खाऊगल्ली - आजचा मेनू - (७)

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 December, 2025 - 13:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फक्त आणि फक्त एक तोपासूफोटो
आणि तो कसा अपलोड करावा हे इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/1556

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली इथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तिची डबल हजारी भरली म्हणून हा नवीन धागा.

तो धागा ख्रिस्तमस्तच्या मस्त माहोल मध्ये संपला
इथे थर्टी फर्स्ट माहोलने सुरुवात करूया Happy

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्धा, अंडी गरम तेलातच फेटली का तव्यावर? जरा सविस्तर लिहिलंत तर करून बघते नक्कि.
तोफू राइसची पण कॄती लिहित येइइल का? हल्ली प्रोटिन वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत
>>>> Hi वृषाली
सोपी कृती आहे
बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो (प्रत्येकी २ tbsp), हिरवी मिरची, तिखट, मीठ हळद १ चमचा तेलात परतून घ्यायचं, एका छोट्या भांड्यात २-३ अंडी चांगली फेटून त्यात हे परतलेले मिश्रण घालून मग त्याच omlette करायचं.

टोफू rice ची फार काही वेगळी कृती नाहीये, कांदा टोमॅटो, मिरची, सिमला मिरची किंवा ज्या हव्या त्या भाज्या घ्या, मी १०० gm टोफू घेते, (२०० gm slab मधलं अर्ध घेते)
तेलात भाज्या आणि हवे ते मसाले (बिर्याणी/ गरम/ किचन किंग मसाला), मीठ परतून वरून tofu cubes आणि धुतलेले तांदूळ ( मी नैवेद्याची छोटी वाटी घेते, एकटीसाठी पुरेसे होतात, किंवा अर्धे तांदूळ अर्धी मुगडाळ घेते), दुप्पट किंवा तिप्पट पाणी घालून २-३ शिट्या करायच्या, झाला

खिरीच्या शेजारी दहीकांद्याची भाजी आहे तडका दिलेली आणि दुसरी तांबाट्याची चटणी आहे.
दोन्ही चपातीसोबत खाताना आणि दर दुसऱ्या घासाला एकेक चमचा खीर सुद्धा तोंडाला लावण्याने छान आंबट गोड फ्लेवरचे रसाळ ज्युसी जेवण झाले होते. नेहमीपेक्षा बरेच जास्त गेले Happy

<किट्टु २१ ज्वारीचे कुरमुरे कुठे मिळतात, हे साध्या भडंग सारखेच दिसतायत, भेळ मस्त दिसतेय>
Gud2eat website वरून मागवले.
ईथेच vb च्या एका धाग्यावर कोणीतरी लिंक दिलेली. चांगले लागतात पण बेसन लाडू सारखे तोंडात चिकटतात असं वाटलं मला.

अच्छा ही दही प्याज सब्जी खालल्ली आहे. इथे रेसिपी दिल्याबद्दल थँक्स रुन्मेष, माझ्याही कामी येईल.

किट्टु मी हैद्राबादला, इथे रत्नदीप सुपरमार्केट मध्ये पाहिले.

तांबाट्याची चटणी >> ह्याचीही रेसिपी मिळेल क प्लीज, धन्यवाद!!

मुग्धा, अनेकानेक धन्यवाद, दोन्हिही पदार्थ करून baghate

@ वृषाली,
ती स्वयंपाकाला ज्या ताई येतात त्यांनी केली आहे. तरी भेट होईल तेव्हा विचारून बघतो. बरेचदा आम्ही ती चटणी/भाजी आणि सोबत आलू पराठे असा बेत करतो. टोमॅटो सॉस सोबत पराठे खाण्यापेक्षा हे कॉम्बिनेशन भारी लागते.

दही प्याज की सब्जी मला पण करून बघावीशी वाटतेय.

नारळी पौर्णिमे निमित्त नारळीभात. त्या त्या सणाचं ते ते गोड करण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे वर्षातून एकदा तरी तो पदार्थ केला/खाल्ला जातो.

