Submitted by ऋन्मेऽऽष on 27 December, 2025 - 13:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
फक्त आणि फक्त एक तोपासूफोटो
आणि तो कसा अपलोड करावा हे इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/1556
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली इथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तिची डबल हजारी भरली म्हणून हा नवीन धागा.
तो धागा ख्रिस्तमस्तच्या मस्त माहोल मध्ये संपला
इथे थर्टी फर्स्ट माहोलने सुरुवात करूया 
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवे फोटो मस्त!
नवे फोटो मस्त!
@ मनीमोहोर,
@ मनीमोहोर,
तुमच्या कामातलं नीटनेटकेपण लपता लपत नाही. Always well made and aesthetically presented. ❤
मलाही वड्यांचा फोटो
मलाही वड्यांचा फोटो बघताक्षणीच ममो ताईंचा असणार, असं वाटलंच. त्यांच्या हाताला जे नीटस वळण आहे, त्याचा मला फार हेवा वाटतो.
अनाया प्लस one
अनाया प्लस one
मलाही वड्यांचा फोटो
मलाही वड्यांचा फोटो बघताक्षणीच ममो ताईंचा असणार, असं वाटलंच. त्यांच्या हाताला जे नीटस वळण आहे, त्याचा मला फार हेवा वाटतो. >> अगदी अगदी
ममो ताईंसाठी माझाही +786
ममो ताईंसाठी माझाही +786
उत्सवाचे वातावरण तयार झाले आहे धाग्यावर..
सामो, अस्मिता आणि मनीमोहोर
@ पर्णीका
लाह्या- पफ पोस्ट माहितीपूर्ण 👍
@ सामो, अस्मिता आणि मनीमोहोर तिघींना थँक्यू.
आता पुन्हा येईन ९० दिवसां नंतर 🙂
अनिंद्य, अनया, किल्ली, माझेमन
अनिंद्य, अनया, किल्ली, माझेमन , ऋन्मेष धन्यवाद..
फोटो बघून ओळखलं > माझ्या अश्याच होतात. ऑर्डर घ्या असं ही सांगतात खूप जण, पण आता पुन्हा कसली बांधिलकी नको वाटते.
हा धागा म्हणजे छळ आहे नुसता.
हा धागा म्हणजे छळ आहे नुसता. सर्व पदार्थ फोटो सुंदर आहेत. तोंपासु.
रक्षाबंधन निमित्त दुपारच्या
रक्षाबंधन निमित्त दुपारच्या पार्टीला मुलांच्या आवडीचा मेनू
.
ओणम, नारळीपौर्णिमा,
ओणम, नारळीपौर्णिमा, रक्षाबांधन सर्वांचे मेन्यू मस्त..
हे आमचे रक्षाबंधन स्पेशल

पार्णिका , छान माहिती.
पार्णिका , छान माहिती.
मग हे सो कॉल्ड मुरमुरे आरोग्याला चांगले नसतात का? as compared to og ones?
Considering the unhygenic conditions under which they are prepared...
सगळे पदार्थ छान
सगळे पदार्थ छान
हे लिहायचं राहिलं होतं
वाह सिमरन.. गुलाबजाम फोटो
वाह सिमरन.. गुलाबजाम फोटो अगदी पाकिटावर असतो तसा आला आहे.
अनिंद्य, छोले-पुरी बघून जीभ
अनिंद्य, छोले-पुरी बघून जीभ खवळायला लागली. बाजूचा मसाला कांदा पण भारीच. घेवर सहीच. कुठले आहेत?
हेमाताई, आरसपानी नारळाची बर्फी आणि वर पिस्त्याचे गालबोट - भारीच.
अस्मिताचा भरगच्च मेन्यू नाही हे बघून जरा बरे वाटले - नाहीतर उगाच भूक लागते.
मग हे सो कॉल्ड मुरमुरे आरोग्याला चांगले नसतात का? >>> ते ultra processed food आहेत. खरे कुरमुरे / लाह्या ultra processed food नसतात. pops आणि puffs मधला फरक गुगल करून बघा.
बर्फी आणि गुलाबजाम काय दिसतेय
बर्फी आणि गुलाबजाम काय दिसतेय! सगळेच फोटो मस्त आहेत.

