं. झेनकथेप्रमाणे कोसल्याचं भूत तुमच्याच मानगुटीवर जास्त बसलं आहे.

सिंडे

केदार- तुझ्या काही पोस्ट आवडल्या, पण पूर्ण वाचुन झाल्याशिवाय मत देणे योग्य नाही. पूर्ण वाचुन काढायचे आहे अजून.

हाय लोक्स.

प्रतिसाद tonaga | 21 June, 2010 - 11:54 नवीन
पुपुवरील प्रश्नाची उत्तरे इथे दिली जाणार नाहीत. ~ हक्मावरोन

प्रतिसाद वैद्यबुवा | 21 June, 2010 - 11:56 नवीन
केदार
मलाही वाचायच्या आहेत खरं, सुरवात केली पण पोस्टींची लांबी पण फार आहे त्यामुळे वाचायचा वेग जरा कमीच आहे.
टोणग्या

प्रतिसाद स्वाती_आंबोळे | 21 June, 2010 - 12:00 नवीन
सिंडे, कळली बघ मेख!

प्रतिसाद केदार | 21 June, 2010 - 12:00 नवीन
धर्मापासून देव ही संकल्पना निराळी काढता येऊ शकते का >> हो. जसे हिंदुत्व आणि हिंदूधर्म वेगळे तसेच देव आणि धर्म हे वेगळे ह्यांची सांगड घातल्या गेली असे नसते तर सगुन साकार / निर्गून निराकार / मैत्रायनी संहिता / चाणक्यिय संहिता / बादरायण संहिता / ब्रह्मदर्शन अन चार्वाक दर्शन असे परस्पर विरोधी तत्वज्ञा उपलब्ध झाले नसते.

आपण हिंदू आहोत म्हणजे नक्की काय आहोत? मला तर 'माझे आईवडील हिंदू होते' यापलिकडे उत्तर सुचत नाही. >>

९९ टक्के हेच उत्तर देतात त्यामूळे नो प्रॉब्लेमो. हा प्रश्न प्रत्येकाला पडने आवश्यक आहे. मॅस्लो थेअरीच्या सेल्फ रियलायझेशन मध्ये असे प्रश्न पडतात, तेंव्हा उत्तर सापडत जाते, अभ्यासाच्या सहाय्याने. पण त्या स्टेज (मॅस्लोच्या) येणे मात्र आवश्यक आहे.

गॉड मानत नस्लो तरी चालते. मी रुढार्थाने देवपुजक नाही.

प्रतिसाद लालू | 21 June, 2010 - 12:01 नवीन
स्वाती, केदार योग्य तिथे लिहावे.
धन्यवाद.

प्रतिसाद पराग | 21 June, 2010 - 12:01 नवीन
रैना.. कोसला बाफवर तुला कोणीतरी काहितरी विचारत होतं.. ते बघून त्याचं उत्तर दे आधी..

कोसला न आवडलेले काही लोकं इथे पार्ल्यात असतात.. त्यांची मिळून एक फळी काढावी काय ?

प्रतिसाद prady | 21 June, 2010 - 12:02 नवीन
केदार Bald & Beautiful कसं वाटतंय नाव सुदुपार पार्ले.

प्रतिसाद tonaga | 21 June, 2010 - 12:04 नवीन
पाकपरिलुप्त रसाने ओतप्रोत भरलेल्या कवितेचे चोष्य रसग्रहण साहित्यिक डायबेटीस झालेल्यांकडून कसे अपेक्षिता येईल? त्यांच्या जिभेवर 'कौसलीय' कारल्याची चव आरूढ झाल्याशिवाय त्यांच्या जीवनाच्या वैय्यर्थाचे चीज झाल्यासारखे त्याना वाटत नाही त्याला काय करावे.?

