Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2021 - 00:52

शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.
खरतर कांदेपोहे करून मुलगी
खरतर कांदेपोहे करून मुलगी मुलगा पसंत करणे, ही किती चुकीची पद्धत आहे, आज च्या जमान्यात तरी. खरा स्वभाव, एकमेकांशी किती पटते, तत्वे, भविष्यातील स्वप्ने हे समजायला माझ्यामते ३ ते ६ महिने नक्की लागतात.
माझ्या किती मैत्रिणी मन मोकळे करताना सांगतात कि त्यांना साखरपुडा होऊन लग्नाच्या आधीच समजून चुकले होते की पुर्ण मने जुळत नाहीत, पण २०-२५ वर्षांपूर्वी साखरपुडा होऊन लग्न मोडणे ही अत्यंत नामुष्की होती, मुलींसाठी , त्यांच्या आई बाबांसाठी, धाकटी भावंडे असतील तर जास्तच.
बरीच लग्न अशीच होतात, नवरा बायको दोघेही जुळवून घेतात, आता मुले बाळे झाली असतात , त्यांच्यासाठी लग्न जगतात. हे सर्व किस्से धमाल आहेत, आणि जुन्या काळात जेव्हा कुटुंबे एकत्र राहत होती त्यावेळी मामा, काका, आत्या ह्यांची पण पसंती गरजेची होती, आता हे सर्व बदलले पाहिजे.
माझा कापोचा कार्येक्रम माझ्या
माझा कापोचा कार्येक्रम माझ्या नवर्याच्या घरी झाला, तो जिथे बसला होता तिथेच एक नामांकित मराठी लेखकाची कादंबरी ठेवली होती. नवऱ्याने अशी परफेक्ट प्लेसमेंट केली होती, मी नंतर सहाजिकच विचारले की वाचायला आवडते का? तो लागलीच हो म्हणाला. मला माझा भावी नवरा प्रचंड आवडला होता आणि त्यात वाचनाची आवड म्हणजे सोन्याहून पिवळे.
लग्नाला २२ वर्षे झाली, मी नवऱ्याला एकही पुस्तक कधीही वाचताना बघितले नाहीये. कापोच्या वेळी मित्राकडून पुस्तक उसने आणले होते नंतर समजले, सगळ्या मुली वाचन आवडते का असे विचारतात म्हणून. अजूनही आमचे जरा भांडण झाले की मी त्याला मजेत सांगते, कापो मध्ये फसवले आहेस मला.
एक दोन किस्से वाचताना मी कधी
एक दोन किस्से वाचताना मी कधी लिहीले हे अस्सं झालं
चुलत बहीणीच्या मैत्रिणीच्या घरी पहायला येणार होते. बहुतेक आधीही बरेच जण येऊन गेले होते.
पाहुणे येऊन बसले. मग मुलगा चांगला असल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले.
त्या मैत्रिणीच्या लहान भावाला घरच्यांनी आईसक्रीम आणायला पिटाळले आणि येताना हळूच आणून दे असेही बजावले.
तो आला तोच "आई आईसक्रीम आणलंय गं, लवकर घे वितळायला लागलं " अशी बोंबाबोंब करतच.
तर मुलाकडचे कुणी तरी म्हणाले " कशाला घ्यायचा त्रास इतका ? इतक्या उन्हात पाठवलंय बाळाला "
मैत्रीणीची आई उत्तरली " आम्ही आणतोच कुणी आलं गेलं की, त्यात काय "
"अहो मग सकाळीच आणून फ्रीज मधे ठेवायचं "
हे असं चाललंच होतं तर हा धाकटा भाऊ मधेच म्हणाला,
" मी म्हणालो होतो सकाळीच कि आणू का तर आई म्हणाली कि मुलगा चांगला असेल तर आणू, उगीच कशाला वाया घालवायचं "
रान्भुली
रान्भुली
रानभुली
रानभुली
रानभूली हा या धाग्याचा
रानभूली हा आईस्क्रीम किस्सा या धाग्याचा परमोच्च बिंदू आहे असे जाहीर करते.
