Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2021 - 00:52

शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा

शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.
"तुम्ही जोडकार्ड पाठवले नाहीत
"तुम्ही जोडकार्ड पाठवले नाहीत" >>>
हे खतरनाक आहे.
पुलंच्या भाषेत "एरव्ही कुत्र्याला हाड् म्हणायची हिंमत नसलेली" सामान्य माणसे एखाद्या प्रसंगात जेव्हा त्यांना तात्पुरते का होईना उच्चासन मिळते, मानाचे स्थान मिळते तेव्हा इतरांना काय तुच्छपणे वागवतात याची उदाहरणे लग्नाच्या कार्यक्रमांत अनेकदा सापडतात. पूर्वी "मुलाकडचे" यात जास्त होते. आता बहुधा चित्र उलटे आहे
आमच्या विद्यापीठाच्या डिपार्टमेण्ट मधे एक स्टाफ मधला माणूस एरव्ही "मऊ मेणाहुनी" व्यक्तिमत्त्व असलेला. एकदम फ्रेण्डली. त्याच्याकडे बहुधा स्टोअररूम सारखी काहीतरी एक एक्स्ट्रा जबाबदारी असे. सर्व विद्यार्थ्यांना वर्षाच्या शेवटी एकदा त्याची सही लागे - काहीतरी स्टोअरमधून घेतलेले तुमच्याकडे काही बाकी नाही असा क्लिअरन्स देणारी.. एरव्ही सहज भेटणारा, गप्पा मारणारा तो त्या दिवशी जरा वेगळ्या रूबाबात असे. काहींना पटकन सही न देता "२ वाजता या" वगैरे करत असे
"नारायण" मधला "जरा तुमची माणसे मोजता का म्हणजे पाने मांडायला सोयीचे पडेल" या प्रश्नाला केवळ मुलाच्या बाजूने आहे म्हणून "मी इथे मोजणी कारकून म्हणून नाही आलो" म्हणणारा मुलाचा काका या जोडकार्ड वाल्या आजोंबासारखाच
वाह फा! एकदम चपखल उदाहरणं
वाह फा! एकदम चपखल उदाहरणं आठवली आहेत तुला
जोडकार्ड किस्सा
जोडकार्ड किस्सा
कमीत कमी शब्दात.>>>>>>>> किमान शब्दात कमाल अपमान
पुणेकर रॉक्स! ठाणेकर शॉक्स
पुणेकर रॉक्स! ठाणेकर शॉक्स
नाही .मार्केट मध्ये गेलो होतो
नाही .मार्केट मध्ये गेलो होतो.त्या चाचूजवळ कपडेच नव्हते. >> पुलं ज्याला 'ठप्पभंगिका योग' म्हणतात तोच हा. 'आमचे बाबा बाथरूमला नाही काही गेलेत, आत बसून चहा पितायत' - हेच आठवलं तो किस्सा वाचून.
कहर
कहर
जोडकार्डचा किस्सा इतक्या
जोडकार्डचा किस्सा इतक्या जणांना 'विनोदी' वाटला हा माझ्यासाठी या धाग्यावरचा सर्वात विनोदी किस्सा आहे

मी विसाच्या कारणाने महिनाभर
मी विसाच्या कारणाने महिनाभर मुंबईला एका ऑफिसात कामाला होतो. त्यापूर्वी मी अमेरिकेत दोन वर्ष राहीलो होतो. एक दिवस मुंबईच्या ऑफिसमधल्या एका मराठी साहेबाने मला त्याच्या केबीन मधे बोलावले. मी गेलो तर तिथे एक धोतर / पैरण घातलेले एक गॄहस्थ बसलेले होते, गप्पा चालल्या होत्या. मी गेलो तर साहेबाने माझी जुजबी ओळख करून दिली. हा अमेरिकेत होता, आता जर्मनीला जाणार आहे, आणि हे (धोतरातले गृहस्थ अमुक तमुक वगैरे झालं).. बाकी ते दोघे एकामेकांशीच बोलत बसले. मी तीन / चार मिनिटे वाट पाहीली आणि 'मला काम आहे' असं सांगून बाहेर पडलो. नंतर ८/१० दिवसानी मी जर्मनीला गेलो. अजून चार एक महिन्यानी साहेबाचा फोन आला...
'वालावलकरांची मुलगी होमियोपाथिक डॉक्टर' आहे, प्ण तिला मुंबईत राहणारा नवराच हवाय,'.