प्रतिसाद रैना | 21 June, 2010 - 12:04 नवीन
पराग- आधी टोणग्याला उत्तर देऊ दे. अरे, तो प्रश्न नाहिये, मी लिहीलेले डझन्ट मेक सेन्स असे आहे ते. इटस ओके. दरवेळेस 'श्वासोश्वासाचे व्हावे प्रबंध" (साभारः टोणगा इन फॉर्म) अशी स्थिती आहे की काय माझी?
काढ ना फळी. त्यात काय.

मंजूडी | 24 June, 2010 - 16:10
साजिर्‍या,

गेल्या आठवड्यात माझीही तीच वेदना होती
मी रडत होते तेव्हा तू गैरहजर होतास

आयला, ही तर गझलच बनली की....

श्रद्धा | 24 June, 2010 - 16:19
गेल्या आठवड्यात माझीही तीच वेदना होती
मी रडत होते तेव्हा तू गैरहजर होतास
>>>>
गेल्या आठवड्यात माझी तीच वेदना होती
मी हजर रडत तर तुझी गैरहजेरी होती

उशाशी ठेवला सेल्फोन वाजला अवचित रात्री
ऐकत माझे बोलणे भिंतीवर पाल होती

चुलीवर ठेवला तवा साडेतीन भाकरी करावया,
मेथी चिरणार्‍या विळीलाही तेव्हा जबर धार होती

ओतला कढईत जेव्हा मी मँगो पल्प उत्साहाने,
आठवले 'तिची' आंबा बर्फी मागे बिघडली होती

माबोवर टीपी करताना उरे न काळाचे भान,
एकदा पहाटे साडेतिनाला मी पोस्ट टाकली होती

टण्या | 24 June, 2010 - 16:25
गेल्या आठवड्यात माझी वेदना तीच होती
तू गैरहजर होतास जेव्हा मी रडत होती

चिमटली दारात जेव्हा अंगुळे ती माझीच होती
ओरडलो त्या विश्वचक्री बेंबी पण माझीच होती

मायबोली पुपुवरी तेव्हा टोणग्याची सद्दी होती
शिवशिवली पण थंड झाली बोटे ती माझीच होती

बोलले कोणी मला ते खंड्याची का साथ होती?
अंधारी 'गाजरे चोविशी' दृष्टी थिटी माझीच होती

लावली काडी जिथे ठिणगी छोटी दिसली होती
वेदनेच्या डोंबामध्येपण 'राडा' करणारी पोस्ट माझीच होती

वरच्या दोन गझलांवर अरभाटाचा झब्बू:

गेल्या आठवड्यात माझीही तीच वेदना होती

गेल्या आठवड्यात माझीही तीच वेदना होती
मी रडत होतो तेव्हा ती गैरहजर होती

दुराव्यास अमुच्या अंतराची साथ होती
मी १६११ वर होतो, ती १७०९१ वर होती

लुटून घरदार तोंडास माझ्या तिने पुसली शेपूची पाने
शेपूसुद्धा मसालेदार तिचा, माझी चंदनबटवा आळणी होती

नशिबास तरी मी का कोसला वू?
मी गटण्याच्या, ती टण्याच्या कंपूत होती

विचारतात, का गेलो मी पहाया रावण
जाण्यास कारण चिकवावर टोणग्याची 'बकबक' होती

ढेकूण, झुरळे, डेटॉल झाले अता कावळे
मला आठवली कचरावालीची कविता होती

समजला मजला दुरून रिक्षा साजरीचा अर्थ
लेखापेक्षा भारी ~~~**टायटलची**~~~ नक्षी होती

दिलेस जरी लांबलचक टायटल तरी एक लक्षात ठेव
सुफासारो* कादंबर्‍या लिहिल्या 'अरभाट' तरच ही गझल होती.
*सुपरफास्टसामाजोरोमांटिक

आज श्रद्धाने केलेले अरभाटसरांच्या प्रेमकथेचे वर्णन. शेवटचा पंच तर सर्व प्रेमकथांच्या वरताण आहे -
श्रद्धा | 9 July, 2010 - 01:10

सरांची प्रेमकथा फ्लॅशबॅक:
ती आणि सर आठवीत होते. एकाच बेंचावर बसत असत.
सर हुशार, ती मंद.
अभ्यासाचा विषय निघताच तिची बोलती बंद.
तरी सरांनी तिला सांभाळलं.
चाचणी परीक्षेत एक न एक उत्तर सांगितलं.
फायदा काही झाला नाही.
(वार्षिकला) एकही विषय सुटला नाही.

