बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याचप्रमाणे घरी चालताबोलता विकीपेडिया असल्याने लग्नानंतर गुगलशी काडीमोड घ्यावा लागेल.
>>> smiley36.gif
मामाची बायको प्रकरण, रोज रोज अन्न वै व्याकरण>>>>>> smiley36.gif

Lol Lol

अर्भाट कठीण आहेस बाबा तू _/\_ Rofl

मामाचा गाव छोटा
नाही डुकरांना तोटा
कोठीची हवा खाउया
मामाच्या गावाला जाऊया Happy

आज अरभाटसरांनी केलेले हे काव्य -

डोळा : एक येने
डोळा नकळत येई, आणि रेंङाळून राही
क्षण एकही न ज्याला डॉला लाल नाही

भेट तुझी ती पहिली लाख लाख आठवते
रूप तुझे ते गॉगल्मय कणकण साठवते
रेड तुझे साजणा हे, आता मज रेडावून जाई
क्षण एकही न ज्याला डोळा रेड नाही

डोळा १ : ही कविताच नाही. फारतर सविता म्हणता येईल.
डोळा २ : मनापासून क्षमस्व.
डोळा ४ : वा! कवीराज, काय कविता आहे. वावा.
डोळा १: डोळादोन्जी, आपण मनापासून क्षमस्व कोणाला म्हणालात? व का?
डोळा २ : मनापासून आभार. ती माझी सवय आहे. मनापासून क्षमस्व. मनापासून आभार.
डोळा ५ : ओ कवीराज, जरा निट कविता करा. हे काय चालले आहे? शुध्धलेखन आणि व्याकरणाकडे लक्ष द्या की. मीसुध्धा कविता करायचो आणि अजुनही करतोच (घाबरतो काय कुणाला?), पण अश्या टिनपाट केल्या नाहित. शुध्ध केल्या. 'तु'सकट.
डोळा तिसरा : कृपया 'अजूनही, नीट, शुद्धलेखन' असे लिहिणार का?
डोळा ५ : मला एवढे भसाभसा, बदादा आणि चांगले डोळे येतात तेव्हा तर काही म्हणाला नाहीत तुम्ही.
डोळा एकच : डोळा येणे यासारख्या भयंकर सामाजिक, राजकीय समस्येवर असली उथळ कविता केल्याबद्दल कवीचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. मला डोळे येतात. दररोज. त्यामुळे मी आणि मीच यावर बोलू शकतो. दुसर्‍याच्या दु:खाला हसण्याची वृत्ती सोडून द्या. मी कविता अजून वाचली नाहीये. कवितेत दम नाही असे काही जणांकडून ऐकले. कविता कश्यावर आहे याचा अगदी अचूक अंदाज आला. वाचून मग लिहीनच.

श्रद्धा | 25 September, 2010 - 13:44
पूनमदी व इतर ऐका हो ऐका... मी शंभर भागांची कादंबरी लिहिणार आहे.
"सलीम दमयंती - एक प्रेमकहाणी" जी चार पुनर्जन्मांमध्ये चालू राहील. पहिल्या जन्मात ते सलीम दमयंती असतात त्यामुळे वेगळे धर्म आड येतात, पुढचा जन्म येतो तर तो चिनी, ती स्वीडिश... भाषा आणि देश आड येतात (यात तिची होणारी सासू तिला काड्यांनी नूडल खाणे जमत नाही यावरून चिनी भाषेत टाकून बोलते आणि ती जीव देऊन तो जन्म संपवते अशी हृदयद्रावक कहाणी आहे), त्याच्या पुढच्या जन्मी दोघे भारतीय पण ती श्रीमंत आणि तो गरीब असतो, त्यामुळे पैसा आड येतो असे आहे. चौथ्या जन्मात पुन्हा ते दोघे भारतीयच पण त्या जन्मात तिला जेसिका तर त्याला देवेश आवडल्यामुळे अखेर एवढे 'जनम जनम के फेरे' घेऊनही ते अखेर लग्न करत नाहीत ते नाहीतच... असा करुण शेवट असलेला प्लॉट आहे. यात मी बर्‍याच समस्यां आणि सध्याच्या हॉट टॉपिकांना विचारात घेतल्याचे जाणवेलच सर्व्यांना. तर कशी वाटली ही कहाणी लोकहो?