मला मुद्दलात वालावलकर कोण, त्यांची मुलगी कोण हे माहीत नसल्यामुळे ह्या माहितीचे काय करावे तेच समजेना. मी विचारलं तेव्हा कळलं, की ते धोतरातले गृहस्थ वालावलकर होते, आणि ते मला बघायला आले होते, आणि मी सोडून साहेब आणि धोतरवाल्याना माहीत होते.
मी म्हटलं, 'मुलगी कोण, करते काय? असते कुठे ? हेच माहीत नाही तर मी माहीतीचे काय करू?' आणि फोन ठेवला.
...
पण या कारणाने माझे नाव कुठल्यातरी लिस्टात गेले (ही लिस्ट मुंबईमधे ज्ञातीबांधवात फिरली असावी).. मी वर्षभरानी भारतात परत आलो तर माझ्या मुंबईत राहणार्या काकांकडे गेलो. ते म्हणाले,
'परवा एका मुलीचे आईवडील भेटायला आले होते.' मुळात माझ्या काकाना मी वर्षातून एकाद्याच वेळी भेटायचो, तेव्हा त्याना कोण कशाला भेटायला आहे कोण जाणे.
'त्यानी सांगितले की मुलगी सिप्ला मधे काम करते'...
मी म्हणालो 'ठिक आहे',
परत मला मुलगी माहीत नाही तर यापुढे त्यावर बोलणार काय?
'ते म्हणाले, की होणारी मुले आजी आजोबानी संभाळावीत',.
'कुठली मुले? कोणाची मुले?'
त्यावर काका म्हणाले, ' तुला आणि सिप्लातल्या त्या मुलीला होणारी मुले , तुझ्या आईवडिलांनी संभाळावीत, अशी त्यांची अपेक्षा आहे'
मी काकाना म्हणालो, 'काका, निदान ही तूरी बाजारात असती तर.... '
धमाल किस्सा, देसायानु!
खरच मजेशिर किस्से, दुसरा कहर
खरच मजेशिर किस्से, दुसरा कहर आहे.
परदेसाई भारीच अनुभव.
परदेसाई भारीच अनुभव. धमाल एकदम.
आधीचे बाकी किस्सेही कहर.
कहर
कहर
आमच्या ओळखीत एका मुलीने
आमच्या ओळखीत एका मुलीने (प्रिया) स्वतःचे लग्न स्वतःच ठरवले होते. पण घरी सांगितले नव्हत, तिला आवडणारा मुलगा तिच्यापेक्षा वयाने लहान आणि शेवटच्या वर्षाला शिकत होता. प्रियाचे वडील मुलाच्या वर्गाची इंजिनियरींगची तोंडी परीक्षा घेणार होते (तसे महाविद्यालयाने जाहीर केले होते). त्यामुळे तोही एक धोका होताच.
आईवडीलानी प्रियाच्या लग्नाची घाई लावली होती. तेव्हा थोड्या थोड्या दिवसानी कांदेपोहे चालू होते. त्यावेळी सेल फोन नसले तरी बर्याच लोकांकडे घरी फोन असत (Landline). आणि कांदेपोहे होऊन मंडळी परत गेली, की मुलगा/मुलगी STD booth वरून मुलाला फोन करून, 'आमचे आधीच ठरले आहे, तेव्हा तुम्ही नकार कळवा .. ' असा फोन करायचे. तेव्हा आलेला Unknown Phone Num उचलायची प्रथा होती.
असाच एक कार्यक्रम झाला. मुलगा प्रियाला पाहून घरी गेला. दुसर्या दिवशी फोन आला, 'तुम्ही नकार कळवा, आमचे ठरले आहे' ...
आठ दिवस झाले तरी प्रियाच्या आईवडीलांना फोन आलाच नाही. तेव्हा ते 'आज उद्या आपणच फोन करू' म्हणून तयारी करू लागले.
प्रियाने परत त्या मुलाला फोन केला. 'मी प्रिया. मी तुम्हाला नकार कळवायला सांगितला होता, तुम्ही का कळवला नाही?'
मुलगा म्हणाला, 'मी प्रिया नावाच्या मुलीला केव्हाच नकार कळवला, तुम्ही पार्ल्याहून बोलतायना?'
'मी? पार्ल्याला नाही, ठाण्याला रहाते.'
