बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................

sharad-patil | 22 एप्रिल, 2009 - 11:13
शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................
>>>>
Rofl शरद सहीच ! Proud

  ***
  दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
  पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)

  आजच्या स्वगतवारी स्लार्टीला खालील पोस्ट झाली.
  ----

  नमस्कार वाडा. आज अगदी थोडा वेळ थांबावे लागेलसे दिसते. साजिराव, परत एकदा सही सही. तुमचे स्वगत आणि रैनाची आर्डर आणि पहाटेचे स्वप्न असे मिळून कविता झाली, ती शुक्लकाष्ठाच्या सरणावर ठेवत आहे -
  पहाटे पडले स्वप्न वाचता मी त्याची गोष्ट
  वाचकांच्या आग्रहाखातर केले त्याचे पोष्ट
  घुमघुमघुमवत आला वसंत आला दारी
  ऐकोनी आवाज तो कुत्रा का उठला नाही ?
  वसंताच्या शेपटीला खोडकर माकड होते बांधले
  त्याचे हॉर्मोन्स घेऊन प्रोफेसराने स्वयंवर मांडले
  पोरगी आग, पोरगी वाघीण, पोरगी खूंखार रक्तपिपासू
  कसली मनीषा अन् आशा, हिने काढले माझे आसू
  ठिपक्यांची रांगोळी माथी, मनात सैतानी नर्तन
  शब्दकोष उतरवून केले मी लाल केसांचे कर्तन*
  पूर्वजांचे प्रजननच ऐसे, रहस्य सारे क्रोमोसोम्सचे
  मॉरिआईचे थर्थर्ती सहा सेन्सेस, नाव घेता शेरू होम्सचे

  आज गडावर मीन्वाज्जींनी कविता कशी करावी या विषयावर एक कार्यशाळा घेतली. त्या कार्यशाळेतील कवितेच्या प्रसूतीसंबंधी त्यांचे हे विचार -

  पन्नास शब्द आणि रात्र हा शब्द आलटून पालटून ओवायचे. एक सुलट एक उलट असतं ना विणकामात तसं विणायचं. त्यामुळे काय होतं की नाई यमक आपोआप जुळतं. बघा हं मुलांनो कशी सुंदर बनते कविता.. आता कार्यशाळेअंतर्गत उदाहरणादाखल आपण दोन कडव्यांची कविता बनवू यात.
  --
  रात्र..

  अहाहा रात्र उहुहु रात्र
  काळी रात्र गोरी रात्र
  धुंद रात्र मंद रात्र
  रत रात्र गत रात्र
  तरल रात्र सजल रात्र

  (पहीलं कडवं अगदी सोपं ठेवलंय सर्वांना कळावं म्हणून. चार ओळी झाल्या की एक ओळीची जागा मोकळी सोडायची. मधेच काही बाही आठवलं तर तिथे लिहीता येईल.)

  स्वप्नसजिली रात्र धुंद नशिली रात्र
  शामरंगिली रात्र रास रसिली रात्र
  शांत मोकळी रात्र कोमल हळवी रात्र
  सरली सरली रात्र उरली उरली रात्र.
  रात्र रात्र रात्र रात्र..
  ---

  (काही काही शब्द पुन्हा पुन्हा लिहीले की कडव्यांची लांबी बरोबर दिसते. म्हणजे 'शामरंगिली' या शब्दाच्या लांबीइतका शब्द व्हावा म्हणून 'सरली' हा शब्द दोनदा वापरला आहे. आता विरोधाभास दिसावा म्हणून एकाच वाक्यात 'सरली' आणि 'उरली' अशी सुरेख शब्दरचना केली आहे त्यामुळे कविता अधिक गेय होते.)

  तर बघा बरं जमतंय का? आता समारोपाच म्हणून एवढंच सांगते

  कविता कशी हवी?
  कविता कशी हवी नागीणीच्या फण्यासारखी
  सह्याद्रीच्या कड्यासारखी
  गंगेच्या प्रवाहासारखी
  वाळवंटातल्या मृगजळासारखी

