कांदेपोहे कार्यक्रम, लग्नासाठी मुलांना/मुलींना भेटणे याचे धमाल किस्से

Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2021 - 00:52
meeting for arranged marriage

शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डेंजर काय नाय, हिंदुनी ३ पोरे जन्माला घालावीत असे जे सूचक वक्तव्य आले होते त्याच्या इन्फोर्समेंटचे ट्रेनिंग म्हणता येईल फारतर उत्साही कार्यकर्त्यांनी केलेले थोड्याशा बिदागी पोटी Lol Lol

नाही. हे त्यापेक्षा बरंच जुनं आहे. त्यांचा उद्देश आपल्या पोरी उजवायचा हाच आहे.

बिहारचं सगळंच उफराटं हेच खरं.
अश्रू धूर टेस्ट करायचाय,, वॉटर कॅननमध्ये रेन डान्स.

बापरे! डेंजर आहे किस्सा. हा प्रकार बातम्यांत वाचला होता पूर्वी. पण प्रत्यक्ष असा अनुभव कोणास आलेला पहिल्यांदा वाचला.

पकडव्वा विवाह गँग>>> डेंजर आहे किस्सा.. पण सहजी सुटलात तरी कसे?
असे एका सिनेमात पाहिल्याचे आठवते, रुही की काय होता तो सिनेमा..
सरळ मुलाला पकडून लग्न मंडपात नेतात असे.

चार दिवस घरात बंदिस्त होतो, तितक्या वेळात गौतम आणि त्याच्या भावाने negotiate केले असावे, मी नंतर खोदून विचारले तर म्हणाला आप छोडीये ना भाईसाब कर लिये जो जरुरी था. नंतर गळ घातली तर म्हणाला की समोरच्याला सांगितले ह्याचे (माझे) महाराष्ट्रात प्रचंड पॉलिटिकल कनेक्शन आहेत अन् ह्याच्याशी मस्ती केली तर चांगला चालू धंदा बंद पडेल त्यामुळे तुम्ही (काकांनी) स्थानिक बँक कारकून अन् शाळा मास्तर वरांवर फोकस करावे मला सोडून. हे ऐकून मला घाम फुटला होता, माझा राजकारणाशी संबंध म्हणजे नगरसेवक, आमदार, खासदार निवडणुकीत जे उमेदवार येऊन उगाच मिठ्ठास हसत काय मग दादा काय म्हणते नोकरी धंदा आजकाल काय सुरू आहे काही लागले तर सांगा म्हणतात तितकाच आलेला आहे. Lol Lol

खतरनाक किस्सा आहे जेम्स वांड..!

शिक्षण पूर्ण झाल्यावर एका कंपनीतून नवऱ्याला बिहारच्या गया साइटला पोस्टिंग मिळाली होती. काही महिने ती नोकरी त्याने केली. तिथे असतानाच मध्ये येऊन त्याने सेंट्रल गर्व्हनमेंटच्या नोकरीची परीक्षा दिली होती. परिक्षेचा निकाल आला आणि मुलाखतीसाठी बोलावलं गेलं. तिथला त्याचा बॉस सुट्टी द्यायला अजिबात तयार नसायचा. शेवटी आईचं ऑपरेशन आहे असं सांगून मुलाखतीसाठी महाराष्ट्रात परतला. तिथे नंतर रितसर राजीनामा दिला.

पहिल्यांदा बिहारला गेला तेव्हा रात्री दोन वाजता गया स्टेशनला उतरलेला.. त्याच्या सहकाऱ्यांनी तेव्हाच त्याला सावध केलेलं हे बिहार आहे महाराष्ट्र नाही.

संध्याकाळी ७ वाजताच सगळीकडे सामसूम आणि चिडीचूप शांतता असायची असं तो म्हणतो..

बरं झालं इथे परत आला, नाहीतर काय माहित बिहारचा जावई बनवून टाकला असता पकडव्वा गँगने..!

२०१० साली ' भाग्यविधाता' नावाची हिंदी सिरीयल आली होती.. colours टिव्हीवर.. हाच विषय होता.. सामाजिक विषयावरची ती सिरीयल मी रेग्युलर पाहायची काही महिने.. आवडायची मला..!

बाप रे, म्हणजे तुम्ही कांदेपोहे कार्यक्रमाला गेला होतात फक्त तेवढ्यापुरता नव्हे तर नंतरही ते सिरियसली विचार करत होते!
खरंच बाल बाल बचावलात.

Submitted by जेम्स वांड on 2 September, 2026 - 08:30>>>जेम्स हे खरे आहे, माझ्या आधीच्या कंपनी मधला एक मुलगा बिहारी आणि माझा खास दोस्त होता. त्याचे वडील डॉक्टर (होमिओपॅथी), मामा आयआरएस(इनकम टॅक्स ) आणि एक काका वाळूचा ठेकेदार...तो मला बोललेला की तुम बिहार जाओगे तोह तुम्हे वहां के लोग शादी कराके ही भेजेंगे, मै भी बचा नहीं पाउँगा अगर किसी के नजर में आ गए तोह...त्याच्याकडे पण असे खुप सारे किस्से होते, त्यांच्या तिथे अशा खास गुंडटोळ्या असतात जे पैश्यांच्या मोबदल्यात अश्या लग्नानंतर पळून गेलेल्या नवऱ्या मुलांना कुठूनही हुड़कुन परत आणून देतात.

आमच्या एम बी बी एस च्या वर्गात सात बिहारी होते. त्या पैकी दोन तीन बिहारी भूमिहार होते ज्यांच्याकडे भरपूर जमीन होती.

मुळात डॉक्टर होतोय म्हटल्यावर भाव वधारलेलेच होते.

सुटीवर जाताना ते पुण्याहून मुंबईला येऊन कलकत्ता मेलने किंवा पटना एक्स्प्रेसने बिहारला जायचे.

त्यांचे भाऊबंद त्यांना मुगलसराय येथे व्यवस्थित बंदूक बिंदुक घेऊन"न्यायला" यायचे. नाहीतर "उठ्वा दिये जाओगे" ची भीती असायची.

थर्ड एम बी बी एस होईस्तोवर बहुसंख्य मुलांची लग्ने ठरलेली होती आणि इंटर्नशिप होताच लग्नें झाली सुद्धा.

हे बिहारचे किस्से खतरनाकच आहेत! कधी काही कामानिमित्त बिहारमध्ये जावे लागले तर कोणी विचारले तर 'माझे लग्न झाले आहे' असे सांगणेच उत्तम राहील! वाटल्यास अनामिकेत एखादी छानशी सोन्याची अंगठी पण घालायची!!!

Pages