'अरे देवा, मी त्या आठवड्यात दोन मुली पाहिल्या, दोघींचे नाव प्रिया होते, मी पार्ल्याच्या मुलीला नकार देऊन मोकळा झालो....'
धमाल किस्से , परदेसाई
धमाल किस्से , परदेसाई
>> पार्ल्याच्या मुलीला नकार
>> पार्ल्याच्या मुलीला नकार
पार्ले गेले ठाणेही गेले. कल्याण!
अतुल
अतुल
पार्ले गेले ठाणेही गेले.
पार्ले गेले ठाणेही गेले. कल्याण! >> जबरी कोटी!
अतुल, अतुलनीय कोटी….
अतुल, अतुलनीय कोटी….
Great discussion! For Vastu
Great discussion! For Vastu Shanti return gifts, natural wellness products can also be a thoughtful option. Essential oils, floral waters, or small aromatherapy gift sets are practical and appreciated by families. We recently explored some natural gifting ideas at AG Organica that may be useful for such occasions. Check out our website: https://www.pureoilsindia.com/
अरे हे लिहायचे राहिले. मुलगी
अरे हे लिहायचे राहिले. मुलगी सुचवण्यासाठी आलेल्या एका मध्यस्थाने मुलगी, तिच्या घरचे अशी थोडीफार माहीती माझ्या मित्राला दिली आणि एकदम म्हणाला (तो मुलीचा मामा होता) ,
'आमची मुलगी एकदम उफाड्याची आहे, तुम्हाला खूप आवडेल,' .....
मित्राच्या घरच्यानी त्या इसमाला कसेबसे बाहेर काढले पण हा किस्सा त्यानंतर बरेच दिवस त्यांच्या घरात चर्चेला होता.
आवरा!
आवरा!
>>>>>आवरा! अगदी अगदी.
>>>>>आवरा!
अगदी अगदी.
तरुणपणी एकेकाळी मी एका
तरुणपणी एकेकाळी मी एका विद्युत पारेषण लायनीची कंत्राटे घेणाऱ्या कंपनी मध्ये फील्ड इंजिनियर म्हणून नोकरी करत असताना एकदा एका प्रकल्पावर बिहार मध्ये काम करत होतो (अंदाजे १५ वर्षे अगोदर)
त्यावेळी माझ्यासोबत माझा एक मुळात बिहारीच असणारा गौतम नावाचा सहकारी होता, आम्ही दोघे समवयस्क आणि माझी नवनवीन अनुभवांची ईच्छा दांडगी त्यातही फूड एक्स्पेरिएम्न्ट करण्याचा सोस मिळून गौतम सोबत गट्टी जमली कारण तो माझा लोकल गाईड असे.
तर एकदा आमचे गौतमभाई म्हणाले चहा नाष्टा मिळेल एका जागी चलतो का ? म्हणले कुठे ? तर म्हणाला थोरल्या भावाला पोरगी बघायला जायचे आहे पलिकडच्या गावात. म्हणले चल.
पोरीच्या घरी गेलो ते टिपिकल क्रोशाचे टेबल टॉप, स्टूल वर टाकून समोसा (सिंगाडा) रसगुल्ले फरसाण असा ऐवज ठेवलेला. मी तिकडे कॉन्सट्रेट करणार तोवर प्रश्नांची फय्यर आमच्याकडे वळली.
मराठी हो ?
जी हां
कौन जात के ठाकुर हो ?
वो मराठा समाज का हूं
हां वो तो बुझे (समझे) पर जात कौनसी ?
मराठा
अशी दिव्य सुरुवात त्या मुलीच्या काकाने केली अन् अशी दिव्य उत्तरे आम्ही दिली. नंतर गाडी हळूच वळली घरी कोण कोण आहे, पगार किती आहे, मुलगी (काकांची पुतणी) बघायला आलेला मुलगा माझा मित्र का त्याचा छोटा भाऊ, खायला काय आवडते इत्यादी इत्यादी.
शेजारी बसलेला गौतम घामाघूम झाला होता, कसाबसा प्रोग्राम संपवून बाहेर पडलो ते गौतमने फुल स्पीड मधे आरमाडा गाडी नेली होती ती गावाबाहेर काढली अन् घरी आला. बोलला काहीच नाही नंतर मला म्हणाला तुझी तब्येत बरी वाटत नाहीये तू घरीच थांब चार पाच दिवस साईट वर जाऊ नको. मी म्हणलो असे काही नाही तर म्हणाला ऐक. म्हणले बरं बाबा.
