बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl हे झालं राखीचं म्हणणं. तुमच्या चौघांचं म्हणणं ही काव्यातून ऐकायला आवडले. Wink

विषय निवडीबाबत माझं मार्गदर्शन किती योग्य आहे याचा प्रत्यय तुम्हाला गुलमोहरात योग्य शोध घेतल्यास येईलंच Wink

वा! वा! सर्वांनाच छान कविता जमल्यात. तरीही माझ्या काही सूचना (शेवटी कार्यशाळा मी घेतेय ना सूचना करायलाच हव्यात..) हा विषय विशिष्ठ वर्गात फारसा प्रसिद्ध नसल्याने फक्त उथळ, टवाळ लोकांच्याच प्रतिक्रीया या विषयावर मिळतील.

स्लार्टी तुझं अजून लग्न व्हायचं आहे हे लक्षात घेता तू हळूवार आणि विशिष्ठ वर्गाच्या डोळ्यात पाणी आणणारे विषय घेतल्यास तुझ्या विचारपूसमधे आणि पर्यायाने तुझ्या आयुष्यात विशिष्ठ वर्गाची वर्दळ वाढेल. Happy उदाहरणादाखल काही बातम्या देत आहे.

१. सामाजिक...रिक्षाचालकांच्या संपामुळे रुग्णांचे हाल या प्रकारचे विषय घेतल्यास तुझी विद्वत्ता दिसून येईल तसेच तुझी सामाजिक प्रश्नाबद्दलची आस्था पाहून विशिष्ठ वर्ग अत्यंत प्रभावित होईल.

२. काळजाला हात घालणार्‍या काही बातम्या.. विशिष्ठ वर्गाच्या छळाच्या त्या वर्गावर झालेल्या अन्यायाच्या बातम्या घेऊन करुण अथवा तडफदार कविता लिहीता येतील... विपु भरभरुन वाहील.

३. मातृप्रेम आणि मातृभक्ती हा एक सदाहरीत विषय आहे. पेपरमधे योग्य बातम्या आल्या नसल्यास हा विषय जरुर वापरावा.

४. लोकप्रिय अहिंसावादी नेते हेही सदाहरीत विषयामधे येतात. हळव्या भावनांचा कवितेत प्रयोग करणे अत्यावश्यक.

श्रद्धे तुला यमक ही गोष्ट अगदी व्यवस्थित कळली आहे. आता इतर काही गोष्टी ज्या काकाशा - १ मधे शिकवल्या त्या तू विसरलीस.. म्हणून पुन्हा एकदा कविता जितकी सहज सोपी तितकीच त्याची प्रसिद्धी कमी. राखी सावंत आणि तिचे स्वयंवर या विषयावर दुर्बोध कविता लिहीण्याचा गृहपाठ मी तुला देत आहे. तुला वीण छान जमली आहे दोन सुलट एक उलट (राखी ) तिन सुलट.. पुन्हा दोन सुलट एक उलट... मला वाटतं तू आता जाळीच्या वीणीचा प्रयोग करायलाही हरकत नाही

लिंब्या तुझी कविता मात्र अगदी काळजाला हात घालते. तवा, चटके, आई, डोळ्यातले पाणी हे शब्द वापरल्याने विशिष्ठ वर्गाच्या काळजालाच हात घातलास.. तेवढं दुर्बोधपणा आणायचं मात्र पहायला हवं. जमेल हळू हळू .

रैना यमकाला १२ नंबरची सुई वापर... आणि मधल्या शब्दांना दहा नंबर.. यामुळे काय होतं की यमक घट्ट तसंच लवचिक होतं. Proud
~~~~~~~~~

महान आहेत आजच्या कविता (येथील). शेवटची तर कळस Lol

>>स्लार्टी तुझं अजून लग्न व्हायचं आहे हे लक्षात घेता तू हळूवार आणि विशिष्ठ वर्गाच्या डोळ्यात पाणी आणणारे विषय घेतल्यास तुझ्या विचारपूसमधे आणि पर्यायाने तुझ्या आयुष्यात विशिष्ठ वर्गाची वर्दळ वाढेल.
एक शन्का : त्या विशिष्ट वर्गाचे प्रतिसाद "स्लार्टीदा, खूपच छान" असे आले तर? राखी सावन्त ऐवजी भलतिच राखी यायची स्लार्टीच्या हातात.

सगळे महान आहात. स्लार्टीचे काव्य तर अशक्य!

आज गडावर पूनम वैनींनी विचारलेल्या एका महान प्रश्नाला उत्तर देताना गडकर्‍यांनी मिळून घातलेला गोंधळ...

psg | 5 मे, 2009 - 12:28
पण 'आय लव 'यु'' आहे तसंच राहिलं. प्रेम हे सर्वशक्तीमान आहे हे सिद्ध झालं! कोणी कितीही प्रयत्न करा, लव ला हात लावू शकत नाही, समझे???

meenu | 5 मे, 2009 - 12:32
बरोबरे पूनम .. लव हे सर्वशक्तीमान अस्तंच मुळी. भीष्मच पुढे जाऊन शक्तीमान झाले. म्हंजे शक्तीमान हा भीष्मांचा पुनर्जन्म आहे. ते की नाई काईसुद्दा करु शकतात. बाणांच्या बेडवर वाट्टेल तितका वेळ झोपु शकतात. हल्ली डनलॉपच्या मऊ मऊ गाद्या आल्यात पण भीष्मांना चालतील की नाई कोण जाणे? भीष्मांचं कुणावर लव होतं...? काय बरं नाव त्यांचं?
~~~~~~~~~

himscool | 5 मे, 2009 - 12:34
कोणी कितीही प्रयत्न करा, लव ला हात लावू शकत नाही, समझे??? >>>

वैनी लवला हात कसा लावणार तो तर द्वापारयुगात होऊन गेला ना.... आणि तो सुद्धा रामाचा सुपुत्र.. त्याला हात लावायचे धाडस कोण करणार.. त्याला हात लावयला गेलो आणि चुकून एखादं ब्रह्मास्त्र येऊन पडलं म्हणजे अंगावर... एवढी रिक्स कोण घेणार.. आणि ती कव्हर तरी करणार आहे का कोणी आजकालच्या जमान्यात.. सगळे विमा कंपनी वाले इकडून तिकडून सारखेच.. लगेच म्हणतील.. हे असले अपघात कव्हर नाही करत आम्ही... असल्या जोखीमी पत्करणार होतात तर आधीच सांगायचं होतं त्या प्रमाणे प्रिमियम लावला असता तुम्हाला...
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

nandini2911 | 5 मे, 2009 - 12:37
भीष्मांचं कुणावर लव होतं...? >>>
माझ्या माहितीप्रमाणे आणि चि कृ गोखले याच्या भारतीय मिथ्याशास्त्र एक तौलनिक अभ्यास या पुस्तकाप्रमाणे लव हा कुश याचा जुळा भाऊ होता. तसेच हे दोघेही राम आणी सीता याचे पुत्र असल्याचे देखील बर्‍याच ठिकाणी छापून आलेले आहे. लव याचा भीष्म याच्याशी संबंध असल्याचे दाखले कुठेही मलातरी अजून मिळाले नाहीत.