फारएण्ड | 25 September, 2010 - 13:56
जी चार पुनर्जन्मांमध्ये चालू राहील>>> मधुमतीगुंग असे नाव सुचवतो.

फारएण्ड | 25 September, 2010 - 13:57
आणि पाचवा जन्म नाही सांगितलास? चार पुनर्जन्म म्हणजे टोटल पाच झाले ना?

पौर्णिमा | 25 September, 2010 - 14:13
माते, सरावासाठी एक जन्म मला आऊट्सोर्स कर न २५ भागात बसवेन, डोन्ट वरी

साजिरा | 25 September, 2010 - 14:19
मधुमतीगुंग>> पण कादंब्रीस हृद्य प्रतिसाद आल्याशिवाय, शिवाय पहिला प्रतिसाद कोण देणार अशी स्पर्धा लागल्याशिवाय ती हिट होणे शक्य नाही. त्या दृष्टीने आम्ही काही सूचना करू इच्छितो. कादंबरीतले पुनर्जन्म एका बाजूला चालू ठेवायचे. पण त्याच वेळी स्वतःच्याच (म्हणजे लेखिकेच्या) जन्माबद्दल काहीतरी सांगत राहायचे. शिवाय स्वतःच्या (म्हणजे लेखिकेच्या) सवयी, मला (म्हणजे लेखिकेला) कुठची भाजी आवडते, कुठची नेलपेंट मला (म्हणजे लेखिकेला) छान दिसते, कुठची हेअरस्टाईल मला (म्हणजे लेखिकेला) जास्त सुट होते- असे सांगत राहायचे. शिवाय स्त्री-पुरुष संबंध, श्लीलाश्लील, अणुकरार इ. बद्दल स्वतःची (म्हणजे लेखिकेची) मते मांडत राहायची. त्याने जन्मांच्या (लेखिकेच्या नाही, कादंबरीतल्या पात्रांच्या) कथेला आणखीच रंग भरतो. शिवाय मध्येच समकालीन (लेखिकेच्या नाही, पात्रांच्या) पोलिस स्टेशने व बुधवार पेठा, होस्टेलांतली स्कँडले इत्यादी मसाला टाकायचाच. या सार्‍या गोष्टींचा पुनर्जन्माशी संबंध जोडणे आवश्यक आहे. वाचकांच्या पसंतीस (लेखिका व कादंबरी पण) उतरण्यासाठी पण.

मंजूडी | 25 September, 2010 - 14:22
माते

एक जन्म संपला की मी 'आता आमी काय वाचाच्चं' असा टाहो फोडेन, मग तू लगेच दुसरा जन्म घे (लिहायला)

मधुमतीगुंग

श्रद्धा | 25 September, 2010 - 14:24
अगदी अगदी राडा...
मधुमतीगुंग...

आणि पाचवा जन्म नाही सांगितलास? चार पुनर्जन्म म्हणजे टोटल पाच झाले ना?<<<<
फारेंडा, तुम्ही इतक्या बारकाईने माझे लिखाण वाचता, हे पाहून मला भरून आले. मी आपल्या ऋणात राहू इच्छिते. आता बदल केले तरी ते लोकांना लक्षात येतील असे नाहीच (डोळे भरून आले / डोके रिकामे झाले की सर्वकाही दिसेनासे होते)! त्यामुळे बदल नकोच. पाचव्या जन्मात ते पुन्हा जन्माला आले, इतकेच लिहून कादंब्री संपवेन बघा.

डुआय | 25 September, 2010 - 14:28 नवीन
श्र /सा लोकहो ह्या ५व्या जन्मात ग्लोबल सिनारिओ / रिसेशन वगैरेही टाकता येईल... तो भाग मी लिहेन

प्रतिसाद अरभाट | 25 September, 2010 - 14:33 नवीन
तू आधी लि'ही' बरे ट्रिट्रिट्रिवटसाजिरेश्वरस्वामी (सॉरी, ट्रिपलश्री लिहिण्याच्या नादात चुकून झाले, पण वट हा ट्रीच असल्याने तसेच ठेवले आहे.)

प्रतिसाद नीधप | 25 September, 2010 - 14:33 नवीन

राडा, काव्ययुद्ध छेडणे, मीच तो ची सॉलोलॉक्वी हे विसरलात..