20260827_134718.jpg

नारळीभात तुम्ही नाही करणार तर कोण करणार Happy

आमच्याकडे लहानपणी करायचे. गेले कित्येक वर्षे इतर कुठेही खाल्ला नाही.

इथे रक्षाबंधन सुटी मिळत नाही तर नारळी पौर्णिमेला कुठे येऊ .. पण जेव्हा योग येईल तेव्हा मोदक खायला जरूर येईन Happy

आज परत पाहिले तर ज्वारीच नव्हे तर नाचणी आणि बाजरीचेही मुरमुरे बनतात हल्ली.
Screenshot_2026-08-27-19-44-06-19_92460851df6f172a4592fca41cc2d2e6.jpg
अद्याप आणले नाही कुठले. मोठी पाकीटंच होती सगळी.

आमचा आजचा मेनू
नारळीभात, गावच्या काकडीचे वडे सोबत काळ्या वाटाण्याची उसळ, पोहा मिरगुंड कुरडई, भजी
Screenshot_2026-08-27-23-46-59-40_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg

जबरदस्त!
फोटोची सुद्धा गरज नव्हती तोंडाला पाणी सुटायला..
मेनू काय याची पोस्टच पुरेशी

ज्वारी, नाचणी, बाजरीचे चुरमुरे dmart मध्ये मिळतात. नाचणीचे खाल्ले आहेत. वर लिहिल्याप्रमाणे थोडे दाताला चिकटतात. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून छान लागतात.

<<<आज परत पाहिले तर ज्वारीच नव्हे तर नाचणी आणि बाजरीचेही मुरमुरे बनतात हल्ली.>>>>

टेक्निकली मुरमुरे नाहीत ते. मुरमुरे म्हणजे अख्खा तांदळाचा दाणा (पारबॉईल्ड) विशिष्ट तापमान वर भाजुन तयार होणारा पदार्थ. तीच प्रक्रिया सगळ्या नाही पण काही धान्यावर केली तर त्याच्या लाह्या तयार होतील. ज्यात सभोवतालचे फायबर चे फाटलेले आवरण पण असेल (जे तांदळात आधीच काढून टाकलेले असते).

तुम्ही उल्लेख केला आहे ते पफ आहेत जे पीठ शिजवून, साच्यातून विशिष्ट दाबाखाली बाहेर काढून (extrusion) आणि नंतर वाळवून/भाजून तयार केले जातात तांदळाचे पीठ किंवा साबुदाणा आधी शिजवुन मग वाळवुन त्याचे पापड करतात तसेच काहीसे.

सर्व नवीन फोटोज् = 👌

ओणम, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन… जे तुम्ही celebrate करताय त्याच्या- त्याच्या शुभेच्छा घ्या.

9b2218af-432e-4ad7-a1c1-b87553892f44.jpeg

ओणम साद्या by वर्गीज़ सर + टीम.

मला यंदा त्यांनी केरल स्टाइल इडलीअप्पम कसे करायचे ते शिकवले.❤

पावसाळी हवा? मग असाच बेत हवा.

1a4bc10a-4e54-48a0-aefe-f688bdcfbce8.jpeg

छोले + पुरी. होम मेड.

श्रावणात एकदातरी हवेतच असे घेवर. सालाबादाप्रमाणे यंदाही - रक्षाबंधन स्पेशल 👇

79639b7e-3c31-424d-9bc8-7f489067f252.jpeg

आणि हो, खूप दिवसांनी फोटो डकवलेत. ज्यांना तारीफ़ करायची असेल त्यांनी चटकन करा, फोटोसाठी जागा नसल्याने लगेच डिलीट करण्यात येतील 😀

अनिंद्य, फारच भारी दिसतेय सगळे. आज छोलेच करणार आहे. डिलिट करायच्या धमकीमुळे ताबडतोब कौतुक करून टाकले. Happy

घेवर, छोले पुरी साद्या थाळी सगळ छान दिसतय.
जुई थाळी भारी दिसतेय.
नारळी पौर्णिमे निमित्त नारळाची बर्फी
20260828_191932.jpg
ओट्यावर लाईटच प्रतिबिंब पडत होतं म्हणून रुमाल घातला आणि ते वर्क झालं.

Pages