  कवितेमधे प्रेम हवं
  कवितेमधे द्वेष हवा
  छान छान सॅटीनचा
  कवितेमधे ड्रेस हवा

  कवितेमधे राग लोभ
  कवितेमधे मत्सर क्षोभ
  वीजेसारखी चमक हवी
  कविता बाळा अशी हवी
  ~~~~~~~~~

  ...

  या कार्यशाळेत क्ष यांनी केलेली ही कविता -

  ती उद्विग्न रात्र
  ती उच्छृंखल रात्र
  ती मखमली रात्र
  ती सर्द रात्र
  ती गर्द रात्र
  ती घेऊन येते दर्द रात्र
  ती शांत रात्र
  ती करी आकांत रात्र
  ती स्फुल्लिंगी रात्र
  ती पुल्लिंगी रात्र
  ती स्त्रीलिंगी रात्र
  ती आजचीच... रात्र?

  त.टी. १ - भरपूर संस्कृतोद्भव शब्द वापरा (शक्यतो नेहमीच्या वापरातले नको .. म्हणजे खांदा नको, स्कंध चालेल )
  त.टी. २ - साधारणपणे हळव्या मनाच्या, विशिष्ट लिंगाच्या व्यक्तींना आवडतील असे शब्द वापरा आणि त्याच व्यक्तींशी विपुमध्ये खूप गोड गोड बोला. म्हणजे इकडे तिकडे काहीही घाणेरडे उद्योग केले तरी एक विशिष्ट वर्ग नेहमी तुमच्या पाठीशी राहील.
  त.टी. ३ - विषयही साधारण अशा व्यक्तींच्या उदात्तीकरणाचेच घ्या (याचा तुमचे त्यांच्याबद्दलचे खाजगी मत काय आहे याच्याशी तिळमात्र संबंध नाही)
  त.टी. ४ - रोज जोर लावून एक तरी अशी कविता पाडा (पण शक्यतो हे सकाळी करु नका )
  त.टी. ५ - शेवटच्या कडव्यात तीन (मोजून) टींबे देऊन एक प्रचंड अर्थ निर्माण करायचा प्रयत्न कराल. बर्‍याच वेळेला फसाल पण एकदा तुक्का लागून जाऊन सर्वोत्कृष्ट कवितेचे बक्षीस गळ्यात पडेलच यांची ग्यारंटी!

  ..

  सौ. माता यांनी केलेली कविता -

  रात्र अशी, मेणबत्त्यांचा प्रकाश पिऊन झिंगलेली...
  रात्र अशी, लोडशेडिंगाच्या त्रासामुळे खंगलेली...
  रात्र अशी, वडाच्या पारंबीला टांगलेली..
  रात्र अशी, दाहीदिशा पांगलेली...
  रात्र अशी, उकाड्याने त्रासलेली..
  रात्र अशी, भयाण अंधाराने ग्रासलेली...
  रात्र अशी, रानोमाळ भटकलेली..
  रात्र अशी, पिंपळाला उलटी लटकलेली...
  रात्र अशी, काळ्या डोहात गुरफटलेली..
  रात्र अशी, शेताच्या बांधाशी उलगडलेली..
  रात्र अशी, झाडाच्या टोकावर चिकटलेली..
  रात्र अशी, पहाट होताना फिकटलेली...
  अशी रात्र, माझी रात्र.
  तुमची रात्र, सर्वांची रात्र.
  ही कविता ठरो बक्षीसपात्र.
  ...

  त्याच कार्यशाळेत साजिरा ह्यांची कविता..

  SAJIRA | 30 एप्रिल, 2009 - 14:38
  रात्र काळी घागर काळी,
  गड काळा नि बुरूज काळा.

  शहाऐंशी घोड्यांचे खुर उधळलेत
  पंचवीस पिढ्यांचे स्वप्न पायदळी तुडवत.
  अन दुरवर काळ्या अंधारात जळतेय
  युगानुयूगाची इच्छा.
  त्या छातीफोड आकांतांची ही चिता.

  पण हे काय?
  माझे घड्याळ बंद?
  घड्याळाचे काटे कसे थांबले?
  या मुर्दाड दगडांना झालेला कर्करोग
  त्याच्या काट्यांना तर झाला नाही..?

  नाही, नाही..
  काट्यांनो, माझ्या मार्गात येऊ नका,
  पुढे पळा, पुढे पळा.
  नाहीतर ती चिता जळतच राहील.
  अन चिमूटभर राख पेल्यात टाकायची
  माझीही एक इच्छा
  अपूरीच राहील...
  अपूरीच राहील.
  =========================
  "हाती घ्याल ते घरीच न्याल"

  सरली सरली रात्र उरली उरली रात्र...>>> ती स्त्रीलिंगी रात्र, ती आजचीच... रात्र?>>> त.टी. ४ >>> तुमची रात्र, सर्वांची रात्र. ही कविता ठरो बक्षीसपात्र. >>>
  Rofl

   ***
   Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Joplin

   स्लार्ट्याचे काव्यपुष्प :

   माझी एक रात्र, तुझी एक रात्र
   असले होऊनच झाली पात्रं
   जे न कळले वाचूनही सार्त्र
   ते रहस्य आता कळले मात्र... (मोजून ३)
   दिवस येता जाते रात्र
   दिवस 'जाता', कसली रात्र ?!

   स्लार्टी, माता, साजिरा, आज्जी कहर आहे! Lol

   Lol मीनू,क्ष, आणि श्रची कविता आवडली.

   फ:

   गिटमगुट् गिटमगुट् गिटमगुट् (कंठ्य ध्वनी)
   क्वेरंडेलाचे घेताच घोट
   खटरखुट् खटरखुट् खटरखुट् (.. कीबोर्डाचा आवाज)
   माबोवर उठू द्या कवितांचे लोट

   स्लार्ट्याची शंका:

   फ, तुमची कविता ही नादखुळा आणि डार्लिंगला झालेले अपत्य आहे का ?

   मातेचे उत्तर:

   स्लार्टी, माझ्यामते ते तसे नसावे. कारण नादखुळा आणि डार्लिंग असताना क्वेरंडेलाचे घोट घेण्यासारखा बाह्यात्कारी उपाय करायचे कारण काय?

   मीनूचे पुनश्च निरुपण:

   अरे अरे किती गोंधळ.. बाकी तुमच्या सर्वांसारखे दर्जेदार (!?) शिष्य लाभल्याने मी अगदी धन्य झालेय.

   प्राची आरोळी हा कवितेचा फॉर्म काही नवकविंची मान्यता पावला आहे. परंतु प्रस्थापित कविंना अजून त्रिकोण, चौकोन, कोष्ठबद्ध काव्यप्रकारांतून बाहेर पडायला जमलं नाहीये... त्यासाठी पोट आपलं ते मन साफ हवं परंतू लवकरच क्रांती होईल आणि अनेक आरोळ्या वाचायला मिळतील अशी आशा करु यात.

   १. कोणत्या आकृतीबंधासाठी कोणता विषय, हे कसे ठरवावे?

   साजिरा कवितेसाठी आपण पन्नास शब्द शोधले की ते आकाराप्रमाणे मांडून घ्यावेत. सारख्या आकाराच्या शब्दांची एकेक वहीच करावी. एकदा का पन्नास शब्दांचे असे वाटे करता आले की त्यावरुन किती प्रकारचे आकार बनवता येतात हे तपासावे. मग आपल्याला आवडेल त्या आकारात कविता लिहावी.

   आता काही हुशार कवी प्रेमकविता लिहीण्यासाठी 'सँडक्लॉक' आकार वापरतात तर काही कवि सांसारीक कवितांसाठी 'चौकोन' वापरतात. (एक या दो बस.. ) तर या प्रकारेही वापर करता येऊ शकतो. मी चायनिज कवि टुं मिंग चुंग यांना भेटले, तेव्हाही या प्रश्नावर बरीच उद्बोधक चर्चा झाली. त्यात मला असे कळले की चीन मधे सांसारीक कविता लिहीण्यासाठी 'त्रिकोण' हा प्रकार वापरतात (एकच बस....)

   बाकीही प्रश्नांना वेळ मिळेत तशी उत्तरे देईन. फक्त आताच जमेल असं सांगता येत नाही. तुमचे प्रश्न लिहून ठेवाल का कृपा करुन.
   ~~~~~~~~~
   काव्य जीवन कैलास जीवन