साजिरा | 25 September, 2010 - 14:44
तू लगेच दुसरा जन्म घे (लिहायला)>>
वट हा ट्रीच असल्याने>>

वड म्हणला की आज्जा आठवतो. वटवट म्हणल्यावर पण. वटच तसा त्याचा. आमचे डोळे पाणावतात बगा.

श्रमाते, अश रीतीने कादंबरी संपवल्यावर जनमानसावर तुमचेच राज्य. संपायच्या एक पॅराआधी नवीन कादंब्रीची घोषणा करायची. नावासकट. तीत मग तुम्ही फक्त पृथ्वीपुरते मर्यादित राहू नका. जन्म तर बदलतातच, पण त्याचबरोबर ग्रह पण बदलतात. (म्हणजे जन्म घेण्याचा ग्रह बदलतो हो). यात प्रेमी मंगळावर, तर प्रेमिका शुक्रावर असे पण करता येईल. असे कायतरी करा. अशा हृद्यसायफाय कादंब्री असल्यावर न वाचून सांगतो कुणाला आम्ही?

प्रतिसाद फारएण्ड | 25 September, 2010 - 14:49 नवीन
जन्म तर बदलतातच, पण त्याचबरोबर ग्रह पण बदलतात.>>> म्हणजे मागच्या जन्मातील आठवणीवरून एखाद्याबद्दल नायिकेने वाईट मत बनवले तर तिचे मत पूर्वग्रहदूषित आहे असेही म्हणता येइल. (आज एवढ्याच फाको माझ्याकडून. अनलेस अजून जबरी सुचली तर )

साजिरा - तुझी प्रेमी मंगळ व प्रेमिका शुक्र ही कल्पना Men are from Mars, Women are from Venus या पुस्तकातून आधीच सिद्ध झाली आहे. ती बद्लावी लागेल.

आजचा टीपी-
आशू -
वाईट आहे अन अपेक्षित आहे
श्लेष हा अशाने उपेक्षित आहे..

पेढ्यावरी नजरा बुभुक्षित आहेत..
बर्फी कशी डब्यात दुर्लक्षित राहे..

हॉटचिप्स असो वा असो बुधानी
वेफर्सला स्लर्प! प्रतिक्षिप्त आहे!

श्रध्दा -
काल काहीतरी अचानक घडले होते.
आणि रात्रीस भयस्वप्न मला पडले होते.

घातले स्टिलेटो, वाढली उंची पाच इंच
ट्रेन पकडण्या पळताना मी धडपडले होते.

ढवळत राहिली वहिनी रव्यास कालथ्याने
कळले अखेर तिजला लाडू बिघडले होते.

आधी एक, मग चार; खाल्ले ताबडतोब पेढे
आणि मग ज्युमेने वेफर्स पाकीट उघडले होते

तापमानवाढ ही आहे आज मोठीच समस्या
काल आंब्याच्या सावलीत उंट पहुडले होते

प्रलयाची भीती वाटे सगळ्यांनाच सारखी,
गेल्या प्रलयात होडीमध्ये मासेही चढले होते

गझला माझ्या भारी आणि कादंबर्‍याही
'वा, वा' प्रतिसाद द्याया, त्यांचे काय अडले होते?

मी झालेच असते पहिल्या नंबराची लेखिका,
माझ्यावर 'जळणारे' हे लोकच नडले होते.

~दि फकीर

अनीशा -
सल्ले दिले त्यांनी न मागता कुणीही
सात सक्कं त्रेचाळीस अजून अज्ञात आहे..

नाही धरली मी मुळी फ्लॅटची आशा
साहित्य सहवास दूरची बात आहे

आले भानावर प्रतिसादाने मातेच्या
आज साग्रसंगीत बुधवार आहे

साजिरा -
गझल गेली वाहून, प्रतिसाद शिल्लक आहे..
हीच मुळातली, गझलेची शोकांतिका आहे!

प्रतिभेला आजकाल माझ्या हृद्यविकार झाला आहे..
सततच्या साहित्य-सहवासाने मी फ्लॅट झालो आहे!

आशू -
प्रतिसाद हा प्रतिभेचा प्राणवायू आहे
रामास मदतनीस तो जटायू आहे..

लेखन होत नाही; असेच वाचन जंक
करुणकष्टी होई तो पहा दिवाळी अंक!