जाणकार यावर मार्गदर्शन करतील का??
--------------
नंदिनी
--------------

raina | 5 मे, 2009 - 12:40
तो लव ? की सौंदर्यशास्त्रातील लव ? डाळीचे पीठ लावावे लहान मुलांना लव जायला. मोठ्यांनी इथल्या कविता वाचाव्यात. आपोआप जाईल.

aditya_d | 5 मे, 2009 - 12:42

लेटेष्ट जन्मात गीता होती.
पूर्वी अंबा अंबिका पैकी कोणीतरी असणार!!
तसा प्रस्ताव तरी होता. पण प्रतिज्ञा आड आली. तिला तशी सवयच होती मुळी. विचित्रवीर्य आणि प्रतिज्ञा यांचं संगनमत होतं. त्याला राजा व्हायच होतं. तसा तो झाला आणि भीष्मांची प्रतिज्ञा थोर ठरली.

slarti | 5 मे, 2009 - 12:48
मराठीत लागत नाहीत म्हणजे त्या दुसर्‍या भाषेत नक्की लागणार.
हे असले अपघात कव्हर नाही करत आम्ही... >>> हिम्या, लव हा अपघात होता असे म्हणतोस ? हेच सीतामैया आणि तुझी बायको यांचेसमोर एकेकदा म्हणून बघ.
सर्वशक्तीमान नक्की कोण ? लव, भीष्म, शक्तीमान की भीम ? फार गोंधळ.
मोठ्यांनी इथल्या कविता वाचाव्यात. आपोआप जाईल. >>> लव जाऊन मिसरूड फुटेल असे म्हणायचे आहे का तुला ?

***
Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Joplin

nandini2911 | 5 मे, 2009 - 12:49
सर्वशक्तीमान नक्की कोण ? लव, भीष्म, शक्तीमान की भीम ? फार गोंधळ.
>>> भीम हे नवीन पात्र आणल्याबद्दल तुमचा निषेध....

--------------
नंदिनी
--------------

aditya_d | 5 मे, 2009 - 12:52
सर्वशक्तीमान नक्की कोण ? लव, भीष्म, शक्तीमान की भीम ? फार गोंधळ>>
भीम असुच शकत नाही. त्याला आपल्या शक्तीचा गर्व असल्याने त्याला पुढचा जन्म 'मुक्तारसिंग' चा मिळाला. त्याचे गर्वहरण 'शहेनशहा' ने केले. त्याचेही नाव लिस्ट मध्ये घाला.

psg | 5 मे, 2009 - 12:53
सर्वशक्तीमान लवच. 'लवलव करी पातं' ऐकलंय ना? एक यःकश्चित पातंही लव करू शकतं, यावरूनच लवचं सामर्थ्य कळतंय.

raina | 5 मे, 2009 - 12:57
पूणम- लवाच्या (फ.क्ष. दामल्यानुसार बरोबर हाय ना ? साभारः मिल्या) एव्हढी आहारी जाऊ नकोस.
बायकांनी मिताहारी असावे.
Love is after all only a four letter word.

लव जाऊन मिसरूड फुटेल असे म्हणायचे आहे का तुला >>

krishnag | 5 मे, 2009 - 12:59
ह्या लव शब्दाची उत्पती आणि लवकर, लवाजमा आदी शब्दांची व्युत्पती या बाबत काही संबंध असल्यास भाषा शास्त्र विषयक जाणकारांनी त्यावर प्रकाश टाकल्यास उत्तम!

raina | 5 मे, 2009 - 13:05
उत्पती हे उचापती सारख वाटतं - भावार्थ तोच असला तरी.
तूर्तास स्लार्टी आणि साजिरा तिनपत्ती लावतायत. तेच ते भिष्मांनी नीट अंपायरगिरी केली नाय ना ते द्युत.
त्यांच्या वेळेला डकवर्थ ल्युविस असता तर द्युत कोण जिंकले असते ?

krishnag | 5 मे, 2009 - 13:06
उत्पती हे उचापती सारख वाटतं >>>>

हो उचपती मधूनच कुठल्याही गोष्टीची उत्पती होत असते!!

psg | 5 मे, 2009 - 13:12
हो उचपती मधूनच कुठल्याही गोष्टीची उत्पती होत असते!! >>> पटलं!

डकवर्थ ल्युईस कसा आला असता रैन? -श्लेष कळतोय ना?
द्यूत महालात बसून खेळतात ना? हां, क्रिकेटची मॅच चालू असती, तर गेले असते सगळे ती बघायला द्यूतबित सोडून

himscool | 5 मे, 2009 - 13:16
सर्वशक्तीमान नक्की कोण ? - नविन यादी -
लव, भीष्म, शक्तीमान, भीम की शहेनशाह... की अजून तिसराच कोणीतरी...

आणि लव ह्या शब्दाची व्युत्पत्ती ल आणि व ह्या दोन अक्षरांपासून झालेली नसून ती 'ळ' आणि 'ब' ह्या दोन अक्षरांपासून झालेली आहे..
इंग्रजांना 'ळ' आणि 'ब' हे दोन्ही शब्द नीट न उच्चारता आल्यामुळे त्यांनी 'बळ बळ बळ' ह्या जपाचा उच्चार 'लव लव लव' असा केला आणि 'लव' हा शब्द प्रचलित झाला....
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

shraddhak | 5 मे, 2009 - 13:24
सर्वच.