सर वर्तमानात:
*दिलीपकुमार: 'वो शादी के रास्ते चली गई और मै बरबादी के... मोड ऑन*
वो बिगरी के रास्ते चली गई (विषय मुळापासून पक्के करायला) और मै डिगरी के...
*दिलीपकुमार: 'वो शादी के रास्ते चली गई और मै बरबादी के... मोड ऑफ*

अचानक समोरच्या अ‍ॅडमिशन फॉर्मांच्या गठ्ठ्यात तिचा फॉर्म दिसला. 'शेवटी सीइटीपर्यंत पोचली तर...' तात्पर्य: सर फॉर्मात आहेत.

मीन्वाज्जीने 'मामावर' विचारलेले प्रश्न आणि पुपुवरच्या (अति) हुशार लोकांनी त्याची दिलेली सविस्तर उत्तरं यातुन निर्माण झालेले म हा न साहित्य.. ()

मीन्वा | 14 July, 2010 - 09:55
संदर्भासहीत स्पष्टीकरण द्या: तू करेगा दूसरा भरेगा कल्लू
मामाचे नाव काय आहे?
पाच ओळीत मामाचे व्यक्तीचित्र रेखाटा.
(कंसा तुला कंसात नमस्कार)

आशुडी
मामाचे नाव वेदशास्त्रपुराणात विश्वप्रसिध्द कंसमामा आहे. त्याच्या प्रीत्यर्थ सर्व लिप्यांमध्ये दोन चिन्हे उदयास आली ती म्हणजे (). हे चिन्ह मामाच्या बाहुबलातून दिसणार्‍या बेटकुळ्यांचे निदर्शक आहे. मामाचे घर शेजारी असले तरी आगीनगाडीतूनच तिथे जायचे असा प्रवाद असल्याने मेट्रोचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मामाला शिकरणपोळी करणारी सुगरण बायको आहे. केकता कपूरच्या हिंदी सीरीयली पाहून तिचा अ‍ॅक्सेंट हिंदी झाला असल्याने 'कन्स' म्हणताना वन्संची आठवण येते म्हणून ती त्याला प्रेमाने कल्लू म्हणते. कल्लूला पाणी भरण्याचे काम असाईन केले आहे. म्हणून तू 'करेगा' दूसरा 'भरेगा' कल्लू हे संतवचन मामाच्या घरात विशिष्ट भिंतीवर कोरले आहे.

श्र:
मामाला पाच ओळींत बसवायचे म्हणजे गगनाला ओढणी घालायचे काम! तरी मित्रांनो आणि मैत्रीणींनो आपण प्रयत्न करूया. हा आपला कंसमामा म्हणजे भारतवर्षाच्या गौरवशाली इतिहासातल्या आद्य मामाचे नाव घेऊन आजच्या काळात वावरणारा कंस. सहा सहा (पहा: प्रौढ साक्षरवार्ता - 'कंस अकेला') प्रकरणे करून एकटे राहाण्याची कला साध्य झालेला कलंदर. आधी कधीकाळी याचे नाव चिनूक्स होते, पण एकेका प्रकरणातून बाहेर पडताना 'ति'ची आठवण म्हणून नावातला एकेक भाग हा गाळत गेला आणि शेवटी कंस उरला. प्रकरणे संपल्यावर करण्यासारखे काही उरले नाही म्हणून मामाने नॅनोटेक्नोलॉजी शिकली. त्यात त्याला बरेच शोधही लावता आले. त्यामुळे मामाला नॅ.टे.ची गोडी लागली. इतकी की, त्याचे आवडते गाणेदेखील 'नॅणो की मत माणियो रे, नॅणो की मत सुणियो..' हे आहे. सध्या मामा नॅ.टे.च्या साहाय्याने माणसाला अदृश्य करणार्‍या कोटाच्या शोधावर काम करत आहे. त्याबद्दल मामाला शूभेच्छा देऊन आपण ही पाच वाक्यांची कहाणी अकरा वाक्यांत सुफळ संप्रूण करुया. जय हिंद! जय महाराष्ट्र! जय विदर्भ! जय अकोला! (मामा वैश्विक असला तरी त्याच्या घडण्याची सुरुवात अकोल्यापासून झाली. त्या भूमीस आपण नम्र वंदन करू.)

