Submitted by ऋन्मेऽऽष on 27 December, 2025 - 13:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
फक्त आणि फक्त एक तोपासूफोटो
आणि तो कसा अपलोड करावा हे इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/1556
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली इथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तिची डबल हजारी भरली म्हणून हा नवीन धागा.
तो धागा ख्रिस्तमस्तच्या मस्त माहोल मध्ये संपला
इथे थर्टी फर्स्ट माहोलने सुरुवात करूया 
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चाय मसाला पुरी .
चाय मसाला पुरी


.
पुऱ्या मस्त दिसत आहेत.
पुऱ्या मस्त दिसत आहेत.
तोंपासु.
साबू बटाटा & पुर्या लाळगाळू.
साबू बटाटा & पुर्या लाळगाळू. इथे पोस्ट्स चा ओघ सध्या फार कमी झालेला वाटतोय.
परवा आम्ही बिना तांदुळाच्या इडल्या बनवल्या. फार भारी झाल्या. पण फोटो राहिलाच.
या पुर्या माझ्या फार
या पुर्या माझ्या फार आवडिच्या आहेत, नुसत्या खायला सुद्धा मजा येते..रुन्म्या कडच्या फार मस्त दिसतायत पातळ लाटल्यात तरी फुगल्यात छान !
धन्यवाद आणि फोटो ओघ आटल्याने
धन्यवाद आणि फोटो ओघ आटल्याने थोडी अतिरिक्त जबाबदारी.
शुद्ध सात्विक शाकाहार
या ब्रेकफास्टला .. आलूपुरी
या ब्रेकफास्टला .. पुन्हा आलूपुरी
Hi Tea आलू पोहे पॅन केक ..
Hi Tea
आलू पोहे पॅन केक ..
मस्त दिसतेय!
मस्त दिसतेय!
परवा आम्ही राजगिर्याचे पीठ वापरून असे पॅनकेक केले, त्यात दुधी घातला होता, पोहे, दही, मिर्ची, मीठ, तीळ, कोथिंबीर इत्यादी. रुजुता ची कॄती आहे ही.
मस्त दिसतात पॅन केक.
मस्त दिसतात पॅन केक. ऋन्मेष च्या बघून मी पण केल्या होत्या आलू पुरी, छान झाल्या होत्या.
इथे खूप दिवस झाले काही दाखवलं नव्हतं, दीप अमावास्येला मी आणि नातवाने मिळून केलेले हे कणकेचे दिवे. त्याला करायला आणि खायला दोन्ही साठी मजा आली. तुपाशी भारी लागतात पण घरात काही जण तूप अजिबात खात नाहीत म्हणून सगळ्यांवर सरसकट नाही घातलं तूप.
किती सुंदर आणि सुबक आहेत दिवे
किती सुंदर आणि सुबक आहेत दिवे!
कणकेचे दिवे खातात सुद्धा का?
कणकेचे दिवे छान दिसत आहेत
हे खातात सुद्धा का?
आमच्याकडे नाही कधी कोणी केले. त्यामुळे उकडतात की तळतात वगैरे काही कल्पना नाही.
हे खातात सुद्धा का? >> हो गुळ
हे खातात सुद्धा का? >> हो गुळ घालून केलेले असतात जनरली. तूप घालून खातात प्रसाद दाखवून झाला की.
आमच्या घरी बाजरीचे पण दिवे करायचे. ते पण उकडलेले असतात. त्यात गुळ साखर काही नसते. पण मग नंतर कुस्करून, दूध गुळ घालून खातात.
दिव्यांच्या अमावास्येला खास.
ममो मस्त दिसत आहेत दिवे
आमच्याकडे कणकेचे दिवे असले की
आमच्याकडे कणकेचे दिवे असले की प्रसादाला नुसते खायचे गूळ घालून अन् मुद्दाम थोडे बाजूला ठेवत, सायंकाळी मेथी लसूण घालून करायची अन् त्यात दिव्यात भरून खायची , दिव्याचा गोडवा + बेसनाची उकडलेली चव + कडसर मेथी + चरचरीत लसुण फ्राय + खरटपणा (मिठाचा)
काहीतरी वेगळे अन् भारी वाटे ते.
Ghee podi दोसा
Ghee podi दोसा
गाजराची कोशिंबीर, कारल्याची
गाजराची कोशिंबीर, कारल्याची परतून भाजी, सार भात आणि tofu sauted
पुणे फलाहार पनीर पहाडी ग्रील
पुणे फलाहार पनीर पहाडी ग्रील सँडविच आणि जामुन शॉट्स
मुग्धा, टोफू सॉटीड एकदम ऑड
मुग्धा, टोफू सॉटीड एकदम ऑड कॉम्बिनेशन वाटतेय..
दिवे फार आवडले.
दिवे फार आवडले.
दिवे आवडले, सर्वांना थँक्यु..
दिवे आवडले, सर्वांना थँक्यु..
मेथीच्या भाजीत घालून खायची आयडिया मस्त आहे.
दिवे खूप छान खुसखुशीत आणि हलके झाले होते. सगळ्यांना आवडले. करायला फार कठीण नसलेला, तेल तूप कमी असलेला असा हा साधा सोपा सर्वांना आवडणारा असा पदार्थ आहे आपण वर्षात खूप वेळा करू शकतो पण नाही केला जात. दिव्यांच्या अमावास्येला एकदाच केला जातो . एरवी नाही होत आठवण ह्या दिव्यांची.