भीष्माचे कुणावरही लव बसण्यापूर्वी त्याच्या पप्पांचे मत्स्यगंधेबरोबर अफेअर झाले. मग त्याला नाविलाजाने प्रतिज्ञा करावी लागली. अंबेचे लव शाल्वावर (किंवा शा'लवा'वर होते!), अंबिका आणि अंबालिकेचे लग्न (लव होते की नाय माहीत नाय!) विचित्रवीर्याबरोबर झाले... नंतर कौरवांनी आयुष्यभर नाना उचापती करून त्यातून नाना प्रॉब्लेमांची उत्पत्ती केली. भीष्म 'मी यात पडणार नाय!' म्हणाला की सर्वे 'तुला घरी जाऊन काय करायचं असतं नैतरी..' असे कुजके टोमणे मारून त्याला प्रॉब्लेमात लक्ष घालायला लावायचे. तात्पर्य, भीष्माचे कुणाशीच लव होऊ शकले नाही. म्हणून त्याने शक्तिमान म्हणून पुनर्जन्म घेऊन गीता विश्वास नावाच्या बाईशी लव केले.

आज स्टार गोल्डावर 'लव के लिये कुछ भी करेगा' हा भीष्माच्या जीवनावरचा शिनिमा आहे. सर्व्यांनी नक्की बघा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.

nandini2911 | 5 मे, 2009 - 13:29
श्र... अफाट,

तो महान चित्रपट बघून मग अचाट चित्रपटाच्या पोतडीत जरा भर घाल.
नंतर कौरवांनी आयुष्यभर नाना उचापती करून त्यातून नाना प्रॉब्लेमांची उत्पत्ती केली.>> यामधे पांडावाचे नाव का नाय?? अल्पसंख्यांक म्हणत म्हणत अख्खे महाभारतभर रडलेत ना ते. त्यानी किती प्रॉब्लेम निर्माण केले???

--------------
नंदिनी
--------------

chinoox | 5 मे, 2009 - 13:30
रशियात पुनर्जन्म घेतलेल्या शक्तिमानाकडून आज गडावर रक्त सांडणार..

pha | 5 मे, 2009 - 13:32
.. श्रद्धे
>>यामधे पांडावाचे नाव का नाय??
तेही 'कौरव' या सुपरसेटाचाच भाग होते ना!

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

raina | 5 मे, 2009 - 13:35
होय होय. आय द अग्रि विथ यु नंदिनी.
आय द अग्रि विथ यु टू चिनुक्सा

श्रद्धे- अफाट अफाट.
हिम्या- जपानी लोकं पण अस्सेच करतात- लवर चा उच्चार रबर

तेही 'कौरव' या सुपरसेटाचाच भाग होते ना!- अरेच्चा खरच की. अजून कोणी काही लिहीपर्यंत आय द अग्री विथ यु पूनम.

nandini2911 | 5 मे, 2009 - 13:36
रशियात पुनर्जन्म घेतलेल्या शक्तिमानाकडून आज गडावर रक्त सांडणार..
>> का? ते राखीचे रक्तपिपासू डांस परत आलेत का? रशियातून स्पेशल ट्रेनिंग वगैरे घेऊन???
--------------
नंदिनी
--------------

shraddhak | 5 मे, 2009 - 13:41
रशियात पुनर्जन्म घेतलेल्या शक्तिमानाकडून आज गडावर रक्त सांडणार..
<<<
त्याने 'पर्व' वाचले तर भैरप्पा व उमा कुलकर्ण्यांचे काय खरे नाही.

>>यामधे पांडावाचे नाव का नाय??
तेही 'कौरव' या सुपरसेटाचाच भाग होते ना!
<<<<<
फ म्हणतोय ते राईट आहे नंदिनी. ते पण कौरवच पण त्यांना कधीच शिंव्हासनावर क्लेम सांगता येऊ नये म्हणून त्यांना पांडव, पांडव म्हणायचे. (मन कलुषित करणारे फुटीचे राजकारण!) लहानपणी टीम पाडून ते 'लढाई, लढाई' खेळायचे तेव्हा दुर्योधनाची टीम स्वतःला कौरव म्हणवून घ्यायला लागली (तेव्हाही संख्याबळावर जिंकायचे लोक!) तर मग ह्या पाच मुलांनी 'पांडव' नाव घेतले. तेव्हापासून कुठल्याही शिनिम्यात पाच हिरो असले की नाव पांडव (शिनिम्याचे!) होय की नाय रे ()?

काल मी 'नजराना' आणि 'फरिश्ते' नावाचे दोन अ नि अ सिनेमे बघितले. पैकी 'नजराना' पूर्ण बघितला. म्हंजे टैटल येतात तिथपासून ते 'धी एंड' च्या पाटीपर्यंत. 'नजरान्या'कडे लक्ष ठेवा.

तेही 'कौरव' या सुपरसेटाचाच भाग होते ना!- अरेच्चा खरच की. अजून कोणी काही लिहीपर्यंत आय द अग्री विथ यु पूनम.
<<<<<<<
पूनम काय? आमच्या ह्यांचा आयडी आहे तो... पीवरून सुरू झालेले सर्वेच आयडी काय पीएसजीच?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.

