कांदेपोहे कार्यक्रम, लग्नासाठी मुलांना/मुलींना भेटणे याचे धमाल किस्से

Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2021 - 00:52
meeting for arranged marriage

शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजकल पांव जम़ींपर नही पडतें मेरे
आनंद घ्या ह्या दिवसांचा

https://youtu.be/HiLs-dr4hoU

Submitted by निलुदा धन्यवाद Happy
अशीच situation आहे.. प्रेमात पागल म्हणतात ते काही खोटे नाही Lol

अमृताक्षर यावरून एक मोफत सल्ला , बघ पटतंय का, आपण अरेंज मॅरेज केस मध्ये तसे अनोळखीच असतो एकमेकांना ( भावी वधू वर) त्यामुळे काही बाबतीतली आपली मतं किंवा some insecurities , अशा काही गोष्टी ज्यांत आपण कधीही compromise करणार नाही, असतील तर त्याची स्पष्ट कल्पना द्यावी. पण आपल्या अपेक्षाही प्रमाणात ठेवाव्यात, थोडं तुझं बरोबर थोडं माझं‌‌ ठिके? असा स्टॅंड असावा. मला याचा उपयोग होतो अजूनही त्यामुळे झालं काय , जीयो और जीने दो अशी पॉलिसी तयार झालीये नकळत दोघांत Happy .

Submitted by भाग्यश्री१२३ >> अगदी पटलंय नक्की अमलात आणणार लग्नाआधीच सगळ्या गोष्टी स्पष्ट बोलून घेणार

थोडं तुझं बरोबर थोडं माझं‌‌ ठिके?" "जीयो और जीने दो " हे महत्वाचे आहे.

Submitted by vijaykulkarni >> होय खूप मुद्दे आहेत जे आता छोटे वाटतं आहे पण पुढे प्रॉब्लेम क्रिएट करू शकतील नक्की बोलून घेईल त्यांच्याशी अशा विषयांवर.. धन्यवाद Happy

अमृताक्षर अभिनंदन!
तू स्पर्धा परिक्षा देत होतीस ना?

Submitted by किट्टु२१ >> हो ना अजूनही चालू आहे private job सांभाळत थोडा साईड बाय साईड..हवी ती पोस्ट मिळाली की प्रायव्हेट जॉब सोडणार..

Pages