   माझी एक र्‍हस्वाकृती कविता...
   तु माझी कविता
   तु माझी सविता
   तु माझी संगिता
   तु माझी भंगिता
   ...
   प्रतिसाद १ : खुप आवडली.
   प्रतिसाद २ : खुप खुप छान (कवीचा गालगुच्चा)
   प्रतिसाद ३ : खुप मस्त. पण भंगिता जरा खटकतय. त्याऐवजी रंगिता चालेल का ? बघा हं, पटत असेल तरच बदल करा (गालगुच्चा... स्वतःचाच). चुभुदेघे. क्षमस्व.

    ***
    Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Joplin

    कहर
    बहर
    जहर!!

    (एक त्रिकोणी कविता..)

    ----------------------
    चंद्राचा पहारा आभाळाचे कायदे
    हंस उडू पाही अवघड इरादे

    Rofl आई गं ऑफिसमधे आल्या आल्या ह्या पानावर येण्याचे पाप केले Uhoh

    >>>>माझी एक र्‍हस्वाकृती कविता...
    तु माझी कविता
    तु माझी सविता
    तु माझी संगिता
    तु माझी भंगिता
    ...
    प्रतिसाद १ : खुप आवडली.
    प्रतिसाद २ : खुप खुप छान (कवीचा गालगुच्चा)
    प्रतिसाद ३ : खुप मस्त. पण भंगिता जरा खटकतय. त्याऐवजी रंगिता चालेल का ? बघा हं, पटत असेल तरच बदल करा (गालगुच्चा... स्वतःचाच). चुभुदेघे. क्षमस्व.