ऋ ती भाजी मंचुरियन आहे का ? ओळखू येत नाहीये.
माधव
मी कुकीज केल्या बदामाच्या पावडरच्या, मैदा नाही यात.
वाह कुकीज मस्त दिसत आहेत. मला
वाह कुकीज मस्त दिसत आहेत. मला दुकानात कुकीज बघायला खूप आवडतात, पण त्या मोहाने विकत घेतल्यावर तितक्याच आवडीने पूर्ण खाल्या जात नाही. पहिल्यांदा खाईन तेवढेच. नेहमी होते हे
<< ऋ ती भाजी मंचुरियन आहे का? >> वाटीतली असेल तर हो, राईस सोबत आलेली ग्रेव्ही, आणि ताटातले पनीर चिली आहे जे शाकाहारमध्ये मुलाचे फेवरेट आणि पास्ता आहे तो लेकीचा आवडता. मग बाकी फाफट पसारा नसला तरी चालतो त्यांना
मंचुरिअन, पनीर चिली - आई ग्ग!
मंचुरिअन, पनीर चिली - आई ग्ग!! फार आवडते.
पर्णीका लाह्या नाहीत आणि मूळ
पर्णीका लाह्या नाहीत आणि मूळ धान्याच्या आकाराच्या नाहीत म्हणजे मशीनने बनवलेले असतील कल्पना आली होती. तुम्ही नेमकी प्रोसेस सांगितलीत, छान माहिती दिलीत.
पण यांना मुरमुरे म्हणायला हरकत नाही असे वाटते, वेगळे नाव नसल्यास.
मुरमुरे चर्चेसाठी इच्छुक इथे येऊ शकता, इकडे अवांतर वाढेल.
आमंड कुकीज़ देखण्या आहेत. अशा
आमंड कुकीज़ देखण्या आहेत. अशा खरपूस भाजलेल्याच आवडतात.
सिमरन, गुलाबजाम चमकदार आहेत फोटोतले. गडद रंगावरचे 👌 आधी फार आवडायचे, आता थोडे कमी आवडतात.
ते पांढरे शुभ्र रसगुल्ले मात्र आधीसारखेच आवडतात फक्त विकतचे असले तर आधी पिळून मग खावे लागतात, way too sweet for my tastebuds.
सौभाग्यवतींचा मूड लागला तर कधीतरी घरी केलेले ताजे गरम रसगुल्लेही लाभतात. कोलकत्याच्या चित्तरंजन सारखे 🤤
नारळ बर्फी फोटो उच्च
नारळ बर्फी फोटो उच्च पातळीवरचा आहे एकदम!
बदाम कुकीजही मस्त.
@ माधव,
@ माधव,
घेवर अनेकांकडचे ट्राय करून पसंत न पडल्याने शेवटी एका होम शेफ़ कडून बनवून घेतो. वर्षातून दोनदा - श्रावण आणि मकरसंक्रांत.
BTW, त्या आवडत्या diced onion sides साठी बोलणी खावी लागायची लहानपणी, विशेषतः आजोळच्या नातेवाईकांकडे.
पुरी+ रसभाजी असलेले जेवण म्हणजे तिकडे “पक्की रसोई”…. त्यासोबत भात, दही, ताज्या ओल्या चटण्या किंवा सलाद-कोशिंबिरी- कांदा वगैरे was a big no.
म्हणून कधीकधी उट्टे काढतो. 😀
गुलाबजाम अगदी परफेक्ट
गुलाबजाम अगदी परफेक्ट दिसताहेत.
हा स्वातीच्या रेसिपीने नारळीभात
या धाग्यावर अनिंद्य आणि
या धाग्यावर अनिंद्य आणि अस्मिता यांची डायनिंग टेबल्स आणि ऋ ची निळ्या फुलांची प्लेट आता पटकन ओळखू यायला लागली आहेत.
ऋ ची निळ्या फुलांची प्लेट >>
ऋ ची निळ्या फुलांची प्लेट >> हा हा, मी कालच हा वरचाच फोटो काढल्यावर बायकोला म्हणालो की रोज फोटोत एकच प्लेट येते नवीन घ्यायला नको का

आणि त्यावर ती म्हणाली घ्यायला कश्याला हवी, एवढ्या घरात आहेत स्टॉकमध्ये, बघ कुठली हवी ती काढ..
पण फोटोसाठी म्हणून नवीन हवीशी वाटली तरी बहुधा आपला घरच्या काही कपड्यात जसा कम्फर्ट असतो तसे जेवणाची प्लेट, चहाचा कप, कॉफीमग, पाण्याचा ग्लास इत्यादी मध्ये सुद्धा होत असावे. प्लेट बदलाविशी वाटत नाही. घरच्या जेवणाचा फिल त्यातच येतो
थँक्स फॉर कौतुक,अस्मिता
थँक्स फॉर कौतुक,अस्मिता किल्ली माझेमन अनिंद्य आणि रून्मेष. हल्ली गुलाबजाम गोड फार म्हणून केले जात नाहीत पण रक्षाबंधनाला आवर्जून करते लहानपणीपसूनचं समीकरण आणि भावाचे फेव्हरेट.
हो खरंय,नेहमीच्या फोटोतले टेबलं आणि ताट वाट्या ओळखायला येतायत.मी तर नाव नसतं तरी फक्त वड्या पाहूनही त्या ममोंच्या आहेत हे ओळखलं असतं इतक्या सुंदर आणि सुबक वड्या त्यांच्याच असतात.
सिमरन गुलाबजाम सुबक आणि गोंडस
सिमरन गुलाबजाम सुबक आणि गोंडस दिसतायत. माझेमन भात छान दिसतोय. गिचका अजिबात नाहीये. अस्मिताच्या कुकीज भयानक मस्त दिसतायत. खमंग, कुरकुरीत.
नारळाच्या वड्या सुरेख आहेत.
नारळाच्या वड्या सुरेख आहेत.
जयपूरला काही कामाने आल्यामुळे
जयपूरला काही कामाने आल्यामुळे काल स्थानिक जेवणाचा आस्वाद घेतला. खालील देशी थाटाचे जेवण आकंठ झाले बरेच हेवी होते पण अतिशय वेगळा आणि रस्टीक स्वाद मिळाला.
पानात - बेजड की रोटी (गहू , जव, काळे चणे, थोडी रागी आणि थोडा मका मिक्स पीठ - भाकरीसारखी जाड चपाती, चवीला बाटी सारखी असते नुसती खायला पण भारी लागते), सोबतीला मारवाडी लसूण चटणी, मिर्ची के टिपोरे, मारवाडी कढी (घट्टसर, कलोंजी, मेथीदाणे, ओवा, मोहरी, जिरे फोडणी), मसाला गट्टे भाजी, मसाला आलू भाजी. सोबतीला मसाला छास.
भारी बेत आहे
भारी बेत आहे
अगदी ऑथेंटिक दिसत आहे
Pages