(No subject)
(No subject)
(No subject)
अंगात येणाऱ्या बाईंना मी
अंगात येणाऱ्या बाईंना मी प्रथम पारितोषिक दिले आहे. आईस्क्रिमवाल्या पोराला दुसरे तर चड्डीचा ब्रँड विचारणाऱ्या ताईंना तिसरे
फार मजेशीर किस्से आहेत
फार मजेशीर किस्से आहेत
आमच्या ओळखीत एक काकू आहेत, त्यांना नावांमध्ये गल्लत करायची सवय आहे. त्यांच्या मुलीसाठी स्थळ आलं त्या मुलाचं नाव श्रीपाद. यांनी नेहमीच्या सवयीनं गडबड केली आणि त्याला वल्लभ म्हणून अॅड्रेस करत होत्या. लग्न ठरल्यावर सुद्धा त्या सविच्या नवर्याचं नाव वल्लभ आहे असंच सांगत. सुदैवानं दिगंबर म्हणाल्या नाहीत, लग्न ठरलंच नसतं. बरं त्यांना कुणी आठवण करून दिली तर 'हा तेच गं, सगळी देवाची नावं' असं काही तरी म्हणत.
बरोबर.. श्रीपाद नावाचा आमचा
बरोबर.. श्रीपाद नावाचा आमचा मित्र होता कॉलेजला. त्याला कुणी नाव विचारलं तर तो श्रीपत सांगायचा चिडवू नये म्हणून.
अंगात येणाऱ्या बाईंना मी
अंगात येणाऱ्या बाईंना मी प्रथम पारितोषिक दिले आहे.
>>> हे मिसलं माझं..
खरंतर असा पायंडाच पाडला
खरंतर असा पायंडाच पाडला पाहिजे.
आईसक्रीम आलं म्हणजे मुलगा पास.
बडीशेप आली तर त्याचा अर्थ- 'आता फुटा'
व्हर्बली नकार देण्यातला ऑकवर्डनेस कमी होईल
वीसेक वर्षापूर्वीची गोष्ट.
वीसेक वर्षापूर्वीची गोष्ट.
माझ्या एका नवीनच लग्न झालेल्या वहिनीचे आईबाबा बडोद्याहून वहिनीच्या लहान बहीणीला घेऊन पुण्यात मुलगा दाखवण्यासाठी वहिनीकडे घेऊन आले. दोनचार दिवसात एक दोन स्थळे बघून दोनेक ठिकाणी नावनोंदणी करून काही मनासारखी पसंती न झाल्याने आधीच केलेल्या रिझर्वेशनप्रमाणे वहिनीचे आईबाबा आणि बहीण सकाळी पुन्हा बडोद्याच्या ट्रेनमध्ये बसणार होते.
एका अतिशय ऊत्साही मध्यस्थांना जे डेली पुणे-मुंबई अपडाऊन करत कुठूनतरी ह्या नवीन स्थळाबद्दलची माहिती मिळाली आणि त्यांनी रात्री वहीनीच्या घरी फोन केला. तेव्हा त्यांना स्थळ सकाळीच पुन्हा बडोद्याला जाणार आहे ही बातमी कळाली.
तर ह्या मध्यस्थ महाशयांनी लग्नाळू मुलाला आणि मुलाच्या वडिलांना थेट सकाळीच स्टेशनला बोलावून घेऊन, बडोद्याच्या पार्टीची बोगी हुडकून काढून, परस्पर पँट्रीतून पोह्याची ऑर्डर देऊन डब्यातच कांद्यापोह्याचा अभूतपूर्व कार्यक्रम घडवून आणला. बडोद्याचा पार्टीसाठी हे अचानक सगळे घडलेले फार धक्कादायक होते. मुला-मुलींला दाराजवळच्या बेचक्यात ऊभे करून गच्ची/गार्डन्/व्हरांडा टॉक पण घडवून आणला महाशयांनी
मध्यस्थांचा परसिवरन्स एवढा जबरदस्त की काही आठवड्यांनी दोन्ही बाजुंनी पसंती झाल्याचे फोन सुद्धा गेले एकमेकांना.