गझल गेली वाहून, प्रतिसाद शिल्लक आहे..
हीच मुळातली, गझलेची शोकांतिका आहे! >> मी लगोलग कोपर्‍यत जाऊन रडून आलो Lol

गझल गेली वाहून, प्रतिसाद शिल्लक आहे..
हीच मुळातली, गझलेची शोकांतिका आहे!

प्रतिभेला आजकाल माझ्या हृद्यविकार झाला आहे..
सततच्या साहित्य-सहवासाने मी फ्लॅट झालो आहे!
>> Lol

यात प्रतिसादात चक्क विनोदी प्रतिक्रिया नसुन स्वतंत्र लेखन आहे. साजिरा, आशुडी इ. यांना विनंती याचे रुपांतर स्वतंत्र विनोदी लेखनात करावे. चहा सांडला सुध्दा लक्षात राहिले असल्यामुळे हे बीज कुठेतरी रुजवावे.

अरभाटसर आणि पीसी यांची कविता:

जिवणाची बगिया फुललेली | बगियामदे उडनारी तितली |
येऊन जवळ ती बसली | जनू जाल्यांत घावली मासोली ||
कागदावर पेन टेकवता | मज सुचली तुफान येक कविता |
माज्याजवल तितली बसता | मला आन्खी दुसरें काय सुचतां?
'काय वो ल्हिता' ती मला बोल्ली | अन न्हेमीसार्कीच की हसली |
'देसी गर्ल' ती लै झ्याक दिसली | किती येळ शेजारी बसली ||
बोल्लो 'ल्हितोय मी कविता येक' | तू दिसतीया आज लै झ्याक |
माझं कालीज जलून खाक | तू येकडाव 'व्हय' म्हनून टाक ||
व्हट मुडपून हसली ती हळू | म्हने येवडी घाई नगा करू |
आदी ब्यांकेत ब्यालन्स भरू | मंगच आपुन येकत्र फिरू ||
मी बोल्लो 'तसं तर तसं' | माला लागलंया तुजंच पिसं |
डोल्यांना येकच सपान दिसं | आपलं लगीन हुतंय असं ||
तितली तशीच राह्यली वो बसून | थोड्या येळानं गेली उडून |
डोल्यांतलं पानी अलगद पुसून | आन जाताना वलून हसून ||

श्र! कालच वाचली होती.. खूप गोड आहे.. Lol
नितीन, तुमची पोस्ट आत्ता वाचली. विनंती वगैरे नका म्हणू. हा बाफ च त्या कारणासाठी काढला आहे. टीपी सुध्दा कधी कधी भन्नाट होतो आणि तो तात्कालिक पुन्हा पुन्हा वाचताना तितकीच धमाल येते. कुणीही इथे येऊन लिहावे आणि ती मजा शेअर करावी हा उद्देश आहे. वेगवेगळ्या विषयांवर केलेली धमाल एकत्रितपणे वाचायला मिळते. त्यामुळे स्वतंत्र लेखन मध्ये लिहीण्यापेक्षा बहरात साठवण्याची गंमत वेगळीच आहे. Happy

वा! वा!!
सिमाता, मला अगदी भरून आले आहे. मी लॅपटॉपच्या कोपर्‍यावर डोके ठेवून हमसून हमसून रडलो.
मी आणि पीसी..... हाय! तुमच्या आशीर्वादाने तेही होईल अशी खात्री बाळगणारा अरोभोट.

आशूडी | 12 October, 2010 - 13:52
ऐश्वर्याचा आठवावा जोधा अकबर |
ताल जोश हम दिल दे चुके सनम |
धूम २, खाकी, रेनकोट देवदास गुरु|
सल्लू, विवेक, अभि लागले मरु||
ढाई अक्षर, क्यूं हो गया और प्यार, मोहब्बते |
हमारा दिल आपके पास है, हम किसीसे कम नही |
'शब्द' 'शक्ती' व्यर्थ; बोलो नये|
वाटे म्हणावे आ अब लौट चले||
अलबेला, बंटी बबली, रावण सार्‍याईची ही उमराव जान|
म्हणौनी दिल का रिश्ता तोडू नये|
सोनसळीला त्या उगा तोलू नये|
गॉगलला म्हणती आय गियर|
हिच्यामुळे ||

Pages