मुग्धा तिन्ही फोटो आवडले. मस्त दिसतंय सगळंच.
>>>>>>आमच्याकडे कणकेचे दिवे
>>>>>>आमच्याकडे कणकेचे दिवे असले की प्रसादाला नुसते खायचे गूळ घालून अन् मुद्दाम थोडे बाजूला ठेवत, सायंकाळी मेथी लसूण घालून करायची अन् त्यात दिव्यात भरून खायची , दिव्याचा गोडवा + बेसनाची उकडलेली चव + कडसर मेथी + चरचरीत लसुण फ्राय + खरटपणा (मिठाचा)
वॉव!!! ऑफबीट मस्त वाटतय.
ऋन्मेष आणि मुग्ध - मस्त मस्त.
ऋन्मेष आणि मुग्ध - मस्त मस्त.
मुग्धा, टोफू सॉटीड एकदम ऑड
मुग्धा, टोफू सॉटीड एकदम ऑड कॉम्बिनेशन वाटतेय.. >>>> vegeterian लोकांसाठी protein पर्याय कमी त्यामुळे हेच खाव लागतं, असं छान लागत पण, खरंतर sauted पण नाहीये, tofu slice करुन तिखट मिठ, १ tsp तूप घालून मायक्रोवेव मध्ये १.५ मिनिटे high वर फिरवले.
ममो आणि सामो thank you
अजून काही फोटो पोस्ट करायचे आहेत, पण size जास्त आहे, compress करून post करेन
दिवे सुरेख दिसतायत, यावर्षी दिवे करायला जमलेच नाहीत
Ghee podi डोसा मस्त दिसतोय..
Ghee podi डोसा मस्त दिसतोय..
मेथीवाला कणकेचा दिवा वर्णन वाचून पाणी सुटले.
ममोताई वर्षभर करूही नका, बरेचदा काही पदार्थ त्या त्या सणाला वर्षातून एकदा केल्यानेच गंमत टिकून राहते.
>>>>>ममोताई वर्षभर करूही नका,
>>>>>ममोताई वर्षभर करूही नका, बरेचदा काही पदार्थ त्या त्या सणाला वर्षातून एकदा केल्यानेच गंमत टिकून राहते.
सौ टके की बात.
<<<
<<<
पण size जास्त आहे, compress करून post करेन
>>>
मी व्हॉट्सअपवर स्वताला पोस्ट करून सेव्ह करतो. ते मला फास्ट वाटते.
विषय निघाला म्हणून हे लिहिले. कोणी काही किचकट पद्धतीने करत असेल तर त्याला फायदा होईल.
बरेचदा काही पदार्थ त्या त्या
बरेचदा काही पदार्थ त्या त्या सणाला वर्षातून एकदा केल्यानेच गंमत टिकून राहते.
>>>> सौ टके की बात.
बरेचदा काही पदार्थ त्या त्या
बरेचदा काही पदार्थ त्या त्या सणाला वर्षातून एकदा केल्यानेच गंमत टिकून राहते. >> ऋन्मेऽऽष , करेक्ट आहे. पटलं तुझं म्हणण.
ममोताई वर्षभर करूही नका,
ममोताई वर्षभर करूही नका, बरेचदा काही पदार्थ त्या त्या सणाला वर्षातून एकदा केल्यानेच गंमत टिकून राहते.
सहमत, पदार्थाचा/ जागेचा जीआय टॅग असतो तसे हे असावे, चिंचवणी/गुळवणी व पोळ्या गावच्या जत्रेत बऱ्या होतात व लागतात, घरी प्रयत्न करता जमत नाहीत, गोंदवल्याची आमटी घरी re-create होत नाही तसेच हे आहे, कणकेचे दिवे दिव्याच्या अवशेला, कैरीची डाळ चैत्रात, नवरात्रीत कडकणी, चंपाषष्ठीला भरीत रोडगे हे फिक्स समीकरण (मला आत्ता इतके आठवले फक्त) , त्या त्या सणाला ते ते पानात पडले की सण सफल झाल्याची फिलिंग येत असे.
ममोताई वर्षभर करूही नका, >>मी
ममोताई वर्षभर करूही नका, >>मी पण समहत. त्या त्या सणाला आणि आम्ही कुणी येऊ तेव्हा करत जा फक्त.
<<<मुग्धा, टोफू सॉटीड एकदम ऑड कॉम्बिनेशन वाटतेय.. >>>> vegeterian लोकांसाठी protein पर्याय कमी त्यामुळे हेच खाव लागतं, असं छान लागत पण, >>>+१ खाण्यातील विविधता अशानेच येते.
मिरच्या, टोमॅटो, बटाटे, साबुदाणा असे कितीतरी पटापट आत्मसात केले आपण. म्हणजे नविन नविन प्रकार करणे व स्विकारणे हीच पारंपरिक खाद्य संस्कृती म्हणु शकतो. (टाळ्या खाऊ वाक्य आहे.)
खाऊगल्ली वरच्या टाळ्या खाऊ
खाऊगल्ली वरच्या टाळ्या खाऊ वाक्यासाठी जोरदार टाळ्या
Pages