अरभाटः
झुकुझुकु झुकुझुकु आगीनकाडी, ज्ञानाचा जाळ हवेत काढी,
झडती वादे पाहू या, मामाच्या गावाला जाऊ या

मामा डॉक्टर तलवार, लेख लिही हजार (करत) वार
असंगाशी (व्या)संग करू या, मामाच्या गावाला जाऊया

मामाची बायको प्रकरण, रोज रोज अन्न वै व्याकरण
नियम घोकत खाऊ या, मामाच्या गावाला जाऊ या

मामाचा आवाका मोठा, समाजकार्यास ना तोटा
प्राचीच्या भाकर्‍या भाजूया, मामाच्या गावाला जाऊ या

श्रद्धा | 14 July, 2010 - 12:16
मामाने विवाहमंडळात दिलेली जाहिरात.
वधू पाहिजे:
मुलगा हुशार, गोरा, मध्यम बांधा, उंची कमी. (त्याच्या विद्वत्तेची उंची बघणे अपेक्षित! 'मूर्ती लहान पण कीर्ती महान! हे वाक्य या मुलाकडेच पाहून रचले गेले.) शिक्षण: बरेच. बालवाडीपासून सतत वर्गात पहिला येत आहे. चौथी, सातवी एवढेच काय आठवीत सहामाहीलाही स्कॉलरशिप मिळवलेली आहे. 'The scholarships that ignore me are losers' हे याचे वाक्य! एसार्केने ते नंतर चोरले व बदलले. (मुलाने केस दाखल केली असून जिंकल्यावर काही कोटी नुकसानभरपाई अपेक्षित!) नुकसानभरपाईची रक्कम वगळूनही मुलाचे वार्षिक उत्पन्न काही कोटी. मोजायला वेळ नाही. (यास्तव मुलीस मोजणी करता येणे आवश्यक.) छंद: नॅनोटेक्नोलॉजीत व स्वयंपाकघरात निरनिराळे शोध लावणे, समाजकार्य, अन्नं वै प्राणा: लिहिणे, इ. नॅ.टे.मधल्या 'करामती कोट' या शोधास अखिल नैऋत्य अकोला शास्त्रज्ञ महासंघाचे प्रथम पारितोषिक, स्वयंपाकघरातील 'हिरवे कबाब आणि आंबा-अंडे सलाड' या ब्रंच मेनूस सौ. यशोदाबाई करमरकर गोखले 'अतिधाडसी स्वैपाककला' स्पर्धेत पहिले पारितोषिक आणि मानाचा स्टेनलेस स्टीलचा पेला. खेरीज शालेय जीवनात लपाछपी, लंगडी, विषामृत इत्यादी खेळांत मुलाने वेळोवेळी सहभाग घेतला आहे.
अपेक्षा:
वरच्या सगळ्याला म्याचिंग मुलगी पाहिजे.
रैना | 14 July, 2010 - 12:18
आणि हो मामाच्या विपुत ठिकठिकाणच्या काकवा आणिक पोरी सल्ले विचारत असतात. "मामांचा सल्ला" हे एक लोकप्रिय सदर ते आपल्या विपुतुन चालवतात. Proud
मामांना सर्व विषयात गती आहे. लोकं मुलांना ' आता झोप, नाही तर मामांना व्याकरण शिकवायला बोलवेन' अशी धमकी देतात. Wink
पौर्णिमा | 14 July, 2010 - 12:27
मामा फक्ट फॅक्ट्स बोलतात. भावनाप्रधान बोलणे त्यांना जमत नाही. त्यामुळे मुलीने मधात भिजलेल्या शब्दातली प्रेमपत्रे वा ईपत्रे यांची अपेक्षा ठेवू नये. अर्थात हे प्रत्यक्ष भेटीत कळेलच, तरीही वैधानिक इशारा देणे हे आमचे कर्तव्य आहे, नंतर 'फसवले, माहिती लपवली' असे कोणी म्हणू नये.
अश्विनी के | 14 July, 2010 - 12:29
त्यामुळे मुलीने मधात भिजलेल्या शब्दातली प्रेमपत्रे वा ईपत्रे यांची अपेक्षा ठेवू नये. >>> आणि पाठवली तरी ती व्याकरणदृष्ट्या बरोबर आहेत की नाही ते भावनेच्या आहारी न जाता तपासली जातील.
अश्विनी के | 14 July, 2010 - 12:35
बोलताना बराच नॉर्मल बोलतो मामा. >>> अगदी अगदी. चांगला खिदळत बोलतो. लेखन वाचलं की उगाचच वाटतं कायतरी सिरियस प्रकरण दिसतंय म्हणून.