meenu | 5 मे, 2009 - 13:40
शक्तिमान थोडाथोडा शेहनशाह आणि थोडाथोडा भीष्मासारखा दिस्तो तो त्या दोघांचा एकदम पुनर्जन्म असेल की काय असं वाटतं मला ? पण दोन माणसं मिळून नंतरच्या जन्मात एक माणूस बनल्याचं ऐकल्यासारखं वाटलं नाय.. नादखुळा आणि डार्लिंग यांना मिळून एक अपत्य झालं ती वेगळी गोष्ट आहे. लव लव करी पात .. यामधे कांद्याची पात लवलव करताना दाखवलीये. शिवाजी महाराजांची तलवार पण लवलव करायची. लव अगदी सर्वस्पर्शी आहे. अमृतांजन बरं की कैलास जीवन की टायगर बाम आणू?
~~~~~~~~~

pha | 5 मे, 2009 - 13:49
अगदी अगदी श्रद्धे. आता दुर्योधनाच्या टिमेनं स्वतःला खरं तर 'धार्तराष्ट्र टीम' म्हणवून घेतलं पाहिजे ना? पण त्यांनी स्वतःला सुपरसेटाचं नाव घेतलं. हे म्हणजे हिंदी भाषिक सिनेमा सृष्टीनं 'इंटरनॅशनल इंडियन फिल्म अ‍ॅकॅडमी अवॉर्ड्स' नामक खिरापत आपापसातच वाटून स्वतःला 'इंडियन सिनेमा' (= सुपरसेटाचं नाव) म्हणून मिरवण्यासारखं आहे.
मीन्वाज्जे, तुला अमृत मलम आठवेना?!
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

nandini2911 | 5 मे, 2009 - 13:48
पण श्र, पांडवानीच वेगळी आयडेंटीटी घेतल्याने आपण त्याना कौरव म्हणू शकत नाही. जरी ते त्या सुपरसेटात असले तरीही.

नजरान्याकडे लक्ष आहेच.
--------------
नंदिनी
--------------

मिने-कांद्याच्या पातीचा झुणका खा<<<<<<
काय गं हे! 'करून खा' असं नाही लिवलंस. नायतर आज्जीला स्वैंपाकघरात पाठवायची तुझी हिंमत झाली म्हणून मी दाद देणार होते.

आज्जे, मी महाभारतावर दुर्बोध, पिळाच्या विणीची कविता लिहिणार आहे.

पण श्र, पांडवानीच वेगळी आयडेंटीटी घेतल्याने आपण त्याना कौरव म्हणू शकत नाही.<<<<
हा तुझा मुद्दा अचूक आहे. तुझी वस्तुनिष्ठ वाद घालायची पद्धत मला भावली. मला तर बाई 'पांडव की तेही कौरव?' असा धागा सुरू करायची इच्छा होतेय.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.

raina | 5 मे, 2009 - 13:58
आज्जी मुदपाकखान्यात जात न्हाईत? मग आजोबा जातात का?
आज्जीSSSSSSSSSSSSSSSSS मले बी शिकवाच हे कसे साध्य केले ते. ती काकाशा नंतर होत -हाईल. हे ज्यास्त म्हत्वाचे हाय.

साजि-या- तुझी मायक्रो क. छान हां. आता आज्जी पयले आमाला (सांसारिक)मार्गदर्सन कर्त्याल मग तुमाला -कवितेच्या जर्म वरुन डिसीज कसा करायचा ते.

shraddhak | 5 मे, 2009 - 14:02
आज्जी मुदपाकखान्यात जात न्हाईत?<<<
घ्या, तुला आज कळलं होय हे? आज्जींना घराचे नूतनीकरण करेपर्यंत एक खोली (तेच ते स्वैंपाकघर!) कशाला आहे, हेच माहीत नव्हते. त्या तिथे भिंती पाडून टेरेस गार्डन करणार होत्या. खेरीज गॅस, वगैरे ज्वालाग्राही गोष्टी घरात नकोतच, मुलगा लहान आहे त्याची सुरक्षितता म्हत्त्वाची, असेही त्यांनी ठरवून टाकले. पण आजोबा कळवळून म्हटले, 'अगं, तिथे टेरेस गार्डन केलं तर आपण झाडांचा पाला खायचा का त्या?' तेव्हा मग त्यांनी नाईलाजाने बेत रहित केला.

आज्जी, दिवे घ्याल ना? की कवितेतून देऊ?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.

nandini2911 | 5 मे, 2009 - 14:03
मले बी शिकवाच हे कसे साध्य केले ते>> बायो, तुला आज्जी कशाला हव्यात त्यासाठी?? माझ्याकडे येऊन शिकत जा. लग्नानंतर अवध्या पंधरा दिवसात शिकायची कला आहे. आता शिकून जास्त उपेग होइल असे वाटत नाही.
--------------
नंदिनी
--------------

slarti | 5 मे, 2009 - 14:05
एक यःकश्चित पातंही लव करू शकतं, यावरूनच लवचं सामर्थ्य कळतंय. >>>
भीष्म 'मी यात पडणार नाय!' म्हणाला की सर्वे 'तुला घरी जाऊन काय करायचं असतं नैतरी..' असे कुजके टोमणे मारून त्याला प्रॉब्लेमात लक्ष घालायला लावायचे. >>>
श्रद्धा, मीन्वाजींच्या मार्गदर्शनाखाली 'ते (कौरव) आणि आम्ही (पांडव)' असा काव्यदोरखंडच वळायला घे.
कवितेच्या जर्म वरुन डिसीज कसा करायचा ते. >>>

***
Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Joplin

aditya_d | 5 मे, 2009 - 14:04
पण श्र, पांडवानीच वेगळी आयडेंटीटी घेतल्याने आपण त्याना कौरव म्हणू शकत नाही.>>>>>
खरय हे. कौरव आणि पांडव यातला मुख्य फरक त्यांच्या आयांमुळे आहे. गांधारी जरा जास्तच आगाउ होती. उगाच डोळ्यांवर पट्टी वगैरे. त्यामुळे १०० पर्यंत मजल गेली.
कौरव आणि पांडव यांचा संधिविग्रह देखिल चमत्कारिकच आहे. पांडव ही पांडुरंगाची मुलं. आणि कौरव ही (गांधारी) कौर ची. खर पाहता, पांडव ही पांडु(रंगाची) मुलं नव्हेतच. ती कुंतीची. त्यांना कुंतव म्हणा.

'ते (कौरव) आणि आम्ही (पांडव)' असा काव्यदोरखंडच वळायला घे.>>>
आणि त्या दोरखंडाला पीळ घालायला फार काही करायला नकोच आहे.. फक्त सातही खंडात फिरुन यायचे....
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