सगळेच
सगळेच
जिद्दु 
अनु, थँक्यु थँक्यु
ए३० काऊ - भारी आयडिया आहे.
हाब - हे अगदी शाखाच्या सिनेमासारखं झालं किंवा गुलजारच्या. भारीच पण एकदम.
शेवट गोड तर सगळंच गोड.
आईस्क्रिमचा किस्सा हा उच्च
आईस्क्रिमचा किस्सा हा उच्च आहे आणी हाबचा" एकदा ठरवल म्हणजे ठरवल " कॅटेगरी ,जबरदस्त!
माझ्या भावाच्या लग्नासाठी
माझ्या भावाच्या लग्नासाठी बघाबघी सुरु झाली तेव्हा माझी दहावीची सुट्टी सुरू होती. एकदा संध्याकाळी एक काकू त्यांच्या मुलीसंबंधी आईला भेटायला आल्या होत्या. त्या बहुतेक रिक्षाने आलेल्या, त्यामुळे मी खेळून घरी येताना घराबाहेर टूव्हिलर वगैरे दिसली नाही आणि मला कोणी घरी आलं आहे हे समजलं नाही. मी बुट काढता काढता बाहेरूनच आईला मोठ्याने "प्र चं ड भूक लागली आहे... लगेच काहितरी खायला दे!! " असं मोठ्याने सांगितलं. मग आत गेल्यावर कोण आलं आहे ते कळलं. त्या काकू कोणत्यातरी शाळेत प्रिन्सीपल होत्या. मग त्यांनी माझी एकदम शा.मा. स्टाईल चौकशी केली. दहावीचे पेपर कसे गेले, पुढे काय करणार, सध्या सुट्टीत काही करतोयस की नाही. सध्या अभ्यास नाही तर बाकी काही शिकत रहावं वगैरे वगैरे. मला कुठल्याही परिक्षेबद्दल "तुझा काय अंदाज ? किती मार्क मिळतील ?" असं विचारलं की फार वैतगा यायचा. आणि ते ही त्यांनी विचारलं. मी पण त्यांना "मला अंदाज बिंदाज कोणाला सांगायला आवडत नाही.. नंतर पोपट झाला तर काय करणार !" असं बाणेदारपणे सांगितलं. त्या माझ्या भावाच्या फोटोची आणि पत्रिकेची हार्ड कॉपी घेऊन गेल्या. त्यांना पत्रिका कोणा ओळखीच्यांना दाखवायची होती वाटतं. पुढे काही जमलं नाही. मग त्यांनी आमच्या घराजवळ रहाणार्या त्यांच्या शाळेतल्या एका मुलाबरोबर फोटो, पत्रिका आणि माझ्यासाठी त्याकाळी मिळणारी सगळ्यात मोठी कॅडबरी पाठवली ! नंतर आई मला चिडवत होती.. बघ त्यांच्या समोर इतकं भूक भूक केलसं त्यामुळे त्यांना वाटलं असेल हा किती खादाड आहे म्हणून इतकी मोठी कॅडबरी पाठवलीये..
And the best kanpo project
And the best kanpo project management award goes to....
>> डब्यातच कांद्यापोह्याचा अभूतपूर्व कार्यक्रम घडवून आणला
हाब, सिंडरेला
हाब, सिंडरेला
पारितोषिके जाहीर करताना पाळणाघरात सर्वप्रथम संडासात शी करायला शिकणाऱ्या मुलाच्या आईला विसरू नका लोकहो!
He should be in << Disaster >
He should be in << Disaster >> management.
धमाल किस्से आहेत.
धमाल किस्से आहेत.
पारितोषिके जाहीर करताना
पारितोषिके जाहीर करताना पाळणाघरात सर्वप्रथम संडासात शी करायला शिकणाऱ्या मुलाच्या आईला विसरू नका लोकहो!>>>>>
महान किस्सा आहे तो... तो मुलगा किती ओशाळला असेल 
रानभुली आईस्क्रीम किस्सा एक
रानभुली आईस्क्रीम किस्सा एक नंबर
आणि डब्यातच कांद्यापोह्याचा अभूतपूर्व कार्यक्रम पण 

बाकीचे सगळे किस्से पण
डब्यातच कांद्यापोह्याचा
डब्यातच कांद्यापोह्याचा अभूतपूर्व कार्यक्रम>>>
काय एकसे एक किस्से आहेत
अजून एक आठवला...