    Rofl

    खरंच भंगिता खटकतंय. भंग्याच्या प्रेयसीचं नाव वाटतंय. (आता काय भंग्याला प्रेयसी असूच नये की काय वगैरे वाद काढू नका):फिदी:

    खरंच भंगिता खटकतंय. भंग्याच्या प्रेयसीचं नाव वाटतंय. (आता काय भंग्याला प्रेयसी असूच नये की काय वगैरे वाद काढू नका)<<
    तुम्हाला काय समजणार भंग्याच्या मनातले? तुम्हाला आयतं पीठ मिळतं रेघोट्या ओढायला.. Wink

    ----------------------
    चंद्राचा पहारा आभाळाचे कायदे
    हंस उडू पाही अवघड इरादे

    नी दि, भंगी आणि पीठ यांचा परस्पर संबंध माझ्या ध्यानात नाही आला, स्पष्टीकरण देणार का? Wink
    अमेरिकेतली लोकं आयत्या पीठावर रेघोट्या ओढतात असाही अर्थ घ्यावा का? Wink

    नाही गं सायो.. आठव आठव.. जोधा अकबर, भांडीवालीची साडी... इत्यादी

    ----------------------
    चंद्राचा पहारा आभाळाचे कायदे
    हंस उडू पाही अवघड इरादे

    आठवलं Proud
    मला जोधा अकबर म्हटलं की ट्युच का आठवते? Wink

    स्लार्ट्याचे काव्यपुष्प :

    माझी एक रात्र, तुझी एक रात्र
    असले होऊनच झाली पात्रं
    जे न कळले वाचूनही सार्त्र
    ते रहस्य आता कळले मात्र... (मोजून ३)
    दिवस येता जाते रात्र
    दिवस 'जाता', कसली रात्र ?!
    >> Lol

    श्रद्धाके यान्ची एक सुन्दर कविता !
    वाहून जावू नय म्हणून इथे टाकतोय !
    ==========================
    एक होती राखी.
    लग्न होत नाही,
    म्हणून ती दु:खी.

    ठरवले करेन लग्न.
    एटीएमवरून पैसे काढून,
    खरेदीत झाली मग्न.

    तिचे बाबा सावंत.
    राखीचे लग्न होईना,
    हीच त्यांची खंत.

    कामावर नको आक्षेप.
    काम हे कामच,
    वापरा आपुला साक्षेप.

    आता तिचे हेच काम.
    शिकूनिया घरातल्या गोष्टी,
    सावंतांचे उजळेल नाम.
    =======================
    टीपः ही कविता माझी नाही. श्रद्धाके यान्ची आहे.

    गडावर का.शा. पुन्हा चालू. Proud
    -----
    SAJIRA | 4 मे, 2009 - 13:34
    नमस्कार गड!
    मीनू, मी तर चातकासारखी वाट बघत असतो बघ काव्यक्लेशा.. आपलं, काव्यक्लासासाठी. तुझ्या काव्यसुरईतले चार अमृतमय थेंब जिभेवर पडले, तरी दिवस धन्य होतो, सार्थक होते, सकाळी उठल्याचे. आता जास्तीचा इंतजार सहन होत नाही. उसळलेली लाट किनार्‍याकडे झेपावते (आं!!?? यालाच म्हणतात काव्यनशा!!), तसे आता हे काव्यदुषित.. आपलं, काव्यतृषित मन गडाबुरूजावर झेपावते, तुझ्या निरूपणाचे चार शब्द कानावर पाडून घेण्यासाठी.
    लवकर चालू कर. म्हणजे वरचा प्यारा मला कवितेत कन्व्हर्ट करता येईल.

    meenu | 4 मे, 2009 - 14:11
    काकाशा-२
    मुलांनो काकाशा-१ मधे आपण एकयमकी कविता पाहीली.. आपलं यमक होतं 'रात्र'. आता आज आपण विविधयमक असलेली कविता पाहू यात. तर सांगा बरं काय यमक घेऊ यात.. ?
    या कविता प्रकारामधे आपण विविध शब्द वापरणार आहोत. उदा.. रात्र मात्र कात्र वात्र (ट सायलेंट) गात्र पात्र (अवांतर : काल मु. पो. बोबिंलवाडी पाहीलं एकदम झकास नाटक आहे काय पण एकेक पात्र आहेत) एक उलट एक सुलट ही वीण ही अगदी बेसिक वीण आहे. यापुढे जाऊन आपण अत्यंत अवघड वीणी पहाणार आहोत.
    आणि हो महत्त्वाची गोष्ट सांगायची राहीली तुम्हाला जर का लोकप्रिय कवी व्हायचे असेल तर तुम्ही रोजच्या बातम्या वाचणे आवश्यक आहे, अशी कोणतीही एक आकर्षक बातमी निवडा जी आजच तुम्ही वाचली आहेत..