shanky | 5 मे, 2009 - 14:07
>>पांडव ही पांडु(रंगाची) मुलं नव्हेतच. ती कुंतीची. त्यांना कुंतव म्हणा.

आणि माद्री कोण होती रे? कुंतीची पाठराखीण का? नकुल, सहदेव कुंतीची मुले नव्हती....
----------------------------------------
मै जिंदगी का साथ निभाता चला गया ...

shraddhak | 5 मे, 2009 - 14:11 नवीन
ती कुंतीची. त्यांना कुंतव म्हणा<<<<
आदित्या, कौरव आणि पांडव हे महाभारतातले 'तत्सम' शब्द आहेत. आता ते नाही बदलू शकत.

मुळात ते कुंतव असले तरी शिंव्हासनावर क्लेम सांगायचा तर कुरुवंशातल्या माणसाचे नाव घेणे अपेक्षित होते. एकतर त्यांचा जन्म वनवासात असताना झालेला. वनवासात गेलेल्या तिघांपैकी फक्त कुंती रिटर्न आली. तेव्हा 'आम्ही कोण कुंतीबिंती ओळखत नाही' असे म्हटले असते तर काय घ्या. तेव्हा तिने त्यांच्या टीमेचे नाव 'पांडव' सांगितले. पांडूचे ते पांडव. आता ते 'पांडू कोण?' म्हणूच शकले नसते कारण शिंव्हासनाच्या मागे आणि महालातल्या भिंतीवर पांडूने आधीच शाईपेनाने 'कुमार पांडू विचित्रवीर्य हस्तिनापूरकर' असे लिहून ठेवले होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.

aditya_d | 5 मे, 2009
टाळ्यांचा गजर.
नकुल, सहदेव कुंतीची मुले नव्हती....>>>>>>
प्वाईंट टू बी नोटेड. ती दोघं मार्दव होत.
म्हणजे ४ कुंतव आणि २ मार्दव.
शंक्या, शंकेखोर निघालास!!!

shanky | 5 मे, 2009 - 14:16 नवीन
>>>म्हणजे ४ कुंतव आणि २ मार्दव
आदित्या सही मार्दव शब्दाची व्युत्पत्ती आज कळली...
----------------------------------------
मै जिंदगी का साथ निभाता चला गया ...

shraddhak | 5 मे, 2009 - 14:16 नवीन
म्हणजे ४ कुंतव आणि २ मार्दव<<<<<
लय खास आदित्या. तू कर्णाला धरून आहेस तर. तू त्या काळी असतास तर कर्ण दुर्योधनाच्या टिमेकडे गेलाच नसता. आणि मार्दी असतं नाव तर मार्दव. माद्री नाव म्हणून माद्रव. हा व्याकर्णाचा प्रेश्न आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.

nandini2911 | 5 मे, 2009 - 14:16 नवीन
बरोब्बर श्र, आणि धृताराष्ट्राला ते दिसलेच नाही. आणी गांधारीला पण!!

जर दिसले असते तर कुंती पांडू वनवासात असताना ते त्याने खोडून टाकलं असतं. आणि मग कुंतव म्हना, किंवा पांडव (माद्रीवरून शब्द मुद्दम देत नाहिये) त्याचा क्लेम गेलाच असता...

--------------
नंदिनी
--------------

shraddhak | 5 मे, 2009 - 14:17 नवीन
जियो नंदिनी. नंदिनी का दिमाग चाचा चौधरीसे भी तेज चलता है. प्रत्येक गोष्टीला तुझ्याकडे स्पष्टीकर्ण आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.

nandini2911 | 5 मे, 2009 - 14:18 नवीन
त्या काळी असतास तर कर्ण दुर्योधनाच्या टीमेकडे गेलाच नसता>>> ते त्याने आयपीएलनुसार केले. रॉबिन उथप्पा मुंबईकडून बंगलोरला गेला तस्सा!!!!! त्याही वेळेल्या प्लेअर्स एक्स्चेंज विंडो होती म्हणायची!!!

--------------
नंदिनी
--------------

himscool | 5 मे, 2009 - 14:18
तू कर्णाला धरून आहेस तर.>>>>
कर्णाला धरुन रहाण्या शिवाय पर्यायच नाहीये त्याला....
शाळेत असल्यापासून फक्त तेव्हढेच करतो..
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

संपादन SAJIRA | 5 मे, 2009 - 14:25
त्या काळी पण आयपीएल होतं?
द्रोणाचार्य हेच ललित मोदी होते का मग?
असतील तर, एक संघ १०० चा नि एक संघ ५ चा असं कसं केलं त्यांनी?
कृपया सांगा.

--
मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय...
ती होता होता मद्यात असते; मध्यरात्री गद्यात असते; पहाटे पहाटे पद्यात असते;
अन उजाडताना पुन्हा एकदा 'सध्यात' असते..!

aditya_d | 5 मे, 2009 - 14:26
आता प्रश्न असा आहे की कर्ण कोणाचे नाव लावायचा? बरं, कुंतीचं माहेरचं आडनाव काय ते कोणास माहित आहे काय?

psg | 5 मे, 2009 - 14:28
'लव' वरून रामायणात किंवा फार तर फार शत्रुघ्न सिन्हापर्यंत पोचायला हवे होतो आपण! महाभारतात कसे काय गेलो?
पुन्हा एकदा पुष्टी मिळालीच- लव हे सर्वव्यापी!
प्वाईंट सोडायचा नाय!

shraddhak | 5 मे, 2009 - 14:32
द्रोणाचार्य हेच ललित मोदी होते का मग?
असतील तर, एक संघ १०० चा नि एक संघ ५ चा असं कसं केलं त्यांनी?>>>
कारण त्यांनी हस्तिनापुरात र्‍हाऊन धृतराष्ट्राचं मीठ खाल्लं होतं. 'नमक का फर्ज अदा करो मास्तर(ते त्यांचे युद्ध आणि पीटी टीचर होते)' असे छद्मीपणे दुर्योधन बोलताच त्यांना तसे करावे लागले. तस्मात, नोकरी फार वाईट.
दुर्योधनाच्या डोक्यात लहानपणापासून फैनल महाभार्तीय युद्धाचे प्लॅनिंग चालू असे कारण त्याच्या आईवडिलांनी नाही तरी त्याने शिंव्हासनामागे आणि महालात कोरलेले शब्द पाहिले होते. त्यामुळे त्याने कर्ण, द्रोण, शकुनीमामा, वगैरे मंडळींना मीठ खाऊ घालून अंकित करून ठेवले होते.