रैना | 14 July, 2010 - 12:32
मामा त्याच्या एक तृतियांश lexicographer पदाला साजेशी मराठी वाक्य लिहीत असला तरी घाबरू नये. बोलताना बराच नॉर्मल बोलतो मामा. Proud
कोणी पदार्थ केला की मामा 'आईसारखा नाही झाला' म्हणतो, प्रेमपत्र तपासून घेतो. च्च च्च च्च!! Proud

श्रद्धा | 14 July, 2010 - 12:39
कायतरी सिरियस प्रकरण दिसतंय म्हणून.
<<<<
अश्विनी, मामाने सिरियस प्रकरणे केली आहेत की! (तीही चांगली सहा.)
पण सिरियस प्रकरणातला मामा वेगळा. मित्रमंडळीतला मामा वेगळा. स्वैपाकघरातला वेगळा. नॅ.टे.मध्ये वेगळा. आणि लग्नाच्या बोहोल्यावर उभा राहील तो अजून वेगळा.
आशूडी | 14 July, 2010 - 12:40
सगळेच, Lol , आज सकाळीच हाती आलेल्या माहितीनुसार, मुलीने अधिक लिपस्टिक लावू नये. मामाने शेडस आणल्या म्हटल्यावर लिपस्टिकच्या का? असा फुटकळ प्रश्न विचारु नये. मामा मराठी, संस्कृत, पाली, अर्धमागधी, इंग्रजी छान बोलतो. मामाकडे खूप पोती आहेत. रिकामी पोती साठवायचा त्याला आगळाच छंद आहे. शिवाय प्रकाशकांशी त्याचे घनिष्ट संबंध आहेत. समकालीन राजहंसांसोबत तो असतो तरी तो वेडा, कुरुप नाही. मामाशी वार्ता करताना शब्द, वाक्य वापरु नयेत, अक्षरेच वापरावीत. त्याचप्रमाणे घरी चालताबोलता विकीपेडिया असल्याने लग्नानंतर गुगलशी काडीमोड घ्यावा लागेल. Proud

चिनुक्स बाबा की जय. Happy
आय मीन चिनुक्स मामा.

पुपुवरचे सग्ग्ळे डेंजर आहेत.

पण काय चुक केली मामांनी म्हणुन अशी सार्वजनिक ... ?

Pages