    slarti | 4 मे, 2009 - 14:15
    वात्र (ट सायलेंट) >>> सुरई, इंतजार, प्यारा वगैरे वाचता साजिरा जोरदार गझल करणार याची खात्री वाटते.
    आजची (किंवा अनेक दिवसांतली) आकर्षक बातमी साजिरानेच दिली आहे. पण राखीशी यमक जुळवणे अवघड आहे. सावंत, खंत, जंत, पंत, रवंथ, वगैरे जमवता येईल.

    rakhi.gif

    यानंतर श्रध्दाने वरच्या पोस्टमधली कविता पाडली.

    यापुढची शाळा पुढे जाईल, तशी इथेही येईलच. Proud

    --
    मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय...
    ती होता होता मद्यात असते; मध्यरात्री गद्यात असते; पहाटे पहाटे पद्यात असते;
    अन उजाडताना पुन्हा एकदा 'सध्यात' असते..!

    वा ! वा ! कार्यशाळा जोर्रात आहे. मिनू- कोणत्या नंबरची सुईघ्यावी ग विणायला ?
    श्र/फ/क्ष/साजि-या/स्लार्टी/मिनु Rofl हसून हसून मी मेल्यास आपणावर कारवाई केली जाईल. हुकुमावरुन.

    रैने,

    एक नंबर कविता पाडायची असेल तर एक नंबर सुईच घे. Proud
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    There is no charge for awesomeness.... or attractiveness.

    लिंबूची कविता. करवादून केली, हे पहिल्या शब्दावरूनच कळते
    --

    च्यामारी Angry

    पोळी लाटता लाटता
    आधी हाताला चिकटे
    मग जाते तव्यावर
    तिथुन गरम पानात

    पोळी तोडता तोडता
    आधी मुरगळे बोट
    मग जाते तोन्डात
    तिथुन गिळा घशात

    घास गिळता गिळता
    सय येते आयेची
    डोळ्या येई पाणी
    आई माझ्या मायेची

    लिम्बी किती करवादते
    पोळी फेकुनी वाढीते
    पोळी सन्गे हातापाई
    दोन घडीन्ची लढाई

    पोळी जाते जीवानीशी
    मी म्हणतो वातड
    चामड्यास कळावी
    या गेन्ड्याचीहो कातडी

    जय हो... बहिणाबाईन्ची कृपा!

    स्लार्टीचे काव्यपुष्प :

    पुढील काव्य राखीच्या लग्नपत्रिकेवर 'आमच्या राखीच्या लग्नाला यायचे हं' या ओळीखाली असेल अशी आशा -
    एक होती राखी
    नीटस डोळीनाकी
    एकदा तिने धरला हट्ट
    मला आणा नवरा वट्ट
    काकांनी दिली जाहिरात
    'निर्वसनी मुलगी. स्वतंत्र बाण्याची.'
    रांग लागली दाराशी
    चिन्या, चिनूक्स, स्लार्टी, टण्याची
    चिन्या होता मोठा हिंदु(स्थान)भक्त
    येता जाता काढी दुष्मनाचे रक्त
    राखी म्हणे, पण उपयोग काय ?
    मदिरा म्हणता मंदिरात जाय.
    चिनूक्स होता विद्वान खूप
    डोक्यात सतत विभक्तीरूप
    राखी म्हणे, पण उपयोग काय ?
    माझे 'संबोधन' याला कळणार नाय !
    स्लार्टी गंभीर विचारी रत
    प्रत्येक विषयावर त्याला मत
    राखी म्हणे, पण उपयोग काय ?
    डांसच्या विचारानेच खाईल हाय
    टण्याने धरिला यमेचा पंथ
    डझन ग्रंथ ? पुरे एकच मंथ.
    राखी म्हणे, पण उपयोग काय ?
    कामु कळला तरी कामुकचे काय ?!

    केळकरकाका बघतात आणखी स्थळे
    सावंतकन्येने फुलवले उपवधूंचे मळे

    ***
    Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Jopli

    ***
    www.jutamaro.com

    Pages