कुंतीला दोन माहेरं होती. एक यादवांकडचं, मग ती दत्तक गेली त्या कुंतिभोज राजाकडलं. कुठलं नाव हवं?

पूनम, भीष्मांचा उल्लेख झाला होता किनै? त्यांच्यामुळेच सगळे महाभारतात शिरलेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.

aditya_d | 5 मे, 2009 - 14:31
'लव' वरून रामायणात किंवा फार तर फार शत्रुघ्न सिन्हापर्यंत>>>>>>
काहितरी चूक होतिये. रामायणात शत्रुघ्न सिन्हा नसुन तो शत्रुघ्न दशरथ रघुवंशी होता.

pha | 5 मे, 2009 - 14:31
>आदित्या, कौरव आणि पांडव हे महाभारतातले 'तत्सम' शब्द आहेत. आता ते नाही बदलू शकत.

आदित्या, कुंतीचं माहेराचं आडनाव यादव होतं. कुंतिभोज नामक यादव राजाची ती कन्या.
>>प्वाईंट सोडायचा नाय!
वहिनी, अ.आं.अडे धडे गिरवताय वाटतं?! आता तुम्हीही चाळीसपानी लिहू नका म्हणजे झालं!

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

aditya_d | 5 मे, 2009 - 14:34
आदित्या, कुंतीचं माहेराचं आडनाव यादव होतं. कुंतिभोज नामक यादव राजाची ती कन्या>>>>
वा! मग बरोबर आहे. यादव आड्नाव लावत नाहीत. त्यामुळे ' कर्ण कुमार ' हे उचित ठरेल.

slarti | 5 मे, 2009 - 14:36
लव सर्वव्यापी तर कुश काय ? उपद्व्यापी ? भावाभावात असा भेदभाव करण्याची पद्धत रामायणकाळीच सुरू झाली म्हणायची. उगीच कौरवांना नावे ! (अआ सध्या आहेत कुठे ?)

***
Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Joplin

aditya_d | 5 मे, 2009 - 14:36
त्यापेक्षा कुंकु(कुंती कुमार) हे ठीक आहे.

nandini2911 | 5 मे, 2009 - 14:37 नवीन
श्र, पुन्हा एकदा अचूक उत्तर.

यादव, रघुवंशी, सिन्हा?????? अरे काय हे इथे पण सर्व युपी बिहारी???

मराठी माणसा, तू कुठे होतास तेव्हा???? तेव्हापासून तुला "जागा हो" असें ओरडून सांगतोय..
--------------
नंदिनी
--------------

टण्याने टाकलेला कोंबडी-विचार :
tanyabedekar | 29 मे, 2009 - 09:34
कोंबडी खरे तर अंडे देउन ते उबवायला बसणार होती. पण अंडे देणे ही उत्पादन प्रक्रिया आहे असे सरकारने ठरवल्यामुळे अंडे दिल्या दिल्या कोंबडीला एक्साइज रजिस्टरमध्ये एन्ट्री करायला लागली. परंतू हे अंडे, अंडे म्हणुन विकले जाणार आहे की अंडे उबवून कोंबडी म्हणुन विकले जाणार आहे हे आधीच माहिती नसल्याने तिने अंडे म्हणुन विकली जाणारी अंडी घालण्यासाठी आणि कोंबडी म्हणुन विकली जाणारी अंडी घालण्यासाठी दोन वेगवेगळे विभाग जाहीर केले. एकाला तिने ट्रेडिंगच्या खाली रजिस्टर केले तर दुसर्‍याला तिने प्रोसेसिंगच्या खाली रजिस्टर केले. ट्रेडिंगच्या अंड्यांना एक्साइज लागू नव्हता तर प्रोसेसिंगच्या अंड्यांना सर्विस टॅक्स. परंतू एके दिवशी अंडी म्हणुन विकायचे अंडे ट्रकमध्ये भरुन पाठवले असता उबले व त्यातून कोंबडीचे पिल्लू बाहेर पडले. रेव्हेन्यु डिपार्टमेंटने कोंबडीवर ट्रेडिंगच्या नावाखाली प्रोसेसिंग केल्याचा फसवणुकीचा दावा दाखल केला. ह्या दाव्याच्या सुनावणीसाठी कोंबडीला क्षेत्रीय न्यायालयात जाण्यासाठी रस्ता ओलांडावा लागला.

  ***
  May contain traces of nuts.

  आजच्या गडावरच्या टवाळान्च्या टवाळक्या! अर्थात Light 1 देऊनच!

  limbutimbu | 29 मे, 2009 - 14:49
  कामात (खपले) काय सगळे????
  बर! करा, कामे करा!
  तवर मी डुलकी काढतो एक छानशी

  बुप्रा: छानशी डुलकी म्हणजे?
  मी: छानशी म्हणजे विनाव्यत्यय
  बुप्रा: विनाव्यत्यय? कशात?
  मी: अहो डुलकीत, अजुन कशात?
  बुप्रा: बर, पण छानशी डुलकी म्हणजे काय?
  मी: (थोड चिडून) भरदुपारी रम्भा उर्वशी मेनकादी अप्सरा वारा घालायला स्वप्नात येतात ती छानशी डुलकी
  बुप्रा: कशावरून त्या रम्भा उर्वशी मेनकादीच अस्तात?
  मी: अहो त्याशिवाय का वारा घालतात?
  बुप्रा: कशावरुन वारा घालतात? केस उडतात काय तुमचे?
  मी: हो, स्वप्नात तरी भुरुभुरु उडतात!
  बुप्रा: म्हणजे भुरुभुरु केस उडणे म्हणजे छानशी डुलकी का?
  मी: (मनातल्या मनात, आयला काय नाठाळ घोडेछाप हे) उघडपणे..... हो, तस म्हणा!
  बुप्रा: पण तुमच्या स्वप्नात भरदुपारी रम्भाउर्वशीमेनकादी अप्सरा येऊन तुम्हाला वारा घालतात, ज्याला तुम्ही "छानशी डुलकी" म्हणता, हे सिद्ध करुन दाखवा!

  मी बेशुद्ध पडतो!
  अन बुप्रा मला वारा घालू लागतो!

  tanyabedekar | 29 मे, 2009 - 15:10
  लिम्ब्या
  >>>
  बुप्रा: कशावरुन वारा घालतात? केस उडतात काय तुमचे?
  मी: हो, स्वप्नात तरी भुरुभुरु उडतात!
  बुप्रा: म्हणजे भुरुभुरु केस उडणे म्हणजे छानशी डुलकी का?
  >>>>
  पण झक्कींना काय करावे?

  limbutimbu | 29 मे, 2009 - 15:19
  >>>> पण झक्कींना काय करावे?
  कुणी???? अप्सरान्नी???????
  वाराच घालायचा!
  केस नाही तर फ्युज, काही तरी एक तरी उडेलच ना?????