अजून एक आठवला...
एका ऑफिसमधल्या मैत्रीणीला बघायला एक अमेरिका निवासी मुलगा येऊन गेला. मुलाचे घराणे अपर मिडलक्लास तर मुलीचे कुटुंब साधेसे मिडलक्लासच पण मुलगी दिसायला सुंदर आणि विशेष म्हणजे आयआयटीयन होती, आमच्या कंपनीत कँपसमधून नुकताच मिळालेला चांगला जॉब सुद्धा होता. तिच्या आईला नुकताच कॅन्सर डिटेक्ट झाल्याने आईची तब्ब्येत चांगली आहे तोवरच करून घेऊ असा त्यांचा एकंदर विचार होता. दोनचार महिन्यातच करायचे असे काही प्रेशर वगैरे नव्हते पण बघण्याची प्रोसेस सुरू केली होती.
तर अमेरिकानिवासी मुलगा आणि आईवडील येऊन मुलीला बघून गेले. गच्चीवरच्या बोलण्यातून मुलाला मुलगी खूप आवडली आणि तिलाही मुलगा आवडला. पण मुलीच्या पालकांचा, मुलाच्या आईबाबांशी बोललल्यानंतर एकंदर असे धानात आलेकी आपली सांपत्तिक परिस्थिती बघून आणि मुलीच्या आईला कॅन्सर आहे ऐकून (जे त्यांनी प्रामाणिकपणे सांगून टाकले होते) मुलाच्या आईवडिलांचा हिरमोड झाला आहे.
ईथवर ठीक होते..पण हे प्रकरण विनोदी पुढे झाले.
आठवड्याभराने फोन करून मुलाचे बाबा म्हणाले, हो हो आम्हा नवराबायकोची पूर्ण पसंती आहे पण मुलगा अजून काही नीट बोलला नाही तर तुम्ही ५०% होकारच समजा.
पुढच्या आठवड्यात त्यांचाच फोन आला, मुलगा आता अमेरिकेला परत गेला, तो थेट काही बोलला नाही पण त्याचे बोलणे पॉझिटिव वाटले, कसे आहे आजकालच्या मुलांना थेट विचारलेले काही आवडत नाही त्यामुळे त्यांच्या कलाने घ्यावे लागते...तर तुम्ही ६०% होकार समजा.
( ईकडे मुला, मुलीचा ईमेलवर (तेव्हा स्मार्ट फोन नव्ह्ते) जनरल बोलणे चालू होते. )
पुढच्या आठवड्यात पुन्हा मुलाच्या बाबांचा स्वतःहुन फोन आला आणि मुलाने अजून पॉझिटिव हिंट दिल्या आता तुम्ही ७५% झालेच म्हणून समजा असे त्यांनी सांगितले.
अजून आठवड्याभराने ही गाडी आधी ८०% आणि मग पुढे ९०% वर गेली.
शेवटी पालकांनी मुलाला समाहाऊ कन्विन्स करण्यात यश मिळवले की अजून दुसरी त्यांच्या स्टॅटसची मुलगी मिळाली काय माहिती... ९०% वरून गाडी ९५% मग ९९% आणि १००% वर जाण्या आधीच डीरेल झाली.
दर सोमवारी सकाळी मिळणारा हा विकली प्रोग्रेस रिपोर्ट आमच्या ग्रूपमध्ये लंच अवर मधला हक्काचा विनोदी विषय झालेला.
विकली प्रोग्रेस रिपोर्ट >>>
विकली प्रोग्रेस रिपोर्ट >>>
पसंतीची टक्केवारी कसली डोंबलाची!
अमेरीकेतुन सुट्टीवर आलेला
अमेरीकेतुन सुट्टीवर आलेला मुलगा, १०-२० स्थळं बघत असतो.