चार पाच दिवसांनी गडी आला ते डायरेक्ट तळलेले चिकन अन् मॅक-डॉवेल्सची बाटली घेऊनच. त्याला म्हणले कसली पार्टी ? तर म्हणाला
आप पर आई हुई बला टालने में सफल हुए भैया।
कैसी बला ?
तर त्याने सांगितले, की त्या स्थळ पाहणी कार्यक्रमात जो काका मला प्रश्न विचारत होता तो मुळात एक "पकडव्वा विवाह गँग" चालवत असे.
म्हणजे काय ? तर ज्या पोरीच्या बापाला हुंडा परवडणार नाही तो हुंड्याच्या एक चतुर्थांश रक्कम देऊन गँगला कंत्राट देणार. ते सरळ बँक कर्मचारी, प्राथमिक मास्तर, प्राध्यापक, अगदी पोलिस शिपाई, कारकून, इंजिनियर इत्यादी मोस्ट एलिजिबल बॅचलर अपहरण करून देवळात आणणार अन् लग्न लावून देणार, कित्येकदा तर पोराला गुंगीचे औषध देऊन वगैरे, परत गॅरंटी असे पोराला/ त्याच्या फॅमिलीला धमकी की सून (?) घराबाहेर काढली तर पूर्ण कुटुंबाला गोळी घालू, तीन वर्षात पाळणा हललाच पाहिजे इत्यादी इत्यादी.
मी त्यांच्या टार्गेट वर आलो होतो ज्याच्यामुळे गौतम आणि त्याचा भाऊ टेन्शन मधे आले होते कारण मी पाहुणा होतो आणि माझी सेफ्टी त्यांना आपली जबाबदारी वाटत असे.
अर्थात नंतर ५ महिन्यांनी प्रकल्प संपला, मी दिल्लीला गेलो आणि गौतम दुसऱ्या एका प्रकल्पावर मिझोरामला गेला. कौटुंबिक संबंध आमचे अबाधित राहिले आहेत
आजही घरी आला की माझ्या बायकोची चेष्टा करतो,
भाभीजी शादी तो आपकी भैय्या के साथ हमने ही करवाई है, न तो पहले ही कोई रामप्यारी हमारी भाभी बन जाती और भैय्या बन जाते उनके राम दुलारे म्हणत.
अजब किस्सा वांड भाउ
अजब किस्सा वांड भाउ
टवणे सर, आहे खरा, लैच बेकार
टवणे सर, आहे खरा, लैच बेकार हालत झाली होती नंतर कुतूहल म्हणून पकडव्वा विवाह गँग कशा असतात काय करतात, अपहरण इंडस्ट्री कशी चालत असे इत्यादी वाचन केले होते तेव्हा "दृष्टीआड सृष्टी" हेच खरे म्हणून गप बसलो होतो.
"पकडव्वा विवाह गँग" >>
"पकडव्वा विवाह गँग" >> जबरदस्त किस्सा
डेंजर किस्सा आहे जेम्स!
डेंजर किस्सा आहे जेम्स!
बिहार मध्ये भाषा एकदम अदबशीर आणि वातावरण अचानक डेंजर होऊ शकते असा अनुभव आहे.
एकदा पश्चिम चंपारण्यातल्या नारकटियागंज गावी गेलो असताना टपरीवाला म्हणाला दोन दिवस आधी आला असतात तर छान गमंत पहायला मिळाली असती. पोलिसांनी तीन डाकू मारले आणि जीपला बॉडी बांधुन त्यांची गावात मिरवणूक काढली होती वाजत, गाजत. लोक नाचत होते म्हणे. (मग दोन दिवसांनी मला भयानक थरार अनुभवायला मिळाला, इथे अवांतर आहे ते खूप.)
धनुष आणि सारा अली खान यांच्या
धनुष आणि सारा अली खान यांच्या सिनेमात असं लग्न बघितल्याचे आठवतंय.
पण किस्सा एकदम थरारक आहे.
https://hi.wikipedia.org/wiki
https://hi.wikipedia.org/wiki/पकडौआ_विवाह
बापरे! हे तर लव्ह
बापरे! हे तर लव्ह जिहादपेक्षा जास्त डेंजर आहे.
Pages