  स्वानुभव हे!

  अशा पद्धतीने, अप्सरान्नी घातलेल्या वार्‍यामुळे उडण्यास भुरुभुरू केस नसले तर डुलकीतच फ्युज उडतो
  अन जाग येते
  जाग आल्यावर आजुबाजुला वारा घालणार्‍या अप्सरा न दिसल्याने डुलकीत उडालेल्या फ्युजमधून जागेपणी शॉर्टसर्कीट होऊन आगीच्या ठिणग्या निघू लागतात!
  असा वेळेस, जवळच हाताशी ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीतून तत्काळ दोन घोट पाणी प्यावे
  म्हणजे आगीचा धोका टळतो!

  tanyabedekar | 29 मे, 2009 - 15:53
  जाग आल्यावर आजुबाजुला वारा घालणार्‍या अप्सरा न दिसल्याने डुलकीत उडालेल्या फ्युजमधून जागेपणी शॉर्टसर्कीट होऊन आगीच्या ठिणग्या निघू लागतात!
  >>>>>>>>>>>
  तरीच माबोवर येउन जाळ काढतात

  हाताशी ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीतून
  >>>>
  तू काहीतरी अतार्कीक बोलू नकोस. त्यांनी जर गडबडीत हाताशी असलेल्या बाटलीतले द्रव्य ओतले तर आगीचा अजून भडका उडेल.

  limbutimbu | 29 मे, 2009 - 15:59
  >>>>> तरीच माबोवर येउन जाळ काढतात
  अगदी अगदी! हूडा, वाचतोहेस ना तू तरी हे सगळ?????
  आयला, झक्कीबोवान्ना हे "तार्किक" कस समजणार???
  बहरात जमल तर कुणीतरी टाका रे!

  nandini2911 | 29 मे, 2009 - 16:05
  बिच्चारे झक्कीकाका, त्याच्या गैरहजेरीचा फायद घेऊन तुम्ही हे सर्व लिहत आहात हे त्याना समजले तर त्याना कित्ती वाईट वाटेल???

  मृ यांची नवी कविता, वाहून जाऊ नये म्हणून

  चहा होतोय तोवर....

  हाय कार्ब हाय प्रोटिन्स, गल्लेलठ्ठ छान
  दादा मला शिव वडापाव आण

  लाल पिवळ्या वड्यात बट्टाट्याची भाजी
  बट्टाट्याची भाजी करी बुध्दी माझी ताजी
  ताज्जी ताज्जी बुध्दी माझी सर्वांवरी ताण.......... ॥१॥

  वड्डापाव विक्कायाला दांडगोबाची गाडी
  दांडगोबाच्या गाडीवर खादाडांची जोडी
  खादाडांची जोडी मोडी तुझ्झी माझी मान........ ॥२॥

  वड्डापाव पोटी जाता वाटे द्याव्या लाफा
  विरोधकांस लाफा इतरा नुस्तेच झापा
  बेसनाचा असर झाला गाठा आता रान.......... ॥३॥

  मृ, सुटलीयेस.... कशा सुचताहेत या कविता? काय खाल्लंस ते तरी सांग.

  मृ झकास गं .. भाग्या शिवडा पाव खाल्लाय गं तीने Lol

  बापरे मृ Lol चालीत झकास बसतंय.
  ***************
  युद्धकर्ता श्रीरामः मम | समर्थ दत्तगुरु मुलाधारः ||
  साचार वानरसैनिकोSहम | रावण वधः निश्चितः ||
  इति अनिरुद्ध महावाक्यम |

  मृ Lol
  बेसनाचा असर झाला गाठा आता रान >>> Rofl

   ***
   I get mail, therefore I am.

   केपीकाकांनी आज एका अनवट पण माबोवर विपुलतेने गायल्या/वाजवल्या जाणार्‍या 'खरज' (ह्यालाच दाक्षिणात्य संगीतात खाजवूनटाकखरुजम् असे नाव आहे) रागाची व ह्या रागाचे उस्तादोंके उस्ताद समजले जाणार्‍या मा.लिम्बूभौ ह्यांची आठवण करुन दिली. (इति टण्याशास्त्री. माझ्या विपुमधून साभार.)

   केपीकाकांचे पोस्ट -
   तो खरज्यातला राग कुठला असतो ? त्याला लिंबू राग म्हणायला पाहिजे.

   टण्याशास्त्री यांचे पोस्ट -
   तर ह्या रागाची व्यवच्छेदक लक्षणे व वेगवेगळ्या घराण्यात ह्या रागाच्या सादरीकरणाची वैशिष्ट्ये खाललील प्रमाणे:
   खरज राग. उस्ताद लिम्बुभौ
   थाटः करकर
   तालः झिन्ज्या
   आरोहः पालथ्या हाताने तोंडावर लयकारी करत बोंब मारणे
   अवरोहः सुलट्या पंजाने तोंडावर नागमोडी वळणाने बोंब मारणे
   समः फट्

   पुढे टण्याशास्त्रींनी 'खरज' या रागावर वाड्यावर मांडलेले काही घराणेशाही विचार -
   (या रागाप्रमाणेच या विचारांमधील काही जागा फार उच्च आहेत).

   tanyabedekar | 24 जून, 2009 - 15:55
   वेगवेगळ्या घराण्यात हा राग वेगवेगळ्या प्रकारे गायला जातो:

   १. आमच्या घराण्यात म्हणजे बुप्रा घराणे: ह्या घराण्याचे वैशिष्ट्य म्हणजे तर्काच्या रेषेत जाता जाता, आर्थिक दृष्ट्या उजव्या व सामाजिक दृष्ट्या डाव्या अंगाने बोंब ठोकली जाते. अधून मधून नास्तिकतेच्या जागा ठळक व अज्ञेववादाच्या जागा हलक्या घेतल्या जातात. 'संपूर्ण साम्यवादी नास्तिक' ते 'दुसर्‍याने देव मानावा अगर न मानावा, माझ्या बापाचे काय जाते' अश्या एकूण २४ श्रुती आहेत.

   २. झक्की घराणे: सा: भारतात सगळेजण लाच मागतात. रे: भारतातले लोक कामचुकार गः अमेरिकेत कामे पटापट होतात. मः टॅक्स भरु हो. पण कामच होणार नसतील तर का भरावा. कोमल प (हा फक्त झक्की घराण्यातच असतो): बारात थंडी फार पडते. भारतात पण पडेल. पण लोकांना फक्त स्वार्थ माहिती आणि सरकार फक्त पैसे खाते, तर थंडी कशी पडेल? पः मला अक्कल नव्हती. पण बोलून पैसा कमवता येतो इथे. तिकडे भारतात काय सगळेच शहाणे, मग पैसा कसा मिळेल. म्हणुन मग मी इथे आलो. धः मला काहीच कळत नाही. म्हणुन मी फक्त मराठीतच बोलतो. पण विशिष्ट शहरात जाउन तुम्ही मराठीत बोलू लागला तर लोक म्हणतील, 'तुम्ही फ्रॉम वेअर आला आहात'. विशिष्ट शहरात राहुनच मी काही गोष्टी शिकलो. मुंबइमध्ये मात्र एक पंजाबीणीकडे मी मेस लावली होती. नी: काही लोकांना मजा कळतच नाही. फक्त उ आणि पां बोलणे. विशिष्ट शहरातले असावेत ते. पण मला काय, शिव्या द्या नाहीतर काहिही लिहा माझ्याबद्दल. मला फरक पडत नाही.