आमच्या आईच्या ऑफीस मधल्या स्त्री कलीगच्या मुलाने हेच केलं होतं.
स्थळं जी श्रीमंत आहेत, मुली शिकलेल्या आहेत त्यनुसार बघायचा क्रम लावलेला. बाई मोठेपणा सांगत लेंच टाईमला बसताना.
एक स्थळ असं होतं जे मालदार होतं पण मुलगी दिसायला अगदीच सुमार होती( अगदी त्या कलीगच्याच भाषेत) तिला बाजूला काढून इतर मुली बघत होते की अजुन काही चांगलं स्थळ मिळतय काय.
आणि ह्या बाईसाहेब( ऑफीसची कलीग) ऑफ्फीसमधून फोन करून , मालदार मुलीच्या बापाला सांगत, अमेरीकेहून आल्यापासून माझ्या मुलाचं पोट खराब झालय, आम्ही काही त्याची पसंती विचारून त्रास देत नाहि आहोत. त्याला बरं वाटलं कि विचारु.
जवळपास सर्व मुली बघून काहीच मालदार( लग्नाचा स्॑र्व खर्च करणारी पार्टी, घर वगैरे देणारी) नाही मिळाली तसे हिच्याशीच ठरवले.
त्या मुलीलाही, अमेरीकेतलाच मुलगा हवा होता. तिच्या बापाने, मुंबईत घर, लग्नाचा खर्च, हनिमून ट्रिप असं केले असा सर्वांना ऑफीसमध्ये सांगत होत्या.
मुलाच्या लग्नानंतर, आई-वडील, मुलाच्या घरी अमेरीकेला गेल्यावर, तिने त्यांना पळवून लावले. मग अगदी, आमचा निर्णय चुकलाच म्हणून रडत होत्या.
वीकली प्रोग्रेस रिपोर्ट :
वीकली प्रोग्रेस रिपोर्ट : हाहाहाहहा
त्यावरून एक माझा च किस्सा आठवला ... एक अत्यंत जवळचे काका जे मध्यस्थी होते ज्यांनी एका मुलाचं स्थळ आणलेलं... मुलाच्या आई वडिलांच्या कंडिशन्स अश्या होत्या कि
१. मुलीला कळता कामा नये कि पाहायला आलो आहोत
२. आधी फक्त वडील च घरी येणार आणि मुलीला भेटणार .
३. वडिलांना छान वाटलं तर मग आई येणार . आणि दोघांना पसंत असेल आणि पत्रिका जुळत असेल तर मुलगा येणार .
४. वडिलांनी विचारलेले प्रश्न: इंजिनीरिंग झालं ते ठीक आहे पण कॉलेज कुठलं? (नामांकित कॉलेज च असलं पाहिजे ) नोकरी कुठे ? किती पगार ? आमचा मुलगा परदेशी पण जाऊ शकतो त्यामुळे थोडं मॉडर्न असायची पण तयारी हवी ( जे मला काही कळलं नाही काय असतं)
५. आई ने विचारलेले प्रश्न : स्वयंपाक येतो का .. इंडियन कि कॉंटिनेंटल ....मुलीला दोन्ही बनवता आलं पाहिजे आणि तसाच राहता हि आलं पाहिजे ..वगैरे वगैरे ....
आम्ही तर या स्थळाला सिरिअसली च नव्हतं घेतलं ..आणि वीकली प्रोग्रेस रिपोर्ट प्रमाणेच त्यांची उत्तरे आली आणि नंतर नाही म्हणून सांगितलं .कारण अजून एका स्थळाशी त्यांचं जमलं होतं पण नंतर ते फिस्कटलं आणि पुन्हा मध्यस्थी काका न कडे माझी चौकशी करायला लागले .(पुन्हा भेटूया वैगेरे )
मध्यस्थीने सांगून टाकलं कि तिचं लग्न आहे आता पुढच्या महिन्यात आणि आता अमेरिकेत सेटल होतीये
आणि काही महिन्यांनी कळालं कि त्या मुलाने शेवटी पळून जाऊन लग्न केलं ... हहा हा
Pages