   झक्की घराण्यात तिनही सप्तकात सुरावट अशीच राहते. खर्जात करोना ताल उत्तम. मध्यमात लाल वारुणी ताल चांगला. आणि तार सप्तकात तार लागेल असा कुठलाही, जिम बिम, शिवास वगैरे वगैरे.
   झक्की रागात विलंबीत मध्ये नोम-तोम हुडा-हुडा अश्या उच्चारणाने होते. मध्यात उ-पां असे स्वरोच्चारण होते. दृतमध्ये बारा-भारत-लाच-पैसा-गीता-मी-मी-मी-मी-मी-मी असे स्वरोच्चारण करणे बंधनकारक.

   हे सुरू असतानाच 'शंखध्वनी' रागाचीही चर्चा झाली, तेव्हा रैना यांचे पोस्ट -
   आरोहात बोंब मारणे, अवरोहात क्षमा मागणे यातच रागाचे चलन आहे.

   गजाननदेसाई यांचे पोस्ट -
   मला वाटते या रागाच्या आरोहातूनच नोम-तोम जन्मास आले!

   टण्या सुटलाहेस अगदी Lol

   म्रु , टण्या!smiley37.gif

   .

   लॉल.. गडावर लई दंगा झालेला दिसतोय .. Lol

   बाकीचीही बरीच घराणी आहेत माबोवर.. त्याबद्दल पण लिहा की कुणीतरी.. ( एका आद्य पार्ल्याक्वाला ह्याचं contract द्यावं का?? ) Happy

   टण्या, ते वरचे सगळे जपून ठेव. मी मेल्यावर युलॉजी म्हणून वाचायला बरे पडेल. लवकरच ती वेळ येईल बहुतेक.

   माझी एकट्याची एव्हढी स्तुति, नि बाकीच्यांना का कंजुषी?

   बाकी आमच्या घराण्यात गायन? चार पिढ्यात तरी ऐकले नाही!
   संगीताबद्दल बोलणारे म्हणजे " सा रे ग धा" लोक असे मी समजतो. कारण ते सारखे सा रे ग, ध वगैरे म्हणत असतात.

   पुनः माझ्या माहितीतल्या "जाणकारांची" मते ऐकली की मला काही समजत नाही.

   एक अतिविद्वानः "मला लताची गायकी आवडत नाही,
   कुमार गंधर्व तर फारच काहीतरी. त्यांचे एक फुफ्फुस क्षयाने खराब झाले तरी ते तसेच गात!, ते काही खरे नाही. आणि काय ते, रागांमधे नसलेले स्वर घुसडायचे!
   संजीव अभ्यंकर पंडित म्हणजे काय, आजकाल कुणीहि उठावे नि स्वतःला पंडित म्हणवून घ्यावे.
   रिव्हरडान्स या ब्रॉडवे वरील आयरिश नाचाच्या प्रोग्रॅमच्या आधी भूप रागातले स्वर वाजवतात.

   दुसरे : पाच वर्षाचा असताना मला ३५ राग ओळखता येत होते. वसंत देशपांडेंनी नाट्यसंगीताची वाट लावली!

   त्यांचाच लहान भाऊ, जो पुण्यात बरेचदा, अनेक तारांचे कुठलेतरी जुने वाद्य (संतूर का सारंगी)व्यावसायिक रीत्या वाजवतो, नि बादशाही बोर्डिंग, टिळक रोड च्या मागे रहातो, एस. पी. च्या जवळ, तो म्हणतो, दादाला संगितातले काही क्ळत नाही म्हणून तो असे म्हणतो, पण वसंत देशपांडे थोर होते.

   तिसरे: संगितात पी एच डी म्हणजे काय, तेच स्वर उलटेपालटे करून नवा राग केला की झाले.

   तर आता मला पण संगितात पी एच डी देणे तुम्हाला भाग आहे!
   म्हणजे मग मी "zakki, M. B. A., Ph. D" असा नविन आय. डी. घेईन.

   धन्यवाद.

   Happy Light 1

   अरे हे अतिविद्वान, १ले, २रे, ३रे कोण आहेत त्यांनी पटापट इकडे येऊन हजेरी लावा रे!

   मृ ला 'मळमळंतय' म्हणे. हां अभिनंदन वगैरे करु नका
   मळमळीच कारण हे आहे

   ...
   मायबोलीवर आयडी मिळं
   तसं लिहीन्याचं वाढं बळं
   इथं शब्दाले शब्द जुळं
   अन् वाचून जीव तळमळं

   जवा अकलेला लागं 'गळं'
   साठे इच्चार तळं

   खतरनाक मृ.. लैच भारी.. गुमोवर चकरा (की चक्करा) मारुन तुझी काव्यप्रतिभा फारच जोमाने फोफावलेली आहे. Happy

   चि. टण्या ह्यांच्या विनंतीस मान देऊन Proud .....
   (मायबोलीकरांस एव्हाना माझ्या काव्यप्रतिभेचे अजीर्ण झाले असेल ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे हे 'शेवटचे' काव्यसुमन आपल्या चर्णी अर्पण!)

   मायबोलीवर आयडी मिळं
   तसं लिहीन्याचं वाढं बळं
   इथं शब्दाले शब्द जुळं
   अन् वाचून जीव तळमळं

   जवा अकलेला लागं 'गळं'
   साठे इच्चार तळं

   थांब गं 'सजनी', लिवु या गानी, टाकूया तू नळीवर
   ये रं दादा, करु या वादा चढवू कंपूले हरबर्‍यावर
   टाकु पोष्टी नव्या बक्कळं
   साठं इच्चार तळं............... ॥१॥

   आयडी बापडा झालाय वाकडा, पोष्टतो काय बी, धावा
   वाह्यात बोलतंय, कुचकट लिवतय, कसा एवीएठी न्यावा
   जवा अकलेचा चांदोबा ढळं
   साठं इच्चार तळं............... ॥२॥

   जवा अकलेचा चांदोबा ढळं>>>
   Lol

   ---
   असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं जातंया आभाळ!

   शेवटचं कडवं वाचून 'साठी' (बुद्धी नाठी) इच्चार तळं असही म्हणता येइल

   Happy Light 1

   Pages